कुमारी मातृत्व आणि पुढील अवघड वाटा - कोणाशी तरी बोलायचंय

Submitted by शूजिता on 27 August, 2021 - 06:10

नमस्कार,
दीड महिन्यापुर्वी माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा एक फोन आला आणि ती जी हुंदके देत देत मला सांगत होती ते ऐकून मी एकदम स्तंभित झाले. तिची मुलगी फक्त २० वर्षाची. आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला. दिसायला सावळी पण फारचं गोड कुणाच्याही नजरेत भरणारी. कमालीची शांत आणि अगदी निरागस वाटणारी. तिची आई म्हणजे माझी मैत्रिण तिला एकुलती एकचं कन्या. त्या मुलीला दिवस गेलेत आणि ती घरुन पळून गेली. साडेसहा महिन्याची गरोदर मुलगी आणि माझ्या मैत्रिणीच्या हे लक्षात आले नाही. मुलगी वाढत्या वयानुसार शारिरिक बदल तिच्यात होत आहेत असेचं तिला वाटले. त्यामुळे गरोदर पणात स्त्रिला जी गोलाई येते त्याकडे तिने कानाडोळा केले. कुठल्याचं आईला आपल्या अविवाहित मुलीच्या अंगावरचे वाढलेले मास पाहून असे वाटणार नाही की ती गरोदर आहे. तिथे माझी मैत्रिण फसली बिचारी.

पाच दिवसानंतर खूप प्रयत्नानंतर शेवटी पोलिस जागे झाले आणि त्यांनी मदत केली. मुलगी परत मिळाली. एका छोट्याशा झोपडीत एका मुलाबरोबर होती. तो तिचा प्रियकर. एकदम सडकछाप मवाली मुलगी. चवथा वर्ग नापास. वय २२ वर्ष. मुली पटवायला एक नंबर आणि लफडेखोर. ह्या मुलाच्या तावडीत इतक्या चांगल्या घरची मुलगी फसली. तिचे त्याच्यावर प्रेम जडले पण त्याने फक्त तिचे शारिरिक शोषण केले.

संसार तसाचं सोडून माझी मैत्रिण दुसर्‍या शहरात गेली. तिथे एक बी एच के शोधले. गर्भपात व्हावा म्हणून वणवण भटकली पण इतक्या उशिरा आता ते शक्यचं नव्हते. आता तिची मुलगी ९ व्या महिन्यात प्रदार्पण करेल. इतक्या शांत मुलीच्या मनात केवढे काय काय साचून होते हे ती आता व्यक्त करते आहे. मी आत्ता तिच्याकडे एक दोन दिवस राहायला आले आहे. तिला आधार मिळावा म्हणून आणि काही मदत करता यावी म्हणून.

मुलीला हे मुल दत्तक द्यायचे नाही. किंबहूना मुल जन्माला घालून आपले आईवडील नाईलाजाने आपले लग्न ह्या मुलीशी लावून देतील ही तिची योजना होती. पण तिला माहिती नाही हे प्रकरण किती दाहक आहे.

मी इथे येऊन विचारणा केली. जिथे तिची प्रसूती ठरली आहे त्या डॉक्टरांना आमची फारचं किव आली आणि त्यांनी हमी दिली की त्या एका एन. जी. ओ. कडून हे मुल दत्तक देण्याची सोय करतील आणि ह्यात जिचे मुल आहे तिची सही लागणार नाही. तसेही अशी मुले बेवारस सापडतात. कचर्‍यात, गटार्‍यात, नदीच्या वाहत्या पाण्यात, देवळात, अनाथालयाच्या दारात, कुण्याच्या ओट्यावर, कुणाच्या अंगणात!! कुंतीनेही कर्णाला वाहत्या पाण्यात सोडलं होतं. आपण तर साधी माणसे. ह्या भावना जाऊ देत.. पण मुल दत्तक दिल्यावर ही मुलगी किती आकांत मांडेल? ती जगू देईल का तिच्या पालकांना? तिचे पुढील शिक्षण पुर्ण करु शकेल का? परत तिचे लग्न होईल का? वय फक्त २० आहे मुलीचे तर अजून १० वर्ष वेळ आहे तिला तोवर ही घटना पुसली जाईल. तिचे भले होऊ शकेल. पण मुलीने परत असेचं थेर केलेते? परत ती तेथून पळून परत त्या मुलाकडे गेली तर? मुलगा लग्न करायला तयार आहे म्हणाला पण नक्कीचं लायक पात्र नाही. मग अशा मुलाशी लग्न करुन काय उपयोग. शिवाय, अशी हार पत्करुन आपण समाजाला काय शिकवण देत आहोत? जर आपण हे मुल तिला दिले आणि तिला त्या मुलाशी लग्न करु नाही दिले तर चालेल का? असे एक नाही अनेक विचार आम्हि दोघीनी बोलताना मांडले.

मी इथे फार लिहित वा वाचत नाही. पण अचानक मला मायबोली आठवली आणि वाटलं इथे आपण मत मांडून बघावे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा प्रतिसाद तुम्ही इतर धाग्यांवर सुद्धा माझ्या कमेण्ट खाली कॉपी पेस्ट करत दिला आहे. एखाद्या ठिकाणी दिला तर गंमत म्हणून सोडून देता येईल. ही गंमत वाटत नाही. विकृती दिसतेय यातून. एखादी व्यक्ती स्त्री आहे की पुरूष याचे निकष सुद्धा फार उथळ आणि बायस्ड वाटताहेत. बावळट हा शब्द मी वापरत नाही. येडपट म्हटले म्हणून लगेच जेण्डर बदलते होय ? Lol
एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी कुणी एव्हढी मेहनत घेईल असे वाटत नव्हते. Lol

<बस कशाला अगदी मंदिरात सुद्धा हेच प्रकार होतात. मी माहुरला गेले होते. तिथे पायर्‍या खूप उंच आहे. एक मुलगी अशीचं माणसांच्या मधे फसली. तिथे ती ओरडून बाहेर आलि. इतके तिला भर गर्दीत दाबले ह्या पुरुषांनी. रात्रीची ७ ची वेळ होती. जगात भारतीय पुरुषांइतके फ्रस्टेटेत पुरुष नसतील.>

अरेरे! हे काय वाचतोय मी? देवळात म्हणजे हिंदू पुरुष ना? ते असं करणं कसं शक्य आहे ? असं फक्त मुस्लिम पुरुषच करतात! हो की नाही हो विक्षिप्त मुलगा? तुम्ही अजून लेखिकेचा तीव्र निषेध केला नाही?

करकोच्यासारखा बरोब्बर पॉईंट उचलला बघा शेठ तुम्ही. इतके लोकं आले एकाच्या लक्षात नै आला बघा हा पॉईंट. मानलं राव तुमाले.
‌लव जिहादचा मैटर असेल का हो शेठ? म्हंजे पोरगी शबाना आन् पोरगं जगन, छगन आसं कायतरी?

लव जिहादचा मॅटर असेल असं वि मु यांनीच सुचवलंय हो. फक्त त्यांनी शब्दांऐवजी फुल्या फुल्या टाकल्यात. त्यांचं कौतुक नाही का करणार तुम्ही?

माबोकरांनी उलटतपासणी सुरु केल्याने धागाकर्त्यांकडुन काही कठोर वक्तव्य केले गेले असावेत असा माझा अंदाज आहे. म्हणुन त्यांनी सांगितलेला सगळा घटनाक्रमच खोटा ठरविणे उचित होणार नाही.

सर तुम्ही इतरांना जो प्रश्न विचारता तो स्वतःला विचारता का? तुम्ही वकील आहात का ? कि प्रोफेशनल बोलघेवडे?

माझ्या मते आता हा धागा बंद करावा.>> अगदी १०० टक्के.

प्रशासक साहेब नमस्कार. तुम्ही मला वाचत असाल तर माझी एक विनंती. मला कोणाशी तरी बोलायचे होते तेंंव्हा इथे लिहिले. मला ह्यातून व्यक्त होता आले. अनेकांची मते कळली. त्याचा खूप फायदा झाला. आता इथे चिखलफेक होते आहे. मी इथे जे लिहिले ती कुणी लेखिका म्हणून नाही तर त्या परिस्थितीशी मी सामना करणारी एक व्यक्ती म्हणून. इथले नवीन प्रतिसाद फार खेदजनक आहेत. मी तुम्हाला विनंती करते की ह्या धाग्याला कुलुप लावा. धन्यवाद. शुभरात्री.

मी विनंती करतो धाग्याला कुलूप लागू नये... स्ट्रेस बस्टर धागा आहे... नवीन मायबोलीकर attract करायला हा धागा मुख्य पानावरच असू द्यावा.. जमले तर QR code बनवून मायबोलीच्या ऑफिशियल हॅण्डल वर टाकता आला तर बरे होईल...

तुम्ही वकील आहात का ? कि प्रोफेशनल बोलघेवडे?>> सर, रागावु नका हो. बाकी चालु द्या तुम्ही. धागाकर्त्यांनी धागा बंद करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे हा या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद.

चार दोन लोकांनी शंका उपस्थित केल्या म्हणून धागा बंद करावा असे मला वाटत नाही. लोकांना मार्गदर्शनासाठी उपयोगी ठरावा. खरे/ खोटे कथानक आहे हे वाचणारे ठरवतील.

कथानक पुढे सरकल्यास किंवा प्रकरणांस काही वेगळे वळण लागल्यास धागाकरर्ते माहिती देत रहातील अशी अपेक्षा.

कशी वाटतेय चव तुमच्या मेडिसिन ची >>>> कोणत्या हो ? मलाही खूप उत्सुकशा आहे, कौतुहलशा आहे, जाणूनशा घ्यायची. Happy
च्रप्स म्हणजे तुमचं पर्यावरण बंद आहे की खरोखर तुम्हीच प्रदूषण सुरू केल्याचा आव आणताय ? Wink
तुम्ही जर त्या असाल तर माफ करा. पण नसाल तर त्यांच्यावर संशय जाईल असे काही करू नका. महिलांच्या बाबतीत चेष्टा योग्य नाही (तुम्ही पुरूष असा किंवा स्त्री).

वही हुआ है ना, वकील वाला रिप्लाय एक महिला को दिया गया था. Lol
आप को नही.
शिवाय हे या धाग्यावर विषयांतर आहे. तुम्ही बळेच ओढून आणलंय असल्या बावळटछाप धाग्यावर Wink

लेखिकेने त्या मुलाचं पाहिलं नाव इथे जाहीर करावं. त्या मुलाचे पाहिले नाव लिहिल्याने गोपनीयतेचा भंग होणार नाही आणि बऱ्याच गोष्टी पण साफ होतील.

.

शूजिता,
मायबोली वा ईतर सोशल फोरमवर वर सल्ला मसलतीसाठी धागा काढणे ही दुधारी तलवार आहे हे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल.

>>> exactly.. She made a big mistake by putting someone's personal issue on this platform.

Pages