सा रे ग म प मराठी : पुढचे पर्व

Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23

महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).

हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....

http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मृतीमध्ये (?) टाळ्या <<< ज्याने स्क्रिप्ट लिहीलं आहे त्याने 'यादमें' चं सरळ भाषांतर केलंय.

अवधूत काहीही बरळतोय. त्याला कोणीतरी आवरायला हवय.
उर्मिलाच्या गाण्यानंतर काहीही बडबडला. कार्यक्रम संपताना स्वतःचा पोपट करुन घेतला.

कालची गाणी:
राहुलः चांगला गायला नेहेमी प्रमाणे पण आज काही एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी नाही वाटला आणि अभंग ऐकायचा कंटाळा आलय दर आठवड्यात !
उर्मिला : IMO अतिशय अ‍ॅव्हरेज !
मला तरी अजिबात आवडल् नाही, वरचा 'सा' ?? Uhoh
अता तर हाइट झाली चॅनल नी तिला जबरदस्तीनी स्टार बनवायची !
अवधूत काय बोलत होता आणि, काय शाह रुख आणि मायकेल जॅक्सन वगैरे, १००% वेड लागलाय, ती अँब्युलन्स खरच आणा घेउन जा त्याला !
काल 'माही वे' तर इतक् फ्लॅट झालं असताना सुध्दा अवधूत चा चाबुक कमेंट्स वगैरे चालु झालच होतं !
अभिलाषा : 'घनरानी मस्तं झालं !!
अश्विनी: होम पिच वर गात होती,त्यामुळे चांगलच झालं.
अपुर्वा: I can't connect with her singing, ओके झालं.
सुम्स्मीरता: पुन्हा अभंग च?? :(.. चांगलं गायली पण तेच तेच होतय !
संहिता: 'जबान पे लागा', चांगलं झालं पण ही साँग सिलेक्शन करताना मौली दवे ची कॉपी करतेय का??:)
ऋतुजा: 'सैय्या' मस्तं झालं, आवडलं, सुफी गाणं बरोब्बर सुट झाल् तिच्या पॉवरफुल आवाजाला पण हिंदी उच्चार खूप सुधारयला हवेत !
(चांगला होता कि गं पूनम तिचा स्कर्ट टॉप :फिदी:)
मृण्मयी: 'कहना हि क्या' बेस्ट परफॉर्मन्स IMO , इन फॅक्ट बेस्ट परफॉर्मर ऑफ द विक!! (बेताल झालेला कोरस मात्रं खरच खटकला ).
मस्त आहे तिची व्हॉइस क्वालिटी आणि दिसते पण सुंदर मृण्मयी !
स्वरदा: नो कॉमेंट्स.
काल सुम्सीरताचं 'सलोनासा सजन है' खूप छान नाही पण 'म' देण्या इतकं वाइट नव्हतं झालं, तिला घालवायचय ठरवलेलं दिसतय लवकर :(.
रविन्द्र साठेंची मस्तं झाली गाणी :).

उदेश उमप याला सुरेश वाडकर आणि पंडीतजीनी तिसर्‍या भागात समज देउन आता वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हणा असे सुनावले होते. या पर्वात असे काही दिसत नाही आहे. (असेल तर मला तरी दिसले नाही).

मला वाटते एलिमिनेशन पुढील क्रमाप्रमाणे होइल..

१.अपुर्वा
२.रुतुजा
३.सुस्मिरता
४.अश्विनी
५.स्वरदा
६.संहिता
७.मृण्मयी
------------- फायनलिस्ट्स
८.अभिलाषा
९.राहुल
१०.उर्मिला

मनस्मी, फायनलीस्ट मधे अभिलाषा नसेल माझ्या मते.. दोन दोन परप्रांतिय नाही ठेवणार... राहूल असेल कारण मुलगा पण आणि परप्रांतिय पण.. सो महागायक बनणार की महागायिका?? अशी "उत्सुकता" ताणण्यासाठी त्याला ठेवतील.. आणि निकाल "ऑब्वियस" लागेल असं वाटतय एकूण रंग बघता... Wink

मनस्मी, फायनलीस्ट मधे अभिलाषा नसेल माझ्या मते.. दोन दोन परप्रांतिय नाही ठेवणार
<<< अभिलाषा पुण्याची आहे ना आणि राहुल बहुदा मुंबईचा ?
परप्रांतीय नाही म्हणता येणार मग , अमराठी म्हणा फार तर :).

आणि निकाल "ऑब्वियस" लागेल असं वाटतय एकूण रंग बघता
<<<हा शब्द वापरला कि माहित आहे न काय होतं? Proud
पण पर्वात तर जरा अतिच चालु आहे सगळं Uhoh

काही करा पण त्या अवधूतला सुट्टी द्या रे! अक्षरशः काहीही म्हणजे काऽऽहीऽऽही बरळतोय! याच्यापेक्षा हिमेश परवडला खरंच!

ते मेकओव्हर पाहून फार हसले! कोणीतरी हौशी ब्यूटी क्लिनिक मधल्या शिकाऊ पोरांनी हवे तसे रंग केसा -तोंडावर फासलेत असं वाटलं! सगळ्यात त्या ऋतुजाची हेअर्स्टाइल (?!) भारी Lol

चाफ्या,
मेगा चॅलेम्ज नाही बघतेस का ?
नसलास तर नक्की बघ, सगळ्या राउंड्स जुन्या संगीतकारांना डेडिकेट केल्या आहेत् आणि स्पर्धक पण सगळे अनुभवी आहेत, अत्ता पर्यंत शंकर जयकिशन, नौशद स्पेशल झाले अता बहुदा एस्.डी.बर्मन स्पेशल आहे :).मेगा चॅलेंज बीबी वर व्हिडिओ लिंक्स पण दिल्यायेत, बघः).
(तुझी वि.पू. डिसेबल केलीयेस बहुदा म्हणून इथे टाकला मेसेज).

<ते मेकओव्हर पाहून फार हसले! कोणीतरी हौशी ब्यूटी क्लिनिक मधल्या शिकाऊ पोरांनी हवे तसे रंग केसा -तोंडावर फासलेत असं वाटलं! सगळ्यात त्या ऋतुजाची हेअर्स्टाइल (?!) भारी<>
अगदि अगदि. काय ते एकेकाचे केस केलेलेत. जाम हसायला येत होत.

कसले एकेक मेक-अप केलेले लोकांचे.. अगदी पल्लवी स्टाइल Proud
मला राहुल सक्सेना ची दोन्ही गाणी एकदम बेकार वाटली...
उर्मिला चे मराठी गाणे ठीक्..पण हिंदी आवडले नाही.. अभिलाषा दोन्ही गाणी चांगली गायली..

सगळ्यात आवडले म्हणजे, रविंद्र साठेंनी अवधुत चा केलेला पोपट Proud .. पांचट पणाची हाईट केली होती अवधूत ने

मला वाटतं मोगरा कौशिक देशपांडे बद्दल बोलत असावी कारण रोहित तसा माहित आहे सगळ्यांना.
कौशिक चॅलेंज'०९ ला होता शंकर महादेवन टिम मधे, लवकर आउट झाला.

आजपासून एलिमिनेशन सुरु!
नेहमीप्रमाणेच धक्कादायक निकाल!
पहिल्या तीनात
१. अभिलाषा
२. ऊर्मिला
३. राहुल
शेवटच्या तीनात
१. अश्विनी देशपांडे
२. सुस्मिरता
३. संहिता
सुस्मिरता डवाळकर आऊट..

राहुलचे गाणे "नसतेस घरी तू जेव्हा.." अतिशय संथ आणि बळंच अंगावर घेऊन दाखवल्यासारखे वाटले.
पण त्या निमित्ताने सलीलचे गाणे ऐकायला मिळाले.
स्वरदाच्या नाटकीपणाला आवरा.
ऊर्मिला मेक ओव्हर नंतर फार कॉन्शस झाली आहे का काय स्वतःच्या दिसण्याबाबत? Uhoh
अश्विनी देशपांडे आजचा आवाज ठरली. चांगले झाले गाणे तिचे.
सलील प्रमाणाबाहेर बोलायला लागलाय.. होल वावर इज अवर असं त्याला वाटतंय की काय कोण जाणे.
अवधूतला म्हणाव बालिशपणा सोड आता तरी. काय तर म्हणे,"माझ्या ग्रुपमधल्या मुलाने सलीलचे गाणे घ्यावे हे पाहून मला जळायला झाले!" काय हे! Angry

सुस्मिरता एलिमिनेट झाली हे मला तरी धक्कादायक वाटले नाही. गेल्यावेळी तिची दोन्ही गाणी नीट झाली नव्हती. आजचे ही फार काही आवडले नाही. तिची तब्बेत खराब असेल कदाचित पण कोण कसं गायलं तेच बघावं लागतं ना शेवटी. सुस्मिरताच्या गाण्यातली तडफ अंतिम फेरीत दिसलीच नाही. कॉल बॅक ला दिसेल बहुधा Happy

कॉल बॅक ला दिसेल बहुधा
-----------------------
म्हणजे अजुन कॉलबॅक संपले नाहीत का? मला वाटलेले आताचे बाय्बाय हे गुडबाय असेल Sad

उर्मिला ने आज वेगळ प्रयत्न केला आणि छान गायली.. अभिलाषा पण छान फक्त अजुन नेटकं होऊ शकलं असतं..
राहूल सक्सेना मणामणाचं ओझं घेऊन गायला.. अगदि काही वेळेस चेहेरा कुंथल्यासारखा करुन..
स्वरदा - ही बाई कधी जाणार किंवा तिला कधी हाकलणार?? महापकाऊ..
बाकिच्या कन्यका..ठीक ठीक..

स्वरदा - ही बाई कधी जाणार किंवा तिला कधी हाकलणार?? महापकाऊ..>>> मोदक्स!!
बाकिच्या कन्यका..ठीक ठीक..>> सगळेच ठीक ठीक, ह्या पुर्ण पर्वात ह्याच्या पुढे कोणी (कधी कधी काही अपवाद वगळता) गेलच नाहिये!! एकही जण कन्सिस्टंट नाही! ह्यात काही नवल नाही की हे पर्व आतापर्यंतच्या सगळ्या पर्वात सर्वात सुमार चाललय. होस्ट, परिक्षक, स्पर्धक, मेकओव्हर .... सग़ळच खालवलय!!

बाई मी विकत घेतला श्याम.

नसतेस घरी इतकं बोअर कुणी म्हणू शकेल असे वाटले नाही. तरीही हे दोघे वा वा म्हणताहेत. छ्या.

मला आवडलं बुवा आज राहुल सक्सेनाचं गाणं. खूप भावपूर्ण म्हटलं आणि उगीचच हरकती घ्यायला गेला नाही.

खूप भावपूर्ण म्हटलं आणि उगीचच हरकती घ्यायला गेला नाही.>>>>
तेव्हढाच काय तो प्लस पॉइंट... कालच्या त्याच्या गाण्यातला... पण अगदीच रटाळ झाले ते गाणे...
पण त्याचे सुदैव एकच की सलीलचे असंख्य पंखे केवळ ह्या गाण्यामुळे त्याला सगळ्यात जास्त मतं देतील..

नसतेस घरी इतकं बोअर कुणी म्हणू शकेल असे वाटले नाही. तरीही हे दोघे वा वा म्हणताहेत. छ्या

अनुमोदन!!

स्वरदा - ही बाई कधी जाणार किंवा तिला कधी हाकलणार >> अगदी अगदी... भयंकर नाटकी आणि लाडिक

शुभा मुदगल ह्यांच्या बद्दलचा आदर आणखीनच वाढला. काय जबरी भाषा आहे त्यांच्यी. जबरी!!

मृण्मयी तिरोडकर मस्त गायली.

स्वरदाच्या गाण्यातला ण फार कापत होता असे वाटते. "येणार" जमलं नाही असे वाटते.

ऋतुजाचा एक क्लास आहे. एकदम अ फा ट गायली. मान गये उसको.

आवडती गायीका उर्मिलाने थोडी निराशा केली, पण पुढे ती भरुन काढेन. Happy

राहुलचे प्रथम तुज काही खास आवडले नाही.

केदारची पोस्ट एकदम करेक्ट!
ऋतुजा लाड ला दोन नी.
अभिलाषा ने ऋतु हिरवा उगाच जास्तीच्या जागा घेऊन म्हटलं आणि तिथेच तिचं गाणं गंडलं.. यावरच्या सलीलच्या कमेंटसाठी तरी व्हिडिओ पाहाच! Proud
पल्लवीचे पुन्हा मिसमॅच सुरु झालेले आहे.
चला, शुभा मुद्गलांचे गाणं सुरु झालं.. Happy
.....
त्यांचं गाणं ऐकल्यावर असं प्रकर्षानं जाणवलं की असे थोर परीक्षक आले की त्यांच्यापुढे अवधूत आणि सलील अगदीच चंगू मंगू वाटतात. पूर्वीसारखं एक तरी सिनियर परीक्षक (निदान वयानं) ठेवायला हवे होते. Happy

चंगू मंगू ....अगदी हाच शब्द चपखल आहे....पण ते नुसते वयामुळे नाही तर अतिशय सुमार कॉमेन्टस् मुळे....त्यात वयाचा भाग अगदी थोडा असावा असं अवधूतचं बोलणं ऐकताना वाटतं....त्याच्या जागी लिट्ल चॅम्प्स् मधील एखाद्या १०-१२ वर्षाच्या मुलाला बसवले तरीही इतक्या फालतू कॉमेन्टस् येणार नाहीत

अभिलाषाचं गाणं पाहिलं... भयंकर गंडलं... तरी दोन ध Uhoh
गाणं झाल्यावर ती ढसाढसा रडली असं आतून कळलं.. Wink
एकूण राहूल, अभिलाषा आणि उर्मिला ह्यांना विनाकारण डोक्यावर चढवतायत.. !!!!! त्यांच्यापेक्षा ऋतुजा, मृण्मयी, स्वरदा, अश्विनी नक्कीच खूप चांगल्या आहेत... पण टिआरपी वाढवण्यासाठी राहूल अभिलाषा पैकी एक आणि उर्मिला हे मेगा फायनल ला जाणार हे नक्की...

Pages