कुमारी मातृत्व आणि पुढील अवघड वाटा - कोणाशी तरी बोलायचंय

Submitted by शूजिता on 27 August, 2021 - 06:10

नमस्कार,
दीड महिन्यापुर्वी माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा एक फोन आला आणि ती जी हुंदके देत देत मला सांगत होती ते ऐकून मी एकदम स्तंभित झाले. तिची मुलगी फक्त २० वर्षाची. आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला. दिसायला सावळी पण फारचं गोड कुणाच्याही नजरेत भरणारी. कमालीची शांत आणि अगदी निरागस वाटणारी. तिची आई म्हणजे माझी मैत्रिण तिला एकुलती एकचं कन्या. त्या मुलीला दिवस गेलेत आणि ती घरुन पळून गेली. साडेसहा महिन्याची गरोदर मुलगी आणि माझ्या मैत्रिणीच्या हे लक्षात आले नाही. मुलगी वाढत्या वयानुसार शारिरिक बदल तिच्यात होत आहेत असेचं तिला वाटले. त्यामुळे गरोदर पणात स्त्रिला जी गोलाई येते त्याकडे तिने कानाडोळा केले. कुठल्याचं आईला आपल्या अविवाहित मुलीच्या अंगावरचे वाढलेले मास पाहून असे वाटणार नाही की ती गरोदर आहे. तिथे माझी मैत्रिण फसली बिचारी.

पाच दिवसानंतर खूप प्रयत्नानंतर शेवटी पोलिस जागे झाले आणि त्यांनी मदत केली. मुलगी परत मिळाली. एका छोट्याशा झोपडीत एका मुलाबरोबर होती. तो तिचा प्रियकर. एकदम सडकछाप मवाली मुलगी. चवथा वर्ग नापास. वय २२ वर्ष. मुली पटवायला एक नंबर आणि लफडेखोर. ह्या मुलाच्या तावडीत इतक्या चांगल्या घरची मुलगी फसली. तिचे त्याच्यावर प्रेम जडले पण त्याने फक्त तिचे शारिरिक शोषण केले.

संसार तसाचं सोडून माझी मैत्रिण दुसर्‍या शहरात गेली. तिथे एक बी एच के शोधले. गर्भपात व्हावा म्हणून वणवण भटकली पण इतक्या उशिरा आता ते शक्यचं नव्हते. आता तिची मुलगी ९ व्या महिन्यात प्रदार्पण करेल. इतक्या शांत मुलीच्या मनात केवढे काय काय साचून होते हे ती आता व्यक्त करते आहे. मी आत्ता तिच्याकडे एक दोन दिवस राहायला आले आहे. तिला आधार मिळावा म्हणून आणि काही मदत करता यावी म्हणून.

मुलीला हे मुल दत्तक द्यायचे नाही. किंबहूना मुल जन्माला घालून आपले आईवडील नाईलाजाने आपले लग्न ह्या मुलीशी लावून देतील ही तिची योजना होती. पण तिला माहिती नाही हे प्रकरण किती दाहक आहे.

मी इथे येऊन विचारणा केली. जिथे तिची प्रसूती ठरली आहे त्या डॉक्टरांना आमची फारचं किव आली आणि त्यांनी हमी दिली की त्या एका एन. जी. ओ. कडून हे मुल दत्तक देण्याची सोय करतील आणि ह्यात जिचे मुल आहे तिची सही लागणार नाही. तसेही अशी मुले बेवारस सापडतात. कचर्‍यात, गटार्‍यात, नदीच्या वाहत्या पाण्यात, देवळात, अनाथालयाच्या दारात, कुण्याच्या ओट्यावर, कुणाच्या अंगणात!! कुंतीनेही कर्णाला वाहत्या पाण्यात सोडलं होतं. आपण तर साधी माणसे. ह्या भावना जाऊ देत.. पण मुल दत्तक दिल्यावर ही मुलगी किती आकांत मांडेल? ती जगू देईल का तिच्या पालकांना? तिचे पुढील शिक्षण पुर्ण करु शकेल का? परत तिचे लग्न होईल का? वय फक्त २० आहे मुलीचे तर अजून १० वर्ष वेळ आहे तिला तोवर ही घटना पुसली जाईल. तिचे भले होऊ शकेल. पण मुलीने परत असेचं थेर केलेते? परत ती तेथून पळून परत त्या मुलाकडे गेली तर? मुलगा लग्न करायला तयार आहे म्हणाला पण नक्कीचं लायक पात्र नाही. मग अशा मुलाशी लग्न करुन काय उपयोग. शिवाय, अशी हार पत्करुन आपण समाजाला काय शिकवण देत आहोत? जर आपण हे मुल तिला दिले आणि तिला त्या मुलाशी लग्न करु नाही दिले तर चालेल का? असे एक नाही अनेक विचार आम्हि दोघीनी बोलताना मांडले.

मी इथे फार लिहित वा वाचत नाही. पण अचानक मला मायबोली आठवली आणि वाटलं इथे आपण मत मांडून बघावे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे
वाचून वाईट वाटलं.
दत्तक द्यायचं नसेल, थोडाफार खर्च उचलण्याची तयारी असेल तर वेगळ्या शहरात सेटल होऊन मूल वाढवता येईल.
फ्रेश स्टार्ट.
जो काही निर्णय घेतला जाईल तो पुढे नेण्याची मानसिक शक्ती मिळो.

बापरे...काटा आला वाचुन अंगावर. कसं सांभाळायचं अशा अडनिड्या वयातल्या मुलिंना ?
मुलीच्या शरीरातले बदल समजले नाही हे ठिके पण तिचे ५-६ महिने पिरीअड आले नाहित हे कसं काय लक्षात नसेल आलं ? मी दोष देत नाहिये तुमच्या मैत्रिणीला पण तरी हा प्रश्ण पडलाय.
तुमच्या समस्येचे काही उत्तर माझ्या कडे तर नाहिये पण योग्य तो मार्ग सापडु दे अशी प्रार्थना.
तुम्ही कौन्सेलर कडे गेलाच असाल असं गृहीत धरते आहे मी. कदाचित अशा अजुन केसेस त्यांनी हाताळल्या असतील तर तिकडे चांगला सल्ला मिळेल.

बापरे...काटा आला वाचुन अंगावर. कसं सांभाळायचं अशा अडनिड्या वयातल्या मुलिंना ?
मुलीच्या शरीरातले बदल समजले नाही हे ठिके पण तिचे ५-६ महिने पिरीअड आले नाहित हे कसं काय लक्षात नसेल आलं ?>>> अगदी हेच मनात आलं.
काऊन्सिलींग करून काहीतरी मार्ग निघू दे.

तसेही अशी मुले बेवारस सापडतात. कचर्‍यात, गटार्‍यात, नदीच्या वाहत्या पाण्यात, देवळात, अनाथालयाच्या दारात, कुण्याच्या ओट्यावर, कुणाच्या अंगणात!! कुंतीनेही कर्णाला वाहत्या पाण्यात सोडलं होतं. आपण तर साधी माणसे. ह्या भावना जाऊ देत.. >>

परत एकदा वाचले हे....तुम्ही आणि मैत्रिण असा विचार करत असाल तर सध्यातरी तुमचे विचार त्या होणार्‍या आई ला भयंकर क्रूर वाटणार आहेत. कसेही असले तरी ते मूल तिचे आहे....९ महिने पोटात वाढवलेले...आणि जे झाले त्यात बाळाचा काय दोष आहे ?...एक आई म्हणुन हे वाचुन अजुनच वाईट वाटले मला. असं कुठल्यातरी एन.जी.ओ. कडे मूल सोपवणं तरी कितपत योग्य आहे ?
प्लीज प्लीज तुम्हि सगळेच लवकरात लवकर समुपदेशकाचा सल्ला घ्या इतकेच सांगु शकते.

मुलगी २० वर्षांची आहे म्हणजे सज्ञान आहे. लग्न न झालेली स्त्री ही तिच्या अपत्याची एकल पालक असेल, अपत्याच्या वडीलांचे नाव गरजेचे नाही असा कायदा आहे. मूल जन्माला आल्यावर या कायद्याने सज्ञान मुलीच्या सहीशिवाय ते मूल दत्तक देणे हे तिच्या पालक म्हणून असलेल्या हक्कावर आक्रमण झाले. 'मुलीच्या सहीशिवाय मूल एनजीओला दत्तक देण्यासाठी....' वगैरे सांगणारे डॉक्टर्स असल्यास मी तरी डॉक्टरच बदलेन. मान्य आहे की जी परीस्थिती आहे ती मुलीच्या कुटुंबासाठी क्लेशकारक आहे पण तरी कायदा धाब्यावर बसवायची चूक करु नये. 'तसेही अशी मुले बेवारस सापडतात' वगैरे भाषा खटकली. ती मुले बेवारस होतात कारण स्वतःला समाजात उजळ माथ्याने वावरता यावे म्हणून त्यांना बेवारस केले जाते. पहिल्यांदा मुलीसाठी चांगले डॉक्टर आणि काउंसेलर शोधा. मूल स्वतः एकटे वाढवणे, दत्तक देणे , प्रियकरासोबत लग्न करुन एकत्र मूल वाढवणे यातले जे काही करायचे ते समजून उमजून निर्णय घेवून स्वतःच्या जबाबदारीवर करण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे. मूल झाले की आईवडील नाईलाजाने लग्न लावून देतील वगैरे भ्रमातून मुलगी बाहेर येणे गरजेचे. लग्न करण्यासाठी सज्ञान असल्याने पालकांच्या परवानगीची गरज नाही , पण लोकलाजेस्तव पालक लग्न लावून देतील आणि आर्थिक आधारही देत राहातील अशी अपेक्षा असल्यास तसे होणार नाही हे देखील स्पष्ट करावे. मुलीला झटपट मोठे व्हावे लागणार आहे याची जाणीव द्यावी. यात 'घरची अब्रू, आमचे संस्कार...' वगैरे भानगडी न आणता मुलीला वास्तवाची जाणीव करुन देणे आणि तिला नक्की काय झेपेल याचा विचार करायला लावणे गरजेचे. कुटुंबाची प्रतिष्ठा/अब्रू , स्वतःचे प्रेम प्रकरण यापेक्षा जन्माला येणार्‍या बाळासाठी काय योग्य असेल असा विचार मुलीकडून झाला तर बाळाला चांगले आयुष्य मिळावे म्हणून दत्तक निर्णयाप्रत मुलगी स्वतःहून येण्याची आणि यातून सावरुन स्वतःचेही अयुष्य मार्गी लावण्याची शक्यता जास्त आहे.
मुलीच्या पालकांनी झाल्या घटनेबद्दल स्वतःला/ एकमेकांना दोष देणे टाळावे. एका ठराविक वयानंतर आपण मुलांचे वागणे कंट्रोल करु शकत नाही, ते स्वतःसाठी योग्य पर्याय निवडतील अशी फक्त आशा बाळगू शकतो.

१३ वर्षं एक महिन्यात फक्त एक लेख..? आणि तोही वाचकांना भंडावून सोडणारा..?? असो.

मी लेख वाचला पण घटनाक्रम बघुन मलाच काही प्रश्न पडले -
१. कोणत्याही चांगल्या घरातील आई वडिलांना आपल्या मुलीला २० व्या वर्षी एकाच घरात रहात असुनही ६ महिने गर्भार राहिलेली कळले कसे नाही?
२. चांगल्या घरातील २० वर्षांची मुलगी नीट शिकली सवरली असेल तर ती नक्कीच पदवीपर्यंत शिकत आलेली असेल तर ती अशा ४ थी नापास मुलाच्या प्रेमात कशी पडेल?
३. समजा तो झोपडीतला ४थी नापास मुलगा कतृत्त्ववान नसेल परंतु चांगल्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा असेल म्हणुन ती चांगल्या घरातील मुलगी अशी अविचाराने रासलीला करून गर्भार रहात असेल तर त्या मुलीची मानसिकता काय असेल?
४. त्या मुलाने तिला ब्लॅकमेल करुन तिचा गैरफायदा घेऊन केलेल्या कृत्याने ती चांगल्या घरातील मुलगी गर्भार राहिली असेल तर ती ते मूल आधीच अ‍ॅबॉर्ट करू शकली असती परंतु तिला त्या झोपडीत सुख दिसत असेल तर तिचे मूल तिच्या परवानगी व्यतिरिक्त असे अनाथालयात देणे कोणत्या कायद्याने करणार आहात.?
५. चांगल्या घरातील मैत्रीणीच्या घरातील खाजगी प्रश्नांत तुम्ही बेकायदेशिर निर्णयात सामिल झालात अन पुढे त्या मुलीने/तिच्या झोपडपट्टीत रहाणार्‍या मित्राने तुमच्या विरोधात पोलिस कारवाई केली तर मग तुम्ही काय कराल...?

स्वाती२, प्रतिसाद आवडला आणि पटला.
शूजिता, या परिस्थितीतून तुम्हाला सर्वांना योग्य तो मार्ग सापडो.>>>> +१.

त्या डॉक्टरांना आमची फारचं किव आली आणि त्यांनी हमी दिली की त्या एका एन. जी. ओ. कडून हे मुल दत्तक देण्याची सोय करतील आणि ह्यात जिचे मुल आहे तिची सही लागणार नाही. तसेही अशी मुले बेवारस सापडतात. कचर्‍यात, गटार्‍यात, नदीच्या वाहत्या पाण्यात, देवळात, अनाथालयाच्या दारात, कुण्याच्या ओट्यावर, कुणाच्या अंगणात!! कुंतीनेही कर्णाला वाहत्या पाण्यात सोडलं होतं. आपण तर साधी माणसे. >>>> हा भाग जरा अतिशयोक्ती टाळून लिहिला असता तर कदाचित गोष्ट खरी वाटली असती.

असो, तरीही स्वाती२ यांचा संयमीत प्रतिसाद आवडला.

वाईट वाटले हे वाचून. स्वाती, तुमचा प्रतिसाद पटला, पण खरं म्हणजे अशा कंडीशन मध्ये त्यांना कायदा वगैरे गोष्टी सुचणं अवघड असेल, आधीच एवढ्या प्रमाणात मानसिक खच्चीकरण झाले असेल, त्यामुळे यातून सुटका कशी करावी एवढाच विचार आला असेल. आणि २० म्हणजे तशी लहानच आहे त्यामुळेच तर असं पाऊल उचलले गेले. त्यांना योग्य तो निर्णय घ्यायला मानसिक बळ मिळो.

मुलीच्या शरीरातले बदल समजले नाही हे ठिके पण तिचे ५-६ महिने पिरीअड आले नाहित हे कसं काय लक्षात नसेल आलं ?>> कारण आजकालच्या पोरी सांगतच नाहीत आईला किंवा अजून कोणाला आता या गोष्टी , की आई आज त्रास होतोय , पोट दुखतंय वगैरे. मैत्रिणींशी फक्त कदाचित शेयर होत असतील या गोष्टी. त्यामुळे आईला वाटतं की ही करते तीचं तीचं परीयड्स हॅंडल, सो कळालं नसेल.

स्वाती2, अगदी हेच डोक्यात आले पण नीट मांडता आले नाही.

डीजे, प्रेम वेडं असतं आणि त्यात जर फिजिकल संबंध असतील तर स्त्री ची मानसिक गुंतवणूक खूप असते(उसने मेरी आत्मा को छुआ है वगैरे)

थायरॉईड किंवा अगदी नवे नवे पिरियड आले असल्यास रेग्युलर नसतात, कळले नसेल.पोषण नीट असणे हाही भाग असेल.
(माझ्या आजूबाजूला असे कोणी सध्या तरी नाही.पण प्युबर्टी, सुरक्षा नाही, आईवडील कामात,बर्थ कंट्रोल साधने जवळ योग्य वेळीनाहींत यात अश्या घटना घडतात, घडत असाव्यात)

कोणत्याही शेडी डील मध्ये पडू नये(डॉ नी सांगितले की जन्मदात्या आईचे नाव न लावता दत्तक वगैरे)
हे रेकॉर्ड वर नसलेले मूल चाईल्ड ट्रॅफिकिंग, अवयव विकणे यासाठी वापरले जाऊ शकते(लिहिताना पण श्वास अडकतोय)

काहीही धागा आहे. टोटल करमणुक! पॉपकॉर्न आणा!
हे असले टॉक्सिक विचार! मुलांना स्वत:च्या पायावर उभं रहायला शिकवलं नाही, लैन्गिक शिक्षण दिलं नाही की असंच होणारच!
बाकी २०२१ मध्ये चौथी नापास! Rofl तुमचा पिक्चर चाळीस वर्षे मागे अडकला आहे. काहीतरी विश्वास बसेल असं लिहायचं की हो!
झोपडीत रहात होती ना? परत सोडून या तिकडे. २० वर्षांची आहे, सो सज्ञान आहे. पोलिसांनी का म्हणून काही अ‍ॅक्शन घ्यावी?
तुम्ही तुमच्या मुला/मुलीला बाहेर जाताना काँडोम आहे ना विचारता का? विचारत नसाल तर विचारत जा. आणि पैसे देतो, फोन देतो तसा देतही जा!

मुलगा चौथी पास असेल पण होनहार असेल तर ?

जर पोलीस कारवाईनंतर मुलगी आईवडिलांकडे परत आली तर मग ओबविअसली पोलीसनी त्या मुलाचा जबाब घेतला असेलच , म्हणजे आता हे प्रकरण डॉक्युमेंटेड आहे

एका छोट्याशा झोपडीत एका मुलाबरोबर होती. तो तिचा प्रियकर. एकदम सडकछाप मवाली मुलगी. चवथा वर्ग नापास. वय २२ वर्ष. मुली पटवायला एक नंबर आणि लफडेखोर>> हे कोणी ठरवलं?
माफ करा. पण तुम्ही त्या मुलाला भेटला का? भेटला नसाल तर त्रयस्थ व्यक्तीबद्दल सोशल मीडिया वर असे लिहिणे कितपत योग्य आहे?
तो झोपडीत का असेना तिला सांभाळतो आहे. यावरुन तरी त्याला जबाबदारीची जाणीव दिसते. दुसरा असता तर हात वर केले असते. ते १८ वर्षाच्या वर आहेत. त्यांनी लग्न करुन घेतले असते तर कायदाही त्यांच्या बाजुने असता.

शूजिता,
तुम्ही जे लिहिले आहे ते खरे की खोटे या फंदात मला पडायचे नाही पण तुमच्या लेखनात अजून जे काही खटकले ते ----
१. दिसायला सावळी पण फारचं गोड कुणाच्याही नजरेत भरणारी. . >>. मुलगी वर्णाने सावळी, फारच गोड, कुणाच्याही नजरेत भरणारी एवढे वर्णन पुरेसे आहे की. मधे तो पण कशासाठी?
२. तिचे त्याच्यावर प्रेम जडले पण त्याने फक्त तिचे शारिरिक शोषण केले. >> प्लीज, दोन सज्ञान व्यक्ती राजीखुशीने एकत्र आल्या तर ते शारिरीक शोषण नाही. तुम्हाला लग्नाशिवाय लैंगिक संबंध अयोग्य वाटत असले तरी इथे जे काही झाले ते परस्पर संमंतीने झाले आहे त्याला उगाच शोषण वगैरे म्हणून खर्‍या शोषणाचे गांभिर्य कमी करु नका. They had cosentual sex and it resulted in pregnancy. आता तिने जो मुलगा प्रियकर म्हणून निवडला तो तुम्हाला योग्य वाटत नाही तर लगेच शोषण?

आपली मुलगी ५ दिवस गायब झाली तर त्रास होतो. पण मुलीचे मूल तिच्या सहीशिवाय देऊन टाकायचे याला आईची (आजीची) संमती Sad हे म्हणजे मुलीला डायलॉग सिच्यूएशन झाली -
"मेरी कोई फिलिंग नही है, तुम्हारी फिलींग तुम्हारी, त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता" झालं...

असो. बाळंतपण सुखरूप व्हावे व सर्वांच्या हिताचे होईल असा मार्ग निघावा यासाठी खूप शुभेच्छा.

सर्वांचे प्रतिसाद वाचले. धन्यवाद.

काहींना इथे उत्तरे देत आहे.

१) शरीरातले बदल समजले नाही हे ठिके पण तिचे ५-६ महिने पिरीअड आले नाहित हे कसं काय लक्षात नसेल आलं ? >>
स्मिता श्रीपाद, पाळी आली नाही आली हे लक्षात न येण्यासाठी मुलीने दर महिन्याला पाळी येते त्या तारखेला मुद्दाम पॅड सोबत घेऊन जायची अंघोळीला आणि पाळी आल्याची नाटक करायची. त्यामुळे आईला लक्षात आले नाही. कोविडच्या काळात मुलगी फार वेळ कधी घराबाहेर पडली नाही. चार पाच वेळा गेली असेल फक्त.

२) परत एकदा वाचले हे....तुम्ही आणि मैत्रिण असा विचार करत असाल तर सध्यातरी तुमचे विचार त्या होणार्‍या आई ला भयंकर क्रूर वाटणार आहेत. कसेही असले तरी ते मूल तिचे आहे....९ महिने पोटात वाढवलेले...आणि जे झाले त्यात बाळाचा काय दोष आहे ?...एक आई म्हणुन हे वाचुन अजुनच वाईट वाटले मला. असं कुठल्यातरी एन.जी.ओ. कडे मूल सोपवणं तरी कितपत योग्य आहे ?
प्लीज प्लीज तुम्हि सगळेच लवकरात लवकर समुपदेशकाचा सल्ला घ्या इतकेच सांगु शकते.>>

स्मिता श्रीपाद, समुपदेशकाचा सल्ल घेण्याचे काम आम्ही आधी केले. तीन वेगवेगळे समुपदेशक घरी येऊन त्यांनी समजवून सांगितले पण त्याचा मुलीवर किंचितही परिणाम नाही झाला. उलट ती अजून धीट झाली आहे. समुपदेशक हेचं म्हणालेत ती ज्या वयात आहे त्या वयात मुलाना समजवून सांगणे फार अवघड असते. बर्‍याच प्रकरणात मुलांना ह्या गोष्टीची उर्मी असते त्याच गोष्टी त्या करुन दाखवतात. त्यांनी आईवडीलांना ह्यातून सावरायला सांगितले आहे.

३) डीजे - तेरा वर्षात एक दोन वेळा लिहून एक डिजे मिळाली. रोज लिहू लागले तर किती डीजे मिळतील!! तुमच्या मुद्द्यातून जराही अनुकंपा जाणवत नाही.

४) काहीही धागा आहे. टोटल करमणुक! पॉपकॉर्न आणा!
हे असले टॉक्सिक विचार! मुलांना स्वत:च्या पायावर उभं रहायला शिकवलं नाही, लैन्गिक शिक्षण दिलं नाही की असंच होणारच!
बाकी २०२१ मध्ये चौथी नापास! Rofl तुमचा पिक्चर चाळीस वर्षे मागे अडकला आहे. काहीतरी विश्वास बसेल असं लिहायचं की हो!
झोपडीत रहात होती ना? परत सोडून या तिकडे. २० वर्षांची आहे, सो सज्ञान आहे. पोलिसांनी का म्हणून काही अ‍ॅक्शन घ्यावी?
तुम्ही तुमच्या मुला/मुलीला बाहेर जाताना काँडोम आहे ना विचारता का? विचारत नसाल तर विचारत जा. आणि पैसे देतो, फोन देतो तसा देतही जा!
>>
अमितव, पुरुषांना स्त्रि म्हणजे एक करमणूक वस्तू वाटते. मुलगी फक्त २० वर्षाची आहे. तुम्ही तरी २० वर्षात स्वतःच्या पायावर उभे होता का? लैंगिक शिक्षण म्हणजे नक्की काय काय सांगायचं? तुम्हाला तुमच्या आई वडीलांनी लैगिक शिक्षण दिलय का? इथे लिहा मी ही सांगेल माझ्या दोन मुलींना. २०२१ मधे चौथी नापास सापडणार नाही हे अनुमान कशावरुन? भारतात १ बिलियन पेक्षा जास्त लोक राहतात आणि इथे जगण्याचे खूप वेगवेगळे स्तर आहेत. मी तुम्हाल बिन शिकलेले मुलेही दाखवून देते. २० वर्ष कायद्यानुसार जरी व्यक्ती सज्ञान असली तर ती विचाराने सज्ञान नसते. २० खूप कमी वय आहे असे निर्णय घ्यायला. पुरेसे शिक्षण नाही. नोकरी नाही. लग्नही झाले नाही. आणि मुल जन्माला घालायले. ह्यात ज्ञान दिसते का तुम्हाला? कायदा जाचक आणि अन्यायकारकही असतो. कित्येकांना कायद्याचा त्रास होतो त्यांचे खरे असूनही न्याय मिळत नाही. कायद्याचा गैरफायदा घेणारेही अनेक जण इथे सापडतील.

५) मुलगा चौथी पास असेल पण होनहार असेल तर ?

जर पोलीस कारवाईनंतर मुलगी आईवडिलांकडे परत आली तर मग ओबविअसली पोलीसनी त्या मुलाचा जबाब घेतला असेलच , म्हणजे आता हे प्रकरण डॉक्युमेंटेड आहे??
ब्लॅककॅट- मुलगा वाया गेलेला आहे. पोलिसांनी खुद्द आम्हाला सांगितले आहे. मुलीचा होत असेल तर लगेच गर्भपात करा आणि मुलीला मुलीच्या तावडीत जाऊ देऊ नका. मुलाच्या फोनमधे अनेक मुलीचे नग्न फोटो. त्याने केलेले नग्न चित्रिकरण आढळले. त्याच्या इन्स्टाग्राममधे किळसवाणे पोर्नो होतो. वासनेने गंजलेला आहे तो मुलगा. बाकी काही नाही.

६) एका छोट्याशा झोपडीत एका मुलाबरोबर होती. तो तिचा प्रियकर. एकदम सडकछाप मवाली मुलगी. चवथा वर्ग नापास. वय २२ वर्ष. मुली पटवायला एक नंबर आणि लफडेखोर>> हे कोणी ठरवलं?
माफ करा. पण तुम्ही त्या मुलाला भेटला का? भेटला नसाल तर त्रयस्थ व्यक्तीबद्दल सोशल मीडिया वर असे लिहिणे कितपत योग्य आहे?
तो झोपडीत का असेना तिला सांभाळतो आहे. यावरुन तरी त्याला जबाबदारीची जाणीव दिसते. दुसरा असता तर हात वर केले असते. ते १८ वर्षाच्या वर आहेत. त्यांनी लग्न करुन घेतले असते तर कायदाही त्यांच्या बाजुने असता.
>> वीरु -

मुलाने मुलीला एका वेश्येच्या झोपडीत ठेवले होते. जिथे अधूनमधून तो जातो तिथे. तो कुठलेही काम करत नाही. मुलीला जे पैसे घरुन मिळायचे ते पैसे ती त्या मुलाला द्यायची. त्याच्या फोनचे पैसे मुलगी भरायची. त्याचे कपडे खाणे पिणे हीच करायची. मुलीच्या वडीलांची सोन्याची अंगठी हरवली होती. ती हीने त्या मुलासाठी घेऊन विकली होती. त्याला त्यातून नवीन कपडे आणि इतर वस्तू घेऊन दिल्या होत्या. आईने वाढदिवसाला आय फोन घेऊन दिला होता तो पाण्यात पडला असे कारण सांगून तो फोन दिले ह्या मुलाला दिला होता. तिच्या ए टी एम चे कार्ड त्याच्याकडे असायचे. आई आणि बाब दोघेही जण मुलीला पैसे कधी कमी पडू द्यायचे नाही पण ही मुलगी अस काहीतरी करत आहे ह्याची त्याना कधी जाणिव झाली नाही. मुलीच्या मैत्रिणी चांगल्या होत्या. संगतगुण कधी वाईट नव्हते. कोविडच्या काळात मुलगी फार वेळ कधी घराबाहेर पडली नाही.

७) शूजिता,
तुम्ही जे लिहिले आहे ते खरे की खोटे या फंदात मला पडायचे नाही पण तुमच्या लेखनात अजून जे काही खटकले ते ----
१. दिसायला सावळी पण फारचं गोड कुणाच्याही नजरेत भरणारी. . >>. मुलगी वर्णाने सावळी, फारच गोड, कुणाच्याही नजरेत भरणारी एवढे वर्णन पुरेसे आहे की. मधे तो पण कशासाठी?
२. तिचे त्याच्यावर प्रेम जडले पण त्याने फक्त तिचे शारिरिक शोषण केले. >> प्लीज, दोन सज्ञान व्यक्ती राजीखुशीने एकत्र आल्या तर ते शारिरीक शोषण नाही. तुम्हाला लग्नाशिवाय लैंगिक संबंध अयोग्य वाटत असले तरी इथे जे काही झाले ते परस्पर संमंतीने झाले आहे त्याला उगाच शोषण वगैरे म्हणून खर्‍या शोषणाचे गांभिर्य कमी करु नका. They had cosentual sex and it resulted in pregnancy. आता तिने जो मुलगा प्रियकर म्हणून निवडला तो तुम्हाला योग्य वाटत नाही तर लगेच शोषण?

>> १) स्वाती २ - तू चिरफाड करत वाचत आहेस. मी सजहगत्या ते पण लावलेत. २० आणि २२ वर्ष कायद्यानी जर मनुष्य सज्ञान असला तरी त्याला फार समज अनुभव नसते. प्रेम करणे चांगली गोष्ट आहे पण प्रेम आणि वासना ह्यात फरक आहे. तुम्ही प्रेमात पडून संभोग करा पण निदान सतर्कता तरी बाळगा? मुलीने आयपिल घ्यायचे असते आणि मुलाने प्रोटेक्षन लावायचे असते. हे ही जर नसेल कळत तर त्यांना सज्ञान म्हणजे उचित नाही ठरणार. उलट ही मुले आम्ही आता कायद्याने सज्ञान आहोत असे समजून आणखी पुढचे पाऊल उचलता. २) मी वर लिहिले आहे. मुलाचे अनेक प्रकरणे आहेत. त्याच्या मामीने खूप काही सांगितले त्याच्याबद्दल. मुलगा जरा जरी बरा असता ना तर आईवडीलांनी आनंदाने लग्न लावून दिले असते. पण, त्याच्याकडे चारित्र्य नाही. त्याच्या कडे चांगले विचार गुण नाही. तो तिच्या आईवडीलाना अरे तुरे च्या भाषेत तेरी बेटी फिर से एक बार भगा के लेके जाऊंगा अशा भाषेत बोलला. त्याला झाल्या प्रकरणात जराही दु:ख नाही. उजळ माथ्यानी तो फिरतो. ही लोक मात्र शहर सोडून ८०० किमी दूर गेलीत. घर ओकबोक पडल. नोकरी शिक्षण सगळ सोडून गेली.

शूजिता,
मायबोली वा ईतर सोशल फोरमवर वर सल्ला मसलतीसाठी धागा काढणे ही दुधारी तलवार आहे हे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल. असो.

आपली मुलगी कोणीतरी फसवून आपल्याकडून हिरावून नेली आहे ही भावना होणे आणि त्यामागचा राग समजून घेता येऊ शकतो. कसेही करून ह्यातून सुटण्यासाठी लोक अनेक मार्ग अवलंबतात, ज्यात आरोप करणे,राग व्यक्त करणे ते बेकादेशीर कृती ते गुन्हा असा बराच मोठा स्पेक्ट्रम दिसून येईल. तुमच्यासाठी (म्हणजे मैत्रिणीच्या परिवारासाठी) ह्या दु:ख आणि क्लेशकारक प्रसंगाच्या पुढे येऊ घातलेल्या कालखंडाच्या पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या फेजची ही सुरूवात आहे. denial, anger, bargaining, depression and acceptance.

ईतरांनी दाखवून दिलेल्या लेखातल्या खटकलेल्या गोष्टीतून संताप आणि आरोप करणे ह्या फेज मधून तुम्ही आणि मैत्रिण जात आहात असे मला वाटते.
हे ही सांगू ईच्छिते की त्रयस्थ व्यक्तीला लेखातून दिसलेल्या बायसेस वर बोट ठेवणे सोपे असते पण आपल्या फॅमिलीसाठी काय योग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार तुमच्या मैत्रिणीला आहे मग ते वागणे ईतरांना बायस्ड वाटत असले तरीही.

अशा अनेक केसेस मध्ये मुलांची कृती ही पालकांच्य व्हॅल्यू सिस्टीमशी मुलांची अजून पूर्ण डेवलप न झालेली व्हॅल्यू सिस्टीम मेळ न खाणे ह्या मूळ कारणामुळे होते. जेवढा ह्या व्हॅल्यू सिस्टिममधला फरक जास्त तेवढी मुलांची कृती ही पालकांच्या निर्णयाला/विचारांना/काळजीला विरोध करणे ह्या भावनेने पछाडलेली असते Rebellion Attitude. (अजाणतेतून अशी कृती केल्या जाऊ शकते पण मुलगी विचार करू शकणारी आहे असे वाटते म्हणुन अजाणतेबद्दल लिहित नाही)

काळजी, राग, हार जीत ह्या सगळ्या भावना बाजूला ठेऊन मुलीला 'तुला आता काय हवे आहे?' असे स्पष्ट विचारा. त्यात तुमचा हेतू तिची मदत करण्याचा आहे आणि तुमची व्हॅल्यू सिस्टीम तिच्यावर थोपवण्याचा नाही हे तिला स्पष्ट जाणवू द्या. तिला जे हवे आहे त्यात तुम्हाला तुमच्या व्हॅल्यू सिस्टीम नुसार काय मदत करणे शक्य/मान्य आहे आणि काय नाही हे सुद्धा स्पष्ट सांगा. तुम्ही तुमची व्हॅल्यू सिस्टीम तिच्यावर थोपवणार नसलात तरी ती डावलून तुमचे स्वतःचे वागणे/कृती तुम्ही बदलू नका. प्रेम जिव्हाळा कमी न होऊ देता आपल्या मदत करण्याचा भुमिकेवर ठाम रहा पण त्यातून विरोध दिसेल असे काही करू नका. मुलीशी कंटिन्युअस आणि कन्स्ट्र्क्टिव डायलॉग जरूरी आहे आणि तिला तुम्ही तिच्याच बाजुने आहात हे सतत कळणे जरूरी आहे.
ती पुढे शिकेल का? तिचे आपल्या सामाजिक स्तरात लग्न होईल का? पुढे मुले वगैरे असे नॉर्मल आयुष्य तिला मिळेल का असे प्रश्न आज तुम्हाला पडले असतील आणि तिच्या त्या नॉर्मल आयुष्यासाठी तुम्ही आज प्रयत्न करणार असाल तर ही लॉस्ट बॅटल आहे. येणारा प्रत्येक दिवस ही लढाई जिंकण्यासाठी नाही तर जास्तीत जास्त डॅमेज कंट्रोल करून सर्वांचे आयुष्य त्यांच्या संमंतीने सुखकर करण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा आहे हे लक्षात असू द्या. आणि ह्या प्रयत्नात वर स्वाती म्हणाल्या तसे मुलीची संमती असणे आवश्यक आहे हे सुद्धा लक्षात असू द्या.

मी अश्विनी,

छान उत्तर लिहिले आहे फक्त शेवटचे वाक्य मला तरी नाही पटत. पोलिस, गायनॅक, तिचे टीचर्स, नातेवाईक सर्वानी एकचं सल्ला दिला आहे मुल दत्तक द्या. ती नाहीचं म्हणणार आहे. सगळ्याच आया नाहीचं म्हणतात. पण अशा केसेस मधे कितपत हे ऐकल जात असेल? त्यातला त्यात आम्ही आत्तापासून असे दांपत्य शोधत आहोत ज्यांना मुल हव आहे आणि ज्याना खरोखर पालकत्व स्विकारायचं आहे. खरे तर दिवसातील अर्धा दिवस रोज आम्ही ह्यात मग्न असतो. एकदा मुल योग्य हातात गेले की त्याचे भले होईल आणि आम्हालाही गील्ट येणार नाही. मुलीला फक्त मुलगा हवा आहे. तिला म्हणाव रोज एक तास चाल तर तिला तेही आवडत नाही. पाणी भरपूर पी तर तेही नको आहे. ऑनलाईन वर्ग अटेन्ड कर म्हणाव तर तिला शिक्षणाची गरज नाही. फक्त नवरा म्हणून मुलगा हवा आहे. फक्त मौजमजा हवी. मनासारख करु दिल तर आईवडील चांगले.

स्वाती ताई चे सगळे प्रतिसाद पटले.
कोणी असं माझं मूल मला अक्कल नाही म्हणून काढून नेलं असतं तर मी त्यांच्या नावाने पोलीस स्टेशन मध्ये रीतसर कंप्लॅन्ट नोंदवली असती किंवा आत्महत्या तरी केली असती.
हे असलं काही करून तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मुलीला वाचवाल तर धन्य आहे तुमची, ती तुमच्यापासून कायमची दुरावेल. मग हा मुलगा नाही तर दुसरा (ओळखीत अशा केसेस आहेत)
असो!

त्या मुलीने मूल जन्माला घालायचं ठरवलं च आहे तर आई आणि मावशी म्हणून साथ द्या तिला (मी नक्की दिली असती). विश्वासाने आपल्याच घरात तिला आणि मुलाला ठेवून घेऊन सगळ्यांचे सगळे आरोप आणि नजरा झेलायचं धारिष्ट्य हवं आई मध्ये.
सरळ सरळ आरोपच करतेय पण आम्हीही या वयात होतो की, पळून नाही गेलो कोणाचा हात धरून कधी कारण आईवर अतिशय प्रेम होतं, विश्वास होता, आईचा आधार होता. माझ्याकडून असं काही झालं असतं तर आईने कुत्र्यासारखं मारलं असतं पण शेवटी कवटाळलं च असतं.
आईला दुःख होईल अशी कुठलीही गोष्ट कितीही टेम्पटिंग असली तरी करू नये याची कायम जाणीव होतीच.
तुमच्या मैत्रिणीने हा आधार दिल्यासारखा वाटत नाहीये मुलीला. आता ज्या प्रकारे तिचं मुलं पळवायचा विचार चालू आहे त्यावरून त्यांचं नातं कसं असेल ते कळतंय.
देवाच्या कृपेने हे नातं सुधारायची संधी।मिळाली आहे. मुलीला सांभाळा, तुझ्या मुलासाठी तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे हे शिकवा. कदाचित मुलाकडे बघून कायमची सुधारेल मुलगी.

माझ्या ओळखीत एक मुलगी आहे - दिसायला देखणी, मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबीय, वर्गात पहिला नंबर सोडला नाही, सगळ्या कलांमध्ये निपुण अतिशय गुणी मुलगी फक्त मुलीला इकडची कडी तिकडे करायची सवय नाही एवढीच काय ती बोट ठेवण्यासारखी जागा. बारावीमध्ये असताना एका मुलासोबत पळून गेली. मुलगा झोपडपट्टी मध्ये राहणारा उडाणटप्पू काहीही काम न करणारा वगैरे वगैरे, तिच्या नादाला लागून तिच्यासाठी म्हणून ट्रक चालवायला लागला. त्यांच्या लग्नाला 6 वर्ष झाली, आम्ही तीलक बघून हळहळतो कायम , आयुष्य वाया घालवलं म्हणून, आई वडिलांनी संबंध तोडले आहेत, पण जेव्हा दिसते तेंव्हा एकदम समाधानी चेहऱ्याने दिसते, कायम हसत असते, अंगावर फाटके पण ठिगळ लावलेले स्वच्छ, कधी कधी आमचेच जुने कपडे वगैरे दिसतात पण आनंद काय ओसंडून वाहत असतो चेहऱ्यावरुन.
मागच्या आठवड्यात भेटली तेंव्हा म्हणाली "दीदी, मी या वर्षी 12वी झाले, हे कोविड आलं आणि शाळा कॉलेज बंद झाल्या तेंव्हाच वाटलेलं परीक्षांची काही तरी सोया होईल म्हणून पटकन वाहत्या गंगेत हात धुवून घेतले"

मला तिचा फार अभिमान वाटला, आमच्या लेखी तिने जो मूर्खपणा केलाय तो निभावून नेण्याची तिची वृत्ती बघून मला आनंद वाटला.

तुम्हाला या प्रसंगातून काही सांगायचं नाहीये मला पण पटकन आठवलं म्हणून इकडे लिहून टाकलं.

धागा खरा असो वा खोटा, कोणा साठी कधी कसा उपयोगी पडू शकतो।माहीत नाही म्हणून सिरियसली प्रतिसाद देतेय.

रीया, तू जे उत्तर दिलय ते फक्त वाचायला आवडणार आहे पण ह्या परिस्थितीत उतरुन तिचा सामना करण खूप कठिण आहे. इथे सगळे चांगलेचं आहे मुलीभोवती पण मुलगी जराही साथ देत नाही आहे. तिने जे केले त्यातून तिला मार्ग काढायचा नाही आहे. तिला फक्त तो मुलगा हवा आहे बाकी काही नाही. तिला स्वतःला गर्भपात करता आला असता पण तिने तो गर्भ ठेवून त्याचा उपयोग ब्लॅकमेलींग करण्यासाठी केला. मुलगा जराही लायक नाही. त्याच्या सावलीत उभे राहणेही नको. घरात त्याला ठेवायचे तर दूरचंं. मुलीला मदत नको आहे. तिला फक्त थेर हवे आहेत. अशा मुलीसाठी तू जे लिहिलेस ते विचार कुठेचं अप्लाय होत नाहीत. मी मदत बिदत समजू शकते पण त्यासाठी समोरची व्यक्ती लायकीची हवी असते.

>>अमितव, पुरुषांना स्त्रि म्हणजे एक करमणूक वस्तू वाटते. >> तुमची मुलगी राजीखुशी संबंध ठेवते. त्यात स्त्री आणि पुरुष दोघांची काय तुम्हाला करमणुक वाटते ती होते आहे.
>>मुलगी फक्त २० वर्षाची आहे. तुम्ही तरी २० वर्षात स्वतःच्या पायावर उभे होता का? >> २० नाही पण २१ व्या वर्षी होतो. माझ्या मुलाने असं केलं तर त्याला परिस्थितीची जाणीव करुन देऊन यातुन मार्ग काढण्याचे मार्ग सांगेन. ते ऐकले नाही, आणि त्याच्या मतांवर ठाम असेल तर प्रेमापोटी जो सपोर्ट करायचा तो एका मर्यादेपर्यंत करत राहीन. पण त्याला त्याचे जीवन जगण्याच्या हक्कावर माझ्या विचारांची गदा नक्कीच आणणार नाही. हे असं परस्पर पोर पळवुन अँबर अलर्ट काम नक्कीच करणार नाही.
>> लैंगिक शिक्षण म्हणजे नक्की काय काय सांगायचं? तुम्हाला तुमच्या आई वडीलांनी लैगिक शिक्षण दिलय का? >> सेफ सेक्स, कंसेंट, अनसेफ सेक्स झालं तर नंतर घ्यायची काळजी, मदत लागली तर कुठे/ कशी शोधायची? चुक झाली तर वेळीच निस्तरणे आणि आयुष्यभर निस्तरणे यातील फरक. आणि तू कुठलेही निर्णय घेतलेस तरी आमचं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही, आम्ही तुला जमेल तो सपोर्टच करू हा विश्वास. आमच्या पासून लपवुन काही रहात नाही, ते तू आम्हाला सांगितलंस तर तुला मदत करायला आम्हाला चटकन जमेल. तू आमचा मुलगा असलास तरी तुझ्या मुलांना तूच वाढवायचं आहे. आम्ही अडीअडचणीला मदत जरुर करू पण तीर कायम गृहित धरू नकोस. सज्ञान झाल्यावर आम्ही घरातुन तुला बाहेर काढणार नाही, पण तू जसं जमेल तसा स्वतंत्र राहिलेले आम्हाला जास्त आवडेल. १८ वर्षांनंतर आमच्या घरात आमचेच नियम चालणार, त्यात तू मारुन मुटकुन राहू नकोस (हे असं स्पष्ट न सांगता शुगरकोट करुन सांगेन बहुतेक)

>>२० वर्ष कायद्यानुसार जरी व्यक्ती सज्ञान असली तर ती विचाराने सज्ञान नसते. २० खूप कमी वय आहे असे निर्णय घ्यायला. >> मग किती वय तुम्हाला वाटतं योग्य आहे? २२? २५? ३०? तुम्हाला बहुदा तुमच्या मतानेच व्हायला हवं आहे. आणि पोरांना अडकवुन ठेवायचं आहे. त्यांना निर्णय आणि होणार्‍या परिणामांना जबाबदार ठेवायची सुरुवात जितकी लहान वयात कराल तितकी ती स्वतंत्र होतील. नाहीतर २० वयही कमी वाटेल.

>> पुरेसे शिक्षण नाही. नोकरी नाही. लग्नही झाले नाही. आणि मुल जन्माला घालायले. ह्यात ज्ञान दिसते का तुम्हाला? >> अजिबात नाही. मूर्खपणा आहे. हे स्वच्छ शब्दांत सांगितलंत का? की मुल झाल्यावर आम्ही सपोर्ट करणार नाही. तुझं तुला वाढवायला लागेल. चार दिवस तिला तिचं जेवण खाण, धुणी भांडी करू द्या. तिला पाणी किती प्यायची ही सुद्धा अक्कल नसेल तर ती २५ काय आणि ३० काय कधीही येणार नाही. तिला कुबड्यांची सवय लावली आहे. आता भोआकफ. लवकर सुधारा.
मुलांत स्वाभिमान आणि स्वतःचं स्वतः करणे हे आईवडिलांनी दिलेल्या संस्कारातुन यावं लागतं. आयफोन दिला, पैसे कमी पडू दिले नाही वा रे वा! तिला घरातच राहू द्या, पण तिच्यासाठी हे जे तुम्हाला वाटतं प्रेमापोटी करताय ते करणं थांबवा. ह्यात काहीही प्रेम नाही. बेजबाबदारपणा आहे. गरोदर आहे म्हणजे काही रोग झालेला नाही. सिंगल मदर्स जगात कमी नाहीत, त्यांनी सगळं निभावलं त्यात किती खस्ता खाल्ल्या ह्याची तिला जराही जाणिव नाही असं दिसतंय. ती करुन द्यायची सोडून तिचं पोर पळवायला निघालेत हे पोराचे आई- मावशी. वर पोलिस आणि गायनॅक सांगताहेत दत्तक द्या! अरे ते कोण आले सांगणारे? काहीही!

भला मोठा टाईपलेला प्रतिसाद चुकून पेज रिफ्रेश होऊन उडाला याला देवाची इच्छा समजून जे लिहिणार होते ते लिहीत नाही आता

शूजिता,त्या मुलीला आणि तुम्हाला योग्य निर्णय घ्यायचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
मेंदूत काही केमिकल लोचा नाहीना हे न्युरॅालॅाजिस्ट कडून एकदा तपासून घ्या.

शुजिता, मला कळतंय तुम्ही आणि तुमची मैत्रीण कोणत्या फेज मधून जात असाल कारण गेल्याच महिन्यात सेम केस माझ्या मैत्रिणीच्या मुलीसोबत झाली आहे.
तुम्हाला जरी त्या मुलीच्या वागण्याचा राग येत असेल तरी तो मुलीला दाखवून देऊ नका. जेव्हढे शक्य असेल तेव्हढे तिच्या कलेने घेत तिला समजावून सांगा. स्वाती२ आणि मी अश्विनी यांनी सविस्तर सांगितले आहेच. तिला विचारा की जर उद्या तो मुलगा, तिचे आई वडील यातील कुणीच नसेल तर ती तिच्या मुलाचे एकटीने संगोपन करण्यासाठी सक्षम आहे का? तिला जे लाईफ आईकडे मिळतेय तसे तिला त्या मुलाकडे मिळेल का किंवा जे मिळेल त्यात ती समाधानाने जगू शकते का? तिला तिच्या भविष्याचा विचार करायला वेळ द्या.

इथे जे कुणी म्हणतात ना की चौथी पास आजच्या जमान्यात वैगरे तर असे काही नाही आजही कितीतरी मुले आहेत जे कमी शिकलेले आहेत.

माझ्या मैत्रिणीचा जो मी वर दाखला दिला आहे त्यातही मुलगा सातवी नापास आहे. कामधंदा करत नाही. मैत्रिणीची मुलगी १८ वर्षाची यंदा बारावी झाली. अठरा पूर्ण होण्याची जणू वाटच बघत होती. तिलाही दिवस गेलेले आणि घरी सांगितले तेव्हा सगळ्यांनी खूप समजवले पण अजिबात ऐकायला तयार नाही. शेवटी घरातले लग्न करून द्यायला तयार झाले. गेल्या महिन्यात झाले लग्न पण बिचारा बाप पूर्ण कोलमडून गेला.

कुणीतरी वर लिहलंय की आई आणि मुलीचे सबंध खास नसतील म्हणून मुलगी अशी वागली असेल. पण असेही नसावे. आपल्या पिढीमध्ये आणि आताच्या पिढीत बराच फरक झाला आहे. माझी मैत्रीण आणि तिचा नवरा तर लेकीचे एकदम खास होते. माझ्याकडे गणपतीत ते नेहमी राहायला असतात, आम्ही त्यांच्या गावी जाऊन राहतो, दर महिन्याला भिशिसाठी भेटतो म्हणून त्यांच्या संबंधाबद्दल माहीत आहे. पण प्रेम आंधळ असतात म्हणतात ना तेच खरं आहे. मुलांना आपल्या प्रेमासमोर, आईवडिलांचे प्रेमही दिसत नाही.

आपण आपल्या घरात सर्वांना प्रेम द्यावं, भरपूर बोलावं, सरांच्या मतांचा आदर करावा आणि तरी काही प्रॉब्लेम्स आले तर एकत्र बसून सोडवावेत. आपलं घर भलं सगळं भलं. उगीच दुसऱ्यांच्या नाजूक प्रोब्लेम ना ठीक करण्यात आपला वेळ वाया घालवू नये.

Pages