Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हाहाहा, दोन्ही भारी किस्से.
हाहाहा, दोन्ही भारी किस्से.
बरं स्विंगर सर्व सुंदर वस्तू
बरं स्विंगर सर्व सुंदर वस्तू एकजात वापरु लागले तर आम्ही का म्हणुन बघत बसायचं?///
खरं आहे. शोभेसाठी यार्डात फ्लेमिंगो लावले तर शेजारी एक पुणेरी पाटी पण लावता येईल- "हे फ्लेमिंगो फक्त शोभेसाठी लावलेले आहेत. तरी स्विंगिंगसाठीची स्थळे आणू नयेत. "
अरे पण स्विंगर्स ला काय चॉईस
अरे पण स्विंगर्स ला काय चॉईस आहे का नाही... कि ओपन फॉर ऑल प्रकार असतो? असे फ्लेमिंगो ठेवले कि झाले? या कोणीपण?
मायबोलीवरील जाणकारांनी उजेड टाकावा...
(No subject)
अमेरिकेत काय असतं याबद्दल
अमेरिकेत काय असतं याबद्दल देशी पब्लिकला बरीच माहिती असते. एकदा व्हॉट्स अॅप ग्रुप वर एक पोस्ट आली होती.
एक विनोदी लेखक होते कोणते तरी (बहुतेक पुलंच असतील) . तर पुलं देशपांडे खेड्यात राहत होते तेव्हां एक अमेरिकन कि इंग्लीश माणूस त्यांच्या गावात येतो. तो त्याच्याकडच्या वस्तू दाखवून गावकर्यांना निवृत्त करतो. त्यांच्या समजुती खोडून काढतो. गावकरी निवृत्त होताना बघून पुल देशपांडे पुढे येतात आणि त्या अमेरिकन कि इंग्लीश माणसाला विचारतात "बाकी काही म्हणा, तुमचा देश आणि तुम्ही सुद्धा खूप प्रगत " यावर तो माणूस खूष होतो. पुलं पुढे म्हणतात " का हो ? पण आम्ही ऐकले ते खरं आहे का ? तुमच्याकडच्या बाया म्हणे खूपच फॉर्वर्ड असतात ?"
पुलं च्या या प्रश्नावर तो गोरा माणूस आता निवृत्त झाला.
चपलांची पुष्पवृष्टी ...
चपलांची पुष्पवृष्टी ...
ठाण्याला गोखले रोडला एका दुकानात हवी ती साईझ नसेल तर पप्पूला शेजारपाजारी पाठवतात तिकडे नाही तर अगदी स्टेशन पर्यंत रमणिकभाईके पास देखले, विरलके स्टोरेज मे छे करुन पिटाळतात. >>>> पण गिर्हाईकाला सांगताना गोडाऊनमधून माल आणायला गेलाय. हे काय इथे शेजारीच आहे गोडाऊन असं सांगतात.
अमेरिकेत पादत्राणांच्या ५.५, ६.५ असल्या अधल्यामधल्या साईजेस बघून धक्का आणि आनंद एकदम अनुभवायला मिळाला होता.
बापरे, ते फ्लेमिंगोचं माहित
बापरे, ते फ्लेमिंगोचं माहित नव्हतं. माझ्या घरी एक फुल साईज पत्र्याचा गुलाबी रंग वगैरे दिलेला फ्लेमिंगो लेकीच्या हट्टापायी घरी आला होता. तो मी घरात झाडं ठेवली होती त्यात ठेवला होता. नशिबानं घरी येणारे सगळेच आमच्यासारखे 'फ्लेमिंगो निरक्षर' असल्याने कधी 'क्वेरी' आली नाही.
फ्लेमिंगो निरक्षर >>> लोल
फ्लेमिंगो निरक्षर >>> लोल.
विनोदबुद्धीला सलाम.
समझनेवाले समझ गए हैं....
समझनेवाले समझ गए हैं....
ऑर बाबा के लिए (म्हणजे आपण
ऑर बाबा के लिए (म्हणजे आपण ज्यांना बाबा म्हणतो त्यांना नाही, तर आपल्याल जे बाबा म्हणतात त्यांना हे लोक बाबा म्हणतात) क्या दिखाऊ? >> हे भारीये.
बाबा/बेबी बरोबर आली नसेल तरी मस्त चुना लावतात.
बेबी स्लीम है या हेल्दी है ? (हेल्दी म्हणजे लठ्ठ...)
"हेल्दी" असेल तर आठ वर्षाच्या बेबीसाठी पप्पूला सांगणार वो दस बारा साल के साईज मे दिखाव.
अरे! पिंक फ्लेमिंगो इन
अरे! पिंक फ्लेमिंगो इन बॉलिवुड.
आज कर्मधर्मसंयोगाने गाडीत रंग रंग मेरे रंग रंग मे गाणं लागलं... आणि त्याच्या सुरुवातीला पिंक फ्लेमिंगो सापडले. काय हा योगायोग!
आमच्या दीपा मेहेताचा सिनेमा आहे (बॉलिवुड- हॉलिवुड). राहुल खन्ना आणि लिसा रे टोरांटोच्या सी-एन टॉवरच्या पार्श्वभूमीवर एकमेकांना फेव. फुड, फेव. फिल्म, असले डेटींग-१०१ प्रश्न विचारत आहेत आणि पर्फेक्शनचं उत्तर लीसा रे 'पिंक फ्लेमिंगोज इन माय पेरेंट्स फ्रंट यार्ड' म्हणते. एकझॅक्टली आपल्या वरच्या डिस्कशन मधले शब्द!
तो गाण्याचाच पार्ट आहे. ते ऐकलं आणि गाडीतच फुटलो! पिक्चर फार पूर्वी बघितलेला आहे पण असा काही संदर्भ आहे का बघायला परत बारकाईने बघितला पाहिजे. तेव्हा कॅनडात रहात न्हवतो, त्या निमित्ताने जीटीए मधल्या खुणा बघत पहायला मजा येईल.
अरे हा पिक्चर अर्धवट आठवतोय.
अरे हा पिक्चर अर्धवट आठवतोय. आता पुन्हा नव्याने बघायला हवा
आपल्याच कल्चर मधे कल्चरल शॉक बसले आहेत का कोणाला? म्हणजे शाळेतील चित्रात जे पाहिले ते आणि प्रत्यक्षात दिसते ते यातील तफावत?
- भिरभिर्याचे चित्र पाहून ते ज्या दिशेला फिरेल असे इमॅजिन केले होते त्याच्या बरोब्बर विरूद्ध दिशेला ते फिरते
- सरळ खांबावरचा झेंडा प्रत्यक्षात चित्रात दाखवतात तसा फ्लॅट आडवा न राहता सगळे कापड एकत्र खाली लटकते
- रेल्वेगाडी ही चित्रातल्यासारखी धूर वगैरे सोडणारी कोळश्याच्या इंजिनाची नसून विजेच्या किंवा डिझेल इंजिनाची दिसते.
हे सर्वांना माहीत आहे पण त्या त्या शाळकरी वयात हे शॉक बसले आहेत
मामी
मामी
'फ्लेमिंगो निरक्षर' >>>
'फ्लेमिंगो निरक्षर' >>>
अरे, मजा म्हणून ठीक आहे, पण
अरे, मजा म्हणून ठीक आहे, पण अर्थ बदलू नका रे कायमकरता.. साध्या गोष्टीतला आनंद राहिला पाहिजे.
नाहीतर whitehat म्हणाल्या तशी पाटी लावावी लागेल. "आमच्याकडे कुठल्याही गोष्टींना छुपा अर्थ नाही". Take things on face value
आमच्या एका मित्राने
आमच्या एका मित्राने (विद्यार्थी असताना) त्याच्या खोलीच्या दारावर स्वस्तिक चिकटवले होते. त्या घरात शेअर करून राहणारे परदेशी विद्यार्थी ते स्वस्तिक पाहून चांगलेच दचकले होते. एकदा त्याला शांतीत घेऊन त्यांनी विचारलं होतं की बाबा रे, तू कुठल्या विघातक कारवाया वगैरे करतोस की काय! स्वस्तिक हे आपल्याकडे मांगल्याचं प्रतीक आहे हा त्यांच्यासाठी कलचरल शॉक होता.
वेगास ला ड्रिंक्स फ्री बघून
वेगास ला ड्रिंक्स फ्री बघून आनंदाचा शॉक बसला होता... जीवाला पी...
पप्पु बाबा फ्लेमिंगो
पप्पु बाबा फ्लेमिंगो
मी पण आणलेला एक छान गुलाबी. मागे ठेवला होता. आता चोच वर करून उन्हाने पांढरा होऊन धूळ खात पडलाय बागेत.
निरक्षर लोकांमुळे बिचाऱ्याचा
निरक्षर लोकांमुळे बिचाऱ्याचा गुलाबीपणा उडून गेला..
म्हणजे आपण ज्यांना बाबा
म्हणजे आपण ज्यांना बाबा म्हणतो त्यांना नाही, तर आपल्याल जे बाबा म्हणतात त्यांना हे लोक बाबा म्हणतात
>>>
सगळ्याच पोस्टी धमाल आहेत.
फ्लेमिंगो निरक्षर
फ्लेमिंगो निरक्षर

भिरभिर्याची दिशा
त्यात इतके शॉक किंवा अगदी
त्यात इतके शॉक किंवा अगदी अनुकंपा वगैरे काय? ही पद्धत हळू हळू भारतात ही येइलच. पोळी वाल्या महिलंचे पगार तुलनेने कमी आहेत म्हणून, नाहीतर आताच आली असती. पुण्या मुंबईत बाहेरच्या महिला पोळ्या करून जातात हे पाहून सांगली/सातारा लोकांना अनुकंपा वाटेल. लहान मुलांना पाळणा घरात ठेवून आई कामाला जाते हे पाहून अनुकंपा वाटेल. >>>>>>>>आळशी कुठचे
मुंबईत होळी दिवशी रंग खेळतात
मुंबईत होळीच्या दुसर्या दिवशी रंग खेळतात
प महाराष्ट्रात पंचमीच्या दिवशी असते
शॉक
पुण्यात पहिल्यांदा आल्यावर
पुण्यात पहिल्यांदा आल्यावर होळीला रंग खेळतात हे पाहून मला शॉक बसलेला
पुण्यात पहिल्यांदा आल्यावर
पुण्यात पहिल्यांदा आल्यावर होळीला रंग खेळतात ??
होळीच्या दुसऱ्या दिवशी
होळीच्या दुसऱ्या दिवशी खेळतात मुंबईत
तसेच तर पोरांचे आठवडाभर आधीच पिचकाऱ्या घेऊन भिजवाभिजवीचे खेळ सुरू होतात..
निरक्षर लोकांमुळे बिचाऱ्याचा
पुणेरी पाटी,फ्लेमिंगो निरक्षर,
निरक्षर लोकांमुळे बिचाऱ्याचा गुलाबीपणा उडून गेला..... ...भारीच.
https://nypost.com/2017/06/02
https://nypost.com/2017/06/02/secret-signs-your-neighbor-might-be-a-swin...
ओरिसा मधे एका ठिकाणी स्त्रिया
ओरिसा मधे एका ठिकाणी स्त्रिया अंगात चोळी घालत नाहीत हे पाहिले होते. कधी तरी ऐकले होते त्यामुळे जोराचा धक्का बिक्का नाही बसला. पण तरी शॉकच की.
मला इकडे एक सौम्यसा क. शॉक
मला इकडे एक सौम्यसा क. शॉक बसला होता जेव्हा बायका सकाळी पोरांना बसस्टॉपवर सोडायला गाडीवर नाईटी घालून वरून टॉवेल घेऊन यायच्या (ओढणी नाही बरं टॉवेलच) दिवसभर बायका नाईटी घालून वावरतात हा आधी धक्का मग बाहेर येताना टॉवेल ओढतात हा पुढचा धक्का.
Pages