Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाहीतरी "खरी IPL" म्हणजे तरी
नाहीतरी "खरी IPL" म्हणजे तरी काय आहे ?
मॅच जिंकायला हवी होती अशी
मॅच जिंकायला हवी होती अशी चुटपूट लागून राहिलीय…
>>>>
आधी ती कसोटी आणि आता ही ट्वेंटी-२० ..
पंत आणि सुर्या या दोघांच्या अफलातून खेळी फुकट गेल्या .. वाईट तर वाटतेय
वेल प्लेड श्री लंका !!!
वेल प्लेड श्री लंका !!! दुसऱ्या कसोटी सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला इंनिंग आणि 39 धावांनी मात दिली आहे.
फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याने पदार्पणाच्या सामन्यात 12 बळी घेतले आणि चंडिमल ने जोरदार द्विशतक मारले.
लंकेचा विजय खरच धक्कादायक
लंकेचा विजय खरच धक्कादायक होता. एका इनिग मधे ऑस्ट्रेलिया स्पिन मास्टर वरून 'काही झेपत नाही राव' मोड मधे गेले. त्यात नेथन लॉयन नि स्टार्क ने टाकलेल्या ओव्हर्स बघून माझा खांदा दुखायला लागलाय.
स्काय चे शॉटस खास परत एकदा बघितले, काहीच्या काही शॉट्स होते काही. त्याचे एव्हढे भन्नाट शॉत्स आयपील मधे पण पाहिलेले आठवत नाहीत.
त्याचे एव्हढे भन्नाट शॉत्स
त्याचे एव्हढे भन्नाट शॉत्स आयपील मधे पण पाहिलेले आठवत नाहीत.
+७८६
ईथला ट्रू बाऊन्स आणि कंडीशन्स त्याच्या शैलीला सूट होत असावे. पारणे फेडले डोळ्यांचे.
काल कोहली होता ते ठिक पण अय्यर ऐवजी हूडाला चान्स दिला असता तर बरे झाले असते. निकालही बदलू शकता असता.
कोहलीचा सो कॉल्ड बॅडपॅच संपायचे नाव घेत नाहीये. रोहीत त्याच्या पुर्ण भरात नाहीये, पंत या फॉर्मेटमध्ये अजून धडपडतोय.. पण तरीही जर तुम्ही यांना वर्ल्डकपला घेऊन जाणार असाल, तर आणखी एक शॉर्ट बॉलवर स्ट्रगल करणारा खेळाडू ऑस्ट्रेलियाला नेण्यापेक्षा हूडाला पुरेशी संधी द्यावी टीमसोबत खेळायची.
लंका जिंकली सुद्धा..
लंका जिंकली सुद्धा..
ईथे वाचून चेक केले..
जिंकेल अशी फिलींग्स काल आलेलीच.. पण अशी?? बेक्कार.. पण आता मजा येईल कसोटी वर्ल्ड चॅम्पियनशिपला.. आपणही नाचवू आणि खेचू ऑस्ट्रेलियाला मागे
हो. ऑस्ट्रेलिया समोर भारत
हो. ऑस्ट्रेलिया समोर भारत दौऱ्याच्या दृष्टीने बरेच प्रश्न आहेत.
ख्वाजा आणि स्मिथ चा अपवाद सोडल्यास त्यांचे इतर फलंदाज स्पिन समोर एकदमच चाचपडत होते.
मारनस ने जरी पहिल्या इंनिंग मध्ये शतक मारले असले तरी तो असंख्य वेळा आऊट व्हायचा राहिला. किपर डिकवेला जणू त्याला आऊट करायचंच नाही असा चंग बांधून आला होता.
लायन जर चालला नाही (उदा. कालची दुसरी इंनिंग / पाकिस्तान मधली मालिका) आणि स्टार्क/कमिन्स ला रिव्हर्स स्विंग गवसला नाही तर त्यांची बॉलिंग ह्या पिचेस वर अजिबात थ्रेटनिंग वाटत नाही.
लेगस्पिनर स्वेपसन अजून तरी एकदमच रॉ आहे. दर ओव्हर ला एखादा लूज बॉल हमखास टाकतो.
इंग्लंडचे प्लेअर्स चौथी टी२०
इंग्लंडचे प्लेअर्स चौथी टी२० समजून मैदानात उतरले की काय?
धुरळा
धुरळा
पीच मध्ये चांगला बाउन्स आहे
पीच मध्ये चांगला बाउन्स आहे आणि स्विंग होईल अशा कंडिशन हि आहेत.
आपल्या बॉलर्स नि याचा पुरेपूर फायदा उठवला आहे.
एकदम डॉमिनेटिंग परफॉर्मन्स.
एकदम डॉमिनेटिंग परफॉर्मन्स. भारत 10 विकेट ने विजयी.
इंग्लंड च्या बॅटसमन ना स्विंग
इंग्लंड च्या बॅटसमन ना स्विंग झेपत नाही ह्याहून मजेशीर गोष्ट काय असू शकते. बाझबॉल वगैरे ठीक आहे पण सहा विकेट्स गेलेल्या असताना नि जवळ्जवळ तीसेक षटके बाकी असताना बटलर दोन बॉल मधे सहा रन्स हव्या असल्यासारख्या का खेळला ? पुढच्या मॅच मधे फिरोज शाह कोटला विकेट असेल बहुधा
बटलर दोन बॉल मधे सहा रन्स
बटलर दोन बॉल मधे सहा रन्स हव्या असल्यासारख्या का खेळला ?
>>
बाझबॉल रेप्युटेशन जपायला असेल
बाकी बॉल स्विंग होत असेल तर एखादा लिविंगस्टनसारखा प्लेअर जो स्विंग थांबल्यावर ६० बॉल १०० ही मारू शकतो तो आपण विकेट टाकून त्या स्विंग समोर एक्स्पोज करतोय यातली चूक त्यांना समजायला हवी होती.
शर्ना मात्र बिलकुल चुकला नाही. प्रमुख बॉलर वापरले आणि संपवला ईंग्लंडला.
मॅक्कलम कोच नसला तरी बाझबॉल
मॅक्कलम कोच नसला तरी बाझबॉल हि टर्म अप्लाय करू शकतो का.
जोक्स अपार्ट, बटलर नवा कॅप्टन असल्याने थोडा ओव्हरव्हेल्म वाटतोय.
तसाही आजकाल बॉल स्विंग व्हायला लागला कि सगळ्यांचेच वांधे होतात. (2-3 बॅट्समन चा अपवाद वगळल्यास).
बाझबॉल च्या बाबतीत बोलायचं
बाझबॉल च्या बाबतीत बोलायचं झालं तर काल अश्विन चा एक युट्युब विडिओ पहिला.
त्याच्या निरीक्षणाप्रमाणे आत्ता हा मोठे टार्गेट चेस करायचा एप्रोच चालतोय कारण या क्रिकेट मौसमात इंग्लिश पिचेस चौथ्या आणि पाचव्या दिवसा पर्यंत बॅटिंग साठी अनुकूल होत आहेत.
काउंटी क्रिकेट मध्येही तिसऱ्या आणि चौथ्या इंनिंग मध्ये कंपॅरिटिव्हली मोठे स्कोर लागत आहेत.
कितपत खरं आणि कितपत खोटं हे आपल्या मानण्यावर. नाहीतर कोल्ह्याला द्राक्षं आंबट म्हणून त्याचं बोलणं सोडून देऊ शकतो.
भारताची टोप्ली गुल
भारताची टोप्ली गुल
काल दहा विकेटने जिंकली, आज शंभर धावांनी हरले.
बॉलिंग दोन्ही मॅचेसमधे चांगली
बॉलिंग दोन्ही मॅचेसमधे चांगली झाली, पण आज बॅटींग ने दगा दिला. प्रसिध कृष्णाने सोडलेला कॅच चांगलाच महागात पडला.
प्रसिध कृष्णाने सोडलेला कॅच
प्रसिध कृष्णाने सोडलेला कॅच चांगलाच महागात पडला. >> हो . परत बॅटींग का घेतली नाही पहिली कोण जाणे जेंव्हा हे पिच नंतर स्पायसी होत जाते हे माहित असताना.
चुम्माने राडा केला राव पुन्हा
चुम्माने राडा केला राव पुन्हा एकदा निर्णायक सामन्यात ... बदाम बदाम बदाम
मन जिंकून जातो राव हा पोरगा
कोहली भारतीय संघसाठी **डू
कोहली भारतीय संघसाठी **डू हत्ती ठरत आहे बाटिंग करत नाही , बोलिंग येत नाही आणि फिल्डिंग मध्ये कॅच सोडतोय. त्याला लोकल क्रिकेट खेळायला लावा जर तिथे परफॉर्म केले तरच पुन्हा वरती घ्या. ह्याच्यामुले उगाच हुडा सारख्या खेळाडूंना फॉर्म असताना संधी मिळत नाही.
पंत आणि पंड्या - जबरदस्त
पंत आणि पंड्या - जबरदस्त खेचली दोघांनी मॅच. बॉलिंगमधे पंड्या (लिविंग्जटन, बटलर), सिराज (रूट) सुद्धा तुफान कामगिरी!!
सिराज (टेस्ट) आणि कृष्णा (टी-२०) च्या लेंथ्स बघून जाणवलं कि वन-डे च्या लेंथ्स वेगळ्या असतात आणि बुमराह, शामीसारखे ही अॅडजस्टमेंट इतक्या चटकन करणार्या बॉलर्समुळे त्यामागचं स्किल कधी कधी प्रेक्षकांच्या लक्षात येत नाही.
बुमराह, शामीसारखे ही अ
बुमराह, शामीसारखे ही अॅडजस्टमेंट इतक्या चटकन करणार्या बॉलर्समुळे त्यामागचं स्किल कधी कधी प्रेक्षकांच्या लक्षात येत नाही. >> हे दोघेही , विशेषतः शमि सुद्धा ह्या फेज मधून गेलाय ना रे. बुमरा त्या मानाने फार लवकर अॅडजस्ट करतो. पांड्याची कालची बॉलिंग खास होती. प्रसिद्द बरोबर त्याने मिडल ओव्हर्स मधे लगाम लावले.
पंत चे हार्ट जबरदस्त आहे. सहावा फोर मारणार नाही हे आधीच ठरवणे सोपे नाही. खर तर त्याचा दिवस होता, हवा असता तर मिस टाईम करूनही गेला असता फोर. क्ल्च प्लेयर आहे. बटलर ने एकदम बरोबर पकडले - त्याला खेळतो तसे खेळू देतात हे मह्त्वाचे आहे.
“हे दोघेही , विशेषतः शमि
“हे दोघेही , विशेषतः शमि सुद्धा ह्या फेज मधून गेलाय ना रे.” - अॅबसोल्युटली. अनुभव हाच खरा गुरू आहे ह्या बाबतीत. चहल सुद्धा टी-२० ते वनडे ट्रान्झिशनमधून गेला होता.
“पंत चे हार्ट जबरदस्त आहे.” - चांगला मॅच्युअर होतोय पंत.
https://www.rediff.com
https://www.rediff.com/cricket/report/you-want-to-play-cricket-which-is-...
जगात बरेच वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत पण ए सोडवल्याशिवाय पीआयल करू नये असे म्हणताहेत का हे ? क्रिकेट खेळ आपला नाही पण श्रीमान जज जे पद भूषवत आहेत ते मूळ भारतीय आहे का ? कब्बडी खेळणार्यांनी ही पीआयल टाकली असती तर चालले असते का ? मूळ पीआयल मधले मुद्दे काही फार वादग्रस्त नव्हते. त्यांनी सगळे मैदान एअर कंडीशन्ड करून द्या असा सूर का लावला आहे ? टॉयलेट सारखी बेसिक सोय नसणे ह्याबद्दल जज साहेब काय म्हणतात ? हद्द आहे.
BCCI ने आपल्या आधीच पॅक
BCCI ने आपल्या आधीच पॅक शेड्युल मध्ये T20 वर्ल्ड कप च्या अगोदर अजून 6 T20 आणि 3 वन डे ऍड केले आहेत.
आज आलेल्या बातमी प्रमाणे आता आपण आशिया चषकानंतर भारतामध्ये एक ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 मालिका (3 सामने) आणि दक्षिण आफ्रिकेविरुध्द T20 (3 सामने )+ वने डे (3 सामने) मालिका खेळणार आहोत.
होपफुली या ऍडिशनल वर्कलोड ने ऐन वेळी वर्ल्ड कप च्या आधी काही दुखापती होणार नाहीत.
*जगात बरेच वेगवेगळे
*जगात बरेच वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत पण ए सोडवल्याशिवाय पीआयल करू नये असे म्हणताहेत का हे ?*- कोर्टांत हजारो महत्वाची प्रकरण वेळेअभावी भिजत पडली असताना पिआयएल करताना विषयाचं तौलनिक महत्व लक्षात घ्यावं, हाच मुद्दा असावा- The court said these are luxuries and that in the list of priority, this issue would come in the 100th position. पूर्ण निकाल वाचल्यास कदचित हे स्पष्ट होईल. कोर्टातील ही परिस्थिती माहित असुनही एका वकिलानेच ही
पिआयएल केल्याने कोर्टाने त्याला असे सुनावले असावे, ही शक्यता अधिक आहे.
The court said these are
The court said these are luxuries and that in the list of priority, this issue would come in the 100th position >> हो कोर्टापुढे अजून जीवन मरणाचे प्रश्न असू शकतात ह्याची कल्पना आहे पण म्हणून पिआयएल टाकणार्याने त्याचा विचार करत बसावा ही अपेक्षा मला चुकीची वाटली. भारत खेळांमधे का तडफडतो ह्याचे उत्तर कोर्टाच्या खेळ ही लक्झरी समजणे ह्या मानसिकतेमधे आहे. जर कोर्टाला हा मुद्दा गौण वाटत असेल तर तो उचलायची पण गरज नव्हती, उचललाच तर बाकीच्या ताशेर्यांची काहीही गरज नव्हती. त्यात पूर्ण निकालपत्रांमधे एव्हढ्या इतरत्र गेलेल्या गोष्टी दिसतात की तेव्हढा अमूल्य वेळ वाया का घालवला असा प्रश्न पडला. निवाळ पाणी नि टॉयलॅट सारख्या बेसिक सुविधा मैदानावर उपलब्ध करून द्याव्यात एव्हढ्या वाक्यात प्रकरण मार्गी लावता आले असते.
*बेसिक सुविधा मैदानावर उपलब्ध
*
*बेसिक सुविधा मैदानावर उपलब्ध
*बेसिक सुविधा मैदानावर उपलब्ध करून द्याव्यात एव्हढ्या वाक्यात प्रकरण मार्गी लावता आले असते.* -
मुख्य मुद्दा ( जो पिआयएल संदर्भात अनेक वेळा पुर्वी कोर्टांने अधोरेखीत केला आहे ) तो हा कीं प्रश्न जे सोडवू शकतात त्यांच्याकडे पाठपुरावा करणं हें अगदींच निष्प्रभ ठरत असेल, तरच आयपीएल करणं योग्य ठरतं. कारण, शेवटीं कोर्ट स्वत: प्रश्नांचं निराकरण न करतां तें करायला संबंधितांनाच सांगणार असतं.
मुळात हा मुद्दा कोर्टात का
मुळात हा मुद्दा कोर्टात का गेला हा मला प्रश्न आहे.
क्रिकेटची मैदाने सरकार जनतेच्या पैशाने चालवते का? खाजगी संस्था अहेत ना त्या? मग खाजगी संस्थांच्या चालकांकडे तक्रार करा.
ते तुम्हाला फाट्यावर मारतील, म्हणतील यायचे नसेल तर येऊ नका.
भारतात क्रिकेटवेडे लोक क्रिकेटसाठी काहीहि सहन करू शकतील.
दोन पिढ्यांपूर्वी चार पैशासाठी स्वतःच्या भावाविरुद्ध फितुरी करणारे, परकीयांचे पाय चाटणारे लोक, आता पैशाऐवजी दारू, क्रिकेट, बॉलिवूडसाठी खुशाल लाथा खातील. त्यांना कोण विचारतो?
Pages