Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
“बाकी रोहितच्याही कॅप्टन्सी
“बाकी रोहितच्याही कॅप्टन्सी मधे दम नाही असे म्हटले तर मायबोलीचा सर्व्हर बंद पडेल इतक्या पोस्ट्स येतील का ?”!-
आता तू मला विचारलेला प्रश्न तुला परत विचारतो, ‘धागा शांत असल्याचं तुला सहन होत नाहीये का?’
ईशान किशन फास्टेस्ट द्विशतक.
ईशान किशन फास्टेस्ट द्विशतक.. १२६ चेंडूत.. राडा...
त्या दिवशी शर्मा दुखापत असूनही खेळायला आला आणि जे कमाल खेळला तेव्हा जसे लोकांना त्याचे कौतुक करायला जड गेले तसे आज होऊ नये
प्लीज करा कौतुक पोराचे
किशन भारी खेळाला आज.
किशन भारी खेळाला आज. कोहलीनेही 3 वर्षानंतर फायनली ODI शतक मारले.
महत्वाची खबर म्हणजे उनाडकट चं 12 वर्षांच्या गॅप नंतर कसोटी संघात पुनरागमन.
आज बायकांचा भारत ऑस्ट्रेलिया
आज बायकांचा भारत ऑस्ट्रेलिया सामना ज्यांनी पाहिला नाही त्यांनी जरूर बघा. काटाकिर्र मॅच झाली. वन ऑफ द बेस्ट. सुपरओवर. फुल्ल पैसा वसूल. आणि मुळात पैसाही द्यायचा मव्हताच. मुंबईकरांसाठी फ्री होता. माझे काही व्हॉटसप क्रिकेट ग्रूपवरचे मित्र गेलेले. नालायक आधी सांगितले असते तर कदाचित मी सुद्धा गेलो असतो.
महत्वाची खबर म्हणजे उनाडकट चं
महत्वाची खबर म्हणजे उनाडकट चं 12 वर्षांच्या गॅप नंतर कसोटी संघात पुनरागमन. >> फे फ तुझ्या दु:खात सहभागी आहे
उनाडकट ने गेल्या काही वर्षांमधे प्रचंड बदल दाखवला आहे हे मान्य आहे पण एव्हढे तरुण पर्याय असताना त्याला आणणे समजले नाही. लाँङ टर्म पर्याय म्हणून बघत नसाल तर नविन रक्ताला सराव देणे जास्त योग्य ठरले असते असे वाटले.
किशन भारी खेळला आज, रोहित राहुल धवन मधे तो आट्यापाट्या खेळत राहणार हे मात्र उघड आहे. खर तर पुढच्या वर्ल्ड कप चा विचार करता काय तीन जण फायनल ठरवायचे असतील ते धरून त्यांनाच वर्षभर सलग खेळवत राहिले तर बरे होईल .
उनाडकट ने गेल्या काही
उनाडकट ने गेल्या काही वर्षांमधे प्रचंड बदल दाखवला आहे हे मान्य आहे पण एव्हढे तरुण पर्याय असताना त्याला आणणे समजले नाही. लाँङ टर्म पर्याय म्हणून बघत नसाल तर नविन रक्ताला सराव देणे जास्त योग्य ठरले असते असे वाटले. >>>>
तरुण पर्याय आहेत पण आणणार कोणाला ? उमरान सोडल्यास एकही उपलब्ध नाही.
प्रसिद्ध, कुलदीप सेन, सकारिया, चाहर (तरुण नसला तरी), यश दयाळ, खलील, मुकेश कुमार - सगळे इन्जुरड असल्याने NCA मध्ये रिहॅब साठी बसलेले आहेत.
गेल्या काही दिवसात इथे फारसं
गेल्या काही दिवसात इथे फारसं लिहायला जमलं नाही. परवा किशन जबरदस्त इनिंग खेळून गेला. ह्या एका इनिंगच्या जीवावर तो लगेच त्याची जागा पक्की करणार नाही कदाचित, पण एक सॉलिड पर्याय त्याने दिला हे नक्कीच. त्याच्या सेंच्युरीच्या वेळी जाणवलेल्या दोन गोष्टी - कोहली पूर्णवेळ सेकंड फिडल खेळला. २०० वी धाव पूर्ण करताना किशनच्या आधी कोहलीने बॅट उंचावली होती. नंतरही तो नाचत नाचत आला आणि त्याने किशन ला मिठी मारली. मला त्याचं हे टीममेट चं यश साजरं करणं आवडलं.
"रोहित राहुल धवन मधे तो आट्यापाट्या खेळत राहणार " - सहमत. गिलचं ही नाव त्यात अॅड कर. बरेच वेळा जसं होतं तसं वर्ल्डकप नंतर एकदम बदल होतील आणि ह्या (आजच्या) तरूण मुलांना संधी मिळेल.
उनाडकटने गेल्या काही वर्षांत डोमेस्टिक क्रिकेटमधे प्रचंड कन्सिस्टंसीने परफॉर्म केलंय. एक बॉलर म्हणून आणि एक कॅप्टन म्हणून त्याची कामगिरी कौतुकास्पद आहे. पण ३२ व्या वर्षी तो लाँग टर्म पर्याय नाही हे तितकच खरं. अक च्या म्हणण्याप्रमाणे इंज्युरी लिस्ट चा परिणाम आहे. मुळात बुमराह, शामी खेळत असते, तर ते दोघं, उमेश आणि सिराज ह्या पलिकडे भारताने पाहिलं नसतं. उनाडकट बरोबर सैनी ला सुद्धा टीम मधे घेतलंय. सैनीपेक्षा उनाडकटकडे व्हेरिएशन्स जास्त आहेत. पण दोघंही कदाचित खेळणार नाहीत. सिराज, उमेश च्या बरोबरीनं कदाचित ठाकूर तिसरा (मिडियम) पेसर म्हणून खेळेल (त्या जागी खरं तर पंड्याने खेळायला हवं). अश्विन आणि अक्षर स्पिनर्स असतील. बाकी, राहूल, शुभमन, पुजारा, कोहली, अय्यर, पंत अशी बॅटिंग असेल असा माझा अंदाज आहे.
फेरफटका / असामी
फेरफटका / असामी
चितगाँव चा ट्रॅक रेकॉर्ड पाहता 3 सीमर्स खेळवणे कठीण वाटते. इथे जनरली स्पिंनर्स हैदोस करतात.
प्रसिद्ध, कुलदीप सेन, सकारिया
प्रसिद्ध, कुलदीप सेन, सकारिया, चाहर (तरुण नसला तरी), यश दयाळ, खलील, मुकेश कुमार - सगळे इन्जुरड असल्याने NCA मध्ये रिहॅब साठी बसलेले आहेत. >> उमेश नि सिराज आहेतच कि दोघे जण. शार्दुल आहे नि सैनी पण आहे मला वाटते. (उमेश तरुण नाही पण त्याचा फिटनेस चांगला आहे नि सब काँटीनेंट मधे तो दादा आहे. त्याचा रेकॉर्ड झक्कसच आहे भारताच्या टेस्ट मधला. ) बांग्लादेश असल्यामूळे मलिक ला ठेवायला हरकत नव्हती बॅकप ठेवायचा असेल तर.
उमेश आणि सिराज दोघेच सिमर
उमेश आणि सिराज दोघेच सिमर खेळतील असं मला वाटतं.
पीच चा रेकॉर्ड बघता (सुरुवातीला फ्लॅट आणि मग टर्नर) अश्विन + अक्षर + कुलदीप / सौरभ असा अटॅक असेल.
अश्विन + अक्षर + कुलदीप /
अश्विन + अक्षर + कुलदीप / सौरभ असा अटॅक असेल. >> सौरभ ला खेळवाच रे . काय आकडे आहेत त्याचे डोमेस्टिक मधले.
आज पासून नवा रणजी चषकाचा
आज पासून नवा रणजी चषकाचा हंगामहि सुरु होतोय.
बघूया यावर्षी मुंबई कसे काय परफॉर्म करतात. ग्रुप तर सॉलिड टफ मिळालाय आणि नॉकआऊट ला क्वालिफाय करायलाही घाम निघणार आहे
मुंबई, दिल्ली, सौराष्ट्र, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि हैद्राबाद (सोबत आसाम आणि आंध्र).
पूर्ण स्ट्रेंग्थ टीम खेळू
पूर्ण स्ट्रेंग्थ टीम खेळू शकली तर मुंबईची बॅटींग सॉलिड तगडी आहे - शॉ, जैस्वाल, राहाणे, सूर्या, सर्फराझ, अय्यर, शर्मा, ठाकूर
राहुल पंत ऐवजी कप्तान कसा काय
राहुल पंत ऐवजी कप्तान कसा काय झाला आणी ? पंट लिमिटेड ओव्हर्स मधे डीसअपॉईंटींग असला तरीही टेस्ट मधे खणखणीत नाणे आहे वाजलेले.
पंत कप्तान न होईल तरच बरे
पंत कप्तान न होईल तरच बरे
त्या नादात वाट लागलीय त्याची
बरयाच ठिकाणी वाचल्या प्रमाणे
बरयाच ठिकाणी वाचल्या प्रमाणे थिंकटॅंकच्या हिशोबात रोहित च्या अनुपस्थिती मध्ये कसोटी कर्णधार म्हणून राहुलच इनकमबंट आहे.
का ते दुसऱ्या राहुल / लक्ष्मण लाच माहिती.
पूर्ण स्ट्रेंग्थ टीम खेळू
पूर्ण स्ट्रेंग्थ टीम खेळू शकली तर मुंबईची बॅटींग सॉलिड तगडी आहे >>>>
हो, पण बॉलिंग चा बऱ्यापैकी वांधा आहे.
हो, पण बॉलिंग चा बऱ्यापैकी
हो, पण बॉलिंग चा बऱ्यापैकी वांधा आहे. >> बॉलिंग मुलाणी च्या भारदस्त खांड्यावर आहे
बरयाच ठिकाणी वाचल्या प्रमाणे थिंकटॅंकच्या हिशोबात रोहित च्या अनुपस्थिती मध्ये कसोटी कर्णधार म्हणून राहुलच इनकमबंट आहे. >> हो तसे संदर्भ पाहिले आहेत फक्त त्यांनी राहुल ने कप्तान म्हणून असे काय वेगळे केले आहे ते कधी नि कुठे पाहिले हे लक्षात येत नाही.
“राहुल पंत ऐवजी कप्तान कसा
“राहुल पंत ऐवजी कप्तान कसा काय झाला आणी” - रोहित च्या कॅप्टन्सीत राहूल च व्हाईस कॅप्टन (based on availability) आहे. पंतचा प्रयोग न्यूझिलंडपुरता होता. मला वाटतं ती त्याच्यासाठी perform or perish संधी (लिमिटेड ओव्हर्स मधे) असावी.
आता राहूलचं कॅप्टन/व्हाईस कॅप्टन म्हणून काय कर्तृत्व आहे ते मात्र विचारू नकोस. म्हणजे, विचार, पण उत्तर नाहीये
perform or perish संधी
perform or perish संधी (लिमिटेड ओव्हर्स मधे) असावी. >> तेच तर कळत नाहिये. लिमिटेड ओव्हर्स मधे पं अजूनही यथा तथाच आहे हे उघड आहे. पण टेस्ट मधे राहुल च्या आधीही त्याचे नाव सर्कल केले जाईल. म्हणून विचित्र वाटले. आता पंतच कॅप्टन/व्हाईस कॅप्टन म्हणून काय कर्तृत्व आहे हे विचारू नकोस.
“ पण टेस्ट मधे राहुल च्या
“ पण टेस्ट मधे राहुल च्या आधीही त्याचे नाव सर्कल केले जाईल” - मध्यंतरी कुठल्याश्या टूर ला बुमराह सुद्धा व्हाईस कॅप्टन होता ना? ती पोझिशन अमेरिकन व्हिसासारखी वाटते हल्ली. कधी, कुणाला, का मिळेल ते सांगता येत नाही.
IND 49/3 (20.3) CRR: 2.39
IND 49/3 (20.3) CRR: 2.39
Day 1: 1st Session
आपण काय बोलणार ? भारी भारी लोक खेळताहेत ना.
४८-३ होते
४८-३ होते
चुम्माने पुन्हा काऊंटर अटेक करून गेम पलटवला
आऊट मात्र फालतू झाला. शतक आले असते तर मजा आली असती.
पण या सगळ्यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान ५० सिक्स मारायचा विक्रम रचला.
आज प्रत्येक जण अपेक्षेप्रमाणे
आज प्रत्येक जण अपेक्षेप्रमाणे खेळला असे म्हणता येईल (राहुल वगळता - बांग्लादेश असताना हुकुमी शतक टाकले नाही) पिच अपेक्षेप्रमाणे फडतूस आहे, ३-४ दिवसांनी सरपटी बॉल्स जातील का ?
बाकी अय्यर स्पिन खेळणारा आजचा सर्वोत्क्रूष्ट फलंदाज आहे असे माझे मत होत चालले आहे. निव्वळ वासरात लंगडी गाय असा प्रकार नसून जनरलच त्याचा स्पिन चा रिड , त्यानुसार केलेले पदलालित्य नि फिरकी गोलंदाजाला सेटल न होउ देण्यासाठी केलेले शॉट्स नैसर्गिक वाटतात.
जाता जाता, अर्जुन तेंडूलकर ने राजस्थानविरुद्ध शतक मारले. आधीच्या टूर्नामेंट म्धे बरी बॉलिंग केली होती. पुढचा रोहन गावसकर तरी व्हायची क्षमता नक्की वाटतेय.
"आज प्रत्येक जण
"आज प्रत्येक जण अपेक्षेप्रमाणे खेळला असे म्हणता येईल " - दोन्ही ओपनर्सचं शॉट सिलेक्शन भयानक होतं.
महाराष्ट्राने दिल्लीला एकही विकेट न देता २००+ रन्स ची पार्टनरशिप केली दिल्लीविरूद्ध. मुंबईकडून सर्फराझ चा रन फ्लो एकदमच आटलाय. रहाणे ला कमबॅक करायची इच्छाच नाहीये का जमत नाहीये, कळत नाही.
रहाणे ला कमबॅक करायची इच्छाच
रहाणे ला कमबॅक करायची इच्छाच नाहीये का जमत नाहीये, कळत नाही. >>>>
माझं प्रामाणिक मत आहे कि रहाणे बॅट्समन म्हणून टर्मिनल डिक्लाईन मध्ये आहे. कमबॅक चे चान्स जवळपास संपलेले आहेत.
पिच अपेक्षेप्रमाणे फडतूस आहे, ३-४ दिवसांनी सरपटी बॉल्स जातील का ? >>>>
अक्षर ने या पीच वर 3-4 थ्या दिवशी धुमाकूळ घातला पाहिजे.
“अक्षर ने या पीच वर 3-4 थ्या
“अक्षर ने या पीच वर 3-4 थ्या दिवशी धुमाकूळ घातला पाहिजे” - आत्ताच काहीतरी स्टॅट दाखवलं कि हे पीच ४थ्या आणि पाचव्या दिवशी बॅटींग फ्रेंडली होतं. अश्विन, अक्षर, कुलदीपने हे स्टॅट खोटं ठरवलं तर मजा येईल.
३ बाद ४८ नंतर आता ७ बाद ३५१.
३ बाद ४८ नंतर आता ७ बाद ३५१. चांगली सुधारणा शेपटामध्ये. कसोटीत एवढे शेपूट बर्याच दिवसांनी वळवळतेय.
अश्विन आणि कुलदीपने मस्त
अश्विन आणि कुलदीपने मस्त पार्टनरशिप केली. आता बांग्लादेशच्या उरलेल्या विकेट्स लवकर जायला हव्या.
अडीचशेच्या आसपास आघाडी घेऊन
अडीचशेच्या आसपास आघाडी घेऊन पुन्हा फलंदाजी करतील व चौथ्या डावात बांग्लादेशला खेळायला लावतील असे वाटते.
Pages