Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विलियम्सन ने दोन वर्षांच्या
विलियम्सन ने दोन वर्षांच्या बॅड पॅच नंतर पाकिस्तान समोर नाबाद द्विशतक झळकवले. पीच जरी सपाट पाटा असला तरी वेल प्लेड.
आशा आहे आपल्या फलंदाजांचा फॉर्म हि परत गवसेल.
ऑस्ट्रेलिया ने दक्षिण
ऑस्ट्रेलिया ने दक्षिण आफ्रिकेला अक्षरशः धुतला. वाईट हेच वाटते कि आपण या दक्षिण आफ्रिकेच्या कमजोर बॅटिंग समोर हरलो. >> फरक हा होता कि ते त्यांच्या देशात खेळत होते. त्या मालिकेपासून चौथ्या डावात समोरच्या संघाला हवे ते करून देण्याची एक भयंकर प्रथा आपण सुरू केली
फरक हा होता कि ते त्यांच्या
फरक हा होता कि ते त्यांच्या देशात खेळत होते. >>>
तरी आपला फर्स्ट चॉईस अटॅक असतानाही चौथ्या डावात 3 च्या वर विकेट ना घेऊ शकणे ह्याचं वाईट वाटतं.
पंतचे कार ॲक्सिडंट.. कारचे
पंतचे कार ॲक्सिडंट.. कारचे फार बेक्कार फोटो आलेत. धडकी भरवणारे
पंतसाठी प्रार्थना _/\_
Wishing Rishabh Pant a speedy
Wishing Rishabh Pant a speedy and safe recovery!
रिषभ लवकर बरा हो!
रिषभ लवकर बरा हो!
अपघात फारच भयंकर झालेला दिसतोय!
लवकर बरा व्हावा ऋषभ पंत…
लवकर बरा व्हावा ऋषभ पंत…
बातम्या देण्यातली घाई, एकदा म्हणे दिल्लीत रूग्णालयात उपचार, आता उत्तराखंडातल्याच, नंतर दिल्लीत हलवणार… आधी म्हणे, स्वतः बाहेर पडला, आता म्हणे मदतीने… अजून उलटसुलट येतीलच..
ऋषभ पूर्णपणे बरा होवो हीच
ऋषभ पूर्णपणे बरा होवो हीच इच्छा आहे.
दुखापतींचे स्वरूप पाहता रीकवरी ला वेळ लागेल पण चिंतेचे कारण दिसत नाही.
आणि या घटने पासून बोध घेऊन खराब हवामान असतांना रात्री उशिरा दमलेल्या स्तिथीत एकटयाने प्लिज ड्राईव्ह करू नका.
अजून उलटसुलट येतीलच.. >> एकाच
अजून उलटसुलट येतीलच.. >> एकाच माणसाने दोन व्हिडियो पाठवलेत -ए कात पंत स्वतः बाहेर निघतोय (आता तो कार मधून बाहेर निघताना कोण महाभाग त्याला मदत करायचे सोडून रेकॉर्ड करत होता हे देव जाणे) नि दुसर्यामधे बस का ट्र्क ड्रायव्हर ने बाहेर काढत भोवती कांबळे गुंडाळले. सोशल मिडिया हा सावळा गोंढळ आहे.
दुखापतींचे स्वरूप पाहता रीकवरी ला वेळ लागेल पण चिंतेचे कारण दिसत नाही. >> +१ महिन्याभरामधे ठीक झाला गडी म्हणजे कमावले.
*ऋषभ पूर्णपणे बरा होवो हीच
*ऋषभ पूर्णपणे बरा होवो हीच इच्छा आहे.* - +१
महिन्याभरामधे ठीक झाला गडी
महिन्याभरामधे ठीक झाला गडी म्हणजे कमावले. >>>>
BCCI चं ऑफिशिअल स्टेटमेंट वाचता ते जवळपास अशक्य वाटतंय.
गुडघ्याच्या लिगामेंट टेअर चा उल्लेख आहे. कुठली लिगामेंट (ACL, PCL, किंवा कोलॅटरल्स) आणि किती फाटलेय त्यावर रीकवरी चा वेळ ठरेल.
सौराष्ट्र ने मुंबईला मुंबईत
सौराष्ट्र ने मुंबईला मुंबईत येऊन हरवले.
चौथ्या इंनिंग मध्ये आपले फलंदाज तीन फिरकी गोलंदाजांसमोर 280 चेस करण्यात अपयशी ठरले.
मुलाणीने ऍज युजुअल बॉलिंग मध्ये आपला एन्ड सांभाळला (सामन्यात 10 विकेट) पण त्याचा जोडीदार कोटियन ची कमी फार जाणवली.
मुलाणीने ऍज युजुअल बॉलिंग
मुलाणीने ऍज युजुअल बॉलिंग मध्ये आपला एन्ड सांभाळला (सामन्यात 10 विकेट) पण त्याचा जोडीदार कोटियन ची कमी फार जाणवली. >> मुलाणीचे आकडे एकदम इंप्रेसिव्ह आहेत. बॅटींग पण ठिकठाक करतो. जाडेजा नि सौरव ला ट्फ होणार गडी.
BCCI चं ऑफिशिअल स्टेटमेंट वाचता ते जवळपास अशक्य वाटतंय. >> वाचले खरे पण अपघातानंतर स्वतः आधाराशिवाय चालताना दिसला व्हिडियो मधे ( खरा खोटा हे माहित नाही) त्यामूळे आशा वाटतेय. फूटबॉल मधले स्वतः चालू शकले नाहि किंवा लंगडताना दिसले कि महिन्या-दोन महिन्यांची निश्चिंती असते त्यावरून आशा धरूया.
मुलाणीचे आकडे एकदम
मुलाणीचे आकडे एकदम इंप्रेसिव्ह आहेत. बॅटींग पण ठिकठाक करतो. जाडेजा नि सौरव ला ट्फ होणार गडी. >>>
सौरभ / मुलाणी दोघेही अक्षर / जडेजा च्या तुलनेत बॉलिंग स्टाईल मध्ये वेगळे आहेत.
दोगांचाही अँप्रोच तसा ओल्ड स्कूल आहे - फ्लाईट, टर्न, ड्रिफ्ट वर भर आणि वेग बऱ्यापैकी कमी.
पण फिटनेस आणि फिल्डिंग बद्दल चा अँप्रोच हि ओल्ड स्कूल दिसतो. आताच्या काळात ह्या गोष्टी तुमच्या विरोधात जातात.
Both need to shed some extra lbs and improve on their fielding.
Even Sundar, who I rate highly, needs lot of improvement in his ground fielding work.
Despite his svelte figure, he runs like Ashwin (who 10+ years his senior) and is as agile as him in the field.
“ पण फिटनेस आणि फिल्डिंग
“ पण फिटनेस आणि फिल्डिंग बद्दल चा अँप्रोच हि ओल्ड स्कूल दिसतो. आताच्या काळात ह्या गोष्टी तुमच्या विरोधात जातात.” - +१
मुलाणीला पहिल्यांदा टीव्हीवर बॉलिंग करताना पाहून हाच विचार आला होता मनात. फिटनेसवर लक्ष द्यायला हवं. अगदी जरी रणजी दीर्घकाळ खेळायची असेल तरिही.
“ पण फिटनेस आणि फिल्डिंग
“ पण फिटनेस आणि फिल्डिंग बद्दल चा अँप्रोच हि ओल्ड स्कूल दिसतो. आताच्या काळात ह्या गोष्टी तुमच्या विरोधात जातात >> मान्य. पण आपले बहुतेक डोमेस्टिक लिडींग स्पिनर असेच आहेत - विशेषःत टेस्ट साठी ओल्ड स्कूल अँप्रोच मधे येऊ शकतील असे. मुख्य मुद्दा हा कि अश्विन- जडेजा चा सब तयार करण्याची सुरूवात व्ह्यायला हवी .
फिटनेस चे म्हणशील तर बहुतेक सगळे कप्तान रोहित चा आदर्श समोर ठेवून असावेत असे वाटते आजकाल.
द्रविड - रोहित आल्यापासून हे प्रमाण फारच वाढले आहे. पांड्ञा च्या येण्याने काही फरक पडतो का बघूया आता.
आज संजू, नि गिल ने सोन्यासारख्या संधी फुकट घालवल्या.
जयदेव सुटलाय आज. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळेण्याचे चान्सेस वाढवलेत.
“ आज संजू, नि गिल ने
“ आज संजू, नि गिल ने सोन्यासारख्या संधी फुकट घालवल्या” - हो. पण दोघंही ही सिरीज खेळतील आणि होपफुली पुढे मेक-अप करतील.
शिवम मावीने मात्र संधीचा सदुपयोग केला. हॅपी फॉर हिम!
जयदेव डोमेस्टिकमधला आगरकर (करियरच्या उत्तरार्धातला) झालाय. कदाचित टेस्टमधे बॅक-अप म्हणून असू शकेल.
जडेजा चा भविष्यातला लॉन्ग
जडेजा चा भविष्यातला लॉन्ग टर्म रिप्लेसमेंट म्हणून बरेच नवे ऑप्शन आहेत - क्वालिटी कंपेर करत नाहीये, स्किलसेट करतोय.
सध्या भारतीय डोमेस्टिक क्रिकेट मध्ये लेफ्ट आर्म स्पिन ऑलराऊंडर चं पीक आहे - जवळपास प्रत्येक टीम कडे एक चांगला खेळाडू आहे.
ऑफ स्पिनर्स मध्ये अश्विन चा लॉन्ग टर्म रिप्लेसमेंट आत्तातरी कोणीही दिसत नाही. सुंदर ऍज अ एक विकेट टेकिंग स्पिनर म्हणून कोसो दूर आहे.
रिस्ट स्पिन ची अवस्था अजून बिकट (कुलदीप चा अपवाद सोडल्यास) आहे.
जडेजा चा भविष्यातला लॉन्ग
जडेजा चा भविष्यातला लॉन्ग टर्म रिप्लेसमेंट म्हणून बरेच नवे ऑप्शन आहेत - क्वालिटी कंपेर करत नाहीये, स्किलसेट करतोय. > फक्त स्किलसेट कसा बघून चालेल पण ? क्वालिटी लागणार ना पण बघायला ? लेफ्ट आर्म स्पिन ऑलराऊंडर चं पीक लिमिटेड क्रिकेट खास करून टी २० साठी कामाला येते म्हणून एका विशिष्ट स्किल्सेट चे असण्याचे चान्सेस आहेत.
बाकीच्या जमातीमधले नावालाही सापडत नाहीत असे वआटायला लागलय खरं. र्हितिक शौकिन चांगला ऑफस्पिनर होउ शकतो पण अर्थात सध्या तरी फारच अननुभवी आहे.
वानखेडेच्या छोट्या सीमारेषा बघता मलिक नि मावी दोघांनीही चांगली बॉलिंग केली असे म्हणून शकतो. चहल चे काय झालय देवच जाणे.
फक्त स्किलसेट कसा बघून चालेल
फक्त स्किलसेट कसा बघून चालेल पण ? क्वालिटी लागणार ना पण बघायला ? >>>
हो, पूर्णपणे मान्य आहे. पण जडेजा ची ओव्हरऑल पॅकेज क्वालिटी रिप्लेस करायला मिळणे कठीण आहे (खासकरून फिल्डिंग मध्ये)
आता त्याची फलंदाजी हि कमालीची सुधारलेली आहे - विशेषतः भारताबाहेर.
र्हितिक शौकिन चांगला ऑफस्पिनर होउ शकतो पण अर्थात सध्या तरी फारच अननुभवी आहे.>>>
हो, पण अजून एखाद-दोन हंगाम परफॉर्मन्स द्यावा लागेल.
मुंबईच्या कोटियन ची हि रेसेन्ट कामगिरी चांगली आहे. पण त्याच्या ऍक्शन वर (ESP. त्याचा आर्म बॉल) प्रश्नचिन्ह असल्याची वार्ता आहे
*रिस्ट स्पिन ची अवस्था अजून
*रिस्ट स्पिन ची अवस्था अजून बिकट* - +१. आणि वाईट असं किं सबंधित कुणालाही त्याचं कांहींच वाटत नाहीय. ( उलट, कुलदीपला प्रभावी ठरला म्हणुन किं काय पुढच्या सामन्यात बाहेर ठेवण्यात आलं ! )
कुलदीप नावडता असावा निवड
कुलदीप नावडता असावा निवड समिताचा आणि टीम मॅनेजमेण्टचा. उगा जास्त बळी घेतले आणि जागा अडवून बसला तर !!
*कुलदीप नावडता असावा निवड
*कुलदीप नावडता असावा निवड समिताचा * - म्हणून काय इतकं डावं- उजवं करायचं निवड समितीने !!
यावर एक व्यंगचित्र होऊन जाऊ
यावर एक व्यंगचित्र होऊन जाऊ दे, भाऊ. बरेच दिवस झाले.
"पण जडेजा ची ओव्हरऑल पॅकेज
"पण जडेजा ची ओव्हरऑल पॅकेज क्वालिटी रिप्लेस करायला मिळणे कठीण आहे" - जडेजाला ह्या ठिकाणी पोहोचायला बराच काळ जावा लागलाय. सुरूवातीला तो एक चांगला फिल्डर, बर्यापैकी बॉलर इतपतच होता. टेस्ट क्रिकेट 'जमायला' बर्याच लोकांना वेळ लागतो.
"लेफ्ट आर्म स्पिन ऑलराऊंडर चं पीक लिमिटेड क्रिकेट खास करून टी २० साठी कामाला येते " - टोटली सहमत.
"रिस्ट स्पिन ची अवस्था अजून बिकट" - कुणीच माहित नाहीये सद्ध्या डोमेस्टीकमधे जो चांगला लेग स्पिनर आहे (एकदम कर्नाटकचा श्रेयस गोपाळ च आठवतो, पण तो पेरिफेरीवरही नाहीये टेस्ट सिलेक्शन च्या). बिश्णोई ती कसर भरून काढू शकेल का माहित नाही.
लेगस्पिनर म्हणून घेण्यापेक्षा
*यावर एक व्यंगचित्र होऊन जाऊ दे * प्रयत्न केलाय -
लेगस्पिनर म्हणून घेण्यापेक्षा मला कायम बारावा गडी ठेवा ! अहो, चार ब्रेक- अप झाले माझे मी एक नुसताच लेग- ब्रेक गोलंदाज आहे हे मुलींना कळल्यामुळे !!!
बिश्णोई ती कसर भरून काढू शकेल
बिश्णोई ती कसर भरून काढू शकेल का माहित नाही. >> तो एक चांगला गूगली बॉलर आहे, त्याच्याकडे लेगी ला लागणारी तयारी आहे - शारिरीक नि मानसिक. पण तो एक टेस्ट मधला लेग स्पिनर म्हणून फारसा उजवा वाटत नाही.
"पण जडेजा ची ओव्हरऑल पॅकेज क्वालिटी रिप्लेस करायला मिळणे कठीण आहे" - >> हे ओव्हरऑल पॅकेज डील नशिबात असेल तरच रेडीमेड मिळते. जाडेजा जेंव्हा वॉर्न ने पुढे आणला तेंव्हा त्याच्या टेस्ट कॅपॅबिलिटी वर सोडा लिमिटेद ओव्हर कॅपॅसिटि वर पण केव्हढे प्रश्न उपस्थित केले होते. त्याने तीन त्रिशतके रणजीमधे मारली तेंव्हा ही त्याची टवाळीच केली गेली होती. अश्विन ने स्वतःला किती सुधारले इतक्या वर्षांमधे. त्यामूले मला वाटते क्वालिटी ओव्हरऑल पॅकेज सहज उपलब्ध नसेल तर सर्व प्रथम मुख्य स्किल सेट असलेल्या अनुभवी प्रोव्हन बॉलर्स वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मग इतर स्किल्सेट डेव्हलप करता आले/केले गेले तर उत्तमच. (अर्थात ते करताना इरफान पठाण होऊ नये म्हणजे मिळवली)
मुंबईच्या कोटियन ची हि रेसेन्ट कामगिरी चांगली आहे. पण त्याच्या ऍक्शन वर (ESP. त्याचा आर्म बॉल) प्रश्नचिन्ह असल्याची वार्ता आहे >> हो मुंअई मधे पण तो सतत आत बाहेर त्यामूळेच असतो बहुधा. मुलाणी हा फर्स्ट चॉइस आहे.
धन्यवाद भाऊ.
धन्यवाद भाऊ.
सॅमसन पहिल्या सामन्यात
सॅमसन पहिल्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाला आहे.
त्याची रिप्लेसमेंट म्हणून आता विदर्भाच्या जितेश शर्माची निवड झाली आहे.
एकदम कर्नाटकचा श्रेयस गोपाळ च
एकदम कर्नाटकचा श्रेयस गोपाळ च आठवतो, पण तो पेरिफेरीवरही नाहीये टेस्ट सिलेक्शन च्या.>>>
गोपाळ ची जागा सध्या कर्नाटक च्या संघातही पक्की नाही. टेस्ट सिलेक्शन फार दूर आहे.
बिश्णोई ती कसर भरून काढू शकेल का माहित नाही. >>>
बिष्णोई काही कारणामुले राजस्थान करता फारसा रणजी खेळत नाही, फक्त वन डे आणि T20.
सद्य स्तिथीत तरी तो रेड बॉल मध्ये काय प्रभाव पडू शकेल या बाबत मला तरी डाउट आहे.
Pages