Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23
महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).
हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....
http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हेतू झी जाणे पण बहुदा आज
हेतू झी जाणे पण बहुदा आज जजेस च्या टॉप स्कोअर प्रमाणे ती आली आणि I guess गायली पण worth.
फक्त सुस्मीरतालाही वरचा सा आणि नी मिळाला म्हणे, मग माहित नाही अपूर्वाला या पेक्षा चांगला स्कोअर मिळाला किंवा काय !
<<< काय हेतू असेल तिला
<<< काय हेतू असेल तिला आणण्याचा?
>>> स्वरदाला ठेवून अपूर्वाला काढल्याच्या अन्यायाने डिवचून रात्री झोप आली नसेल सलीलबुवांना!
lol चाफ्या , थोडक्यात वाया
lol चाफ्या :), थोडक्यात वाया गेली कॉल बॅक, मग अता पुढच्या एलिमिनेशन ला चुक पूर्णपणे दुरुस्त करा म्हणावं :).
अपूर्वा-सुस्मीरता दोघी स्पर्धेत असत्या जर तेंव्हा अपूर्वाला घालवलं नसतं तर !
असो,
ऑरकुट वरच्या माझ्या एका स्नेहींनी म्हंटल्या प्रमाणे 'कॉल बॅक' ऐवजी 'किक आउट' राउंड घ्यायला हवी आणि त्यात त्यांना पात्रता नसताना जास्त हाइप करून ठेवलाय त्यांना घालवून द्यायला हवं
'किक आउट' राउंड >> लै भारी
'किक आउट' राउंड >> लै भारी

पहिला मग अवधूत-सलील याना बाहेर काढा
अपूर्वा काय सुरेख गायली!
अपूर्वा काय सुरेख गायली! "भोगले जे दु:ख त्याला" अगदी लाजवाब झाले! तिच्यावर दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अन्यायाचा परत एकदा अगदी उबग आला!
)
पियूची गाणी पण छान झाली. "पिया बिना" गाण्यातले तिचे हिंदीचे उच्चार बघा किती सुरेख आहेत! (मराठीभाषिकांचे हमखास असतात तसे नाहीत
बाकी सगळे यथातथा.
अपूर्वा काय सुरेख गायली!
अपूर्वा काय सुरेख गायली! "भोगले जे दु:ख त्याला" अगदी लाजवाब झाले! >>
अगदी अगदी अनूमोदन.. तिचे हिंदी गाणे पण सुरेख झाले होते... तिची निवड योग्यच झाली,
सुस्मिरता चे पण हिंदी गाणे लाजवाब झाले... पिया बिना" सुंदर झाले.
संहिता ची गाण्याची निवड चुकली.. परत गुरु सिनेमातलेच गाणे गायले
जमले नाही.
सांहिताला गुरू साठी वरचा सा
सांहिताला गुरू साठी वरचा सा का दिला ???
अपूर्वाचं भोगले जे दुख: पेक्षा हिंदी गाणं जास्त छान झाले.. सुस्मिरताला पण वरचा सा दिला.. ! एकूणात काल काही मार्क्स आणि कमेंट्स देत होते.. !!
'किक आउट' राउंड >> दीपांजली,
'किक आउट' राउंड >>
दीपांजली, केदार_जोशी अनुमोदन...
एक आतल्या गोटातली बातमी..ज्या
एक आतल्या गोटातली बातमी..ज्या एपिसोड मध्ये श्रुती विश्वकर्माला काढण्यात आले त्या वेळी खरेतर ती ऱोनी मुजुमदारानी जे गाणे वाजवले ते म्हणणार होती पण तिच्यावर ते बदलण्यावरून खूप pressure आणले आणि बराच गोंधळ घातला झी ने.. म्हणून मग तिला बाद ठरवले...
हे झी चे लोक फारच विचित्र आहेत एकूणात! आणि talent hunt वगैरे सगळे झूठ आहे.."बोलविता आणि करविता धनी वेगळाची " हे अगदी स्पष्ट झाले आहे...
कालचा भाग चांगला
कालचा भाग चांगला झाला.
अपूर्वा, राहुल, अभिलाषा यांनी मजा आणली. मृण्मयीचं 'ठेच लागली जाता जाता..' आणि उर्मिलाचं 'घननीळा..' ही चांगले झाले.
कालच्या भागात सगळ्यात शेवटी
कालच्या भागात सगळ्यात शेवटी झालेली गम्मत!
आयडीया आजचा आवाज म्हणुन राहुल आणि अभिलाषा दाखवायला हवे होते. त्यानी "चुकुन" उर्मिला दाखवली. (कदाचित ते डीफॉल्ट सेटींग आहे? आणि बदलायला विसरले)
मन्स्मि हो ना.. मला पण खुप
मन्स्मि हो ना.. मला पण खुप मजा आली बघायला.
आपण का बघतो हे असा प्रश्न पड्तो...
हो कालची गम्मत मजेशीरच खरं,
हो कालची गम्मत मजेशीरच खरं, एवढा बेजबाबदारपणा
आजचा आवाज अपूर्वा....काहीही
उर्मीलाला द्यायला हवं होतं
पुढचा नंबर तिरोडकरबाई बहुतेक
राहुलच्या चुका छान सांगितल्या मान्यवरांनी
गोडबोलेंबाईंची विकेट मस्त घेत असतो अवधूत
कालचं अपूर्वाचं 'रैना बीती
कालचं अपूर्वाचं 'रैना बीती जाए...' केवळ आनंद देऊन गेलं.. जियो अपूर्वा..!
ही अपुर्वा उर्मिलाला डोकेदुखी
ही अपुर्वा उर्मिलाला डोकेदुखी ठरणार आहे असे दिसतेय
स्वरदा, मृण्मयी बाहेर जाणे आता जस्ट मॅटर ऑफ टाईम वाटतेय.
जर उर्मिलाने शोभा गुर्टु, सुलोचना चव्हाण, रोशन सातारकर, आरती अंकलीकर, रेशमा, शुभा मुद्गल यांची आणखी हिट गाणी शोधली नाही तर तिचे शेवटच्या तीनात स्थान जरा डळमळीत वाटतेय.
बाहेर जाणार्यातः
स्वरदा
मृण्मयी
-----------------
फायनलिस्टः
राहुल सक्सेना
अभिलाषा
उर्मिला/अपुर्वा
>जर उर्मिलाने शोभा गुर्टु,
>जर उर्मिलाने शोभा गुर्टु, सुलोचना चव्हाण, रोशन सातारकर, आरती अंकलीकर, रेशमा, शुभा मुद्गल यांची आणखी हिट गाणी शोधली नाही
बबबबबब केव्हडी लिस्ट..... ते काय मंडईत जावून भाजीपाला घेणे आहे काय?
मृण्मयी ला इतकं डोक्यावर का
मृण्मयी ला इतकं डोक्यावर का चढवतायत ? पियू बोले ला २ नी !! ते अत्यंत सुमार गायलं होतं तिने..
"मालवून टाक दिप" धापा टाकत म्हंटलं ऑलमोस्ट.. तरी सलीलने ध..
अभिलाषाला पण कैसी पहेली है ये जिंदगानी ला २ वरचे सा.. एकूण कैच्याकै मार्क्स दिलेत..
>पियूची गाणी पण छान झाली.
>पियूची गाणी पण छान झाली. "पिया बिना" गाण्यातले तिचे हिंदीचे उच्चार बघा किती सुरेख आहेत!
ख्या ख्या ख्या ......
तुम्ही कधी गायलात का हो?
मॄण्मयीच्या चेहर्यावर
मॄण्मयीच्या चेहर्यावर मनापासून हसू कधी दिसणार ? ( तिचा गाणं संपल्यानंतरचा चेहरा डोक्यात जातोय माझ्या .
)
आणि म्हणे हसावं का हा प्रश्न पडला , अवधूतची त्यावरची कमेंट म्हणजे षटकार होता . 
)
" आज कुणीतरी यावे " गाऊन झाल्यावर स्वरदाच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता .
मला तिचं गाणं आवडलं , पण ...... गाण्याच्या प्रत्येक ओळीतलं शेवटचं अक्षर ऐकूच येत नाही . तिच्यात कधी सुधारणा होणार ???
( ह्या दोघींच्या बाबतीतले हे प्रश्न मला सध्या फार सतावतायंत .
(कदाचित ते डीफॉल्ट सेटींग
(कदाचित ते डीफॉल्ट सेटींग आहे? आणि बदलायला विसरले) >>
> ह्या दोघींच्या बाबतीतले हे
> ह्या दोघींच्या बाबतीतले हे प्रश्न मला सध्या फार सतावतायंत
एव्हडं मनाला नाय लावून घ्यायचं काय? इतर तज्ञांप्रमाणे experts comments द्यायच्या
स्वरदा आणि मृण्मयी जाणार
स्वरदा आणि मृण्मयी जाणार यानंतर
त्यानंतर मात्र competition tough असेल.
अवनी, तू लिहिलेल्या दोघीं
अवनी,
तू लिहिलेल्या दोघीं पैकीच एक overhyped singer गेली !
कोण ते ओळखा
दीपांजली, मला
दीपांजली,
मला वाटतं............स्वरदा
राधिका, तुझी विचारपुस बन्द
राधिका,
तुझी विचारपुस बन्द आहे का?
इथे नाही लिहित रिझल्ट.
मृण्मयी असणार! सलील
मृण्मयी असणार! सलील कुलकर्णीबद्दल उरलासुरला नावापुरताही आदर उरलेला नाही! स्वरदाचं गाणं म्हणे थोडा वेळ रेडियोत ऐकत आहोत असं वाटलं त्याला!
अपूर्वाचं "रैना बीती जाए" बेस्ट!
आत्ता स्वरदाचं 'नयन तुजसाठी
आत्ता स्वरदाचं 'नयन तुजसाठी आतुरले' ऐकलं.
या आधी सायली पानसेनी गायलेलं अजून कानात आहे.
'माझ्या मना रे ऐक जरा' ही सलीलची सन्गीतरचना छान वाटली.त्यानी खरं तर पेटी घेऊन गाण्यांना चाली लावत वेळ सत्कारणी लावावा (हा माझा अनाहूत सल्ला)
स्वरदाला इतरांपेक्षा दुपटीहून अधिक मतं आली ?.......................अरे काय चाललंय काय?
अगदी अपेक्षित निकाल्..(आणि
अगदी अपेक्षित निकाल्..(आणि योग्यही!)
स्वरदाला इतरांपेक्षा दुपटीहून
स्वरदाला इतरांपेक्षा दुपटीहून अधिक मतं आली ?>>>>
अहो.. दुप्पटीहून काय.. तिला तब्बल ४५% मते आल्याचे दाखवले की टी.व्ही. वर... आणि दोन नंबरवर मृण्मयीला १८% मते...
आजचा निकाल समाधानकारक
आजचा निकाल समाधानकारक !
अभिलाषाची दोन्ही गाणी आवडली. स्वरदाचं 'नयन तुजसाठी' फार नाही आवडलं पण 'एकवीरा देवी' खरंच छान झालं. आवाज सुरेख लागला आणि चपखल बसला त्या गाण्यासाठी.अपूर्वा चांगलं गायली.उर्मिलाची ठीक ठीक आवडली. राहुलची ठीक ठीक झाली पण नाही आवडली. ( रच्याकने, त्याने दुसर्या लोकगीताच्या फेरीत जे गाणे म्हटले त्याची पहिली ओळ अगदी हम है राही प्यार के मधील 'वो मेरी नींद मेरा चैन मुझे लौटा दो ..' सारखी होती. ) मॄण्मयीचं गाणं मला विशेष आवडत नाहीच. 'गाऊ मोटंवरचं गानं' तर अगदीच फुसक्या आवाजात झालं.
ज्याला सगळ्यात जास्त गुण त्याला सगळ्यात कमी वोट्स
ज्याला सगळ्यात कमी गुण त्याला सगळ्यात जास्त वोटस
बॉटम टू मधल्यांच गाणं नेहमी त्या दिवशीच्या सर्वोत्तम गाण्यांपैकी असतं. ( म्हणजे आजचा आवाज मध्ये जरी नाही दाखवलं तरी परीक्षक तसं बोलून मात्र नक्की दाखवतात. )
एकूण काय, सगळे स्पर्धक झी च्या पटावरची प्यादी. परीक्षक आणि वोट्स पाठवणारे पटावरच राजा आणि वजीर. निकालांमागचा खरा कर्ता करविता वेगळाच. काय पण, बुद्धीबळ खेळायचंच आहे तर जरा हुशारीने तरी खेळा राव
Pages