बिगबॉस हिन्दी : सिझन १६ .

Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01

मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या वीकएंड का वार नंतर एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे साजिदचे मिस्टर गुडी टू शुजचे घेतलेले सोंग बाहेर आले. जेवायला मिळणार नाही म्हटल्यावर याने जी शिव्या द्यायला सुरवात केली की बीबीला mute करावे लागले. शिवला पण धडकी भरली की हा आपल्या ग्रुपला गोत्यात आणेल. तो त्याला समजावत होता की 'गाली गलोच नहीं करेंगे हम'.
साजिद "अब तू मेरा क्रोध देखेगा"biggrin.gif
" मर्द का बच्चा है तो आके गाली दे"

अब्दूला आता बहुतेक कोणी कधीच नॉमिनेट करणार नाहीत. सलमानने पार सुनावले सगळ्यांना की त्याला नॉमिनेट कसे काय करता तुम्ही. तो किती चांगला आहे. बहुदा फिनालेपर्यंत जाणार हा लव्ह यु ब्रो, थँक यु ब्रो करत.

हे रुप मराठीत नव्हतं दिसलं, बहुदा २ वर्ष आत्मपरीक्षण केलं किंवा मराठी पेक्षा हिन्दी बोलताना जास्त कम्फर्टेबल असेल ! >>> असू शकेल.

अजून एक महणजे शिवला मराठीत नेहा फार घा पा बोलायची ळ म्हणता येत नाही म्हणून, त्यामुळे तो तेवढा फ्रीली बोलत नसावा.

मारकी म्हैस म्हणा... मला अजूनही कळत नाही तिला कोण वोट करत असेल कि फिनाले ला गेली...

विकेंडच्या वार मधे सलमान परत आला - इज अ बिग रिलिफ. तो करण जोहर तर पेंद्यासारखा वावरत होता. अजुन जास्त विकेंड राहिला असता तर बिगबॉसचा "कखुकग" करुन टाकला असता...

सिरियस्ली, मांजरेकर निड्स टु गेट फ्यु पॉइंटर्स फ्रॉम सलमान...

कालचा एपिसोड म्हणजे फेकनेस, बॅड अ‍ॅक्ङिंग, बॅड स्क्रिप्ट सगळ्याचं उदाहरण !
आय मिन सिरीयस्स्ली? पब्लिकला हे खरे वाटेल असं बिबॉला वाटतय का ?
साजिद “अब तू मेरा क्रोध देखेगा“ , अर्चना : कौन होता है ये हमारा राशन दावपे लगानेवाला Rofl
अब्दुनेही लगेहाथ बॅड अ‍ॅक्टिंग करण्यात हात धून घेतले ‘नो निड लाइक धिस कॅप्टन ‘ Rofl
बिबॉने क्लिअरली स्क्रिप्ट पुरवली गौतमच्या कॅपटनशिप ड्रामा साठी आणि बॅड अ‍ॅक्टर्सने पाट्या टाकल्या !
Btw , त्या कत्रिनाने काय केलय चेहर्‍याचं ,का? का ??

मला आवडले वीकेन्ड चे एपिसोड्स. सलमान पहिल्यांदा आवडला मला आणि इन कन्ट्रोल वाटला. फुल एन्टरटेनमेन्ट, मज्जा आली. खाना छीन लिया वरून घरच्या लोकांच्या रीअ‍ॅक्शन्स फार फनी होत्या एकेक. काहीं येड्यांना खरंच वाटले की काय आता उपाशी रहावे लागणार असे? Happy साजिद तर ओवर अ‍ॅक्टिंग की दुकान. अर्चना रडायला लागली. शिव, प्रियांका, अशा काही जणांना लक्षात आले असावे हा ड्रामा आहे म्हणून ते त्यावरून फार बोलत नवह्ते, विचार करत असावे या सिचुएशन चा कसा वापर होऊ शकतो. अब्दू पण मोडक्या तोडक्या भाषेत स्टुपिड वगैरे ओरडत होता.
कतरीना ला बघणे निव्वळ पेनफुल होते . काय ते बोटॉक्स नि तत्सम केलेय त्याने तिल धड हसताही येत नवह्ते!
शिव हल्ली दिसत नाहीये फारसा . त्या अब्दुला डॉक्यावर चढ्वले आहे त्यावरून त्यानेच कार्यक्रम स्पॉन्सर केलाय की काय असे वाटावे.
त्या अंकित ला हाकलावे आता. पण कदाचित गोरी जाईल आधी.

विकेंड चांगला झाला असेल तर बघेन voot वर.

कतरिना आणि सलमान नॉर्मल वागले का एकमेकांशी, अर्थात प्रोफेशनल आहेत म्हणा. पूर्वी ते रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा kbc त एकत्र आलेले, ते आठवलं उगाचच.

निम्रत ला चार वेळा जेवताना बघणे हॉरिबल होते... हि सौन्दर्य ने दिलेले जेवण करून भूक हडताल म्हणे?
हॅट्स ऑफ टू सौन्दर्या.. एकटीच सगळे काम करत होती.. शेवटी प्रियांका गेली मदतीला पण बाकी कोणी नाही...

काल चक्क सौंदर्या पॉझिटिव वाटली !
मला आता शालिन व्हिलन वाटायच्या ऐवजी जोकर वाटायला लागलाय, बिबॉ सकट सगळे त्याच्या फिरक्या घेतात..
दीपिकाच्या २ चुटकी सिन्दूर नंतर शालिनचे १५० ग्रॅम चिकनच Biggrin
घरात महाभारत चलु असताना शालिनला चिन्ता फक्त चिकनची !

यावेळी सौंदर्या, अर्चना व सुमबुल नॉमिनेटेड आहेत. त्यापैकी बहुतेक सुमबुल ला काढतील असे वाटते. तिला वोट्स नक्की जास्त असतील पण ती शांत असते त्यामुळे बीबी ला ती नको असेल. शिवाय ती हायेस्ट पेड आहे बहुतेक. सौंदर्याही जाऊ शकते कदाचित
सुमबुलची मला थोडी दया येते. वयाने फक्त १९ वर्षाची आहे. लहानपणापासून काम करत आहे. आई नाही. वडिलांवर इमोशनली डिपेंड असावी. आतापर्यंत प्रोटेक्टड होती. लहान वयात खूप प्रसिद्धी मिळाली.पण अशा शो मध्ये पार हरवून गेली. हे टीव्ही सिरीज नाही हे तिला आता कळाले. नाहीतर सिरीजचे dialogues च आधी बोलायची.

बाकीचेही फक्त तिला तू दिसत नाही असे बोल बोल बोलतात. सलमान पण मागच्या वेळी तिला खूपच तोडून बोलला. बिचारीचा कॉन्फिडन्स कमी झाला असेल.
वडिलांचे पण काय रिझनिंग की जगाचा अनुभव यावा म्हणून बिग बॉस मध्ये पाठवले. वाह ! त्यासाठी हाच शो मिळाला का ?
साजिद बरोबर म्हणाला की जरा बरोबरच्या वयातील लोकांशी भेटण्याची, बोलण्याची गरज आहे तिला. हळूहळू उरलासुरला कॉन्फिडन्स जायच्या आत तिने घरी जावे.

बिग बॉस ची फेव्हरिट निमरीत (आणि अर्थातच साजिद) आहे हे काल सिद्ध झाले. तिने शिवाशी मैत्री करावी अशी सारखी हिंट देणे, तिच्या चुकांवर काहीच न बोलणे, तिने खाल्लेले असताना पण तिला बोलवून दोनदा पिझ्झा खायला घालणे ही सगळी तिला टॉप २ मध्ये आणण्याची धडपड आहे.पण काय करणार. आपलाच सिक्का खोटा आहे. निमरीत खूपच वीक आहे.

शिवशी निमरीतची मैत्री करून २ ग्रुप्स करायचे आहेत बीबी ला. त्यासाठी सगळी धडपड

बिग बॉसच हे मला अजिबातच पटत नाही. या वेळेस voting line बंद ठेवण्याची काय गरज होती. गेल्या आठवड्यातच कोणी गेलं नाही ना. 3 जणी नॉमिनेशन मध्ये, एक colors चा चेहरा, दुसरी भांडखोर आणि तिसरी लव अँगल वाली. त्यामुळे यांना वाचवायला voting line बंद ठेवली.

Mc stan किती कच्च्या कानाचा आहे. सुरुवातीला बरा वाटलेला पण आता आवडत नाही. लॉयर म्हणून एकही मुद्दा व्यवस्थित मांडू शकला नाही. तरीही त्या येड्या अंकितने त्याच्या बाजूने निर्णय दिला.

मराठी सारखा टॉर्चर टास्क हिंदी मध्ये का आणत नाही? सगळ्या मेकअप वाल्या आहेत म्हणून? कसले रटाळ टास्क देतायत, सगळे जण नुसतेच लोळताना / चकाट्या पिटताना दिसतात. आणि बायका नटूनथटून लोळत असतात.

बहुतेक सौन्दर्याला सिक्रेट रूम मध्ये टाकतील. कारण ती गेली की गौतम निम्रत एकत्र येतील अशी बीबीला आशा असेल.

सौंदर्याच्या मागे बीबी हात धुवून मागे लागले आहेत. पण सध्या २/३ दिवसांपासून ती खूपच सेन्सिबल वाटते आहे. निम्रत लाडकी म्हणून तिला काहीच बोलायचे नाही बरं का..

आता त्या राशन वरून रोजच्या कटकटीचा कंटाळा आला. कोर्ट टास्क पण काहीतरी फनी करता आले असते. पण बीबी तोच तोच 'गौतम सौंदर्या फेक लव्ह अँगल' मुद्दा केव्हापासून धरून बसला आहे.

मी तेच विचारायला आले. इतक्यातच बघायला सुरुवात केली. पण टास्क काही दिसले नाहीत. नुसता टाईमपास दिसतोय. बहुतेक सगळे बॉडी बिल्डर दिसतायेत, बिबॉ ला टास्क द्यायची धडकी भरली असेल. आणि या सीजन मध्ये बिबॉ किती मध्ये मध्ये बोलून लोकांना ट्रोल करतोय.

आणि अर्चना प्रियांका काय कचाकचा भांडत असतात . त्यात त्या अर्चनाचा चिरका आवाज, कोण काय बोलतोय काही कळत नाही. Bb13 नंतर पाहीलाच नाही कोणता सीजन. Bb14 बघायचा प्रयत्न केला, त्यात ती रुबिना सतत किरकिर करायची. इथे ही प्रियांका.. बघु किती दिवस जमतय बघायला.

बीबी तोच तोच 'गौतम सौंदर्या फेक लव्ह अँगल' मुद्दा केव्हापासून धरून बसला आहे. >> शालीन टिना ची लव्हस्टोरी पण फेक आहे. तरी त्यांना काहीच बोलत नाहीत. त्याचं शालीन भनोट हे नाव बदलून चिकन भनोट असं नाव ठेवायला पाहिजे.

Bb 16 टीआरपी क्रॉसड bb 13( सिद्धार्त शेहनाज पारस) ... सुपरहिट झालाय हा सिझन...

Bb 16 टीआरपी क्रॉसड bb 13( सिद्धार्त शेहनाज पारस) ... सुपरहिट झालाय हा सिझन... >>> Really? BB 13 फुल्ल एंटरटेनमेंट होता. ड्रामा, action, प्रेम, राडा, heart break, दुष्मनी, कॉमेडी, सगळे emotions होते त्या सिझनमध्ये.

14-15 बोर होते. BB 16 चांगला वाटतोय. पुढे अजून मज्जा येईल असे वाटतयं आता तरी. BB फेवर हे तर सगळ्याच सिझनमध्ये असतेच.

सुम्बुल चा काय लव्ह अँगल मला वाट्त नाही.... तिने हे १०० वे ळा सागितल आहे.... त री पण तिचा लव्ह अँगल Bb बनवत आहेत .... कारण ती स्टार प्लस chaa फेमस चेहरा आहे.... आ णी ती त्याना जस हव तस content देत नाही सो तिला ट्रोल करत आहे ... she is highest paid actor in bb

शालीनचे चिकन चिकन ऐकून वैताग आला आहे. कालच्या भागात बिग बॉसने चिकनवरुन सुनावले तरी हा निर्लज्जपणे अजून 150 ग्रॅम चिकन पाठवा सांगतो. डोक्यावर पडलाय का तो.

Pages