क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचा सामना पावसाने रद्द झाला
आज एक एस्ट्रा गोलंदाज म्हणून हूडा आत आला
पण बाहेर पंत नाही तर संजू गेला Happy

थोडक्यात पुढच्या आणि अंतिम सामन्यातही हाच संघ कायम राहील. पंतच अकरात राहील.

आज शार्दुलच्या जागी दिपक चहर होता. शार्दुलचा काही प्रॉब्लेम झाला की बसवला हे माहीत नाही. पण पहिल्या सामन्यालाच शार्दुल ऐवजी दिपक चहर हवा होता. गोलंदाजी वीक आहे, आणि तो जास्त चांगला लिमिटेड फॉर्मेट गोलंदाज आहे.

VHT 2022: ऋतुराज गायकवाड़ ने एक ओवर में जड़े 7 छक्के,
ठोका दोहरा शतक; महाराष्ट्र ने यूपी को दिया 331 का लक्ष्य

नो बॉलही नाही सोडला Lol

दुसरा कि तिसरा सिक्स इतका फ्लॅट होता लाँग ऑन वर की ग्राउंड छोटे होते कि काय असे वाटलेले. सातवा मात्र दणकेबाज होता.

पिच खेळायला सोपं नाहीये. भारताची सावध/डळमळीत सुरूवात. न्यूझिलंडने प्रेशर चांगलंच मेन्टेन केलंय. मिल्नने सोडलेल्या कॅचचा काही उपयोग होतो का ते पहायचं.

स्विंग कमी झाला तर रन्स येतील
आपल्याकडे तीनच वेगवान गोलंदाज आहेत. स्पिनरला काही मदत मिळेल का? की पुन्हा गोलंदाजी तोकडी पडणार?

“ स्विंग कमी झाला तर रन्स येतील” - त्यांच्या पण. आणि त्यांची बॅटिंग दुसरी आहे.

गिल, पंत अगदी टी-२० पिढी आहे. बॉलच्या लाईनच्या आतूनच शॉट्स खेळतात. अजिबात लाईनमधे येऊन खेळायचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे बॉल स्विंग होत असला कि अगदीच पंचाईत होते त्यांची.

आफ्रिकेला world cup मध्ये थेट प्रवेश पाहिजे असेल तर येत्या ५ समान्यांपैकी ४ जिंकावे लागणार अशी facebook पोस्ट वाचनात आली. ही पोस्ट खरी असेल तर वेस्ट इंडिज पाठोपाठ अजून एका देशांमधून क्रिकेट कमी होताना दिसत आहे.

पिच खेळायला सोपं नाहीये. भारताची सावध/डळमळीत सुरूवात. >>

मला वाटते सेंकड हाफ मधील फलंदाज कितपत तयारीचे आहे हे तपसण्यासाठी टीम मॅनेजमेंटने सुरवातीच्या ५ फलंदाजाना लवकर बाद व्हायला सांगितले असावे वर्ल्ड कपच्या दृष्टीने. तयारी म्हणून! Wink
आणि गोलंदाजांचीही तयारी बघता येईल कमी स्कोअर डिफेन्ड करता येतो का? कारण ३०० तर नाही करता आले पहिल्या सामन्यात कदाचित कमी असेल तर करू शकतील. Wink

*वर्ल्ड कपच्या दृष्टीने. तयारी म्हणून!* - अगदीं पेपर सुरूं झाला तरी आपल्या निवडसमितीचा परीक्षेचा अभ्यास व तयारी चालुच असते !! Wink
*..बीजेपी सरकार येत नाही तो पर्यंत संजूला नो चान्स.* - तसंच असेल तर , मीं बीजेपीवाला ( तसा कोणत्याच पक्षवाला) नसूनही, निदान संजुसाठी तात्पुरतं तरी बीजेपी सरकार यावं केरळात ! किती अंत पहाताय बिचार्याचा !! Wink

निदान काही काळ तरी लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमधून पंतला विश्रांती देऊन किशन (टी२०) आणि संजू (वन-डे) ला संधी द्यावी.

ऑसीज अन् विंडीज टेस्ट सिरीज मधला पहिला सामना पर्थ ला, त्यात लबुस्काख्नी अन् स्मिथी च्या डबल सेंच्युरी, हीड चं हुकलेलं शतक (९९) आणि डेब्यू ला तेगनरेन चंदरपॉल ची सॉलिड ओपनिंग (दुसऱ्या दिवसा अखेर नाबाद ४७)

टेस्ट मे बेस्ट... टेस्ट क्रिकेट...

रच्याकने, उद्या तेगनरेन ची सेंच्युरी होऊदे...

उद्या विजय हजारे ट्रॉफीच्या फायानालाचीही उत्सुकता आहे.

महाराष्ट्र टीम मस्त फॉर्म मधे आहे. बावणे, त्रिपाठी अन् ऋतुराज लिटरली खोऱ्याने धावा उपसतायात, हंगर्गेकर, बाच्छाव इंपॉर्टन्ट खेळ्या खेळतायत पण समोर फॉर्म मधला उनाडकट आहे.

बघू काय होतं
(त्रिपाठी बांगलादेश वान डे सिरीज साठी नॅशनल टीम मधे आहे, त्यामुळे उद्या तो नसणार)

इंग्लंड ने पाकिस्तान ला कसोटी च्या पहिल्या दिवशी निर्दयपणे कुटलंय.

दिवसा अखेरीस चा स्कोर 506/4, आज फक्त 75 ओव्हर टाकल्या गेल्या.

अश्या रीतीने इंग्लंड कसोटी सामन्याच्या इतिहासात पहिल्या दिवशी 500 धावा करणारा पहिला संघ झाला आहे.

काल रात्री झोपायच्या आधी पहिल्या सेशन चा खेळ पाहत होतो. नसीम, रौफ आणि इतर गोलंदाजांची प्रामाणिकपणे दया अली. पीच मध्ये ना सिम मूव्हमेन्ट आहे, ना बाउन्स, ना टर्न.

PCB ची रटाळ पाटा हायवे बनवायची ची सवय इंग्लंड च्या आक्रमक बायटिंग समोर वाईटरित्या बॅकफायर झाली आहे .

"उद्या तेगनरेन ची सेंच्युरी होऊदे" - +१.

लबुशेन आणि स्मिथ जबरदस्त खेळले. हेड अगदीच दुर्दैवी ठरला.

"PCB ची रटाळ पाटा हायवे बनवायची ची सवय इंग्लंड च्या आक्रमक बायटिंग समोर वाईटरित्या बॅकफायर झाली आहे ." - पाकिस्तान सुद्धा मोठी इनिंग खेळू शकतात.

"इंग्लंड कसोटी सामन्याच्या इतिहासात पहिल्या दिवशी 500 धावा करणारा पहिला संघ झाला आहे" - त्यांना बॅटींग घ्यायला लागली (आजारपणामुळे) अशी शंका सुद्धा येत नाहीये स्कोअरकार्ड बघून.

"उद्या विजय हजारे ट्रॉफीच्या फायानालाचीही उत्सुकता आहे." - येस्स! केदार जाधव एका मॅच नंतर परत का नाही खेळला कळलं नाही. पण फिट असेल तर त्याने उद्या खेळावं. hope, the law of averages doesn't catch up with Ruturaj in the finals. ऋतुराज चा बॅटिंग फॉर्म महाराष्ट्रासाठी खूप गरजेचा आहे.

PCB ची रटाळ पाटा हायवे बनवायची ची सवय इंग्लंड च्या आक्रमक बायटिंग समोर वाईटरित्या बॅकफायर झाली आहे . >> आणि आमचा अ‍ॅटॅक एंव आहे नि त्यंव आहे म्हणून जिथे तिथे ढेंगा मारत असतात. हे दुसर्‍यांदा झालाय ह्या वर्षी. इंग्लंड ने पूर्ण धमाल केली आहे. ९० ओव्हर्स पूर्ण झाल्या असत्या तर सातशे लावले असते , लियाम बाकी होता म्हणजे Happy

ऋतुराज चा बॅटिंग फॉर्म महाराष्ट्रासाठी खूप गरजेचा आहे. >> वेड्यासारखा खेळलाय. वन डे साठी त्याचा गेम एकदमच परफेक्ट आहे.

तिकडे बांग्लादेश विरुद्ध जय्स्वाल ने वसूल केलाय टोल. माझ्या मते शॉ नि पड्डीकल च्या पुढे सरकलाय जयस्वाल आता सलामी च्या सापशिडी मधे.

मी राहुल त्रििपाठीचा फॅॅन. (शाखा मुळे सगळ्या राहुलांचा फॅॅन झालो आहे.) त्याची काय अवस्था आहे?
खेळणार कि नुसताच खुर्ची गरम करणार? एनी आयडीया?

law of averages फार गंडलेली टर्म वाटते मला. टॉस उडवताना छापाकाट्याला ठिक आहे. पण परफॉर्मन्ससाठी उगाच आहे. ते एक असो, फक्त फायनलचे प्रेशर वा फायनल म्हणजे स्पेशल मॅच, आज नाही खेळलो तर आजवरची मेहनत पाण्यात असे डोक्यात ठेऊन खेळू नये. सध्या भारताला बिग स्टेजवर निर्णायक क्षणी परफॉर्म करणाऱ्यांची फार गरज आहे. नवीन पोरांमध्ये गंभीर, युवराज तयार झाले तरच एखादा वर्ल्डकप येऊ शकतो.

ईंग्लंडने मात्र आज फुल्ल राडा केला. वर्ल्डकपमध्ये भारताला ईंग्लंडने दहा विकेटने हरवल्यावर भारतीयांना झालेले दु:ख आज कमी झाले असेल.

पण मुर्खपणा पाकिस्तानचाच आहे जे असे पिच ईंग्लंड सामन्याला ठेवले. तरी गेल्यावेळी तुडवणारा बेअरस्ट्रो यात नाहीये. एखादा बटलर नाहीये. लिविंगस्टोन एक घेतलाय तो अजून फलण्दाजीला यायचा आहे. तर अशी हालत. गोलंदाजांना मदत नसेल तर ईंग्लंड विवस्त्र करूनच मारते हल्ली हे पाकिस्तानला समजायला हवे होते. आपल्याकडे या म्हणावे. आखाडा बनवू आणि आश्विन तर आश्विन, आमचा अक्षरही नाचवेल ईंग्लंडला..

केशवकुल

त्रिपाठी पण चांगल्या फॉर्मात आहे. विजय हजारे मध्ये त्यानेही गेल्या 8 सामन्यात 3 शतके आणि 2 अर्धशतके केली आहेत.

माझ्या मते शॉ नि पड्डीकल च्या पुढे सरकलाय जयस्वाल आता सलामी च्या सापशिडी मधे. >>>>

शॉ सध्याच्या फॉर्म मध्ये भारताच्या सिलेक्शन पासून कोसो दूर आहे.
विजय हजारे आणि रणजी मध्ये फारशा धाव केल्या नाहीयेत आणि मुश्ताक अली मधले त्याचे आकडे खूप फसवे आहेत.

पडिकल ला नको त्या वेळी झालेली इंज्युरी नडली आहे.

ENG 657
PAK 181-0
Day 2: Stumps

पाकिस्तानने ईंग्लंडच्या १०१ ओव्हरमध्ये १० विकेट काढल्या.
ईंग्लंडला ५१ ओवरमध्ये पाकिस्तानची एकही विकेट काढता आली नाही.
लोकं ईंग्लंडच्या बॅटींगला आक्रमक म्हणत आहेत.
पण या ॲंगलने विचार करता पाकिस्तानी गोलंदाज आक्रमक नाहीत काय Happy

ऋतुराजचे सलग तिसरे शतक ह्या विजय हजारे स्पर्धेतले! >> फुकट गेले. सौराष्ट्र बॅलॅन्सड टीम आहे हे जाणवते. त्यांचा कीपर आजकल बरेचदा चरचेमधे असतो. पुढचा पार्थीव Happy

"फुकट गेले." - त्या शतकापायी मॅच पाहिली रात्री जागून.

माझी काही ऑब्झर्वेशन्स: पहिलं म्हणजे, सौराष्ट्राची टीम जबरदस्त खेळली. शेवटपर्यंत टिच्चून बॉलिंग केली. २-३ तगडे ऑलराऊंडर्स असण्याचा त्यांना खूप फायदा होतो. वेल प्लेड सौराष्ट्र. महाराष्ट्राची टीम (बहुदा) पहिलीच विजय हजारे ट्रॉफी फायनल खेळत होती. ते सुद्धा संपूर्ण टूर्नामेंट मस्त खेळले. त्यांचंही कौतुक.

इंडियात, (विशेषतः) थंडीच्या दिवसात, टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेऊन अ‍ॅडेड अ‍ॅड्व्हांटेज मिळतो. कारण पिचमधे फारसा दम नसतो. पण सकाळी बॉल खूप हालतो. त्यामुळे दुसरी बॅटिंग तुलनेने सोपी असते.

काल बॉल मूव्ह होत होता, सौराष्ट्राची बॉलिंग function at() { [native code] }इशय डिसिप्लिन्ड होती. पण तरिही ऋतुराज च्या बॅटिंग मधे इंटेंट खूप कमी होता. जवळ जवळ पहिल्या ३०+ ओव्हर्स त्याने function at() { [native code] }यंत सावध खेळ केला. ड्राईव्ह लेंथ बॉलची वाट पहात होता आणि सौराष्ट्राचे बॉलर्स शॉर्ट ऑफ गूड लेंथ वरून बॉलबाहेर काढत होते. त्याने एकदाही कट करायचा प्रयत्न केला नाही, फूटवर्क चा वापर करून काही वेगळं केलं नाही. पूर्वी कधी कधी ४-५ विकेट्स लवकर गेल्यावर धोनी अशी 'होपफुल' (hope, something will happen in second inning) इनिंग खेळायचा त्याची आठवण झाली. गायकवाड किंवा बाच्छाव पैकी कुणीतरी थोडी रिस्क घेतली असती तर २०-२५ रन्स जास्त होऊ शकल्या असत्या. बाच्छाव हा काही महाराष्ट्राचा वन-डाऊन बॅट्समन नाही. त्याने सिलेक्टीव्हली पिंच हिटिंग करायला हरकत नव्हती.

Pages