कुमारी मातृत्व आणि पुढील अवघड वाटा - कोणाशी तरी बोलायचंय

Submitted by शूजिता on 27 August, 2021 - 06:10

नमस्कार,
दीड महिन्यापुर्वी माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा एक फोन आला आणि ती जी हुंदके देत देत मला सांगत होती ते ऐकून मी एकदम स्तंभित झाले. तिची मुलगी फक्त २० वर्षाची. आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला. दिसायला सावळी पण फारचं गोड कुणाच्याही नजरेत भरणारी. कमालीची शांत आणि अगदी निरागस वाटणारी. तिची आई म्हणजे माझी मैत्रिण तिला एकुलती एकचं कन्या. त्या मुलीला दिवस गेलेत आणि ती घरुन पळून गेली. साडेसहा महिन्याची गरोदर मुलगी आणि माझ्या मैत्रिणीच्या हे लक्षात आले नाही. मुलगी वाढत्या वयानुसार शारिरिक बदल तिच्यात होत आहेत असेचं तिला वाटले. त्यामुळे गरोदर पणात स्त्रिला जी गोलाई येते त्याकडे तिने कानाडोळा केले. कुठल्याचं आईला आपल्या अविवाहित मुलीच्या अंगावरचे वाढलेले मास पाहून असे वाटणार नाही की ती गरोदर आहे. तिथे माझी मैत्रिण फसली बिचारी.

पाच दिवसानंतर खूप प्रयत्नानंतर शेवटी पोलिस जागे झाले आणि त्यांनी मदत केली. मुलगी परत मिळाली. एका छोट्याशा झोपडीत एका मुलाबरोबर होती. तो तिचा प्रियकर. एकदम सडकछाप मवाली मुलगी. चवथा वर्ग नापास. वय २२ वर्ष. मुली पटवायला एक नंबर आणि लफडेखोर. ह्या मुलाच्या तावडीत इतक्या चांगल्या घरची मुलगी फसली. तिचे त्याच्यावर प्रेम जडले पण त्याने फक्त तिचे शारिरिक शोषण केले.

संसार तसाचं सोडून माझी मैत्रिण दुसर्‍या शहरात गेली. तिथे एक बी एच के शोधले. गर्भपात व्हावा म्हणून वणवण भटकली पण इतक्या उशिरा आता ते शक्यचं नव्हते. आता तिची मुलगी ९ व्या महिन्यात प्रदार्पण करेल. इतक्या शांत मुलीच्या मनात केवढे काय काय साचून होते हे ती आता व्यक्त करते आहे. मी आत्ता तिच्याकडे एक दोन दिवस राहायला आले आहे. तिला आधार मिळावा म्हणून आणि काही मदत करता यावी म्हणून.

मुलीला हे मुल दत्तक द्यायचे नाही. किंबहूना मुल जन्माला घालून आपले आईवडील नाईलाजाने आपले लग्न ह्या मुलीशी लावून देतील ही तिची योजना होती. पण तिला माहिती नाही हे प्रकरण किती दाहक आहे.

मी इथे येऊन विचारणा केली. जिथे तिची प्रसूती ठरली आहे त्या डॉक्टरांना आमची फारचं किव आली आणि त्यांनी हमी दिली की त्या एका एन. जी. ओ. कडून हे मुल दत्तक देण्याची सोय करतील आणि ह्यात जिचे मुल आहे तिची सही लागणार नाही. तसेही अशी मुले बेवारस सापडतात. कचर्‍यात, गटार्‍यात, नदीच्या वाहत्या पाण्यात, देवळात, अनाथालयाच्या दारात, कुण्याच्या ओट्यावर, कुणाच्या अंगणात!! कुंतीनेही कर्णाला वाहत्या पाण्यात सोडलं होतं. आपण तर साधी माणसे. ह्या भावना जाऊ देत.. पण मुल दत्तक दिल्यावर ही मुलगी किती आकांत मांडेल? ती जगू देईल का तिच्या पालकांना? तिचे पुढील शिक्षण पुर्ण करु शकेल का? परत तिचे लग्न होईल का? वय फक्त २० आहे मुलीचे तर अजून १० वर्ष वेळ आहे तिला तोवर ही घटना पुसली जाईल. तिचे भले होऊ शकेल. पण मुलीने परत असेचं थेर केलेते? परत ती तेथून पळून परत त्या मुलाकडे गेली तर? मुलगा लग्न करायला तयार आहे म्हणाला पण नक्कीचं लायक पात्र नाही. मग अशा मुलाशी लग्न करुन काय उपयोग. शिवाय, अशी हार पत्करुन आपण समाजाला काय शिकवण देत आहोत? जर आपण हे मुल तिला दिले आणि तिला त्या मुलाशी लग्न करु नाही दिले तर चालेल का? असे एक नाही अनेक विचार आम्हि दोघीनी बोलताना मांडले.

मी इथे फार लिहित वा वाचत नाही. पण अचानक मला मायबोली आठवली आणि वाटलं इथे आपण मत मांडून बघावे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीम्बा यांनी दिलेल्या त्रिसूत्रीप्रमाणे कायद्याने करता आले तर परिस्थिती थोडी तरी आटोक्यात आणता येईल. मुलगी आणि प्रियकर यांच्या या लग्नानंतर पालकांकडून काही अवास्तव अपेक्षा असतील तर त्यांना ते अशक्य आहे याची समज येईल. आर्थिक सोय होणार नाही, त्याकरता पालकांना वेठीस धरता येणार नाही हे कळल्यावर मुलगी आणि प्रियकर यांची लग्नाची भूमिका तेवढीच ठाम राहते का पहा.

मुलगी म्हणतेय ते पुरावे नेमके कुठे आहेत (आणि ते खरच सक्षम आहेत का ?) कारण प्रियकराचा फोन पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलाय. त्यात जे काही ऑडिओ, व्हिडिओ, फोटो, सोशल मीडिया content आहेत त्याविषयी विरुद्ध पक्षाकडून तक्रार होत नाही तोवर पोलीस कायद्याने फार काही करू शकत नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. ( उलट प्रियकर मुलीचे ऑडिओ ऐकवून मुलीचा सक्रिय सहभाग सिद्ध करत आहे.) मुलीचा फोनही पालकांकडे आहे. त्यात काय आहे हे एव्हाना त्यांना समजले असेल. त्यामुळे रातोरात तो गजाआड होईल असे नेमके तिला काय माहीत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. बरे हे जे काही तिला माहिती आहे ते माहीत असूनही ती त्याला साथ द्यायची म्हणतेय. जर मुलाचे इतर मुलींसोबत अशाच प्रकारचे सबंध असतील तर त्यांच्यापैकीही कुणीतरी असे पुरावे उपस्थित करून त्याला गजाआड करू शकेल. अशा वेळेस ती काय करेल?

मुलाकडे सापडलेल्या आक्षेपार्ह चित्रिकरणामध्ये तो स्वतः involve आहे हे सिद्ध करता येईल का ? (म्हणजे त्या विडिओ मधील character म्हणून किंवा व्हिडीओग्राफर/फोटोग्राफर ) म्हणून. कारण ते सिध्द करता आले तरच पोलीस एक गुन्हा म्हणून त्यात हस्तक्षेप करू शकतील. किंवा तुम्हालाही तुमच्या मुलीला आणि इतरही मुलींना जाळ्यात अडकवले जातेय ही बाजू ठामपणे मांडता येईल. निव्वळ फोनवर आक्षेपार्ह content सापडले म्हणून कायदा हातात घेता येणार नाही.

तिच्या व त्याच्या इंस्टा/फेबु अकाउंटवर (जे तिने शेअर केलेले नाही) अजून काही तपशील सापडण्याची शक्यता असेल तर सायबर सेल शी संपर्क करता येईल का?

मुलीच्या इतर मित्र मैत्रिणीकडून काही सुगावा लागू शकतो का ? का कुणास ठाऊक पण असे वाटते की तिला सध्या सामोरे जावे लागत असलेल्या परिस्थितीपेक्षाही इतर कशाचा तरी जास्त तणाव वाटतो आहे आणि ते इतर काहीतरी लग्न करून आटोक्यात येईल असा तिचा समज झाला आहे. राहून राहून मुलीच्या निर्णयाबद्दल पराकोटीचे आश्चर्य वाटत आहे.

मुलगी म्हणतेय ते पुरावे नेमके कुठे आहेत (आणि ते खरच सक्षम आहेत का ?) कारण प्रियकराचा फोन पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलाय. त्यात जे काही ऑडिओ, व्हिडिओ, फोटो, सोशल मीडिया content आहेत त्याविषयी विरुद्ध पक्षाकडून तक्रार होत नाही तोवर पोलीस कायद्याने फार काही करू शकत नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे.

तिचे एक नाही अनेक इण्स्टाग्राम आहेत. तिचे मुख्य बोलणे लिहिणे ईन्स्टावरच चालायचे. त्यातही तिने तो अ‍ॅप कधी इन्स्टाल केला नाही. गुगलवर जाऊन इन्स्टाग्राम उघडायची व लॉगीन करायची. आईला तसेही त्यातले काही कळत नाही. हे ईन्टाग्राम नक्की काय प्रकरण आहे हे तिला आत्ता कळले. मुलीचे सर्व खाते प्रायवेट आहे. नावेपण फार चित्रविचित्र दिलेली आहेत. पासवर्ड बदलावा तर मुलाच्या फोनवर जातो. फार टाईट सेक्युरिट केलेली आहे तिने. तिच्याकडे हेच पुरावे आहेत की जर मुलाने माझ्यासोबत लग्न नाही केले किंवा हे मुल त्याचे नाही असे म्हण्टले तर तिच्याकडे पुरावे आहेत. तिचे सर्व काम योजनाबद्ध आहे. आत्ताही आईला म्हणते तुम्ही माझी प्रसूती करत आहात हे तर आमच्या दोघांसाठी खूप चांगले आहे. नाहीतर इतका खर्च आणि लक्ष कुणी घातले नसते. बाळ आल्यानंतर तिचे प्लानींग तिने करुन ठेवले आहे. एकदम निगरगट्ट शांत मुलगी आहे. आईवडीलांच्या बाजूने मुळीच नाही.

तिचे सर्व काम योजनाबद्ध आहे. आत्ताही आईला म्हणते तुम्ही माझी प्रसूती करत आहात हे तर आमच्या दोघांसाठी खूप चांगले आहे. नाहीतर इतका खर्च आणि लक्ष कुणी घातले नसते. बाळ आल्यानंतर तिचे प्लानींग तिने करुन ठेवले आहे. एकदम निगरगट्ट शांत मुलगी आहे. आईवडीलांच्या बाजूने मुळीच नाही. >>
इतके सगळे स्पष्ट असुनही नक्की कसला आटापिटा करता आहात तुम्ही आणि मुलीचे आईवडील ? इतके करुन मुलीचे चांगलेच होइल याची खरच शाश्वती आहे का ? प्रसुती झाल्यावर मुलगी आईवडीलांच्या विरुद्ध गेली आणि पोलिसांना काही सांगितले तर त्यांनाच गजाआड जावे लागेल ना. वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे आई वडीलांच्या जीवाला दोघांनी मिळुन काही धोका केला तर कितीला पडेल हे प्रकरण.

त्यापेक्षा तिला परत मुलाकडे सोडुन द्या. तुझं तु बघ म्हणुन सांगा आणि एखाद्या प्रायव्हेट डीटेक्टीव्ह एजन्सी च्या मार्फत दोघांवर लक्ष ठेवता येते का बघा ( असे करता येते का माहित नाही. सिरीअल मधे पाहिले आहे ).पडद्याआड राहुन तिला मदत करा. जेव्हा मुलाचे खरे रंग बाहेर पडतील, आयुष्याचे टक्के टोणपे खावे लागतील तेव्हाच ती ताळ्यावर येइल ( जर भुलली असेल तर ) . झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार आहात तुम्ही ?
Let her fight her own battle.
"जर त्या मुलाला सोडुन येणार असशील" तरच आम्ही आहोत एवढाच विश्वास देउ शकता जाताना.

मला माहित आहे की एक आई-बाप म्हणुन आपल्या लेकरांना असे वार्‍यावर सोडणे अवघड आहे पण पाणी गळ्याशी आल्यावर पिल्लांना पण पायाशी घेणार्‍या माकडीणीची गोष्ट आपण सगळेच जाणतो ना...मग जे काही करायचे ते डोळे उघडे ठेवुन होउदेत.

मुलाप्रती परस्पर रिटॅलिएशन टॅक्टिक्स (त्याला पोलिस, कायदा ह्यांच्या कचाट्यात अडकवणे) हे सध्या तरी करू नये असे वाटते.
ह्याचा ऊलटा परिणाम मुलगी तिच्या सुखी संसाराच्या स्वप्नात विघ्ने निर्माण केल्याचे ऊट्टे पुन्हा आई वडिलांशीच वागण्यात काढू शकते.

तिच्या टोकाच्या वागण्याचे जस्टीफिकेशन समजण्यासाठी, मुलीचे वागणे खरेच प्रेमाने पछाडलेले आहे की आई वडिलांना माहित नसलेल्या एखाद्या मेंटल ट्रॉम्यातून ती गेली/जात आहे (जसे दुसरे ब्रेकअप, प्रियजनाचा लॉस, अभ्यासाचा स्ट्रेस, एखादी मानसिक धक्का पोहोचवणारी वाईट वगाणूक), हे प्रेमप्रकरण फक्त तिचा ईमोशन रिस्पॉन्स आहे, तिच्या आजवरच्या जीवनातून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न आहे हे एकदा तपासून बघणार का? अर्थात हे तपासणे तज्ञाचेच काम आहे.

आई वडिलांशिवाय मुलगी अजून कोणाशी ईमोशनली अ‍ॅटॅच्ड आहे का? आजी, आजोबा, मैत्रिण, मावशी, काकू जी तिच्या आणि आई वडिलांमध्ये बफर बनून मुलीची मनस्थिती आणि विचार जास्त चांगले समजून घेऊ शकेल.
मान्य आहे तुम्ही दुरच्या ठिकाणी नेले आहे पण जर अशी मदत शक्य असल्यास 'बातमी पसरेल' ही भिती सोडून तुम्ही ती जरूर घ्यावी.

कुठलाही निर्णय फायनल करतांना आपण फक्त लक्षणांवर मलमपट्टी न करता परिस्थितीच्या मूळ कारणावर ऊपाय करत आहोत आणि असे करतांना अजून जास्त त्रासदायक परिस्थिती जन्माला घालत नाही ना हा चेक अँड बॅलन्स नक्की आजमावून बघा.

हाकलून द्या!
आई वडीलांची पहिली चुक ते त्या वेश्येच्या झोपडीतुन, ती मुलगी स्वतः यायला तयार नसताना तिला घेऊन आले.
सगळं काही वाचल्यावर मी तर असंच म्हणेन की अशा निगरगट्ट, आईवडीलांची पर्वा नसलेल्या मुलीला जा सिमरन जिले अपनी जिंदगी म्हणावे. चांगली किंवा वाईट!तिने प्रियकराबरोबर काही प्लॅन करुन ह्या दोघांचं जीणं हराम करण्याआधी. ती नाचवते हे नाचतात जस्ट नॉट फेयर. तिला तिच्या निर्णयांचे परीणाम भोगुदेत पालकांना नाही.
20 वर्ष म्हणजे लहान नाही. आणि ही तर जास्तच लबाड आहे.
दुसरी चुक बाळंतपण वैगेरे.
लेट हर सफर.
स्वाती2 चे सर्व प्रतिसाद पटलेत.
पालकांना शुभेच्छा!

स्मिता, तू म्हणते आहेस तेच विचार होते सुरवातील पण तिला तेचं हवे होते म्हणून आम्ही नेमके तिच्या विरुद्ध पाऊल टाकले. माझा असा विश्वास आहे की प्रसूती अनुभवल्यानंतर तिच्यात बदल होईल. कारण प्रसूतीतून कुमारी मुलीला जाणे हे फार विदारक असते.

हाकलून द्या!
आई वडीलांची पहिली चुक ते त्या वेश्येच्या झोपडीतुन, ती मुलगी स्वतः यायला तयार नसताना तिला घेऊन आले.
सगळं काही वाचल्यावर मी तर असंच म्हणेन की अशा निगरगट्ट, आईवडीलांची पर्वा नसलेल्या मुलीला जा सिमरन जिले अपनी जिंदगी म्हणावे. चांगली किंवा वाईट!तिने प्रियकराबरोबर काही प्लॅन करुन ह्या दोघांचं जीणं हराम करण्याआधी. ती नाचवते हे नाचतात जस्ट नॉट फेयर. तिला तिच्या निर्णयांचे परीणाम भोगुदेत पालकांना नाही.
20 वर्ष म्हणजे लहान नाही. आणि ही तर जास्तच लबाड आहे.
दुसरी चुक बाळंतपण वैगेरे.
लेट हर सफर.
स्वाती2 चे सर्व प्रतिसाद पटलेत.
पालकांना शुभेच्छा!

सस्मित, चुक जर कुणी केली असेल तर त्या व्यक्तीला मी तरी संधी देते. ह्यात तर ही एकुलती एक कन्या आहे तिच्या आईवडीलांची. त्यामुळे ते दोघे तिला वाचवायचा प्रयन्त करत आहेत. पुढे त्यांना ही गोष्ट भेडसावू नये की त्यांनी काहीच प्रयत्न केले नाही आणि मुलीला पालकांचा सपोर्ट होता आणि आहे हे जाणावायला पाहिजे जेणेकरुन ती त्यांना सपोर्ट करेल. अशी अपेक्षा ठेवली आहे. आईवडील मुलीशिवाय इतके दिवस राहू नसते शकले. देवावर विश्वास आहे नियतीचे पारडे आमच्याबाजूने झुकेल.

माझा असा विश्वास आहे की प्रसूती अनुभवल्यानंतर तिच्यात बदल होईल. कारण प्रसूतीतून कुमारी मुलीला जाणे हे फार विदारक असते. >>

उलट प्रसुतीच्या काळात मुलगा आणि त्याच्या घरचे कसे वागतात यावर तिचे मतपरीवर्तन (होणार असेल तर) होइल. हीच संधी घ्या. पडद्याआड राहुन प्रसुतीला मदत करा (काही मेडीकल ईमर्जन्सी ई उद्भवले तर ).आत्ता तुम्ही जे करता आहात त्याबद्दल ती कधीही तुमची ऋणी राहाणार नाहिये. उलट बरच आहे , आई बाप सगळं करत आहेत अशीच भावना आहे तिची. प्रसुती च्या वेळी आणि नंतर मायेची माणसं जवळं नसणे म्हणजे काय असते याची जाणीव तिला तुम्ही आसपास नसलात तरच कळेल. नाहीतर ती सर्व हक्काने करुन घेतेच आहे आणि तिला काहीही किंमत नाहीये आईवडीलांची.

बापरे बाप, ऐकावे ते नवलच वाटतंय सगळं. सरळ हाकलून द्यावं तिला प्रसुती झाली की, तुझं तु निस्तर म्हणावं . त्या मुलाकडे जाऊन टक्के टोणपे खाऊ द्या तिला. सस्मित यांचा प्रतिसादच पटतोय आता.

त्यापेक्षा तिला परत मुलाकडे सोडुन द्या. तुझं तु बघ म्हणुन सांगा आणि एखाद्या प्रायव्हेट डीटेक्टीव्ह एजन्सी च्या मार्फत दोघांवर लक्ष ठेवता येते का बघा ( असे करता येते का माहित नाही. सिरीअल मधे पाहिले आहे ).पडद्याआड राहुन तिला मदत करा. जेव्हा मुलाचे खरे रंग बाहेर पडतील, आयुष्याचे टक्के टोणपे खावे लागतील तेव्हाच ती ताळ्यावर येइल ( जर भुलली असेल तर ) . झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार आहात तुम्ही ?
Let her fight her own battle.
"जर त्या मुलाला सोडुन येणार असशील" तरच आम्ही आहोत एवढाच विश्वास देउ शकता जाताना.>>> खरंय. हेच करायला हवे. पण ती मुलगी पडद्याआडून मदत करायच्या पण लायकीची वाटत नाहीये एवढे कारस्थानं वाचून. She is adult , let her live her life on her own now, असा स्टॅंड घ्यावा पालकांनी खरंच. I know that's not easy , ,पण काही काळ तरी त्यांनी तिला अक्कल , पश्र्चाताप ( हा कधी होईल असं वाटत नाही, पण तरी) होईपर्यंत कठोर व्हावे.

उलट प्रसुतीच्या काळात मुलगा आणि त्याच्या घरचे कसे वागतात यावर तिचे मतपरीवर्तन (होणार असेल तर) होइल. हीच संधी घ्या. पडद्याआड राहुन प्रसुतीला मदत करा (काही मेडीकल ईमर्जन्सी ई उद्भवले तर ).आत्ता तुम्ही जे करता आहात त्याबद्दल ती कधीही तुमची ऋणी राहाणार नाहिये. उलट बरच आहे , आई बाप सगळं करत आहेत अशीच भावना आहे तिची. प्रसुती च्या वेळी आणि नंतर मायेची माणसं जवळं नसणे म्हणजे काय असते याची जाणीव तिला तुम्ही आसपास नसलात तरच कळेल. नाहीतर ती सर्व हक्काने करुन घेतेच आहे आणि तिला काहीही किंमत नाहीये आईवडीलांची.

हा विचार त्रिवार केला होता पण कुणाचे मन धजावले नाही. फक्त तिला धडा शिकवण्यासाठी त्याच्याकडे पाठवणे अयोग्य वाटले. कदाचित त्यांना हेच हवे असेल. मग ते त्यांना का मिळू द्यावे. कुठल्याही परिस्थितीत मुलीला इतक्या सहजा सहजी त्याच्याकडे पाठवू नये. पालकांना सगळे काही प्रयन्त करुन जर अपयश येत असेल तर तोवर ते कणखर होतील. एकदा पालकांच्या नजरेतून मुलगी उतरली की कदाचित त्यांना हे प्रकरण स्विकारायला मदत होईल. आपण पालकांशी प्रतारणा केली हे तिला कुठेतरी जाणवले तर कदाचित तिचे पाऊल पडता पडता अडकेल.. ती मागे सरेल. आशावाद बाळगत आहे. तो हवाच!

चुक जर कुणी केली असेल तर त्या व्यक्तीला मी तरी संधी देते. >>> माफ करा शूजिता, पण ही चूक वाटत नाहीये, समजून उमजून आई-वडिलांना त्रास देण्यासाठी केलेला प्लान वाटतो. पण तुमचा हेतू आणि द्रुष्टिकोन समजू शकते.

हा विचार त्रिवार केला होता पण कुणाचे मन धजावले नाही. फक्त तिला धडा शिकवण्यासाठी त्याच्याकडे पाठवणे अयोग्य वाटले. कदाचित त्यांना हेच हवे असेल. मग ते त्यांना का मिळू द्यावे. >>

तुमच्या आशेला फळ मिळो इतकेच म्हणु शकते.

रच्याकने : शूजिता, तुम्ही प्लीज वाईट वाटुन घेउ नका पण या धाग्याने फार जास्त negative vibes तयार झाल्यात माझ्या मनात. आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी, राग, चिडचिड ,हताशपणा... सगळंच मिश्रण झालंय मनात. काल बहिणीला या धाग्याबद्दल सांगत होते तर "कशाला असले काही वाचत बसतेस उगीच..फुकटचा मनस्ताप" असा सल्ला मिळाला. त्यामुळे आता या इथे परत येणे नाही.
लवकरात लवकर बाप्पा येउदेत आता. म्हणजे जरा विषय बदलतील.

शूजिता, तुमच्या एक एक पोस्ट्स वाचून त्या मुली ऐवजी आई वडीलांचीच काळजी वाटू लागली आहे. रजेनंतर वडील जेव्हा नोकरीवर रूजू होतील तेव्हा घरात आई एकटीच असणार आहे का या मुलीसोबत? एखाद्या तरूण नातेवाईक व्यक्तीला आईला सोबत म्हणून राहू देत.
समुपदेशक तुमच्या समोर कसे बोलले मुलीशी? Counseling is usually a private conversation.
मुलीला psychiatrist ला पण दाखवा असे वाटले एकूण वर्तन बघता.

मी पण हा धागा आणि प्रतिसाद वाचून खूप हताश झाले होते
क्राईम पेट्रोल आणि पेपर मध्ये काही काही वाचतोच.
शेवटी प्रत्येकाला आपापला क्रॉस स्वतः वाहायचा आहे.
लवकर चांगला मार्ग निघूदे.
मुलीला चूक कळूदे
आणि झालेले मूल हसत खेळत सर्वानी वाढवणे, चांगली नोकरी मुलीने मिळवणे असा याचा चांगला शेवट आपल्याला इथे वाचायला मिळू दे.
सध्या अनेक अविवाहित मुली सुद्धा मूल दत्तक घेऊन वाढवतात. मोठ्यामेट्रो सिटीत फार जास्त लोकांचा विचार न करता चांगले जगणे शक्य असावे.
मुलीला स्किझोफ्रेनिया सदृश काही डिसऑर्डर आहे का हेही तपासावे.

स्मिता मी समजू शकते. मी ह्यातून जाते गेले आहे. ही भिती साहजिक आहे. तरुण वयातील मुलांना सांभाळणे हे एक आव्हान असते. तुमच्या बहुमुल्य वेळेसाठी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. तुमची मुले यशस्वी होवोत आणि आईवडीलांचे नाव उच्च करो!!!

जिज्ञासा, मी ऐकले काही सेशन, सेशन आईवडीलांचेही झाले. मी विनंती केली होती त्यांना मला ती काय म्हणते हे ऐकायचे आहे. त्यांनी मला मदत केली. तिची उत्तरे आणि त्यांचे तिला प्रश्न आणि सल्ले आपण इथे जसे बोलत आहोत तसे वाटले.

माझ्याकडे उत्तम psychiatrist बद्दल माहिती नाही. असेल तर सांगा.

स्मिता,
मुलांच्या भविष्याची काळजी, राग, चिडचिड ,हताशपणा ह्या सगळ्या ईमोशन्सच्या पुढे शेवटी एक 'doing the right thing' ऊपाय असतोच असतो आणि आपल्या प्रियजनांच्या बाबतीत तर नक्कीच कारण तिथे राग, निराशेपायी सरळ दुर्लक्ष करणे/ वार्‍यावर सोडणे/जबाबदारी टाळणे हे पर्याय सुद्धा तेवढेच त्रासदायक असतात.
ह्या प्रकरणात अवघड परिस्थितीतून (रीड: बाळंतपण) जाणार्‍या व्यक्तीला मदत करणे आणि बाळाचे भविष्य सुखकर होईल असे बघणे ही सगळ्या ईमोशन्सच्या परे असलेली right thing आहे असे मला वाटते.

>>>>मुलीला स्किझोफ्रेनिया सदृश काही डिसऑर्डर आहे का हेही तपासावे.
किंवा बायपोलर. मला हे हाय रिस्क टेकिंग अनडायग्नोसड रॅश मॅनिअ‍ॅक वागणे वाटते आहे. त्या मुलीची मेंटल कंडिशन खरच इव्हॅल्युएट करा. तिला उपचाराची गरज असू शकते. जेन्युइनली गरज असू शकते. अशा पेशंटसचे वागणे फार सेल्फ डि फीटिंग, सेल्फ सॅबोटाजिंग असू शकते. पेशंटला हे कधीच कळत नाही की तो/ती पेशंट आहे. आपल्यालाही या रोग्यांचा राग-राग येतो पण उपचारोपरान्त खूप सावरले जाउ शकतात असे रोगी.

सस्मित ला अनुमोदन. मुलगी आईवडिलांच्या प्रेमाचा, शांतपणाचा गैरफायदा घेत आहे.
यावरून जुनी ऐकलेली गोष्ट आठवतेय का कुणाला? एक मुलगा आईचा खूप लाडका असतो, त्याचे लहानपणापासून सगळे गुन्हे, चूका आई नजरेआड करून आई त्याला support करत असते. मोठेपणी तो चोर की दरोडेखोर काहीतरी होतो मग जेलमध्ये गेल्यावर भेटायला आलेल्या आईचा कान चावतो कारण पहिल्या गुन्ह्यासाठी तिने शिक्षा नाही दिली म्हणून.
कितीही कठोर वाटले तरी आई वडिलांनी मुलांच्या सगळ्या चूका पोटात घालता कामा नये.
त्या मुलासोबत लग्न न करून देण्यामागे आई वडिलांची मुलीची काळजी हे तर मुख्य कारण आहे परंतु त्यासोबत एकाच शहरात असल्यामुळे सगळ्या नातेवाईकांमध्ये, समाजामध्ये बदनामी होईल हा पण मुद्दा आहे.
त्यामुळे मुलीला सांगायचे की असेही मुलगा कामधंदा करत नाहीये तर त्याला जर लग्न करायचे असेल तो शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी दोघे लग्न करून रहा. आमची आर्थिक मदत होणार नाही. तुमचे तुम्ही बघा. त्यांच्या नकळत लक्ष असू द्या. असेही जे त्या दोघांबद्दल समजले आहे त्यानुसार त्यांचे लग्न फार काहीकाळ टिकणार नाहीये. मुलींसाठी परतीचा मार्ग खुला ठेवा.
सिम्बा यांनी सुचविल्या प्रमाणे त्या तिन्ही गोष्टी करणे गरजेचे आहे. पैशांसाठी आई वडिलांच्या जीवसोबत दगाफटका होऊ शकतो. मुलगी प्लॅनर आहे.

पहिल्यांदा मुलीची अन होणाऱ्या बाळाची काळजी वाटत होती। पण आता मला आईवडिलांचीच जास्त काळजी वाटतेय।एकतर मुलगी हवं तसं वागतेय, तिच्या तालावर नाचवतेय।
दुसरं स्वताचं घर विकून नवीन गावी आईवडील गेलेत। सगळं निस्तरताना प्रचंड पैसा घालवत आहेत। लेक बाळंतपण फुकटात करवून घेतेय। म्हणजे आर्थिक आघाडीही बिकट अन मानसिक स्वास्थ्य ही नाही। वर परगाव असल्याने सपोर्ट सिस्टिम नाही।
मुलगी सज्ञान आहे अन याची तिला जाणीवही दिसतेय(बाळंतपण करताय तर बरंय यावरून)। तिची गरज संपली की सरळ सगळं झुगारून द्यायलाही ती कमी पडणार नाही, असं दिसतय।
त्यामुळे खरं तर आईवडिलांना योग्य समुपदेशन हवं प्लस वकिली सल्लागारही हवा।

बाकी हे प्रकरण किती खरं किती खोटं संबंधित व्यक्तीच जाणो (माबो वरतीच अशा किमान ३ घटना अनुभवल्या आहेत म्हणून) पण तरीही अशा सोशल मिडियावर मिळणारे सल्ले वास्तवात किती उपयोगी पडतात प्रश्नच आहे।
मनात प्रश्न उभा रहातो। योग्य काऊन्सिलर, योग्य वकील, योग्य डॉक्टर आणि गरज पडलीच तर योग्य पोलिसी मदत घेणे जास्त संयुक्तिक नाही का?

कोणावरही दोषारोप करायचे नाहीत, तो उद्देशही नाही। तसे वाटल्यास आधीच क्षमस्व!

मनात प्रश्न उभा रहातो। योग्य काऊन्सिलर, योग्य वकील, योग्य डॉक्टर आणि गरज पडलीच तर योग्य पोलिसी मदत घेणे जास्त संयुक्तिक नाही का?

हे अगदी बरोबर आहे. पण अशी योग्य माणसे मिळणे वा मिळवणे सोपे नाही आणि ह्याला वेळ लागतो. हे प्रकरण सुरु होऊन फक्त दीड महिना उलटला आहे. आणि आत्ता जिथे आहोत तिथे पोचता पोचता बरीच दमछान झाली आहे. शारिरिक, मानसिक आणि आर्थिक तिन्ही पातळीवर धक्के सहन केलेत.

जाता जाता एक जवळच्या घरातला किस्सा।
सधन आणि समाजात नाव असणारे कुटुंबीय। घरचा मोठा व्यवसाय। ४ मुली एक मुलगा। यातली ३ क्रमांकाची मुलगी बारावीत असताना व्यवसायाच्या कामासाठी येणाऱ्या टेंपोच्या ड्रायव्हरबरोबर पळून गेली। हरप्रयत्न करून ४ महिने सापडली नाही। नंतर पोलिसांच्या शोधात ती सापडली। एका झोपडपट्टीत पत्र्याच्या एका खोलीत ८-१० जणांचं कुटुंब। त्यात हिचा नवरा मोठा मुलगा। जो आता वेगळ्या ठिकाणी ड्रायव्हरकी करत होता। घरात कोणी शिकलेले नव्हते। भाषा गावरान। पण मुलीला प्रेमाने वागवत होते।
तिचा शोध लागल्यावर मुलीची मोठी बहिण, आई वडिल भाऊ तिला बघायला समजावयाला गेले। पण ती परत यायला तयार नव्हती। शिवाय ती प्रेग्नन्ट आहे हेही तिने सांगितले।
हताश होऊन सगळे परतले। मुलीच्या ठाम मताचा त्यांनी आदर केला।
हे सोपे नव्हते पण मनावर दगड ठेवून त्यांनी हे जमवले।
कालांतराने वडिलांनी आपल्या व्यवसायातील एक छोटा हिस्सा त्या मुलीच्या नावे केला अन जावयाला चालवायला दिला।
या सगळ्याला किमान २५ वर्ष झालीत। आजही त्या मुलीची आर्थिक परिस्थिती इतर भावंडांपेक्षा कमी आहे। परंतु तिचा संसार नीट चालला। तिला दोन मुलंही झाली अन ती व्यवस्थित शिकलीही।
अर्थातच कोणत्याही दोन घटना वरकरणी साम्य असणाऱ्या असल्या तरीही त्यांत प्रचंड फरक असू शकतो याची जाणीव आहेच।
इथेही तुलना म्हणूनही सांगितलेल़ नाही।

जस्ट एक अनुभव शेअर केला

वर सगळ्यांनी त्यांच्यापरीने योग्य ते सल्ले दिले आहेतच. पण हा अनुभव जर खरा असेल तर तो त्या मुलीच्या बाजूने पण ऐकायला आवडेल. एवढ्या चांगल्या घरातली मुलगी, चांगले आई वडील, आर्थिक बाबतीत सधन आणि त्यातून एकुलती एक. मग असे काय घडले की तिला तो मुलगा आई-वडीलांपेक्षा जास्त जवळचा वाटू लागला?
साधारणपणे असे अनुभव घरात दुर्लक्षिलेल्या मुलींबाबतीत ऐकायला मिळतात. मोठ्या कुटुंबात ३-४ भावंडा मध्ये मधली मुलगी थोडी दुर्लक्षिलेली असते. किंवा नोकरी/ व्यवसायात खूप व्यग्र आई-वडील असले की मुलांकडे दुर्लक्ष होते. ह्या अनुभवात असे काहीच नाही.
ही मुलगी एवढी का Revolt मोड मध्ये गेली? आई वाडीलांबद्दल काही राग मनात आहे का? हा मुलगा फक्त एक कारण आहे पण खरा उद्देश घरच्या लोकांवर सूड उगवायचा आहे का? बालपणी मुलीबाबतीत काही वेगळं घडलं आहे का ( मानसोपचारतज्ञ हा प्रश्न नक्की विचारणार)? ह्या दृष्टीकोणातून पण विचार करावा.
I just feel there is more into it and we should not judge anyone on limited information.
बाकी, शुजिता मावशीनी त्या चांगल्या कुटूंबाला जी काही मदत केली आहे आणि वेळोवेळी वेळातवेळ काढून इथे येऊन इत्यंभूत माहिती updated ठेवली आहे त्या बद्दल विशेष कौतुक. पुढे बघूया अजून काय काय नवीन बाहेर येत आहे ते.

मानसिक त्रासातून जाणार्‍या व्यक्तीस टोमणे मारून, तिचा त्रास कसा खोटा आहे हे शाबीत करण्याचा प्रयत्न करून, मीडिया ट्रायल. असल्या सारखे त्रास सोसणाऱ्या व्यक्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यासारखे प्रतिसाद लिहून, आपल्या स्वतःच्या biases अंतर्गत त्रासातून जाणार्‍या व्यक्तीलाच जज करणारा --- +१२३४५६७ खरचं!!
तुम्ही प्रत्येक निगेटिव्ह कमेंट ला रिप्लाय करू नका.

मलाही बाकीचे रिप्लाय जास्त योग्य वाटतायतं.. तुम्हाला यातून लवकरात लवकर मार्ग मिळावा ही इच्छा.

आज अनेक महिन्यांनी मायबोलीवर आलो. कोतबो हा माझ्या आवडीचा विभाग आहे आणि इथे हा पेटलेला धागा बघून आत डोकावलो. विषय गंभीर आहे. आणि प्रतिक्रिया मध्ये फार मोठा धक्का बसला अशा प्रकारचा टोन आहे. पण खरं सांगतो मला काहीही वाटलं नाही. कारण हीच ती मायबोली आहे आणि हेच ते मायबोलीकर आहेत जेंव्हा मी माझ्या एका धाग्यावर

https://www.maayboli.com/node/78514

म्हणालो होतो

"ठरवून केलेल्या लग्नाच्या नावाखाली मुलीवर पुरुषाची जबरदस्ती लादण्याची परंपरा गेली कित्येक हजारो वर्षे सुरु आहे. इतक्या हजार वर्षांचे संस्कार असल्याने आता आता गेल्या काही दशकांत मोकळ्या होऊ घातलेल्या समाज व्यवस्थेत मुलीला आपला जोडीदार आपल्या बुद्धीने निवडता येण्याची अपेक्षा करावी तरी कशी?"

तेंव्हा मला अनेक मायबोलीकरांनी बदडले होते. मुलीना स्वत:हून जोडीदार निवडायची अक्कल नसते, त्या कुणासोबतही पळून जातात. हे मी माझ्या आयुष्यात अनेकदा विदीर्ण ह्रदयाने बघितले आहे. म्हणून मी तो धागा काढला. तर तेंव्हा मला सुनावणारे मायबोलीकर इथे मात्र सुन्न, थरकाप, काळजी वगैरे करत आहेत. आपल्या शेजारी पाजारी कोण मुलगी कधी कोणत्या झोपडपट्टी छाप झिपऱ्या सोबत पळून गेली वगैरे वगैरे गोष्टी सांगत आहेत.

पण मला कशाचे काही वाटत नाही याचे कारण मी ह्या अशा घटनांवर नंतर माझ्या मित्रांशी बोललो व आमच्यात एक कनक्लूजन निघाले. त्याबद्दल इथे कोणत्याही प्रतिसादात उल्लेख दिसला नाही म्हणून ते कनक्लूजन इथे शेअर करत आहे. न जाणो धागाकर्त्या किंवा अन्य कुणास उपयोगी पडेल.

सेक्सुअल फ्यांटसी किंवा लैगिक स्वप्नरंजन

होय हेच ते कनक्लूजन. या व अशा घटनांमध्ये जिथे चांगल्या घरच्या मुली सडकछाप मावा सिगरेट वाल्या मवाल्यासोबत पळून जातात त्यांना सेक्सुअल फ्यांटसी असते. आर्थिक व सामाजिक स्तर, नातीगोती, प्रतिष्ठा, परंपरा हे सगळे कृत्रिम आहे. निसर्गाला यातले काही कळत नाही. म्हणून निसर्ग हे सगळे फाट्यावर मारतो. त्यातून लैगिक स्वप्नरंजन तयार होते. आपल्या नेहमीच्या रुटीन, परंपरा, स्तर ह्या सगळ्यातील सोडून अन्य व्यक्तीसोबत सेक्स करणे हि फ्यांटसी असते. हि फ्यांटसी कोणाची काय असेल हे त्या व्यक्तीला वरवर पाहून कळत नाही. किंवा ती व्यक्ती सुद्धा कधीच कुणाशी ते बोलणार नाही. त्यामुळे मुलगी काय बोलते त्यावर विचारच करू नका. प्रेम वगैरे तर शब्दसुद्धा उच्चारायला नकोत ह्या संदर्भात. प्रेमाच्या पवित्र भावनेचा अवमान करू नका. काही प्रेम वगैरे नाही इथे. हि शुद्ध वासना आहे जी हे सर्व घडवत आहे. बरीच वर्षे झाली, शायनी अहुजा म्हणून एक एक्टर होता. प्रसिद्ध होता, तरुण व देखणा होता, जवळ पैसा होता. मनात आणता तर किती चांगली पार्टनर सेक्स साठी सहजी मिळवू शकला असता. पण ते सगळे सोडून याने कुणाला पकडले? तर घरात काम करायला येणाऱ्या मोलकरणीला! कारण तशी त्याची फ्यांटसी असणार.

हल्आलीच्जया काळात पॉर्न साइट्सवर व्हिडिओ बघून अशा लैगिक स्वप्नरंजनचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातून अशा घटना घडतात. मालकीण-नोकर, जिजा-साली, देवर-भाभी, म्याडम-विद्यार्थी, मित्राची बायको, बायकोची मैत्रीण आणि इतर बरेच व्हिडिओचा सुकाळ आहे. यातले काही इथे लिहू सुधा शकत नाहीत अशी नाती सुद्धा यात आहेत. अशा व्हिडिओज ना प्रचंड व्ह्यूज पण आहेत.

धागाकर्त्या यांचे प्रतिसाद व धागा वाचला कि कळते धाग्यातील मुलगी हे सगळे करत आहे ते फक्त त्या मुलाकडून सेक्स करून घ्यायला तिला आवडतो म्हणून असेच दिसून येते. कारण, चांगल्या घरातली नाजूक मुलगी आणि सडकछाप मवाली मुलगा हि तिची फ्यांटसी असणार. ती का व कशी तयार झाली ह्यात आता जाण्यात अर्थ नाही. पण वेळीच उपचार केले नाहीत तर हीच फ्यांटसी विकृती धारण करू शकते. तंव्हा मला एकच उपाय वाटतो:
१. जसे वर काही मायबोलीकरांनी सुचवले आहे कि बाळ झाल्यावर त्याला चांगल्या संस्थेत दत्तक देणे
२. चांगल्या मानसोपचार तज्ञांशी सल्लामसलत करून मुलीला सन्मार्गाला आणणे. (ती ज्या मार्गावर चालली आहे तो नक्कीच तिच्या आयुष्याची वाताहत करणारा आहे ह्यात दुमत नाही. वरती काहींनी उदाहरणे पण दिली आहेत कि कसा त्या मुलीच्या वडिलांचा नैराश्यात वगैरे मृत्यू झाला व काही तर घरच संपले. तेंव्हा कृपया कुणीही उपटसुंभाने निदान आता तरी मला याबाबत फुकाचे सल्ले देऊ नयेत हि नम्र विनंती). सन्मार्गाला आणण्याच्या कामात Happy Thoughts, SSY, Art of Living वगैरे शिबिरात तिला दाखल करायला हरकत नाही. हे सगळे चांगल्या मानसोपचार तज्ञांशी विचारविमर्श करून करा.

साईड बाय साईड, कायदेशीर समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून वकील व पोलीस यांचा सल्ला जरूर घ्या.
फडतूस लोकांचे सल्ले फाट्यावर मारा. इथे दिशाभूल करायला आलेले सुद्धा फार आहेत. यांना बोलायला काय जातंय, यांच्या घरातली कुणी गेली पळून गुटखा थुन्क्या सोबत तेंव्हा कळेल.

स्वातंत्र्य हवे आहे तर नंतर कोणी निस्तरायचे? लिव इनचेही काही जण गोडवे गात असतात. पोलीस काय करणार? सजाण मुले स्वत: गेली.

Pages