Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23
महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).
हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....
http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय पण, बुद्धीबळ खेळायचंच आहे
काय पण, बुद्धीबळ खेळायचंच आहे तर जरा हुशारीने तरी खेळा राव >>>>
हे हे हे....
काय झाल शेवटी ? कोण गेल बाहेर
काय झाल शेवटी ? कोण गेल बाहेर ? इथतरी लिहा कि राव ..
मृण्मयी..
मृण्मयी..
(अंदरकी बात) पल्लवी झिंकणारः
(अंदरकी बात) पल्लवी झिंकणारः ढ्यांट्ढ्यां...
डुबई चं मार्केट जास्त अपिलींग असेल तर स्वरदा झिंकणार.
नमस्कार, सारेगमप नियमित पहात
नमस्कार,
सारेगमप नियमित पहात नसलो तरी येथली चर्चा उत्साहाने वाचून काढली.
मला एक कळाले नाहीये की मराठी कार्यक्रमात अमराठी लोकांनी कसा काय भाग घेतला आहे.
तसेच परिक्षक देखील अनेक वेळा अमराठी येतात.
इतर भाषेतल्या गाण्यांच्या स्पर्धांमधे मराठी स्पर्धक / परिक्षक असतात का ?
(सुरेश वाडकरांसारख्यांचा अपवाद वगळता, कारण त्यांचे अमराठी पार्श्वगायन खुप आहे).
इतर भाषा म्हणजे फक्त हिंदी सारेगमप नव्हे, तर बंगाली, पंजाबी, दक्षिण भारतीय, इ.
हा प्रश्न मी कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करण्यासाठी विचारलेला नाहीये.
पण हाच सर्वधर्म समभाव सगळीकडे आहे का अशी एक शंका. जर असेल तर आनंद आहे.
कालच्या भागात अभिलाषाचं 'मला
कालच्या भागात अभिलाषाचं 'मला जाऊ द्या ना घरी' एकदम मस्त झालं. खुप्पच आवडलं.
अवधूत सलिलपैकी कोणीतरी म्हणालं त्याप्रमाणे आता खरंच ह्या गाण्यासाठी 'नटरंग' पाहिला जाईल. सिनेमामध्ये ह्या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन बहुतेक फुलवा खामकरने केलं आहे.
मला कोणितरी कालच्या भागाचा
मला कोणितरी कालच्या भागाचा रिपोर्ट सांगा ना........... मला नाही बघता आला.
कोण काय आणि कस गायल आणि मान्यवर परिक्षक कोण होते?????
खरोखर खुप छान झाल अभिलाषाच
खरोखर खुप छान झाल अभिलाषाच गाण. मजा आलि.
अभिलाषाची दोन्ही गाणी मस्त
अभिलाषाची दोन्ही गाणी मस्त झाली आणि राहुलचीही. उर्मिला प्रेडिक्टेबल झाली आहे.. 'नटरंग्'ची गाणी शक्य तितकी प्रमोट केली, तरी गाणी आवडली. अतुल कुलकर्णीचं दर्शनही सुखद. लावणीपेक्षा मला राहुलने गायलेलं 'खेळ मांडला' जास्त आवडलं..
काही गाण्यांच्या चाली इतक्या सुंदर असतात, की कोणीही गायली तरी चांगलीच ऐकू येतात, उदा., 'राधा ही बावरी', 'मी राधिका' आणि आता ही 'मला जाऊद्या ना घरी..' ह्या गाण्याचा ठेका इतका जबरदस्त आहे, की कोणीही गायलं तरी जबरीच ऐकू येणार.. यात अभिलाषाचं क्रेडीट काढून नाही घेत, तीही मस्त गायली.. अंतिम तीन अमराठी असावेत असा अंदाज!
अंतिम तीन केपेबल असायला हवेत.
अंतिम तीन केपेबल असायला हवेत. मराठी/अमराठी हा भाग गौण आहे असे वाटते.
अभिलाषा ऐवजी उर्मिला/स्वरदा केवळ मराठी आहेत म्हणुन आल्या तरी ते योग्य होणार नाही. (हे माझे मत)
काही गाण्यांच्या चाली इतक्या
काही गाण्यांच्या चाली इतक्या सुंदर असतात, की कोणीही गायली तरी चांगलीच ऐकू येतात, उदा., 'राधा ही बावरी', 'मी राधिका' आणि आता ही 'मला जाऊद्या ना घरी..' ह्या गाण्याचा ठेका इतका जबरदस्त आहे, की कोणीही गायलं तरी जबरीच ऐकू येणार.. >>>>>>> अगदी आगदी... मी आधी म्हंटलं ना.. गाण्यांच्या सिलेक्शन बद्दल.. त्यातलाचला प्रकार असावा... !
अंतिम तीन अमराठी असावेत असा अंदाज! >>>> चुकणार बहुतेक तुझा अंदाज..
सोमवारच्य भागात एकदम वेगळी गाणी होती.. एकूणात चांगला झाला एपिसोड.. मृण्मयीने काय इमोशनल अत्याचार केला शेवटी..
मंगळवारची २ च गाणी पाहिली आहेत अजून (स्वरदाचं एक आणि अभिलाषाचं एक) .. ती दोन्ही आवडली..
अंदाज चुकेल की कसे ते नाही
अंदाज चुकेल की कसे ते नाही सांगता येत, पण तिन्ही अमराठीच अंतिम फेरीसाठी पात्र आहेत हे माझे मत आहे! अभिलाषा / अपूर्वा पहिल्या क्रमांकासाठी नि राहुल दुसर्या.
पण तिन्ही अमराठीच अंतिम
पण तिन्ही अमराठीच अंतिम फेरीसाठी पात्र आहेत हे माझे मत आहे! >>>>> अरे..तुझा मताप्रमाणे सगळं चालल असतं तिथे तर पल्लवीच्या जागी तू असतास ना...!
अभिलाषा, राहूल चांगले गातात पण त्यांना जरा जास्त हाईप केलय... त्यात राहूल अबाव्ह अॅव्हरेज आहे इतकच.. फार ग्रेट वगैरे नाहिये.. अपूर्वा आधी बरीच बोर होती.. कॉलबॅक नंतर खूपच सुधारली आहे पण तशीच पुढे (म्हणजे ह्या स्पर्धेत पुढे) राहिल की नाही माहित नाही.. अर्थात हे IMO !
म्हणजे पग्या तिथे काय
म्हणजे पग्या तिथे काय पल्लवीच्या मताप्रमाणे चालते का?
राहूल अबाव्ह अॅव्हरेज आहे इतकच.. फार ग्रेट वगैरे नाहिये >> अगदी अगदी.
अरे ती प्रोड्युसर आहे म्हणून
अरे ती प्रोड्युसर आहे म्हणून म्हंटलं.. जोक होता रे बाबा..
हो रे. मी त्यावर कोटी करावी
हो रे. मी त्यावर कोटी करावी म्हणून लिहीले रे बाबा. ते जाऊदे मग पुढच्या आठवड्यात कोण जाणार?
हो रे. राहुल ग्रेट नाहीये. पण
हो रे. राहुल ग्रेट नाहीये. पण वासरात लंगडी गाय शहाणी तशातली गत आहे. अपूर्वा मला तरी कधीच बोर वाटली नाही. आता जजेस तसे प्रोजेक्ट करतायत सतत स्वतःच्या चुका लपवण्यासाठी.
अंतिम तीन केपेबल असायला हवेत.
अंतिम तीन केपेबल असायला हवेत. मराठी/अमराठी हा भाग गौण आहे असे वाटते <<<
पण तिन्ही अमराठीच अंतिम फेरीसाठी पात्र आहेत हे माझे मत आहे! <<< मनस्मी आणि प्रणव अनुमोदन!
राहुलचे गाणेही मला कधी कंटाळवाणे वाटले नाही. मला आवडते. तो कठीण गाणी गाताना ( त्याने अशी अनेक गाणी गायली) अनेकदा वाटायचे की आता याला ही जागा जमेल का? पण तो सहज गाऊन जायचा.
(अर्थात माझ्या गाण्यातल्या संवेदना हा विषय वेगळ्या चर्चेचा :p ) अपूर्वाचेही तेच.
या तिघांपैकी कोणालाही उगीचंच हाईप केलं जातंय असे वाटले नाही.
अंदाज चुकेल की कसे ते नाही
अंदाज चुकेल की कसे ते नाही सांगता येत, पण तिन्ही अमराठीच अंतिम फेरीसाठी पात्र आहेत हे माझे मत आहे! अभिलाषा / अपूर्वा पहिल्या क्रमांकासाठी नि राहुल दुसर्या.
<<< १००% अनुमोदन
आणि उरलेल्या दोघीं पैकी एक टॉप १२ मधे सुध्दा नको होती, दुसरी 'हवा मे उडता जाए' भयानक गायल्या नंतर एलिमिनेट होयला हवी होती (पुन्हा एकदा IMO).
मराठी कार्यक्रमात अमराठी
मराठी कार्यक्रमात अमराठी लोकांनी कसा काय भाग घेतला आहे.>>> ह्म्म्म्म्म्म्म निदान गाण्यात तरी मराठी अमराठी ( ब्राम्हण/ इतर/ ... /....) असं वर्गीकरण करायलाच हवं??
मराठी कार्यक्रमात अमराठी
मराठी कार्यक्रमात अमराठी लोकांनी कसा काय भाग घेतला आहे.>>>
सगळ्या प्रकारची मराठी गाणी सुरेख गाता येतात आणि गाताना मराठीचे उच्चार flawless आहेत म्हणून.
मो.रफि, महेन्द्र कपुर, किशोर कुमार, श्रेया, शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर,सुखविन्दर, सोनु निगम,सुनिधी, कुणाल गान्जावाला हे नावाजलेले अमराठी गायक मराठी मधे गातात (आणि आपण ती एंजॉय करतो) तर इतर अमराठी गायक स्पर्धेत उतरल्याचं आश्चर्य वाटायला नको !
गाताना मराठीचे उच्चार
गाताना मराठीचे उच्चार flawless आहेत म्हणून. >>>> काही काही ठिकाणी खटकतात..
)
e.g. अभिलाषाचे एका लावणी मधले उच्चार खटकले होते.. अपूर्वा कधी कधी गाणं म्हणताना तिला अर्थ कळतोय खरच कळतोय का असं तिच्या चेहेर्यावरून वाटतं.. अर्थात श्राव्य माध्यमात चेहेर्यावरच्या expressions चा संबंध नसतो.. पण कधी कधी तिच्या गाण्यातपण हे जाणवतं.. हे मराठी गायकांच्या बाबतीतही होऊ शकतं पण विषय निघाला म्हणून लिहिलं... (चाफ्या.. मी सगळ्या गाण्यांबद्दल म्हणत नाहिये.. नाहितर लगेच भोगले जे ची तलवार काढशील..
आणि सगळ्यात खटकतं.. ते पल्लवीचं त्यांना डोक्यावर चढवणं.. की तुम्ही अमराठी असून कित्त्त्ती छान मराठी गाता अँड ऑल... तुम्ही मराठी सारेगमप मधे आला आहात तर मराठी गाणी शुध्द गाता यायलाच हवी.. तो गेटींग क्रायटेरिया आहे... त्यासाठी त्यांचं कौतूक होत असेल तर मराठी स्पर्धकांवर तो अन्याय आहे.. परवा राहूलचं गाण झाल्यावर पल्लवी ने काहितरी तू कितीतरी गाणी पहिल्यांदाच ऐकली असशील.. तरीही ती छान गातोस वगैरे वगैरे.. असं काहितरी ग्यान दिलं होतं.. ते ही चूकीचच आहे.. त्याने गाणी पहिल्यांदा ऐकली त्यात कसलं क्रेडीट.. मराठी स्पर्धक मराठी गाणी लहानपणापासून ऐकतात हा त्यांचा दोष आहे का?? किंवा त्यांच्या बाबतीतही एखादं गाणं आत्ता आत्ता ऐकलं असं होऊ शकतं.. !!! पण हे कधी बोलून दाखवलं गेलेलं नाही..
अमराठी स्पर्धकांबद्दल आकस नाही.. पण त्यांच्या अमराठीपणाचं भांडवल करून त्यांना जे डोक्यावर चढवलं जातं ते डोक्यात जातं.. असो.. !
सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा..
admचा पग्या झालाय का?
admचा पग्या झालाय का?
आणि सगळ्यात खटकतं.. ते
आणि सगळ्यात खटकतं.. ते पल्लवीचं त्यांना डोक्यावर चढवणं.. की तुम्ही अमराठी असून कित्त्त्ती छान मराठी गाता अँड ऑल...
<< हेहेहे, पल्लवीला स्वतःला मराठी मातृभाषा असून इतके कष्ट पडतात म्हणून तिला हे रिमार्क्स सुचत असावेत
तसं पाहिलं तर हिंदी सारेगमप मधे सुध्दा बहुसंख्य विजेते हे हिंदी मातृभाषा नसलेलेच आहेत.. एक तर ऑलमोस्ट सगळे बंगाली, काही असामी किंवा मराठी !
हिंदी मातृभाषा असलेला विनर फक्त अत्ताचा लिट्ल चँप हेमन्त ब्रिजवासीच आठवतोय मला तरी.
कल्याणजी-आनन्दजी मधले आनन्दजी भाई आले आणि मराठी स्पर्धक अला कि याचा ठरलेला रिमार्क " मराठी होकर भी आपके हिंदी प्रोनाउन्सेशसन्स अच्छे थे'
असो,
अमराठी असून मराठी छान गाता म्हणून जास्त फेवर करणं चूकच आणि अमराठी असून यांना स्पर्धेत कसे येउ दिलं असा नी दुजाभव हे पण चूक.
स्पर्धकांची लास्ट नेम विसरून जाऊन जरी पाहिलं तरी अत्ता पर्यन्त एलिमिनेशन्स बघताना असं नाही वाटलं कि या स्पर्धका ऐवजी अभिलाषा/राहुल जायला हवे होते म्हणून.
उर्मिला/स्वरदा बाबतीत मात्रं तस् वाटलं.
इन जनरल इतर कुठल्याही स्पर्धकाला गुणवत्ते खेरीज इतर कुठल्या बेसिस वर फेवर करणं चूकच आहे.
पण IMO ओव्हरऑल हे पर्व पहाता अभिलाषा सर्वात जास्त कन्सिस्टंट वाटली आणि टोनल क्वलिटी वाइज पण बेस्ट वाटली , फक्त अता एक तरी मराठी फिनालेला हवा या आग्रहामुळे तिच्यावर अन्याय होउ नये !
दीप्याला अनूमोदन
दीप्याला अनूमोदन
अभिलाषा आणि राहुल दोघेही छानच
अभिलाषा आणि राहुल दोघेही छानच गातात, ते हवेतच अंतिम तीनात. अपूर्वाबद्दल मात्र मी अनडीसायडेड आहे. नाकातून गाते, आणि तिला गाताना कष्ट पडतात असेही वाटते कधीकधी. कॉलबॅकमध्ये सुस्मिरता यायला हवी होती, मग ती आणि हे दोघं अशी जबरा फायनल झाली असती.
उर्मिलाचा आवाज सगळ्या गाण्यांना सूट होत नाही (मला तर तिची भावगीतंही लावणी टाईपच वाटतात :अओ:) स्वरदाही कधीकधीच स्पार्क दाखवते- लडीवाळ, गोडगोड गाण्यात.. त्यामुळे पाचातल्या दोनाबद्दल मी ठाम आणि उरलेल्या तीनात कोणीच नको असं माझं मत आहे. अंतिम फेरी दोघातच नाही होऊ शकत का?
मी काही कळत नसले तरी अधून
मी काही कळत नसले तरी अधून मधून हा शो बघतो. काही प्रश्नः
ती जी स्टेजवरची बाई आहे, तिचा एक डोळा चकणा आहे, का फुटला आहे? कायम डोळ्यावर झापर्या आलेल्या.
तिथे कुणाला मराठी येत नाही का? सगळे आपले फाड फाड के इंग्रजी शब्द वापरून गाण्याची चिरफाड करत असतात! जे काय म्हणायचे त्याला मराठी शब्द आहेत. गाण्यातले काही माहित नसले तरी तेव्हढे शब्द मला माहित आहेत. मग याच लोकांना का नाही येत मराठी?
उद्या एखादा इंग्रजी शो असला नि त्यात इंग्रजी ऐवजी मराठी शब्द वापरणारा माणूस आला, तर मराठी लोकच त्याला आधी हाकलून द्या म्हणून ओरडा करतील. मग मराठी शो मधे हे इंग्रजी का?
हिंदी सा रे ग म वर प्रवेश मिळाला नाही म्हणून आता मराठी सा रे ग म वर यायला लागले आहेत लोक असे दिसते. मराठी गाणी म्हणतात, पण शब्दोच्चारावरून कळतेच.
४५ वर्षांपूर्वी बीटल्स नावाचा एक प्रसिद्ध इंग्रजी गायक समूह आला होता भारतात. त्यांच्या स्वागतपर त्यांचेच एक गाणे भारतीयांनी म्हंटले. बीटल्स म्हणाले व्वा, आमचे गाणे तुम्ही तुमच्या भाषेत केले! त्यांना सांगितले, अहो आम्ही इंग्रजीतच म्हणत होतो. तसे वाटते.
तिथे कुणाला मराठी येत नाही
तिथे कुणाला मराठी येत नाही का?>>
आशाताईंचं स्वागत करताना पल्लवी चक्क त्यांना ' तुम्ही स्थानबद्ध व्हा' म्हणाली . अन ते ऐ़कून कोणाच्याही तोंडून ' आँ' आलं नाही ! मला वाटलं की या भागातली गाणी ऐकणं म्हणजे स्थानबद्ध होण्याचीच शिक्षा आहे की काय ? पण गाणी ऐ़कून तसंही वाटलं नाही
तो शो मअआठी नसून इंग्लिशमधे
तो शो मअआठी नसून इंग्लिशमधे आहे.... फक्त मढे मढे चुकून काही क्रेझी लोक मअआठी स्पिक करतात..
'तुम्ही स्थानबद्ध व्हा'
'तुम्ही स्थानबद्ध व्हा' >>??? बाप रे
पण पुन्हा तोच प्रश्न मला पडला, पल्लवीला मराठी येत नाही हे माहित आहेच पण कार्यक्रमाशी संबंधित कुणालाच कळत नाहीत का हे भयाण विनोद(?!!)
हे असले प्रकार एडिट करताना सुधारता आले असते!
Pages