Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"चा कीपर आजकल बरेचदा चरचेमधे
"चा कीपर आजकल बरेचदा चरचेमधे असतो." - विदर्भाचा जितेश शर्मा सुद्धा चर्चेत असतो.
फे फ, मी मॅच पाहिली नाही फक्त
फे फ, मी मॅच पाहिली नाही फक्त कॉमेंटरी वाचली नी मलाही तसेच वाटले. पण हायकवाड चा मूळ पिंड असाच असावा - कोहली टाईप्स. तो नंतर फुटतो. खर तर महाराष्ट्र चाळीस ओव्हर मधे मस्त प्लेस्ड होते - तिणशे आवाक्यातले वाटत होते पण झटक्यात विकेट्स गेल्या नि निम्मेच रन्स निघाले.
धोनी अशी 'होपफुल' (hope, something will happen in second inning) इनिंग खेळायचा त्याची आठवण झाली. >> बाफ शांत आहे हे सहन झाले नाही का तुला ?
“बाफ शांत आहे हे सहन झाले
“बाफ शांत आहे हे सहन झाले नाही का तुला ?” -
असा काही हेतू नाहीये. कोहलीच्या पाकिस्तानविरुद्ध केलेल्या खेळीच्या कौतुकाच्या वेळी मी त्याला 'धोनी-एस्क फिनिश' ची उपमा दिली होती हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात असेल अशी आशा आहे. 
“कोहली टाईप्स. तो नंतर फुटतो” - मलाही तश्याच खेळीची अपेक्षा होती. पण सलग चार चार ओव्हर्स मेडन जाऊ देणं, सिंगल्स सुद्धा न काढणं, ६०%+ डॉट बॉल्स घालवणं हे अनअॅक्सेप्टेबल आहे असं मला वाटतं.
शे आवाक्यातले वाटत होते पण
शे आवाक्यातले वाटत होते पण झटक्यात विकेट्स गेल्या नि निम्मेच रन्स निघाले.>>
गायकवाडने ४२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा विनाकारण प्रयत्न केला आणि धावबाद झाला. अन्यथा २८०- २९० पर्यंत नेऊ शकला असता कारण त्याने टॉप गिअर टाकला होता. नंतरच्या ८ षटकात धपाधप बाद होत केवळ ४८ धावा झाल्या.
आज बांगलादेश साडवतो आहे
आज बांगलादेश सडवतो आहे आपल्याला...
रोहित, धवन, कोहली, राहुल ची वापसी (राहुल सोडून बाकीच्यांनी माती खाल्ली, राहुल त्याच्या कमजोर टीम समोर दादा असण्याच्या इमेजला जागतोय...
अवघड दिसतंय एकूणच...
फिरकी समोर गारद फलंदाजी.
फिरकी समोर गारद फलंदाजी.
ईंग्लंडने ईतके लवकर डिक्लेअर
ईंग्लंडने ईतके लवकर डिक्लेअर का केले कळले नाही.. खूपच रिस्क घेतलीय.
बॅडलाईटने खेळ लवकर थांबतोय.
उद्या साधारण ७५ ओवर मिळतील पाकिस्तानला २६३ मारायला तरी रनरेट साडेतीन होतोय.
टेस्ट क्रिकेट जगवायची जबाबदारी ईंग्लंडने आपल्या खांद्यावर घेतली आहे का..
ंबंगलादेश भारताविरुद्ध जिंकले
ंबंगलादेश भारताविरुद्ध जिंकले.
मेहदी समोर गारद गोलंदाजी!!
काय पण सामना!
१२८/५ ते १३६/९ नि नंतर थेट १८७. शेवटची जोडी नाबाद ५०! चौकार मारून विजय!!!
सेन फार महाग पडला.
मजा आली
मजा आली
सेन महाग पडला तरी अखेरीस त्याला द्यायला हवी होती. सुंदर स्पिनर तरी आजमावयला हवा होता. दिपक चहर डेथला अगदीच मर्यादीत क्षमतेचा गोलंदाज वाटला. सिराजच्याही संपल्याने तळाच्या फलंदाजांवर दमदाटी करून विकेट काढेल असा कोणी उरलाच नाही. बस ते काय चुक करताहेत याची वाट बघत राहिलो. एक चूक केली तिथे राहुलने झेल रापला. त्याचीही काही किपिंग करायची मनापासून ईच्छा दिसत नाही.
त्रिपाठी पुन्हा बेंचवर!
त्रिपाठी पुन्हा बेंचवर! त्याचा कोणी काका मामा अतोबा निदान MLA कोणीही नाही. अश्यांनी क्रिकेट खेळू नये हेच खरंं.
काल भारताला ५१ धावा साठी
काल भारताला ५१ धावा साठी शेवटचा बळी मिळविता नाही आला आज इंग्रजांनी ८३ धावा शिल्लक असताना ९ धावात ५ बाद करून ७४ धावांनी विजय मिळविला. गोलंदाजांचा अनुभव.
४० वर्षाचा अँडरसन अजुनी फिट अँड फाईन..
काल भारताला ५१ धावा साठी
--
४० वर्षाचा अँडरसन अजुनी फिट
४० वर्षाचा अँडरसन अजुनी फिट अँड फाईन..
>> ७०० साठी फक्त २८ बळी हवेत आता.
IND 84/4 (20.1) CRR: 4.17
IND 84/4 (20.1) CRR: 4.17 REQ: 6.3
या चिमण्यांनो, परत फिरा रे
घराकडे अपुल्या जाहल्या, तिन्हीसांजा जाहल्या
IPL सुरु होतंय. तुम्ही काऊन तिकडे TP करत अहात?
*या चिमण्यांनो, परत फिरा रे*
*या चिमण्यांनो, परत फिरा रे* -
क्रिकेटचं ' अति झालं, हंसू आलं ' झालंय !!!
<<क्रिकेटचं ' अति झालं, हंसू
<<क्रिकेटचं ' अति झालं, हंसू आलं ' झालंय !!!>>
शंभर टक्के सहमत.
पण लोक पैसे देऊन बघायला येतात नि मालक लोक माकडांना खेळवावे तसे खेळाडूंना खेळवतात.
हरले काय नि जिंकले काय, पैसे तर मिळतातच.
बोलून चालून धंदाच तो.
क्रिकेटचं ' अति झालं, हंसू
क्रिकेटचं ' अति झालं, हंसू आलं ' झालंय !!! >> वर्ल्ड कप नंतर ह्या अधल्या मधल्या छोट्या सिरीज अ नि ब संघ घेऊन खेळायला हव्या होत्या. मेंटली चेक्ड आ ऊट वाटतात सगळे
“ह्या अधल्या मधल्या छोट्या
“ह्या अधल्या मधल्या छोट्या सिरीज अ नि ब संघ घेऊन खेळायला हव्या होत्या.” - बॉलिंग बहुतेक सगळी ब संघाचीच (आणि ड दर्जाची) आहे की.
मर्द मावळा मुंबईकर मुघलांशी
मर्द मावळा मुंबईकर मुघलांशी एकटा लढला !
हो. भारताचा पराभव झाला. पण मन शर्माने जिंकले. मी पाहिला नाही सामना मात्र दहावा खेळायला आला म्हणजे दुखापत अगदी साधी नव्हती. त्यामुळे त्यानंतरही जे केले ते कमाल होते.
५ ओवर ५९ हवे असताना १८ धावा मारून ४ ओवर ४१ ला सामना आणलेला पण सिराजने अक्षरशा ओवरच्या ओवर मेडन घालवून २ ओवर ४० केले. तिथूनही सामना एकहाती लास्ट बॉलपर्यंत नेला.
मालिका हरलो तरी शर्मा अश्या दुखापतग्रस्त अवस्थेतही खेळल्याने आता पुर्वीचा शर्मा बघायला मिळू शकतो. येत्या वर्ल्डकप तयारीच्या दृष्टीने हे चांगले चिन्ह आहे.
बॉलिंग बहुतेक सगळी ब संघाचीच
बॉलिंग बहुतेक सगळी ब संघाचीच (आणि ड दर्जाची) आहे की. Happy >>
नाहि रे तसे नाही - जो संघ बांग्लादेशात आधी जाऊन खेळून आला होता त्याबद्दल म्हणत होतो. म्हणजे लाईनीच्या पलीकडे असलेल्यांना संधी द्यायला हवी होती. ड दर्जाची म्हणशील तर आपल्या मेन बॉलिंङ ला पण तो शाप सध्या आहेच कि. इनिंङ क्लोज न करता येणे हे काहीनवीन नाहीये नि द्रविअड आल्यापासून ते टेस्त मधे व्हायला लागले आहे. बॉलर्स पेक्षा एकंदर डावपेचांचा हिस्स ह्यात अधिक वाटतो मला.
बाकि सरफराज ने पार म्हणजे पारच निराशा केली राव
सिरीज हरल्याचे वाईट वाटते पण
सिरीज हरल्याचे वाईट वाटते पण हे विसरून चालणार नाही कि बांगलादेश हे ODI सामन्यात खरोखरच घरचे शेर आहेत.
गेल्या 5-6 वर्षात त्यांचा होम रेकॉर्ड कुठल्याही संघापेक्षा तगडा आहे. ते घरच्या मालिका सह्सा हरत नाहीत.
हो रे फक्त इथे ते ऑलमोस्ट
हो रे फक्त इथे ते ऑलमोस्ट हरले होते दोन्ही वेळेला. अगदी अशक्यप्राय रितीने खेचले आहेत त्यांनी.
हो, अश्या वेळी एका चांगल्या
हो, अश्या वेळी एका चांगल्या रिस्ट स्पिनर ची कमतरता जाणवते. टेलएंडर ना गुंडाळायला ते फार कामाचे ठरतात.
टॉप ऑर्डर चं फेल होणं हि नेहमीची रड तर आहेच.
*एका चांगल्या रिस्ट स्पिनर ची
*एका चांगल्या रिस्ट स्पिनर ची कमतरता जाणवते. टेलएंडर ना गुंडाळायला ते फार कामाचे ठरतात.* - +1 . नुसते टेलएंडरच नाही तर टॉपचे फलंदाजही चांगल्या रिस्ट स्पिनरना गंडतात ! आणि, आपणच पूर्वी हें सिद्ध केलंय !!
“टेलएंडरच नाही तर टॉपचे
“टेलएंडरच नाही तर टॉपचे फलंदाजही चांगल्या रिस्ट स्पिनरना गंडतात ! आणि, आपणच पूर्वी हें सिद्ध केलंय ” - अजूनही करतोय, फक्त दुसर्या बाजूने

*फक्त दुसर्या बाजूने *--
*फक्त दुसर्या बाजूने *-- याचंच दु:ख वाटतं !!
बीसीसीआय ने ‘नोएल डेव्हिड‘
बीसीसीआय ने ‘नोएल डेव्हिड‘ परंपरेला जागत, दोन फास्ट बॉलर्स आणि एक बॅट्समन इंज्युअर झाल्यावर एक स्पिनर रिप्लेसमेंट म्हणून पाठवला.
‘नोएल डेव्हिड‘ परंपरा.
‘नोएल डेव्हिड‘ परंपरा. तिकडे इंडीया अ संघाने बांग्लादेश अ संघाला चांगलाच चोपला.
बाकी रोहितच्याही कॅप्टन्सी मधे दम नाही असे म्हटले तर मायबोलीचा सर्व्हर बंद पडेल इतक्या पोस्ट्स येतील का ?
दोन फास्ट बॉलर्स आणि एक
दोन फास्ट बॉलर्स आणि एक बॅट्समन इंज्युअर झाल्यावर एक स्पिनर रिप्लेसमेंट म्हणून पाठवला >>>
ईश्वरन आणि सैनी ला "अ" दौरा संपल्यावर थांबवून ठेवणार अशी बातमी आहे. उमरानलाही ODI नंतर परत टीम सोबत ठेवत आहेत.
तसेही पहिल्या कसोटीत दोनच फास्ट बॉलर्स ना खेळवतील. उमेश आणि सिराज पुरेसे पडले पाहिजेत.
सब काँटिनंट पिच म्हणजे
सब काँटिनंट पिच म्हणजे स्पेशालिस्ट उमेश खेळलाच पाहिजे.
Pages