चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लुप-लपेटा अजिबात आवडला नाही, युज्वली तापसीचे मुव्हिज बरे असतात पण यात त्यानी ल्युडोची स्टाइल वापरायचा प्रयत्न केलाय पण हा त्याच्या जवळपास सुद्धा जात नाही.एकतर तिने त्याच्या जिवासाठी पळापळ करावी अस त्याच्यातल रिलेशनच वाटत नाही त्यात ड्रामा क्रियेट करायाला तापसी पळताना दाखवली आहे तो आपल्यापर्यत पोहोचतच नाही ५० मिनिटात ५० लाख मिळवायचे म्हणजे काही प्लॅन हवा ना पण हि नुसती येड्यासारखी पळते. पडद्यावर खुप काही चाललय अस दाखवायचा नुसता ड्रामा आणी त्यासाठी उफराटे कॅमेरा अ‍ॅन्गल वापरले की झाल का?

प्राजक्ता सहमत
मीही कालच पहिला
चित्रपट वेगळ्या धाटणीचा आहे आणि काही काही प्रसंग खुलून आलेत पण मूळात तापसी खूपच कमी पडलीय
एकतर ती फार विचित्र धावलीय आणि कुठेही त्यांची केमिस्ट्री दिसून येत नाही
त्या उलट छोट्या प्रसंगात तो टॅक्सीवाला, ज्वेलर ची पोरे भाव खाऊन जातात

मी पण बघितला लुप-लपेटा , आवडला नाही. तापसी आवडते पण ह्यात जमली नाही.
प्राजक्ता, अनुमोदन.

लूप लपेटा फसलेला आहे. मी पूर्ण न पहाता बंद केला. कंटाळाच आला. तापसी पण नाही आवडली.

छोट्या प्रसंगात तो टॅक्सीवाला, ज्वेलर ची पोरे भाव खाऊन जातात
>>>>
हो +७८६ हे मात्र खरे आहे. त्यांची कॅरेक्टर ईंटरेस्टींग डेव्हलप केलीत. त्या ज्वेलरचेही खरे तर.. पण पिक्चर तापसीचाच आहे. तिने कुठलीही विशिष्ट लकब न घेता कॅरेक्टर उभारले आहे. त्यामुळे जे घडतेय ते विश्वसनीय वाटते.

पिक्चरचा संदेश छान आहे. जे कर्म कराल तेच तुम्हाला परत मिळेल. तीन लूप पाहिल्यावर हे आपल्याला जाणवते.
सेकंड लूपचा त्याचा मृत्यु बघून मला तो स्पायडरमॅन चित्रपटाचा सीन सुद्धा आठवला ज्यात तो त्या चोराला न अडवता जाऊ देतो आणि पुढे तो त्याच्याच आजोबांना गोळी घालतो.

लूप लपेटा अत्यंत बोर पिक्चर झालेला आहे. चांगल्या कल्पनेची माती केलेली आहे.
एकतर प्रचंड मोठा आहे. पिक्चरचा लूप आहे हे समजायला तब्बल १ तास १० मिनिटे लागतात. तेव्हा बघितलं तर अजुन तितकाच शिल्लक ही असतो चित्रपट! साधारण काही आवडलं की सलग बघितलं जातं, वीकेंडला तर नक्कीच. पण हा तीन रात्री थोडा थोडा बघत बघत संपवला एकदाचा! यातच काय ते आलं. नाही बघितलात तरी हरकत नाही.

लूप लपेटा अत्यंत बोर पिक्चर झालेला आहे. चांगल्या कल्पनेची माती केलेली आहे.>>+१
नाही बघितलात तरी हरकत नाही.>>>+१
अजिबात आवडला नाही, पकडच घेत नाही ! तेच तेच संवाद ऐकायला वैताग आला. कॉमेडी समजावा तर हसू आले नाही, थ्रीलर समजावा तर थरार वाटला नाही.

सुरूवातीची २० मि. बघायला मजा आली.. वेगळ्या पद्धतीचं डिरेक्शन म्हणून.. कधी नव्हे ते तापसी आवडली..एऱहवी फार आवडत नाही.. पण नंतर गोंधळ अजून वाढत जाणार आणि बरेच राडे होणार ह्या विचारानेच बसच्या सिननंतरचा पिच्चर सोडून दिला.. उरलेला नवऱयाने बघितला.. कसा होता पिच्चर हे ही नाही विचारावसं वाटलं Happy

मी असले चमत्कारीक धाटणीचे चित्रपट फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेकदा बघितले आहेत. त्यामुळे वेगळा प्रयोग म्हणून आवडला. टिपिकल बॉलिवूडी रोमान्स आणि घिसेपिटे डायलॉगपेक्षा सुसह्य, कॉपी केलेला असल्यानेही असेल कदाचित..अजून चांगला होऊ शकला असता (हे वाक्य आता या धाग्यावर ऑटो मोड मध्ये द्यायची सोय करावी अॅडमिन यांनी :))

पण पिक्चर तापसीचाच आहे हे अजिबातच पटलं नाही. तिची कुठेही छाप पडत नाही. आता छाप न पडणे किंवा बोर मारणे हाच निकष असेल तर त्यावर काही बोलायचे नाही.

धनि, अगदी!
वेगळ्या धाटणीचा आहे आणि घिसापिटा नाही इतका लहान निकष नाही ना होऊ शकत!

वेगळ्या धाटणीचा आहे आणि घिसापिटा नाही इतका लहान निकष नाही ना होऊ शकत! >>> परफेक्ट, अमितव. पण आताशा निकष लेव्हल इतकी खाली आणावी लागत आहे. बरेच पिक्चर पाहताना जाणवतं हे.

छोट्या प्रसंगात तो टॅक्सीवाला, ज्वेलर ची पोरे भाव खाऊन जातात >> भाव खाऊन जाता हे अंडर स्टेटमेंट आहे रे. त्यांचे कॅरॅक्टर आल्यावर पुढे ते परत कधीयेणार ह्याची वाट बघत बसतो. भसीन चे काम पण नीट झाले आहे. तापसी खटकत नाही पण रन लोला रन मधे जसा चित्रपट लोलाचा होता तसा इथे होत नाही. का कोण जाणे तापसी अशी धावणारी वाटतच नाही. लोला क्लट क्लासिक असल्यामूळे फार अपेक्षा नव्हत्या पण एकंदर चित्रपट बोअर होत नाही असे मला वाटले.

का कोण जाणे तापसी अशी धावणारी वाटतच नाही.>>>>

हो हेच म्हणायचं होतं खूप ऑकवर्ड आणि विचित्र धावते ती काहीतरी, आणि मुळात कनव्हिसिंग नाही वाटत तिचा रोल

मी आजवर एकही झोंबी सिनेमा नाही पाहिला. काय मी चिकवा - २ धाग्यावर येण्यास पात्र आहे ?

लूप लपेटा ३ दा प्रयत्न केला पहायचा... पण प्रत्येक लूप ला झोप च आली भयंकर.. मुवी च माहीत नाही.. लूप मध्ये झोप चांगली झाली.

अजिबात आवडला नाही, पकडच घेत नाही ! तेच तेच संवाद ऐकायला वैताग आला. कॉमेडी समजावा तर हसू आले नाही, थ्रीलर समजावा तर थरार वाटला नाही.>>>+१
लूप लपेटा एकदम च बोर झाला. तापसी आवडते मला पण दर वेळेस सेम टू सेम डायलॉग डीलेव्हरी देते, मोनोटोनस वाटते. हसीन दिलरूबा मधे एक्स्प्रेशन्स मधे विक्रांत ने तिला कच्चे खाल्ले होते..ईथे ही तिची छाप काही पडत नाही.

तापसीचा रश्मी रॉकेटही होता ज्यात ती मेल हार्मोन्स जास्त असलेली फिमेल अ‍ॅथलीट होती. तो पिक्चरही छान होता. तो सर्वस्वी तिचाच होता. या भुमिकेलाही अ‍ॅथलीट पर्सनॅलिटीची गरज होती. त्यामुळे तापसीच फिट बसत होती. अश्या भुमिकांत सूट होणार्‍या हिरोईनी आपल्याकडे अभावानेच आढळतात. एक प्रियांकाने मेरी कोम जबरदस्त केलेली. पण कंगणाची कबड्डी जमली नव्हती, तर सायना नेहवालचा तर ट्रेलरही बघवला नव्हता.

<<<सायना नेहवालचा तर ट्रेलरही बघवला नव्हता.>>>{
सहमत...
तद्दन रद्दड सिनेमा.... खरी सायना तर depression मधेच गेली असती तो सिनेमा बघून..

लूप लपेटा पाहिला एकदाचा... शेवटच्या लूप मध्ये पकड घेतो.. तापसी नेहमीप्रमाणे सुमार अभिनय... प्रचंड स्लो आणि बोरिंग वाटला.. ओव्हर इंजिनीरिंग केली आहे आणि त्यातच गंडलाय ...
ग्राउंडहॉग डे , बटरफ्लाय इफेक्त्त, सोर्स code सारखे चित्रपट पाहिलेल्याना खूप बोर वाटेल...
बॉन जोवी चे इट्स माय लाईफ गाणे/व्हिडीओ बेटर आहे या लूप लपेटा आणि तापसी रन पेक्षा...

Pages