Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पंतला खेळवलंच पाहिजे असा काही
पंतला खेळवलंच पाहिजे असा काही हट्ट नाहीये. नसेल जमत तर राहू दे. >>
.. खर तर ते सजेशन विनोदाचा निष्फळ प्रयत्न वाटतो आहे. जगभरातला प्रत्येक देश एकापेक्षा अधिक स्किल असतील असे खेळाडू पॅक करायचा प्रयत्न करताहेत तर त्याउलट जायचे. वरती फिक्सिंग नि ब्रँड व्ह्ल्यू ह्यामधला प्रचंड सावळा गोंधळ जाणवतो. अर्थात नवल नाही काहीही.
कालच्या सूर्याच्या इनिंग मधला माझा सर्वात आवडता शॉट मिल्ने ला सतराव्या ओव्हर्मधे मारलेला सिक्स. ऑफ च्या बाहेरच ओव्हरपिच्ड स्लोअर बॉल. सूर्या अँट्सिपेट करत असल्यासारखा उजवा पाय लेग च्या बाहेर ढकलत होता पण बॉलची ट्रेजेक्टरी बघून पटकन अॅडजस्ट करत स्क्वॉट केल्यासारखे करत बॉल पिच होईल तिकडे पोहोचत, त्याच्या खाली जाऊन लाँग ऑफ ला सिक्स. शॉटत कनेक्ट होताना बॅलॅन्स गंडलेला आहे नि फॉलो थ्रू मधे स्क्वॉट च्या सुरूवातीची पोझीशन आहे. कोण अस शॉट मारतो नि तो स्लो बॉल असताना टायमिंग नि मनगटांच्या जोरावर लोंङ ऑफ ला सिक्स मारतो ? अॅबे सुद्धा सॉलिड स्टेबल बेस मधे असत असे अशक्यप्राय फटके मारताना. बॅटीम्ग चे कोचिंग मॅन्युअल फाडायला लावलय पुरते. टिपीकल बॅटसमन स्क्वेअर लेग ला शॉटस मारेल अशा बॉल्सना हा शेवटच्या क्षणी रिस्ट वर्क च्या जोरावर फाईन लेग, डीप फाईन लेग ला मारतो - तेही बॉल स्लो असेल तर इनफ पॉवर निर्माण केली जाते त्या व्हिप्लॅश च्या जोरावर. कोहली म्हणातो तसे सूर्या अॅनिममधे खेळल्यासारखा खेळतोय सध्या.
*कोण अस शॉट मारतो नि तो स्लो
*कोण अस शॉट मारतो नि तो स्लो बॉल असताना टायमिंग नि मनगटांच्या जोरावर लोंङ ऑफ ला सिक्स मारतो ? * - खरंय. मला वाटतं , असामान्य reflexes व फॉर्ममुळे आलेला प्रचंड आत्मविश्वास याशिवाय हें अशक्य आहे. मला आठवतं स्टेप आऊट करुन फटका मारताना पाय घसरुन कन्हाय सपशेल उताणा पडला तरीही त्याने तो सरळ खेळायचा चेंडू क्षणार्धात सफाईने फाईन लेगला खेळून सर्वाना आश्चर्यचकित केलं होतं ! ( वय मोठ असण्याचा इथं हा फायदा असतो !
)
आजकाल आपले फलंदाज फिरकी
आजकाल आपले फलंदाज फिरकी गोलंदाजाना क्रीझ सोडून पुढे खेळताना दिसत नाही. मी मध्यंतरी जुन्या गावस्कर, वेंगसरकर, संदीप पाटील, कपिल देव, यशपाल शर्मा ह्यांचे काही डाव बघितले, फिरकी गोलंदाज आले की हे पुढेच खेळणार क्रीज सोडून मग ते सुरक्षात्मक असो की आक्रमक.
सचिन, गांगुली, द्रविड नंतर फिरकीला क्रीझ बाहेर येऊन खेळणे जवळपास बंद झाल्यात जमा क्वचित फारच ओव्हर पीच चेंडू असेल तर खेळतात. पुर्वीचे फलंदाज थोडेफार डावखुर्या आर्थोडोक्स स्पीनर समोर बचावत्मक खेळताना जाणवले तेही केव़ळ भारतिय खेळपट्ट्यांवर .
आजकाल आपले फलंदाज फिरकी
आजकाल आपले फलंदाज फिरकी गोलंदाजाना क्रीझ सोडून पुढे खेळताना दिसत नाही >> अय्यर , पुजारा नि मयांक हे तिघेच जण रेग्युलर करताना आढळतात त्यातही पुजारा बचावात्मक खेळण्याच्या धोरणानेच येतो. अय्यर आक्रमक मोडमधेच असतो. मयांक बॅलॅन्स्ड असतो.
त्याने तो सरळ खेळायचा चेंडू क्षणार्धात सफाईने फाईन लेगला खेळून सर्वाना आश्चर्यचकित केलं होतं >> गूगल करून बघतो.
*फलंदाज थोडेफार डावखुर्या
*फलंदाज थोडेफार डावखुर्या आर्थोडोक्स स्पीनर समोर बचावत्मक खेळताना जाणवले तेही केव़ळ भारतिय खेळपट्ट्यांवर .* - डावखुरा स्पीनर जर बापू नाडकर्णी सारखा अचूक टप्पा ठेवणारा असेल तर आक्रमक खेळणं चांगल्या फलंदाजालाही कठीणच ! ( अर्थात, टी 20च्या आतांच्या जमान्यात कोणत्याही गोलंदाजाने फलंदाजाना बचावात्मकच खेळायला लावीन अशी आशा बाळगण्यात अर्थ नाहीं!)
“मिल्ने ला सतराव्या ओव्हर्मधे
“मिल्ने ला सतराव्या ओव्हर्मधे मारलेला सिक्स” - ह्यावेळी मॅचेस बघता नाही आल्या टायमिंग (सूर्याचं - ‘आमच्या गावचा सूर्व्या डुबल्यागत झालेला‘ असल्यामुळे). हायलाईट्स आहेत का कुठे?
“त्याने तो सरळ खेळायचा चेंडू क्षणार्धात सफाईने फाईन लेगला खेळून सर्वाना आश्चर्यचकित केलं होतं” - ह्याविषयी मागे एकदा संझगिरींच्या (बहुदा) लेखात वाचलं होतं. त्यावेळी तर हे निव्वळ अद्भूत वाटलं असेल.
फेरफटका
फेरफटका
अमेझॉन प्राईम वर असले पाहिजेत. न्यूझीलंड मध्ये होणाऱ्या सगळ्या क्रिकेट मॅच चे ब्रॉडकास्ट राईट्स त्यांच्या कडे आहेत.
प्राईमवर आहेत हायलाईटस
प्राईमवर आहेत हायलाईटस
लाईव्हसुद्धा तिथेच बघतोय
मॅचच्या पंधरा मिनिटे आधी मी टाटास्काय रिचार्ज मारला आणि डोक्याला शॉट लागला
यावर वेगळा धागा काढायला हवा
फे फ espn वर आहे पूर्ण मॅच
फे फ espn वर आहे पूर्ण मॅच नि हायलाईट्स. अमेरिकेत प्राईम वर दिसत नाहिये.
डावखुरा स्पीनर जर बापू नाडकर्णी सारखा अचूक टप्पा ठेवणारा असेल तर आक्रमक खेळणं चांगल्या फलंदाजालाही कठीणच ! >> विंडीज चा हुसेन तसा अचूक असतो पण तरीही पिचची मदत लागतेच. बॅटसमन जर हाराकिरी करायचीच अशा मूड मधे उतरला असेल तर .....
रेकॉर्ड ब्रेक कामगिरी !
रेकॉर्ड ब्रेक कामगिरी !
एन जगदीशनची विजय हजारे ट्रॉफीतील कामगिरी
विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेच्या या हंगामात एन जगदीशन (N Jagdeeshan) याने आंध्रप्रदेशविरुद्ध 114 धावा, छत्तीसगडविरुद्ध 107 धावा, गोवाविरुद्ध 168 धावा, हरियाणाविरुद्ध 123 धावा आणि अरुणाचल प्रदेशविरुद्ध 277 धावा चोपल्या.
“espn वर आहे पूर्ण मॅच नि
“espn वर आहे पूर्ण मॅच नि हायलाईट्स” - पाहिले.
“मिल्ने ला सतराव्या ओव्हर्मधे मारलेला सिक्स” - कमाल मारलाय तो शॉट! फर्ग्युसनची आक्खी १९ वी ओव्हर अशाच अचाट शॉट्सने भरलेली आहे. पहिल्याच बॉलवर, वाईड यॉर्करवर, विटी-दांडूत गलीतून विटी कोलावी तसं शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून त्याने तो बॉल कोलून फोर मारलीय. तिथपासून ते शेवटच्या बॉलवरच्या थर्डमॅन बाऊंड्रीवरून मारलेल्या सिक्सपर्यंत (मिसटाईम झालाय असं वाटेपर्यंत सिक्स गेली होती), सगळाच प्रकार अशक्य आहे.
ह्या सगळ्या शॉट्समधे त्याचं स्किल, प्रॅक्टीस जितकं आहे, तितका त्याच्या फॉर्मचा वाटा आहे (विशेषतः त्याच्या अचूक टायमिंगमधे). हा फॉर्म दीर्घकाळ टिको ही सदिच्छा!
यावर वेगळा धागा काढायला हवा >
यावर वेगळा धागा काढायला हवा >> चूक.
*हा फॉर्म दीर्घकाळ टिको ही
*हा फॉर्म दीर्घकाळ टिको ही सदिच्छा!* - +1 , आमेन , तथास्तु !!!
*हा फॉर्म दीर्घकाळ टिको ही
*हा फॉर्म दीर्घकाळ टिको ही सदिच्छा!* - +1 , आमेन , तथास्तु !!!
*हा फॉर्म दीर्घकाळ टिको ही
*हा फॉर्म दीर्घकाळ टिको ही सदिच्छा!* - +1 , आमेन , तथास्तु !!! >> खरच !
बांग्लादेशविरुद्ध अ संघ निवडला त्यात पांचाल उडाला पण ईस्वरन आहे नि कप्तान आहे. म्हणजे तो नक्की खेळणार. जैस्वाल, धुल ला उचललाय. एव्हढे ओपनर ट्राय करणार असू तर इस्वरन कशाला हवा ? तसाही तो होता तेंव्हा त्याला बाजूला करून इतर ओपनर ट्राय केले होते इंग्लंड मधे कारण तो टेक्निकली फिट नाही तेव्हढा म्हणे. मग नेला कशाला होता बिचार्याला तेंव्हा. काय गोंधळ घालतात राव. अ संघा मधे पुजारा असताना तो कप्तान असणे साहजिक नाही का ? अ संघाचा कप्तान असा माणुस का ज्याला तुम्ही नक्की खेळवणार नाही मेन टी म्मधे नि खेळवले तरी कप्तान करणार नाही. पुजारा ची वर्णी रिप्लेसमेंट कॅप्टन म्हणून लागण्याचे चान्सेस त्यातल्या त्यात अधिक नाही का ?
कुलदीप सेन, मुकेश कुमार नि सौरभ कुमार ला मिळालेल्या संधीछे ते सोने करतील तर बरे होईल.
महत्वाचा प्रश्न आहे कि हि टीम
महत्वाचा प्रश्न आहे कि हि टीम सिलेक्ट केली कोणी ?
कारण चेतन शर्मा आणि त्यांची निवड समिती तर पायउतार झालीये.
मी ही कुतूहल म्हणून हेच शोधत
मी ही कुतूहल म्हणून हेच शोधत होतो. इथे विचारायचे का ?
CONTACT US
4th Floor, Cricket Centre
Wankhede Stadium
‘D’ Road, Churchgate
Mumbai- 400020
India.
E-mail: office@bcci.tv
रच्याकाने ह्याची सुरूवात बघा. खर तर अॅडम ईव्ह पासून सुरू करायलाही स्कोप होता.
https://www.bcci.tv/about/history
“ अ संघा मधे पुजारा असताना तो
“ अ संघा मधे पुजारा असताना तो कप्तान असणे साहजिक नाही का” - पुजारा फक्त दुसरी मॅच खेळणार आहे (तो आणि उमेश), बांग्लादेश दौर्याची तयारी म्हणून.
“ खर तर अॅडम ईव्ह पासून सुरू करायलाही स्कोप होता” -
भारतातल्या क्रिकेट
भारतातल्या क्रिकेट इतिहासावरचा छान लेख.
आज संजूला खेळवले
आज संजूला खेळवले
पण फलंदाजी क्रमांक ६ वा
सुर्यकुमार यादव playing to
सुर्यकुमार यादव playing to the gallery खेळतोय असे वाटते
306 झाले. एका वेळी 275 पर्यंत
306 झाले. एका वेळी 275 पर्यंत आटोपतील असे वाटले होते.
सुंदर ने शेवटी येऊन मस्त हाणले.
श्रेयस ने चांगली इंनिंग खेळली. ODI टीम मध्ये त्याची जागा दिवसेंदिवस पक्की होत चाललीये
(गेल्या 8 मॅचेस मध्ये 5 अर्धशतके आणि 1 शतक).
दोन लाईफ मिळाल्या पण ते चालायचेच.
आता फक्त पाच बॉलर्स नि हा स्कोर कसा डिफेन्ड करायचा ते पाहावे लागेल.
आज पाचच बॉलर आहेत.
आज पाचच बॉलर आहेत.
ते ही रन्स लीक करणारा ठाकूर, वेगावर नियंत्रण नसणारा उमरान मलिक, विकेट टेकर म्हणून न ओळखला जाणारा सुंदर, सध्या फारसा फॉर्मात नसलेला युझी चहल आणि पहिलाच सामना खेळणारा अर्शदीप.
पण अश्यावेळीच जिद्दीने सारे बॉलिंग टाकतात असेही होते. बघूया आज काय होतेय.
आज पाचच बॉलर आहेत.
आज पाचच बॉलर आहेत.
ते ही रन्स लीक करणारा ठाकूर, वेगावर नियंत्रण नसणारा उमरान मलिक, विकेट टेकर म्हणून न ओळखला जाणारा सुंदर, सध्या फारसा फॉर्मात नसलेला युझी चहल आणि पहिलाच सामना खेळणारा अर्शदीप.
पण अश्यावेळीच जिद्दीने सारे बॉलिंग टाकतात असेही होते. बघूया आज काय होतेय.
इंडियासाठी जमेच्या बाबी
इंडियासाठी जमेच्या बाबी म्हणजे धवन-गिल ची आणखी एक सॉलिड ओपनिंग, अय्यर-संजू ची पार्टनरशिप, ‘सुंदर’ फिनिश, ठाकूर चा ओपनिंग स्पेल, आणि उम्रानचा आश्वासक डेब्यू.
त्यानंतर मात्र भारताचे दोन पारंपारिक किवी काटे - विल्यमसन आणि लॅथम - ह्या दोघांनी भारतासाठी काही आश्वासक ठेवलं नाही.
पंतने काही दिवस व्हाईट बॉल
पंतने काही दिवस व्हाईट बॉल क्रिकेटमधून ब्रेक घ्यावा. ह्या टीममधे सुद्धा पंतच्या जागी हूडा खेळला तर सहावा बॉलिंग ऑप्शन मिळेल.
चहल चा फॉर्म चिंताजनक आहे.
चहल चा फॉर्म चिंताजनक आहे.
मला तरी त्याची कालची बॉलिंग पूर्णपणे निष्प्रभ वाटली. तो धावाही रोखू शकला नाही आणि विकेट घेईल असाही वाटलं नाही.
“ विकेट घेईल असाही वाटलं नाही
“ विकेट घेईल असाही वाटलं नाही.” - कॅच सोडला तेव्हा तर तो इतरांना विकेट्स घेऊ देइल असंही वाटत नव्हतं
*भारतासाठी सर्वाधिक वनडे धावा
*भारतासाठी सर्वाधिक वनडे धावा (13 डावांनंतर)*
629 – शुभमन गिल
558 – नवज्योत सिंग सिद्धू
536 – शिखर धवन
531 – श्रेयस अय्यर
502 – केदार जाधव
भारताच्या गोलंदाजीत बराच
भारताच्या गोलंदाजीत बराच गडबड घोटाळा दिसतो आहे. काहीतरी केले पाहिजे. बापू नाडकर्णीला (बिचारा जिवंत असेल तर बोलवा!) निदान धावा तरी रोखू शकेल. एकदिवशीय व २०-२० मधे बाद किती झाले याला महत्व नसतेच. पण धावाच काढता नाही आल्या प्रतिपक्षाला तर काय उपयोग त्यांना.
Pages