सा रे ग म प मराठी : पुढचे पर्व

Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23

महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).

हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....

http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहेच का पुन्हा ? Uhoh

या वेळेस ऑनलाईन कुठे बघायचे ते शोधून ठेवायला हवे. आत्ता तरी ते भाग युट्यूबवरती आहेत पण जातील काही दिवसात. त्यात अभिलाषा नावाची जबर्‍या गाणारी आहे.

~~
तिल तिल तारा मिरा तेली का तेल, कौडी कौडी पैसा पैसा पैसे का खेल.
चल चल सडकोंपे होगी ढॅण टॅण. - ढॅण्टॅणॅण ...

अभिलाषा आणि रोहित सक्सेना हे दोघ, माझ्या मते इंडियन आयडॉल आणि तत्सम हिंदी प्रोग्रॅम्स मधे फायनल पर्यंत आलेले होते... आणि निवडचाचणी मधे मराठी गाणी पण त्यानी छान म्हंटली आहेत...
बाकी स्पर्धक पण चांगले आहेत.. एकुण ३२ जण निवडण्यात येतील.. यावेळी सुद्धा परत परत पल्लवी जोशीच असणार का निवेदक म्हणुन ? Sad

अरे व्वा.. राहुल सक्सेना मराठी सारेगमप मधे आला होता ??
जबरी गातो तो , आयडॉल च्या पहिल्या सिझन ला , जुन्या सारेगमप मधे आला होता तो .
अभिलाषा 'स्टार व्हॉइस ऑफ इंडिया' इष्मीत च्या सिझन ला आली होती, बर्‍या पैकी पुढे गेली होती तिथे, चांगली गाते ती .

राहुल सक्सेना(जुन्या हिंदी सारेगमप मधे)
आन मिलो सजना:
http://www.youtube.com/watch?v=bEjiFMrmOdM&feature=PlayList&p=771D17FB36...

मोरे सैय्या:
http://www.youtube.com/watch?v=bu8RfiOkoDo&feature=PlayList&p=771D17FB36...

सुरेश वाडकर आणि सुखविन्दर दोघांच्या आवाजाची झलक जाणवते याच्या आवाजात :).

राहुल सक्सेना मला प्राजक्ता शुक्रे आणि अमित सना पेक्षा आवडला होता... ऑडिशन चे मराठी गाणे खतरनाक गायला तो...

जर तो आणी अभिलाषा फायनल ३२ मधे आले (आणि येतिलच बहुतेक Happy ) तर आपल्या नविन स्पर्धकाना चांगलीच competition आहे

बहूतेक आले.. फायनल ३२ ची निवड झाली ऑलरेडी..

राहुल सक्सेना सहीच गायला पुण्याच्या ऑडिशन ला, अत्ता पर्यंत त्याची जितकी गाणी ऐकलीयेत त्या आधारे खूप पुढे जायला हरकत नाही (अर्थात पब्लिक व्होटिंग ने वाट लावली नाही तर), नक्की सॉलिड काँपिटिशन देणार सगळ्यांना :)!!

अति झालं नी हसू आलं म्हणतात तसं झालंय सारेगमचं. आवरा ह्यांना कुणीतरी.
तिथे असतानाच पुढच्या पर्वाच्या ऑडिशन्स दाखवायला लागले होते.

सायो अगदी अगदी... Sad अति झालंय या सारेगम वाल्यांचं. खाऊन खाऊन अजिर्ण झालंय आता लोकांना.
आता अगदी छोट्या पडद्यावर ही लाटा यायला लागल्या आहेत पहिल्यांदा टिपिकल सिरियल्स, सगळ्या सास बहुवाल्या, मग बाल विवाह, मग सगळे रियालिटी शोज.

सारेगमचा ही दर्जा घसरू लागलाय हळू हळू. Sad वैशालीची दोन्ही पर्व (हिंदी आणि मराठी) कित्ती इंटरेस्टींग होती... मी तर एकही भाव चुकवायचे नाही.

कार्यक्रम सुरू होण्याआधी ऑडिशन्स दाखवणं म्हणजे निव्वळ टिआरपी वाढवण्याचं काम. पण त्यांना हे कसं कळत नाही की त्यानी टिआरपी अ‍ॅक्चूली कमी होऊ शकतो ते Uhoh आणि हे ऑडिशन्स दाखवण्याची कल्पना म्हणजे ईन्डियन आयडॉलची कॉपी आहे. मी मूळ कार्यक्रम कधीच पाहीला नाही, ऑडिशन्स चा कार्यक्रम मात्र कधी चुकवला नाही, तोच जास्ती एन्टरटेनिंग होता.. Proud

----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------

एकुण ३६ स्पर्धकांत २४ मुली (की युवती) आणि १२ मुलगे (की युवक) आहेत.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

राहुल सक्सेना हा फराह खान चा जाम फेवरिट होता...
तो लवकर वोट आऊट झाल्यावर तिनी त्याला स्वतःच्या सिनेमात गायला देईन असं प्रॉमिस केलं होतं...
त्याप्रमाणे त्यानी जान-ए-मन मधे एका गाण्याला आणि ओम् शांति ओम् च्या दीवानगी गाण्याला आवाज दिला होता... {दीवानगी मधे बरेच आवाज होते, मुख्य आवाज शान आणि उदित नारायण चे होते, राहुल चा आवाज तसा कोरस मधेच राहिला, पण सुनील शेट्टी च्या प्लेबॅक च्या वेळेला त्याचा आवाज सोलो वापरला आहे...}
_______
...हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते...

पण आता पल्लवी जोशी नको. दुसरी कोणी तरी हवी. तिला बघुन आता कंटाळा आला. एकाच प्रकारच्या साड्या आणि mismatch blouses. बास आता.

पल्लवी जोशी नको. दुसरी कोणी तरी हवी >> अगदी अगदी... Happy
या वाक्या साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत Proud

बाकीचं सोडलं तरी त्यामुळे १०० मध्ये एक जण तरी पुढे येतोय की नाही ? मग चालेल कितीही वेळा हा कार्यक्रम. नको ते सोडून, हवं ते बघायचं म्हणजे झालं.
ते जेव्हा एसएमएस चं प्रमाण कमीत कमी करतील तेव्हा खरी मजा येईल पण तसे होण्याची शक्यता नाही हे ही तितकंच खरं.. Sad

मिलिंदाला अनुमोदन Happy

Btw, पल्लवी जाउ दे, पण तो कोण बावळट्ट बाळु नं.१ पकडून आणालाय ऑडिशन्स होस्ट करायाला Biggrin

बाळु नं.१ >>> Lol .. तो मला अतुल परचुरे ची भ्रष्ट नक्कल वाटतो

बा. बा. नं. १ हा.का.ब. न. चा होस्ट आहे. Proud
बाकी मिलिंदाला मोदक..

हा का ब न चा होस्ट ?

बांदेकर होता ना पूर्वी?

{तो ही बा.बा.नं १ च}
_______
...हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते...

{तो ही बा.बा.नं १ च}

कायच्या कायच... नं.१ काय, त्याच्या आधीही काही तरी नंबर असेल तर द्या त्या गाढवाला...माझं डोकंच फिरतं त्याला पाहुन.. आणि त्यात वहिनी वहिनी करायला लागला तर गळाच दाबावासा वाटतो... प्रोमोज पाहुन एवढा त्रास तर हप्ता बंद बघितला तर किती त्रास??????

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

पहिले इंऑ मी अथ पासुन इती पर्यंत पाहिले होते. राहुल सक्सेना माझाही आवडता होता. तो आऊट झाल्यावर मलाही खुप वाईट वाटले होते Sad

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

हफ्ता बंद पाहा, चांगला प्रोग्रॅम आहे.

----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------

चालू द्या चालू द्या....

=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

कायच्या कायच... नं.१ काय, त्याच्या आधीही काही तरी नंबर असेल तर द्या त्या गाढवाला...माझं डोकंच फिरतं त्याला पाहुन.. आणि त्यात वहिनी वहिनी करायला लागला तर गळाच दाबावासा वाटतो... प्रोमोज पाहुन एवढा त्रास तर हप्ता बंद बघितला तर किती त्रास??????
------------------------------------------------------------------
Happy

साधना,
"होम मिनिस्टर" मधे तो डोक्यात जातो पण हप्ताबंद मधे तो बराच सुसह्य आहे (बराच बरा!).
तो कार्यक्रम जरा ठीक आहे.

डिटेल्स जजेस वगैरे >> सलिल कुळकर्णी ह्यावेळचा जज आहे.
सारेगमपचा आता कंटाळा आला आहे.

सलिल कुळकर्णी ह्यावेळचा जज आहे.
-------------------------------
हे राम! सध्या संदीप खरे ने लिहिले थांबवले की काय? Happy

होस्ट म्हणून पल्लवी शिवाय कोणीच सापडत नाही का झी ला :)?
मराठी मधे बर्‍या पैकी गाणारा + चांगला स्क्रीन प्रेझेन्स + बोलायला हजरजवाबी अस कोणीच नाहीये का ?
ते मधे पर्व झालं होत ना जिथे प्रसाद ओक जिंकला, त्या अ‍ॅक्टर-सिंगर पैकी कोणी होस्ट बनु शकण्या सारखं नाहीये का?
मधे प्रसाद ओक होता २-३ एपिसोड्स , तो तरी पकाउ वाटला जाम !
सुमीत राघवन / अभिजीत सावंत/ राहुल वैद्य/ प्राजक्ता शुक्रे यांच्या पैकी कोणी कसं वाटेल ?:)
राहुल वैद्य नी नुकतच स्टार प्लस च्या एका शो मधे अँकरींग केल, तसा अगाउ च आहे तो पण्..तरीही कदाचित झी मराठी वाल्यांनी ठिक गाइड केल् तर राहुल्/अभिजीत चांगले वाटु शकतील !
अभिजीत काय अता शिवसैनिक झाल्यामुळे शक्यता कमीच Happy
निहिरा- वैशाली माडे गायिका म्हणून फ्लॉलेस आहेत पण बोलण्याच काम जमण्याची शक्यता कमीच !
मधे निहिरा-सुनील बर्वे ई टी.व्ही च्या शो चे होस्ट होते, आगदीच गंभीर चेहेर्‍यानी सामान्य अँकर वाटले!

पण असल्या कार्यक्रमातून जिंकून मग अँकरींग(च) फक्त नशीबी असेल तर काय फायदा .. हे लोक त्यांच्या गाण्यासाठी जिंकतात न सा रे ग म सारख्या स्पर्धा? त्या हिमानी (Challenge 2005) ला हिंदी अंताक्षरी मध्ये बघितलं होतं .. अगदीच काहीतरी ..

सशल,
जे खरच आउटस्टँडिंग आहेत त्यांना योग्य ती संधी मिळालीये कि आणि अँकर पैकी म्हणाशील तर सोनु निगम्-शान हे सुध्दा आधी अँकर च होते, त्यांना खरं एक्स्पोझर सारेगम चे अँकर बनल्यावर च मिळाल आणि सध्या ते टॉप लिडींग सिगर्स पैकी आहेत हे सांगायला नकोच Happy !
शिवाय सारेगम चे श्रेया घोषाल- सुनिधी चौहान(मेरी आवाज सुनो), विशाल शेखर पैकी शेखर, कुणाल गांजावाला, बेला शेंडे हे सुध्दा सध्याच्या बॉलिवुड/इतर संगीत क्षेत्रात प्रचंड यशस्वी आहेत जे आधी सारेगम मधे केवळ एक स्पर्धक बनून आले होते !
नुकतीच शारिब्-तोशी नी पण संगीतकार जोडी म्हणून जबरदस्त सुरवत केलीये राज-२ नंतर्(सध्या त्यांच्या कडे मधुर भांडारकर चा आगामी 'जेल' , महेश भट्ट आणि इतर बेनर चे चित्रपट आहेत संगीतकार म्हणून).
शिवाय वैशाली माडे, पार्थिव गोहिल , राजा हसन यांच्या कडे पण भरपूर प्ले बॅक सिंगिंग ची अगामी प्रोजेक्ट्स आहेत.
हेमाचन्द्रा ऑलरेडी तलगु प्ले बॅक सिंगिंग मधे बर्‍यापैकी बिझी आहे.

हिमानी बेकार च होती पण वर मिलिंदानी म्हंटल्या प्रमाणे शंभरातून एक जरी श्रेया-सुनिधी-कुणाल गांजावाला-वैशाली माडे - राजा पुढे येणार असेल तर काय हरकत आहे:).
आणि राहुल्-अभिजीत्-प्राजक्ता सारख्या लोकांची अँकरींग चे काम मिळाले तरी त्यांच्या साठी तो पण चांगलाच प्लॅटफॉर्म आहे, फक्त गायकी मधे करिअर केले तर तिथे हे लोक कमीच पडणार सध्याच्या काँपिटिशन पुढे !

Pages