Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुन्हा चुम्मा आणि अय्यर..
पुन्हा चुम्मा आणि अय्यर.. फिरकीची ठासत आहेत
बिच्चार्या पंतला फक्त लाल
बिच्चार्या पंतला फक्त लाल चेंडू दिसतो खेळताना. पांढरा चेंडू नीट दिसत नाही.
सहाव्यांदा नाईंटीजमध्ये गेला.
सहाव्यांदा नाईंटीजमध्ये गेला..
अष्टपैलू अक्षर चार धावा काढून
अष्टपैलू अक्षर चार धावा काढून पसार.
त्याला आश्विनच्या आधी कश्याला पाठवला. आश्विन कसोटीत बाप फलंदाज आहे.
त्याला आश्विनच्या आधी कश्याला
त्याला आश्विनच्या आधी कश्याला पाठवला
>>
के एल राहुल ला कॅप्टन असण्याचा फारसा अनुभव नाही. आयपीएल मधे पंजाबचा अन् आफ्रिकेत भारताचा कॅप्टन होण्यापूर्वी त्याला कर्नाटक रणजी टीम मधे ही कॅप्टन म्हणून कन्सिडर केलं नव्हतं.
भाऊ फार मोठ्ठा जॅक लाऊन आलाय (सुनील शेट्टी चा बीसीसीआय मधे वट असेल असं काही वाटत नाही, वेगळं काहीतरी कनेक्शन असावं. मागे राहुलला टीम मधून नारळ दिल्यावर लगेचच कुठल्याशा इंटरव्ह्यू मधे मोस्ट टॅलेंटेड न्यू जनरेशन प्लेअर / कॅप्टन्सी मटेरियल राहुल आहे आणि तो टीममध्ये असायला पाहिजे असं दादा नी म्हणाल्याचं वाचलं होतं. दादाला क्रिकेट लई जास्ती समजतं पण क्रिकेट पॉलिटिक्स ही तितकंच जमतं उदा. कोहली केस / साहा केस)
राहुलची २०-२० फलंदाजी क्लास
राहुलची २०-२० फलंदाजी क्लास आहे. मी नेहमीच ॲप्रेशिएट करतो. पण त्याला प्रेशर हॅंडल करता येत नाही. मोठ्या सामन्यांचे तर बिलकुल नाही. यावर मागेही मी वाद घालून झालाय ईथे. ते एक असो. पण अशी व्यक्ती कप्तान मटेरीअल कशी असू शकते. त्यात तो कसोटीत काही तीसमारखान फलंदाज नाही. नक्कीच मोठा जॅक आहे त्याचा.
त्याला आश्विनच्या आधी कश्याला
त्याला आश्विनच्या आधी कश्याला पाठवला >> लेफ्टी असल्यामूळे ? पंत बाद झाल्यावर शाकिब नि ताइज्जुल ह्या दोन्ही स्लो लेफ्ट आर्म ओर्थोडोक्स बॉल्रस विरुद्ध लेफ्ट राईट काँबो ठेवण्यासाठी ? अक्षर जॅक लावून आहे असे म्हणणे मला तरी भयंकर धाडसाचे वाटते. राहुल वर कोणाचातरी वरदहस्त असणे नि अक्षर/ जयदेव वर असणे ह्यात बराच फरक आहे असे म्हणायला हरकत नाही.
गिल वा राहुलच्या जागी धवनला
गिल वा राहुलच्या जागी धवनला घेतले असते तर ओपनिंगला लेफ्ट राईट काँबो मिळाले असते या हिशोबाने
गिल सरासरी ३३
राहुल सरासरी ३४
धवन सरासरी ४०
जो राईट हॅंड लेफ्ट हॅंड काँबो सुद्धा देतो जे पहिल्या चारमध्ये कोणी नाहीये. कसं सुचत नाहीये हे या लोकांना. वर्षानुवर्षे त्यावर फुल्लीच मारून ठेवली आहे.
असो. बाकी अक्षरबद्दल काही
असो. बाकी अक्षरबद्दल काही म्हणने नव्हते. तर कुलदीपबाबत अन्याय होतो असे वाटते हा मुद्दा होता. तरी अक्षरच हवा होता तर सामनावीर कुलदीपला बसवून बारा वर्षांनी उनाडकटला संधी देण्यामागे काय लॉजिक होते. ना तो फलंदाज होता ना लेफ्ट हॅण्ड कॉम्बो आणत होता. तीन वेगवान ऐवजी तीन स्पिनर ईथेही खेळवायला हरकत नव्हतीच. दुसऱ्या डावात आश्विनने सुरुवात करणे यातच हे उघड झाले आहे.
"त्याला आश्विनच्या आधी
"त्याला आश्विनच्या आधी कश्याला पाठवला. आश्विन कसोटीत बाप फलंदाज आहे." ह्या वाक्यांचा अर्थ "बाकी अक्षरबद्दल काही म्हणने नव्हते. तर कुलदीपबाबत अन्याय होतो असे वाटते हा मुद्दा होता." हा होतो होय ? अक्षर संघात आहे, धवन नाही त्यामूळे त्याला का आधी पाठवले असू शकते ह्याचे पॉसिबल उत्तर वर होते. बाकी धवनवरच थांबलात नि वुर्केरी रामन ला का नाही घेतलं असे न सुचवल्याबद्दल धन्यवाद !! काही भरोसा नाही तुझा !
त्याला आश्विनच्या आधी कश्याला
त्याला आश्विनच्या आधी कश्याला पाठवला. आश्विन कसोटीत बाप फलंदाज आहे." ह्या वाक्यांचा अर्थ तुम्हीच अक्षर वशिल्याचा आहे असा घेतला. ते कप्तानाच्या निर्णयाबद्दल म्हटलेले. म्हणून म्हटले की त्याच्याशी संबंध नाही याचा.
बाकी धवनचे उदाहरण राईट लेफ्ट काँबोच्या नावावर हल्ली ज्याचे त्याचे समर्थन केले जाते त्यातील फोलपणा दाखवायला दिले होते
आश्विनचा पहिला स्पेल बघून
आश्विनचा पहिला स्पेल बघून वाटते की कुलदीप ने नक्कीच नाचावले असते.भारताला दोन्हीं राहुलना नारळ देण्याची वेळ आली आहे.
दोन विकेट लवकर गेल्या
दोन विकेट लवकर गेल्या
कोहलीच्या आधी अक्षर आला
हि मूव्ह मात्र ईण्टरेस्टींग वाटतेय.
कोहली तसेही चाचपडला असता स्पिनसमोर असे वाटते. अक्षरच्या पंचवीस तीस धावाही प्रेशर काढून जाईल. आणि दिवसा अखेरीस कोहली आणि भारतीय संघ दबावात येणार नाही..
गिल गेला आणि कोहलीला यावेच
गिल गेला आणि कोहलीला यावेच लागले.
या गिल राहुल पुजारा कोहलीपेक्षा पंत अय्यर अक्षर आश्विन आश्वासक वाटतात आता..
गेला कोहली २२ बॉल १
गेला कोहली
२२ बॉल १
आता सहाव्या नंबरवर उनाडकट आला
आता सहाव्या नंबरवर उनाडकट आला..
पंत अय्यर आपले स्पिनला अटेक करणारे बेस्ट प्लेअर मागेच अजूनही..
दिवसाअखेरीस ४५-४
दिवसाअखेरीस ४५-४
२६ अक्षरचेच
१०० अजून हवेत
पंत किंवा अय्यर एक पुढे असता तर सामना वेगळा असता. बाकीच्यांवरचेही प्रेशर गेले असते. आता पाच सहा विकेट गेल्यावर ते येणार म्हणजे बाकीच्यांनी त्यांच्यावरही प्रेशर टाकले असे होणार..
चला सामना 5व्या दिवशी गेला
चला सामना 5व्या दिवशी गेला आहे आणि भारताचा पराभव जवळ जवळ निश्चित झाला आहे. जिंकलेच तर केवळ नशीब. भारताचा बांगलादेश सोबत पहिलाच पराभव असेल. दोन्ही राहुलच्या मूर्ख निर्णयांमुळे अशी परिस्थिती ओढवली आहे.
कोहली चा गेल्या 2-3 वर्षातला
कोहली चा गेल्या 2-3 वर्षातला फिरकी विरुद्धचा डाउनफॉल बघून वाईट वाटते.
आजकाल त्याला कोणीही येऊन बकरा बनवतोय.
भारताचा पराभव जवळ जवळ निश्चित
भारताचा पराभव जवळ जवळ निश्चित झाला आहे.
>>>>
पंत आणि अय्यर शिल्लक आहेत हो खेळायचे. ते आले तर वेगळाच गेम सुरू होईल. तसेच अक्षरनेही मागच्या पानावरून उद्या पुन्हा सुरू व्हावे. सोबत आश्विन एक चिवट लढवैय्या खेळाडू आहेच. असे सोडू नका मॅच. ज्यांच्याकडून अपेक्षा नसते ते बाद झाले आहेत. खरी फलंदाजी बाकी आहे.
बाकी कोच कर्णधार राहुल-राहुल यांच्या निर्णयांचा फटका बसला हे मान्य. मी पहिल्या दिवशीच हे म्हटलेले हे अंगाशी येणार. जो कुलदीप बांग्लादेशला पिक होत नव्हता त्याला बसवून उनाडकटला बारा वर्षांनी संधी दिली. आणि आता त्यांचे तीन स्पिनर आपल्याला नाचवत आहेत. निव्वळ मुर्खपणा...
एक चुम्मा आहे आपला त्याची पहिल्या ईनिंगची धमाकेदार खेळी फुकट जायला नको म्हणून जिंकावे असे वाटते. अन्यथा हे लोकं हरले तर बरे अशीही एक ईच्छा आहे.
येनीवेज, शास्त्रीबुवांना परत आणायला हवे..
अन्यथा हे लोकं हरले तर बरे
अन्यथा हे लोकं हरले तर बरे अशीही एक ईच्छा आहे. >>>>>
तर मग WTC फायनल मध्ये जायचे चान्स विसर. आपण ऑस्ट्रेलिया ला 4-0 हरवणं अशक्य आहे.
छे हो.. ते आपले चिडून
छे हो.. ते फक्त आपले चिडून म्हणायचे. कोण्या एका दुसऱ्याचा राग आला म्हणून भारत हरावा अशी ईच्छा कोण बाळगणार..
उद्या अक्षर आणि उनाडकटनेच खेळून जावे. आणि चुम्माने फक्त ऐटीत विनिंग शॉट मारायला यावे. सामनाही जिंकावा. मालिकाही जिंकावी. पॉईंटसही फुल्ल मिळावेत. आणि चुम्माला सामनावीरही मिळावे
उद्या अक्षर आणि उनाडकटनेच
उद्या अक्षर आणि उनाडकटनेच खेळून जावे. आणि चुम्माने फक्त ऐटीत विनिंग शॉट मारायला यावे
>>>
अक्षर 34, उनाडकट 13, पंत 9 वर चचले
88/7
अय्यर भाऊ आणि अश्विन ने काढली
अय्यर भाऊ आणि अश्विन ने काढली मॅच. जिंकलो एकदाचे.
राहुल्स ची नाचक्की टाळली ८
राहुल्स ची नाचक्की टाळली ८ व्या जोडीने
अश्विन - अय्यर जबरदस्त खेळले.
अश्विन - अय्यर जबरदस्त खेळले. वेल डन इंडिया!!
हुश्श...
हुश्श...
आश्विन नी एका ओव्हर मधे संपवली मॅच.
अक्षर अन् आश्विन आपल्या सेकंड इनिंग मधे टॉप टू स्कोअरर ठरल्याने राहुलचा त्या दोघांना खेळवण्याचा डिसिजन सार्थ ठरला...
आश्विन आणि श्रेयस ने राहुलचे
आश्विन आणि श्रेयस ने राहुलचे टेस्ट करीयर अजून थोड्या दिवसांसाठी वाचवले आहे, असे म्हणायला हरकत नाही. शाकीब ने अजून थोडा वेळ अग्रेसिव फील्ड ठेवली असती तर निकाल वेगळा लागला असता. वेल डन आश्विन आणि श्रेयस.
अभिनंदन भारत !
अभिनंदन भारत !
कोणताही कसोटी सामना हा सर्व शक्तिनिशीच खेळला पाहिजे व त्यांत संघ निवडताना भलते प्रयोग करू नयेत !!!
आपली खरी बॅटींग टॉप चार नंतरच
आपली खरी बॅटींग टॉप चार नंतरच सुरू होते जी अजून बाकी आहे..
आश्विन कसोटीत बाप फलंदाज आहे
आश्विन चिवट लढवय्या फलंदाज आहे
या सर्व विधानांना पुन्हा एकदा सार्थ ठरवणारा विजय आला.
त्याचसोबत कुलदीपला काढून उनाडकटला घेण्याचा मुर्खपणा अंगाशी येणार हे जे पहिल्याच सकाळी म्हटलेले ते देखील तसेच झाले.
Pages