Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
रीपीट व्हायला हरकत नाही, पण
रीपीट व्हायला हरकत नाही, पण ते अक्षर चुकीच्या ठिकाणी असेल तर पिवळं दाखवणं ही ठीकच. पण बरोबर ठिकाणी आलं तर हिरवं दाखवून पुरेसं नाही, पर्पल दाखवलं पाहिजे असं वाटलं. अॅंबिग्युईटी येते. अर्थात ती येऊन गेमची मजा वाढत असेल तर काही म्हणणं नाही. मी तीनच दिवस झाले खेळतोय त्यामुळे फार अनुभव नाही.
(No subject)
आज डेस्कटॉपवरून रिझल्ट शेअर करता आला नाही. फोनवरून पुन्हा सोडवावं लागलं.
(फक्त सोडवणं पुरेसं नाही, शेअर करावं लागतं. शास्त्र असतं ते.)
तो अन्लिमिटेड वाला पाहिला. त्यात अनेकवचनं, भूतकाळाची रूपं वगैरे वापरलीत. त्यामुळे मजा येत नाही.
फक्त सोडवणं पुरेसं नाही, शेअर
फक्त सोडवणं पुरेसं नाही, शेअर करावं लागतं. शास्त्र असतं ते
सत्यवचन
Admin / वेमा : युनिकोड कॅरॅक्टर एनेबल करा ना. म्हणजे रांगोळी डायरेक्ट कॉपी पेस्ट करता येईल. आता स्क्रीनशॉट अपलोड करावा लागतो म्हणजे उगाच सर्व्हरची जागा फुकट जाते. इतरही सगळ्या स्मायली उपलब्ध होतील
दुसऱ्यांदा सोडवतानाही 4
दुसऱ्यांदा सोडवतानाही 4 attempts ...
*तो अन्लिमिटेड वाला पाहिला.
*तो अन्लिमिटेड वाला पाहिला. त्यात अनेकवचनं, भूतकाळाची रूपं वगैरे वापरलीत. त्यामुळे मजा येत नाही. >>+१११
अशी रूपे वापरणे हे शब्दखेळांच्या मूलभूत नियमांचे विरुद्ध आहे
माझ्या रांगोळीतील शेवटल्या
माझ्या रांगोळीतील शेवटल्या दोन लाईनी पाहिल्या की लक्षात येईल शेवटले अक्षर कुठले डोक्यात धरून बसलो होतो.

आज एकही पिवळा चौकोन नाही सगळे हिरवेच तरीही ५ अटेम्पट्स.
a, e असलेले शब्द असतात का
a, e असलेले शब्द असतात का कधी? मी कधी कधी हे स्वर एलिमिनेट करायला पहिला शब्द खर्ची पाडतो.
माझ्या आता लक्षात आलं आज मला
माझ्या आता लक्षात आलं आज मला पण एकही पिवळा चौकोन नाही चार प्रयत्नात.
आज माझा दुसरा रॅन्डम गेस योगायोगाने चांगला निघाला. मग पुढचं सोपं होतं
काय योगायोग! आज मलाही एकही
काय योगायोग! आज मलाही एकही पिवळा चौकोन नाही, तरी चार पायऱ्या लागल्या.
पहिला शब्द adieu का श्रद्धा?
पहिला शब्द adieu का श्रद्धा?
पहिल्याच ट्रायमधे सुरवातीची
पहिल्याच ट्रायमधे सुरवातीची दोन अक्षरे मिळाली.
मी_आर्या, दुसऱ्या प्रयत्नात
मी_आर्या, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही पहिल्या प्रयत्नात मिळालेली दोन अक्षरे का वापरली नाहीत?
vowels शोधायला?
पहिला शब्द adieu का श्रद्धा?<
पहिला शब्द adieu का श्रद्धा?<<<<<<< बरोब्बर!
<<दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही
<<दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही पहिल्या प्रयत्नात मिळालेली दोन अक्षरे का वापरली नाहीत?<<
अन पहिली दोन्ही व्यंजने होती, मला स्वर शोधायचे होते.
एवढ सुचले नाही तेव्हा.
आपल्याला उलट गेमपण खेळता येईल
आपल्याला उलट गेमपण खेळता येईल. प्रत्येकाचा पहिला शब्द ओळखायचा
आज फटकन जमला शब्द!
आज फटकन जमला शब्द!
<<नंबर 2 चे wordle खतरनाक आहे
<<नंबर 2 चे wordle खतरनाक आहे! 5 व्या लाईनला जमलं<<
अगदी अगदी! दोनदा सेम अक्षरे आली तरी इथे जमत नाही. इथ तर..
अन मला अनेकवचने आली की फार वैतागवाणे वाटते.
(No subject)
पहिल्या लाइन मधे सगळे काळे येण्याचा आनंद्/फायदा वेगळाच
आजचा शब्दच असा आहे की पिवळे
आजचा शब्दच असा आहे की पिवळे चौकोन येतंच नाहीयेत बऱ्याच जणांना
(No subject)
झालं एकदाचं. सेम नावाने सेव्ह
झालं एकदाचं. सेम नावाने सेव्ह केल्याने चित्र अपलोड होत नव्हते.
आजचा शब्दच असा आहे की पिवळे
आजचा शब्दच असा आहे की पिवळे चौकोन येतंच नाहीयेत बऱ्याच जणांना >> अगदी
तीन
तीन
पहिल्यांदा 3 पिवळे, मग 4
पहिल्यांदा 2 पिवळे, मग 4 हिरवे आणि 3 बरोबर!! हॅपी
(No subject)
स्वरूप, कृपया फक्त रांगोळी
स्वरूप, कृपया फक्त रांगोळी टाका. शब्द रिव्हील करू नका.
(No subject)
ओह्ह.... सगळ्यांना सेमच शब्द
ओह्ह.... सगळ्यांना सेमच शब्द असतो का?
ती रांगोळी अपलोडच होत नव्हती..... page error येत होती!!
(No subject)
आजही तिसऱ्या प्रयत्नात आले.
हो स्वरुप , सगळ्यांना एकच/सारखाच शब्द असतो.
ती रांगोळी अपलोडच होत नव्हती.
ती रांगोळी अपलोडच होत नव्हती..... page error येत होती!!
<<
मायबोलीवर ती रांगोळी "पेस्ट" होते पण अपलोड होत नाही. त्याचा फोटू काढून टाकावा लागतो. वरती भरत म्हणालेत तसं, "शास्त्र असतंय ते"
Pages