कुमारी मातृत्व आणि पुढील अवघड वाटा - कोणाशी तरी बोलायचंय

Submitted by शूजिता on 27 August, 2021 - 06:10

नमस्कार,
दीड महिन्यापुर्वी माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा एक फोन आला आणि ती जी हुंदके देत देत मला सांगत होती ते ऐकून मी एकदम स्तंभित झाले. तिची मुलगी फक्त २० वर्षाची. आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला. दिसायला सावळी पण फारचं गोड कुणाच्याही नजरेत भरणारी. कमालीची शांत आणि अगदी निरागस वाटणारी. तिची आई म्हणजे माझी मैत्रिण तिला एकुलती एकचं कन्या. त्या मुलीला दिवस गेलेत आणि ती घरुन पळून गेली. साडेसहा महिन्याची गरोदर मुलगी आणि माझ्या मैत्रिणीच्या हे लक्षात आले नाही. मुलगी वाढत्या वयानुसार शारिरिक बदल तिच्यात होत आहेत असेचं तिला वाटले. त्यामुळे गरोदर पणात स्त्रिला जी गोलाई येते त्याकडे तिने कानाडोळा केले. कुठल्याचं आईला आपल्या अविवाहित मुलीच्या अंगावरचे वाढलेले मास पाहून असे वाटणार नाही की ती गरोदर आहे. तिथे माझी मैत्रिण फसली बिचारी.

पाच दिवसानंतर खूप प्रयत्नानंतर शेवटी पोलिस जागे झाले आणि त्यांनी मदत केली. मुलगी परत मिळाली. एका छोट्याशा झोपडीत एका मुलाबरोबर होती. तो तिचा प्रियकर. एकदम सडकछाप मवाली मुलगी. चवथा वर्ग नापास. वय २२ वर्ष. मुली पटवायला एक नंबर आणि लफडेखोर. ह्या मुलाच्या तावडीत इतक्या चांगल्या घरची मुलगी फसली. तिचे त्याच्यावर प्रेम जडले पण त्याने फक्त तिचे शारिरिक शोषण केले.

संसार तसाचं सोडून माझी मैत्रिण दुसर्‍या शहरात गेली. तिथे एक बी एच के शोधले. गर्भपात व्हावा म्हणून वणवण भटकली पण इतक्या उशिरा आता ते शक्यचं नव्हते. आता तिची मुलगी ९ व्या महिन्यात प्रदार्पण करेल. इतक्या शांत मुलीच्या मनात केवढे काय काय साचून होते हे ती आता व्यक्त करते आहे. मी आत्ता तिच्याकडे एक दोन दिवस राहायला आले आहे. तिला आधार मिळावा म्हणून आणि काही मदत करता यावी म्हणून.

मुलीला हे मुल दत्तक द्यायचे नाही. किंबहूना मुल जन्माला घालून आपले आईवडील नाईलाजाने आपले लग्न ह्या मुलीशी लावून देतील ही तिची योजना होती. पण तिला माहिती नाही हे प्रकरण किती दाहक आहे.

मी इथे येऊन विचारणा केली. जिथे तिची प्रसूती ठरली आहे त्या डॉक्टरांना आमची फारचं किव आली आणि त्यांनी हमी दिली की त्या एका एन. जी. ओ. कडून हे मुल दत्तक देण्याची सोय करतील आणि ह्यात जिचे मुल आहे तिची सही लागणार नाही. तसेही अशी मुले बेवारस सापडतात. कचर्‍यात, गटार्‍यात, नदीच्या वाहत्या पाण्यात, देवळात, अनाथालयाच्या दारात, कुण्याच्या ओट्यावर, कुणाच्या अंगणात!! कुंतीनेही कर्णाला वाहत्या पाण्यात सोडलं होतं. आपण तर साधी माणसे. ह्या भावना जाऊ देत.. पण मुल दत्तक दिल्यावर ही मुलगी किती आकांत मांडेल? ती जगू देईल का तिच्या पालकांना? तिचे पुढील शिक्षण पुर्ण करु शकेल का? परत तिचे लग्न होईल का? वय फक्त २० आहे मुलीचे तर अजून १० वर्ष वेळ आहे तिला तोवर ही घटना पुसली जाईल. तिचे भले होऊ शकेल. पण मुलीने परत असेचं थेर केलेते? परत ती तेथून पळून परत त्या मुलाकडे गेली तर? मुलगा लग्न करायला तयार आहे म्हणाला पण नक्कीचं लायक पात्र नाही. मग अशा मुलाशी लग्न करुन काय उपयोग. शिवाय, अशी हार पत्करुन आपण समाजाला काय शिकवण देत आहोत? जर आपण हे मुल तिला दिले आणि तिला त्या मुलाशी लग्न करु नाही दिले तर चालेल का? असे एक नाही अनेक विचार आम्हि दोघीनी बोलताना मांडले.

मी इथे फार लिहित वा वाचत नाही. पण अचानक मला मायबोली आठवली आणि वाटलं इथे आपण मत मांडून बघावे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल दिवसभरात शेकड्याने प्रतिसाद आलेत. एवढे वाचायला वेळ लागेल, पण वाचणार जरूर. कारण अशी वेळ उद्या माझ्यावर वा माझ्या ओळखीच्यांपैकी कोणावरही येऊ शकते.
एक मात्र नक्की, धागाकर्ती स्वतः हे सर्व प्रतिसाद वाचून प्रत्येकाला ज्या संयमाने उत्तर देत आहेत ते फार कौतुकास्पद आहे.

>>>> मानसिक त्रासातून जाणार्‍या व्यक्तीस टोमणे मारून, तिचा त्रास कसा खोटा आहे हे शाबीत करण्याचा प्रयत्न करून, मीडिया ट्रायल. असल्या सारखे त्रास सोसणाऱ्या व्यक्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यासारखे प्रतिसाद लिहून, आपल्या स्वतःच्या biases अंतर्गत त्रासातून जाणार्‍या व्यक्तीलाच जज करणारा मायबोलीचा एक अतिशय ओंगळवाणा चेहरा ह्या धाग्याच्या निमित्ताने समोर आलेला दिसला. तसा तो यापूर्वी अनेकदा तुकड्या तुकड्यात दिसला होता पण ह्या धाग्यावर फारच लख्खपणे<<<
आगदी अगदी. इतकं की सिरियल काढा, मुलीला कंडोम घेवुन जा असे लिहून टिंगल करणे पाहून किव आली.
खोटा लेख वाटला तर नका लिहू ना, पण त्या शूजितालाच पिंजर्‍यातच टाकायचं, मुलीच्या आई वडीलांनी आपलच बघितलं म्हणून वाकडे प्रश्ण विचारायचे ... कमाल आहे.
पण हे ही समाजाचे चित्रण आहे.
आज काल सोशल मिडियावर आपल्या रूममध्ये बसून मुलं/मुली काय करतात ह्याची बातमी सर्वच पालकांना असते काय?

एका केसमध्ये मुलाने सांगितले की, आपण भेटत नाही पँडेमिकमध्ये तर, तुझ्या ह्या ह्या भागाचे फोटो पाठव, मला आठवण येते, तर तसे करून ब्लॅकमेलने त्रासलेली मुलगीची बातमी वाचली नाही का?
बॉयफ्रेंडच्या सांगण्याने, आई वडीलांचा खून करून पशार झालेली बातमी नाही वाचली ?
माझ्या पाहण्यात अश्या मुली आहेत, ज्यातली एक माझ्याच कॉलेजमधली होती. एकुलती एक , श्रिंमत घरातली. जी आमच्या शाळेच्या बस ड्रायवरच्या प्रेमात; त्याचे वय३५ आणि हिचे वय १५. ११ वीत असतानाच गरोदर झाली. पण शाळेत असल्यापासून तो ड्रायवर फितवत होता. वडिलांना मारून( मारहाण) पैसे घेवून पळाली. नंतर नको ते आजार घेवून परत आली. मूल तर गेले. आणि मग ती सुद्धा गेली आजाराने. वडिल धक्क्याने गेले आणि आईने त्या वयात लोकलज्जेने आत्महत्या केली. नालायक लोकं येता जाता, आई वडिलांनाच टोमणे मारत मुलीवरून. चूक कोणाची चिरफाड करायला काय जाते कोणाचे? पण प्रश्ण हा आहे, एकाची चूक नसतेच कधी.
बरेच घोळ असतात.

>>> लग्न करुन दिल्यास आटे दाल का भाव कळल्याने बरोबर जागेवर येईल तेव्हा मात्र लगेच हालचाल करुन मुलीला त्या मुलापासून वेगळे होण्यास मदत करावी.<<<
हे असे होउलच सांगता येत नाही. मुलीला विचारा, तुला काय हवेय?
-बाळाचा खर्च कोण करणार?( हे मुद्दाम विचारा, हि तिची ज्बाबदारी आहे जाणून द्या)
-मुलाने नाही केले लग्न आणि मग तुझ्याकडचे पुरावे आपण वापरायचे का?
मुद्दम आईने मुलीला म्हणावे, हे बरय, तुझ्याकडे पुरावे आहेत. आधी बाळ येवु दे आणि लग्नाचे विचारु, तोवर तु पुरावे काय ते जपून कुठे ठेवलेत ते लक्षात आहेत का?
तुझ्याकडचे पुराव्याला असा का घाबरेल?( असे प्रश्ण विचारून बघा ती काय सांगते)
बाकी हे करा:
१)तुम्ही काय करताय व करणार ह्या बद्दाल काही सांगू नका.
२) वकिलाशी बोलून बघा
३) मायबोलीवरील, लिखाण दाखवू नका
४) वरून दोस्ती ठेवा पण आंधळं प्रेम नको. मुलीला, आम्ही लग्न करून देणार आहोत हे भासवा. आधी बाळ येवु दे, मग त्या मुलाला नोकरी लागू दे. तु नोकरी कर टेम्पररी तरी असे सारखे कंडिशन घालत रहा. खर्च वाढणार, मग तो कोण करणार ह्याचे टुमणे लावा सतत तिच्या कानाशी. फरक काय पडेल ह्याचा विचार नाही करायचा पण मुलीच्या कानावर पडले पाहिजे सतत.
तुमच्याकडचा पैसा संपला ह्या मूवींग मध्ये किंवा पुरेसा नाही असे चित्र करा. आमची आर्थिक ताकद नाहीच आहे असे दाखवा. मुलीला, तुमची सध्याची बॅंकेची जमा माहिती दाखवू नकाच. तिला सर्व बाजूने, तूच पेलणार आहेस आता असे मधून मधून बोलत रहावे. तभ्येत सांभाळूया आधी, मग लग्न.
अशी बरीच भलावण करू शकता. अजिबात, विरोध आहे दाखवू नका. रिवर्स सायकोलॉजी वापरा.
५) मुलीच्या सर्व लैंगिक चचण्या झाल्याच असतील( गरोदर आहे आणि ती मुलासोबत व त्या वेश्यबरोबर राहिलीय)
६) तिची पैशाची अकांट्स रिकामीच ठेवा.
७) किंमती सामान बाळगू नका.
८) नवीन रहात्या ठिकाणी, आजूबाजूला काहीच दर्शवू नका तुमच्या घरातील प्रोबलेम्स. लोकं नालायक असतात व ज्यास्त त्रास होवु शकतो.
९) कुठल्याही परीस्थितीत, लग्न , करायचे/करून द्यायचे नाही. पण तसे मुलीला दाखवायचे नाही. लग्न केले तरी शेवट चांगला असण्याची शक्यता नगण्य आहे( वरील माहितीवरून). लॉस आता झालेला निस्तरता येइल पन मुलाची गोश्ट पहाता, दुप्पट त्रास होण्याची शक्यता आहे. कोणी सांगावे, मुलगा, मुलीला आणखे कुठल्या गुन्ह्यात अडकवेल? किम्वा मुलगीच अडकेल? तेव्ह, लग्न हा पर्याय नाहीच आहे.

बरेच काही नंतर..

झंपी,

हे असे होउलच सांगता येत नाही. मुलीला विचारा, तुला काय हवेय?
-बाळाचा खर्च कोण करणार?( हे मुद्दाम विचारा, हि तिची ज्बाबदारी आहे जाणून द्या)

तिला लग्न करुन हवे आहे. तोही तयार आहे. पण आईवडीलांना आणि आम्हा सर्वांना तो मुलगा आणि मुलीचा निर्णय अयोग्य वाटतो.

-मुलाने नाही केले लग्न आणि मग तुझ्याकडचे पुरावे आपण वापरायचे का? हे बरय, तुझ्याकडे पुरावे आहेत. आधी बाळ येवु दे आणि लग्नाचे विचारु, तोवर तु पुरावे काय ते जपून कुठे ठेवलेत ते लक्षात आहेत का?
>> तो करेल पण ते आम्ही करुन दिले तर. नाहीतर तो तिला तसे ठेवेन. मुलीने त्याला दोन तीन वेळा आपण कोर्टात जाऊन लग्न करु असे म्हणाली. त्याला त्याच्याकडे जे कागदपत्र नव्हते त्यासाठी तिने पैसेही दिले होते. पण त्याने ते काम केले नाही किंवा त्याच्याकडे कागदपत्र असतील. पण पोलिसांच्या ताब्यात सापडल्यावर त्याला आता तो बाप आहे हे मान्य करणे भाग आहे. तो म्हणून तरी लग्न करेन आणि त्याला कोणी विचारत नाही. तेंव्हा ही मुलगी त्याला मिळणे त्याच्यासाठी चांगलेचं आहे. तेंव्हा तो लग्न करेन असे ९९ टक्के वाटते.

तुझ्याकडचे पुराव्याला असा का घाबरेल?( असे प्रश्ण विचारून बघा ती काय सांगते)
>> त्याबद्दल फार काही नाही बोलली पण ठोस पुरावे आहेत तिच्याकडे. ती फार सिंहावलोकन करते नेहमी.

बाकी हे करा:
१)तुम्ही काय करताय व करणार ह्या बद्दाल काही सांगू नका.

>> हो ते आहे पण तिला आमचे प्लान थोडेफार लक्षात येत असतील.

२) वकिलाशी बोलून बघा
>> हेही केले.

३) मायबोलीवरील, लिखाण दाखवू नका

>> नाही त्याची दक्षता मी घेतली आहे. मी इतिहासही उडवून टाकते.

४) वरून दोस्ती ठेवा पण आंधळं प्रेम नको.
>> प्रेम आहे आणि राहिल. आम्ही सतर्क आहोत.

५) मुलीच्या सर्व लैंगिक चचण्या झाल्याच असतील( गरोदर आहे आणि ती मुलासोबत व त्या वेश्यबरोबर राहिलीय)
>> हो सर्व झालं करुन.

६) तिची पैशाची अकांट्स रिकामीच ठेवा.
>> थोडे पैसे आहेत पण तिचे पासबुक मुलाकडे आहे. आम्ही खाते स्थगित केले आहे त्वरीत.

७) किंमती सामान बाळगू नका.
>> नाही तेही जवळ नाही.

८) नवीन रहात्या ठिकाणी, आजूबाजूला काहीच दर्शवू नका तुमच्या घरातील प्रोबलेम्स. लोकं नालायक असतात व ज्यास्त त्रास होवु शकतो.
>> हो इथे आम्ही एकही बाई कामाला ठेवली नाही. दुधही बाहेरुन आणतो. घरी कुणी येत नाही.

९) कुठल्याही परीस्थितीत, लग्न , करायचे/करून द्यायचे नाही. व तसे दाखवायचे नाही. लग्न केले तरी शेवट चांगला असण्याची शक्यता नगण्य आहे( वरील माहितीवरून)

>> हो हे आहेच.

मुलाला , काय मुलगी एक तुतारी आहे. नक्की वाजणारच; अशी नाही तरी तशी असा सीन आहे तर.
तिला गुम्ह्यात सुद्धा अडकवेल, नाहीतरी काहीही करु शकतो ज्या वळणाचा मुलगा आहे त्यावरून. किंवा मुलगीच बळी पडेल त्याच्या मागण्यांना.
सध्या, तुम्ही तुमचा फार्स ठेवा चालू की, करू लग्न. घाई काय. .....असे तसे करत.

मुलं झाल्यावर, स्त्रीच्या शरीरात शारीरीक बदल हे विलक्षण व चमतकारीक असतात व वैचारीक सुद्धा. तसे काही वैचारीक बदल झाले तर उत्तम. नाहितर आहेच झुंज पालकांची.
पण जरा बाय-इन टाईम आहे तोवर प्लॅन ठेवा काय करायचे. मुलगी जर इतकी वेडी आहे, तर पालकांनी जीवाला जपावे.

माफ करा पण तुमचा विषय सार्वजनिक करणे चुकीचे वाटते. तुम्हाला अनेक सल्ले मिळतील. पण उत्तर तुम्हालाच शोधायचा आहे. सर्वांनी आपापल्या परीने पर्याय सांगितले. प्रत्येक पर्यायाला जर तर चे दरवाजे आहेत. असं केलं तर तस होईल.
माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला जर त्या मुलाकडे एवढे पुरावे मिळाले आहेत. तर त्यावर कायदेशीर कारवाई का नाही करत जेणेकरून तुम्हाला पुन्हा त्याच्याकडून त्रास होणार नाही, आणि पुन्हा तो इतर कुणालाही फसवणार नाही, ब्लॅकमेल करणार नाही.
तसे केल्यास, कदाचित तुमच्या मुलीच्या मनातूनही तो दुरावले आणि पुढे जाऊन तिला आणि तिच्या बाळाला भविष्य ठरवता येईल.
भविष्य कुणालाही अनप्रेडिक्टबल आहे. त्यामुळे असं केलं तर चांगलं होईल किंवा तस केलं तर वाईट होईल हे आता सांगता येणार नाही. पण तुमचे निर्णय मार्ग सुखकर करण्याचा प्रयत्न करतील. ती मुलगी अजूनही matured नाही त्यामुळे कुमारी माता आणि हे प्रकरण आणि आपल्याकडील समाजस्थिती यांना सामोरं जाणं तिला आणि तिच्या बाळाला कायमचं कठीण असेल. किंबहुना तिच्या पश्चात तिच्या बाळाला ते अत्यंत क्लेशदायक ठरेल.
बाळाला कोणी ऍडॉप्ट करायला मिळेल तर खूप चांगलं होईल, त्याच्या भविष्यासाठी, त्याला मानाने जगण्यासाठी. मुलीचे कर्म तिला भोगावेच लागतील, त्याला पर्याय नाही.

मुलीच्या पालकांवर जो प्रसंग आला आहे त्यातून बाहेर पडण्यास त्यांना मानसिक बळ आणि सर्व सहकार्य लाभावे ही सदिच्छा.
कालपासून हा धागा आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचत आहे. खरेतर मलाही आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी, राग, चिडचिड, हताशपणा या भावना अनिवार झाल्या होत्या.
आमच्या जवळच्या नात्यात असंच एक प्रकरण हाताळलं आहे. मुलगी कॉलेजमधे शिकत असताना तिथल्या शिक्षकाच्या प्रेमात पडली होती. विशेष म्हणजे तो शांतीप्रिय समुदायातील असून विवाहितही होता. त्यातुन मुलीला बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.

Parichit यांनी सांगितल्याप्रमाणे लैगिक स्वप्नरंजन हाही एका मुद्दा आहेच, त्याचबरोबर २४/७ चालणारे करमणूक फडतूस मालिका, ज्यामध्ये स्वैराचार विवाहबाह्य संबंध यांना प्राधान्य देणारे कथानक, ते सर्व आवडीने बघणारा ठराविक प्रेक्षक, त्यामुळे किशोरवयीन मुलं मुली यांच्यावर होणार परिणाम. अडनिड्या वयात, संप्रेकांमुळे (केमिकल लोच्या) शारीरिक आणि मानसिक स्तरांवर होणाऱ्या बदलांसोबत येणारी ऊर्जा, आपलाच खरं करण्याची प्रवृत्ती..... अवघड आहे....

एक वेगळा निष्कर्श - सर्वाना मान्य असेलच असा नाही
अतिस्वातंत्र आणि आणि अति स्त्रीमुक्ती याच्या नावाखाली आपण Alpha Male हा गुणधर्म जवळजवळ नष्ट करण्याचा मार्गावर आहोत. आपल्या सामाजिक संस्कारांवर ज्यावेळी निसर्गदत्त भावना वरचढ ठरतात त्यावेळी किशोरवयीन मुलींना Alpha Male हा गुणधर्म असणारी मुले आकर्षित करतात. आणि अशी मुले खालच्या सामाजिक स्तरावर जास्त प्रमाणात असतात. या स्तरातील सर्वच मुले काही याप्रमाणे नसतात.

माफ करा पण तुमचा विषय सार्वजनिक करणे चुकीचे वाटते. तुम्हाला अनेक सल्ले मिळतील. पण उत्तर तुम्हालाच शोधायचा आहे. सर्वांनी आपापल्या परीने पर्याय सांगितले. प्रत्येक पर्यायाला जर तर चे दरवाजे आहेत. असं केलं तर तस होईल.
माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला जर त्या मुलाकडे एवढे पुरावे मिळाले आहेत. तर त्यावर कायदेशीर कारवाई का नाही करत जेणेकरून तुम्हाला पुन्हा त्याच्याकडून त्रास होणार नाही, आणि पुन्हा तो इतर कुणालाही फसवणार नाही, ब्लॅकमेल करणार नाही.
तसे केल्यास, कदाचित तुमच्या मुलीच्या मनातूनही तो दुरावले आणि पुढे जाऊन तिला आणि तिच्या बाळाला भविष्य ठरवता येईल.

१) पोलिसांनी आधीचं सांगितले आहे की जर मुलीचे बयान त्या मुलाविरुद्ध ती त्या द्यायला तयार असेल तर त्याला खूप मोठी शिक्षा होईल. पण नसेल देत तर नाही होणार.
२) मी हा विषय फक्त वेगवेगळी मते आणि वाटा काय असू शकतात ह्या दृष्टीने केला आहे. ह्यात मी कुणाचे नाव गाव शहर लिहिले नाही. मला इतर ठिकाणी ह्या घटनेची वाच्यता करता आली नसती. इथे लिहितानाही भित भित लिहिते आहे. मदत करण्याची गरज आणि इच्छा वाटते त्या मुलीला आणि तिच्या आईबाबांना.
३) बाळासाठी सगळे प्रयत्न असतील त्याच्या सुखी जीवनासाठी. आईचाही विचार करत आहोत. कुठलेच कृत्य अमानुष नसेल. कुठलेच निर्णय बेकायदेशीरही नसतील.

विशेष म्हणजे तो शांतीप्रिय समुदायातील असून विवाहितही होता.

अरे बापरे. फारच वाईट.
तुम्ही ज्या समाजातून येता तो शांतीप्रिय नाही का? धुडगूस घालणारा आहे का?

१) पोलिसांनी आधीचं सांगितले आहे की जर मुलीचे बयान त्या मुलाविरुद्ध ती त्या द्यायला तयार असेल तर त्याला खूप मोठी शिक्षा होईल. पण नसेल देत तर नाही होणार.---
हा, तुमच्या जबाबाचा विषय झाला. त्याच्या मोबाइल मध्ये इतर मुलींचेही आक्षेपार्ह चित्रण मिळालं असेल तर कारवाईसाठी आणखी कसल्या जबाबाची गरज लागेल असं वाटत नाही. पोलीस प्रशासनाने स्वतःहून सज्ञान घेऊन कारवाई करायला हवी होती.

१) पोलिसांनी आधीचं सांगितले आहे की जर मुलीचे बयान त्या मुलाविरुद्ध ती त्या द्यायला तयार असेल तर त्याला खूप मोठी शिक्षा होईल. पण नसेल देत तर नाही होणार.---
हा, तुमच्या जबाबाचा विषय झाला. त्याच्या मोबाइल मध्ये इतर मुलींचेही आक्षेपार्ह चित्रण मिळालं असेल तर कारवाईसाठी आणखी कसल्या जबाबाची गरज लागेल असं वाटत नाही. पोलीस प्रशासनाने स्वतःहून सज्ञान घेऊन कारवाई करायला हवी होती.

त्यासाठी मी त्यांना जातीने भेटेन आणि त्यांना मला हवी असलेली माहिती विचारेन. आत्ता मला हलता येणार नाही. फोनवरुन अशी कामे होत नाही. मी आणि मुलीचे आईबाबा प्रसूतीनंतर पुढील कारवाया करणार आहोत.

त्यासाठी मी त्यांना जातीने भेटेन आणि त्यांना मला हवी असलेली माहिती विचारेन. आत्ता मला हलता येणार नाही. फोनवरुन अशी कामे होत नाही. मी आणि मुलीचे आईबाबा प्रसूतीनंतर पुढील कारवाया करणार आहोत.---
तुमच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा.... सर्वजण या मोठ्या संकटातून सुखरून सुटून नव्याने आयुष्याला सुरुवात करावी हि सदिच्छा..... मला माहित आहे सदिच्छा देऊन सहानुभूती दाखवणे सोपे असते. तुम्ही प्रत्यक्ष मदत करत आहात ते खूप मोठे कार्य आहे. एवढे कष्ट घेऊन मुलीने सकारात्मक बदल घडवावेत नाहीतर सर्व प्रयत्नांवर पाणी.

सल्ला वगैरे तर नाहीच देऊ शकणार पण अशी वेळ कुणा पालकांवर येऊ नये हीच प्रार्थना..
बाकी हा धागा आणि विषय कायम लक्षात राहील. हादरवून टाकलंय एकेका पोस्ट नी. मुलगा मुलगी , आई वडील आणि येणारं बाळ ह्यांचं काय झालं असं वाटत राहिलं कायम. सगळ्यांचं जे काही होईल ते चांगलं च होवो...

सगळ्याचे मुद्दे वाचले ( खर तर सगळ्या कॉमेंट्स वाचल्या नाहित पण ज्या वाचल्या त्या) . आता माझ्या कॉमेंट ची त्यात भर घालते. आता तुमची मैत्रिण घर सोडुन ८०० किलोमिटर दूर जाऊन राहीली आहेच ना मग मैत्रिणीला सांगा तिथेच रहा. आता दोघेही ( मैत्रीण आणि त्यांचें मिस्टर)नोकरी करत असतील तर रिटायर झाले आहेत का नाही?. झाले नसतील तर मुलीच्या वडिलांना राहुदे स्वतःच्या घरी आणि रिटायर झाल्यावर यांना जॉईन होउ दे पण मायलेकिने मात्र ८०० किलोमिटर दूरच रहावे. मुलाला जन्माला घालावे वाढवावे. दोन वर्षांत मुलगी ठिकाणावर येइल. मुलाचं करतां करतां तिला त्या मुलाची आठवण पण येणारं नाहीं. कमीच येईल किंवा आलीच तर माझ्यावर एकटी वर मुलाची जबाबदारी टाकून हा आपला मोकळा म्हणून रागच येण्याची शक्यता जास्त.हळू हळू तिची त्याच्या बद्दलची ओढ निवळेल. आणि काही वर्षांनी तिला लग्न करण्याची इच्छा झाल्यास मुलासकट जबाबदारी स्वीकारणारा जोडीदार पण मिळू शकेल. काळ हे सगळया विवांचानेवर औषध असतं हे नक्की. तिला आणि तुमच्या मैत्रिणीला आणि मुलीच्या वडिलांना सगळ्यांनाच सावरण्यासाठी शुभेच्छा

पान एक पर्यंतच कॉमेंट्स वाचल्या आहेत . पुढच्या कॉमेंट्स उद्या वाचेन ( रात्र खुप झाली आहे) पण रहाववल नाही म्हणून माझी कॉमेंट पोस्टली

आज सगळे प्रतिसाद वाचले . कदाचित आतापर्यंत मुलीची प्रसुती पण झाली असेल कारण शुजिताचा शेवटचा प्रतिसाद ३१ ऑगस्ट आहे .मी पहिल्यांदाच काल हा धागा बघितला तरी लिहिणार आहे .मुलगी हे सगळं थंड डोक्याने करुन घेणारी आहे. कुठल्या तरी मानसिक आजाराने सुध्दा पीडित दिसते त्याकरतां मानसीक रोग तज्ञालाच विचारावं लागेल. मुलीचं बाळंत पण करावं पण मुल जन्मल्यानंतर ते दत्तक देण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत. तिथे जर मुलगी अडवणूक करत असेल तर तीला एकटीलाच मुलाचे सगळे करायला लावावे. एक अंघोळ घालण सोडल्यास. मुलीच्या आईने बाळाचे करण्यात कुठलाही पुढाकार घेऊ नये. पण मुलीवर लक्ष मात्र ठेवावे. कदाचित एकटीलाच सगळे करावे लागते या भावनेतून कंटाळुन ती मुल दत्तक द्यायला तयार होईल. नंतरचे नंतर . मुलगी कशी वागेल काय वागेल याची चिंता सध्या करूं नंये. आणि इतक सगळं होऊनही काही महिन्यांनी/ एखाद्या वर्षाने सुध्दा त्या प्रेमपात्र मुलाचं भूत तिच्या डोक्यातून उतरलं नाहीच आणि आई वडिलांना त्रास द्यायला परत सुरवात केल्यास "तुझी तू जा त्याच्याकडे आता आम्ही तुला अडवणार नाही म्हणावे" तिच्या मनाप्रमाणे तीला करु द्यावे अणि मालमत्ता मात्र तिच्या नावावर करु नये . तसे मृत्यू पत्र केले आहे याची तिला महिती द्यावी नाहीतर त्या आशेने परत आई वडिलांना त्रास द्यायची . सगळे चांगलें झाल्यास मृत्युपत्र कोणीही बदलू शकते . चांगलें नाहीच झाले तर स्वतःच्या नावावर च संपत्ती ठेवावी . दोघांच्या पश्चात एखाद्या अनाथ आश्रमाला सगळी संपत्ती दान द्यावी.

ही घटना जर खरी असेल तर , दुसर्‍यांच्या खाजगी बाबी अशा पब्लिक फोरमवर मांडुन काय मिळवलतं. हेच जर तुमच्या घरात झालं असतं आणि तुमच्या मैत्रीणीने असा ( नाव गाव गुपीत ठेवुन) बोभाटा केला असता तर तुम्हाला चालला असता का ?
सगळ्या जगाची मतं घेऊन प्रश्न सुटत असतात का ? हे त्या नवरा बायको आणि गाढवाच्या गोष्टीसारखं झालयं.

सगळ्या जगाची मतं घेऊन प्रश्न सुटत असतात का ? हे त्या नवरा बायको आणि गाढवाच्या गोष्टीसारखं झलायं.
हे एकदम पटलं आहे.

ऐकावे जनाचे, करावे मनाचे पण असत की ओ.
जेव्हा सगळीकडून अवघड परिस्थिती येते तेव्हा आपले विचार भरकटतात. 4 जणांचे विचार ऐकून ते पडताळून पाहता येतात.
मग को त बो हा विभाग कशासाठी आहे?
मी मुलींना आवडत नाही काय करू?
शेजारीण सारखी वाटी घेऊन नॉनव्हेज मागते तिला कसं टाळू ?
बाल्कनीत शॉर्टस मध्ये उभं राहू की नको?
असे प्रश्न विचारून पोल घेण्यासाठी?

या धाग्यातून कुणाचीही ओळख उघड झालेली नाही ,अगदी धागा कर्तीही. उद्या या तिघी तुमच्या शेजारून गेल्या तरी तुम्हाला कळणार आहे का 'त्या अवघड ' परिस्थितीत असलेल्या ह्या आहेत म्हणून

जगाला विचारून कुणाचेच कुठलेच प्रश्न सुटत नसतात. आपले प्रश्न आपले आपणच सोडवायचे असतात. कुणी जवळच्या व्यक्तीपाशी मन हलकं करतं , कुणी प्रोफेशनल समुपदेशकाची मदत घेतं तसच कुणी माबो सदस्य हा एक परिवार वाटतो म्हणून तिथं आपलं मन मोकळं करून बोलतं.
4 जण बोलताना 4 वेगवेगळ्या बाजू ही समोर येतात ज्या पेचात पडलेलो असताना दिसत नसतात.

मोबाईल कोणता घ्यावा?
मिक्सर ,फुप्रो कोणता चांगला आहे?
हे विचारलेलं चालतं पण कोणाला रुमाल कोणता चांगला? हेअर ड्रायर कोणता घ्यावा असले सिमीलर प्रश्न ही खटकतात. विनोदी किंवा हडतुड करावे वाटतात.

धागाकर्ती च्या प्रश्नाचे काहीतरी सोल्युशन निघालेले असो एव्हाना. इथे अपडेट ही द्या जमेल तेव्हा.

आशिकाची हडळ +1 सर्वात महत्वाचे म्हणजे प्रश्नकर्तीने ओळख कुठेही दिली नाही .कुणाचा प्रॉब्लेम मांडून त्यावर सोल्युशन मिळावं यासाठी सोशल मिडियावरही तरी नाही लिहायचं तर कुठे लिहायचं.उत्तर मिळण्यापेक्षाही विविध प्रकारच्या लोकांची मत विचार कळून जर का प्रॉब्लेम सोल्व्ह करण्यासाठी मानसिक आधार जरी मिळत असेल तर काय हरकत आहे.त्यातूनही जर प्रॉब्लेम लपवायचाच ठरवलं तर उत्तराचा प्रश्नच मिटतो .सगळ्यांनाच नाही सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं सोपं जात.

आ. ह. , खरंय.
आणि लगेच ‘हा धागा खोटाय का’ हे पण विचारु नये असे वाटते. जोवर चर्चा रुळावर असते तोवर धाग्याचा प्रश्न खरा की खोटा यावर चर्चा घसरु नये कारण एखादा प्रश्न आज अस्तित्वात नसला तरी उद्या पण नसेलच असे नाही. त्या ‘टॉक्सिक फ्रेंडशिपवर‘ पण ‘हे खरे कशावरुन‘ असा संशय व्यक्त केला गेलेला वाचला. पण तिथे प्रतिसाद चांगले आलेत खरंतर.

नमस्कार आणि परत एकदा मनापासून सर्वांचे खूप खूप आभार.

मी - प्रयत्नांती परमेश्वर असतो - हे लिहूण तात्पुरते थांबले होते. आज आनंदी भरल्या मनाने इथे परतत आहे. ह्यातून नैतिक मार्गाने बाहेर पडायला आम्हाला अनेकांची खूप मदत मिळाली. तुमच्या मतांचातर केवढा तरी फायला झाला. मस्त ब्रेन-स्टॉर्मिंग झाले. शेवटाच्या दिवसात मुलीनेही साथ दिली. खूप खोलवर लिहित नाही. पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रोसेस झाल्यात. बाळाला आणि आईला योग्य ती दिशा मिळाली ह्यासाठी मात्र तुमचे जरुर आशिर्वाद आणि शुभेच्छा द्या.

परत एकदा आभार.

चला.. बरं झालं!
बाळाला आणि सर्वांनाच शुभेच्छा!

All is well that ends well.
पुढील वाटचालीस शुभेच्छा

शुजिता, मुलीने सपोर्ट केलाय आणि सगळं मार्गी लागलं ते वाचुन बरं वाटलं.
खुप डीटेलमधे नाही पण थोडक्यात काय झालं/घडलं/केलं ते इथे लिहाल का? घटना/विचारबदल ईत्यादी.

Pages