बिगबॉस हिन्दी : सिझन १६ .

Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01

मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मला पण शिव आवडला , तसा तो आधीपासूनच मस्त खेळतोय पण कॅप्टन झाल्यावर अजून च चमकला...
साजिद धीरे धीरे पत्ते खोलेगा!
सुमबुल फार मूर्ख आणि बावळट आहे, तिने आता घरी गेला पाहिजे....
मान्या अजिबात मेकप नाही करत. तिचा तो अति पेक्षा अती सामान्य चेहरा बघवत नाहीय....
अर्चना रॉक्स , प्रियांका पण मस्त....
टीना ला अक्कल नाही हे पुन्हा पुन्हा सिद्ध करतेय...
निमरीत म्हणजे वर्गातील ते मूल आहे, जे कायम पहिल्या नंबरात असतं, टीचर च लाडकं, आणि जरा मनाविरुद्ध झालं की वेडं होतं.
सौंदया आणि गौतम अर्धवट शिरोमणी आहेत...
शालीन ने स्वतः च अग्री केलं की त्याला प्रॉब्लेम आहे... त्यामुळे नो कमेंट....
गोरी नागोरी पण मध्येच सरकते....

मला पण काल अब्दु ने सौन्दर्याला बोललेले बघून आश्चर्य वाटले फार! त्याला मीनिंगफुल बोलताना पहिल्यांदाच पाहिले.
आता अजून एक त्याच्यासारखाच मुलगा जो त्याचा रायव्हल आहे त्याला वाइल्ड कार्ड म्हणून आणणार आहेत असे ऐकले सोमि वर. खरंच की काय Uhoh
मला तर वाटते अब्दु ला आता टाटा करावे. आणि नंतर त्या रडक्या सुंबुल ला. म्हणजे अ‍ॅडल्ट बिबॉ सुरु होईल Happy

गौतम-शालीन च्या भांडणांमध्ये
अर्चना बिग बॉसला "बिगबॉस मी झोपले नाहीये. कुकडुकु वाजू नका नाहीतर हे लोक डिस्ट्रक्ट होतील. भांडू दे त्यांना."
omg... हहपुवा

काय मस्त बोलते ही.

काल मी थोडा वेळ बघितलं, काही कळेना. ती चष्म्या, स्टुडियस वाटणारी कोण आहे.

अर्चना, अंकितचं अफेअर आहे का.

शिववर फोकस नव्हते करत लवकर म्हणून मी बंद केला tv.

शिव नक्की जिंकेल असं वाटतंय.

काल शिव छा गया था. गोरी आणि अर्चनाला छान गप्प केलं त्याने. ट्रेनच्या टास्कमध्ये पण मस्त डोकं लावलं.
साजिद चे वनलायनर्स मला पण आवडतात, मजा येते.
सुंबुल जाम बोर होते घरी पाठवा तिला.

काल साजिद खानने सुंबुलला जे सुनावलं, बँग ऑन, कोणीतरी स्पष्ट बोललं फायनली तिला घरात.. दिल खुष कर दिया !

हो साजिद पर्फेक्ट बोलला Happy अ‍ॅडल्ट बनून रहयाचे तर सारखे रडत कुणा ना कुणाकडे जाणे बंद कर आणि इतरांनी तुला डीफेन्ड करावे अशीच अपेक्षा असल्यास ते बच्ची बच्ची म्हणतात तेही ऐकून घ्यावे लागेल. मूर्ख आहे ती सुंबुल. त्या घरात रहायला सुटेबल नाहीये.
तिला कोण आणि का सपोर्ट / वोट करतायत तेच कळत नाही. यावेळि कदाचित मान्या जाईल असे वाटते मला.

काल तो स्टॅन मनातून पार उतरला. अर्चनाशी भांडताना काय भाषा वापरत होता... शेमडी, बस्ती की ऑंटी वगैरे. अरे राजा तू स्वतःही मी बस्तीतून आलोय म्हणून तुणतुणे वाजवत असतो. मग हे बस्ती की ऑंटी म्हणून अपमान का करतोयस? त्यात तुझ्या बस्तीचाच अपमान नाही का? कोणाला याच्या भाषेची गंमत वाटत असेल तर त्याची कीव येते. अपमान करायचा तर अनेक गोष्टी बोलून करता येतो. त्याआधी टीनाला ढकलून लाईन मध्ये उभा राहिला आणि निमरीतशी पण वाटेल ते बोलत होता. अतिशय टपोरी वाटत होता. आणि मग कोपऱ्यात जाऊन रडायला काय लागला. सतत खडूस चेहरा घेऊनच वावरत असतो.
त्याचे फॅन्स पण तसेच, अतिशय गलिच्छ भाषेत ट्विटरवर लिहितात.(तुझ्या आईचा रेट काय वगैरे)

शिवनेपण त्याला गप्प केले नाही. खैर शिव कधीच ते करत नाही म्हणा.

शिव ने स्टॅन आणि साजिद ला सोडले नाही तर अवघड आहे...

स्टॅन ला रडवला अर्चना ने Happy तेरी मा हू मै .. मारते मारते मोर बना दूंगी...

काल शालीन गौतम टीना भांडण चालू असताना अर्चना बेड मधे - बिग बॉस मै सो नही रही हूं .. कुकुडुकु मत बजाना ये लोग डिस्ट्रक्ट हो जायेंगे.. झगडा रुकना नही चाहिये Happy
अर्चना फेव्हरेट होत चालली आहे...

स्टॅन ची भाषा म्हणजे ते कंटाला, शेंबडे वगैरे फनी वाटते मला . पण काही बेकार शिव्या दिल्या असल्यास सेन्सॉर होत असल्यामुळे ऐकू आल्या नाहीत.
बाकी सोमि नाही पाहिले त्यामुळे फॅन्स ची भाषा वगैरे काही कल्पना नाही.

काल शालीन गौतम टीना भांडण चालू असताना अर्चना बेड मधे - बिग बॉस मै सो नही रही हूं .. कुकुडुकु मत बजाना ये लोग डिस्ट्रक्ट हो जायेंगे.. झगडा रुकना नही चाहिये Happy
अर्चना फेव्हरेट होत चालली आहे...>>>+१११
अर्चना जिंकणार नाही पण शेवटपर्यंत राहील. बिग बॉसमधील एंटरटेनमेंट फॅक्टर तीच आहे. " ये लाडकी पागल हैं "

शीवच्या ग्रूप मध्ये गोरी, स्टॅन, साजिद, अब्दू आहेत यापैकी साजिद नक्कीच काही आठवड्याच्या बोलीवर आला आहे. अब्दुही. गोरीही जास्त नाही टिकणार. खूप चीप आहे.
स्टॅन फक्त फॅन्समुळे राहील बाकी त्याचे कन्टेन्ट शून्य आहे. गंमत म्हणजे हे दुसर्यांना ग्रूप बनवून खेळतात म्हणत होते.

आज शिवने खूप चुका केल्या. निगेटिव्ह झालाय सोमीवर पण नाव ठेवत आहे

ओके साॅरी एडीट केले

काळजी घेईन यापुढे

शिवने कुठे काय निगेटिव केले ? मला तर त्याचा अ‍ॅटिट्युड एकदम करेक्ट वाटला !
अर्चाना बरोबर जे काय वाजलं तीच लेव्हल आहे कि अर्चनाची !

काल अर्चना चे "लगता है बिबॉ मे नन्हा मेहमान आनेवाला है" ऐकून हहपुवा झाली Lol खरंच फनी सिचुएशन होते, ती गॉसिप सेशन्स , आणि मग सौंदर्याचे इमली शोधणे.

मला हा सिझन आवडतोय
मजा करतायत सगळे जण....
आज अर्चना ला कॅप्टन केली आणि सगळे एकत्र होऊन तिला त्रास द्यायला चालू झाले.. नुसती धमाल चालू होती.....

बिगबॉसचं मॅड हाउस झालय Proud
टास्क्स झालेच नाहीत काही , अर्चना फुटेज घेतेय सगळं, शालीन सुम्बुल गायब, बरं झालं !

या सिझनमध्ये बिग बॉसच खेळत आहेत त्यामुळे मला तरी मज्जा येतेय. असेही बिबॉ बोलत असले की ऐकत रहावेसे वाटतं.

यावेळचा वीकेन्ड चा वार केजो ने हॅक केला, कॉफी विथ करण टाइप Happy सलमान पेक्षा बेटरच वाटला मला. सलमान पेक्षा कुणीही बेटर च वाटते. इतका तो इंटरेस्ट नसल्यासारखा बोलतो.
शिव ची कॅप्टनशिप काढून अर्चना ला कॅप्टनशिप मिळाली तेव्हाच उघड होते ती सगळे त्रास देणार. बाकी गोरी नागोरीने जरा जास्त ड्रामा केला तरी अर्चना काही कमी नाहीये. पण बिबॉ ने कालचा अर्धा भाग केजो ला अर्चनाची वकिली करायला लावली असे वाटले Happy
मला सगळ्यात हसू कशाचे आले तर मधल्या ब्रेक मधे इतका दंगा- आरडाओरडा, तावातावाने डिस्कशन चालू असताना शालीन आणि अंकित शांतपणे आपला काही संबंधच नसल्यासारखे जेवत बसले होते Happy शालीन ला तसेही काही चान्स नाही कॅप्टनशिप मिळण्याचा त्यामुळे ते आणखीनच विनोदी आणि अंकित तर असे वाटत होते की तो त्या घरात नाहीच आहे Lol

Pages