सा रे ग म प मराठी : पुढचे पर्व

Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23

महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).

हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....

http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुल च गाणं आवड्तं. चुल्लू भर पानी मधे डूबण्याएव्हडं वाईट नाही वाटलं. तो सगळेच भाग छान गायलाय. तोच होणार विनर. इथे मराठी-यूपीचा प्रश्ण करू नका.
अभिलाषा गाते चांगली. पण सगळीच गाणी तिला सूट नाही होत. लावनी साठीचा आवाज नाही तिचा. आणि उर्मिला ची सगळीच गाणी लावणी सारखिइ वाटतात. रूजूता छोटी मुलगीच आहे, पण छान गाते.

वर म्हणालय ते बरोबर आहे. पल्लवी[पेक्षाही सलिल्-अवधूत जास्त इन्ग्लिश बोलतात. तेही वाईटच आहे, चूक आहे. पण चूक फक्त पल्लबी नाही.

थोडक्यात काय तर ह्या पर्वा मधिल एक ही गायक्-गायिका खास नहियेत.
काय तो त्या अभिलाशा चा थोडा चढता ग्राफ (performance चा) आहे इतकच.
तिच्या ह्या चढत्या performance मुळे, अमराठि असुनही स्पश्ट उच्चारामुळे, आणि तिच्या Sincere efforts मुळे ति winner व्हायला काहिच हरकत नाहिये. (IMO)

पण शेवटी निर्णय zee ला घ्यायचाय (किंवा घेवुनही झाला असेल !!!!) आणि जो की माझ्या सारख्या बर्‍याच जणांना unfortunately मान्य नसेल.
(आधिच डोक्यावर चढवुन, तु शहारुख खान, तु स्टार असे म्हणुन झाल्यावर "निक्काल" च लागणार ना
Sad )

ह्या पर्वा मधल्या गायक गायिकेची तुलना त्यांच्या आप-आपसातच होउ शकते ना की lil champs शी आणि
ना ही वैशाली माढे शी. ती लोक ह्यांच्या पेक्शा बरीच 'पोहोंची हुई चिज आहेत' Happy

आज जाण्याचा नंबरः
ऋतुजा, स्वरदा, किंवा अभिलाषा (अवधुत ने "म" देउन तिला खाली आणले आहे)

फायनल मधे
उर्मिला
राहुल
मृण्मयी
--
आणि विजेती कोण होणार ओळखा पाहु मुलानो Wink

(आता परत कॉलबॅक फेरी होणार नाही अशी फोल आशा मनात बाळगलेली खोटी ठरली Sad पुढच्या आठवड्यात कॉलबॅक होईल असे वाटतेय).

विजेती कोण होणार ओळखा पाहु मुलानो >>
उपविजेता-उपविजेती कोण असे विचारायला हवे.. विजेती तर ठरलेलीच आहे Proud

उद्याच आहे कॉलबॅक >> ओह्ह कॉलबॅक आहेच का परत?

विजेती तर ठरलेलीच आहे
<<<
या वेळी कहानी मे ट्विस्ट देतील कि काय अशी शंका वाटतेय मृण्मयी ला ज्या प्रकारे हाइप करून पुढे ढकलतायेत ते पाहून !

या वेळी कहानी मे ट्विस्ट >>
आता कॉलबॅक पण आहेच... त्यातल्या पण कुणालातरी विजयी करतील.. काय सांगता येत नाही..

ऋतुजा गेली.
Btw, या कॉल बॅक च्या नाटका पेक्षा विटो पॉवर द्यायला हवी जजेस ना, म्हणजे एकच अनफेअर एलिमिनेशन रोकण्याची पॉवर.
अर्थात जजेस च असे बायस्ड आहेत तर विटो पॉवरचीही वाट लावली असती त्यांनी..

ऋतुजा गेली >> ओह्ह Sad
अताचे पर्व एकदम बेकार होतेय सगळ्यात... Sad मागचे आजचा आवाज वाले पर्व पण चांगले झाले होते..
वास्तविक याच्या ऑडिशन्स ना जास्त मजा आली होती Proud

अताचे पर्व एकदम बेकार होतेय सगळ्यात... मागचे आजचा आवाज वाले पर्व पण चांगले झाले होते..
>>> अनुमोदन! हिंदी सारेगमपच्याही खाली गेली पातळी! Proud

काय तो कालचा भाग !! अरारारारा !
त्या सवधूत गुलकर्णी जोडीला काय बोलावे हे कळतच नाही बहुतेक.
>>याच्या ऑडिशन्स ना जास्त मजा आली होती
अनुमोदक. त्या ह्या कार्यक्रमापुढे बर्‍याच चांगल्या वाटल्या.

फार म्हणजे लईच बोअर झालं. आणि निकाल लागण्याच्या आधी ऋतुजावर जी बळंच स्तुतीसुमने उधळली गेली ( म्हणजे ती प्रशंसेस पात्र आहेच पण कौतुक सुध्दा 'ठरवून' केलंलं आणि सहज झालेले कळते ना!) तेव्हाच कळाले की आज ती आऊट आहे. Sad वाईट रिझल्ट्.मृण्मयीला आत ठेवून ऋतुजाला बाहेर कसे काढू शकतात? Angry

चाफ्या,
हिंदी सारेगमप शी तर तुलनाच होउ शकत नाही Happy
तिथे १० पैकी निदान ५-६ तरी फायनलिस्ट्स डिझर्विंग असतात.
मुख्य म्हणजे अशा ताईं असतात तिथे :). ( निदान सेमि फायनल चे काही एपिसोड्स) त्यांचं प्रेझेन्स, कॉमेंट्स यामुळे शो चा दर्जा इतर शोज पेक्षा नक्कीच उजवा असतो.
फायनल ला सुध्दा फालतु बडबड करणारे ३ ड्रामेबाज मेंटर्स असले तरी एखादा शंकर महादेवन सारखा जिनियस, विशाल शेखर सारखे सेन्सिबल मेंटर्स ठेवायचे भान तरी असते झी ला. (आणि ड्रामेजाज हिमेश सुध्द्दा अवधूत पेक्षा परवडला.)
इथे या वर्षी सगळाच आनंदी आनंद , मुलींची गर्दी जमवता जमवता बर्‍याच डिझर्विंग मुलांवर अन्याय केला झी मराठीनी.
वैशाली माडे आणि त्या आधीच्या मुख्य पर्वात (अभिजीत जिंकल्याचा रिझल्ट पटला नसला तरी) छान दर्जा होता प्रोग्रॅम चा (अवधूत पण भान राखून बोलायचा जरा), तेंव्हा गाणी पण तीच ती नाही वाटायची पण नंतर प्रत्येक पर्वात ठराविक गाणी झालीच पाहिजेत अस् धोरण झालं बहुदा झी चं :).
Btw, ती अनघा ढोमसे कुठे गात नाही का?
छान आवाज होता तिचा.

ड्रामेजाज हिमेश सुध्द्दा अवधूत पेक्षा परवडला >> अगदी असच वाटतय आता Happy

अवधूत पण भान राखून बोलायचा जरा >> मला वाटते अवधूत तेव्हापण बाष्कळ पणा करायचा तरी.. देवकी बरोब्बर खडूस कमेंट्स द्यायची.. balance व्हायचे त्यामुळे Proud

DJ, अवधूत गुप्ते कधीच सेंसिबल बोलत नसे. समीरला विचार, मी दोन वर्षांपूर्वीच त्याला सांगितलं होतं ते. Proud
आणि माझी ती कॉमेंट हिंदी सारेगमपला नावं ठेवणार्‍यांसाठी होती. Wink

आज कॉल बॅक मधे परत कोणाला आणणार त्याच्या वर बेट लावा....

अपूर्वा की संहिता की ऋतुजा...

आपले नशीब एवढेच आहे.. की सलधूत गुलकर्णी जोडीच्या अनेक अचाट आणि अतर्क्य कॉमेंटस दिग्दर्शक डांगे एडिटरच्या मदतीने उडवतात..

झी ने ठरवलेलीच स्पर्धक येणार पण सुस्मीरता यावी अशी माझी इच्छा आहे :).
टॅलेंट चा झी ला काही फरक पडत नसेल तर निदान औरंगाबाद ची एकमेव स्पर्धक या कमर्शियल अ‍ॅप्रोच वर तरी आणवं तिला !

औरंगाबाद हा कमर्शियल अ‍ॅप्रोच? ख्या ख्या Happy
यापेक्षा आत्ता चालु आहे ते अधिक मनोरंजक Happy

दिपांजलीने अनघा ढोंमसेची आठ्वण काढली, आणि मला तिचं "चमचम करता है ये नशीला बदन" आणि शारद सुंदर चंदेरी राती - हि गाणी आठवली. काय सुरेख म्हंटली होती. खरच आता कुठे असते ही?

ऋतुजा - परत यायला हवी पण...
अश्विनी - नो स्पेशल रीझन टु कन्सिडर गाणे सोडले तर..
सुस्मिरता - मराठवाड्याला प्रतिनिधित्व हवे असा विचार झाला तर Wink
संहिता - ग्लॅमर हवे असल्यास घेणार..टॅलंटच्या बळावर चान्स कमी..
अपुर्वा - अन्यभाषिक आहे चान्सेस कमी - राज ठाकरेंच्या नादाला कोण लागणार Wink

वरील कारणे आपण पाहिली तर "टॅलंट" हा सगळ्यात शेवटचा क्रायटेरीया ठरतोय. अतिशय दुर्दैवी प्रकार.

अपुर्वा - अन्यभाषिक आहे चान्सेस कमी >>> आधीच दोन आहेत.. त्यांच्यापैकी एक मेगा फायनलला नक्की... सो त्यांचा कोटा फुल... Happy ऋतुजा किंवा अश्विनीपैकी एक परत यायला पाहिजे.. सुस्मिरता सुरुवातीला खूप छान गायची नंतरच्या फेर्‍यांमधे बरीच घसरली..

मृण्मयीबद्दल डिजेला मोदक.. बळच अती डोक्यावर चढवलय.. उर्मिलालाचं पण तसच आहे.. कालच गीत रामयणातलं गाणंपण फारच सो-सो झालं तिचं पण एकूणात ती बाहेर जायची काहिच शक्यता नाही...

Pages