चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याचा अर्थ सांगा त्यांना
त्यांचं इंग्लिश कमजोर आहे असे तेच कधीतरी म्हणालेत Happy

आणि हेमाशेपो चा पण अर्थ सांगा त्यांना
हुमायून नेचर आहे त्यांचं कळत नसेल तरी वापरायची हौस दांडगी Happy

Happy

गहराईया पाहिला..एफ ची बाराखडी जास्तच झाली, ते शब्द वाक्या वाक्यात नसते तरी डायलॉगबाजी इफेक्टीव वाटली असती..बाकी बोअर नाही झाला..शेवटचा ट्वीस्ट भारीच..

युक्रेन मधे घुसलेल्या रशियन सैन्याला जागोजागी गहराईया दाखवून पळवून लावले जात आहे अशा बातम्या आहेत.

उद्या

राधेश्याम भरपूर शो आहेत
झुंड , खिंड कमी झाले आहेत
काश्मीर फाईल्स अगदीच कमी शो आहेत

बॅटमॅनचे पहिले भाग पाहिले नाहीत तरी हा पाहिला. चांगला असेलही पण मला वाटलं की हा सिनेमा म्हणजे सुरुपासुन शेवटपर्यंत सगळंच काळंकाळं, हळुहळु. बॅटमॅन दु:खीदु:खी. वाटले होते तो दुसरा मॅन कसा हात फेकत फेकत भिंतीभिंतीवरुन प्रवास करतो व उजेडात करमणुक पण करतो तसा हा मॅन पण करेल. पण अंदाज चुकला.

बॅटमॅन च्या अश्या दुःखद गोष्टीच सगळ्यात भारी असतात. बॅटमॅनचे अप्रूप त्याच्या स्नायू शक्तीत नसते, बुद्धी आणि न वाकणारे इथिकल स्टॅण्डर्ड यात असते.
डार्क नाईट ट्रायोलॉजी पहिली नसेल तर अवश्य पाहा सुनिधी.
त्याखेरीज चांगले एनिमेटेड बॅटमॅन सिनेमे-
१. बॅटमॅन हश
२. बॅटमॅन: इअर वन
३. बॅटमॅन: अंडर द रेड हूड
४. द डार्क नाईट रिटर्न्स- भाग १ व २
५. गॉथम बाय गॅसलाईट

राधे शाम पहिला
VFX ,भव्य सेट्स, सगळा चकचकीत पणा... स्टोरी फारशी वेगळी नाही... नियती लाही बदलणारे प्रेमी...
बाकी काहीच नाही...

मी विकिपीडियावर वाचले आणि कँसल केले

त्याच्या ज्योतिषी असण्याचा कथेत काहीच मोठा प्लस पॉईंट वाटला नाही , ना सस्पेन्स , ना हॉरर , ना थ्रिलर

Proud

हो
मायबोलीवरचे लोक पिक्चर चालावा म्हणून 4 जास्त टिकते काढत आहेत म्हणे

Thursday पाहीला आज. Thursday लाच सुरू केला होता पण आज संपला. विषय चांगला असूनपण मांडणी फारच वरवरची वाटली. सगळंच प्रेडिक्टेबल. ती कुणाही लहान मुलांना मारणार नाही हे लगेच कळतं. कदाचित Wednesday चा इफेक्ट असेल मनात, त्यामुळे हा अगदीच साधा वाटतो. तो पाहीला नसता तर हा आवडला असता कदाचित.

बधाई दो बघितला. आवडला.
"कांताबाई " जोक्स आणि स्टिरीओटाईप्सपेक्षा खूप उजवा आहे.
विषयाच्या हाताळणी आणि मांडणी साठी 100%.
बाकी मोठं कुटुंब , टिपिकल सैटप वगैरे ओकेओके.

बधाई दो - अर्ध्या तासात जांभया देत बंद केला.
>>>
मलाही हिच भिती आहे. असा विषय आणि त्यात आयुष्यमान किंवा रावला पाहिले की हल्ली भितीच वाटते.
त्या चंदीगढच्या नादालाही मी म्हणून लागलो नाही

मायबोलीवरचे लोक पिक्चर चालावा म्हणून 4 जास्त टिकते काढत आहेत म्हणे>> lol
ट्रेलर promising वाटलं.. reviews पण मस्त आहेत.. IMDB rating १० आहे.. शेवटचं हर्षद मेहता ला होतं हे रेटिंग माझ्या माहितीत.. म्हणून विचारलं..
पण म्हणून ३० पौंड(५ तिकिटाचे) नाही घालवणार मी.. Lol

राधे शाम पहिला >> मीपण... actually अजून थोडा राहिला आहे.. पण बघवत नाहीये आता.. वेळ बरबाद सिनेमा आहे.. ओव्हर dramatic.. अती चकाचक.. अती VFX..

Pages