Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मराठीत सई सारखी आंतरराष्ट्रीय
मराठीत सई सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची अभिनेत्री असताना प्राजुडी ला का घेतात ?>>>>
ती अजून लहान आहे हो, कॉलेज कुमारीचे रोल चांगले शोभतात तिला, ती तसेच स्वजो आणि अंकुश चौधरी हे फॉरएव्हर 16 गटात मोडतात
त्यांना वयस्कर लोकांच्या भूमिका देऊ नयेत
स्वजोचा लहान भाऊ सचिन
स्वजोचा लहान भाऊ सचिन (म्हाग्रु) आणि अमेय वाघ एकाच शाळेत शिकत असतात.
बालवाडीत
अक्षय कुमारला शाल श्रीफळ द्या
अक्षय कुमारला शाल श्रीफळ द्या आता कुणीतरी.
बास झालं म्हणावं.
अजून त्याचे चरित्र
अजून त्याचे चरित्र अभिनेत्याचा रोल करणे बाकी आहे , बच्चन प्रमाणे !
राधिका आपटेला अभिनय आहे परंतु
राधिका आपटेला अभिनय आहे परंतु फार ग्लुम्ड्/डुम्ड भूमिका करते. अर्थात मी फार पाहीलेले नाहीत तिचे सिनेमे तरीही ... एक नीरीक्षण.
सामो - आपटे चा पारछेड किंवा
सामो - आपटे चा पारछेड किंवा फोबिया बघा...
च्रप्स बघेन. मे बी तिने विविध
च्रप्स बघेन. मे बी तिने विविध भूमिका केल्याही असतील. पहाते. धन्यवाद.
सचिन आणि अमेय हे कुमारावस्था
सचिन आणि अमेय हे कुमारावस्था संपवून तारूण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवत असतात. पण ते शाळेत हाफचड्डी घालून जात असल्याने सचिन चा मोठा भाऊ स्वप्नील जोशी जो ज्युनियर कॉलेजला आहे तो दोघांना अजूनही चॉकलेट्स आणत असतो. सचिन आणि अमेय दोघांमधेही निसर्ग बदल करत असतो. एक दिवस अमेयची मोठी बहीण , जी कि सई ताम्हणकर आती, ती सचिनला दिसते. पार्श्वभागी आमची मुंबईचं संगीत सुरू होतं आणि मनात पालवी फुटू लागते. छोटा सचिन युवा सईच्या प्रेमातच पडतो.
हे अमेयला माहिती पडतं. तो सचिनला मदत करू लागतो. हळू हळू सई पण सचिनशी प्रेमाने बोलू लागते. त्याला मागे बसवून बाजारात दूधी भोपळा, तूरडाळ, कणीस घ्यायला जाऊ लागते. सचिन सुद्धा मोठ्या आनंदाने पिशव्या घेऊन मागे मागे फिरत असतो.
एक दिवस सई त्याला घेऊन मोमोज खायला जाते. सचिन आज खूप खूष होतो. त्याला मनातले बोलायचे असते. इतक्यात युवा स्वप्नील जोशी त्या दोघांना एकत्र पाहतो आणि सईला नाही नाही ते बोलतो.
ती आधी म्हणते अरे ऐकून तर घे...
पण तो सचिनच्या कानाखाली एक झापड लावून देतो आणि घरी जा म्हणतो ( या सीननंतर स्वजो महागुरूंच्या पायावर डोकं ठेवून रडणार).
तो काही ऐकून न घेता जाणार इतक्यात सई त्याच्या कानाखाली ठेवून देते.
लहानग्या सचिनला काय करावे समजत नाही. एकीकडे भाऊ आणि दुसरीकडे आऊ !
इकडे अमेय आणि सचिनचे थप्पड वरून भांडण होते. अमेय मग दोघांमधे काड्या करायला सुरूवात करतो. त्याने लावलेली आग इंटर्व्हलच्या वेळी प्रचंड भडकते. थिएटरमधे गरम व्हायला लागतं आणि दरवाजे उघडावे लागतात.
शेवटी आईसक्रीम आणि कोल्डड्रींक्स ( १००० स्क्वे फुटाच्या स्टॉलवरची थंड बीअर) घेऊन आल्यावर मग सावकाआश, निवांत, हळू हळू सगळा उलगडा होऊ लागतो.
म्हणजे सचिन म्हणालेला असतो कि "दादा गर्लफ्रेण्ड म्हणजे काय असतं रे ?"
तेव्हां झबा त्याला सांगतो " अरे तू मोठा झालास कि आपोआप ते समजायला लागेल "
आणि लगेचच संध्याकाळी त्याला सई आणि म्हाग्रु एकत्र दिसतात. त्याला वाटतं सचिनने सईला पटवलं.
खरंतर इंटर्व्हलच्या आधी दोघांनी कॉलेजला गाणी म्हटलेली असतात. मराठीच्या मर्यादा सांभाळत सईने बोल्ड दृश्ये सुद्धा दिलेली असतात. त्याच वेळी स्वजोला पोरीचा अंदाज येत नाही. आत्ता चालतंय आणि लहान भाऊ सोबत दिसला कि थप्पड ! वा रे वा !
इकडे सचिनला पण कळतं की आपण दादाची पोरगी पटवली.
पण तिकडे प्रकारच वेगळा असतो.
ती "भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना" मोड मधे असते. तिला सचिन मधे अमेय वाघच दिसत असतो. पोरगी वरून बोल्ड पण आतून निरागस असते अगदी फणसासारखी !
बंबई का बाबू मधे आख्ख्या देव आनंदला पिक्चरभर रोमान्स केल्यावर जे शेवटी कळतं तेच सचिनला क्लायमॅक्स समजतं. आणि मग सगळे गुंते सुटत शेवट गोड होतो.
शेवटी बडजात्याप्रमाणे आडव्या धिकताना फ्रेममधे सगळे जण एकत्र येतात. सत्ते पे सत्ताची फ्रेम थोडी उंच आणि जास्त रूंद असल्याने मराठीच्या बजेट मधे बसत नाही हे सचिनला आम्ही सातपुतेमधेच समजलेले असल्याने इथे तो मोह टाळण्यात येतो आणि हिंदीच्या शिरस्त्याप्रमाणे नावं येत असताना एक मराठी पॉप गाणं सुरू होतं.
इकडून आले फुगे
तिकडून आले फुगे
झब्याला शिवले झगे
झगे झगे झगे
द एण्ड !
मराठी अभिनेत्री मध्ये अभिनय
मराठी अभिनेत्री मध्ये अभिनय नसतोच..>>> अरे आवरा आता खरंच जास्ती होतय. टू मच जनरलायझेशन!
स्मिता पाटिल ना विसरलात का?
इकडून आले फुगे
इकडून आले फुगे
तिकडून आले फुगे
झब्याला शिवले झगे
झगे झगे झगे>>>
अरररा खतरनाक

कसलं भारी आहे
कौन प्रवीण तांबेhttps://youtu
कौन प्रवीण तांबे
https://youtu.be/BKlYYBbtKcA
ईंटरेस्टींग ट्रेलर आहे.
या प्रवीण तांबेचा सख्खा भाऊ आमच्या ऑफिसमध्ये. त्यामुळे आमच्या ऑफिस क्रिकेट टीमला टिप्स द्यायला हा प्रवीण तांबे यायचा. आयपीएलमध्ये चमकला की आमच्या ऑफिसमध्येही याच्या कौतुकाचा मेल फिरायचा. मर्यादीत गुणवत्ता पण पॅशन आणि डेडीकेशन या गुणांमुळे वय ऊलटूनही याने दाखवलेली चिकाटी काबिले तारीफ.
पिक्चर बघायला उत्सुक आहे...
दसवी ट्रेलर आवडला - अभिषेक
दसवी ट्रेलर आवडला - अभिषेक बच्चन, यामी गौतम आणि निम्रत कौर
लिंक - https://youtu.be/V4kdp7vPqWY
मस्त दिसतोय दसवी..
मस्त दिसतोय दसवी.. ईंटरेस्टींग विषय.. कलाकारही मस्त.. अभिषेक, यामी, निम्रत कौर.. हा नक्की बघणार
शांमा हे म्स्त आहे कश्याच
शांमा हे म्स्त आहे कश्याच विडंब न आहे? दुनियादारी?
नाही नाही. हे असंच होतं.
नाही नाही. हे असंच होतं.
मस्तच आहे. शांमा, लाडक्या
मस्तच आहे. शांमा, लाडक्या व्यक्तिमत्वांचा कोथळाच निघाला की बाहेर.
मी वसंतरावचा ट्रे लर छान आहे. पण ती राधिका वसंत रावाची आई हे काही झेपत नाही. गाणी मस्त असतील.
बंबई का बाबू मधे आख्ख्या देव
बंबई का बाबू मधे आख्ख्या देव आनंदला पिक्चरभर रोमान्स केल्यावर जे शेवटी कळतं तेच सचिनला क्लायमॅक्स समजतं.
>>> हे कोणीतरी उलगडून सांगा...
दसवी ट्रेलर आवडला - अभिषेक
दसवी ट्रेलर आवडला - अभिषेक बच्चन, यामी गौतम आणि निम्रत कौर >>> मलाही आवडला.
कौन प्रवीण तांबे - हा ट्रेलरही मस्त दिसतोय. "इक्बाल" नंतर श्रेयस तळपदे पुन्हा क्रिकेट वाल्या रोल मधे.
https://www.youtube.com/watch?v=5XZia9c4fVU
"शाबाश मितू" हा मिताली राज वरचा पिक्चर दिसतोय. पिक्चर कदाचित चांगला असेल पण ट्रेलर इतका खास नाही. सस्पेन्स बिल्ड-अप मधे जास्त फुटेज गेले आहे.
https://www.youtube.com/watch?v=rX_Xr-F-hEQ
दसवी ट्रेलर आवडला - अभिषेक
दसवी ट्रेलर आवडला - अभिषेक बच्चन, यामी गौतम आणि निम्रत कौर >>> मलाही आवडला.+१
शेवटचं गाणं ऐकून हिंदी मिडियम सिनेमातले 'एक जिंदडी' आठवलं.
भन्नाट आवडलाय ट्रेलर, गाणी तर
भन्नाट आवडलाय ट्रेलर, गाणी तर एकसे एक झालियेत.
https://www.youtube.com/watch?v=7jr7dqdiE4M&ab_channel=EverestMarathi
हृषिकेश गुप्ते यांचा चित्रपट
हृषिकेश गुप्ते यांचा चित्रपट येतोय.
दिल दिमाग और बत्ती. ट्रेलर तर नाही दोन गाणी रिलीज झाली आहेत. भन्नाट आहेत. वंदना गुप्ते रॉक क्वीन आणि दिलीप प्रभावळकर काऊ बॉय !
https://www.youtube.com/watch?v=x9LGJqMSCRo
जिग्नेशभाई जोरदार... चांगला
जिग्नेशभाई जोरदार... चांगला मेसेज देणारा चित्रपट वाटतोय...
https://youtu.be/fppJtxJ7RWY
दिल दिमाग बत्तीचा ट्रेलर
दिल दिमाग बत्तीचा ट्रेलर आवडला. https://www.youtube.com/watch?v=vC_pUv5va4s
ट्रेलर छान आहे दिमाग दिल
ट्रेलर छान आहे दिमाग दिल बत्ती .. पण चित्रपट कंटाळवाणा असेल असे वाटते... हे असले पांचट विनोद ट्रेलर पुरते बरे वाटतात.. तीन तास तेच तेच बघणे शक्य वाटत नाही...
तिकिट काढून तर शक्यच नाही...
https://youtu.be/BT0zd0kmTxM
https://youtu.be/BT0zd0kmTxM
हा बघायला जायचंय .. ट्रेलर तर मस्त वाटतोय.. शाहिद तसाही आवडतोच आणि कबिर सींग पासून माझ्या लिस्टमधे टॅापला आहे
कबीर सिंगचा स्पेशल धागा आहे
कबीर सिंगचा स्पेशल धागा आहे आपल्याकडे
कबीर सिंग - एका उत्कट प्रेमाची धाडसी कहाणी
https://www.maayboli.com/node/79474
बाकी जर्सीची उत्सुकता मलाही आहे. याचे एक साऊथ ईंडियन वर्जन सुद्धा आहे. पण ते मी मुद्दाम बघत नाही. मला हाच आधी बघायचा आहे.
https://youtu.be/pt81CJcWZy8
https://youtu.be/pt81CJcWZy8
A24 चा पुढचा भयपट !
ट्रेलर छान आहे दिमाग दिल
ट्रेलर छान आहे दिमाग दिल बत्ती .. पण चित्रपट कंटाळवाणा असेल असे वाटते... हे असले पांचट विनोद ट्रेलर पुरते बरे वाटतात.. तीन तास तेच तेच बघणे शक्य वाटत नाही...
तिकिट काढून तर शक्यच नाही...
>>>>>>
खरंय च्रप्स. अश्या ट्रेलरबाबत असेच अनुभव आहेत. काहीच थांग लागत नाहीये पिक्चरचा..
इतके फेमस चेहेरे दिसताहेत.
इतके फेमस चेहेरे दिसताहेत. काहीतरी बरा असू दे!
Pages