तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विरंगुळा(पुणे सातारा रस्त्यावर सातारा जवळ कुठेतरी) ला थालीपीठ मागितल्यावर तव्यावर प्रॉपर बचकाभर तेलात तळून दिले होते हे बघून फार धक्का बसला होता.>>> 2018 सालाच्या जून च्या 26 तारखेला तुम्ही हेच सांगितलं होतं(पहिल्या पानावर). इतका शॉक बसतो तर परत परत जाता कशाला त्या विरंगुळा मध्ये? Happy

माझ्या कझनने, भारतात येताना महिन्याभराचा स्वयंपाक केला होता.20- 25 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.त्यावेळी जरा विचित्र वाटले होते.

> परदेशात आठवडाभराची पोळी भाजी करूप फ्रीजमधे ढकलतात आणि मग रोज थोडी थोडी वेळेला गरम करून खातात हे समजल्यावर धक्का बसला + अनुकंपा वाटली जनतेबद्दल

त्यात इतके शॉक किंवा अगदी अनुकंपा वगैरे काय? ही पद्धत हळू हळू भारतात ही येइलच. पोळी वाल्या महिलंचे पगार तुलनेने कमी आहेत म्हणून, नाहीतर आताच आली असती. पुण्या मुंबईत बाहेरच्या महिला पोळ्या करून जातात हे पाहून सांगली/सातारा लोकांना अनुकंपा वाटेल. लहान मुलांना पाळणा घरात ठेवून आई कामाला जाते हे पाहून अनुकंपा वाटेल.

आमच्याखडे पप्पू, इसमेसे सात नं निकाल म्हटलं की वरच्या माळ्यावरूप पुष्पवृष्टी व्हावी तशी हवी ती आणि हव्या त्या नं. ची चप्पल पडते खाली.>> अगदी अगदी ... Lol

२० -२५ वर्षांपुर्वी कुलाब्याच्या पॉश भागात राहणा-या माझ्या एका पॉश कलिगने सान्गितले होते की त्यान्च्या बिल्डिन्गीत फ्लाईन्ग कुक येतो. म्हणजे तो आठवड्यातुन एकदाच येतो, आठवड्याचा वेगवेगळा मेन्यु बनवुन देतो. आपण मेन्यु फ्रिजमध्ये ठेवायचा अणि रोज गरजे प्रमाणे काढुन गरम करुन खायचा. बिल्डिन्गित खुप जण त्याच्याकडुन जेवण बनवुन घ्यायचे.

आठवड्याचे जेवण असे करुन ठेवायची कल्पना मला जरा विचित्र वाटलेली पण मी तसे बोलुन वगैरे दाखवले नाही. खाणा-याला त्रास नाही तर मी का उगीच लोड घेऊ?

>>>>>>>>.लहान मुलांना पाळणा घरात ठेवून आई कामाला जाते हे पाहून अनुकंपा वाटेल.
आई त्या मुलांच्या भविष्याकरता तजविजच करत असते.

तुम्हाला उद्देश्युन नाही विकु.

“ अमेरीकेतल्या एका दुकानात चप्पल घ्यायला गेले होते. एक चप्पल आवडली. म्हटलं..ह्यातला सात नं द्या तर घरचीच जनता हसायला लागली. म्हणे इथं असेल तोच मिळतो.” - ह्यातला पुष्पवृष्टीचा विनोद चांगला आहे. पण कुठल्या दुकानात ‘असतील त्याच चपला मिळतात‘ ह्याची उत्सुकता आहे. हवा तो साईझ काढून देणारा पप्पू नसेल माळ्यावर पण वेगवेगळ्या मापाच्या चपला / शूज अ‍ॅव्हेलेबल नसणारं अमेरिकेतलं कुठलं शूज चं दुकान आहे?

आमच्याखडे पप्पू, इसमेसे सात नं निकाल म्हटलं की वरच्या माळ्यावरूप पुष्पवृष्टी व्हावी तशी हवी ती आणि हव्या त्या नं. ची चप्पल पडते खाली >>> Lol हे सुपरलोल आहे.

आपल्याकडे दुकानात काम करणारे बहुधा अनेक वर्षे तेथे काम करत असल्याने माहीतगार असतात. इथे त्या रोल मधे काम करणारे इतकी वर्षे एकाच ठिकाणी सहसा नसतात. त्यामुळे हवा तो साइज विचारल्यावर "शेल्फ वर नसेल तर नाही" असे उत्तर, ते इथला पप्पू आत वेअरहाउस मधे शोधायला जातो आणि तो तेथूनच पळून गेला की काय अशी शंका येइपर्यंत २-३ बॉक्सेस घेउन हजर होतो - या रेंजमधे अनुभव आले आहेत Happy

आमच्याखडे पप्पू, इसमेसे सात नं निकाल म्हटलं की वरच्या माळ्यावरूप पुष्पवृष्टी व्हावी तशी हवी ती आणि हव्या त्या नं. ची चप्पल पडते खाली.>>
Rofl Rofl

Lol
अमेरिकेत वेगवेगळ्या साईझचे जोडे असतात आणि सांगितलं तर वेअर हाऊस मधुन शोधून आणुन देतात. तिकडे नसतील तर ऑर्डर करुन स्टोअर पिकप/ फ्री शिपिंग करुन घरी ही येतात.
पण भारतात जो माल विकायचा अ‍ॅटिट्युड असतो तो नसतो. ठाण्याला गोखले रोडला एका दुकानात हवी ती साईझ नसेल तर पप्पूला शेजारपाजारी पाठवतात तिकडे नाही तर अगदी स्टेशन पर्यंत रमणिकभाईके पास देखले, विरलके स्टोरेज मे छे करुन पिटाळतात. आणि तोवर आपल्याला दुकानात बसवुन ऑर बाबा के लिए (म्हणजे आपण ज्यांना बाबा म्हणतो त्यांना नाही, तर आपल्याल जे बाबा म्हणतात त्यांना हे लोक बाबा म्हणतात) क्या दिखाऊ? करुन काही ना काही गळ्यात मारतात.

>>>>>>>>ऑर बाबा के लिए (म्हणजे आपण ज्यांना बाबा म्हणतो त्यांना नाही, तर आपल्याल जे बाबा म्हणतात त्यांना हे लोक बाबा म्हणतात) क्या दिखाऊ? करुन काही ना काही गळ्यात मारतात.
हाहाहा सिक्सर!!!

आमच्याखडे पप्पू, इसमेसे सात नं निकाल म्हटलं की वरच्या माळ्यावरूप पुष्पवृष्टी व्हावी तशी हवी ती आणि हव्या त्या नं. ची चप्पल पडते खाली.>>
हे epic आहे. Lol Lol

इथे एक ओळखीचे पालक, non indian, आठवड्यासाठी (hold it) एकच non veg पदार्थ करून ठेवायचे. आठवडाभर तोच गरम करून खायचा.
हा माझ्यासाठी धक्का होता. तर आम्ही रोज स्वयंपाक करतो तोही वेगवेगळा हा तिच्यासाठी धक्का होता.
जोपर्यंत आम्हांला एकमेकांसारखे करावे लागत नाही तोपर्यंत कि फर्क पैंदा?

घरी त्या त्या वेळी करणे, तयार आणणे आणि आधी तयारी करून काही करून ठेवणे यांतील योग्य तो option वेळ काळ बघून निवडावा लागतो.
प्रत्येकासाठी तो सारखा नसतो.

आमच्याखडे पप्पू, इसमेसे सात नं निकाल म्हटलं की वरच्या माळ्यावरूप पुष्पवृष्टी व्हावी तशी हवी ती आणि हव्या त्या नं. ची चप्पल पडते खाली >>
हे आणी
ऑर बाबा के लिए (म्हणजे आपण ज्यांना बाबा म्हणतो त्यांना नाही, तर आपल्याल जे बाबा म्हणतात त्यांना हे लोक बाबा म्हणतात) क्या दिखाऊ? >>>
याला Rofl

पण कुठल्या दुकानात ‘असतील त्याच चपला मिळतात‘ ह्याची उत्सुकता आहे. >>> +१
किंवा ग्रहयोग चांगले नसल्यामुळे 'सेल मधल्या चपला असतात, पण आपले पाय त्या नंबरचे नसतात' असं झालं असेल.

आमच्याखडे पप्पू, इसमेसे सात नं निकाल म्हटलं की वरच्या माळ्यावरूप पुष्पवृष्टी व्हावी तशी हवी ती आणि हव्या त्या नं. ची चप्पल पडते खाली.>> खत्री आईस्क्रीम आहे हे.

हे आणी
ऑर बाबा के लिए (म्हणजे आपण ज्यांना बाबा म्हणतो त्यांना नाही, तर आपल्याल जे बाबा म्हणतात त्यांना हे लोक बाबा म्हणतात) क्या दिखाऊ? >>> हे भयानक आहे Biggrin

तोवर आपल्याला दुकानात बसवुन ऑर बाबा के लिए (म्हणजे आपण ज्यांना बाबा म्हणतो त्यांना नाही, तर आपल्याल जे बाबा म्हणतात त्यांना हे लोक बाबा म्हणतात) क्या दिखाऊ? करुन काही ना काही गळ्यात मारतात. >>>> Lol

ऑर बाबा के लिए (म्हणजे आपण ज्यांना बाबा म्हणतो त्यांना नाही, तर आपल्याल जे बाबा म्हणतात त्यांना हे लोक बाबा म्हणतात) क्या दिखाऊ? >>>
एकदम परफेक्ट वर्णन Happy

इथे swinging करतात हे अपघातानेच कळाले.
एका non मराठी कुटुंबाने नवीन घर घेतले. हौसेने सजवताना बागेत ३ flamingo ठेवले.
शेजारीण हबकून म्हणाली की, वाटलं नव्हतं तुम्ही त्यातले असाल. हिला काही कळत नाही दिसल्यावर समजावलं की हि swinging करणाऱ्यांची sign आहे. Lol Lol
हा किस्सा सांगतांना मैत्रीण अजून शॉकमधून बाहेर आली नव्हती.
मैत्रीण आणि शेजारीण दोघींसाठी एकाच वेळी शॉक.

Lol..lol झालाय हा धागा..

१९९७ साली sndt जुहू मधल्या काही मुलींचे कपडे बघून मानसिक धक्का बसलेला. नंतर सवय झाली.
फेशन शो chyaa वेळेस 10 मुलींचे कपडे (२ सेत) ए का छोट्या बॅग मध्ये बसलेले बघून धक्का बसलेला.
एका वेगळ्या कॉलेजच्या मुलामुलींनी खजुराहो थीम घेऊन फॅशन शो केल्याचा धक्का बसलेला

सांगली, सातारा, कोल्हापूर, विदर्भ वगैरे भागातून आलेल्या अनेकांना असे धक्केच धक्के engineering च्या सुरुवातीला बसलेले.
गेहेराईया मधल्या कपड्यांवरची टीका वाचून "भरपूर तर आहेत" असे वाटले. Lol

२४ hour fitness मध्ये चेंजिंग रूम मधल्या बायका बघून बहुतेक धक्का बसलेला अस वाटतंय. (पहिल्या वेळेस) . नंतर ते okay वाटल. (अस अंधुकस आठवतंय)

आई त्या मुलांच्या भविष्याकरता तजविजच करत असते....... प्रामाणिकपणे सांगायचे तर आई, आपली आर्थिक सुरक्षितता सोडत नसते.मग आपले आपणच हे तुमच्यासाठी करतो वगैरे म्हणायचे.सामो, तुला हे व्यक्तिशः म्हणत नाही.सगळ्या नोकरीवाल्या आयांची स्थिती आहे.मीही त्यातलीच एक.

बागेत ३ flamingo ठेवले...... हे मलाही माहित नव्हते.अरे देवा,शॉक laga.

हाइला माझ्याकडे आहेत २ पत्र्याचे फ्लेमिन्गो बॅकयार्डात, गेली ३-४ वर्षे तरी. Happy बर्‍याच ब्लॉक पार्ट्या आणि माबो गटग पण केलीत तिथेच.

>>>>>>आई, आपली आर्थिक सुरक्षितता सोडत नसते.मग आपले आपणच हे तुमच्यासाठी करतो वगैरे म्हणायचे.
अगं आपल्या बाळाला आपली गरज आहे, तिची ही वर्षे परत आपल्याला मिळणार नाहीत. तिच्याबरोबरचा वेळ अमूल्य आहे हे सर्व ओळखूनही जेव्हा आई घराबाहेर पडते ते - याच बळावर की तिच्या भविष्याची तरतूद होइल. चार पैशांनी तिलाच ( अपत्य) समृद्ध आयुष्य मिळेल.
बाकी आर्थिक स्थैर्य स्त्रीलाही हवे असतेच. नाही असे नाही.
पण 'दिल बेहलाने के लिये' ये खयाल भी अच्छा है की काहीतरी भरीव आपल्या कुटुंबाकरता करता येतय.

तर आपल्याल जे बाबा म्हणतात त्यांना हे लोक बाबा म्हणतात >> पूर्वी कापड दुकानांमध्ये काही बॉक्स वर "बाबासूट" असे लिहीलेले असे ते आठवले Lol

फा ची वेअरहाऊस ची कमेंट भारी आहे. आमच्या बुटांच्या दुकानात आता सगळ्यांची ओळख झालेली आहे. साईझ नसेल तर तो आधीच फोन करून दुसर्‍या शाखेत आहे का असे विचारून घेतो. तेही जमले नाही तर ऑनलाईन मागवून ठेवतो.

अय्यो मोरोबा,
माझ्या लक्षातच नाही मी इथे सांगितलं ते.बरं झालं सांगितलं.आता नवे कल्चरल शॉक लावून घ्यायला हवेत.

Pages