कुमारी मातृत्व आणि पुढील अवघड वाटा - कोणाशी तरी बोलायचंय

Submitted by शूजिता on 27 August, 2021 - 06:10

नमस्कार,
दीड महिन्यापुर्वी माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा एक फोन आला आणि ती जी हुंदके देत देत मला सांगत होती ते ऐकून मी एकदम स्तंभित झाले. तिची मुलगी फक्त २० वर्षाची. आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला. दिसायला सावळी पण फारचं गोड कुणाच्याही नजरेत भरणारी. कमालीची शांत आणि अगदी निरागस वाटणारी. तिची आई म्हणजे माझी मैत्रिण तिला एकुलती एकचं कन्या. त्या मुलीला दिवस गेलेत आणि ती घरुन पळून गेली. साडेसहा महिन्याची गरोदर मुलगी आणि माझ्या मैत्रिणीच्या हे लक्षात आले नाही. मुलगी वाढत्या वयानुसार शारिरिक बदल तिच्यात होत आहेत असेचं तिला वाटले. त्यामुळे गरोदर पणात स्त्रिला जी गोलाई येते त्याकडे तिने कानाडोळा केले. कुठल्याचं आईला आपल्या अविवाहित मुलीच्या अंगावरचे वाढलेले मास पाहून असे वाटणार नाही की ती गरोदर आहे. तिथे माझी मैत्रिण फसली बिचारी.

पाच दिवसानंतर खूप प्रयत्नानंतर शेवटी पोलिस जागे झाले आणि त्यांनी मदत केली. मुलगी परत मिळाली. एका छोट्याशा झोपडीत एका मुलाबरोबर होती. तो तिचा प्रियकर. एकदम सडकछाप मवाली मुलगी. चवथा वर्ग नापास. वय २२ वर्ष. मुली पटवायला एक नंबर आणि लफडेखोर. ह्या मुलाच्या तावडीत इतक्या चांगल्या घरची मुलगी फसली. तिचे त्याच्यावर प्रेम जडले पण त्याने फक्त तिचे शारिरिक शोषण केले.

संसार तसाचं सोडून माझी मैत्रिण दुसर्‍या शहरात गेली. तिथे एक बी एच के शोधले. गर्भपात व्हावा म्हणून वणवण भटकली पण इतक्या उशिरा आता ते शक्यचं नव्हते. आता तिची मुलगी ९ व्या महिन्यात प्रदार्पण करेल. इतक्या शांत मुलीच्या मनात केवढे काय काय साचून होते हे ती आता व्यक्त करते आहे. मी आत्ता तिच्याकडे एक दोन दिवस राहायला आले आहे. तिला आधार मिळावा म्हणून आणि काही मदत करता यावी म्हणून.

मुलीला हे मुल दत्तक द्यायचे नाही. किंबहूना मुल जन्माला घालून आपले आईवडील नाईलाजाने आपले लग्न ह्या मुलीशी लावून देतील ही तिची योजना होती. पण तिला माहिती नाही हे प्रकरण किती दाहक आहे.

मी इथे येऊन विचारणा केली. जिथे तिची प्रसूती ठरली आहे त्या डॉक्टरांना आमची फारचं किव आली आणि त्यांनी हमी दिली की त्या एका एन. जी. ओ. कडून हे मुल दत्तक देण्याची सोय करतील आणि ह्यात जिचे मुल आहे तिची सही लागणार नाही. तसेही अशी मुले बेवारस सापडतात. कचर्‍यात, गटार्‍यात, नदीच्या वाहत्या पाण्यात, देवळात, अनाथालयाच्या दारात, कुण्याच्या ओट्यावर, कुणाच्या अंगणात!! कुंतीनेही कर्णाला वाहत्या पाण्यात सोडलं होतं. आपण तर साधी माणसे. ह्या भावना जाऊ देत.. पण मुल दत्तक दिल्यावर ही मुलगी किती आकांत मांडेल? ती जगू देईल का तिच्या पालकांना? तिचे पुढील शिक्षण पुर्ण करु शकेल का? परत तिचे लग्न होईल का? वय फक्त २० आहे मुलीचे तर अजून १० वर्ष वेळ आहे तिला तोवर ही घटना पुसली जाईल. तिचे भले होऊ शकेल. पण मुलीने परत असेचं थेर केलेते? परत ती तेथून पळून परत त्या मुलाकडे गेली तर? मुलगा लग्न करायला तयार आहे म्हणाला पण नक्कीचं लायक पात्र नाही. मग अशा मुलाशी लग्न करुन काय उपयोग. शिवाय, अशी हार पत्करुन आपण समाजाला काय शिकवण देत आहोत? जर आपण हे मुल तिला दिले आणि तिला त्या मुलाशी लग्न करु नाही दिले तर चालेल का? असे एक नाही अनेक विचार आम्हि दोघीनी बोलताना मांडले.

मी इथे फार लिहित वा वाचत नाही. पण अचानक मला मायबोली आठवली आणि वाटलं इथे आपण मत मांडून बघावे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

All well that ends well.
पुढील वाटचालीस शुभेच्छा!! + १२३४५६७८९
सस्मित +१२३४५

बरं वाटलं तुमची आत्ताची पोस्ट वाचून! गोष्टी मार्गी लागल्या आणि कुठेही गैरमार्गाचा वापर करावा लागला नाही हे अजूनच छान! सर्वांना शुभेच्छा!
जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा या साऱ्यातून गेल्यानंतर तुम्हाला इतरांना काही do's and don'ts सांगायचे असतील तर ते जरूर लिहा.

बरं वाटलं मार्ग निघाला वाचून!
खरं तर काही देणंघेणं नाही संबंध नाही तरी काय झालं असेल असा कधीतरी डोक्यात विचार यायचा... इथे कळवलंत ते चांगलं केलं.... थोडक्यात जरूर लिहा.

सुस्कारा सोडला, सगळं नीट व्यवस्थित मार्गी लागलं हे वाचून.
लेख वाचल्यापासून, मनाला कुरतडत होता..!

छान वाटले तुमचे अपडेट्स वाचून! मुलीला आणि बाळाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा! तुम्ही या कुटुंबाच्या पाठीशी कठीण प्रसंगात उभ्या राहिलात म्हणून तुमचे खूप कौतुक.

>>जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा या साऱ्यातून गेल्यानंतर तुम्हाला इतरांना काही do's and don'ts सांगायचे असतील तर ते जरूर लिहा.>> +१

छान वाटले तुमचे अपडेट्स वाचून! मुलीला आणि बाळाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा! तुम्ही या कुटुंबाच्या पाठीशी कठीण प्रसंगात उभ्या राहिलात म्हणून तुमचे खूप कौतुक. <<< ++1

छान वाटले तुमचे अपडेट्स वाचून! मुलीला आणि बाळाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा! तुम्ही या कुटुंबाच्या पाठीशी कठीण प्रसंगात उभ्या राहिलात म्हणून तुमचे खूप कौतुक. >> +१

छान वाटले तुमचे अपडेट्स वाचून! मुलीला आणि बाळाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा! तुम्ही या कुटुंबाच्या पाठीशी कठीण प्रसंगात उभ्या राहिलात म्हणून तुमचे खूप कौतुक. >>> अगदी अगदी.

सगळे प्रतिसाद नाही वाचले, पण जे वाटले ते लिहिते आहे.
खरे / खोटे / का या सगळ्याला आता अर्थ नाही झाले ते अन वाईंड करता येणार नाही पण -
जर शक्य असेल तर दुसरी कडे शिफ्ट व्हावे. होणारे मुल तुमच मै ने दत्तक घ्यावे सो नविन ठिकाणी कोणी जास्त प्रश्न विचारणार नाही. आणि मुलिला शिकुन करियर करु द्यावे. अजुन काही काळाने जेंव्हा ती सेटल होईल तेंव्हा परत बसुन विचार करावा. फक्त एक पाळावे शक्य असेल तर याची वाच्यता सध्या तरी न करता मुल मै ने दत्तक घेवुन मुलिला मानसिक आधार द्यावा.

तुमचा विचार खुप फलातू आहे. सावली म्हणून मुलगी म्हणालीस. सावली गोरी म्हंजे काय अस्ते. आधी डॉक्टरांकडे जा. आणि चेकअप करा

या कथेचा शेवट चांगला झाला (असे कथा लेखिकेने नमूद केले आहे ) पण या कथेत ती मुलगीच फार फार हुशार,कठोर आणि मनमानी वाटली म्हणजे एवढं सर्व तिच्याबाबतीत झाले त्याबद्दल तिला काहीच गिल्ट वाटले नाहि पण तिने तिच्या अवती भवतीच्या लोकांना चांगलेच टांगून ठेवले तेही एका छपरी निब्बा साठी। ऐन लोकडाऊन काळात घडलेली हि घटना म्हणजे आई वडील पण घरीच असतील शिवाय कोविडच्या काळात मुलगी फार वेळ कधी घराबाहेर पडली नाही. चार पाच वेळा गेली असेल फक्त. कोविड काळात तर चांगली बॉण्डिंग व्हायला पाहिजे होती आई वडिलांची, चांगल्या वेब सिरीज बघायच्या सोडून रियल जीवनाचीच वेब सिरीज बनविली। मुलाकडे नको त्या अवस्थेतले फोटो आहेत हे मुलीला माहित असूनही तिला तो आवडतो त्याला कागदपत्र बनविण्यासाठी व इतर खर्च करण्यासाठी हि पैसे पुरवते म्हणजे कठीणच आहे सगळे, एवढा मनमानी कारभार. आई वडिलांनी आपल्या बिझी शेड्युल मधून थोडातरी वेळ मुलींसाठी काढून 'नाही' या शब्दाचा योग्य अर्थ समजावयाला हवा होता. मुलगी २० वर्षाची असून सुद्धा तिला भल्या बुऱ्याची समज नाही म्हणजे तिला लहान पनापासून ऐदी आणि हेकेखोर बनवून ठेवले आहे ती आपले तेच खरे करतेय।
Aai – Mayecha कवच या सिरीयल मध्ये ती मुलगी स्वतःच्या प्रेमात इतकी आहे कि आईला धडा शिकवण्यासाठी ती किती छक्के पंजे करते एवढे छक्के पंजे तिने स्वतःचे जीवन सुधारण्यास लावले असते असे दाखवले तर ती कोणीतरी मोठी इंटरप्रुनर किंवा मोठी आसामी होऊ शकली असती पण नाही आई शिस्त लावते म्हणजे आपल्यावर निर्बंध घालते हेच मनात बिंबले गेल्याने तिची अवस्था इतकी बिकट झालीय कि ती ICU मध्ये भरती आहे, आणि आई तिच्या जीवासाठी झगडते आहे .

कोतबो मध्ये फक्त एकच बाजू मांडलेली असते.. प्रत्येकाला वाटते तेच बरोबर.. त्या मुलाचीही बाजू असेल..

आनंदी शेवट झाला हे उत्तम. खूप लोकांनी कळकळीने सल्लले आणि आधाराच्या पोस्ट लिहिल्या आहेत ह्या धाग्यावर. त्यांच्या साठी तरी धागाकरतीने नक्की काय मार्ग मिळाला हे थोडक्यात सांगायला हरकत नाही. शिवाय दुर्दैवाने इतर कोणी कधी अशा परिस्थितीत सापडले तर त्यांनाही मदत होईल.

कोतबो मध्ये फक्त एकच बाजू मांडलेली असते.. प्रत्येकाला वाटते तेच बरोबर.. त्या मुलाचीही बाजू असेल..

Submitted by च्रप्स on 18 April, 2022 - 09:20

त्या मुलाची बाजू सांगायला त्याच्या आईची मैत्रीण मायबोलीवर कुठेय ?????

मी हा धागा सुरवातीपासूनच वाचत होतो. त्या मुलाचे वर्णन वाचूनच मनात '** ***' ची शंका आली होती. मात्र विषय नाजूक असल्याने धागा भरकटू नये तसेच admin महोदयांची वक्रदृष्टी माझ्यावर पडू नये म्हणून काहीही प्रतिसाद दिला नाही.
या घटनेतून आपण सर्वांनीच बोध घेणे आवश्यक आहे. खासकरून तरुण मुलींनी. उगाच एखाद्या मुलाशी प्रेमाचे नाते जोडायला जाऊ नये. ज्या आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे ते योग्य त्या वेळी लग्न लावून देतीलच यावर विश्वास ठेवावा. स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याकडे, करिअर करण्याकडे लक्ष द्यावे.

Shakespeare said, "Journeys end in lovers meeting."

It was Shakespeare who also said, "Love is blind."

शेवट चांगला झाला हे वाचून बरे वाटले.

<< खासकरून तरुण मुलींनी. उगाच एखाद्या मुलाशी प्रेमाचे नाते जोडायला जाऊ नये. ज्या आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे ते योग्य त्या वेळी लग्न लावून देतीलच यावर विश्वास ठेवावा. >> हे पचवायला जरा कठीण आहे. एक तर प्रेम होतं ते असं रॅशनल विचार करून होत नाही. दुसरं म्हणजे सर्व तरुण मुलींना बावळट समजू नये, स्वतःचे हित कशात आहे ते त्यांना बरोबर कळतं अश्या काही केसेस अपवाद म्हणून असल्यातरी.

<< शेवट चांगला झाला हे वाचून बरे वाटले.
<< खासकरून तरुण मुलींनी. उगाच एखाद्या मुलाशी प्रेमाचे नाते जोडायला जाऊ नये. ज्या आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे ते योग्य त्या वेळी लग्न लावून देतीलच यावर विश्वास ठेवावा. >> हे पचवायला जरा कठीण आहे. एक तर प्रेम होतं ते असं रॅशनल विचार करून होत नाही. दुसरं म्हणजे सर्व तरुण मुलींना बावळट समजू नये, स्वतःचे हित कशात आहे ते त्यांना बरोबर कळतं अश्या काही केसेस अपवाद म्हणून असल्यातरी. >>

------- या केसला पण अपवाद का म्हणायचे? आपल्याला एकच बाजू वाचायला मिळते आहे, मुलाची बाजू कोण मांडणार , कशी कळणार?

आई- वडिलांनी मुलांना/ मुलींना चांगले शिक्षण आणि जोडीला आर्थिक स्वावलंबनाचे धडे द्यावे. त्यांना त्यांचे मार्ग (शैक्षणिक शाखा, नोकरी, काम धंदा, जोडीदार ) निवडण्याचे स्वातंत्र द्यावे. सल्ला विचारला तर जरुर द्यावा, त्यांनी तो मानायलाच हवा असेही नाही. त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या इच्छेने जगू द्या.

या केसला पण अपवाद का म्हणायचे? आपल्याला एकच बाजू वाचायला मिळते आहे, मुलाची बाजू कोण मांडणार , कशी कळणार? >> या बाबतीत तुमच्याशी सहमत आहे.

आनंदी शेवट झाला हे उत्तम. खूप लोकांनी कळकळीने सल्लले आणि आधाराच्या पोस्ट लिहिल्या आहेत ह्या धाग्यावर. त्यांच्या साठी तरी धागाकरतीने नक्की काय मार्ग मिळाला हे थोडक्यात सांगायला हरकत नाही. >> +123

संकटात असताना इतके डिटेल्स दिलेले शुजिता यांनी.. तर आता मार्ग काय निघाला याविषयीसुद्धा (पूर्वीइतकीच गोपनीयता कायम ठेवून) थोडं सविस्तर लिहायला काय हरकत आहे?

या धाग्याला सपोर्ट करणारे अनेकजण म्हणत होते की भविष्यात कोणालातरी या धाग्याचा/ सल्ल्यांचा उपयोग होऊ शकतो. तर मग शेवटी काय आणि कसे वर्कआऊट झाले ते तर लिहा शुजिता मावशी.

नमस्कार

मी नवीन प्रतिसाद वाचलेत. जेंव्हा ह्या परिस्थितीतून जात होते तेंव्हा खूप ठिकाणी लिहिले जसे इथे लिहिले. अनेकांशी बोलले. मार्ग काय आणि कसा काढावा ह्यात अगदी हरवून गेले होते. खूप वाईट अवस्था होती त्यावेळी माझी, माझ्या मैत्रिणीची आणि तिच्या घरच्यांशी. मी मागिल महिन्यात पोलिसांना भेटले. त्या मुलाला तिथे बोलावले. त्याच्या एकून १०३ फेक इन्स्टाग्राम आयडी त्याने दाखवल्यात. तो मिळेल त्या मुलीची बाईशी वैश्येशी फक्त शरिरसुख मिळावे ह्या भावनेतून बघतो. त्याला प्रेम काय माहिती नाही. त्याची आई एक वैश्या स्त्रि आहे. ती काय मत मांडेल तिच्या मुलाबद्दल. ती पोलिस चौकीत मला भेटली होती. पोलिसांसमोर तिला उभे करण्यात आले होते. बाईला अंग झाकणे काय म्हणतात तेही माहिती नव्हते. उघडी मोकळी छाती पदर ढाळून उभी होती की एक बाई म्हणून मला लाज वाटत होती तिच्यापुढे. अशी नीच बाई जी देह विक्रि करुन जीवन जगते ती तिच्या मुलाला काय संस्कार देईल आणि त्याची काय बाजू मांडेल. त्याच्या १०३ ईन्स्टा आयडीवर फक्त लफडी होती. बाकी काहीही नव्हते. माझ्या मैत्रिणीच्या मुलीला हे सर्व खूप आधी माहिती होते पण तरीही त्याच्याकडे ओढली गेली. त्याला कारण तिचे कोवळे वय आणि त्या कोवळ्या वयात तिला त्या मुलाने शरिरसुखाची लावलेली चटक. तो मुलगा त्याचे आईबाबा घरात असताना हिला बोलवायचा आणि तिच्याशी गैर प्रकार करायचा. कुठले आईवडील मुलाचे हे थेर स्विकारतील. ही सर्व लोक गुन्हेगार आहेत. ह्यांना शिक्षा व्हायला हवे. पण जाऊ दे निदान चार पाच वेळा पोलिसांनी त्याला पडकून धरुन हाणले आणि धमकी दिली हेहे नसे थोडके. माझी मैत्रिण सतर्क आहे. तिला मी गाईड करते आहे. कधी ऐकते कधी धीर खचतो तिचा. पण मी तिला डोळस व्ह्यायला शिकवते. हळूहळू ह्यातून आपण बाहेर येतो आहे असा एक विश्वास वाटतो आहे. वेळ लागेल पण शेवटी आपल्या चांगल्या हेतूने केलेल्या प्रयत्नांना नक्की यश येईल.

कथानक चांगले आहे. मैत्रीण म्हणजे कथेची नायिका. इथल्या शेकडो प्रतिसादांतून कथा कशी पुढे नेता येयील याच्या विविध कल्पना एव्हाना आपल्याला आल्या असतीलच. आपल्या पटकथेस शुभेच्छा.
एक आगंतुक सुचवणी:
कोणतीही स्त्री मग ती वेश्या असुदे नाहीतर दुसरी कुणीही, ती पोलीस स्टेशन मध्ये उघडी मोकळी छाती पदर ढाळून कधीच उभी राहणार नाही. एक स्त्री आहे ती. त्यामुळे तो प्रसंग तेवढा पुन्हा लिहा.

>>>
अशी नीच बाई जी देह विक्रि करुन जीवन जगते ती तिच्या मुलाला काय संस्कार देईल
> >>>
हे अगदीच खटकलं....
असा कुठचाही मुलगा आपल्या मुलीला चळवू शकलाच कसा याचं परीक्षण सुद्धा आईवडीलांनी करणे गरजेचे आहे

आपण उत्तम संस्कार दिलेले असताना सुद्धा आपली मुलगी वयामुळे चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी आकर्षित होऊ शकते‌ - तर त्या मुलाच्या बाबतीतही असं काही असू शकेल ही शक्यता उरतेच - त्याच्या दोषांचा भार आई-वडिलांच्या डोक्यावर कशाला?

जर त्या मुलाचे इतके सगळे इंस्टाग्राम अकाउंट केवळ वेगवेगळ्या मुलींना फसवण्यासाठी काढलेले होते,‌‌आणि हे त्या मुलीला माहित असूनही ती केवळ शरीरसुखासाठी त्याच्याकडे जायला तयार होती - तर या मुलीच्या वैचारिक ताकदीविषयी संशय घ्यायला जागा आहे - यानंतर असा कोणताही इतर विचार तिच्या हातून होऊ नये यासाठी तिचं मन कोणत्या पॉझिटिव गोष्टीत गुंतवणे‌ /गरजेप्रमाणे समुपदेशन / तिला तिच्या जबाबदारीची जाणीव करून देऊन मग आतापर्यंत झालेल्या चुकांचे काही परिणाम तरी स्वतः भोगायला लावणे / मुळात एवढा अविचार तिने का केला याचा धांडोळा घेणे या गोष्टी तुम्ही केल्या असाल अशी आशा करते

लहान वयात झालेल्या चुकी तुन बाहेर येण्यासाठी तिने एक्झॅक्टली काय केलं हे लिहिलं तर दुर्दैवाने अशा इतर कोणी अडकलेल्या मुलांना त्याचा उपयोग होऊ शकेल

वेश्या असण्यात नीचपणा नाही. वेश्या प्रामाणिकपणे पोट भरतात. चोरीमारी करत नाहीत. वेश्याव्यवसाय कायदेशिर झाला पाहीजे खरं तर. असो. तो विषय नसल्याने लिहीत नाही.

Pages