सा रे ग म प मराठी : पुढचे पर्व

Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23

महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).

हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....

http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंडळी.. डीजेची लिस्ट शंभर टक्के बरोबर आहे....

पण सर्वात वाईट गोष्ट अशी की फक्त एकच मुलगा आणि नऊ मुली.. त्यामुळे सगळी बायकी गाणीच तेव्हढी ऐकायला मिळणार... अर्थात कार्यक्रम बघितला तरच... बघायची इच्छा नाहीच आहे फारशी.. पण तरी पण मधे अधे कधीतरी बघितली जातीलच....
सक्सेनाचे नशीब चांगलेच जोरावर आहे... शेवटी तीन पर्यंत तर तो नक्कीच जाणार... दुसरा कुठला मुलगा नसल्यामुळे त्याला ठेवणारच.... Sad

डीजे,
मौली चा हा परफॉर्मंस खरंच ए-वन...

केद्या,
SD बर्मन, मन्ना डे, किशोर ची तारीफ केलीं तर बिघडलं कुठं...
हक बनता है उनका...

पूनम व सुप्रिया, अवधूतला नावे ठेवल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद! तो अशी मूर्ख, निरर्थक, फाजील, साचेबद्ध बडबड पूर्वीपासूनच करतो. (पहा : माझी इतर सीझन्समधल्या आर्काईव्हजमधली त्याच्यावर उधळलेली मुक्ताफळं! :D)

तो स्क्रीनवर आला की (आणि त्याने संगीतबद्ध केलेली गाणीही कोणी म्हणत असले की) तेवढा भाग मी चक्क फॉरवर्डच करुन बघतो. वेळ फुकट जात नाही.

बरं, जाता जाता नमूद करायला हवं की पल्लवी मला आवडते. जोरदार टाळ्या, आणि आता कसं वाटतंय हे इरिटेटींग आहे हे मान्य केलं तरीही. Proud

अवधूत आणि ती पल्लवी पण दिवसें दिवस अजुन च इरिटेट करतायेत !!
त्या बिचार्‍या सागर जाधव च्या चांगल्या गाण्याला हिंदीचे धडे देण्या आधी त्या पल्लवीला मराठीचे धडे द्या !!
मृण्मयीला काय म्हणे "खूप छान गाणं म्हणालीस"
आणि एकदा नाही दोनदा, साधना सरगम च्या बाबतीत पण पुन्हा तेच, छान गाणं "म्हणालीय" साधना सरगम!!
ती चूक कोणाला दिसली नाही का ?
बोलताना इंग्रजी शब्द वापरणं एक वेळ समजु शकतो, पण इतकं चुकीचं मराठी होस्ट नी बोलणं अतिच !

असो, गाण्यां बद्दल !
सागर जाधव बद्दल पूनम ला अनुमोदन, बिचारा चांगला गायला होता कि !
खरच ठरवून टार्गेट केल् त्याला.

मृण्मयी ओके गायली पण 'चुपकेसे' without 'दोस्तोसे झूठी मूठी दुसरोंका नाम लेके तेरी मेरी बाते करना '(मधे मधे "आहा") कसं काय सादर करतात, त्या कोरस शिवाय मजाच नाही चुपकेसे ची !!

सुमीरता 'बैरी पिया' चांगली गायली पण अवधूत नी तोंड फाटे पर्यंत स्तुति केली तितकं काही फ्लॉलेस नव्हतं !
उर्मिलानी गाण्याचं सिलेक्शन बरोब्बर केलं(फक्त पुन्हा एकदा लोकगीत), गाणं छान झालं पण सुरवात जेवढी दमदार झाली , तितका अंतरा पॉवरफुल नाही वाटला, वरचा 'सा' जरा जास्त च !
सलील नी काय बक्षिस म्हणून काय तर घड्याळ काढून दिलं, काहीही :हहगलो:, तिला समजलं नसेल त्या घामट घाड्याळाचं काय कारायचं Proud

आर्या-प्रथमेश सही गायले पण रोहित चा आवाज फुटल्यामुळे एकदम वेगळाच येतोय त्याचा आवाज !

बाकी सगळे निर्णय बायस्ड, कोणाला फुटेज द्यायचं सगळं ठरवून चाल्लय असं दिसतय !

सलील नी काय बक्षिस म्हणून काय तर घड्याळ काढून दिलं,
>>
केबीसी ३ मधे शाहरुख (टॅग हर) घड्याळं काढून द्यायचा...
सलमान पण अधून मधून (बीईंग ह्यूमन) घड्याळं देत असतो...

सलील स्वतःला यांच्याएवढा सूपरस्टार वगैरे समजायला लागला की काय???
आणि कोणतं घड्याळ दिलं...?? मॅक्सिमा की सोनाटा... की चायनीज... Wink

बाय द वे... जाता जाता आठवलं...
सुरवातीच्या (दिल चाहता है पूर्वीच्या) काळात सैफ अली खान मॅक्सिमा घड्याळं, न्यूपोर्ट जीन्स, राजदूत आणि यामाहा लिबेरो मोटरसायकली सारख्या बजेट ब्रँड्सचा अँबॅसॅडर होता... Happy

काढून देण्यासारख्या दोनच गोष्टी- घड्याळ किंवा चष्मा Lol काय देणार? घड्याळच ना! Lol सर्वात मोठा Light 1

चाफा, एकाच पोस्टमध्ये अवधूत आवडत नाही आणि पल्लवी आवडते असंकसंकायलिहूशकतोसतू? हे पॅकेज असं आहे, की Take it or leave it! दोघेही आवडतात किंवा दोघेही आवडत नाहीत Proud

काढून देण्यासारख्या दोनच गोष्टी-
>>
तो म्हाग्रू कसा सरोज खान ची कॉपी करत शंभर रुपये देतो...
तसं यानी घरनं येताना मिठाईचा डब्बा घेऊन यायचा... चांगलं झालं गाणं तर एक एक बर्फी द्यायची, पाव किलोत आख्खा एपिसोड होईल...
उरलीच थोडी बर्फी तर अवधूत ला द्यायची...
त्यातून उरली तर पल्लवीला...

सलील नी काय बक्षिस म्हणून काय तर घड्याळ काढून दिलं <<< LOL !

या पर्वातले परीक्षक 'वहिणी वहिणी' करायला परफेक्ट वाटतात. तिकडे पाठवा.

घामट घड्याळ Lol

खरंतर प्रोमोज् मध्ये सलिल 'तुला आत्ता जेन्ट्स घड्याळ मिळालं तर काय करशील?' असं विचारताना दाखवत होते. मेन एपिसोड मध्ये ते दृश्य कापून टाकलं. बहुतेक उर्मिलाने काहीतरी wierd उत्तर दिलं असणार. Proud

उर्मिलाचे अभिनंदन! छान गायली..

तिच्या पुढच्या फेरीसाठी काही गाणी:
१. उघड्या पुन्हा जहाल्या
२. सैया निकस गये
३. खेळताना रंग बाई होळीचा
४. तुझ्या उसाला लागल कोल्हा
५. उगवली शुक्राची चांदणी
६. येउ कशी तशी मी नांदायला

यातली ३ आणि ४ क्रमांकाची गाणी म्हटली तर अवधुत वेडाच होईल आणि सलील चष्मा काढुन देइल बहुतेक Happy

अरे त्या अवधूत गुप्तेच्या कानाखाली वाजवून त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारून हाकलून दिले पाहिजे..कहिच्या काही comments देतो तो...आणि उर्मिला छान गाते पण तिला उगाचच डोक्यावर चढ्वून ठेवलेय सगळ्यानी..सागर जाधव खरेतर चांगला गायला होता पण नेहमीप्रमाणे अजून एक वर्षाने बघ तुझं गाणं कुठे पोहचतेय वगैरे बोलून त्याला गोड बोलून बाहेर काढल्..खरतर हा कार्यक्रमच बंद केला पाहिजे..

सागर जाधवचं 'तडप तडप के' गाणं खरंतर चांगलं झालं होतं. पण त्यावर परीक्षकांच्या मात्र 'दिग्दर्शित प्रतिक्रिया' आल्या. अर्थात, ते अपेक्षित होतंच.. >>>>>>अनुमोदन.

सौरभ काडगावकर ला का नाही सिलेक्ट केलं ??
सही गायला तो , राहुल हा एकच मुलगा का ठेवलाय? बरोबर सौरभ पण हवा होता !
उगीच मुलींची गर्दी करून ठेवलीये फायनल मधे ठरवून Angry

सौरभ पाहिजे होता फायनल ला, छान मोकळा आवाज आहे आणि स्टेज प्रेझेन्स पण चांगलय !
स्वरदा, अपुर्वा गज्जला दोन मुली नको होत्या !
परिक्षकांनी कशा कॉमेंट्स द्याव्या ते शृति ताईं सडोलीकरांनी दाखवून दिलं !
अर्थात निर्णय हा झी च्या इन्फ्लुंन्स नी झाला असणार !

Btw,
एक तक्रार आहे सॉग सिलेक्शन बद्दल !
इथे अभंग्-भक्तीगीतं जरा जास्तच निवडतात , त्या मानानी जुनी सॉफ्ट भावगीतं (त्यात आशा ताईंची)कमी ऐकायला मिळतात !

त्या मानानी जुनी सॉफ्ट भावगीतं (त्यात आशा ताईंची)कमी ऐकायला मिळतात !>>>
अगदी अगदी DJ, हे मी मागे पण लिहिले होते. काही काही गाणी तर खुपदा रिपिट झाली आहेत.आणी काही काही सुंदर गाणी तर त्या स्टेज वर झाली पण नाहीयेत बहुतेक... Sad

even गीत रामायणा मधली पण खुप कमी ऐकायला मिळाली गाणी..
आता तर ते पण possible नाहिये, कारण mostly ती गाणी गायकाची आहेत.. आणी ह्या पर्वा मधे आता एकच गायक उरलेला आहे Sad

स्वरदा ऐवजी आकांशा किंवा सौरभ पाहिजे होता..

मागच्या पर्वांतील गाणी पुन्हा या पर्वात ऐकताना तेवढी मजा येत नाही. त्यामुळे झीने मागच्या पर्वातील गाणी टाळली तर बरे होईल.

अत्रे मोड ऑन
पुढच्या हजार वर्षांमध्ये एकाही गाण्याची पुनरावृती न करता त्यांनी अशी दहा हजार पर्वं घेतली तरी त्यांना पुरून उरतील अशी एकापेक्षा एक खणखणीत गाणी मराठीत आहेत. (टाळ्या)
अत्रे मोड ऑफ

जिडी तुम्हाला शंभर मोदक Happy
झी वाल्यांनी ... सगळ्या पर्वांत सगळी तिच तिच गाणी ठरवूनच ठेवलेली आहेत बहुदा.. आता फायनलला पुन्हा तिच छमछम करता.. ईई गाणी..गेल्या तिनही पर्वात... तिच तिच गाणी ऐकुन कंटाळा आलाय. Uhoh

आज खूप दिवसांनी इथली चर्चा वाचली. गायक स्पर्धा परीक्षक यांच्याबद्दलची मते विचारपूर्वक दिली आहेत यात शंका नाही. पण वर "सलील ने उर्मिलाला काय बक्षीस दिलं?" यावर जी चेष्टेखोर 'चर्चा' झाली आहे ती अजिबातच नाही आवडली. बक्षीस हे शेवटी बक्षीस असतं. ते कुणी , कुणाला का किती आणि काय द्यावं हे तुम्ही कोण ठरवणार? लग्ना-मुंजीच्या वरातीतही मस्त नाचणार्‍या लहान / मोठी मुलं, मुली यांना कौतुकाने उत्स्फूर्तपणे नातेवाईक खिशातून नोट काढून बक्षीस देतात त्यावर अशी मुक्ताफळं उधळतं का कुणी? आणि यावरुन कुणाची ऐपत ठरवण्याची वृत्ती तर अतिशय हीन वाटते. "घामट घड्याळाचं ती काय करणार!" एवढाच प्रश्न आहे का तुम्हाला? मग तुम्हाला आजवर मिळालेल्या मेड्ल्स आणि सर्टिफिकेट्स चं तुम्ही काय केलंत ते आठवा.दाद देण्याची प्रत्येकाची पध्दत असते. का हिंदी सिनेसृष्टीतल्या लोकांनी केला की तो दिलदारपणा आणि मराठी लोकांनी केला की पांचटपणा? मग पूर्वीचे राजे उत्तम कामगिरीबद्दल लोकांना बक्षीस म्हणून मोत्याचे कंठे, सोन्याची कडी बहाल करत आणि आपल्या पूर्वजांनी तो ठेवा अजूनही जिवापाड जपला हा निव्वळ मूर्खपणाच झाला नाही का?

का हिंदी सिनेसृष्टीतल्या लोकांनी केला की तो दिलदारपणा आणि मराठी लोकांनी केला की पांचटपणा? मग पूर्वीचे राजे उत्तम कामगिरीबद्दल लोकांना बक्षीस म्हणून मोत्याचे कंठे, सोन्याची कडी बहाल करत आणि आपल्या पूर्वजांनी तो ठेवा अजूनही जिवापाड जपला हा निव्वळ मूर्खपणाच झाला नाही का?
<<
lol, तुम्ही इतर बक्षिसांची तुलना रिअ‍ॅलिटी शोज मधल्या appreciation शी करु नका !
हिंदी मधले कौतुक आणि मराठी मधला पांचटपणा असं कोण म्हंटलं ? Proud
रिअ‍ॅलिटी शोज (हिंदी-मराठी किंवा इतर कुठली प्रादेशिक भाषा) , त्यातलं हे बक्षिस (मग त्या सुवर्णाकुमार बप्पीदांची gold chain असो, सरोज खान चे १०० रुपये असो किंवा ते मराठीतले महागुरुंचे १०० रु.), हे कौतुक कमी आणि fixed ड्रामा जास्त वाटतो !
सलील नी काढून दिलेलं घड्यळ पण शो ऑफ किंवा खर सांगायचं तर ते हतातल घड्याळ काढून देणं विनोदी वाटलं! Happy

रिअ‍ॅलिटी शोज (हिंदी-मराठी किंवा इतर कुठली प्रादेशिक भाषा) , त्यातलं हे बक्षिस (मग त्या सुवर्णाकुमार बप्पीदांची gold chain असो, सरोज खान चे १०० रुपये असो किंवा ते मराठीतले महागुरुंचे १०० रु.), हे कौतुक कमी आणि fixed ड्रामा जास्त वाटतो ! >>
मला डिजेचं जास्त पटलं.

हे कौतुक कमी आणि fixed ड्रामा जास्त वाटतो ! >>
lol, तुम्ही इतर बक्षिसांची तुलना रिअ‍ॅलिटी शोज मधल्या appreciation शी करु नका !
>> lol,ती तुलना नाही. आपल्याला मिळालेल्या बक्षीसाचा लोकांना किती अभिमान असतो याचं ते उदाहरण आहे !!
डीजे, तो फिक्स्ड ड्रामा असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण तो ड्रामा करण्यासाठी तरी त्या स्पर्धकांमधलाच कुणीतरी 'वरचढ' किंवा 'लायक' निवडावा लागतो हे तरी मान्य असेल ना? नाहीतर आजपर्यंत प्रत्येक स्पर्धकाच्या बाबतीत असा ड्रामा करता आला असता. आणि "आज काय बक्षीसं मिळणार" या उत्कंठेपायी अजून टीआरपी वाढवता आला असता. पण या 'नाटका' साठी का होईना, उर्मिला पात्र ठरली यात तिचे काहीच साध्य नाही असं तर नाही ना म्हणू शकत? इतक्या स्पर्धकांमध्ये तिचा जो सन्मान झाला, जो जगाने पाहिला तसं आजवर तिचं कौतुक झालं होतं? आणि इथे लोकांना चिंता त्या 'घामट घड्याळाचं ती काय करणार!" याची ! LOL!! Rofl
माझा आक्षेप
>>
केबीसी ३ मधे शाहरुख (टॅग हर) घड्याळं काढून द्यायचा...
सलमान पण अधून मधून (बीईंग ह्यूमन) घड्याळं देत असतो...

सलील स्वतःला यांच्याएवढा सूपरस्टार वगैरे समजायला लागला की काय???
आणि कोणतं घड्याळ दिलं...?? मॅक्सिमा की सोनाटा... की चायनीज...
>> या वाक्यांना आहे.
यामध्ये बेधडकपणे तुलना करुन , ऐपत किंवा लायकी दाखवण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटलं.
परीक्षेत उत्तम यश मिळाले की बाबा सायकल आणून देतात, भाऊ नवीन सॅक घेऊन देतो, आई आवडीचं पक्वान्न बनवते आणि म्हातारी आजी प्रेमाने नुसतंच जवळ घेते आणि घरी येणार्‍या प्रत्येकाला आपलं कौतुक सांगत रहाते. यातलं कोणतं बक्षीस श्रेष्ठ? येईल सांगता?
आता प्लीज पुन्हा ही 'त्या' बक्षीसाशी केलेली 'तुलना' आहे असं म्हणू नका. पुन्हा एकदा हे एक उदाहरण आहे !!

हिंदी मधले कौतुक आणि मराठी मधला पांचटपणा असं कोण म्हंटलं ? >> हे असं कुणी म्हटलं, असं मला म्हणायचंच नाहीये. या चर्चेवरुन ते सिध्दच झालं आहे. कसं? याचं उत्तर वरच्या संदर्भात मिळालंच असेल.
अर्थात, कुणाला कशाबद्दल काय वाटावं याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. जसं या सगळ्या ड्रामा बद्दल तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही लिहिलंत. तसंच त्यात जे मला आवडलं नाही, आणि ते का आवडलं नाही हे मी मांडलं. त्यावरुन कुणी स्वतःच्या विचारात , वृत्तीत बदल करावा अशी बाष्कळ अपेक्षा मी मुळीच ठेवलेली नाही. Happy

Pages