चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ. नो पाहिला. आठवत नव्हता. सीन कॉनरीला तोड नाही. तगडा, राकट, देखणा आणि मिस्कील तरीही अत्यंत भेदक जेम्स बॉण्ड आहे त्याचा. पहिला बॉण्डपट, द स्पाय हू लव्हड मी पाहिला तेव्हां तो अलंकारला मॅटिनीला आलेला होता. मॅटिनीला अठराची अट एव्हढी पाळत नव्हते म्हणून पाहिला. त्यात रॉजर मूर बराच वयस्कर होता. पण त्यामुळे बॉण्ड म्हणजे मूर असे डोक्यात फिक्स होते. टिमोथी डाल्टन अज्जिबात आवडला नव्हता. त्यानंतर सीन कॉनरी माहिती झाला. अलकाला मुद्दामून डॉ नो पुन्हा लागला होता. हाऊसफुल्ल शोज होते. रॉजर मूरची इमेज एकदन निरमाने धुवून टाकली ओरोजिनल बॉण्डने.

सीन कॉनरीला तोड नाही.
>>> ऋन्मेष स्टाईल का... लिहायचे सीन पण वाचताना शॉन wachayche? Happy

ऋन्मेष स्टाईल का... >>> सरांच्या ह्याच्यात... आपलं बूटात पाय घालण्याचा प्रमाद कसा काय करेन सर ? ( अशोक सराफ स्टाईल वाचावे)
लिहायचे सीन पण वाचताना शॉन wachayche? >> लहानपणापासून केसरी / सकाळचे जे संस्कार झालेत त्यामुळे शॉन असा उच्चार करतात हे माहिती होऊनही सीन सोडवत नाही. शॉन हा वेगळाच अभिनेता वाटतो सकाळ-केसरी कृपेने.

रॉजर मूरची इमेज एकदन निरमाने धुवून टाकली ओरोजिनल बॉण्डने.>> अगदी अगदी. तो फारच गोड आहे. खरेच फिट बा वडी व एकदम मिशिकिल मॅनरस. रॉजर मू र ला उगीच कान फटवावे असे वाट्ते.

मी पन मून रेकर, व थंडर बॉल नेव्र से नेव्र अगेन बघितले इतक्यात. ( माबो अ‍ॅ बसेन्स मध्ये) थंडर बॉल मध्ये खूपच डीप सी डायविन्ग आहे.
मून रेकर एक दम स्टुपिडेस्ट बॉन्ड मुव्ही आहे.

मी मॅन विथ द गोल्डन गन पाहिलेला अलकाला. तो स्कारा मांगाच जास्त सेक्सी दिसतो मूर पे क्षा.

विधवा बाईने रडवाणे दिसले पाहिजे किंवा असते असं आधी म्हणायचं मग बदलायचं. मग अगदी हास्यास्पद पोस्ट की बेबी फॅट लूज करायला पाहिजे. का? जेवण सोडून द्यायचं नवरा गेला म्हणून? काहीही..( नेहमीसारखच विनोदी).
निम्स स्तरातील विधवा त्या उच्च स्तरातील विधवा पाहिल्यात घरच्या ते बाहेरच्या. कोणालाच रडं घेवून बसताना पाहिलं नाहीये.
का रया गेलीय( नॉट जजिंग की त्यांना आंतरीक दु:ख न्हवतेच) पण रया गेलेलीच असतेच नवरा गेल्यावर अगदीच टू मच कमेंट.
म्हणूनच तर समाजात, विधवा बायकांनी सजले/ नटले तरी लोकं कमाल करतात, त्या बाईला नावं ठेवतात.
प्रत्येक विधवा बायका अश्याच दिसतात किंवा असतात हा असा अचाट रीमार्क?
बाकी चालू द्या..
दोन जवळची उदाहरणे, आजोबा गेले तेव्हा, आजीने सर्व बिझनेस एकटीनेच सांभाळला. उलट ज्यास्त गुंतवणूक केली.
एका आत्ये-आजीचा नवरा ,अमाप संपत्ती सोडून लवकर गेलेला, ती नेहमीच म्हणायची, सुटले ते आणि सुटली मी. अगदी मजेत जगतेय मी आता. कारण, नवरा बेड रिडन होता आणि आत्ये-आजी कंटाळलीच होती त्यांच्या आजारपणाला. सो केस बाय केस असतं ह्याची नोंद घ्या.

आणि डिप्रेस्ड नवरा मेला की बायको गरीबच. हे हे तितकच हास्यास्पदच.
अलीकडेच आमच्या बिलडिंगमधील एकाने गच्चीवरून आत्महत्या केली. ड्राय फ्रूट्स धंदा, मस्त ४ बेडरूम घर आहे. बायको पारंपारीक मारवाडी हॉउसवाईफ . ती रोज चालताना भेटते.
तिच्या ग्रूपमध्ये अगदीच विषय निघाला एक्दा डिप्रेशनवर, तर म्हणे नवरा १८ वर्षे डिप्रेशनमध्ये होता, गेला तेच बरं झालं. बिल्डिंगमधल्या क्लिनिकल डिप्रेशन ह्याविषयी काहीच अक्कलच नसलेल्या बाया, हे कसे शक्य? करून कुटाळक्या करतात नेहमीसारख्या.
आणि ती कशी सजते वगैरे करून सकाळचा वेळ त्यांच्या टवाळक्या करून सार्थ करतात.
आता मुर्खांना कोण सांगणार , हे केस टू केस असते.
तेव्हा चालू द्या.

सरकारी स्कीमातही हीच बोंब आहे

विधवा पेन्शन मागीतली की घरी व्हिजित करतात , फ्रीज टीव्ही वोशिंग मशीन मोठे घर दिसले की नो पेन्शन

पण हे सगळे मुळात नवर्याचेच असेल ना , नवरा गेल्यावर आणि नोकरी नसेल तर ती किती काळ मेंटेन करू शकेल ?
बिनडोक

आणि हे सगळे मंजूर करणारव स्वतः लाखात पगार घेतात

Are bb movies cha aahe chukla watte zimma war liha Tai

Today's movie From Russia with Love.

पण हे सगळे मुळात नवर्याचेच असेल ना , नवरा गेल्यावर आणि नोकरी नसेल तर ती किती काळ मेंटेन करू शकेल ?>> फॅमिली पेन्शन किंवा फॅमीली पी एफ घ्यायचा असेल तर लाइफ सरटिफिकेट द्यावे लागते दर वर्शी त्यात खाली एक कॉलम असतो त्यात विडो असल्यास त्यांनी रि मॅरेज केले नाही आहे हे लिहून बँक ऑफिसर कडून सही घेउन इ पी एफ ओ ला सबमिट करावे लागते. पण ह्याची चर्चा सरांच्या बाफ वर नको. सभासद उखडतील.

थँक्स अमा, स्कारा मांगा चा एकही मूव्ही पाहिलेला नाही. बघतो आता वेळ मिळाला की.

कॅनेडीअन फिल्ममेकर आगम दर्शी यांचा डाँकीहेड नक्की पहा. सर्व पात्रांचा उत्तम अभिनय, अतिशय सशक्त कथानक , ज्यांना आवड असेल त्यांच्याकरता एक स्टीमी सीन चित्रपटात घातलेला आहे.
पार्म , मोनाचा भाऊ एकदम बॅलन्स्ड आणि सर्वाधिक लेव्हल हेडेड वाटतो तो नंतर एकदम वेगळा जाणवतो. फॅमिली सिक्रेटस, भावंडांतील प्रेम, काही कुरबुरी.
मोनाचे काम आगम दर्शींनी केलेले आहे. मोनाला महत्वाकांक्षाच नाही असे समजून तिची भावंडे सल्ले देतात यंव न ट्यंव पण खरे पहाता, मोनाने वडीलांच्या आजारपणाची जबाबदारी उचललेली आहे ज्यात तिचे करीअर राहून गेलेले आहे - हे कोणाच्या लक्षातच येत नाही.
हा पॉइन्ट मला स्वतःला खूप भेदक वाटला. बरेचदा आपण जज करतो, मते बनवतो पण त्या मतांना आधार असतो आपले मर्यादित नीरीक्षण व खरोखर आपले मर्यादिक आकलन.
एक प्रसंग तर इतका मस्त आहे - मोना ला वाटते बाबा आता आपल्याला "यु आर अ गुड गर्ल' म्हणतील व ती जाता जाता आशेने थांबतेही , अक्षरक्षः कान टवकारुन. परंतु ती गेल्यानंतर वडील पुटपुटतात "यु आर अ गुड गर्ल मोना." आयुष्यभराची तिची ही खंत आहे. वडील भयंकर क्रिटिकल आहेत.
खूप रीड बिटवीन द लाइन्स आहे. पात्रांना खोली आहे. झिम्मामध्ये पात्रांना खोली दाखविण्याच्या नादात अनेक इश्युंचे ट्रिव्हिलायझेशन झालेले आहे. याउलट डॉन्कीहेड सिनेमात, प्रेक्षकास स्पुन फीडींग फारसे केलेले नाही तर रीड बिटवीन द लाइन्स करायला लावलेले आहे.

थँक्स अमा, स्कारा मांगा चा एकही मूव्ही पाहिलेला नाही. बघतो आता वेळ मिळाला की.>> अरे नाही रे नाही भावा. फक्त मॅन विथ द गोल्डन गन मधील व्हिलेन चेच नाव स्कारा मांगा आहे. ( बहुतेक.) पिच्चर परत बघून लिव्हते.

कोणी क्लिफर्ड द रेड बिग डॉग पहिला का??

अतिशय धमाल सिनेमा आहे, लहान मुलांना आवडेल खूपच
आणि भुभु प्रेमी असाल तर अगदीच

ते रेड भुभु सेम ओड्या सारख दिसतं आमच्या

https://youtu.be/4zH5iYM4wJo

ते रेड भुभु सेम ओड्या सारख दिसतं आमच्या>> हाउ क्वीट.

तो रेड डॉग फार फेमस आहे. बघते. मला पॉप कल्चर मधील कुत्रे असा एक लेख लिहायचा आहे. लिहेन आता .

मला पॉप कल्चर मधील कुत्रे असा एक लेख लिहायचा आहे. लिहेन आता>>>>>

वाह भारीच विषय
लिहा लवकर, वाट बघतो

मेपल वर पण लिहा, ते वेडू ड्रमर आहे आणि मालकाला गिटार ला सोबत करत
असलं गोंडस दिसतो ना

https://youtu.be/0Dik2IjKois

माझी जेम्स जेम्स बद्दल एक छोटी तक्रार आहे. मिशन संपविल्यावर तो पहिले व्यवस्थित बॉस ला कॉल का नाही करत? दर वेळी आपली अवघड परिस्थिती. त्या वेळची बाई पण जावा तिकडं म्हणत नाही.

आत्ता फॉर युअर आइज ओन्ली बघितला हा पन अलकात बघितलेला. हिरवीनीचे लांब लांब केस अगदी परवीन बाबी च्या केसांपेक्षा पण छान आहेत.
व क्लायमॅक्स चे लोकेशन व स्किल एकदम लव्हली आहेत. जरूर बघा. रॉजर मूर च्या ऐवजी कोन पण ठोक ळा बशिवला तरी चालतंय.
तेव्हा ह्या बाँड हिरवीणी म्हणजे आमच्या अगदी अ‍ॅस्पिरेशनल लेव्हल नेव्हर रीचेबल होत्या. पर दिलमें तमन्ना तो रहती ही है.

झोम्बोली पाहिला

ठीक आहे

पण मराठी सिनेमे हे एकांकिकेसारखे का असतात समजत नाही

उजवा हात ऐकत नाही , हेपण साऊथ पिक्चरवरून घेतलय , पण त्यात त्याचे रहस्य सांगितले होते, ह्यात काय नाही

आणि बॅक ग्राउंड म्युजिक मध्ये एकदोनदा पुष्पाची पिप्पाणी वाजल्यागत वाटते सॅकसोफोन की काय ते
पिपाणी
पेटी
तुणतुणे

जगात 3 च वाद्ये असतात

शान्त माणूस, malignant सिनेमाचे कथाकल्पना भारी आहे. रहस्य, काही सीन भारी आहेत. पण सिनेमा नंतर मनात जास्त रेंगाळत रहात नाही. एक वेगळा अनुभव म्हणून पाहु शकता.

सुनिधी आभार.
थोडक्यात छान रिव्ह्यू दिला आहे.

बरेचसे सिनेमे नोट केले आहेत. इतका वेळ कसा मिळणार प्रश्नच आहे. Happy
झिम्मा आईला आवडला. मीच लावून दिल्याने सुरूवात पाहिली. टाईमपास आहे.
छुपकथा फक्त होईचोई वर आहे. सबस्क्रीप्शन्स खूप झाल्याने एव्हढ्यासाठी नाही घेतली. येईलच अन्य ठिकाणी त्या वेळी बघेन.

आता फ्लॅट नंबर ६०९ बघेन. (होईचोई वर होता, प्राईमवर पण आला आहे).

संपला एकदाचा फ्लॅट नं ६०९. अरिंदम भट्टाचार्यचे नाव वाचून पाहिला. सुरूवातीचे दचकवणारे सीन्स मला सलग पाहता आले नाहीत. पहिल्यांदा बंद केला. दुसर्‍या दिवशी मग हिय्या करून पाहिला. दुसर्‍यांदा पाच मिनिटे मधेच थांबून मग पुढे पाहिला. (कुणी पाहणार असेल तर मलाच असे होतेय कि अजून कुणाला हे जाणून घ्यायला आवडेल).
स्पॉयलर देत नाही. पुढे सस्पेन्स आहे. काही वेळाने संशय आला तेच झाले. तरीही खिळवून ठेवले. कहानी १ मधला सतत काहीतरी खाणारा स्थूल इन्स्पेक्टर यातही आहे. काहीशा त्याच पद्धतीने रहस्य उलगडत जाते. खूप धक्के दिलेले नाहीत मात्र.
सुरूवातीला मला ती प्रेग्नंट वाटली होती. तसं नाही पण.

६०९ लिस्टमधे अ‍ॅड केला आहे.

अनपॉजड दुसरा भाग कोणी पाहिला का प्राईमवर? मंजुळेची वैकुंठ स्टोरी चांगली आहे ऐकलंय.

आजचा चित्रपट यु ओन्ली लिव्ह ट्वाइस. ह्या त बाँ ड व इतर लोक जपानात काही बाही करत आहेत. मनी पेनी व एम ह्यांनी नेव्हीचे ड्रेस घातलेले आहेत. व बॉड एका गाडीत मागे पकडून ठेवला आहे तर आपल्या सारखा मास्क घातला आहे त्याने. आता एका खोलीत येउन एक जाडा जपानी बाप्या आहे त्याबरोबर मारामारी करून त्याला मूर्ती ने ठोकून मारतो. व शेजा रीच लगेच एक बार अस्तो तिथे सयामीज वोडका असते ती ओतून घेतो व तोंड वाकडे करतो.

लगेच त्याला तिथे एक सेफ दिसतो त्यातील काही मामला चोरी करून पळून जातो. हिरवीन फॅन्सी गा डी घेउन येते व त्यात बस्तो व तिथून पळतात.
ती कार मस्त आहे. इटालिअन नक्की.

काल प्राईमवर eakam पाहिला.
पाच कथा पैरलली सुरू असतात... फुल्ल फिलॉसॉफी..सबटायटल्स वाचता वाचता दमछाक झाली..पण चांगला आहे...(तेलुगू कळत असेल तर उत्तम Wink )

अनपॉजड दुसरा भाग कोणी पाहिला का प्राईमवर?>>>>>>>>>> मी पाहिलाय पहिल्या दोन कथा.. पुर्ण व्हायचाय.

Pages