बिगबॉस हिन्दी : सिझन १६ .

Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01

मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Faarach wichitra aahe te yewadhya malaa ghaalun firane.. promo madhe baghitala.. kasasach jhala

काल पाहिला बीबीचा नॉमिनेशन टास्क. काल नशीब बिग बॉसच्या विरोधात गेले. बुली गॅंग (निम्रत व अब्दू सोडून ) पूर्ण नॉमिनेट झाली. बिग बॉस मनात म्हणत असेल की कुठून मी असा व्हील फिरवण्याचा चान्स घेतला आणि माझ्या लाडक्यांना धोक्यात टाकले. पण कदाचित त्यांना निम्रत सेफ असल्याने काही काळजी वाटली नसेल. प्रियांका पण नॉमिनेट झाली आहे ते पण निम्रतने खोटारडेपणा करून एक चान्स शिवला दिला म्हणून झाली. ही निम्मो इतकी लुझर आहे ना. मला तिचा आवाज असह्य होतो. आता शिवने खरेतर अंकित किंवा सौंदर्याला नॉमिनेट करायचे तर वेड्यासारखे प्रियांकालाच केले. सौंदर्याला केले असती तर तीच गेली असती.

आता साजिदला कसे वाचवायचे हा पेच बीबी पुढे उभा राहिला आहे. त्याला काहीही वोट्स नाहीत. आणि हा म्हणे मी फार पॉप्युलर आहे दूरदर्शन काळापासून मला फॅन्स आहेत. प्रियंकाने मला नॉमिनेट करून एक वोट वाया घालवले.
biggrin.gifकुठून येतो इतका ओव्हर कॉन्फिडन्स कुणास ठाऊक ?

कॅप्टन कसा ठरवला तर म्हणे आधीच घरातल्यांनी सेटिंग केली. बीबीला काहीही करून निम्रत ला विनर करायचंच आहे असं दिसतंय.

Faarach wichitra aahe te yewadhya malaa ghaalun firane.>>
८ किलोच्या माळा घालून ह्यांच्या माना दुखत नसतील का ? आणि रात्री इतक्या माळा काढून ठेवताना चोरीचे टेन्शन येत नसेल का ?

त्या stan ला तूफान वोटिंग होतंय, तो एक नंबरवर आहे, प्रियंका दोन आणि शिव तीनवर आहे. फॅन्स पण डबल आहेत म्हणे त्याचे 4 मिलियन्स, बाकीच्यांचे वन आणि टू मिलियन्सच्या मध्ये. अॅक्ट रायडर्स म्हणाला, ख खो माहिती नाही.

स्टॅन इज ह्युज डिल ऑन सोशल मिडिया, म्हणून त्याला टिप्स द्यायला, पुश करायला सोन्याची माणसं पाठवली असणार !

टिना भयंकर इनसिक्युर बाई आहे....
शिव बरोबर म्हणाला , निमरीत ला काय कोणाला दुसऱ्याला कॅप्टन बनवलं, तर ती तुझी मैत्रीण आहे म्हणून तुला आनंद नाही होऊ शकत? अशी कशी दोस्ती तुझी??? मग खरं रूप आलं बाहेर बाईसाहेबांचं,
माझा कोणी दोस्त नाही, मी माझा गेम खेळणार...
आधी जसं काय बाकी लोकांसाठी च खेळत होती ...
साजिद बोलत होता, तिला सध्या मार्केट व्हॅल्यु नाही, तिचा शो 6 वर्षांपूर्वी बंद झाला.... वगैरे...

काल अर्चना त्या सोनेरी सनी सोबत वर्कआऊट करत होती तो सिन बघायला मजा आली. शिव तिच्यासारखं चालून दाखवत होता आणि सुमबुल म्हणते, वो ड्रेस दिखा राही है"
मग अर्चना उपडी झोपून फक्त पाय हलवत होती, म्हणजे व्यायाम करत होती... hahahah
आणि ते दोघे सोनेरी मुलगे पक्के मराठी आहेत , स्टॅन बोलतो त्यांच्यासोबत ते ऐकायला मजा येते....

निम्रतच्या myglam contest वोट्स मध्ये पण प्रचंड वाढ झाली आहे म्हणे. तासातासाला मिलियन वोट्स मिळत आहेत. आता सांगा कोण फॅन्स आहेत हिचे बाहेर की जे तिला वोट्स देत आहेत ?

बिग बॉसने पढवल्याप्रमाणे शीवच्या मदतीने ती फिनालेत पोचणार आणि विनर ही होणार. शिव हात चोळत बसणार बहुतेक.

मी तर निमरीत ला कुठे ही पाहिलं नव्हतं
नन्तर कळलं की ही एक सिरीयल मध्ये आलेली आहे... पण फक्त तितक्या जोरावर तिला इतके वोट?????

निमरीतपेक्षा प्रियंका जिंकली तर चालेल. वोटस मात्र मी शिवला देईन. सध्या देत नाहीये, शेवटी देईन.

कोणीतरी वाघचौरे आला आहेना आता, बघायला हवं. दागिने घालणाऱ्या लोकांना आणून काय करणार.

शिवच्या गेमचा फायदा निम्रितसाठी करून घेत आहेत बीबॉ. बिनधास्त फेवरीजम करायचं म्हणजे पब्लिक त्यांच्या विरोधात जातं आणि नंतरच्या आठवड्यात त्यांना टोमणे मारायचे म्हणजे पब्लिक खुष. अप्रिसौ काही केल्या आवडत नाहियेत, फार किंचाळत बसतात. टिना या सीजनची विलन आहे. मला नाही वाटत निम्रित जिंकेल. स्टॅन भयानक पॉप्युलर आहे, पण त्याला नाही जिंकवनार. शिवचा प्रश्नच नाही. दोघांना जास्ती जास्त टॉप 5 पर्यंत नेतील. अर्चनाही असेल. प्रियांका जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. दर वीकेंडला त्यांना स्पून फीडिंग करतात. तसंही येताना एक वोट घेऊन येणार्‍यांना एक फायदा असतोच. बाकी यावेळी साजिद जावा, बोर करतो. सुंबूल, अंकित, स्टॅन या गेमसाठी नाहीच आहेत.

बाकी यावेळेस बीबॉला कोणी जुमानत नाहिये त्याची मला फार मजा वाटते. पण बीबॉ तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतोय.

स्टॅन ने परवा टीनाला सांगितले की त्याला गेममध्ये काही कळतही नाही आणि इंटरेस्ट पण नाही. तो केवळ टाईमपास आणि बदल म्हणून आला आहे. सकाळी तर त्या बिग बॉस अँथेम मध्ये नुसता उभा असतो. एरवी झोप काढणे आणि टास्कमध्ये साजिद आणि शिव सांगतील तसे वागणे, निर्णय देणे हेच करतो.

तो अति सेन्सिटिव्ह आहे किंवा खरच त्याला काही समजत नाही. आणि बऱ्याचदा दुसरा काय बोलला हे तिखट मीठ लावून सांगतो. आणि लगेच सर्रास खोटेही सांगतो कि मी काही बोललोच नाही. ग्रजेसही ठेवतो अब्दू सारखे.

मी खूप प्रयत्न केला त्याला समजून आवडून घ्यायचा पण असले prejudiced मिसोजिनिस्ट लोक नाहीच आवडत.

निमरीतपेक्षा प्रियंका जिंकली तर चालेल. >> अंजू प्रियांका आणि निमरतची comparison च नाही. निम्रतला स्वतःचे डोकेच नाही. प्रियांका हुशार आहे आणि स्ट्रॉन्गही. पण बीबी च्या मनात निम्रत आहे. बीबी ने निम्रतला पहिल्यापासून टेकू देऊन पुढे आणले आहे. तिला सिम्पथी देणे हाही त्यातलाच प्रकार. तिचा फॅन बेस ही कमी आहे पण विनर तर करायचे आहे म्हणून प्रियंकाला नेगेटिव्ह दाखवतात. वीकेंडला एकदा तिला ओरडतात की तू मुद्द्यात घुसते(जे शिवही करतो पण ते इग्नोर केले जाते)पुढच्या आठवड्यात तोच सलमान तिला म्हणतो की तू मुद्दयांवर बोलली नाहीस. त्याच्या पुढच्या आठवड्यात तू मित्रांना का भडकावलेस आणि त्यापुढच्या आठवड्यात तू का मित्रांना सपोर्ट केला नाहीस म्हणून ओरडतॊ. असे उलटसुलट ओरडायचे. म्हणजे ती confused.

प्रियांका अंकितला टॉर्चर करते असेही सीन वेचून दाखवतात. त्यांचे जोक्स करतानाचे, हसतानाचे चांगले सीन्स दाखवत नाहीत. आता अंकित किती हुशार, सॉर्टेड आहे हे तर सर्वानी पहिले आहे. तो जर असा टॉर्चर होत असता तर राहिला असता का तिच्याबरोबर. पण बिग बॉस असे नॅरेटिव्ह क्रिएट करतात.
प्रियांका अंकित ला मी याआधी पहिले नव्हते, अंकित मला खूप आवडतो पण माझे इम्प्रेशन असे आहे की प्रियांका त्याच्या प्रचंड प्रेमात आहे आणि अंकित नॉन कमिटल आहे तो लग्न commitment पासून नेहमीच दूर राहील. प्रियांका ने त्याच्यापासून दूर व्हावे, नाहीतर तिची निराशाच होईल.

मग आता साजिदला नॉमिनेशनपासून वाचविण्यासाठी काय करतात बघायला मजा येईल. कारण तो आला नॉमिनेशनमध्ये की तोच जाणार.

साजिद वोटींगमध्ये शेवटी होता हे सर्वानीच सांगितले होते. मग बिग बॉसपाशी पर्यायच नाही राहिला.

आता पुढच्या वेळी परत वन सायडेड टास्क करून साजिदला वाचवतील. आणि कसे तरी सौंदर्याला नॉमिनेशन मध्ये आणतील. बाकीच्यांना काढूच शकत नाहीत.
सगळ्यांनाच ठेवायचे आहे मग काढणार तरी कोणाला.

गौतम गेल्यापासून सौंदर्या कडे अर्चना सोबत किचन फाईट शिवाय काहीच उरलेलं नाही. तरीपण शालीन सोबत काहीतरी स्पाईस क्रिएट करेल या आशेनं बीबी ने तिला एक आठवडा एक्स्ट्रा ठेऊन घेतलं. आता मात्र नक्की काढतील.

माझे इम्प्रेशन असे आहे की प्रियांका त्याच्या प्रचंड प्रेमात आहे आणि अंकित नॉन कमिटल आहे >>> मला वेगळ्याच व्हाइब येतात अंकित बद्दल. कदाचित चुकतही असेन मी, पण त्याला प्रियांका काय कोणत्याच मुलीत इन्टरेस्ट नसावा असे काही तरी वाटते. असो. यापेक्षा जास्त बोलत नाही.

गोल्डन बॉइज शांततेत गेले की. मला वाटलं दंगा करतील. बिबॉ स्क्रिप्टेड नसलं तरी ते हिंट्स देतात येन केन प्रकारेण , ज्यांची नावं आलीत त्यांनी गोंधळ घालायचा.
काल परत स्पून फीडिंग, ब्रेक अप, पॅच अप, रुठना ,मनाना चाललं बहु बेट्याचं. त्यांचं कमी की फेक कपल आहेच मग. Spitvilla नाही तर सास बहु ड्रामा. अंकितला एव्हढं आंजारून गोंजारून झालंय, प्रियांकाचा आरडा ओरडा जास्त झाला तर ट्रॉफी त्यालाच देतील. प्रोमो बघुन वाटतय आता टिशावर कोणी विश्वास ठेवणार नाही.

ह्यात बिग बॉसने शिवसमोर वीणाचा विषय काढला हे खरं आहे का. युट्युबवर चर्चा सुरु आहे, वीणाने इंस्टावर शिवसाठी वाघ आहेस तू, रडू नकोस, मी आहे तुझ्यासोबत वगैरे लिहीलं असे फोटोही बघितले. मी इंस्टावर नाही पण युट्युबर्स सांगतायेत.

ह्यात बिग बॉसने शिवसमोर वीणाचा विषय काढला हे खरं आहे का. >> हो promo पहिला मी आणि ista वर वीणाने तो video ठेवून हे caption दिलंय....

Ho Veena cha ullekh bb ne naahi shiv nech kela hota.. ti mala samjun ghete asa kahi.. Veena ne pan insta war status takla hota .. tech waagha aahe n all..

Ithlya posts thamblya.. sagale ekatra pakalo aapan Lol

Pages