कबीर सिंग - बहुधा २०१९ चा चित्रपट..
मग आज त्यावर का लिहावेसे वाटले?
.. कारण मी आज पाहिला. अगदी आता पाहिला.
तेव्हा का नाही पाहिला?
.. चित्रपट बघायची फार आवड नाही, वेळ नाही. कधी कानावर आले एखादा चित्रपट भारी आहे वा त्यात शाहरूख आहे वा मराठी आहे तरच बघायचे.
या चित्रपटाबद्दल कोणाकडून कळले?
.. मागे लॉकडाऊनमध्ये केस दाढी तुफान वाढवलेली. गॉगल काढून घराच्याच खिडकीत उभे राहून दोनचार फोटो काढलेले. दोन चार मित्रांनी कॉमेंट दिली, अरे हा तर कबीर सिंग. तेव्हा या चित्रपटाबद्दल पहिल्यांदा कळले.
मग आज का बघितला?
.. गाणी ! वेड लावणारी गाणी!
सहजच एक गाणे कानावर पडले. आवडले. कुठल्या चित्रपटातील आहे हे शोधताना कबीर सिंगचा अल्बम हाती लागला. एखादा अपवाद वगळता अख्खाच्या अख्खा अल्बम आवडला. रिपीट मोडवर ऐकू लागलो. माझ्यामते गेल्या तीन चार वर्षातील सर्वोत्तम म्युजिक अल्बम. फील येण्यासाठी मग यूट्यूबवर त्याचे विडिओ बघू लागलो. त्या गाण्यांच्या विडीओत जे प्रेमाचे उत्कट चित्रण दिसत होते त्यामुळे उत्सुकता वाढत होती. पण शाहरूखचा चाहता असल्याने एखादे यशस्वी न झालेले, दुख दर्द भरे, आणि कदाचित तसेच सॅड एंण्डींग असलेला चित्रपट बघायची हिंमत नव्हती.
बर्र मग? आज आली का ती हिंमत?
.. आली नाही केली. म्हटले जे काही आहे ते बघूया, अनुभवूया. कारण चित्रपट बघितल्यावर त्यातली गाणी आणखी आत उतरतात असा आजवरचा अनुभव आहे. जर यातली गाणी आधीच हृदयाला हात घालणारी असतील तर असेना एखादा काळीज पिळवटून टाकणारा चित्रपट, बघूया म्हटले.
मग काय बघितले? कसा वाटला चित्रपट?
.. ते नेमक्या शब्दात नाही सांगता येणार. मी काही चित्रपट समीक्षक नाही. पण जे पाहिले ते आयुष्यभर मनावर ठसून राहावे असे आहे.
काय आवडले? एका टपोरी, गुंडागर्दी करणार्या मवाली मुलाची लव्हस्टोरी?
.. का, टपोरी मुलांना प्रेम करायचा अधिकार नसतो का? कॉलेजात भाईगिरी करणार्या मुलांना पुढे आयुष्यात सुधारायचा अधिकार नसतो का? माझ्या शाळेतला याच कॅटेगरीतला एक अख्खा ग्रूप आज चांगले शिक्षण घेऊन सेटल झालाय. तर तेव्हा पुस्तकी किडे असणारे आज शाळेच्या व्हॉटसपग्रूपवर दर विकेंडला दारूच्या ग्लासांचे फोटो टाकत राहतात.
मग यात काय वेगळे केलेय? ते व्यसनांचे उदात्तीकरण नाही का?
.. वाटत नाही. वाईट काळात त्याने व्यसनांना जवळ केले. पण पुढे कुटुंबाच्या आणि स्वतःच्या प्रेमासाठी सुधारला तेव्हा व्यसनांना दूर सारले. याचा अर्थ व्यसने वाईट काळाचे सोबती असतात हाच संदेश दिलाय.
आणि बाहेरख्यालीपणा?
.. कोणावर जबरदस्ती तर नाही ना करत? प्रेयसीला विसरायला ईतर मुलींशी त्यांच्या मर्जीने शारीरीक संबंध ठेवायचा मार्ग निवडतो. पण अखेरीस प्रेमाची जागा ते घेऊ शकत नाही हेच त्याला समजते.
आणि ते दारू पिऊन सर्जरी करणे?
.. हे असे खरेच शक्य आहे की नाही कल्पना नाही. म्हणजे दारू पिऊन सर्जरी करणे, आणि त्याला सहकार्यांनी तसे करू देणे. शक्य नसल्यास त्याला दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य समजूया. पण जेव्हा एका अपघाताने त्याच्यावर केस पडते तेव्हा तो जे वागतो ते पाहता काय योग्य आणि काय अयोग्य हा संदेश प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचतोच.
म्हणजे चित्रपटात दाखवलेला सारा वाह्यातपणा योग्यच आहे का?
.. बिलकुल नाही. तो वाह्यातपणा म्हणूनच स्विकारायचा. पण अश्या व्यक्तीलाही प्रेम काय आणि किती सुधरवू शकते हे बघावे. बाकी वाह्यात ईथे कोण नाहीये? पर्रफेक्ट पुरुषोत्तम ईथे कोण आहे? छे, उत्तराची अपेक्षा नाहीये. येऊ द्या तुमचा पुढचा प्रश्न!
रागावला की कसाही वागतो तो. कोणालाही मारतो तो. प्रेयसी असो, वा तिचे बाबा, वा आपलेच मित्र, आपलाच भाऊ .... ??
.. अच्छा म्हणजे शॉर्ट टेंपर, शीघ्रकोपी. झाल्यास विक्षिप्तही म्हणा. स्वभावाचा भाग आहे हा. अनुभवावरून सांगू शकतो. जे खरेच आपलेच असतात तेच अश्यांशी डील करू शकतात. थोडी लोकं दुखावली जातात, थोडी नाती दुरावतात. जवळची म्हणावी अशी माणसे कमीच उरतात आयुष्यात. पण ती माणसे मात्र जीवापाड प्रेम करणारी भेटतात. कारण म्हणूनच टिकली असतात. मित्र बघितला ना कसा भेटतो त्याला. चित्रपटाचे नाव कबीर सिंग नसते तर कदाचित मी ते विसरलो असतो, पण त्या शिवाला विसरणार नाही कधी.
म्हणून मग अश्या स्वभावाचे उदात्तीकरण?
.. छे, पुन्हा तोच शब्द. उदात्तीकरण कुठे दिसले यात. त्याचीच फळे तर भोगतो.
हो, फळे भोगतो. पण शेवटी तर फळे चाखतोच. शेवट गोडच केलाय त्याच्यासाठी
.. बिलकुल! त्याचसाठी तर चित्रपट आवडला. तेव्हाच तर डोळ्यात पाणी आले. त्याचे वाईट झालेलेच दाखवायला हवे होते असे जे तुम्हाला वाटत होते त्यालाच अनुसरून चित्रपटाचा शेवट असणार याची खात्री होती मला. ती मनाची तयारीही केली होती. असेना कोणी वाह्यात, कोणाचे वाईट झालेले नाही आवडत मला. कारण परीस्थिती बदलते तशी माणसे बदलतात हा विश्वास आहे मला. लोकांच्या आयुष्यात चांगले घडले तर ती सुद्धा चांगली वागतात असा माझा समज आहे.
बर्र ते जाऊ द्या, शेवटी हा पिक्चर आहे. कोणी किती सिरीअसली घ्यायचे ते ज्याच्या त्याच्यावर सोडूया
.. बरं सोडले, तुम्हीच धरून होता एवढावेळ
मला सांगा एक कलाकृती म्हणून काही मूल्य आहे की नाही?
.. काय मूल्य हवे.
तांत्रिकदृष्ट्या तर हल्लीचे सारेच चित्रपट सरस असतात. पण पटकथा आणि तिची एडीटींग अशी आहे की चित्रपटात एक क्षण बोअर होत नाही. सतत दुसर्या क्षणाला काय होणार याची उत्सुकता वाटून राहते.
अभिनयात म्हणाल तर शाहीद कपूरने निव्वळ राडा केला आहे. आता ईथून दहा वर्षे तरी मला शाहीद कपूर म्हटले की कबीर सिंगच आठवणार हे नक्की!
हिरोईनला अभिनय येतो की नाही कल्पना नाही पण तिच्या एक्स्प्रेशनलेस चेहर्याचा ईतका उत्तम वापर करून घेतला आहे की जेव्हा अखेरीस तिच्या चेहर्यावर काही एक्स्प्रेशन दिसतात ते बघूनच काळीज गलबलून येते.
आणि गाणी तर फक्त आणि फक्त चुम्मा आहेत!!!
हे घ्या यूट्यूबवर जाऊन ऐकून या सारी. लिंक देतो गाण्यांची. चित्रपट आपला आपण शोधून बघायचा.
https://www.youtube.com/watch?v=BDlNjOc3wiQ
- ऋन्मेष
धाडसी का लिहीलं? ह्या सिनेमात
धाडसी का लिहीलं? ह्या सिनेमात धाडस काय होतं??
जबरदस्त चित्रपट आहे हा...
जबरदस्त चित्रपट आहे हा... त्या वर्षीचा सर्वोत्तम चित्रपट...
इथे नसेल तर लगेहाथ शाहीद कपूर
इथे नसेल तर लगेहाथ शाहीद कपूर फॅन धागा पण विणून टाकायचा ना. हाकानाका
लाखो प्रतिसाद यायची भीती आहे
लाखो प्रतिसाद यायची भीती आहे असा धागा काढला तर...
कुणाला?
कुणाला?
चित्रपट वादग्रस्त असला तरिही
चित्रपट वादग्रस्त असला तरिही चित्रपटातली गीते मात्र श्रवणीय आहेत. गाणी रिपीट मोडवर असतात नेहमीच..!
चित्रपटात भलताच सणकी प्रियकर आणि त्याचं भलतंच उत्कट प्रेम दाखवलंय हे मात्र खरं..
बाकी परिक्षण चांगलं लिहिलयं..
चित्रपट वादग्रस्त असला तरिही
--
अतिशय आवडलेला हा चित्रपट.
अतिशय आवडलेला हा चित्रपट. आवडत्या लिस्टीत आहे. शाहिद कपुर मला पैल्यापासुनच आवडतो.
गाणी पण छान आहेत.
शेवटी ती गंगु त्याला भेटली असं दाखवलं नसतं तर अजुनच आवडलं असतं मला.
धाडसी का लिहीलं? ह्या सिनेमात
धाडसी का लिहीलं? ह्या सिनेमात धाडस काय होतं??
>>>>>
असे वाटणे हे आपले मोठेपण. बहुधा आपला धाडसाचा बेंचमार्क हाय असावा. पण सर्वसामान्य मराठी प्रेक्षकांना यात दाखवलेले झेपणार नाही, म्हणून रुचणार नाही, असे मला वाटले, म्हणून तसे शीर्षक दिले.
जबरदस्त चित्रपट आहे हा...
जबरदस्त चित्रपट आहे हा... त्या वर्षीचा सर्वोत्तम चित्रपट... >>>> नक्कीच. म्हणजे मी सगळेच वा फार चित्रपट पाहिले नाहीत म्हणून तुलना करू शकत नाही. तरी एखादा चित्रपट बघून समजते की असा वर्षात एखादाच निघत असावा.
इथे नसेल तर लगेहाथ शाहीद कपूर
इथे नसेल तर लगेहाथ शाहीद कपूर फॅन धागा पण विणून टाकायचा ना.
>>>>>>>>
मला शाहीद कपूर ईश्क विश्क प्यार व्यार आणि येह दिल मांगे मोअर चित्रपटापासूनच आवडायला लागलेला.
फॅन मी त्याचा जब वुई मेट ला झालेलो. जिथे सगळे जण भावखाऊ रोल असलेल्या करीना कपूरवर फोकस करत होते तिथे मला वाटते शाहीदने त्याच्या कारकिर्दीतला सर्वोत्तम परफॉर्मन्स दिला होता. मला शाहीद म्हटले की कालपर्यंत त्यातलाच शाहीद आठवायचा. आजपासून कबीर सिंग आठवेल.
रुपाली धन्यवाद, सस्मित हो,
रुपाली धन्यवाद, सस्मित हो, गाण्यांवर तर वेगळे चार पॅराग्राफ लिहावेसे वाटत होते. पण झोप आलेली.
शेवटी ती गंगु त्याला भेटली असं दाखवलं नसतं तर अजुनच आवडलं असतं मला. >>>>> मलाही हेच दाखवतील असे अपेक्षित होते. हाल हाल होऊन मेला. मित्राच्या आधाराने सुधारला. दुसरी मुलगी आअयुष्यात येत सेटल झाला. दुसरी मुलगीही पळून गेली. यापैकी एखादा शेवट अपेक्षित धरला होता. तरी जो शेवट दाखवला तो मला फार आवडला. धागा काढून झोपायला जायच्या आधी मी पुन्हा शेवट बघून झोपायला गेलो.
ह्या सिनेमाचे उगमस्थान अर्जुन
ह्या सिनेमाचे उगमस्थान अर्जुन रेड्डी मला जास्त चांगला वाटला.
चित्रपट अजिबात च आवडला नाही.
चित्रपट अजिबात च आवडला नाही. पण शाहीद चा परफॉर्म्सन आवडला. गाणी आवडली. शेवट गाण्यामधेच दाखवला हे पण आवडले. शेवटच्या गाण्यात हिरोईन ८० टक्के छोटी हेमामालिनी दिसते.
भिकार सिनेमा
भिकार सिनेमा
पण सर्वसामान्य मराठी
पण सर्वसामान्य मराठी प्रेक्षकांना यात दाखवलेले झेपणार नाही,
जरा ईस्कटून सांगता का काय म्हणायचं आहे ते?
सात च्या आत घरात ह्या चित्रपटात एका आज्जीच्या तोंडी मस्त डायलॉग आहे - हागऱ्या मुत्र्या प्रश्नांना डिप्रेशन म्हणायचं आणि मग सिगारेटी ओढायच्या आणि दारू प्यायची.
कबीर सिंग शाहिद कपूर साठी
कबीर सिंग शाहिद कपूर साठी पहिला होता. त्याचा अभिनय नेहमीच प्रामाणिक वाटतो.
बाकी त्याच्या अनेक चित्रपटात त्याचे कामाचे क्रेडिट दुसर्या सहकलाकारांना मिळते(जब वुई मेट -करीना, पद्मावत-रणवीर )
यात फक्त शाहिद मुळे प्रेक्षणीय आहे सिनेमा. गाणी पण छान आहेत (बेखयालि माझे आवडते)
(शाहिद चा अभिनय 'हैदर' आणि 'विवाह' या दोन्ही चित्रपटात मध्ये खूप वेगळा आहे पण दोन्ही आवडले.
राजश्री प्रॉडक्शनचा ' प्रेम' नावाचा हिरो सलमान नंतर शाहिदच शोभतो.) हेमवैम. शाहिद फैन धागा असेल तर तिकडे टाकते.
सर्वसामान्य मराठी
सर्वसामान्य मराठी प्रेक्षकांना यात दाखवलेले झेपणार नाही, म्हणून रुचणार नाही, असे मला वाटले>> मराठी प्रेक्षक अजुनही 'हळद फसली कुंकु रुसले' टाईप पिक्चरांमध्ये रमले आहेत असे वाटते का तुम्हाला.
अरे हालहाल होऊन मेला कशाला
अरे हालहाल होऊन मेला कशाला पाहिजे? जे काही घडलं ते घडलं. एका पॉइंटला मुव्हॉन झाला हे पण छान होतं.
गाण्यांत मला बेखयाली पेक्षा बाकी गाणी आवडतात.
तु पहला पहला प्या है मे रा.....
आता ऐकावी लागतील.
ह्या सिनेमाचे उगमस्थान अर्जुन
ह्या सिनेमाचे उगमस्थान अर्जुन रेड्डी मला जास्त चांगला वाटला. >>> पण तो तेलगूत आहे ना? की हिंदीत डब आहे? त्याचे गाणे यूट्यूबर पाहिलेले, जवळपास फ्रेम टू फ्रेम कॉपी वाटले.
शेवटच्या गाण्यात हिरोईन ८०
शेवटच्या गाण्यात हिरोईन ८० टक्के छोटी हेमामालिनी दिसते. >>> हे रोचक निरीक्षण आहे. तरी मी विचार करत होतो की एवढा एक्प्रेशनलेस वावर असूनही एक काहीतरी गोडवा तिच्या चेहर्यात दिसत होता. बहुतेक तो हाच हेमा फॅक्टर असावा
भिकार सिनेमा > नक्की काय
भिकार सिनेमा > नक्की काय भिकार हे ईलॅबोरेट करता येईल का?
सात च्या आत घरात ह्या
सात च्या आत घरात ह्या चित्रपटात एका आज्जीच्या तोंडी मस्त डायलॉग आहे - हागऱ्या मुत्र्या प्रश्नांना डिप्रेशन म्हणायचं आणि मग सिगारेटी ओढायच्या आणि दारू प्यायची.
>>>>>>
आपण अजून सातच्या आत घरातचा नियम मोडणे म्हणजे क्रांती यातच अडकून आहोत
प्रेमाचा ब्रेक अप, प्रेयसीचा तिच्या मनाविरुद्ध विवाह - हा हगरा मुतरा प्रश्न आहे? (आज्जींनी हागर्या मुतर्या असाच घाणेरडा शब्द वापरलेला का?)
बाकी ब्रेक अप झाले की व्यसनांच्या आहारी जाणे हे देवदासाच्या काळापासून चालत आले आहे.
नक्की काय भिकार हे ईलॅबोरेट
नक्की काय भिकार हे ईलॅबोरेट करता येईल का? > just google ''kabir singh toxic masculinity''.
एका पॉइंटला मुव्हॉन झाला हे
एका पॉइंटला मुव्हॉन झाला हे पण छान होतं. >>>> मूव्ह ऑन म्हणजे व्यसनांतून बाहेर पडलेला. मुलगी मिळायच्या आधी हे झाले हे छानच दाखवले. पण तरी सुखी नव्हताच. गुंतलेले मन पुर्णपणे बाहेर पडले नव्हतेच. कितीही म्हटले तरी पुढे काय हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात ठुसठुसत राहतोच. आणि बरेचदा अश्या चित्रपटांत तो तसाच ठेवतात वा देवदाससारखे मारून टाकून प्रश्न कायमचा निकाली लावतात.
बाकी तिच्या पोटातील मुलगा त्याचा दाखवला नसता आणि ती मनाविरुद्ध लग्न झालेल्या नवर्याबरोबर खुश नाही म्हणून त्याला सोडून याच्याकडे परत आलेली दाखवली असते तरी चालले असते. तिला अनटच म्हणजेच सो कॉल्ड पवित्र दाखवायचा अट्टाहास करायची गरज नव्हती. तिथे थोडे धाडस कमी पडले.
just google ''kabir singh
just google ''kabir singh toxic masculinity''
>>>
त्या आधी मला व्हॉट ईज toxic masculinity हे गूगल करावे लागेल. ज्यात अश्याच तांत्रिक ईंग्लिश शब्दांचा भडीमार असलेले पॅराग्राफ सापडतील. तर तुम्हीच याचा अर्थ सांगितला तर आवडेल. जर एखाद्या चित्रपटानिमित्त काही नवीन माहीती समजत असेल तर स्वागतच आहे.
मराठी प्रेक्षक अजुनही 'हळद
मराठी प्रेक्षक अजुनही 'हळद फसली कुंकु रुसले' टाईप पिक्चरांमध्ये रमले आहेत असे वाटते का तुम्हाला.
>>>>
अगदीच असे नाही, पण दिल्ली कल्चर आणि महाराष्ट्र कलचर वेगळे आहे. पिक्चर बनवताना सर्वांना झेपेल असा बनवला जातो. जर तिथल्या कल्चरकडे जास्त झुकणारा असेल तर ईथल्यांना ते पचनी पडत नाही.
साधे समांतरचे उदाहरण घ्या. चार आठ शिव्या काय दाखवल्या तर मराठी कुटुंबात कुठे एवढ्या शिव्या दिल्या जातात म्हणून लोकं ओरडा करत आहेत
मी तेलुगु मधे पाहिला होता पण
मी तेलुगु मधे पाहिला होता पण नंतर कधीतरी सेट मैक्स कि कुठल्याशा हिंदी चैनलवर पण आला होता हिंदीमधे.
ते गुगलल्यावर सुरुवातीलाच
ते गुगलल्यावर सुरुवातीलाच सविस्तर विवेचन असलेली चित्रपट परीक्षणे आहेत. त्यातली एखाद दोन नजरेखालून घातल्यास मी भिकार विशेषण का वापरले ते कळले असते. तरीही सोप्या शब्दात समजून घ्यायचे असल्यास इथे "स्त्रियांना बळजबरी आवडते" अशा आशयाचा छान धागा आहे जो तुम्ही वाचलेला असणारच.
बाकी वरती सगळ्यांनी त्यांना आवडला/नावडला असे मत दिलेले पाहून मी माझे एका शब्दात वैयक्तिक मत नोंदवले. त्याचे कारण विचारले तर ते दोन शब्दात दिले एवढेच. सोशल मीडिया म्हटल्यावर सगळ्यांची मते/आवडीनिवडी सारख्या थोडी असणार ?
मृणाली ओके, बघतो तो धागा
मृणाली ओके, बघतो मिळतेय का हिंदी वर्जन ऑफ तेलगू चित्रपट
@ जिद्दू, आपले मत पटेल न पटेल, ते खोडावेसे वाटेल न वाटेल, पण त्याचा आदर आहेच. एक दोन शब्दात देण्याऐवजी ईलॅबोरेट करा ईतक्यासाठीच म्हणालो की एक नवा दृष्टीकोण समजतो. कदाचित मी त्या दृष्टीकोणातून चित्रपट पाहिला नसेल वा मला तो जाणवला नसेल.
इथे "स्त्रियांना बळजबरी आवडते" अशा आशयाचा छान धागा आहे जो तुम्ही वाचलेला असणारच.
>>>>>>
मी मधल्या काळात वर्षभर नव्हतो. बहुधा हा कबीर सिंगच्याच रीलीजचा काळ असावा. जर वरील चर्चा त्या काळात त्या निमित्तानेच झाली असेल तर मी नसेन. आणि हो, मी नुसते वाचत नाही. लिहितोही. जर त्यावर माझी पोस्ट नसेल तर मी अब्सेंट होतो तेव्हा समजा. धागा नेमका शोधून कोणी देईल का? कारण धाग्याचा विषय रोचक वाटत आहे. एकेकाची मते वाचायला आवडतील.
Pages