बिगबॉस हिन्दी : सिझन १६ .

Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01

मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेखर सुमनचे स्वतःचे मत असेल तर तो बाहेर लिहितो. आत त्या दोघांना किती रोस्ट करतो. काय वाटेल ते बोलतात त्यांना. त्यांना कुठे माहित आहे कि तो बाहेर काय लिहितो ते.
निम्रत आणि शिवचा सगळा खेळ प्रियांकाच्या भोवतीच असतो. शिवचे डोळे तर सतत प्रियांका वर असतात.
बाकी सर्वाना तिने खूप मागे सोडले आहे.
बाकी स्टॅनच्या 'दो दो बॉयफ्रेंड्स पाहिजेत का ' असे प्रियंकाला बोलण्यात कोणाला काहीच गैर वाटले नाही का ?

जेंव्हा सगळे अर्चनावर ओरडत होते फुटेज घेत होते तेंव्हा प्रियांका तिला शांतपणे समजावत होती- तिथेच ती विनर झाली...

प्रियांका स्ट्रॉंग आहे. गोल्ड कॉइनच्या टास्कमध्ये तिने बिगबॉसच्या पुढेही माघार घेतली नाही. अशा व्यक्ती बिग बॉसला आवडतात. निम्रत अगदी फुसकी दिसते तिच्यापुढे. बिग बॉसने तिला सांभाळायचा आणि शीवच्या ग्रुपमध्ये ढकलायचा कितीही प्रयन्त केला तरी सिक्काच खोटा आहे तर काय करणार.
टीना नेगेटिव्ह आणि स्वार्थी वाटते पण खरे तर ती जरा तरी खेळते.
आणि शिव चा खेळ फक्त bully करणे व प्रियंकाला अंकितवरून इरिटेट करणे एवढाच राहिला आहे.

पण प्रियंका विनर होईल च असं वाटतंय कारण ती कलर चा फेस आहे
माझ्या मनातून ती उतरलीय खरं तर....
आणि उगाचच मध्ये मध्ये करत राहते... मला आता कोण च आवडत नाहीय ...
Mc स्टॅन ने जरा रॅपिंग वगैरे करायला हवं होतं, कॉमेडी किंवा समोरच्याला भडकवणारं.
मजा आली असती.. पण तो काहीच करत नाही.
काल प्रियांका ला बोलला ," ऐसें ऐसें क्या करती...चपाती बनाती है क्या"
आणि मग ते 2 बॉयफ्रेंड छहिये क्या वगैरे...
पण इतकं लोकांना धक्का बसण्या सारखं काय आहे त्यात? त्यापेक्षा अधिक घाणेरडं बाकी लोक बोलतात.... आणि तो मिसॉजिनिस्ट तर अजिबात नाही वाटत इतके दिवस झाले....
काल तो गौरव पण किन्नर वरून हातवारे करून बोलला...
जर सगळे सभ्य असते आणि स्टॅन असं बोलला असता तर गोष्ट वेगळी...
आता अर्चना ला घरात घेतलं यावरून मागच्या बिबॉ मध्ये ज्यांना काढलं त्या लोकांनी ट्विट केलेय.....
जस साजिद आणि अब्दु करतात,- लॉंग सन आणि शॉर्ट सन....ते जरा टाईम पास असतं पण कधी कधी ते ही बोर होतं

मलापण बोर झालं आता. सगळी भांडणं पळवते मी . ती प्रियांका फार किरकिर करते , दुसऱ्यांना बोलूनच देत नाही . नुसता कलकलाट , काहीच कळत नाही. आता एथिकली काय चूक काय बरोबर हे फक्त बीबॉ ठरवणार.
अर्थात प्रियांकाच जिंकणार , कारण कलर फेस आहे. त्या दोघांना सतत फीडबॅक पण मिळत असतो .

प्रियांका मला आवडत नाही पण आय अग्री की ती सर्वात स्मार्ट प्लेयर आहे. त्या सो कॉल्ड अर्चना कोर्ट मार्शल एपिसोड मधे तिला एकटीला समज्त होते नक्की काय सुरु आहे आणि यात बिबॉ चा काय प्लान असू शकतो. बाकीचे फुल्ल गंडलेले होते. शिव ला तर त्यांनी डिसकरेज केले होते काही वेळ. अब मै वो पोपट वगैरा टॉन्ट भी मारू के वो भी नही कर सकता असे काहीतरी म्हणत होता स्टॅन ला, पण नंतर त्याच्या लक्षात आले असावे.
सर्वात मोठा फायदा अर्थात अर्चना ला झाला आहे. तिने आता ओळखले असणार की तिला जे वाटले तेच बरोबर आहे, आणि बिबॉ मुझे निकाल नही सकते. दुसरे म्हणजे दीदी आणि तिच्या पार्टी साठी तिने इत्का शूरपणे (!) झगडा केल्याने त्याचा लोकल पोलिटिक्स मधे उपयोग नक्की होईल बाहेर गेल्यावर.

प्रियंका बिगबॉसला आवडते कि नाही प्रश्नच नाहीये, ठरलेली विनर आहे कलर्स फेस असल्यस्मुळे हे अगदी पक्के आहे, सगळ्यांनाच माहित असावे, टिनाच्याही तोंडातून निघून गेले परवा , म्हणूनच २५ लाख विनिंग अमाउन्ट मधून गेल्यावर साजिदशी भांडत होती.
दिपिका कक्कर, रुबिना, तेजस्वी प्रकाश आणि आता प्रियंका !
शिव / इतर कोणी कोणी जिंकले तरच आश्चर्य !
मला तर वाटते कलर्सचे प्लॅनिंग्/कॉन्ट्रॅक्ट पण झालं असेल .. विनर प्रियंका , शिवला पुढचा रिअ‍ॅलिटी शो ( खतरोंके खिलाडी), अर्चना इथून पुढची राखी सावन्तला रिप्लेसमेन्ट = मक्टिपल एन्ट्री व्हिजा टु ऑल सिझन्स !

शिव इतरांना बुली करण्याच्या पोजिशन मधे नाही आहे तिथे. तो मायनॉरिटी ग्रुप मधे आहे. त्यातले पण सगळे गेम च्या दृष्टीने लंगडे घोडे Happy तरी त्याने लीडरशिप ची भूमिका घेतली आहे त्या ग्रुप मधे. घरातल्या गोष्टीत स्टँड घेणे हे तर करावेच लागणार. नाही केले तर काहीच कॅमेरा टाइम न मिळता बाहेर जाईल तो. प्रियांका आणि इतर त्याचा आधी चा अनुभव लक्षात घेता तो आपल्याला डोईजड होऊ नये म्हणून त्याला बाहेर घालवण्यासाठी टारगेट करतात आणि करणारच. बरं बाकी फालतू नॉमिनेशन्स वगळता टास्क च नसतात काही, त्यामुळे त्यात पण कामगिरी करणे हे बाद. बिबॉच सगळ्यांना माइंड गेम्स / प्लॉटिंग / प्लानिंग एवढ्याच गेम साठी मजबूर करत आहेत असे म्हणता येईल.

मला आता वाटायला लागले आहे की बाकीचे जाऊद्या, बिग बॉस साजिदलाच विनर करणार वाटते. काय शाही थाट आहे त्याचा ! सर्व पॉवर्स मिळतात, खास त्याच्यासाठी फालतू टास्क्स ठेवतात, नॉमिनेशन्स मध्ये कुठल्या न कुठल्या मार्गाने सेफ करतात. बाकीचे कॉन्टेस्टन्ट घाबरून आहे.

त्याला व स्टॅन ला बाहेर खूर्चीत बसून सिगरेटी ओढायची फुल्ल परवानगी. बाटल्या फोडणे, दरवाजाला लाथ मारणे काही करा, बिग बॉस ढिम्मच.
हा बाहेर आला की धुतल्या तांदळासारखा स्वच्छही होणार .

बाकी सलमान ने एखाद्या लॉयर च्या वरताण आर्ग्युमेन्ट्स करत तो खटला चालवला परवा. इतका डीटेल अनालिसिस आणि अर्ग्युमेन्ट ? मला पुन्हा मनात येऊन गेले, की स्क्रिप्टेड/ प्रॉम्प्टेड फीड असेल का ?!

बिग बॉस प्रियांका ला सपोर्ट नाही करत.. तो निम्रत ला सपोर्ट करतो आणि बुली गॅंग ( साजिद अब्दू शिव mc निम्रत).. बायस्ड किती आहे बिग बॉस दिसून येतेयंकी...

नाही, साजिदला देतात कि बरेचदा समज , ऑडियन्सला आवडत नाही, पॉप्युलॅरीटी मधे तो सर्वात मागे आहे त्यामुळे जिंकु द्यायचा प्रश्नच नाही !
शिव टास्कस मधे नं. १आहे, पण बिबॉ टास्कच देत नाही मग पोकिंग्/प्रोवोक /माइंड गेम इज बॅकबोन ऑफ बिगबॉस, हे तर आलेच पाहिजे ना , मुद्दे मांडण्यातही स्ट्राँग आहे , त्यानी त्याची इमेजही क्लिन ठेवली आहे !
तो सर्वात स्ट्राँग आहे /त्याच्या डोक्याने त्याची टिम चालते बघितल्यावर प्रियंकाने तिचे आधीचे (निम्रित) बिनडोक टार्गेट बदलून शिव वर फोकस केले आणि करत रहाणार .
एका टिमची लिडर वि दुसर्‍या टिमचा लिडर हेच टॉप २ असणार , बाकी सगळे फिलर्स !

घरातल्या गोष्टीत स्टँड घेणे हे तर करावेच लागणार. >> हे खरंय , किचन, चिनी, टिश्यू पेपर असल्या गोष्टींवर भांडणं चालू आहेत . मला प्रियांका अर्चना लुटू पुटू भांडतात असं वाटतयं. म्हणजे खेळताना एकमेकींना धरतात विश्वास वगैरे, पण किचन भांडणं जोरदार, म्हणजे कॅमेरा पण दोघींवरच राहील.

रुबिना व राहुल वैद्य होते तेव्हा मी राहुल वैद्यला सपोर्ट करत होते. पण रुबिना सोमीच्या कुठल्याही पोल मध्ये किंवा 'बिग बॉसच्या वोटिंग मध्ये clearly जिंकायची. बाकीच्या विंनर्स सुद्धा भरपूर वोट्स घेतात. अगदी सिद्धार्थ शुक्लही
फक्त हीनाला कलर्सने जिंकू दिले नाही शिल्पा शिंदेपुढे..

इथेही माय ग्लॅम वोटिंग मध्ये प्रियांका आघाडीवरच असते, कितीही राग आला तरी ह्यांचा फॅन बेस जबरी आहे. तो वोट करतोच त्यांना. चॅनेलला फारसे काही करावे लागत नाही फॅन्स मध्ये भांडण लावण्यापलीकडे.

आणि या सिझन मध्ये तर प्रियांका आणि शिव सोडून बाकींच्यात विंनिंग कॅपॅबिलिटी नाहीये. त्यामुळे फारसा चॉईसच नाहीये

बाकी सलमान ने एखाद्या लॉयर च्या वरताण आर्ग्युमेन्ट्स करत तो खटला चालवला परवा. इतका डीटेल अनालिसिस आणि अर्ग्युमेन्ट ? मला पुन्हा मनात येऊन गेले, की स्क्रिप्टेड/ प्रॉम्प्टेड फीड असेल का ?!
<<<<<
खटला कसा चालवायचा ते कलर्स टिम सांगत असतीलच कि त्याला, शिवाय हेडफोन असतोच कायम पण जर ठरवलं तर आहे सलमन मधे उत्तम होस्टिंग स्किल्स/प्रेझेन्स ऑफ माइंड !
मुख्यं म्हणजे त्याचा दरारा आहे, कॉन्टेस्टन्ट्स घाबरतात , शब्दहीन होतात त्याच्यापुढे त्यामुळे त्याला हवे ते वदवून घेता येत असेल !
मांजरेकर उत्तम अभ्यास करतात एपिसोड्सचा , डिटेल अ‍ॅनॅलिसिस करतात पण कॉन्टेस्टन्ट्स उलटी उत्तरं द्यायला घाबरत नाहीत त्यांना !

साजिदला अगदी किरकोळ रागावतात जणू काही आई मुलाला लटकेच ओरडते तसे.
बुली गॅंग ( साजिद अब्दू शिव mc निम्रत).. बायस्ड किती आहे बिग बॉस दिसून येतेयंकी...>>>अगदी अगदी..भरपूर बायस चालू आहे. काही करून त्यांना वाचवायची धडपड. अब्दुला तर मागच्या वेळी केवढी पॉवर आणि आत साजिदला. बिग बॉसला काय माहित नसणार का की तो कोणाला वाचवणार.

यावेळी अंकित किंवा गौतमला काढायचा प्लॅन असावा. खरेतर स्टॅन किंवा सुमबुल या निष्क्रिय लोकांना काढले पाहिजे.

छे, अन्कितला नाही काढत, प्रियंकाला कायम आधार लागतो, तो टॉप ६ पर्यन्त जाणार !
गौतम कधीही जाऊ शकतो, तोही निष्क्रियच आहे , गेल्याने फरक नाही पडत , सौंदर्याला आता त्याची गरज नाही , शि इज डुइंग बेटर विदाउट हिम !
सुम्बुलला काढायचे २ चान्सेस येऊन गेले तरी काढले नाही म्हणजे मिनिमम गॅरेन्टी घेऊन आली असेल, नाहीच जाणार !
गौतम, स्टॅन, टिना, साजिद, सौंदर्या सगळे गेल्यावर मग जाईल ती Uhoh

सुमबुलला १२ लाख पर वीक (हायेस्ट पेड) मिळतात म्हणे. काहीच ना करता इतके दिवस ठेवणे परवडेल का बीबीला. पण तिला वोटींगने काढणे कठीण आहे. त्याआधी चिल्लर लोक जातील.

एवढा फार्स आणि खर्च तरी कशाला करायचा. सरळ announce करायचे की साजिदला कॅप्टन.
थोडे ट्विस्ट्स, टर्न्स असतील , थोडे प्लॉटींग प्लँनिंग असेल, प्रतिस्पर्ध्याला काहीं पॉवर असेल तरच असे टास्क, असे शो पाहण्यात मजा येते. मला तर काल फार बोर झाले. कारण पहिल्यापासून पुढे काय होणार हे ऑब्व्हियस होते. असेच राहिले तर टी आर पी घसरत जातील. torture टास्क किंवा इतर टास्क वगैरे तरी साजिदची एम जी संपल्यावर ठेवतील का?

स्टॅन ला आता चक्क 'लडकी लोग' चे काम करावे लागणार म्हणजे स्वैपाकघरात चिरणे, कापणे वगैरे, बाप रे ! काय काय करावे लागते शोमध्ये नाही ! बाकी त्या माठ माणसाला शिव नसेल तर एक डिसिजन तरी डोक्याने घेता येईल का याची शंका आहे. शिव सतत त्याला प्रॉम्प्ट करत होता की कूकिंग रूममध्ये जा. पण या निर्बुध्दला किती वेळ समजतच नव्हते काय करायचे.

कॅप्टन्सी टास्क Biggrin
असे का साजिदला बॉस बनवले म्हणे ? आय थिंक साजिद पाहुणाच आहे, कॉटेस्टन्ट नाही !
सौंदर्या म्हंटली परत एकदा कि बिबॉ आता पुन्हा विचारु नका, मी बायस्ड गेम का म्हणते Happy
यावेळी टिना, गौतम, अन्कित आणि प्रियंका झालेत म्हणे नॉमिनेट.. म्हणजे टिना/गौतम पैकी कोणाचा तरी नंबर लागणार किंवा एलिमिनेशन कॅन्सल अ‍ॅज ऑलवेज !

यावेळी टिना, गौतम, अन्कित आणि प्रियंका झालेत म्हणे नॉमिनेट.. म्हणजे टिना/गौतम पैकी कोणाचा तरी नंबर लागणार किंवा एलिमिनेशन कॅन्सल अ‍ॅज ऑलवेज ! >>>> टिना, शालीन, गौतम आणि सौंदर्या नॉमिनेट झाले.
अंकितला voting असते का? मला वाटले टिना,शालीनने गौतम सौंदर्याला नॉमिनेट करून मूर्खपणा केला. प्रियांका अंकितला करायला पाहिजे होते. त्यामुळे अंकितचे जाण्याचे चान्सेस जास्त होते. प्रियांकाला हे माहीत होते म्हणून तिने पार्टी बदलली.

अंकित ला खूप सपोर्ट आहे.. अंकित ला नॉमिनेशन मध्ये टाकणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणे .. आणि हे शालीन ओळखून आहे...

शालिन एखादा एपिसोड डॉमिनेट करु शकेल हे ऑडियन्सला काय बिगबॉसलाही वाटलं नसेल Proud
पण आज बिगबॉसनेही मानलं आणि त्याला कबाब देऊन बक्षिस दिल !
बाकी तो वाटतं तितका डंब नाही हे विकेन्डच्या वार मधेही दिसतं अधेमधे, शिवाय दोन पोरींना मागे लावलय, कन्टेन्टही देतोय !

Pages