Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तू परत एकदा जाऊन मी आवेश खान
तू परत एकदा जाऊन मी आवेश खान बद्दल काय लिहिले होते ते वाच. त्याने तेंव्हाही तेच केले जे आज केले नि कारण काय हे मी लिहिले होते. पटटा फिरवणे ह्यापेक्षा त्याला बॅटींग येत नाही हे मी लिहिले होते त्यावर तू 'त्याची बॅटिंग कशी टाकाऊ नाही' वगैरे प्रवचन झोडले होतेस. इंटरनॅशनलमधे ८ चा नि डोमेस्टिक मधे १७ मॅचेस मधे ४५ रन्स काढलेला खेळाडू आहे तो. शुअर त्याने स्ट्र्राईक संजूला द्यायला हवा होता हे उघड आहे पण ते तो एकाच पद्धतीने करू शकतो जे तो करायचा प्रयत्न करत होता. तूझी अपेक्षा त्याने स्टाईलमधे मस्त गॅप मधे बॉल ढकलवा अशी असेल तर गम्मत आहे. बहुतेक टेल एंडर्स असेच पट्टे फिरवतात. सेत असलेल्या संजू ला सुद्धा ३७.६ मधे बॉल डॅब करता आला नव्हता नि स्ट्राईक आवेश खान कडे गेला होता हे लक्षात घे.
मॅच फिक्सिंग प्रमाणे तू इथेही आधी कंक्ल्यूजन काढून त्याला पूरक पुरावे शोधतो आहेस.
शुअर त्याने स्ट्र्राईक संजूला
शुअर त्याने स्ट्र्राईक संजूला द्यायला हवा होता हे उघड आहे पण ते तो एकाच पद्धतीने करू शकतो जे तो करायचा प्रयत्न करत होता.
>>>
माफ करा पण बिलकुल नाही पटले.
एखाद्या फलंदाजाला आंधळी बॅटच फिरवता येते आणि बॅटला बॉल लावणे एवढे बेसिक तो करू शकत नसेल वा तसा प्रयत्नही त्याला जमत नसेल तर त्याचा नंबर नववा नाही तर अकरावा हवा.
आणि हो, सिंगल काढायला बॉल गॅपमध्ये ढकलावा नाही लागत. अश्या सिच्युएशनला बॅटला बॉल लागला की रन मिळतो कुठूनही. एका बॉलला नाही मिळाला तरी पुढच्या बॉलला मिळतो. फक्त तशी नियत हवी. त्याची नियत आज पुन्हा उघड झाली. आशा करतो टीम मॅनेजमेंटकडून त्याला टोचन मिळेल आणि अश्या वृत्तीला आळा घातला जाईल.
असो,
माझा मुद्दा क्लीअर झाला. आपल्याला मान्य न करण्याचा अधिकार आहेच. शुभरात्री
(No subject)
..
एकूण एक क्रिकेटप्रेमींना पटले हे.
पण अर्थात मॅनेजमेंटला पटणे गरजेचे.
>>>
मटाची बातमी!
हिरो बनायला गेला पण भारताच्या पराभवाचा व्हिलन ठरला, संजूला साथ न देणारा हा खेळाडू कोण पाहा
https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/want-to-hero-bu...
पहिले वाक्य "लखनौ : भारताचा
पहिले वाक्य "लखनौ : भारताचा कर्णधार बदलला खरा, पण त्यांचे नशिब मात्र बदलले नाही. कारण कर्णधार बदलल्यावरही भारतीय संघावर सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाची नामुष्की ओढावली. " ह्यातच त्या लेखाची क्रेडिबिलिटी दिसते. सो मि वरच्या लाईक्स ना माझ्यासाठी शून्य किम्मत आहे. तिथे काहीही लिहिले तर लाईक्स देणारे मिळतात.
आज श्रेयस आणि किशन जबरदस्त
आज श्रेयस आणि किशन जबरदस्त खेळले. भारताची बॉलिंग बघितली नाही, पण त्यांनी चांगला कमबॅक केला असं वाचलं. संजूला विनिंग साईडला बघून बरं वाटलं.
असामी नुसते लाईक्स नाही
असामी नुसते लाईक्स नाही क्रिकेटप्रेमींचे कॉमेंटसही होते. माझे मत मायबोलीबाहेर शेकडो लोकांना पटले. तुम्हाला न पटल्यास आता माझी हरकत नाही हेच सांगायचे होते. तुम्ही आमच्या मताला शून्य किंमत देऊ शकता
अय्यर आज भारी खेळला.
अय्यर आज भारी खेळला.
एकदिवशी संघात तरी तो आपली जागा दिवसेंदिवस पक्की करत चालला आहे. गेल्या 10 एकदिवशी सामन्यात हा सहावा 50+ स्कोर आहे.
सिराज ने खरंच चांगली बॉलिंग टाकली, नव्या बॉल ने हि आणि डेथ ओव्हर्स मध्ये हि.
तुम्ही आमच्या मताला शून्य
तुम्ही आमच्या मताला शून्य किंमत देऊ शकता >> समर्थांना शिकवणारी महान हस्ती आपण - पण त्या लेखात आवेश खान खेळात व्हिलन ठरला एव्हढेच म्हटलय' तुझ्यासारखे त्याची 'नियत' काढलेली नाहिये हा सूक्ष्म फरक आहे.
अय्यरन्नॉकिये च्या शॉर्ट बॉल ला थोडा चाचपडला पण त्यातून शिकलेला वाटत होता. बाकी स्पिन तो ज्या तर्हेने खेळला ते बघून त्याला मधल्या फळीत सूर्या बरोबर स्पिनर विरुद्ध रन रेट वाढवायला नक्की वापरले जाईल .
सिराज ने खरंच चांगली बॉलिंग टाकली, नव्या बॉल ने हि आणि डेथ ओव्हर्स मध्ये हि. >> सिराजची बॉलिंङ एकदमच रेफ्रेशिंग होती. रीव्हर्स पण केले काही वेळा.
तुझ्यासारखे त्याची 'नियत'
तुझ्यासारखे त्याची 'नियत' काढलेली नाहिये हा सूक्ष्म फरक आहे.
>>>
संघहिताचा विचार करून लोकप्रिय खेळाडूच्या चाहत्यांना दुखावून ज्याने आपल्याला एक नाही तर तब्बल तीन विश्वचषक मिळवून दिले त्या महान कर्णधार धोनीला ईथे स्वार्थी आणि ढोंगी म्हटले गेले त्याला म्हणावे एखाद्याची नियत काढणे..
त्या दिवशी जर धोनी कर्णधार असता तर काय बिशाद त्या आवेश खानची असले काही करायची. पहिल्याच बॉलला त्याला टोचन मिळाले असते किंबहुना पहिला चेंडू पडायच्या आधीच त्याला त्याची भुमिका समजावली गेली असती. आणि त्यापलीकडे जाऊनही त्याने हिरोगिरीचा हट्ट सोडला नसता तर त्याला धोनीच्या संघात जागा नसती.
मी धोनीचा चाहता आहे ते याच गुणांसाठी. म्हणूनच मागे विंडीज विरुद्धच आवेश खानचा हा आवेश पकडला होता. त्यानेही पुन्हा तेच करून मला खरे सिद्ध केले.
सर, स्वतःच्या अंगावर आलं कि
सर, स्वतःच्या अंगावर आलं कि दुसर्याच्या शिंगावर ढकलायचा राजकारणी खेळ खेळणं बंद करा. संदर्भ सोडून दुसर्याची वाक्य उद्धृत करून स्वतःचा मुद्दा पुढे दामटणं बंद करा. मधूच्या आत्याबाईंना मिश्या असत्या तर काका म्हटलं असतं छाप विधानं बंद करा आणी बघा स्वतःचा मुद्दा मांडता येतो का.
बाकी तुम्ही ‘समर्थ’ आहातच
स्वतःच्या अंगावर आलं कि
स्वतःच्या अंगावर आलं कि दुसर्याच्या शिंगावर ढकलायचा राजकारणी खेळ खेळणं बंद करा. > खरय ! ह्यात धोनी चा नि तुझ्यात नि फे फ मधे झालेल्या वादाचा काय संबंध आहे ? नेहमीप्रमाणे वडाची फांदी पिंपळाला लावायचे काम सुरू. इतके सेल्फ व्हॅलिडेशन ईज नॉट रीयली हेल्दी बाबा.
क्रिकेट विषयावर एक मराठी
क्रिकेट विषयावर एक मराठी दिवाळी अंक Cricकथा बाजारात आला आहे.
फेसबुक वर कळलं. Online आणि पेपर अंक पण आहे. चांगला वाटतोय. (www.crickatha.com)
www.crickatha.com
दिवाळी अंक www.crickatha.com वर वाचायला मिळेल.
प्यारा प्लस मी पण हा Cricकथा
प्यारा प्लस मी पण हा Cricकथा दिवाळी अंक दुकानात बघीतला. विकत घेऊन बघायला पाहिजे. आधी कधी cricket वर दिवाळी अंक नाही पाहिला. Interesting आहे concept.
छे वाद कोणाशीही नाही. ना
छे वाद कोणाशीही नाही. ना वडाची साल पिंपळाला आहे.
आवेशने हिरो बनायच्या नादात सामना घालवला हे आता जगजाहीर आहे. ते तो असाच आहे हे मी आधीच ओळखलेले ईतकेच. त्यात मी त्याची नियत काढली वा चारीत्र्यहनन केले अश्या आविर्भावात लिहीताना तेच धोनीला ढोंगी वा स्वार्थी म्हणतेवेळी कसा निकष बदलतो याची तेवढी गंमत वाटली ईतकेच.
असो. या विषयावर हे मा शे पो
पुढचा सामना आपण जिंकलोही.
आज निर्णायक.
पण मजा येत नाहीये या मालिकेत. मुख्य संघ नसल्याने म्हणा वा आता मन आधीच २०-२० वर्ल्डकपला पोहोचल्याने म्हणा...
तरी यानंतर लवकरच वन डे वर्ल्डकप आहे. तो ही भारतात. तेव्हा हे सारे परफॉर्मन्स काऊंट होणार आहेत. पंत, राहुल, किशन, सॅमसन सारे किपर पुन्हा स्पर्धेत असणार आहेत. मिडल ऑर्डरला अय्यर आपली दावेदारी मजबूत करत आहे. तो वर्ल्डकप भारतात असल्याने अय्यर नक्कीच आहे त्या स्पर्धेत. धवन आणि गिलमध्येही एक चुरस बघायला मिळू शकते. एकदा हे २०-२० फिव्हर संपला की मग येणाऱ्या वनडे मालिकांत काय संघ असेल त्यावरून समजेल शर्मा-द्रविड आणि निवडसमितीच्या डोक्यात काय चालू आहे..
*शर्मा-द्रविड आणि
*शर्मा-द्रविड आणि निवडसमितीच्या डोक्यात काय चालू आहे..* - डोक्यात काय आहे यावरून निवड करताना मैदानात काय चाललं आहे हें नीट बघूनच डोक्यात साठवणं अत्यावश्यक ! No prejudices, no favouritism !!!
आधी कधी cricket वर दिवाळी अंक
आधी कधी cricket वर दिवाळी अंक नाही पाहिला. Interesting आहे concept. >> +१ नक्कीच बघायला हवे.
No prejudices, no favoritism !! >> आपले नशीब भाऊ कि ते कोणाची न्यत आधीच ठरवऊन त्याप्रमाणे तोफा डागत नाहीत. बाकी ते 'समर्थ' आहेत
संदर्भहीन उद्धरणं देण्याची
संदर्भहीन उद्धरणं देण्याची परंपरा चालू ठेवून असंबद्धपणे आपला मुद्दा पुढे दामटवण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्यानंतर का होईना, ‘ह्या विषयावरची ही माझी शेवटची पोस्ट‘ म्हटल्याबद्दल मंडळ आभारी आहे.
आज आवेश खानची गोलंदाजी
आज आवेश खानची गोलंदाजी चांगली झाली. ५ षटाकांत फक्त ८ धावा.
नशीब त्याला आज फलंदाजी नाही करावी लागली, नाहीतर पुनः शिव्या खाव्या लागल्या असत्या.
झक्की आयपील मधल्या
झक्की आयपील मधल्या कामगिरीवरून टेस्ट मधे निवडणाअरे आपण त्यामूळे बॉलर कडून बॅटींग ची अपेक्षा धरून त्याची नियत काढणे साहजिकच धरायचे हो.
भारतीय मुलींच्या टीमने
भारतीय मुलींच्या टीमने सातव्यांदा एशिया कप जिंकला. अभिनंदन टीम इंडिया!!
रेणुका सिंग एक अमेझिंग फाइंड आहे. खुप व्हरायटी आहे तिच्याकडे. बाकी स्मृती, हरमन, दिप्ती, स्नेह हे नेहमीचे यशस्वी कलाकार आहेतच. आता एकदा ऑस्ट्रेलियाला हारवताना बघायचंय (फायनल फ्रंटियर
)
मग यातल्या काही काही बायकांना
मग यातल्या काही काही बायकांना घेऊन एक स्त्री-पुरुष संमिश्र संघ केला पाहिजे!
बॉलर कडून बॅटींग ची अपेक्षा
बॉलर कडून बॅटींग ची अपेक्षा धरून त्याची नियत काढणे साहजिकच धरायचे हो.
>>>>
नियत काय आहे याचा फलंदाजी गोलंदाजी स्किल काय आहे याच्याशी संबंध नसतो. असो हे कळावे ईतके सारेच सुज्ञ आहेत. फक्त मान्य करायचे नाही. त्यापेक्षा सोडा तो विषय
बायका आशिया कप जिंकल्या.
बायका आशिया कप जिंकल्या. आनंद आहे. त्यांच्या कौतुकाचे मी व्हॉटसप स्टेटसही ठेवले. पण आशियात त्यांना टक्करला लंका पाकिस्तान संघ फार तगडे नाहीत. त्यांनी लवकरात लवकर वर्ल्डकप जिंकायला हवे. सध्या बायकांच्या क्रिकेटला चांगले दिवस आलेत. प्रेक्षकवर्ग वाढतोय. लोकांचा पाठिंबा मिळतोय. पण मोठ्या स्पर्धेत जी त्यांची चोकर ईमेज झाली आहे ती लवकरात लवकर बदलणे गरजेचे.
रेणुका सिंग एक अमेझिंग फाइंड
रेणुका सिंग एक अमेझिंग फाइंड आहे. खुप व्हरायटी आहे तिच्याकडे >> +१ . एकदम इंप्रेसीव्ह आहे. एकूनच गर्ल्स टीम कौतुकास्पद खेळतात.
असो हे कळावे ईतके सारेच सुज्ञ आहेत. >> आत्मपरीक्षण
आज शमी ला एकच ओव्हर का दिली ?
आज शमी ला एकच ओव्हर का दिली ? अक्षर ला एकही का दिली नाही ? काही कळले का ?
“आज शमी ला एकच ओव्हर का दिली
“आज शमी ला एकच ओव्हर का दिली ?” - आज इंडियाने पूर्ण टीमची नावं डिक्लेअर केली होती. पण शमी स्टार्टिंग ११ मधे नव्हता. त्याला एकदम शेवटच्या ओव्हरलाच आणलं. रोहितच्या म्हणण्यानुसार हा प्लॅन होता. शमीची पॉवरप्ले मधली बॉलिंग परिचित आहेच, पण त्याला डेथ ओव्हर्समधे चॅलेंज करायचं होतं.
आज इंडियाने पूर्ण टीमची नावं
आज इंडियाने पूर्ण टीमची नावं डिक्लेअर केली होती. पण शमी स्टार्टिंग ११ मधे नव्हता. >> कमाल आहे राव. बुमरा चा सब म्हणून नेलय. भुवी, हर्श, अर्शदीप पैकि दोघेच खेळवू शकतो हे लक्षात येऊनही अकरा मधे नव्हता ?
https://www.espncricinfo.com
https://www.espncricinfo.com/story/t20-world-cup-2022-aus-vs-ind-wanted-...
इथे सगळा इंटरव्ह्यू आहे शर्मा चा.
"अकरा मधे नव्हता ?" - प्लेयिंग ११ डिक्लेअर न करता आक्खी टीमच रोस्टरवर होती. त्याचा फोटो आलाय कुठेतरी. त्यात शामीची बॅटींग पोझिशन १३ दाखवली आहे.
वोर्मअपला कुठे असते अकराची
वोर्मअपला कुठे असते अकराची भानगड. पंधराच्या पंधरा खेळवू शकतो ना. लिहिली असतील कशीही नावे.
आणि हा आपला तिसरा वॉर्म अप सामना होता. अजून एक बाकी आहे. टोटल चार सामने असताना गरजेनुसार प्रत्येकाला कमी जास्त खेळवत असतील. कोणाला किती मॅचप्रॅक्टीसची गरज आहे आणि कोणत्या सिच्युएशनला हे आपल्यापेक्षा जास्त तिथे त्यांनाच ठाऊक असावे.
शमीला लास्ट ओवर देणे मात्र वॉर्म अप सामन्यातील मास्टरस्ट्रोक ठरला. तसेही तो कसोटीत बरेचदा नवीन बॉल न हाताळता पहिला चेंज म्हणून वापरला जातो. ईथेही त्याला मिडल ओवर, डेथ ओवर भुमिकेत बघितले जाऊ शकते.
Pages