कुमारी मातृत्व आणि पुढील अवघड वाटा - कोणाशी तरी बोलायचंय

Submitted by शूजिता on 27 August, 2021 - 06:10

नमस्कार,
दीड महिन्यापुर्वी माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा एक फोन आला आणि ती जी हुंदके देत देत मला सांगत होती ते ऐकून मी एकदम स्तंभित झाले. तिची मुलगी फक्त २० वर्षाची. आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला. दिसायला सावळी पण फारचं गोड कुणाच्याही नजरेत भरणारी. कमालीची शांत आणि अगदी निरागस वाटणारी. तिची आई म्हणजे माझी मैत्रिण तिला एकुलती एकचं कन्या. त्या मुलीला दिवस गेलेत आणि ती घरुन पळून गेली. साडेसहा महिन्याची गरोदर मुलगी आणि माझ्या मैत्रिणीच्या हे लक्षात आले नाही. मुलगी वाढत्या वयानुसार शारिरिक बदल तिच्यात होत आहेत असेचं तिला वाटले. त्यामुळे गरोदर पणात स्त्रिला जी गोलाई येते त्याकडे तिने कानाडोळा केले. कुठल्याचं आईला आपल्या अविवाहित मुलीच्या अंगावरचे वाढलेले मास पाहून असे वाटणार नाही की ती गरोदर आहे. तिथे माझी मैत्रिण फसली बिचारी.

पाच दिवसानंतर खूप प्रयत्नानंतर शेवटी पोलिस जागे झाले आणि त्यांनी मदत केली. मुलगी परत मिळाली. एका छोट्याशा झोपडीत एका मुलाबरोबर होती. तो तिचा प्रियकर. एकदम सडकछाप मवाली मुलगी. चवथा वर्ग नापास. वय २२ वर्ष. मुली पटवायला एक नंबर आणि लफडेखोर. ह्या मुलाच्या तावडीत इतक्या चांगल्या घरची मुलगी फसली. तिचे त्याच्यावर प्रेम जडले पण त्याने फक्त तिचे शारिरिक शोषण केले.

संसार तसाचं सोडून माझी मैत्रिण दुसर्‍या शहरात गेली. तिथे एक बी एच के शोधले. गर्भपात व्हावा म्हणून वणवण भटकली पण इतक्या उशिरा आता ते शक्यचं नव्हते. आता तिची मुलगी ९ व्या महिन्यात प्रदार्पण करेल. इतक्या शांत मुलीच्या मनात केवढे काय काय साचून होते हे ती आता व्यक्त करते आहे. मी आत्ता तिच्याकडे एक दोन दिवस राहायला आले आहे. तिला आधार मिळावा म्हणून आणि काही मदत करता यावी म्हणून.

मुलीला हे मुल दत्तक द्यायचे नाही. किंबहूना मुल जन्माला घालून आपले आईवडील नाईलाजाने आपले लग्न ह्या मुलीशी लावून देतील ही तिची योजना होती. पण तिला माहिती नाही हे प्रकरण किती दाहक आहे.

मी इथे येऊन विचारणा केली. जिथे तिची प्रसूती ठरली आहे त्या डॉक्टरांना आमची फारचं किव आली आणि त्यांनी हमी दिली की त्या एका एन. जी. ओ. कडून हे मुल दत्तक देण्याची सोय करतील आणि ह्यात जिचे मुल आहे तिची सही लागणार नाही. तसेही अशी मुले बेवारस सापडतात. कचर्‍यात, गटार्‍यात, नदीच्या वाहत्या पाण्यात, देवळात, अनाथालयाच्या दारात, कुण्याच्या ओट्यावर, कुणाच्या अंगणात!! कुंतीनेही कर्णाला वाहत्या पाण्यात सोडलं होतं. आपण तर साधी माणसे. ह्या भावना जाऊ देत.. पण मुल दत्तक दिल्यावर ही मुलगी किती आकांत मांडेल? ती जगू देईल का तिच्या पालकांना? तिचे पुढील शिक्षण पुर्ण करु शकेल का? परत तिचे लग्न होईल का? वय फक्त २० आहे मुलीचे तर अजून १० वर्ष वेळ आहे तिला तोवर ही घटना पुसली जाईल. तिचे भले होऊ शकेल. पण मुलीने परत असेचं थेर केलेते? परत ती तेथून पळून परत त्या मुलाकडे गेली तर? मुलगा लग्न करायला तयार आहे म्हणाला पण नक्कीचं लायक पात्र नाही. मग अशा मुलाशी लग्न करुन काय उपयोग. शिवाय, अशी हार पत्करुन आपण समाजाला काय शिकवण देत आहोत? जर आपण हे मुल तिला दिले आणि तिला त्या मुलाशी लग्न करु नाही दिले तर चालेल का? असे एक नाही अनेक विचार आम्हि दोघीनी बोलताना मांडले.

मी इथे फार लिहित वा वाचत नाही. पण अचानक मला मायबोली आठवली आणि वाटलं इथे आपण मत मांडून बघावे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग त्या मुलाने देवळात आणि बस मध्ये का नाही मजा केली? (आता त्या केलेल्या मजेचे ग्राफिक वर्णन, हिंदीतून मेसेजेस द्या)
त्याने बिचार्‍याने छोट्याश्या झोपडीत असलेल्या त्याच्या सेपरेट रूमचे दार बंद करुन केली? बरं त्याच्या स्वतःच्या घरात केली. बाहेर त्याचे आई वडील असताना, कसलीही जबरदस्ती न करता केली. सज्ञान व्यक्ती बरोबर स्वतः सज्ञान असताना केली.
हा मुलगा समस्त भारतीय लिंगपिसाट पुरुषांपेक्षा भिन्न का बरं झाला असेल? पण नियम अपवादानेच सिद्ध होतो म्हणतात ना!

सोशल मिडियावर का टाकता म्हणे. काय हा निरागस प्रश्न! Proud लेखक्/लेखिका हुषार आहेत. सोशल मिडिया / माबो ला ओळखून आहेत. कोतबो ला शेकड्यांनी प्रतिसाद आले. तसे कुणा माहिती नसलेल्या आयडीच्या टुकार कथे ला आले असते का?
हे म्हणजे ७०-८० दशकांमधे दिवाळी अंकात यायच्या तशा टाइप चे अतिसुमार कथानक वाटते आहे. वरच्या पोस्टीतला तो हिंदीतला टेक्स्ट मेसेज, आणि वेश्येचा पदर वगैरे इतर किती तरी अनावश्य्क ग्राफिक डीटेल्स वाचूनही जे कोणी या कथेला खरी समजून सल्ले देत आहेत त्यांच्या निरागस मनाचे खरोखर कौतुक वाटते आहे.

पण इथे अनेक जण खोदून खोदून आणि बळजबरी करुन विचारतात ते फार त्रासदायक होते आहे. इतके सर्व तर पोलिसांनीही नाही विचारले.>>>
अहो मग नका लिहू ना
इथे स्पष्टीकरण देण्याची सक्ती असल्यासारखे का करताय

वरच्या पोस्टीतला तो हिंदीतला टेक्स्ट मेसेज, आणि वेश्येचा पदर वगैरे इतर किती तरी अनावश्य्क ग्राफिक डीटेल्स वाचूनही जे कोणी या कथेला खरी समजून सल्ले देत आहेत त्यांच्या निरागस मनाचे खरोखर कौतुक वाटते आहे.>>>
आता म्हणजे तो मुलगा मुसलमान होता आणि हे सगळं लव जिहाद होतं आणि याबद्दल त्याला पैसे मिळाले इतकंच बाकी आहे Happy

आशुचँप, लव्ह जिहाद अँगल पान नं १० वर विक्षिप्त मुलग्याने मांडला होता. फक्त तो "'** ***' ची " असा मांडल्याने गोची झाली. झेपला नाही आणि गाडी समस्त लिंगपिसाट पुरुषांवर अडकली. तो ट्विस्ट आला असता तर आणखी एका सेंच्युरीची गॅरेंटी झाली असती.

इथे लोकांची अपेक्षा अशी आहे की नावासहीत लिहा आणि वर फोन नंबरही द्या. मग ते भेटीला जातिल त्या मुलीच्या घरी.>>
तै तुमी लै बॅटींग करुन रायल्या बघा.

लोकहो,
जर ही कथा काल्पनिक असेल तर तुम्ही कितीही खोदून खोदून विचारलंत तरी धागाकर्ता/कर्ती ते मान्य करणार नाही.
त्यामुळे या प्रश्नांचा तसा काही उपयोग नाही.

जर ही खरी गोष्ट असेल तर कशाला त्याबद्दल सविस्तर उत्तरांची अपेक्षा ठेवायची? खरोखरच असं घडलेलं असेल तर मुलीच्या आणि आईवडिलांच्या दृष्टीने शेवट (तात्पुरता का होईना) चांगला झाला म्हणून आनंद मानायचा.

तात्पर्य, सोडून द्या.

असे कसे सोडून द्या वावे ... इतका मस्त टाईमपास धागा मायबोलीवर सोडतील कसा... आणि त्यात पण लेखिका प्रत्येकाला उत्तर देत असताना... Happy

वावे Happy +१००. च्रप्स - इतक सोसावं लागलं मुलीला नि सगळ्यांना तर टाईमपास कसं हो? Happy
धागाकर्तीस- खरं असेल नि चांगलं झालं असेल तर हे फार बरं झालं. असंच पुढेही सारं मार्गी लागू दे. खरं नसलं तरी ठीकच आहे पण आपणच लिहीत असाल तर फक्त ते पदर पीनपचं घ्या मनावर. ह्या मुद्रास्फिती (इंफ्लेशन)मध्ये भाव न वाढलेली एकच गोष्ट असेल- सेफ्टीपिना. तेवढ्या तरी वापरू द्या बायांना.

समोर मुलगी असेल तर उभ्या उभ्या सर्व काही जमत तुम्हाला. तुम्ही भारतीय पुरुष .. दंडवत!!!>> तै नेमका प्रोब्लेम हाये तरी काय तुमचा?
त्या पोरावरचा राग सगळ्या बाप्यांवर काहुन काढुन रायल्या तुमी??
हे भगवान बचाले रे बाबा..

इतक सोसावं लागलं मुलीला >> मुलीने काय सोसलंय? सगळं तर आई-बाबा आणि मावशीने सोसलंय. मुलगी मला आठवतंय त्याप्रमाणे कायम आनंदात होती. तिला सगळ्यात जास्त त्रास या आई-बाबा-मावशीने दिलेला आहे. अर्थात त्या अर्थी सोसलंच तिने. बरोबरच आहे.

बाकी सेफ्टिपिनेचे भाव वाढले नसले तरी तू ग्राफिक वर्णन नीट वाचलेलं नाहीस. उघडी बाई. पदर ढळला आणि मावशींनी सेफ्टीपिन लावायची म्हटली तरी त्या पिनेचं दुसरं टोक कुठे जाणार? कातडीत घुसवायला लागेल. आपलं कंडिशनिंग असं झालेलं असतं की ढळलेला पदर म्हटलं की पीन आठवते. पण त्या बिचार्‍या माऊलीला आत वस्त्र नाही घालायला. (अंतर्वस्त्राकडे अंतर्वस्त्र नाही हा जोक करायचा मोह टाळतो.) त्याची मावशींना लाज वाटते याची मला लाज वाटते.
सोडूनच दिलेलं. पण काळ सोकावतो असं दिसू लागलंय.

लोकहो,
जर ही कथा काल्पनिक असेल तर तुम्ही कितीही खोदून खोदून विचारलंत तरी धागाकर्ता/कर्ती ते मान्य करणार नाही.
त्यामुळे या प्रश्नांचा तसा काही उपयोग नाही.>>> असेल???
इथे लेखिकेने एक काल्पनिक समस्या रचली जमेल तेवढा मसाला ठासुन ठुसुन भरला आणि त्यात मुलगी इनोसन्ट पण बेताल्,आइवडील प्रेमळ पण हताश, मुलगा डॅबिस आणी ह्या मावशी लोकानी का आणी कस करत सगळ्या प्रकारचे सल्ले दिले , धागा पळ पळाला दमुन थान्बला मग परत धाव्तोय..
राजकारण आणी चित्रपट याशिवाय धागा हिट करता येतो हे तुम्ही समस्त माबोकराना दाखवुन दिलत.

>>>> तरीही त्याच्याकडे ओढली गेली. त्याला कारण तिचे कोवळे वय आणि त्या कोवळ्या वयात तिला त्या मुलाने शरिरसुखाची लावलेली चटक. तो मुलगा त्याचे आईबाबा घरात असताना हिला बोलवायचा आणि तिच्याशी गैर प्रकार करायचा.

>>>> "मुझे जो देखना था औ मैने देख लिया. तुझे पुरा खोल दिया. एक बार नही कईबार तुझे चोदा. अब तेरे मे कुछ बाकी नही रहा. तू रांड हो गई है. तुझे मेरे पास अगर आना है तो तू आ वरना पछतायेगी तू. तुझे जो करना है वो कर"

>>>> खच्चून भरलेल्या बसमधे पुरुष अंगाला असे काही बिलगतात------मंदिरात सुद्धा हेच प्रकार होतात.----- एक मुलगी अशीचं माणसांच्या मधे फसली. ---- तिला भर गर्दीत दाबले ह्या पुरुषांनी.

=======> अरे अरे अरे! हि धागामालक व्यक्ती म्हणजे ___मला कोणीतरी हवी आहे___ वर्गातला उपाशी पुरुष आहे ह्यात आता शंका उरली नाही. असे धागे काढून त्याद्वारे असले लिखाण करण्याचा आनंद हि व्यक्ती घेत आहे. इतल्या स्त्री सदस्यांशी अन्यथा असे बोलायला त्यांना मिळाले नसते. हा खूप गम्भिर प्रकार आहे. त्यांना एकच विनंती आहे कृपया लोकांच्या भावनांशी खेळू नका अन्यथा खरेच ज्यांची समस्या आहे त्यांना कोण मदत करणार नाही. समस्या खरी असेल असे समजून तुमच्या विपु मध्ये येऊन काकुळतीने मदत करत आहेत इथे सदस्य. जरा विचार करा. खरेतर लाजेखातर का असेना पण तिथेच प्रांक थांबवायला हवा होता तुम्ही. अत्यंत घृणास्पद आहे जे काही सुरु आहे ते.

उप्स!! अशी पटकथा द ग्रेट स्युपर स्टार्र, किंग ऑफ बॉलीवुड शाहरुक खान यांना मिळाली पाहिजे!!!

मराठीत चित्रपट छान जमेल...

पोराचा बाप - स्वप्नील जोशी.
पोराची आई- मुक्ता
पोरगा- सचिन पिळगावकर गळ्यात रंगीत रुमाल..

ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईकांच्या अडचणी वाढल्यात... गणेश नाईक यांनी तो मुलगा आपलाच असल्याचं कबूल केल्याचं पीडितेच्या वकिलांनी म्हंटलं.. शिवाय 27 वर्षांपासून महिलेशी संबंध असल्याचं नाईकांनी कबूल केल्याचा दावाही पीडितेच्या वकिलांनी केलाय...

https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-special-report-ganes...

सेम सिच्युएशन
पण त्या केसमध्ये बाप अडकला आहे आणि ह्या केसमध्ये आई

>> पोरगा- सचिन पिळगावकर गळ्यात रंगीत रुमाल.. <<<
महागुरू बेस्ट चॉईसाय, पण समजा त्यांच्या तारखांचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर प्रवीण तरडेही आहेत.
दिग्दर्शक बाकी मांजरेकरच पाहिजेत.
आत्ताच 'वरण भात लोन्चा'मुळे त्यांचा यासंदर्भातला
सीव्ही चांगलाच स्ट्रॉंग झालाय.

आशुचँप, लव्ह जिहाद अँगल पान नं १० वर विक्षिप्त मुलग्याने मांडला होता. फक्त तो "'** ***' ची " असा मांडल्याने गोची झाली. .....
Submitted by अमितव on 22 April, 2022 - 19:48

सही पकडे है!!!

उप्स!! अशी पटकथा द ग्रेट स्युपर स्टार्र, किंग ऑफ बॉलीवुड शाहरुक खान यांना मिळाली पाहिजे!!!
नवीन Submitted by बंडल on 22 April, 2022 - 22:51

>>>>>>>>

मराठीत चित्रपट छान जमेल...

पोराचा बाप - स्वप्नील जोशी.
पोराची आई- मुक्ता
पोरगा- सचिन पिळगावकर गळ्यात रंगीत रुमाल..

Submitted by च्रप्स on 22 April, 2022 - 23:14

>>>>

जगातले सगळे हिरो संपले आहेत का?
कश्याला धाग्यात शाहरूख स्वप्निल आणि सचिन सरांना आणत आहात... जेवता जेवता हाड अडकले बिर्याणीतले घश्यात Sad

जगातले सगळे हिरो संपले आहेत का?
कश्याला धाग्यात शाहरूख स्वप्निल आणि सचिन सरांना आणत आहात>>>>

हा तुमचा प्रतिसाद आहे हे वाचून मलाही बियर चा ठसका लागला

हा तुमचा प्रतिसाद आहे हे वाचून मलाही बियर चा ठसका लागला
>>>>
चीअर्स!
मी आता लोकांना दाखवून देणार आहे की मायबोलीकरांनाच शाहरूख विषयी बोलायला आवडते. फक्त त्याचा विषय काढतो म्हणून मी उगाच बदनाम आहे Happy

मुलगी मुलाच्या घरी जाते तेव्हा एक गाणं टाकता येईल. मराठी पिक्चर आहे त्यामुळे दोन गुलाब, कोसळणारा धबधबा, विझलेली मेणबत्ती इ. सीन.. प्रेक्षक त्यांना काय समजायचे ते समजुन घेतील.

धाग्याचं शीर्षक वाचून इतके दिवस उघडला नव्हता. आत्ता पाहीलं तर मनोरंजनाचं भांडार आहे की हे.
मस्तरामचा पुढचा सीझन आख्खा याच्यावर येऊ शकेल.

मी इथे येऊन विचारणा केली. जिथे तिची प्रसूती ठरली आहे त्या डॉक्टरांना आमची फारचं किव आली आणि त्यांनी हमी दिली की त्या एका एन. जी. ओ. कडून हे मुल दत्तक देण्याची सोय करतील आणि ह्यात जिचे मुल आहे तिची सही लागणार नाही. >>> इथेच मायबोलीवर दत्तक मूल घेण्यातल्या अडचणी हा धागा वाचला असता तर एव्हढी मोठी चूक झाली नसती. कोणताही डॉक्टर असे उपद्व्याप कीव येऊन करेल असे वाटत नाही. डॉक्टरांना अशा केसेस इतक्या हाताळाव्या लागत असतील कि कीव वगैरे येईल असे वाटत नाही. तसेच कोणतीच एनजीओ मुलीच्या आईच्या सहमतीशिवाय (मूल अनाथ नसताना) असले धंदे करणार नाही. फ्रॉड एनजीओ असेल तर डॉक्टर कशाला भानगडीत पडतील ?

मूल दत्तक देण्याआधी दत्तक घेणार्‍यांना भरपूर कागदपत्रे सादर करावी लागतात. खूप काळ जातो यात.

Pages