तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वडार समाजातील स्त्रिया चोळ्या घालत नसत. गेल्या तिस वर्षात ही प्रथा हळुहळु करत बंद झाली. सुरबातीलस तरुण वडारणी वरच्या भागावर दोन वस्त्रे चढवु लागल्या त्यामुळे टेक्निकली त्यानी चोळी घातलीय असे म्हणणे अशक्य झाले. नन्तर त्याचाही त्याग करुन आताच्या तरुण वडारणी इतर स्त्रियांसारखे ब्लाउज घालतात. हा बदल व्हायला काही वर्षे लागली. मी बिनाचोळीच्या वडारणी पाहिलेल्या आहेत, त्यांची पदर घ्यायची पद्धत अशी असे की शरिराचा दिसु नये असा भाग चुकुनही दिसत नसे. शिवाय कामानिमित्त हातात कायम हातोडा व छिन्नी. कोण मवाली हिंमत करेन छेडायची?

आपण पायाने वस्तू कधी उचलतो बरोबर ते या लोकांना म्हणे विचित्र वाटते.
पाणी आपण वरुतोधार सोडून, पीतो ते सुद्धा.

पाय लागल्यावर नमस्कार करतो हेही
माझ्या भावाने सांगितलेला किस्सा
जर्मनीत त्याचा पाय चुकून कलीग ला लागला तर याने पटकन सवयीने नमस्कार केला
त्या कलीग ला काही कळेना आणि मग याला ते पदस्पर्श मग नमस्कार असं सगळं संत्रे सोलून द्यावं लागलं
त्यावर तो म्हणे नेक्स्ट टाईम जस्ट से सॉरी Happy

त्यांची पदर घ्यायची पद्धत अशी असे की शरिराचा दिसु नये असा भाग चुकुनही दिसत नसे. >>>>> आमच्या बस्तर च्या गोंड/माडिया बायकांचं पण. कुठलातरी दगड वापरतात हेअर रिमुवर म्हणून.

मी बिनाचोळीच्या वडारणी पाहिलेल्या आहेत, त्यांची पदर घ्यायची पद्धत अशी असे की शरिराचा दिसु नये असा भाग चुकुनही दिसत नसे.
>>>>

हे माझी आजी करायची. आधी जेव्हा असे करायला सुरुवात केली तेव्हा मला थोडे विचित्र वाटलेले. कारण आम्ही चाळीत राहायचो. पण घरच्यांना काही टेंशन नव्हते. आज्जी त्यात कम्फर्टेबल होती तर मी बोलणारा कोण Happy

आज्जी तेव्हा किमान ८० वर्षांची असावी.

बघणारे कम्फर्टेबल नको का ... Happy
>>>
तो त्यांचा प्रश्न आहे.
लोकांना कल्चरल शॉक बसू नये म्हणून आपण का बदलावे Happy

खोचक प्रश्न कशाला. एवढी अक्कल आहे ना लोकांना. काही अनकॉम्फी होत नाही. नीट अदबशीर, डिग्निफाईड पर्सनॅलिटी, वर्तणूक असेल तर सगळं नीट असणार ना.

भारी चर्चा पण गावी गेले होते फोन वरून लिहिता येइना. फ्लेमिन्गो चर्चा वाचून खालील बातमी आठवली.

सुरतेतील सर्किटः

https://timesofindia.indiatimes.com/city/surat/Surats-swinging-couples-a...

मी तमिळनाडुला आल्यावर पहिला शॉक होता ईकडे हिंदी जास्त कोणाला येत नाही आणी शाळेतही शिकवत नाहीत.दुसरा बायका डोक्यावर पदर घेत नाहीत.देवळात तर अजिबात नाही आणी मी वर्षभर डोक्यावर पदर घ्यायचे फक्त बाहेर गेल्यावर हा त्यांच्यासाठी शॉक असणार.तिसरा नऊवारी लुगडे कोणीतीही आजी नेसत नाही.बाकी अजून सगळीकडे फुलांचा भरपूर वापर.फटास वाजवत निघणारी फुलांनी सजविलेली अंत्ययात्रा.अजूनही आहेत खूप.

डोक्यावर पदर घेण्याची किंवा चोळीची पद्धत भारतात नव्हती. पुरूष सुद्धा वरचे अंग झाकत नसत. सम्राट अशोकाच्या काळात ग्रीक लोकांच्या प्रभावाने स्त्री आणि पुरूष दोघांसाठीही वरच्या भागासाठी चौकोनी आकाराचे एक वस्त्र वापरात असे. पण सर्वत्रच नाही. वरच्या अंगासाठी वस्त्राची पद्धत ही मुस्लीम आक्रमक आल्यानंतर आली. मुघलांनी असे आदेश काढल्याचे पुरावे नाहीत. मात्र तत्कालीन चित्रांवरून सत्ताधारी शासकांच्या स्त्रियांप्रमाणे काही देशी स्त्रियांनी वस्त्रे परिधान केल्याचे दिसते. त्यांच्या दीर्घकाळ सत्तेमुळे आचार, आहार, कपडे यावर फरक पडला असणार.

कायच्या काय

मोघली सत्ता 50 % प्रदेशातच होती

संस्कृत काव्यात चोळी इ ची वर्णने आहेत

नवीन लग्न झाल्यावर भार्येसह पुण्यात आगमन झाले होते, कुळाचाराप्रमाणे हापिसातून आल्यावर वीकएंड सुरू झाल्याच्या आनंदात आमच्या मंडळींना घेऊन फर्गसन रस्त्यावर वैशालीला डोसा खाल्ला गेला आणि बाहेर पडलो तर टाईम्स ऑफ इंडिया बिल्डिंग जवळच्या टपरीवर काही आधुनिक कन्या धूम्रपान करताना पाहून बायको सुप्रीम कोर्ट अन मनसे हरकत घेईल इतक्या मोठ्या डेसिबल पिच मध्ये

"अहो ते बघा तिथं पोरगी सिगरेट ओढतेय की हो!!!"

असं चित्कारली होती, नशिबाने कश मारलेल्या पोरीला ठसका बसला नाही त्यावेळी, बायकोला साईडला घेऊन शांतपणे समजावले

"अगं आजकाल नॉर्मल आहे,तुला ओढायची आहे का सिगरेट एखादी ?"

तर नक्को बाई म्हणाल्या काकू

आजही कधीतरी रेडवाईन सिप करता करता बायकोसोबत शिराज बरी का सॉविनो ह्या चर्चेत हे स्मरणरंजन निघाले का आम्ही खळखळून हसतो त्यावर.

ब्लॅक कॅट, मुघलांचा काय संबंध ? पोस्ट नीट वाचा.
प्रभावासाठी १००% भागात सत्ता पाहीजे हे कुणी सांगितले ? महाराष्ट्रात पंजाब्यांचे राज्य नसतानाही सलवार कमीज हा पोशाख इथे सर्वमान्य झाला आहे.
संस्कृत काव्ये कुठल्या शतकातली आहेत ते ही सांगा. थोडे गुगल केलेत तर मी लिहीलेला मजकूर बीबीसी, एनसायक्लोपीडीया आणि अन्य काही फॅशन्सच्या वेबसाईटवर सापडेल.

माझे आणि माझ्या मुलींचे कपडे, चपला ते अगदी टिकली, पिन्सपासून घरात लागणाऱया सगळ्या लहान मोठ्या वस्तू ते अगदी सगळी ग्रॅासरी खरेदी नवराच दुकानातून किंवा ॲमेझॅानवरून ॲार्डर करतो हे बघून माझ्या मैत्रिणींना वरचेवर कल्चरल शॅाक्स बसत असतात आणि त्यांचे नवरे ह्यातलं फार काही करत नाहीत म्हणून मला कल्चरल शॅाक बसतात

खंडोबा(मनातल्या मनात) - (तुझ्या शॉपिंगच्या बिलाचा आकडा बघून दर वेळी मला शॉक लागतो म्हणून करतो मीच सगळं शॉपिंग)
Just kidding Happy

मुंबईत वाटे, जोडी असे मासे विकत घेणाऱ्या मला पुण्यात वजनावर मासे विकतात हा शॉक होता. पण आता ही वजनाचीच पद्धत योग्य वाटते.

"अहो ते बघा तिथं पोरगी सिगरेट ओढतेय की हो!!!" >>> हा शॉक मलाही बसलेला काही वर्षांपुर्वी, डोंबिवलीत एम आय डी सी त चहाच्या टपरीवर एका मुलीला सिगरेट ओढताना बघुन, कारण डोंबिवलीत कधी बघितलं नव्हतं. मुंबईत वगैरे बघितलं होतं. आक्षेप काहीच नाही. खरं तर शॉक बसायला नको होता पण बसला. अर्थात मी व्यक्त केलं नाही.

सिगारेट पिणाऱ्या मुलीला बघून शॉक बसण्यावर मागे मी एक कथा लिहिलेली. त्यावर बराच राडा झालेला असे आठवतेय//// लिंक न देता फक्त आठवण! हा मला बसलेला कल्चरल शॉक

अच्च्छा.. अच्छा.. ऋन्मेषशी हुशारी... घ्या भोगा मग आता.. दोन दोन लिंक Happy

एक सिगारेट पिणारी मुलगी
https://www.maayboli.com/node/42727

हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..!
https://www.maayboli.com/node/42839

Pages