सा रे ग म प मराठी : पुढचे पर्व

Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23

महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).

हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....

http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं सांगायचं तर सलील कुलकर्णींच्या परीक्षणात मला सच्चेपणा जाणवतो. बरेचदा चांगलं गाणं ऐकताना त्याला भरुन येतं. नंतर ते बोलून दाखवत असतानाही त्याचा आवाज दाटून आलेला असतो. त्याचा आपल्या शिष्यांबद्दलचा अभिमान जाणवतो. त्याला कवितेची उत्तम समज आहे. रसग्रहण चांगले करु शकतो.तो एक उत्तम शिक्षक आहे. त्याच्या गटात असणारे खरंच भाग्यवान आहेत. त्यांना तो खूप चांगलं शिकवत असणार.
अवधूत एक व्यक्ती म्हणून चांगला वाटत असला तरी त्याच्या ज्ञानाबद्दल शंका वाटते. एखादं गाणं सलील जितक्या चांगल्या प्रकारे उलगडून सांगू शकेल तितकं तो नक्कीच नाही सांगू शकणार. ते काटा किर्र, चाबूक वगैरे मासेस साठी ठीक आहे. स्पर्धकांना त्याचा काय उपयोग ?
देवकी पंडित मला गायिका म्हणून अतिशय आवडतात. आणि त्यांचे परीक्षणही अतिशय कडक ( अवधूतच्या व्याख्येप्रमाणे कडक नाही ) असायचे.
खरं तर सलील कुलकर्णी आणि देवकी पंडित असे दोन कायमस्वरुपी परिक्षक असते तर स्पर्धकांचे भले झाले असते. पण मग कार्यक्रम गंभीर झाला असता. ते च्या मारी धरुन फटाक वगैरेच्या फोडणी शिवायचे सारेगमप अगदीच मुळमुळीत असे झी ला वाटले असावे. बाकी कुणी असो वा नसो. अवधूत कॉमन फॅक्टर ठेवलाय दर वेळेस.
पाहुण्या परीक्षकांमध्ये संजीव अभ्यंकर परत यावेत असं वाटतं. अक्षरशः भरभरुन मोलाचे सल्ले मिळतात त्यांच्याकडून.
स्वरदा गोखलेचं फायनलला जाणं मात्र अजिबात नाही पटलं. सलील दर वेळी तिच्या चुका चांगल्या काढतो पण तरी निकालात ती पुढे जातेच. ( खरं तर एक पाऊल मागे आणि मग नॉमिनेटेड एपिसोड्स मध्ये परत पुढे )
श्रुती सडोलीकरांचे परीक्षण मात्र अजिबात पटले नाही. झी च्या धोरणांनुसार ठरवून बोलत होत्या असे वाटले. त्यांच्यासारख्या बुजुर्ग गायिकेला असं झीच्या कलाने घ्यायची काय गरज आहे ?

त्यांच्यासारख्या बुजुर्ग गायिकेला असं झीच्या कलाने घ्यायची काय गरज आहे ?

अगं अश्विनी, खुद्द पंडित ह्रदयनाथ मंगेशकर झी च्या धोरणांना बळी पडले, तिथे श्रुती ताईंचं काय गं... महाराष्ट्र टाईम्सचा दिवाळी अंक इथे लिहिणार्‍या सगळ्यांनीच जरूर वाचा असं मी म्हणेन.

मटाच्या दिवाळी अंकातलं वाचून झीबद्दल आणि मामासाहेबांबद्दल कोणतेही निष्कर्श काढू नयेत प्लीज. आम्ही नुकतेच त्यातल्या एका अतिथी परिक्षकाला भेटलो आणि बर्‍याच आतल्या बातम्या कळल्या. झी किमान ओपनली कमर्शियल आहे, पण बाकीच्यांचं वागणं काय असतं पडद्यामागे हे आपल्याला माहीत नाहीये हेच बरंय असं म्हणेन मी! Happy तेव्हा, छापून आलेल्या आणि 'आपल्याला' टीव्हीवर दाखवलेल्या बातम्या खर्‍याच असतात असं अजिबात नाही! Wink

अगो, छान लिहिलं आहेस Happy

तेव्हा, छापून आलेल्या आणि 'आपल्याला' टीव्हीवर दाखवलेल्या बातम्या खर्‍याच असतात असं अजिबात नाही!

अरे बाप रे!! म्हणजे ही म.टा.ची स्ट्रॅटेजी म्हणायची का? Uhoh

अरेरे, त्या मटातल्या लेखाबद्दल इतकं ऐकतेय. कसा वाचायला मिळणार मला तो ? कुणीतरी स्कॅन करुन पाठवू शकेल का मेलमधून ? ...
पंडितजी खूप बळी पडले असं नाही मला वाटलं. मला त्यांचं परीक्षण फार आवडलं. कदाचित त्यांची नेहेमीची धारदार वाणी त्यांनी थोडी म्यान केली असेल झी साठी. पण श्रुती सडोलीकर ह्यांनी स्वरदाच्या गाण्यांची अवाजवी तारीफ केली, चढ चढ चढवलं आणि श्रुती विश्वकर्माचं नाट्यगीत, सागर जाधव, सौरभ काडगावकर ह्यांना फारच उतरवलं. इतरांच्या गाण्यात दोष नव्हते असे मला म्हणायचे नाही पण मग एकच नियम सगळ्यांना लावा ना. प्रेक्षकांना गाता येत नसलं तरी इतपत नक्कीच समजतं.

आता बघ ना, 'मटा'तला लेख वाचायलाच हवा, म्हणून किती जणांनी घेतला असेल अंक (एरवी घेतला नसता, असेही लोक)? खप वाढला ना? Happy

या पर्वात मुलांवर (मुलगे) फारच अन्याय झाला Sad / केला Angry सौरभ, सागर, आणि अजून एक तो लाजराबुजरा कोल्हापूरचा- सगळे चांगले गायक होते. 'महागायिका'च बनवायची होती, तर मुलांना स्पर्धेत प्रवेश तरी कशाला दिला कोण जाणे!

आता बघ ना, 'मटा'तला लेख वाचायलाच हवा, म्हणून किती जणांनी घेतला असेल अंक

पण अंक वाचनिय आहे. मी अजुन बाकिचे दिवाळी अंक वाचलेले नाहीत, पण मटाने निराशा केली नाही. आवडला मला.
मला मुखपृष्ठ ही आवडले त्यांचे. बहुतेक लोक चित्रतारका छापतात (तारे का नाही छापत?? फक्त बायकाच का इथे???). ह्यानी महाराजांचा मस्त फोटो टाकलाय

अश्विनी, मी आज प्रयत्न करते पाठवण्याचा. तु लिहिलेले एकदम पटले. तसेही अवधुत च्या चेह-यावर 'नायतरी आम्हाला कोण घेतंय सिरयसली, तेवढंच जरा हसुन मोकळं करायला जमलं तर बरं' असेच भाव असतात...

मी फारसे पाहिले नाहीय सारेगा..... लिटिल चॅप्स सोडुन, पण मला देवकीचे परिक्षण आवडले होते. हातचे वगैरे वाटले नाही, तर कुवत ओळखुन सल्ला दिल्यासारखे वाटले.

अ‍ॅशबेबी, धन्यवाद. पण अगदी सहज जमत असेल तरच पाठवा. कुठेतरी बाहेर जाऊन स्कॅन करावे लागणार असेल तर नको Happy

आता मराठी सारेगम त्याची एकेकाळची उंची सोडून खाली यायला लागलय.

आता ते 'मराठी' राहीलेच नाहिये. अमराठी स्पर्धक, अमराठी परिक्षक (ते पण तलत अजीज सारखे मर्यादीत प्रतिभा असलेले) आणि भरपूर हिंदी राऊंड्स. आधीच्या पर्वात एकच हिंदी फेरी असायची. काल तर अजीज साहेब आणि अ.गु. आणि स.कु. यात एकसंघपणा जाणवलाच नाही. बर्‍यआच वेळेला तर त्याला ह्यांचे मराठी कळतय का नाही अशी मला शंका आली इतका तो मख्ख बसून होता.

बाकी स्पर्धकांची गाणी तर यथातथाच झाली अगदी ! कार्यक्रमाचा सगळ्यात अविस्मरणीय अनुभव म्हणजे सलिलच्या बायकोने म्हटलेले -'भुई भेगाळली'. एकही वाद्य नाहि कुठेही बेसुरेपणा नाही - सही झालं ते गाणं.

स्पर्धकांचा मेकओव्हर करायलाच हवा का ? म्हणजे स्टेज प्रेझेन्ससाठी त्यांना उत्तम कपडे, मेकअप वगैरे करतात तितपत समजू शकतं. पण आज म्हणजे प्रत्येकाला फॅक्टरीतून काढलेल्या एका साच्यातल्या कचकड्या खेळण्यांसारखं बनवल्यासारखं वाटलं.
उर्मिलासाठी मला आज मनापासून वाईट वाटलं. ती खरंच खूप साधी मुलगी आहे. त्या मेकओव्हरमध्ये नेहेमीची उर्मिला हरवूनच गेली होती. त्यावर कळस म्हणजे तलत अझीझनी तिचं गाणं संपल्यावर "स्टेजवर येऊ का?" असं विचारलं आणि येऊन तिला तू किती साधेपणाने उभी होतीस, असं गाणं होतं ( रिचा शर्माचं माही वे ) तर थोडंसं अ‍ॅक्टींग करुन गायला हवं होतं वगैरे सांगितलं. उर्मिलाला ही तडजोड अजिबात पटत नव्हती असं वाटलं.
आजकाल हे 'परर्फॉर्मर' प्रकरण जरा जास्तच वाढत चाललंय. जो पर्यंत एखाद्या गायकाला आपल्या गाण्यांचा अल्बम काढून स्वतः त्यात अभिनय करायचा नाहीये तो पर्यंत त्याला नाचत, हलत-डुलत गाणं म्हणता यायला हवं असा आग्रह का ? अगदी स्तब्ध उभं राहून जर एखादा गायक गाण्यात भाव ओतू शकत असेल तर त्याने/तिने कसं उभं राहावं हे दुसर्‍या कुणी का ठरवावं ? गायकाचं काम हे गाण्यातून अनुभूती देणं आहे, हातवार्‍यातून नव्हे. त्यातून एखादा गायक हातवारे करुनच भाव आणू शकत असेल तर ठीक आहे. पण सब घोडे बारा टक्के 'परर्फॉर्मर' व्हायचा हा नवीन ट्रेंड कुठला ?
आणि देवकी पंडितांनी म्हटल्याप्रमाणे खरंच कधीकधी देहबोलीकडे जास्त लक्ष गेल्यास सुरांना ताकद कमी पडते. ते अचूक लागत नाहीत.
लता मंगेशकर, आशा भोसले आणि आजच्या पिढीतल्या साधना सरगम सारख्या गायिका सगळ्या प्रकारची गाणी सात्विक चेहेर्‍यानेच गातात. आणि तरीही मूळ गाण्यांच्या जवळपास आजही कुणी जाऊ शकलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे.

गायकाचं काम हे गाण्यातून अनुभूती देणं आहे,

है शाब्बास अगो.......... मी अगदी हेच लिहायला इकडे आले होते. Happy

अगो ला मोदक Happy
मलाही उर्मिलाबद्दल खूप वाईट वाटलं Sad काहिच्या काही अवतार करून टाकला बिचारीचा .. ति अजिबात कंफर्टेबल वाटली नाही त्यात.

काय ते मेकओव्हर?? भयाण! संहिताची तर वाट लावली पार! उर्मिला खरंच उर्मिला वाटली नाही Sad गाणंही तितक्या उंचीचं झालं नाही.. काल अभिलाषालाही 'नी' मिळावं इतकं चांगलं नाही वाटलं मला..
उलट मेकओव्हरमुळे स्पर्धक जरा कॉन्शस झाल्यासारखे वाटून दडपणाखाली गात होते.. अगोशी सहमत.. आजकाल स्टेज प्रेझेन्स सगळ्यांकडेच असतो.. असलं काही करून त्यांना ऑकवर्ड वाटत असेल, तर काय गरज आहे असे उथळ बदल करण्याची? गाण्याची स्पर्धा आहे ना?

'कार्यक्रम हिंदी होत चाललाय'ला अनुमोदन! 'नी' हा कायम राखीव ठेवायला हवा माझ्या मते- अगदी बेतोड गाणं झालं, तरच द्यावा, पण हिंदी सारेगमपच्या लायनीवर चाललंय ना सगळंच.. मला वाटतं, स्पर्धा रीजनल न रहाता, देशपातळीवर पोचावी म्हणून हा प्रयत्न आहे, पण मराठीपणा हरवत चाललाय त्यातून Sad

हिंदी आणि मेकओव्हर बद्दल सगळ्यांना मोदक! काहीच्या काही चालू आहे. इतकं बोअर झालं काल की सरळ टीव्ही पुढून उठून अर्धवट वाचायचं राहिलेलं पुस्तक पूर्ण करायला घेतलं. आजवर सा रे. बघताना असं वाटलं नव्हतं की उठून जावं. Sad

कार्तिकी बाइंचा वारसा .. फायनल ५ पर्यंत तर नक्की झी तिला "राखून" ठेवणार
तुम्ही उर्मिलाचं गाणं नक्की "ऐकलं" का?
तिने आतापर्यंत ३ गाणी गायली आणि तिन्हीही अप्रतिम गायली आहेत. तिला ताल आणि सूर यांची जाण आहे, कवितेची जाण आहे, तिची शब्दफेक अचूक आहे. तिची अगदी प्रत्येक तान गाण्याच्या/कवितेच्या बाजाला सांभाळून घेतलेली आहे. उदा भुई भेगाळली मध्ये नको तितक्या हरकती नाहीत, तर पिकल्या पानाचा मधल्या ताना लावणीच्या अंगाने जाणार्‍या आहेत. लटपट लटपट ची "नारी गं" वरची भल्याभल्यांना न जमणारी अवघड हरकत तिने किती सहज घेतली याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष?

झी ला तिला राखून ठेवण्याची गरजच नाही कारण आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार तिचं गाणं अगदी सूर्यप्रकाशाइतकं लख्ख आहे! मला दुसर्‍या कुठल्याही स्पर्धकामध्ये तिच्याइतकी तयारी दिसली नाही.
फक्त तिचा आवाज गोड गोड, गुळगुळीत नाही त्यामुळे लोकगीतांसाठी(च फक्त) चांगला अशा पूर्वग्रहदूषित टीकेला कितपत अर्थ उरतो? तिच्या स्वतःच्या आवाजाबद्दल, तिने आतापर्यंत संगीतावर घेतलेल्या मेहनतीबद्दल तिला काहीच क्रेडीट न देता तिला थेट "राखीव" मध्ये टाकून एका चांगल्या गायिकेचा तुम्ही सरळ अपमान करताय असं वाटत नाही?
थोडक्यातच कार्तिकीशी तिची तुलना करुन ती राखीव आहे म्हणून(च) पुढे येणार हे प्रचंड अस्थानी आणि वेगळा वास असलेलं वाक्य वाटलं ..
>>>>>>>>>>>>>>>>
अनुमोदन अगदी बरोबर बोललात.

'नी' हा कायम राखीव ठेवायला हवा माझ्या मते- अगदी बेतोड गाणं झालं, तरच द्यावा, पण हिंदी सारेगमपच्या लायनीवर चाललंय ना सगळंच

<< सगळं ??
मला नाही वाटत 'सगळं' कॉपी मारणं जमेल !
सर्वात मह्त्वाचं म्हणजे हिंदी गाण्यांची लेव्हल आहे का इथे हिंदी सारेगमप इतकी ? Happy
नुसत्याच राउंड्स ठेउन काय उपयोग?
तिथे बाकी काही ड्रामे असोत , एखादी आस्मा सोडली तर गायक हिंदी गाणी चांगलीच तयारीनी गातात.
तिथे जजेस सुध्दा कितीही ड्रामेबाज असले तरी अगदीच अवधूत गुप्ते इतक्या बिनडोक कॉमेंट्स अगदी हिमेश सुध्द्दा नाही देत.
इथे हिंदी उच्चारां मधे राहुल सोडून आज तर कोणीच कंफर्टेबल नव्हते,आज तर अभिलाषा चे उच्चार सुध्दा सदोष वाटले , तरी 'नि' !
त्या बिचार्‍या सागर जाधव ला मात्रं चांगला गायला असूनही हिंदी वरून सुनावलं.. जजेस ना इतर स्पर्ध्कांची मराठीमय हिंदी गाणी खटकत नाहीत का?

मुळात इथे हिंदी राउंड्स कशासाठी आहेत?
गेस्ट जजेस साठी कि फॉरमॅट च बदलला??
हिंदी गाणीच दाखवायची आहेत झी ला तर मग आहेच "चांगल्या" हिंदी गाण्यांचं सारेगमप मेगा चॅलेंज.
पण बहुतेक इथे जास्त करून अभंग नाही तर एकदम हिंदी गाणी असच चाल्लय !
सोमवारच्या गाण्यां मधे 'मोरे सैय्या तो है परदेस' आणि 'एकाच या जन्मी जणु' सोडून एकही गाणं चांगलं झालं नाही.
तरीही 'परफॉर्मर ऑफ द डे' अभिलाषा? Uhoh

बाकी मेक ओव्हर(!) तुफान विनोदी.. उगीच केसांचे कोंबडे नाही तर भसा भसा ब्लाँड हायलाइट्स !:फिदी:
तो तलत अझीज विचित्र च काही तरी बोलत होता !

"माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात."
फारच छान वाक्य आहे, दक्षिणा.

'सगळं' म्हणजे गुण, मेकोव्हरसाठी होतं डीजे Happy हिंदीत कायम छप्पर फाडके गुण देतात ना, कारण पहिल्यापासूनच समस व्होटींग असते.. जजेसच्या मतानुसार कोणी बाहेर जात नाही. इथे, अगदी लिटील चँप्सनादेखील गुणवत्तेनुसार गुण देत होते.. शंकर आला होता, तेव्हा फक्त 'नी' दिले होते सगळ्यांना सरकसट.

सारेगमपच एकूणात कंटाळवाणं होत चाललंय.. हिंदी परिक्षक आणा किंवा मेकोव्हर.. अजून ड्रामेबाजी झाली नाहीये, बहुतांशी मुली आहेत, त्यांच्यातली जळजळ, हिचा मेकप माझ्यापेक्षा चांगला कसा? तिचे कपडे माझ्यापेक्षा चांगले कसे? ही पुढेपुढे करते.. ही मला रियाझ करू देत नाही... इत्यादी झाले की तीही कमी रहाणार नाही! Proud

हिंदी मधे इतके वाइट नाहे ग करत मेक ओव्हर्स!
मेक ओव्हर करणे चूक नाहीये पण ते खरच त्यामुळे स्पर्धक कंफर्टेबल राहून आधी पेक्षा जास्त चांगले दिसत असतील तर ठिक आहे , पण झी मराठी ने पार सगळ्यांची वाट लावली उलट॓!
सर्वात वाईट अवतार केला त्या ऋतुजचा, संहिताचे पण वेडे वाकडे लेयर्स मधे केस कापले आणि घाउक भावात सगळ्यांना ब्लॉन्ड कलर फासला, All suffered from 'bad hair day'!

सुम्सीरता च्या गाण्यांची यु ट्युब लिंक नाहीये का कालच्या एपिसोड ची ??
तिला किती मार्क्स मिळाले ?

इथे चर्चा वाचून मीहि कालचा एपिसोड पाहिला.
मला वाटते त्यांचा मेकओव्हर पाहून स्पर्धेच्या बाहेर पडलेल्यांनी सुटकेचा निश्वा:स टाकला असेल.
उर्मिला विषयी म्हणायचे झाले तर तिची भिक नको पण कुत्रा आवर अशी गत झाली होती. कारण त्या तलत अजीज ने तिला जे सांगितले ते काही फारसे मनावर घेण्यासारखे नव्हते.कदाचित त्याला स्वतःला खूप प्रयत्न करूनही अभिनेता म्हणून नाव कमवता नाही आले त्याची सल अजूनही मनात बोचते आहे वाटते.

बाकी अश्विनी देशपांडे जरा बघण्या लायक वाटत होती नाहीतर तिचे ते विचित्र expressions बघून कंटाळा आला होता..
मला वाटते मेकओव्हरची idea पल्लवी ताईंची असणार कारण सगळ्याच मुली तिच्यासारखीच विचित्र रामदास पाध्येंसारखी वेशभूषा करून आल्या होत्या.

अंजली मराठे- कुलकर्णीचं गाणं हा नेहमीच एक सुखद अनुभव असतो .
खूप तयारीची गायिका आहे ती. ती साधारण ५/७ वर्षाची असताना "महाराष्ट्र दर्शन" कार्यक्रमात तिने नाचरे मोरा गायलं होतं त्यावेळी तिला ५/६ वेळा once more मिळालेला..

मला वाटते झीच्या मॅनेजर कडेच ह्या भावना पोहचल्या पाहिजेत.

मला वाटते मेकओव्हरची idea पल्लवी ताईंची असणार कारण सगळ्याच मुली तिच्यासारखीच विचित्र रामदास पाध्येंसारखी वेशभूषा करून आल्या होत्या.>>> Proud

हिंदी गाणीच दाखवायची आहेत झी ला तर मग आहेच "चांगल्या" हिंदी गाण्यांचं सारेगमप मेगा चॅलेंज.
पण बहुतेक इथे जास्त करून अभंग नाही तर एकदम हिंदी गाणी असच चाल्लय !
>> अनुमोदन डिजे!
इथल्या सलील आणि अवधूत बद्दलच्या चर्चेवरुन पाहिले कालचे परीक्षण.. खरंच पांचटपणा चालू आहे Sad
काल रवींद्र साठे आल्यामुळे खरंच खूप बरं वाटलं.. हुश्श झालं! त्यांनी अवधूत चा मस्त पोपट केला.. उर्मिलाला म्हणाले, "शाहरुख, मायकेल वगैरे सगळं बाजूला.. तू जे आणि ज्या पद्धतीने (विनम्रतेने)गातेस तेच योग्य आहे!" मला यावर जोरदार टाळ्या वाजवाव्याशा वाटल्या.. Happy एकूणच अवधूत परिश्रमांपेक्षा प्रसिध्दीला हपापलेला /भुकेला आहे असं जाणवलं..
साठेंचं सर्वात पहिलं गाणं.."अजब सोहळा.." काय अप्रतिम आवाज होता.. आणि शेवटचं "वळणवाटावर झाडीत हिरवे छंद" माझं अत्यंत आवडतं..पण कोणत्या सिनेमातलं आहे आठवतंय का कुणाला?

काल कोणी एलिमिनेट झालं का? पूर्ण भाग बघता आला नाही. मृण्मयीचं 'कहना ही क्या' चांगलं झालं. कोरस एकदम छान होता. पण ह्या गाण्यातला चित्राचा आवाज कानात बसलाय त्यामुळे दुसर्या कोणी गायलेलं पोचतच नाही.

राहुलचं 'काळ देहासी...' एकदमच गंडलं.

पल्लवीच्या निदान ह्या दोन शब्दरचना तरी सुधारायला हव्यात ;
1. स्मृतीमध्ये (?) टाळ्या
2. गाणं म्हणलीस Sad

मुक्ता सिनेमा.. >> हम्म..आठ्वलं.. ती कॉलेजसाठी पुण्यात (?) शिफ्ट होतानाचं.. धन्स डॅफो. Happy
आणि अजून एक. एखाद्या कलाकाराची जयंती/ पुण्यतिथी असेल तर त्याचं एक तरी गाणं म्हटलं जातं हे 'सिक्रेट' आता प्रेक्षकांना न कळण्याइतके ते मूर्ख नाहीत हे स्वीकारा. दरवेळी ते गाणं झालं की "आणि आज 'नेमका' 'योगायोग' असा की आज अमूक यांची जयंती/ पुण्यतिथी आहे" हे फार हास्यास्पद व्हायला लागलं आहे. हे 'नेमका' 'योगायोग' शब्द कशासाठी? Happy

रविन्द्र साठे कमाल आहेत ना! काय आवाज आहे अजूनही! खणखणीत! आणि किती विनयशील आहेत! 'आजचा आवाज' पर्वातही त्यांचं सुखद दर्शन झालं होतं. खरंय, अवधूतचा नुस्ता पोपट नव्हे, कचरा केला अगदी! आणि किती योग्य सल्ला! उर्मिलालाही पटलं असेल ते नक्कीच.

मृण्मयी, ऋतुजा, अभिलाषा, सुस्मिरता, उर्मिला यांची गाणी आवडली. काल उर्मिलाचं गाणं खरंच छान.

ऋतुजाचे कपडे पाहिल्यावर लेक म्हणाला, 'आई, तिने नाईट ड्रेस का घातलाय?' Rofl

Pages