चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रानबाजार या मराठी चित्रपटाचे दोन टीजर रीलीज झालेत.
मराठीसाठी फार बोल्ड आहे वा नाही ते सोडा, पण टीजरलाच हे दाखवून अपेक्षित प्रेक्षकवर्गाला आमंत्रण आहे असे वाटते.

१. तेजस्विनी पंडीत
https://www.youtube.com/watch?v=ZUptCHIhHHY

२. प्राजक्ता माळी
https://www.youtube.com/watch?v=kwVviVKIH1Y

तेजस्विनीला आधीही अश्या बोल्ड भुमिकेत पाहिलेले. पण प्राजक्ता माळी हा जरा धक्का होता. स्पर्धेत टिकायला हे असे करावेच लागते का हा प्रश्न पडलाय..

अरे रानबाजारचा ट्रेलर कडक आहे. एक सो एक कलाकार आहेत. आणि काहीतरी दमदार स्टोरी बघायला मिळेल अशी आशा आहे.

https://youtu.be/v70dXJ3cHnU

बाकी टीजर का असा आंबटशौकीनांसाठी बनवला समजले नाही. पब्लिसिटी स्टंट का? चांगली आयड्या होती पण..

वरचा प्रतिसाद दुसर्‍या धाग्यावरून अ‍ॅडमिननी तत्काळ उडवला होता ना कालपरवा ?
कुठून सापडतात असले ट्रेलर ?

हुडकून आणून असा ट्रेलर टाकणे आणि असे ट्रेलर का बनवतात असे भाबडेपणे विचारणे यासाठी खूप कौतुक करावेसे वाटते. तसेच ही दृश्ये आंबटशौकीनांसाठी आहेत का असे प्रश्न विचारणे यामुळेच नितांत आदर वाटतो. आता इथून पुढे अशी दृश्ये मिटक्या मारत पाहणार नाही ही शपथ घेतो.

आणि स्वतः च स्वतः ला उत्तर दिल्यासारखे प्रतिसाद आहेत>>>
17 मे ला टाकलेला पहिला
कोणीच रिप्लाय नई केला पण सरांना तर यावर चर्चा हवीच होती मग परत एक Happy

असे ट्रेलर का बनवतात असे भाबडेपणे विचारणे यासाठी खूप कौतुक करावेसे वाटते>>>>
खरंय, भाबडेपणा चा आव आणणे सोप्पे नाही, उघडे पडले तरी सर आपली चिकाटी सोडत नाहीत Happy

स्वतः च स्वतः ला उत्तर दिल्यासारखे प्रतिसाद >>> अरे राहिले असतील कपडे बदलायचे. समजून घ्यायचं आणि पुढे जायचं ! घाईघाईत आपण नाही का कोट , टाय आणि खाली नाडा लोंबणारी पट्ट्याची अंडरविअर घालून हातात ब्रीफकेस घेऊन थाटात कारमधे बसताना बिल्डिंगमधे वर बघून बायकोला टाटा करत असतो तेव्हां इतर बायका का हसतात या विचारात नाही जात ऑफीसला ?

हुडकून आणून असा ट्रेलर टाकणे '
>>>>
शांत माणूस मी ईंग्लिश चित्रपट/सिरीज बघत नाही. हिंदी मोजकेच, मराठी त्यामानाने बरेपैकी. त्यामुळे मला नेट सर्फिंग करताना मराठी चित्रपट, मराठी वेबसिरीज, मराठी विडिओज जास्त सजेस्ट होतात. त्यामुळे हुडकावे असे लागत नाही Happy

आणि ईथे टाकण्याचे म्हणाल तर ईथे मी सर्व प्रकारचे कंटेट टाकतो. त्यावर बरीवाईट चर्चा अपेक्षित असते. तुम्ही विषयावर आपले प्रामाणिक मत नोंदवू शकता. स्वागत आहे Happy

त्यातही मराठीत काही नवीन चित्रपट वा मालिका असेल तर आवर्जून त्यावर लिहितो वा नवीन धागा काढतो. हवे तर लिस्ट देतो आजवरची Happy

असो,
रानबाजारचा टीजर बघून एक्सायटेड झालेले लोकं ट्रेलर बघून नाराज झालेत.
आणि टीझर बघून निराश झालेले लोकं आता ट्रेलर बघून जरा खुश झालेत.

रानबाजारचा टीजर बघून एक्सायटेड झालेले लोकं ट्रेलर बघून नाराज झालेत.
आणि टीझर बघून निराश झालेले लोकं आता ट्रेलर बघून जरा खुश झालेत.>>>>

सर याची आकडेवारी असेलच ना तुमच्याकडे?

सॉरी सॉरी
तुम्हाला भारताचे "मुद्दाम घुसेन" का घोषित करण्यात येवु नये?????? Light 1 (सर बघा हं हा प्रतिसाद मी तुमची बाजु घेवुन दिलाय ध्यानात असु द्या)

आज वेळ होता हो, त्यात सरांची नेहमीचीच भंपकगिरी सुरू असलेली पाहून मोह आवरला नाही
पण आता पळावे, नैतर 'शी बाई कंटाळा आला या सर प्रकाराचा' गँग सदस्य येऊन ठेपतील Happy
माझी लेखमाला पूर्ण होईपर्यंत तरी मला माझा आयडी हवा आहे शाबूत

माझी लेखमाला पूर्ण होईपर्यंत तरी मला माझा आयडी हवा आहे शाबूत
तुम्ही ते लेखमाला पटपट लिहिण्याचे मनावर घ्या बघु. वाटल्यास एक........................... टंचनिका (सॉरी आपलं ते टंकनिका) बाळगा पाहु.

हे बरीक खरं हाय. अशी लेखमाला चालू आहे हे लोक विसरून जायच्या आत एखादा भाग येऊ द्या कि.
हे समद्यांनाच लागू हाय.
(सर सर ग्यांग पीडीतांसारखं नाय. त्याच्याकडून अपेक्षा नाही, पण तुमच्याकडून आहेत इत्यादी इत्यादी. मजेशीर धागा होता. उडाला पण )

https://youtu.be/R6savS7m0Fg

लाल सिंघ चढ्ढा ट्रेलर. ट्रेलर चांगले वाटतेय. 'बॉक्स ऑफ चॉकलेट' या सुप्रसिद्ध ओळींचे भारतीयीकरण मस्त केलंय.

करीना छान दिसतेय.. आमिर खान धूम ३ मधे जशी ॲक्टिंग केली तशी करताना दिसतोय.. पण फॅारेस्ट गम्पचं नाव खराब होऊ नये इतकी काळजी नक्कीच घेईल तो.. कधी येतोय बाय द वे?

क्या बात है!
आता पाहिले ११ ऑगस्टला रिलीज होतोय
फिर तो कुच बुरा हो ही नई सकता यार
पिक्चर सुपर हिट आहे !

ट्रेलर काही फार विशेष वाटत नाही. पण आमीर खानच्या पिक्चरमध्ये सगळे पत्ते ओपन होत नाहीत. लगान बघताना समजलेले की त्यात क्रिकेट आहे.

ह्या लालसिंग चढ्ढा मध्ये टेबलटेनिस उर्फ पिंग-पाँग का आहे हे अतुल कुलकर्ण्यांना विचारायला हवे... फारेष्ट गंपाने पिंग-पाँग खेळल्ला त्याला मोठा इतिहास होता... ८० -९० मधला भारत म्हणला की क्रिकेट सोडून असले भलते नाद बरे नव्हे हो... ओ कुलकर्णी, हे इंडियन अ‍ॅडॅप्टेशन कसं हो??
https://en.wikipedia.org/wiki/Ping-pong_diplomacy

म्हाळसा +१
शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे हे. अतिशय चांगला झाला फॉरेस्ट गम्पचा रिमेक तरच त्यात अर्थ आहे. आमीर खान करतोय हे चांगलं आहे. अभिनय त्याच्याहून चांगला करणारे आहेतच, पण प्रयोग करण्याचं धाडस त्याच्याकडे खूप आहे. आणि अर्थात मेहनत.
सीमंतिनी, टे.टे.ची ही पार्श्वभूमी माहिती नव्हती.

अनिल, किती दिवसांनी बघतेय तुला!!! आश्चर्याचा सुखद धक्काच बसून गेला मला. लेख मात्र अतिशय भेदक झालाय बंर का. लहानपणीपासून तुला जत्रा, तमाशा, उचलेगिरी ह्यांची आवड होती माहिती होत पण लिखाणात तू तरबेज असशील असं तुझ्या कडे बघून कधीच वाटलं नाही. मध्यंतरी मंदा भेटली होती.. ती म्हणाली तू अजून लग्न केलं नाही म्हणून. मला माहिती आहे काय कारण आहे. जमल्यास मला माफ कर. तू मात्र अजून तसाच दिसतोस.. स्थूल, केविलवाणा, तेच ते ओठ, गालावरचे व्रण, कानावरचे केस. तेच मिश्किल भाव, तीच मग्रूर अदा. जुन्या आठवणी रमले मी. फोन करीन उद्या. बसते आता जरा वेळ. कुठे? इश्श!

Pages