Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आत्ताच काहीतरी स्टॅट दाखवलं
आत्ताच काहीतरी स्टॅट दाखवलं कि हे पीच ४थ्या आणि पाचव्या दिवशी बॅटींग फ्रेंडली होतं. >> मी पाहिल एतेंव्हा इथे नक्की काय होईल सांगता येत नाही अशी टेप होती रे
बांग्लादेशच्या टेस्ट हे ऑसी साठी परफेक्ट प्लॅनिंग आहे. अश्विन ला टेस्ट मोड मधे यायला लागणारा वेळ इथे मिळेल नि तोवर बाकीचे मॅनेज करतील. बॅटस्मन ना पण मोड स्विच ऑन व्हायला वेळ मिळेल.
कमबॅक चे चान्स जवळपास संपलेले आहेत. >> दुर्दैवाने असे वाटते खरे.
<<<आत्ताच काहीतरी स्टॅट
<<<आत्ताच काहीतरी स्टॅट दाखवलं कि हे पीच ४थ्या आणि पाचव्या दिवशी बॅटींग फ्रेंडली होतं>>>
तरी ५१३ म्हणजे जरा जास्तच आहेत. तरी सामना अनिर्णित होऊ नये. दोन दिवसात १० ग॑डी बाद करायला पाहिजेत - पण काही भरोसा नाही
पहिल्या एकदिवशीय सामन्यात त्यांच्या शेवटच्या जोडीने ५१ धावा करुन सामना जिंकला.
बांगलादेश चौथ्या इंनिंग मध्ये
बांगलादेश चौथ्या इंनिंग मध्ये घाम काढणार असं दिसतंय.
४थ्या डावात ५०० धावा करून
४थ्या डावात ५०० धावा करून जिंकल्यास धमाल!!!
आता ४०० धाव्या हव्यात बरोबर किमान १५० षटकांत. आणि १० बळी बाकी सोपे नसले तरी अशक्य नाही!
ईंग्लंडने डिक्लेअर केले
ईंग्लंडने डिक्लेअर केले तेव्हा ग्रेट डिक्लेरेशन
आपण केले तर चिंता
सहा बाद झाल्यवर कुठे चिंता
सहा बाद झाल्यावर कुठे चिंता मिटली.
भारताच्या दृष्टीहीन संघाने
भारताच्या दृष्टीहीन संघाने बांग्लादेशला हरवून क्रिकेट विश्वकप जिंकला !
सद्ध्याची इंडियन बायकांची टीम
सद्ध्याची इंडियन बायकांची टीम पाहून मला लेट ९०‘ज, अर्ली २०००‘ज मधली पुरूषांची टीम आठवते. ते असेच ऑस्ट्रेलियाच्या तगड्या टीमशी भिडायचे. थोडक्यात कमी पडायचे, पण त्यातून हळू हळू एक सातत्यानं जिंकणारी, स्ट्राँग टीम घडत गेली. होपफुली मुलींच्या टीमचं पण भविष्य उज्ज्वल असेल.
उमेश ने खूप छान बॉलिंग केली.
उमेश ने खूप छान बॉलिंग केली. दोन कॅचेस टाकले नसते तर त्याचे नंबर अजून चांगले दिसले असते.
अक्षर ने हि झकास बॉलिंग केली. त्याला लवकर आणायला हवे होते.
अश्विन चा परफॉर्मन्स थोडा चिंताजनक होता. कंसिस्टन्ट लाईन - लेंग्थ टाकायचे सोडून उगाच जास्तच एक्सपेरिमेंट करत होता असे वाटले.
ऑस्ट्रलिया - द आफ्रिका
ऑस्ट्रलिया - द आफ्रिका कसोटीचा पहिला दिवस बघायला मजा आली. गॅब्बा ची पीच पूर्णपणे हिरवी आणि फास्ट बॉलर ना अनुकूल बनवली आहे.
आधी ऑस्ट्रेलिया ने द आफ्रिकेची दाणादाण उडवली आणि त्यांना 152 ला खोलले.
उत्तरादाखल ऑस्ट्रेलिया ची परिस्थितीही 27-3 अशी बिकट होती. मग हेड आणि स्मिथ ने चांगली भागीदारी करून परिस्थिती जरा सुधारली.
हेड ची ईनिंन्ग फाईट फायर विथ फायर अशीच होती जसा एका काळी सेहवाग काउंटर अटॅक करायचा.
तळटीप - कॅम ग्रीन स्लिप / गली मध्ये कमालीचा फिल्डर आहे. त्याची साईझ (6"7') बघता अशक्य चपळ रिफ्लेक्स आहेत.
आफ्रिका ऑस्ट्रेलिया टेस्ट 2
आफ्रिका ऑस्ट्रेलिया टेस्ट 2 दिवसाच्या आत संपली.
(शेवटच्या डावात 35 करताना ऑसीज च्या 4 विकेट्स गेल्या. पण कुणाला पीच बद्दल तक्रार वगैरे करावीशी वाटली नाही.
बॉलर्स चा कमाल परफॉर्मन्स वगैरे टायटल झिंदाबाद.
हेच सब काँटिनेंट मधे झालं असतं तर गोरे लोक पँट वर कोल्हापुरी मटणाचा रस्सा सांडल्यासारखे टणाटणा उडायला लागले असते.
इंग्लंड रडवतय पाक ला.
बाबर खेरीज इतर लोक म्हणत असतील की हे येत नव्हते तेच बरं होतं. दुबई च्या पाटा विकेट्स वर काहीतरी चान्स मिळायचा.
सद्ध्याची इंडियन बायकांची टीम
सद्ध्याची इंडियन बायकांची टीम पाहून ... मुलींच्या टीमचं पण भविष्य उज्ज्वल असेल.
>>
पूर्ण पोस्ट ला मोदक.
कानिटकर ला कोच म्हणून बघायला बरं वाटलं.
रहाणे ला कमबॅक करायची इच्छाच
रहाणे ला कमबॅक करायची इच्छाच नाहीये का जमत नाहीये, कळत नाही. >>>>
व्हाईट बॉल टीम मधे यायच्या हट्टापायी रेड बॉल टीम मधली जागाही घालवून बसलाय.
पुजारा पद्धतशीर पणे इंग्लंड ला जाऊन काउंटी खेळून फॉर्म परत मिळवून आला. आपण फक्त रेड बॉल प्लेअर असणार आहोत हे त्यांनी ॲक्सेप्ट केलंय. रहाणे त्यावेळी आयपीएल अन् डोमेस्टिक लिमिटेड ओव्हर्स च्या मॅचेस खेळत होता. त्यातून हाती काहीच लागलं नाही (यंदाच्या आयपीएल मधे मोस्टली अंडी उबवेल असंच दिसतंय).
आता पुढच्या समर मधे काउंटी खेळायला गेला तरी वर्ष हातामधून गेलंय, आणि तेवढ्यात अय्यर नी जागेवरही दावा लावलाय.
I guess he has played his last game...
ऑस्ट्रेलिया सिरीज नंतर जरा बरा खेळला असता तर आत्ता रेड बॉल कॅप्टन असता. बॅटर रहाणे मुळे आपण कॅप्टन रहाणे ला मुकलोय...
ऑस्ट्रेलिया सिरीज नंतर जरा
ऑस्ट्रेलिया सिरीज नंतर जरा बरा खेळला असता तर आत्ता रेड बॉल कॅप्टन असता. बॅटर रहाणे मुळे आपण कॅप्टन रहाणे ला मुकलोय... >> +१
सद्ध्याची इंडियन बायकांची टीम पाहून ... मुलींच्या टीमचं पण भविष्य उज्ज्वल असेल. >> आमेन टू दॅट.
शेवटच्या डावात 35 करताना ऑसीज च्या 4 विकेट्स गेल्या. पण कुणाला पीच बद्दल तक्रार वगैरे करावीशी वाटली नाही. >> एल्गार ने एल्गार जाहीर केला ना पिचबद्दल. मला तरी अन एव्हन बाउन्स होता असेच वाटलेले.
"बॅटर रहाणे मुळे आपण कॅप्टन
"बॅटर रहाणे मुळे आपण कॅप्टन रहाणे ला मुकलोय" - टोटली अॅग्रीड!
"मला तरी अन एव्हन बाउन्स होता असेच वाटलेले." - एल्गरने निषेध केलाय. पुअर रेटिंग मिळायला हवंय - मिळेलही पीच ला. पण अहमदाबाद आणि ब्रिस्बेनच्या पीचेसमधला मुख्य फरक हा होता की अहमदाबादला कुणाच्या जीवावर बेतलं नसतं, तर ब्रिस्बेनला इंज्युरीची शक्यता भरपूर होती.
इंज्युरी मुळे का होईना, राहुल
इंज्युरी मुळे का होईना, राहुल टीम मधून बाहेर जायचे चांसेस...
तसं झालं तर इश्र्वरन ला पदार्पणाची संधी मिळेल अन् पुजारा ला टीम लीड करायची...
कुठल्या का कोंबड्याच्या आरवण्यानी असेना, उजाडल्याशी मतलब...
चिकट गुंडा राहुल खेळतोय, पण
चिकट गुंडा राहुल खेळतोय, पण पहिल्या मॅच च्या स्टार परफॉर्मर कुलदीप ला बाहेर बसवून उनाडकट ला आत घेतलंय...
बांगलादेश चे दोन्ही ओपनर्स आऊट झालेत अन् २० ओव्हर्स नंतर ५२/२ स्कोअर आहे...
बघुया पुढे काय होतं...
२२७ मध्ये बाद केले!
२२७ मध्ये बाद केले!
तरी कुलदीपला का बाहेर बसविले असावे ?? ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुढच्या मॅच मध्ये फीट असूनही बाहेर बसलाय ते देखिल आशियायी खेळपट्टीवर! ऑस्ट्रेलियात पर्थची गवताळ खेळपट्टी असती तर समजू शकलो असतो.
राहुल च्या मते पिच वर थोडं
राहुल च्या मते पिच वर थोडं गवत होतं, म्हणून 3 सीमर्स खेळवले.
कुलदीप च्या गेल्या मॅच मधल्या परफॉर्मन्स नंतर त्याच्यावर थोडा जास्त विश्वास दाखवायला हवा होता. अक्षर ला बसवून उनाडकटला घेता आलं असतं.
द्रविड कोच झाल्यावर थिंक टँक च्या प्रोसेस मधे फरक पडेल असं वाटलं होतं, पण तसं काही दिसत नाहीये. द्रविड ए टीम साठीच बेटर होता असं वाटतंय.
राजकारण म्हणूनही एक प्रकार
राजकारण म्हणूनही एक प्रकार असतो
आपण फक्त क्रिकेटचे निकष लाऊन विश्लेषण करू तर असेच भंजाळून जाऊ
“ कुलदीप च्या गेल्या मॅच
“ कुलदीप च्या गेल्या मॅच मधल्या परफॉर्मन्स नंतर त्याच्यावर थोडा जास्त विश्वास दाखवायला हवा होता. अक्षर ला बसवून उनाडकटला घेता आलं असतं.” - कुलदीपला वगळणं अनपेक्षित होतं, पण अक्षरला काढून बॅटिंग कमकुवत करणं - ते सुद्धा जडेजा/पंड्या नसताना आत्मघतकी ठरू शकतं. कुलदीपसाठी हा कॉल अनफेअर आहे.
कालच्या दिवसाचा खेळ पहाता, उनाडकटचं सिलेक्शन योग्य ठरू शकेल अशी शक्यता वाटायला लागलीय. त्याने बॉलिंग पण चांगली केली. अजून चार दिवस शिल्लक आहेत, बघू काय होतं.
बिचारा कुलदीप यादव..
बिचारा कुलदीप यादव..
पहिल्या कसोटीत फलंदाजीतही महत्वपुर्ण क्षणी ४० धावा काढल्या होत्या.
कुलदीपला वगळणं अनपेक्षित होतं
कुलदीपला वगळणं अनपेक्षित होतं, पण अक्षरला काढून बॅटिंग कमकुवत करणं - ते सुद्धा जडेजा/पंड्या नसताना आत्मघतकी ठरू शकतं. कुलदीपसाठी हा कॉल अनफेअर आहे. >> +१. फार पर्याय नव्हता असे वाटते. पिच वर रीव्हर्स होईल असे दिसतेय नि जयदेव यादव एव्हढीच बॅटींग करतो तेंव्हा तो उचलला गेला असावा. ह्यात काही राजकारण आहे असे मला तरी वाटत नाही.
खेळपट्टी ३ र्या दिवशी
खेळपट्टी ३ र्या दिवशी सामन्याचा सोक्षमोक्ष लावणार असे दिसतेय. जो चांगली फिरकी खेळेल तो जिंकेल.
गिल, दुसरा ओपनर, पुजारा,
गिल, दुसरा ओपनर, पुजारा, कोहली, अय्यर, पंत, आश्विन हे 7 बॅटर असताना, उडणकट ही कुलदीप इतकीच बॅटिंग करत असताना आपल्याला अक्षर च्या बॅटिंग ची इतकी गरज लागणं आणि त्यापायी कुलदीप च्या बोलिंग चा बळी देणं हे लज्जास्पद आहे.
बॅटिंग ची इतकीच पडलेली असती तर राहुल बाहेर असता. त्याला इंज्यूरी झाल्याच्या बातम्या असूनही तो खेळतोच आहे अन् परफॉर्म करूनही कुलदीप बाहेर यामुळे राजकारणाचा वास येतो...
कुलदीप गेल्या खेपेला ही ५ विकेट्स घेऊन बाहेर गेला होता...
पुजाराही गेला. .. ३ डाऊन
पुजाराही गेला. .. ३ डाऊन
त्यांच्या स्पिनरनी जखडले आहे आपल्या.
कुलदीपला न खेळवणे हे अंगाशी येणार आता..
पुजाराही गेला. .. ३ डाऊन
पुजाराही गेला. .. ३ डाऊन
त्यांच्या स्पिनरनी जखडले आहे आपल्या.
कुलदीपला न खेळवणे हे अंगाशी येणार आता..
पुजाराही गेला. .. ३ डाऊन
पुजाराही गेला. .. ३ डाऊन
त्यांच्या स्पिनरनी जखडले आहे आपल्या.
कुलदीपला न खेळवणे हे अंगाशी येणार आता..
पुजाराही गेला. .. ३ डाऊन
पुजाराही गेला. .. ३ डाऊन
त्यांच्या स्पिनरनी जखडले आहे आपल्या.
कुलदीपला न खेळवणे हे अंगाशी येणार आता..
पुजाराही गेला. .. ३ डाऊन
पुजाराही गेला. .. ३ डाऊन
त्यांच्या स्पिनरनी जखडले आहे आपल्या.
कुलदीपला न खेळवणे हे अंगाशी येणार आता..
Pages