Submitted by DJ. on 13 December, 2018 - 09:45
लहाणपणी सर्वत्र चिमण्यांची चिव-चिव आणि कावळ्यांची काव-काव ऐकु यायची. कधितरी पोपट साद घालायचे. मैनाताई पण थुईथुई बागडताना दिसायच्या. पण या मराठमोळ्या पक्षांनी चिवचिवाट केला अथवा कावकाव केलं म्हणुन कधिही मस्तक उठले नाही.
हल्ली मात्र चिमण्या-कावळे-पोपट लांबुनच दर्शन देउन पसार होतात आणि अत्यंत घाणेरडी अशी परप्रांतीय कबुतरे कितीही हाकलली तरी त्रास द्यायला पुन्हा हजर होत आहेत. सोबत त्यांचे शेकडो सगे-सोयरे आणुन साफ-सफाईचे अगदी ३-१३ वाजवलेत.
गेल्या २-३ महिन्यांपासुन बिल्डिंगची डक्ट, बाल्कनी आणि खिडक्यांच्या ग्रिल्सवर कबुतरांनी उच्छाद मांडला आहे.
त्यांची पिसे, विष्ठा आणि सततची गुटर्रर्रर्र-गु यांमुळे अगदी हैराण झालो आहे.
कबुतरे कायमची हुसकावुन लावण्यासाठी, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांच्या त्रासातुन सुटका होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील..?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बिल्डर लोक एक्झॉस्ट बसवून देत
बिल्डर लोक एक्झॉस्ट बसवून देत नाहीत, ती खिडकी मग मोकळीच रहाते
आम्ही तिथे चार दिवस मोकळे बॉक्स ठेवले होते मग लगेच एक्सझोस्ट बसवून घेतले
भरत , thanks . हे माहिती
भरत , thanks . हे माहिती नव्हतं.
हो blackcat , आमच्याबाबतीत तेच झालं पण आमच्या लक्षातच आलं नाही , एवढा त्रास होईल.
सध्या पुठ्ठे लावले आहेत तिथे. साफसफाई झाल्याशिवाय काहीच काम करता येत नव्हते. आता एकेक गोष्टी आटपू.
ही चर्चा मला काही अपील होत
ही चर्चा मला काही अपील होत नाहीये. ग्रिलवर बसलेल्या कबुतरांचा गुटरगु आवाज करण्याशिवाय काही त्रास झालेला नाही आजवर. आजकाल तर कबुतर पण दुर्मिळ झालेत असं वाटतंय.
पण माअम की कबुतर किंवा पक्षी प्राणी आपापल्या स्वभावधर्मानुसारच वागणार. आपण होणार्या त्रासासाठी उपाययोजना करायची
आमच्याइथे काही जण कबुतर पालायचे ते आठवलं.
ज्या घाणीत आम्हालाच काम
ज्या घाणीत आम्हालाच काम करायच्या कल्पनेनेच शिसारी येत होती , त्यासाठी जास्त पैसे देउनही बाईला बोलावणं मला योग्य वाटलं नाही
>>>>>>>
हे विचार आदर्शवादी असले तरी प्रॅक्टीकल / व्यावहारीक नाहीये.
कारण अश्याने आपण आपल्या घरचा कचरा स्वतःच डंपिंग ग्राऊंडला जाऊन टाकावा लागेल. स्पेशली मांसाहाराचा कचरा भयानक वासाचा असतो. मांसाहार करणार्यांनाही नाही झेपत. पण तो आपल्या दारात कोणीतरी येऊन घेऊन जातोच. रस्त्याने कुठे कचर्याची गाडी शेजारून गेली तर आपण नाकाला रुमाल लावतो / हल्ली मास्क वर सरकावतो. पण तरीही हे काम काही लोकांना योग्य ती काळजी घेऊन करावे लागतेच. सार्वजनिक जागेत आपण कचरा टोपलीतच टाकला तरी त्या टोपल्याही कोणालातरी खाली कराव्या लागतातच.
कबूतरांनी केलेला कचरा आपल्याला जरी असह्य वाटला तरी जे लोकं हे प्रोफेशन म्हणून करतात त्यांना सवयीने तो तितका बेक्कार वाटत नाही. तो कसा हाताळावा हे त्यांना माहीत असते. त्यामुळे अश्यांना काम द्या. रोजगार द्या. सोबत ईज्जत द्या. काम झाल्यावर छान चहापाणी नाश्ता द्या. हे जास्त योग्य राहील.
बाकी वर भरत यांनी म्हटल्याप्रमाणे अर्बन कंपनीवाले आणू शकता. ते थोडे महागडे पडत असावे ईतकेच.
आमच्याइथे काही जण कबुतर
आमच्याइथे काही जण कबुतर पालायचे ते आठवलं.
>>>>>
आमच्याईथे कबूतरांची काळजी घेणारी, त्यांना औषधोपचार करून बरे करणारी बाई होती. ती बहुधा जैन होती. आमच्याकडे कोणालाही रस्त्यात जखमी, लंगडणारे, अर्धमेले वगैरे कबुतर सापडले की उचलून तिच्या ताब्यात द्यायचे.
माणसे लावायची अश्या कामाला.
माणसे लावायची अश्या कामाला.
<<
या रुन्म्याला थोडी माणसं लावावीत असा विचार बळावू लागला आहे.
हे लिहायचं राहिलं. मागच्या
हे लिहायचं राहिलं. मागच्या वेळी कबुतरं घरात घुसली होती तेव्हा खिडकीत सुकत ठेवलेली वाटी त्यांनी खाली पाडली होती.
आताही उन्हं यायच्या आत खिडकी उघडी ठेवायची सोय नाही. दुपारनंतर किचनच्या सिंकवरच्या छोट्या खिडकीतून आत येतात.
मला वाटतं, कबुतरांना वळचणीला बसायचं असतं. बाहेर त्यांना तशी आडोशाची जागा मिळत नाही. घरात पंख्यावर , माळ्यावर बसतात. किचनमध्ये क्रोकरीचं एक शोकेस भिंतीवर लावलंय. त्याच्या वर माळा आहे. त्यामुळे एक फुटाचीच गॅप असेल. त्या शोकेसवर बसतात. त्यांच्या पंखांचा फडफडण्याचा आवाज दुसर्या खोलीतही येतो त्यामुळे आलेली लगेच कळतात.
हणमंतराव गायकवाडांची कम्पनी
हणमंतराव गायकवाडांची कम्पनी आहे ना साफसफाई करणारी, त्यांची मदत होऊ शकेल काय?
कबुतरान मुळे श्वसन विकार
कबुतरान मुळे श्वसन विकार होतात. माझ्या वडिलांना झाले होते.
बोरिवली पूर्वेला काही
बोरिवली पूर्वेला काही सोसायट्यांमधील रहिवासी तेथील कबूतरखान्यांचा बंदोबस्त करा, या मागणीसाठी दोन वर्षांपासून पालिकेकडे, लोकप्रतिनिधींकडे खेटे घालत आहेत. घरातल्या चारपैकी एका सदस्याला दम लागतोय, धाप लागतेय, श्वसनाच्या विकारासोबत त्वचेवर पुरळ उठणं, केस गळणं, घशात- नाकात संसर्ग होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मुंबईतील कबूतरखाने हटवण्यासंदर्भात अनेक वर्षांपासून राजकारण जोरात सुरू आहे. मुंबईच्या अनेक भागांतील रहिवासी तेथील कबूतरांच्या गुटर्गुसह त्यामुळे होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमुळे अक्षरशः मेटाकुटीला आलेत.
सविस्तर बातमी ईथे वाचा
https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/sona-ani-maati/health-prob...
वरील बातमी पाहून मला वाटते काही विशिष्ट लोकेशनला हा कबूतरांचा खूप त्रास होत आहे. त्यामुळे ज्यांना हा अनुभव नाही त्यांना हा उपद्रव समजणे अवघड जात असावे.
वर कोणीतरी म्हटलेय की कबूतर घरात शिरतात. पंख्यावर बसतात. पोटमाळ्यावर बागडतात.. आजवर मी ज्या दहाबारा घरात राहिलो आहे. तिथे असा अनुभव कधी आला नसल्याने याबाबत कल्पना करणे अवघड.
थोडक्यात नवीन घर घेताना परीसरात कबूतरांचा त्रास आहे का नाही हे सुद्धा आता चेकलिस्टमध्ये टाकायला हवे.
हे सध्याचे घर घेताना मी माझ्या आजवरच्या आयुष्यभराची कमाई ओतली असल्याने फार सावधपूर्वक एक चेकलिस्ट बनवून त्यानुसार घर सिलेक्ट केलेले. तेव्हा हा कबूतरांचा मुद्दा त्यात नव्हता. नशीबाने असा काही प्रॉब्लेम ईथे नाहीये. तरी नंतर ती माझी लिस्ट शोधून त्यावर एक धागा काढतो. कदाचित ऊपयुक्त चर्चा होईल.
छर्याच्या बंदूकीने साल्यांना
छर्याच्या बंदूकीने साल्यांना जायबंदही करता येत नाही. भर वस्तीत ते छर्रे इतरांना, काचांना लागायचे. function at() { [native code] }ओनात न्युइसन्स्वाला पक्षी आहे हा मात्र. आणि काय त्या घाण सवयी. एकाच घरट्यात १०-१० विणी करतात. ते ही अगोदरची विष्ठा अजिबात न काढून टाकता. इतकी दुर्गंध येते.
सुप्रभात..!
सुप्रभात..!
या सुर्यनारायणवारी सायंकाळी नित्यनियमाप्रमाणे सी शोअरला गेलो तेव्हा नेहमीप्रमाणेच मावळत्या सुर्याचा फोटो टिपताना समोर दाणे टिपणारी कबूतरांची पिल्ले दिसली. साधारण माझ्याच वयाची वाटली. हा धागा आठवला आणि त्यांनाही फोटोत टिपले
सामो प्रत्येक पक्षी घाण करतो.
सामो प्रत्येक पक्षी घाण करतो... झू मध्ये बर्ड एरियात घाण वास पसरलेला असतो...
मांजर लांब जावून जमिनीत
मांजर लांब जावून जमिनीत पायाने उकरून त्या मध्ये संडास करते आणि परत त्या वर माती पसरते .
हा त्याचा नैसर्गिक गुण आहे .
पण आता माणसांनी फ्लॅट मध्ये मांजर पाळायला सुरुवात केली आहे.
त्या मुळे त्या प्राण्या च्या पण नैसर्गिक सवयी बदलतील.
नैसर्गिक वातावरण देणे शक्य नसेल तर प्राणी ,पक्षी पाळण्यावर सक्त बंदी च असावी.
कबुतर चे नैसर्गिक अन्न शोधण्याची सवय पण माणसं च बिघडवत आहेत.
ग्रामीण भागात कुत्री पाळली जातात पण त्यांना नैसर्गिक वातावरण तिथे असते.
खूप मोठी जागा
>>>>>>>सामो प्रत्येक पक्षी
>>>>>>>सामो प्रत्येक पक्षी घाण करतो
हो ती तर बेसिक माहीती आहे. पण प्रत्येक पक्षी कबुतरासारखे घरटे, पिल्लांच्या विष्ठेने खराब झालेले ठेवुन त्यातच अंडी घालत बसत नाही. हा पक्षी आळशी व घाणेरडा आहे.
मला मान्य आहे आपण (मी) पक्ष्यांनाही जज करणे सोडत नाही. पण हे नीरीक्षण इथे विषय निघाला म्हणुन या धाग्यावर लिहीणे मी उचित/योग्य समजते.
Pages