कुमारी मातृत्व आणि पुढील अवघड वाटा - कोणाशी तरी बोलायचंय

Submitted by शूजिता on 27 August, 2021 - 06:10

नमस्कार,
दीड महिन्यापुर्वी माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा एक फोन आला आणि ती जी हुंदके देत देत मला सांगत होती ते ऐकून मी एकदम स्तंभित झाले. तिची मुलगी फक्त २० वर्षाची. आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला. दिसायला सावळी पण फारचं गोड कुणाच्याही नजरेत भरणारी. कमालीची शांत आणि अगदी निरागस वाटणारी. तिची आई म्हणजे माझी मैत्रिण तिला एकुलती एकचं कन्या. त्या मुलीला दिवस गेलेत आणि ती घरुन पळून गेली. साडेसहा महिन्याची गरोदर मुलगी आणि माझ्या मैत्रिणीच्या हे लक्षात आले नाही. मुलगी वाढत्या वयानुसार शारिरिक बदल तिच्यात होत आहेत असेचं तिला वाटले. त्यामुळे गरोदर पणात स्त्रिला जी गोलाई येते त्याकडे तिने कानाडोळा केले. कुठल्याचं आईला आपल्या अविवाहित मुलीच्या अंगावरचे वाढलेले मास पाहून असे वाटणार नाही की ती गरोदर आहे. तिथे माझी मैत्रिण फसली बिचारी.

पाच दिवसानंतर खूप प्रयत्नानंतर शेवटी पोलिस जागे झाले आणि त्यांनी मदत केली. मुलगी परत मिळाली. एका छोट्याशा झोपडीत एका मुलाबरोबर होती. तो तिचा प्रियकर. एकदम सडकछाप मवाली मुलगी. चवथा वर्ग नापास. वय २२ वर्ष. मुली पटवायला एक नंबर आणि लफडेखोर. ह्या मुलाच्या तावडीत इतक्या चांगल्या घरची मुलगी फसली. तिचे त्याच्यावर प्रेम जडले पण त्याने फक्त तिचे शारिरिक शोषण केले.

संसार तसाचं सोडून माझी मैत्रिण दुसर्‍या शहरात गेली. तिथे एक बी एच के शोधले. गर्भपात व्हावा म्हणून वणवण भटकली पण इतक्या उशिरा आता ते शक्यचं नव्हते. आता तिची मुलगी ९ व्या महिन्यात प्रदार्पण करेल. इतक्या शांत मुलीच्या मनात केवढे काय काय साचून होते हे ती आता व्यक्त करते आहे. मी आत्ता तिच्याकडे एक दोन दिवस राहायला आले आहे. तिला आधार मिळावा म्हणून आणि काही मदत करता यावी म्हणून.

मुलीला हे मुल दत्तक द्यायचे नाही. किंबहूना मुल जन्माला घालून आपले आईवडील नाईलाजाने आपले लग्न ह्या मुलीशी लावून देतील ही तिची योजना होती. पण तिला माहिती नाही हे प्रकरण किती दाहक आहे.

मी इथे येऊन विचारणा केली. जिथे तिची प्रसूती ठरली आहे त्या डॉक्टरांना आमची फारचं किव आली आणि त्यांनी हमी दिली की त्या एका एन. जी. ओ. कडून हे मुल दत्तक देण्याची सोय करतील आणि ह्यात जिचे मुल आहे तिची सही लागणार नाही. तसेही अशी मुले बेवारस सापडतात. कचर्‍यात, गटार्‍यात, नदीच्या वाहत्या पाण्यात, देवळात, अनाथालयाच्या दारात, कुण्याच्या ओट्यावर, कुणाच्या अंगणात!! कुंतीनेही कर्णाला वाहत्या पाण्यात सोडलं होतं. आपण तर साधी माणसे. ह्या भावना जाऊ देत.. पण मुल दत्तक दिल्यावर ही मुलगी किती आकांत मांडेल? ती जगू देईल का तिच्या पालकांना? तिचे पुढील शिक्षण पुर्ण करु शकेल का? परत तिचे लग्न होईल का? वय फक्त २० आहे मुलीचे तर अजून १० वर्ष वेळ आहे तिला तोवर ही घटना पुसली जाईल. तिचे भले होऊ शकेल. पण मुलीने परत असेचं थेर केलेते? परत ती तेथून पळून परत त्या मुलाकडे गेली तर? मुलगा लग्न करायला तयार आहे म्हणाला पण नक्कीचं लायक पात्र नाही. मग अशा मुलाशी लग्न करुन काय उपयोग. शिवाय, अशी हार पत्करुन आपण समाजाला काय शिकवण देत आहोत? जर आपण हे मुल तिला दिले आणि तिला त्या मुलाशी लग्न करु नाही दिले तर चालेल का? असे एक नाही अनेक विचार आम्हि दोघीनी बोलताना मांडले.

मी इथे फार लिहित वा वाचत नाही. पण अचानक मला मायबोली आठवली आणि वाटलं इथे आपण मत मांडून बघावे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव + 1

काय जेन्यूईन आणि काय नाही हे ते कसे ठरवतात? एक बाजू ऐकून विश्वास ठेवून??
हे फार भयंकर आहे जर हे असे आई आणि बापाच्या सहीशिवाय असले प्रकार होत असतील तर...

गर्भपात करायचा की नाही किंवा मूल दत्तक द्यायचे की नाही यात बापाचा कंसेंट महत्वाचा नाही का की फक्त आईच ठरवू शकते...
>>>
काय नियम आहे याची कल्पना नाही. मात्र आपल्या समाजात तरी लग्नाआधी एखादी मुलगी गरोदर राहत असेल तर तिलाच याबाबत सर्व हक्क असायला हवे असे मला वाटते.

>>> इथे ऑनलाईन वेबसाईटवर मुलीचे पालक/ मुलगी यांना जज करणे आणि टिंगल करणे खूप सोपे आहे पण हा आपल्या समाजातला खरा प्रश्न आहे.<<< +१

हे हादरवणारे आहे !!!! त्या मुलीस आणि मुख्य म्हणजे तिच्या आई बाबांना यातून सुटका होवो ..... काहीच सुचवू शकत नाही पण प्रार्थना मात्र करू शकतो..... तिने झाली चु़क समजून घेवून त्या निरागस बाळास साम्भाळावे अन सावरावे.... काही काळ आई वडिलांना खूप कठीण जाईल ..... देवा .... त्यांना पार कर!!!!

वर कुठल्यातरी प्रतिसादात या घटनेला हजारोत की लाखोत एखाद्या घरात घडणारी घटना म्हटले आहे.
बरेच आईबापांना असेच वाटते की आपल्या घरात हे घडणार नाही. आपली घरंदाज पोरगी कुठल्या अशिक्षित, असंस्कृत, मवाली वा हलके समजले जाणारे काम करणार्‍या मुलासोबत पळून जाणार नाही. बरेचदा हाच ओवरकॉन्फिडन्स नडतो आणि हे घडते.
गंमत म्हणजे मुलाबाबत त्यांना हा कॉन्फिडन्स नसतो, म्हणजे वयात आलेल्या मुलाचा पाय घसरेल ही भिती त्यांना असते. पण मुलीचा पाय घसरेल ही कल्पनाही बरेच पालकांना करायची नसते Happy

भारतात MTP ऍक्ट नुसार गर्भपातासाठी फक्त संबंधित महिलेचा कंसेंट आवश्यक आहे लग्न झालेले असेल किंवा नसेल तरीही.

मायनर मुलगी किंवा मानसिक दृष्ट्या सक्षम नसलेली महिला असेल तर guardian चा कनसेंट आवश्यक आहे

बरोबर वाटतोय कायदा. मतभिन्नता झाल्यास दोघांपैकी एकाचे कोणाचे तरी मत अंतिम धरणे आवश्यक. ते आईचेच असणे स्वाभाविक आहे.

फार विचित्र केस आहे. धिस विल पास टु. मुलीचं माहेर मात्र तोडु नका. तिला कळेल ती परत मार्गी नक्की लागेल. आत्ता ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल तर लग्न लांबवत रहा. लीव्ह हर अलोन अ व्हाइल. लेट हर कम टु हर सेन्सेस.

सगळे प्रतिसाद वाचले. खालील गोष्टी कळल्या
१. केवळ त्या मुलाशी लग्न करायचं म्हणून तिने बाळ पोटात ठेवलेय. त्यात बाळाबद्दल माया किति ते कळत नाही.उद्या तो मुलगा म्हणाला तर ते बाळ आई च्या पदरात टाकून मुलगी निघून जाऊ शकते.
२. अश्या जाती बाहेर प्रेम प्रकरणाच्या केसेस मध्ये मुलगा मुलगी पळून जाऊन लग्न करतात. लग्न करणे हा उद्देश असतो. इथे तर बाळ जन्माला घालून आई वडिलांनी ब्लॅकमेल करण्याचा विचार असावा असे दिसतेय
३ मुलीला आयफोन घेऊन देण्याची ऎपत आहे, मुलगी एकुलती एक आहे, हट्टी आहे हे बरोबर जोखुनच तिला प्रेमाच्या जाळ्यात अोढलेले दिसतेय

या सर्वात मी तरि त्या आईवडिलांना वकिलांचा सल्ला घ्यायला सुचवेन.

या सर्वात मी तरि त्या आईवडिलांना वकिलांचा सल्ला घ्यायला सुचवेन>>>>>>

सहमत. मुलीला वाऱयावर सोडू नका पण तिचे ऊपद्रवमुल्य
लक्शात घेऊन स्वत:ला सुरक्शीत करा.

संपुर्ण लेख आणि प्रतिक्रिया वाचल्यावर (त्यात मावशींचे वेळोवेळी आलेले नवनवीन टर्निंग ट्विस्ट लक्षात घेऊन) असे वाटते आहे की -

१. चांगल्या सधन घरातील मुलीने मुलाशी काही वेगळा उद्योग करण्यासाठी तर संधान बांधलेले नाही ना..?
२. तिला पोटातील मूल केवळ त्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी ठेवायचं आहे हे वाचुन ती चांगली आई व्हायच्या योग्यतेची असावी का?
३. ४ थी नापास आणि वेश्या वस्तीतील स्त्रियांशी घरोब्याचे संबंध (होणार्‍या बायकोला वेश्येच्या झोपडीत ठेवतो म्हणजे तेवढे मजबुत संबंध नक्कीच असणार.. असे कोण कोणाला स्वतःच्या घरी ठेऊन घेईल..?) असणार्‍या मुलासोबत तिला नक्की काय आणि कसले प्रेम जडले असावे?
४. जो मुलगा स्वतःच्या मोबाईल मधे फसवलेल्या मुलींचे फोटो अन व्हिडेओ ठेवतो तो ब्लॅकमेल करून अशा चांगल्या घरातील मुलींना समाजात परत जायचे सर्व मार्ग बंद करण्याच्या उद्देशाने प्रेग्नंट करत नसेल कशावरून?
५. कदाचित मुलगी आणि मुलगा दोघांनी मिळून काही अघोरी उद्योग करण्याचा प्लॅन तर आखला नाही ना..??

वरील सर्व प्रश्नांची उत्तरं मुलीच्या बाजुने असतील तर अगदी चांगल्यात चांगला विचार करुन मी हे सांगू इच्छीतो की शूजिता मावशी, मला तर वेगळीच शंका येते आहे.. तुमच्या भाचीला ज्या मुलाने प्रेग्नंट केले आहे तो वेश्याव्यवसायातील दलाल असावा.. आणि तुमच्या भाचीला त्या नरकात खेचण्यासाठी प्रेग्नंट करणे हा त्याचा डाव असावा. शक्य असेल तर पोलिस कंप्लेंट करा अन त्या नराधमाची पाळेमुळे खणुन त्याला कायद्याने शिक्षा कशी होईल हे बघा. कमित कमी तुमच्या भाची सारख्या इतर मुलींची तरी या सेक्स रॅकेट मधुन सुटका होईल. भयंकर आहे हे...!!

त्यांनी पोलीसांना कधीच कळवलेले आहे. तुम्ही म्हणताय तशी मुलगी फसवलि गेलेली वगरे वाटत नाही. तिला सर्व कल्पना आहे. तिच्याकडे त्या मुलाच्या विरूद्ध पुरावे पण आहेत असं ति म्हणतेय. त्या आईवडिलांच्या पापभीरू स्वभावाचा फायदा घेणार ति असच दिसतेय.

कमित कमी तुमच्या भाची सारख्या इतर मुलींची तरी या सेक्स रॅकेट मधुन सुटका होईल. भयंकर आहे हे...!!>> सहमत. त्याच्या मोबाईल मध्ये चित्रण असलेल्या इतर मुलींच्या आणि भविष्यात त्याची शिकार होऊ शकणाऱ्या मुलींचा विचार करता त्याला पोलीसांच्या ताब्यात द्यायला हवे.
असे चित्रण तो इंटरनेटवर अपलोड करत असेल तर फारच गंभीर पुन्हा होईल. असे असेल आणि या केस मधील मुलीची त्याला साथ असेल तर तिही सहआरोपी होऊ शकेल.

असे चित्रण करणे हाच गंभीर गुन्हा नाही का? पोलिसांनी फक्त त्याचा मोबाईल जप्त करून त्याला सोडून दिलंय.

पोलिसांनी फक्त त्याचा मोबाईल जप्त करून त्याला सोडून दिलंय.>> हाच तर‌ मुद्दा होतोय. ज्यांनी कारवाई करायची ते आईबापाची समजुत घालत आहेत. आणि मुलगा आईबापाला पोरीला पळवुन नेईल म्हणुन धमक्या देतोय. पण यांना काळजी येणाऱ्या बाळाचे काय करावे याची. अरे पण त्या बाकीच्या अभागी मुलींचे काय? महिला आयोग, शासकीय यंत्रणा, न्यायपालिका याकडे का नाही गेले हे लोक.

माबो वर आलेत हे तरी नशिब. नक्की कोणत्या गावात ही घटना घडली हे कळाले तर तिथल्या माबोकरांची मदत घेऊन संबंधिक गावातील, शहरातील योग्य त्या महिला आयोग, बालसंगोपन केंद्र, शासकीय मदत अन पुनर्वसन विभाग अशा विभागांत नोंद तरी करता येईल. त्या गावातील इतर मुलींचे तरी रक्षण होईल.

स्वाती ताई आणि शिल्पा नाईक यांच्याशी सहमत आहे. मुलगी सज्ञान असल्याने आई वडीलांनी वकिलाच्या सल्ल्याशिवाय काही पावले उचलू नयेत बाळाच्या बाबतीत आणि आर्थिक बाबीत.
गेली पाच वर्षे मुलीचे मुलावर एकतर्फी प्रेम आहे. मुलाला लग्नात वा बाळात इंटरेस्ट नाही. पण बहुतेक मुलीने आपल्याकडे मुलाविरूद्ध पुरावे आहेत हे दाखवल्यामुळे त्याने तिला जी काही थोडीफार साथ दिली ती दिली असावी (मॅगी करून घालणे, पाय चेपून देणे इत्यादी).
मुलीला एकदा आडून आडून विचारा की जर आई वडील लग्न लावून द्यायला तयार झाले नसते किंवा त्यांनी तुला काहीही मदत केली नसती तर तू काय केलं असतंस? Is there something else other than the pregnancy she has in her mind to manipulate/convince her parents for this marriage? तिच्या आई वडीलांकडून काय अपेक्षा आहेत? या बाबतीत तिने स्वतःच्या आनंदासाठी जी काही पावलं उचलली ती फारशी योग्य नव्हती. यापुढे तिच्या मनात काय येते आहे याचा अंदाज येणे आवश्यक आहे. आज तिला तिच्या शारीरिक अवस्थेत फार काही करता येत नसलं तरी ती काहीतरी विचार करतच असेल ना पुढच्या काळाचा. तो कळणे गरजेचे आहे असे वाटते.

यांना काळजी येणाऱ्या बाळाचे काय करावे याची. >> ती काळजी चुकीची नाही.
संकटात सापडलेला माणुस हे एवढे कसे निस्तरायचे या विचारात गुरफटून जातो, पुढचे पुढे बघू असा विचार करतो. "अरे आधी हे तर निस्तरु द्या" अशी त्यावेळी मनोधारणा होते. आठवा आपण कुठल्याही मोठ्या कठीण प्रसंगी सापडलो तेव्हाची वेळ.

बाळाला दत्तक देऊन, मुलगी एकटी राहील, नोकरी करील असे विचार आहेत सध्या, ते याच मनोधारणेतून वाटतात.
पण मुलगी केवळ विस वर्षांची आहे, मोठ्ठ आयुष्य पडलंय तिच्या पुढे.

तेव्हा मुलगी काही करेल आपण कचाट्यात सापडू पेक्षा एकंदरीतच या प्रकरणात वकिलांचा सल्ला घ्यावा, मुलाची सगळी पार्श्वभूमी सांगून, ते मोबाईल मधील रेकॉर्डिंग, मुलीकडे काय पुरावे आहेत सगळे सांगून.

पोलिसांकडे अनेकदा गेलो पण त्यांची फार अशी काही मोठी मदत नाही मिळाली. पाच दिवस मुलगी लापता असूनही त्यांनी काहिचं केले नाही. माझ्या पतीचा एक वर्गमित्र आय. ऐ. एस. ऑफीसर होता. त्याला आम्ही फोन केलेत. त्यानी मग त्या जिल्याच्या जिथे घटना घडली तिथल्या एस. पी. ला फोन केला. जेंव्हा एस. पी. ने पोलिसांना ताबडातोब ही मुलगी शोधा असा आदेश दिला तेंव्हा कुठे पोलिस जागेवरुन हललेत. तोवर त्यांच्याकडे रोज जाऊन काहीही उपयोग नाही झाला. पहिल्या दोवशी तर त्यांनी ऐफ आय आर पण नाही लिहून घेतला. त्याऐवजी मुलगी घरातून गायब आहे असे जुजबी लिहून घेतले. त्याचा उपयोग झाला. ह्या खेरिज महिला आयोग आणि शहरातील इतर सामाजिक का. क. भेटून झाले आम्हाला लवकरात लवकर मदत करा. मुलगी तरुण आहे. परत एक निर्भया केस घडू शकते. पण त्यांनी वाट पहा हेच उत्तर लिहिले. मुलगी सापडेपर्यंत आईबाबा कासावीस झाले होते. अशी बातमी सांगताही येत नव्हती आजूबाजूला. मुलगी सापडली त्यावेळी ती घरी जायला तयार नव्हती. तिला त्या मुलासोबतच राहायचे होते. घरी आईसोबत तिने आधी कबुल करुन घेतले माझे लग्न करुन द्या. मग कुठे तयार झाली. नाहीतर इथल्या इथे पोलिसांना सांगते मी सज्ञान आहे माझी मर्जी आहे. पोलिसांनी नंतर मुलाकडून पैसे उकडले. तो सुटला. परत त्याने त्रास देणे सुरु केले. पोलिस म्हणाले मुलगी एकही अक्षर विरोधात बोलत नाही मुलाच्या. मुलाने हे कबुल केले आहे हे त्याचे मुल आहे आणि मुलीनेही हे मान्य केले आहे.

वकिलांचा सल्ला घेतला.

आईवडील मुलीच्या प्रसूतीसाठी थांबले आहे. शिवाय स्थलांतर करेपर्यंत ते फार बीझी होते. मुलगी नाचवत होती आईबाबाना. आता ९ वा लागला म्हणून थोडी मंद झाली आहे. नाहीतर थयथयात सुरु होता. फोन हिसकवून एक एक तास दरवाजा बंद करुन मुलाशी बोलायची. काय बोलायची सांगायची नाही. मुलाविरुद्ध जरा काही बोलले कुणी तर लगेच त्याची बाजू घेते. तिला पुरावे दाखवले मुलगा किती बाईलवेडा आहे तर ती म्हणते मुलीच त्याच्या वेड्या आहे पण तो फक्त माझा आहे.

कृपया ही घटना कुठे घडली आणि इतर तपशीलवर विचारु नका. सुरक्षित वाटत नाही. क्षमस्व.

यांना काळजी येणाऱ्या बाळाचे काय करावे याची. >> ती काळजी चुकीची नाही.>> चुकीची नाहीच आहे. आणि ते डॉक्टरचा सल्ला वगैरेही घेत आहेत. हा झाला एक भाग.
आता दुसरा भाग असा की, तो मुलगा आईबापाला धमक्या देतो. त्याच्या मोबाईल मध्ये अन्य मुलींचे चित्रण‌ आहे. त्यात काही अल्पवयीनही असु शकतील. याबद्दल काय तर "आधी हे निस्तरु द्या मग बघु," याला तुम्ही काय म्हणाल?

आता दुसरा भाग असा की, तो मुलगा आईबापाला धमक्या देतो. त्याच्या मोबाईल मध्ये अन्य मुलींचे चित्रण‌ आहे. त्यात काही अल्पवयीनही असु शकतील. याबद्दल काय तर "आधी हे निस्तरु द्या मग बघु," याला तुम्ही काय म्हणाल?

तो भाग आईवडील बघू शकत नाही. तो भाग पोलिसांनी बघायला हवा. त्यांच्याकडे थेट त्या मुलाचा फोन आहे. त्यातून त्यांना अनेक अनेक इनपुट मिळू शकतात. आम्ही फक्त आमच्या वतीने मुलीसोबत जे काही घडले त्याबद्दल पुढे पाऊल टाकणार आहोत. पण सध्या प्रसूती जवळ आल्यामुळे आणि आम्ही फार दुर असल्यामुळे हे काम प्रसूतीनंतर करणार आहोत. तोवर परिस्थिती बदलेल. प्रसूतीतून गेल्यावर मुलीला थोडी तरी अक्कल येवो.

आधी हे निस्तरु द्या मग बघु," याला तुम्ही काय म्हणाल?...... काही म्हणणार नाही.प्रत्येकाला आपला स्वार्थ प्यारा असतो.आपल्या अब्रूचे धिंडवडे निस्तरणे जास्त महत्वाचे आहे.

पण त्यांनी वाट पहा हेच उत्तर लिहिले. ...बऱ्याच केसेस मध्ये मुली स्वखुशीने पळूनच जातात.त्यामुळे पोलिस लगेच तपास करत नाहीत.इथेही तसेच आहे.

तुमच्या ओळखीत असलेल्या IAS ना हे सगळं माहीत आहे का? आणि मुलीला शोधण्याचे आदेश देणाऱ्या SP ना? ते नक्कीच action घेऊ शकतील.

बऱ्याच केसेस मध्ये मुली स्वखुशीने पळूनच जातात.त्यामुळे पोलिस लगेच तपास करत नाहीत.इथेही तसेच आहे.>> अहो ताई मी यांच्या मुलीबद्दल बोलत नाही आहे. तिची काळजी तिचे आईवडील घेत आहेत. पण त्यांनी प्रतिसादात मुलाच्या मोबाईल मध्ये अन्य मुलींचे चित्रण आहे, हा जो मुद्दा मांडलाय तो गंभीर आहे.
अनेक अभागी मुलींचा प्रश्न आहे. पोलीसांनी काही केले नाही असेही त्या सांगत आहेत.
ते जाऊ द्या ही घटना कोणत्या पोलीस स्टेशन हद्दीतील आहे इतकेच त्यांनी सांगावे, म्हणजे काहीतरी करता येईल.

कृपया ही घटना कुठे घडली आणि इतर तपशीलवर विचारु नका. सुरक्षित वाटत नाही. क्षमस्व. >>+ १ .
हे कुठल्याही परिस्थितीत सांगू नका.

मला स्वतःला हे काही/पूर्ण काल्पनिक वाटले/वाटते ती गोष्ट वेगळी. पण तुम्ही किंवा कुठल्याही अशा कोतबोमध्ये लोकांनी आपली आयडी अथवा ती उघड होईल अशी माहिती सांगण्याची आवश्यकता नाही.

सगळ्यात आधी हा नवा आयडी म्हणजे फेक असेल यापासून सुरवात होते. उद्या मला काही वैयक्तिक कारणासाठी कोतबो धागा काढावा लागला तर मी स्वतः नविन आयडीने काढेन आणि खरा आयडी कळु नये याची पूर्ण काळजी घेईन.

हे दुसर्यांच्या केसेस बद्दल पोलिसांना पाठपुरावा करण्या आधी मुलीशी बोला. ती कदाचित सह आरोपी असण्याची शक्यता आहे. आगितुन फुफाट्यात असं नको व्हायला. त्यामुळे वन बाय वन निस्तरले पाहिजे. प्रसुति आधी फक्त आईवडिलांनी वकिलाचा सल्ला घेणे फार महत्त्वाचे आहे. पुढे त्यांनाच त्रास कमी.
पोलिसांना त्यांच्या एरियात होणार्या प्रत्येक गुन्ह्याची माहिती असतेच, फक्त तो दु्र्लक्ष करण्याचा आहे की नाही ते सोयिने ठरवतात. (जो जास्त पोहोचलेला तो जास्त सेफ)

तुमच्या ओळखीत असलेल्या IAS ना हे सगळं माहीत आहे का? आणि मुलीला शोधण्याचे आदेश देणाऱ्या SP ना? ते नक्कीच action घेऊ शकतील.
मी वाचले त्यांचे समस माझ्या पतीच्या मित्रांना आलेले. मुलगी सापडली आहे. तिच्या आईवडीलांकडे तिला सुपुर्त केले. अशी केस परत होणार नाही. आम्ही त्वरीत अ‍ॅक्षन घेऊ. तरुणांना सतर्क करु. असे लिहिले होते. मी अवाक झाले त्यांनी काहीचंं केले नाही त्या मुलाला. जर एका आय. ए. एस. चा फोन दुसर्‍या आय. ए. एस. ला नसता गेला तर किती दिवस ही मुलगी सापडली नसती!!!? माझा आपल्या सिस्टमवर विश्वास नाही. खूप धक्के खावे लागतात. त्वरीत न्याय मिळत नाही. त्वरीत मदत मिळत नाही. सतत कायद्याची भिती दाखवली जाते. गुन्हे करणारे मात्र मोकाट फिरतात.

काही लोक काही विचार न करता प्रतिसाद लिहतात.
प्रत्येक गोष्ट करणे इतके सोपे नसते. ज्याच्या वर वेळ येते त्याला च समजते. तरि मुली च्या आई वडीलां नी बरेच धिरा ने केले आहे.
अधीच झालेल्या प्रकारा मुळे खचलेले आई वडिल काय काय करणार .

मुलगी वाह्यात आहे. इतके चांगले आई-वडील-मावशी समजाऊन सांगत आहेत. आय.ए.एस. आणि एस.पी. पर्यंत प्रकरण पोचले तरी तिच्यात काडीमात्र फरक पडलेला नाही नाही. अशी आई येणार्‍या संततीला काय संस्कार देईल याची चिंता वाटते. अशा २० वर्षांच्या मुलीला आपण अल्पवयीन म्हणु शकत नाही.

पोलिसांचे फार काही चुकले असे वाटत नाही. दोघांची वये १८ पेक्षा जास्त आहेत. आई-वडील आणि इतर नातेवाईकांच्या दृष्टीने हे महाभयंकर प्रकरण नक्कीच आहे परंतु दोन सज्ञान व्यक्तिंच्या परस्पर संमतीने उचलेल्या पावलाला पोलिसी खाक्या दाखवून काहीच फायदा नाही हे त्या पोलिसांना कायद्याचे ज्ञान असल्याने पुरते माहित आहे. फक्त तो मुलगा आयटी अ‍ॅक्ट आणि पॉस्को कायद्या खाली जेल मधे जाऊ शकतो अन त्यासाठी त्याच्या मोबाईल मधील फोटो अन व्हिडीओ पोलिसांकडून गहाळ होता कामा नयेत.

कदाचित मुलगा अन मुलगी संगनमताने हे सेक्स रॅकेट चालवत असतील तर त्या कायद्याखाली अटक टाळता यावी म्हणुन मूल जन्माला घालण्याचा उद्योग केलेला असु शकतो.. जेणे करून सहानुभुतीचा आधार मिळुन जेल मधे जाण्यापासुन बाळाच्या रुपाने कवच कुंडलं मिळतील

Pages