Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23
महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).
हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....
http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्यामुळे सोमवारी मला टिव्हीवर
त्यामुळे सोमवारी मला टिव्हीवर नक्की बघा बर्का..
.
..
.
.
सगळेच जण प्रत्यक्षात बरेच बारीक आहेत.. टिव्हिवर खूप जाड दिसतात.. !!!!
<<<
ते मी स्पर्धकांबद्दल
ते मी स्पर्धकांबद्दल म्हणतोय.. माझ्याबद्दल नै कै..
आजचा निकाल पटला.
आजचा निकाल पटला.
कोण गेलं? तुला आत्ता कसा
कोण गेलं?
तुला आत्ता कसा दिसतो तो कार्यक्रम?
मंजु, वि,पू. मधे सांगते तुला
मंजु,
वि,पू. मधे सांगते तुला कोण गेली ते.
अड्मा, तुझं लग्न होतं ना २२
अड्मा, तुझं लग्न होतं ना २२ ला? मग तु सारेगमप बघायला कुठे गेलास? ते पण स्वरदाबरोबर??
सगळ्यात महत्वाची वेंधळेगिरी
सगळ्यात महत्वाची वेंधळेगिरी (झी ची) म्हणजे सोमवारचा कार्यकर्म सुरु झाला टिव्हीवर तेव्हाच त्यांच्या वेबसाईट वर अश्विनी वोट आउट अस डिक्लेअर केलेल होत. त्यानंतर जेव्हा अश्विनीच गाण सुरु झाल तेव्हा कॅप्शन येतच होती अश्विनीला समस करण्यासाठी..... वगैरे. भले शुटिंग आधी झालय त्यामुळे एलिमिनेश पण झालय पण वेबसाईट वर ते कार्यक्रमाच्या आधी दाखवुन वेंधळेपणा नी तरिही वोटिंग साठी कॅप्शन देऊन लबाडी का करावी झी ने?
सारेगमप मेगा चॅलेंज या झी
सारेगमप मेगा चॅलेंज या झी च्या हिंदी शो मधे आपली महाराष्ट्राची टिम ग्रँड फिनाले ला पोचली आहे, फिनाले नक्की पहा (बहुदा ११ डिसेंबर ला असेल, हा सारेगमप चा १००० वा भाग पण असेल.)
मेगा चॅलेंज मधे सारेगमप/सारेगम चे नवे जुने विनर्स्-स्पर्धक सगळे होते.
आठ राष्ट्रांच्या टिम्स नी भाग घेतला होता.
महाराष्ट्राच्या टिम नी सर्वात स्ट्राँग टिम गुजराथ ला हरवून फिनाले मधे एंट्री मिळवली.
फिनाले मधे महाराष्ट्राची गाठ प.बंगाल टिम बरोबर पडेल.
वैशाली माडे महाराष्ट्र टिम ची कॅप्टन आहे, बरोबर लिट्ल चँप चा रोहित राउत आणि गेल्या वर्षीच्या चॅलेंज चा कौशिक देशपांडे आहेत.
एक झलक पहा जुगलबन्दी राउंड ची, वैशालीनी सेमि फायनल ला तिच्या तिन्ही गाण्यांना जजेस standing ovations ची मिळवली :),
वैशालीची गाणी:
कुहु कुहु बोले कोयलीया (स्वर्णसुंदरी): http://www.youtube.com/watch?v=FRkJgDetlZQ
( हे गाणं ऐकायला देवकी ताई हव्या होत्या, सगळे 'पण' गायब झाले असते)
अंखियोंके रहने दे (बॉबी):
http://www.youtube.com/watch?v=PuvUiBpBnr4&feature=SeriesPlayList&p=00A8...
कही ना लागे मनः
http://www.youtube.com/watch?v=5wQ1j9trwuo&feature=SeriesPlayList&p=00A8...
आठ राष्ट्रांच्या <<<
आठ राष्ट्रांच्या <<< राज्यांच्या.
हो, आपले तीनही जण चांगले आहेत. मी आवर्जून पाहतो. गुजरातसोबतची टक्करही लीलया पेलली.
दिपांजली, तुझ्या मुळे च मी पण
दिपांजली, तुझ्या मुळे च मी पण हिंदि सारेगमप बघायला लागले.
आता पर्यंतचे ३ -४ एपिसोड पाहिले.. वैशाली, आसाम चे अनामिका, अभिग्यान दास, आणि ती प्रियांका माल्या यांचा आवाज खुपच भावला.
महाराष्ट्र टिम , all the best!!
btw, वैशाली ला पाहिल की तुझी आठवण येते.
I know तु तिची big fan आहेस
हिंदी चा राऊंड बरा
हिंदी चा राऊंड बरा चाललाय..
अपूर्वा (२ नी), स्वरदा (सुनो सजना) (२ ध) ची गाणी मस्त झाली...
मृण्मयीच्या "ये दिल केह रहा है" ची सुरुवात सपशेल गंडली.. आणि अंतरा ठिक ठिकच.. तरी सलिल ने ध दिला.. आणि अवधूत ने प !!!!
उर्मिलाचं "हवा मे उडता जाए" सपशेल झोपलं... !! अवधूत ने म आणि सलिल ने ध... उर्मिलाच्या आवजातल्या लिमिटेशन्स अश्या गाण्यांमधे दिसून येतात...
अभिलाषा चं पेहेला नशा नी आणि वरचा सा देण्याइतकं भारी नव्हतं असं IMO.. कडवं ठिकठिकच होतं जरा चोरट्या आवजात गायल्यासारखं वाटलं... तिला डेंजर झोन मधून काही करून बाहेर काढायचचं आहे असं ठरवलेलं दिसतय...
राहूल ने कुठलं तरी राजस्थानी लोकगीत गायलं.. ठिक होतं.. इथेही अवधूत ने बळच मिठ्या-बिठ्या मारून नाटकं केली... दोन नी मिळाले..
मराठीतली पहिली दोन गाणी छान झाली.. अपूर्वा (नभ उतरू आलं) आणि स्वरदा (या डोळ्यांची दोन पाखरे).. दोघींनाही दोन ध...
मृण्मयीच्या चांद मातला वर जतिननी एकदम योग्य मत नोंदवलं.. खूप थकल्यासारखं झालं एकूण.. दोन ध परत..
ऋतुजानी जितेंद्र अभिषेकींच्या स्वराभिषेक मधलं गाणं छान म्हंटलं.. तिच्या आवाजाला एकदम सुट झालं.. !! दोन नी एकदम डिसर्विंग...
अॅडमच्या परिक्षणाला
अॅडमच्या परिक्षणाला माझ्याकडून अनुमोदन, पण राहूलच राजस्थानी लोकगीत मला आवडल. आणि ते कुठलतरी म्हणण्याइतक unknown नाहिये. चांगलच प्रसिद्ध आहे.
अरे अडमा.. तुला ते राजस्थानी
अरे अडमा.. तुला ते राजस्थानी लोकगीत माहिती नाहीये.. लेकिन मध्ये आहे की.. लतादिदी मंगेशकरांच्या आवाजात.. अर्थात चाल थोडीशी वेगळी आहे....
आणि परवा सोमवारी तू कुठेच दिसला नाहीस... हरवला होतास का कुठे.. अमितच्या चेहर्याचा मोठ्ठा क्लोजअप घेतल्यानी तू दिसलाच नाहीस बहुतेक...
पुढल्या सोमवारी बहुदा
पुढल्या सोमवारी बहुदा मृण्मयीची वेळ येणार.
पुन्हा एकदा राहुल च अत्त
पुन्हा एकदा राहुल च अत्त पर्यंत सर्वात कन्सिस्टंट/सिन्सिअर आहे असं वाटल मला !
अभिलाषा च 'भुर्र्र्र्रर्र्र्र्र्र्र्र 'काय सही झालं, म्हणून पाहिलं तर जिभेला खाज सुटते
IMO बाकी काही म्हणा , हे दोघ आहेतच गाण्यात इतरां पेक्षा सुपिरियर, मग अमराठी म्हणून पुढे जातात अशी तक्रार /झी चं धोरण असेल तरी काही फरक पडत नाही, they deserve where the are !
अपूर्वा ही ओके गायली या आठवड्यात.
मृण्मयी च आवाज छान आहे पण कॉन्फिडंट नसते ती, आणि एक्स्प्रेशसन्स मधे मार खाते..या आठवड्यात तर अतिशय फ्लॉप झाली तिची गाणी !
नेक्स्ट वीक बाहेर पडणार बहुदा !
(खरं तर सर्वात वाइट गाण्यात उर्मिला नी बाजी मारली, 'हव मे उडता जाए' तर ऐकवत नव्हत.. तिची 'लावणी' पण अतिशय अॅव्हरेज च झाली होती पण वरचा 'सा' ??... हाइट झाली... झी कसं घालवेल तिला म्हणून बहाल केले हे मार्क्स !)
बहुतेक स्पर्धकांना हिंदी गाणी फारशी झेपतच नाहीत, कशाला या राउंड्स ठेवतात ?
हे बघा... प्रिय संपादक
हे बघा...
प्रिय संपादक ’लोकसत्ता’ यांसी,
सप्रेम नमस्कार.
"मला मराठी नीट बोलता येत नाही" असे वेळोवेळी अभिमानाने सांगणार्या पल्लवी जोशीने मंगळवार दि० २४ नोव्हेंबर २००९ च्या सारेगमपच्या भागामध्ये कहरच केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस २६-११ च्या दिवशी दहशवादी हल्ल्याला तोंड देण्याचे कर्तव्य मोठ्या धाडसाने निभावलेल्या काही शूर पोलिसांची ओळख करून देताना आपल्या उच्च प्रतीच्या मराठीच्या ज्ञानाचे तारे तोडत पल्लवीने त्यांचा उल्लेख चक्क "या दहशतवादी हल्ल्यात सहभागी झालेले पोलिस अधिकारी" असा केला. पल्लवीला आपल्या मराठी भाषेच्या ज्ञानाची पर्वा नाही, आणि "मी जे काही आणि जसे काही बोलेन, ते मराठी वाचकांनी ऐकून धन्य झालेच पाहिजे आणि टाळ्या वाजवल्या पाहिजेत" अशीच तिची नेहमी भूमिका राहिली आहे. पण आता मात्र तिच्या मराठीबद्दलच्या बेपर्वाईच्या वर्तणुकीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत असेच म्हणावे लागेल. अशा या तिच्या भाषिक दहशतवादाबद्दल आपण तिच्या निषेधार्थ जोरदार टाळ्या वाजवुया.
मराठी म्हणून जन्म घेतल्याबद्दल अभिमान वाटत नसला तरीही निदान ज्या भाषेतील कार्यक्रमामुळे मिळणार्या पैशाने आपण गेले काही वर्षे पोट भरीत आलो, ज्या कार्यक्रमामुळे आपल्याला आयुष्यभरातील सर्वाधिक प्रसिद्धी मिळवून दिली, त्या कार्यक्रमाच्या मिठाशी तरी तिने जागणे आवश्यक आहे. एखाद्या चांगल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंग्रजी कार्यक्रमाच्या सूत्रधाराच्या भूमिकेची जबाबदारी तिला मिळाली असती (होय, तसे होईल अशी आपण सदिच्छा धरुया आणि कल्पना करुया) तर तिने आपले इंग्रजीचे ज्ञान, उच्चार, संबंधित विषयाचे ज्ञान इत्यादी विषयी अभ्यासपूर्वक सुधारणा केल्या नसत्या का? मग मराठी प्रेक्षकांनाच अशा पकारे का गृहित धरले जाते? मराठी चित्रपटात, मराठी दूरदर्शन वाहिनी यांवर अनेक वेळा कामे करूनही आपल्या मराठीच्या अज्ञानाला कुरवाळीत मराठी बोलताना वाक्यांत ८०-१००% टक्के इंग्रजी शब्द वापरणार्या पल्लवीशिवाय मराठीमध्ये दुसर्या कोणी अधिक चांगली मराठी कलाकार उपलब्धच नाही का?
आभार.
आपला,
डॉ० सिद्धार्थ बोर्डॆ
Here is the Proof > WATCH
http://www.youtube. com/watch? v=q7h8rgT4lYY
कमाल आहे पल्लवीची पल्लवीनी
कमाल आहे पल्लवीची
पल्लवीनी जाहिर माफी मागावी( खरं तर हाकलायला हवं तिला पण लाचार लोक काढणं तर शक्य नाही तिला!)
अवघड आहे! एवढी अक्षम्य चूक
अवघड आहे!:अओ: एवढी अक्षम्य चूक सहन कशी केली जाते
बर एलिमिनेशन स्पॉयलर
बर एलिमिनेशन स्पॉयलर बहुतेकांना माहित असेलच, पण ऐकायचा असेल तर माझ्या वि.पू. मधे मेसेज टाका.
पुढच्या आठवड्यातले गेस्ट जज (बहुदा )उषा मंगेशकर आहेत. (पुन्हा एकदा उर्मिलाला लावणी म्हणायची सवलत. नव्हे बोनस असणार.. इतकी वाइट गातेय सध्या .. जायला हवी होती खर तर या आथवड्यात पण तिचे कोण काय बिघडवणार :()
एक मिनीट. इथे जरा गरजेपेक्षा
एक मिनीट. इथे जरा गरजेपेक्षा जास्त मुठी आवळल्या जात नाहीत ना याचा विचार करावा ही विनंती. पल्लवीचे मराठी अस्खलित, बिनचूक व वक्तृत्व सर्वोत्तम नसले तरीही इतर अनेक संचालकांपेक्षा ती नक्कीच खूप उजवी आहे. तिच्या इंग्रजीमिश्रित मराठीमुळे व ठराविक काही प्रश्नांमुळे किंवा टाळ्या वाजवा या आग्रहामुळे थोडा रसभंग होत असला तरी शेवटी तीही एक माणूस आहे व अशा चुका अजाणतेपणी होणे हे नैसर्गिक आहे. तिला कोणत्याही तराजूत तोलण्याआधी ती जे संचालन करते ते आपण करत असू तर आपण ५ वर्षांत कदापिही अशी एकही चूक होऊ दिली नसती अशी ग्वाही जे देऊ शकत असतील त्यांनीच तिला अशा कडक भाषेत नावे ठेवावीत. (ती गोष्ट आहे ना की तो साधू जमावाला सांगतो की पापी माणसाला मारण्यासाठी त्यानेच पुढचा दगड उचलावा जो स्वतः पूर्णतः पापमुक्त आहे?)
पल्लवी स्वतः अतिशय संवेदनशील व्यक्ती आहे. तिच्या वेळोवेळी पाणावलेल्या डोळ्यांनी व गदगदलेल्या आवाजानी हे आपण पाहिलेले आहे. तेव्हा तिच्या २६/११ बद्दल बोलताना तिच्या मनातल्या भावाविषयी शंका नसावी. दुसरे असे की इथे दिलेले वाक्य संदर्भाबाहेर ऐकले / वापरले तर नक्कीच दुराग्रह निर्माण होईल. परंतु मूळ वाक्ये अशी बोलली गेली आहेत - "२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशवादी हल्ला झाला. या हल्ल्याचा पहिला घाव आपल्या छातीवर झेलला तो मुंबई पोलिसांनी. या हल्ल्यामधे सहभागी झालेल्या पोलिसांपैकी काही अधिकारी आज आपल्यासोबत आहेत..."
इथे काय चुकलं? "हल्ल्यामधे" ऐवजी "हल्ल्याच्या प्रत्युत्तरामधे" अशी शब्दयोजना हवी होती बहुतेक. पण खरंच आपण एवढे टोकाचे भाषिक समीक्षक आहोत का, की आपल्याला मूळ संवेदनेपेक्षा कोणते शब्द वापरले गेले हेच काटेकोरपणे तपासायचे आहे? चूक झाली हे मान्य पण अशी चूक कोणाकडूनही होऊ शकते हेही कृपया लक्षात घ्यावे. ती अजाणतेपणी झालेली चूक आहे; कदाचित उत्स्फूर्तपणे बोलण्यामुळे, भावनेच्या भरात बोलल्यामुळे, किंवा केवळ मेंदूच्या पकडीतून सहज निसटल्यामुळे! त्यासाठी तिचे मराठीचे ज्ञान वेठीस धरण्याची आवशक्यता नाही. ही चूक प्रशांत दामले किंवा प्रतिभा पाटील यांच्याकडूनही होऊ शकते! Forget and Forgive!
वरचे पत्र आणि प्रतिक्रिया मला खूप जहाल वाटल्या म्हणून हे लिहिले. चुकीचे समर्थन करण्याचा उद्देश नाही.
चाफा, सॉरी पण तिनी चूक च अशी
चाफा,
सॉरी पण तिनी चूक च अशी केली आहे कि जहाल प्रतिक्रिया च आल्या पाहिजेत !(माणुस आहे आणि चुका होणार वगैरे याला काही अर्थ नाही, ती एक प्रोफेशनल होस्ट आहे, ज्या प्रकारची चूक अत्ता केलीये ती चूक अक्षम्य आहे... त्या शूर पोलिसांनी च दम भरायला हवा होता तिला !)
आणि ही एवढी एकच चूक नाही, पाच वर्षे प्रत्येक एपिसोड मधे बोलताना ती काही ना काही सॉलिड चूक करतेच, अशक्य वाइट होस्ट आहे ती !
चाफा, अनुमोदन. खरच,
चाफा, अनुमोदन.
खरच, सुत्रसंचालन करणे येरागबाळ्याचे काम नोहे.
सूत्रसंचालन करणे
सूत्रसंचालन करणे येरागबाळ्याचे काम नाही हे खरं आहे. मला जमणार नाही हेही खरं , पण मग नाहीच्चे ना त्यामुळे मी सूत्रसंचालक
जोक्स जाऊ देत पण एखादे वेळी क्वचित शब्दांची गफलत किंवा "स्लिप ऑफ टंग" होणं समजू शकतं कोणीही, जसं टायपो समजून घेतली जाते पण कायम अशुद्धलेखन कोणी करत असेल तर चीड येते. तसंच पल्लवीचं आहे. नेहमीच चुकीचं बोलते काही ना काही. भातात खडे यावेत तसं तिचं बोलणं टोचतं कानाला! आताचा हा विनोद (?!) जरा अतिच झाला त्यामुळे अशा प्रतिक्रिया आल्या असाव्यात.
) पण ते काहीही असो , तिचे सदोष बोलणे टोचायचे ते टोचतेच मला तरी ! 
बाकी ती सेन्सेटिव वगैरे असण्याची शक्यता असेलही (किंवा कदाचित मराठी सूत्रसंचालनापेक्षा गळा भरून येणे /अश्रुपात इ.अभिनय बरा जमत असेल तिला
सोमवार चा भाग बघा नक्की.. खूप
सोमवार चा भाग बघा नक्की.. खूप हॅपनिंग आहे..
भातात खडे यावेत तसं तिचं बोलणं टोचतं कानाला! >>>>> मै अगदी १०० मोदक... !! "गाणं म्हणालीस" हे तर भयंकर डोक्यात जातं दरवेळी..!! चूक १०० % पल्लवीची नसेलही कदचित... कारण झालेली चूक ही इडीटींग च्या वेळी दुरुस्त करता आली असतीच की.. कार्यक्रम लाईव्ह नसतो... दिग्दर्शकाच्या तरी लक्षात यायलाच हवं होतं ते... आणि माणूस आहे म्हणजे चूक होणारच वगैरे बळच आहे.. प्रोफेशनल कार्यक्रम म्हंटला आणि त्यात अश्या चूका झाल्या की लोकं प्रतिक्रिया ह्या देणारच..
एडिटर तर आहेत कि नाही अशी
एडिटर तर आहेत कि नाही अशी शंका येते, ज्या प्रकारे पल्लवीच्या सगळ्या चूका डोळ्या आड करतात !
'गाणं म्हणालीस' तर ऑलमोस्ट दर वेळी.. दोन तोंडात माराव्याश्या वाटतात तिला !
आणि तशीही पल्लावी इन जनरल होस्ट म्हणूनच वाइट आहे, हिंदीतही अंताक्षरीला ठरवून नाटकी रडणं, कर्कश्श बोलणं , स्टुपिड कमेंट्स भयानक डोक्यात जायचं !
दिग्दर्शकाच्या तरी लक्षात
दिग्दर्शकाच्या तरी लक्षात यायलाच हवं होतं ते.
>>> हा मुद्दा अगदी योग्य. यात एडिटर आणि दिग्दर्शक यांचा दोष सर्वाधिक आहे. पल्लवी मला आवडते. त्या अवधूत गुप्तेपेक्षा कैक पटींनी चांगलं बोलते! हिंदी अंताक्षरीच्या होस्टसपेक्षा हजार वेळा चांगली आहे! मला अजिबात वाटत नाही अक्षम्य चूक वगैरे. There is no such thing as perfect in this world.
<<< माणूस आहे म्हणजे चूक होणारच वगैरे बळच आहे.. प्रोफेशनल कार्यक्रम म्हंटला आणि त्यात
अश्या चूका झाल्या की लोकं प्रतिक्रिया ह्या देणारच
>>> प्रोफेशनल कार्यक्रमात चुका होत नाहीत की काय? हजारो लोकांसमोर कपडे सुटण्यापासून लोकसभेत मारामारीपर्यंत सगळे होते! वेलकम टू रिअॅलिटी टीव्ही! चूक झाली आणि प्रतिक्रिया येणारच हे मान्यच आहे पण "अक्षम्य चूक" हे नो पटेश!
...
...
पल्लवी मला आवडते. त्या अवधूत
पल्लवी मला आवडते. त्या अवधूत गुप्तेपेक्षा कैक पटींनी चांगलं बोलते! हिंदी अंताक्षरीच्या होस्टसपेक्षा हजार वेळा चांगली आहे!
<<< चाफ्या,
अरे हिंदी अंताक्षरीला दुर्गा जसराज्-रेणुका नंतर पल्लावीच होती रे बरेच दिवस होस्ट
एक रिचा शर्मा(गाण्या साठी) सोडून अंताक्षरीच्या सगळ्याच होस्ट इरिटेट करायच्या !
तेच तर म्हंटलं मी वरती कि तिथेही पल्लवी वाइट च होस्टिंग करायची , फेक इमोशसन आणि अन्नु कपुर बरोबर माकडचेष्टा!
आणि अवधूत पेक्षा चांगलं म्हणजे चांगलं ही फारच कमीत कमी अपेक्षा झाली !
सध्याच्या अवधूत पेक्षा प्रेक्षकां मधली शेंबडी पोरही ही सेन्सिबल बोलतील !
बाकी प्रत्येकाची आवड आहेच आणि इतक्या दोषां सकट ती लोकांना आवडतही असणार पण IMHO देशावर आलेल्या एवढ्या कठिण संकटाला तोंड देणार्या पोलिसांचा (जरी नकळत झाला तरी)अपमान हा अक्षम्य च!
इतर रिअॅलिटी शोज च्या चीप गोष्टींचे कोणीच समर्थन करत नाहीये , (खर् तर त्या गोष्टी नजरेआड कराव्यात कारण तसल्या शोज ना टी आर पी हे फक्त कोंट्रोव्हेसीज मुळे मिळते)त्यांच्यावरही टिका होतेच इथे जरा जास्त च गंभीर चूक केली आहे पल्लवीनी तर जहाल टिका होणारच !
बरं चल आपण उर्मिलाकडे वळू.
बरं चल आपण उर्मिलाकडे वळू. तिच्याबद्दल आणि अवधूतबद्दल मी तुझ्याशी सहमत आहे.
मला उर्मिलाची सुरुवातीची गाणी
मला उर्मिलाची सुरुवातीची गाणी प्रचंड आवडली होती... विशेष म्हणजे न ऐकलेली गाणी ऐकायला मिळाली...
पण नंतर as ususal अवधूत-सलील कंपनीने तिला प्रचंड डोक्यावर घेतले.. आणि योग्य मार्गदर्शन करण्याऐवजी नको तितके कौतुक केले
.. सध्याची गाणी बेकार होत आहेत एकदम..
सलील चे तिने मधे हुर हुर असते गाणे गायले होते... सलील ने तिला अजुन चांगले व्ह्यायला हवे होते असे म्हंटले.. पण काय चुकले ते सांगितलेच नाही.. अवधूत चे comments तर ऐकण्यापलिकडचे आहेत..
स्वरदा गोखले ची पण तिच अवस्था आहे... गाणे गाताना श्वास जातो.. लाडिक होते कायम.. पण कुणी काहीच बोलत नाही.. देवकी ची उणीव खुप जाणवतेय..
ऋतुजा - अभिलाषा याच काय त्या चांगल्या गात आहेत सध्या.
Pages