कबुतरांच्या उच्छादाला आवर कसा घालावा..?

Submitted by DJ. on 13 December, 2018 - 09:45

लहाणपणी सर्वत्र चिमण्यांची चिव-चिव आणि कावळ्यांची काव-काव ऐकु यायची. कधितरी पोपट साद घालायचे. मैनाताई पण थुईथुई बागडताना दिसायच्या. पण या मराठमोळ्या पक्षांनी चिवचिवाट केला अथवा कावकाव केलं म्हणुन कधिही मस्तक उठले नाही.

हल्ली मात्र चिमण्या-कावळे-पोपट लांबुनच दर्शन देउन पसार होतात आणि अत्यंत घाणेरडी अशी परप्रांतीय कबुतरे कितीही हाकलली तरी त्रास द्यायला पुन्हा हजर होत आहेत. सोबत त्यांचे शेकडो सगे-सोयरे आणुन साफ-सफाईचे अगदी ३-१३ वाजवलेत.

गेल्या २-३ महिन्यांपासुन बिल्डिंगची डक्ट, बाल्कनी आणि खिडक्यांच्या ग्रिल्सवर कबुतरांनी उच्छाद मांडला आहे.
त्यांची पिसे, विष्ठा आणि सततची गुटर्रर्रर्र-गु यांमुळे अगदी हैराण झालो आहे.

कबुतरे कायमची हुसकावुन लावण्यासाठी, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांच्या त्रासातुन सुटका होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील..?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नायतर माझ्या गल्लीतल्या कुत्र्याचं नाव कबूतर, अन कबूतराचं रुन्म्या ठेवून चांगला बदडून काढीन आता.
>>>

जोक्स द अपार्ट, हे असे करतात माणसे. जनावरांना माणसाळलेली वा भलत्याच प्राण्यांची नावे देणे. कुत्र्याला टायगर नाहीतर शेरू नाव देतात तर बोक्याला बंड्या. आमच्या बिल्डींगमध्ये एक पिंकुडा नावाचा चायनीज सूप खाणारा बोका होता. तर एका चायनीज दिसणाऱ्या केसाळ कुत्र्याचे नाव धनजीभाई होते. तेच त्या कुत्र्याच्या मालकाच्या आजोबांचे नाव होते.
यावर एक वेगळा धागा निघेल. काढूया का?

नको

न पिताच चढलेला माणूस ॠन्मेष...
तू ओ देण्याबद्दल लिहिलेयस, कुत्री तुझ्याकडे यायची, ओ नाही द्यायची Wink तुझ्याशी आता तुझ्यासारख्याच इरीटेट करणार्या लॉजिक नी बोलावं लागेल.

तू ओ देण्याबद्दल लिहिलेयस, कुत्री तुझ्याकडे यायची, ओ नाही द्यायची
>>>>
ओ देणे म्हणजे रिस्पॉन्स देणे.. माणसे ओ करून देतात तर कुत्रे भो करून देतात. मतितार्थ तोच Happy

महानगरात कबुतर ना सार्वजनिक ठिकाणी खाद्य पुरवणे हा गुन्हा आहे. नसेल तर असला पाहिजे अ जामीन पात्र गुन्हा.
खाद्य देण्या मागे धार्मिक भावना असतील तर त्या व्यक्ती नी चार पाच एकर जागा महानगरात खरेदी करावी आणि ती बंधिस्त करून हजारो कबुतर पाळावीत.
दुसऱ्यांना त्रास देवून चोरांनी स्वतःची पाप धुवू नयेत .
मंदिरा बाहेर गाय उभी करणाऱ्या व्यक्ती स्व खर्चाने अर्धा ऐकर जागा खरेदी करावी आणि पन्नास गायी पाळून पुण्य कमवावे.
लोकांना त्रास देवू नयेत

पापी लोकांचे पाप धुवून जाते म्हणून करोडो पापी लोकांनी देशातील सर्वात मोठी नदी भारताची संपत्ती.
गंगा नदीचे गटार केले.

पण असे पुण्य करून पाप कसे राईट ऑफ होते ?

म्हणजे उद्या ब्यांकेचे कर्ज बुडवले आणि त्या ब्यांकेसमोर एक गाय बांधून तिला कडबा दिला तर कर्ज माफ होते का ?

खाद्य देण्या मागे धार्मिक भावना असतील तर त्या व्यक्ती नी
>>>>

कबूतरांना दाणे टाकण्यामागे वा रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घालण्यामागे धार्मिक भावनेपेक्षा भूतदया वगैरे असावी.
धार्मिक भावना कावळ्यांना खाद्य पुरवण्यामागे जास्त असते आणि मला वाटते हे बहुतांश जनता करते. काही जण सणासुदीला खाऊ घालतात तर काही जण रोजचे खाऊ घालणारेही आहेत. आमच्या जुन्या चाळीत हे आमच्याकडे रोजचे होते.
आणि हे बंद होणेही अवघड, कारण कावळ्यांना आपल्याकडे पूर्वज समजले जाते. मेल्यावरही कावळा पिंडाला शिवायला हवाच. आठवा काकस्पर्श.

आणि हे कावळ्यांना खाऊ घालणेही डेंजर असते बरे का.. मी आणि माझी मुलगी लहानपणी राणीबागेत मरता मरता वाचलो आहोत. आजही ती घटना आठवून अंगावर काटा येतो Sad

मी आणि माझी मुलगी लहानपणी राणीबागेत मरता मरता वाचलो आहोत.
<<
अरेरे!

(मूळ वाक्य मूर्ख रुन्मेश पणाचे आहे. कुणाच्या लहानपणी?)

अहो आम्ही माझगावकर जिजामाता उद्यान नाही राणीचा बागच म्हणतो. बालपण गेलेय माझे राणीच्या बागेत. कुठल्या पिंजृयात तेवढे विचारू नका.

@ आरारा, काय हे, अहो मुलीचा उल्लेख आहे म्हणजे तिच्या लहानपणी. अर्थात अजूनही तशी ती लहानच आहे पण सध्या नवी मुंबईला शिफ्ट आणि स्थायिक झाल्याने वरचेवर राणीबागेत जाणे होत नाही म्हणून लहानपणी म्हटलेय.

ऋनमेष
जनरल knowledge कमी असल्या मुळे काही ही बरळत आहे
कावळे लोकांना त्रास देत नाहीत .
कबुतर देतात

कावळे लोकांना त्रास देत नाहीत .
कबुतर देतात
>>>>>>>

त्रास देणे म्हणजे काय नुसते शी शी करणे ईतकेच का?
आम्ही मरता मरता वाचलोय. देव न करो हा अनुभव कोणालाही येवो, त्यामुळे तुम्हाला आला तर समजेल असेही म्हणायचे नाहीये.

चिडले तर कावळे पाठीशी लागू शकतात. एक किस्सा माहिती आहे नातेवाईकांमधला.
किरण पुरंदऱ्यांकडून असं ऐकलंय की एका दाढीवाल्या माणसाने घरटं बांधणाऱ्या कावळ्यांच्या जोडीला त्रास दिला. त्यानंतर कावळे तिथून जाणाऱ्या सगळ्या दाढीवाल्या माणसांवर हल्ले करू लागले. @ऋन्मेष, तसं काही झालं असावं.

ओ देणे म्हणजे रिस्पॉन्स देणे.. माणसे ओ करून देतात तर कुत्रे भो करून देतात. मतितार्थ तोच Happy>>>
यालाच म्हणतात गिरे तो भी टांग उप्पर.

बरं रीस्पॉन्स देणे म्हणू, तर कबुतरा ला पारवा म्हणा नाहितर कबुतर म्हणा, त्याच्या रीस्पॉन्स मधे काय डोंबलाचा फरक पडणार आहे? मुळात कबुतरा ला काय पडली आहे कोणत्या भाषेत त्याला काय म्हणतात ह्याची??

कबुतर मुद्दाम माणूस बघून शी करते का ?

सेफ्टी संडासमुळे माणसाची शी हाच एक प्रॉब्लेम बनला आहे. एखाद्या गावाचा सगळा सेफ्टीक टॅंकचा माल गोळा केला तर एका ज्वालामुखीइतका होईल

aashu29 = आशुचॅम्प?

>>>>
नाय हो, माझा एकमात्र आयडी आहे
जे काही भले बुरे बोलायचे ते एकाच आयडीने बोलतो

आणि या मला 3 वर्षे सिनियर आहेत मायबोली वर
मला 12 च वर्षे झालीयेत त्यांना 15

तर कबुतरा ला पारवा म्हणा नाहितर कबुतर म्हणा, त्याच्या रीस्पॉन्स मधे काय डोंबलाचा फरक पडणार आहे? मुळात कबुतरा ला काय पडली आहे कोणत्या भाषेत त्याला काय म्हणतात ह्याची??
Submitted by aashu29 on 9 December, 2021 - 11:04

>>>>

लहानपणी* स्कॉलरशिपच्या परीक्षेत प्रश्न होता,
चिमणीला कबूतर म्हटले, कबूतराला कावळा म्हटले, कावळ्याला पारवा म्हटले आणि पारव्याला मैना म्हटले
तर सर्वात जास्त ऊच्च्छाद कोण मांडतो?
पर्याय
१. कबूतर २. कावळा. ३. पारवा ४. यापैकी नाही

(* @ आरारा - हे माझ्या लहानपणी बर्रं का Happy )

सेफ्टी संडासमुळे माणसाची शी हाच एक प्रॉब्लेम बनला आहे. >>>> हे काय असते? कसली सेफटी? सीटबेल्ट लावून वगैरे बसायचे असते का?

Safety नाही sanitary toilet असा शब्दप्रयोग आहे

What is a 'Sanitary Toilet'? A sanitary toilet is a toilet which is connected to a septic tank or a twin pit because of which the waste does not leak into the environment.

म्हणजे आपण रोज वापरतो तेच , भारतीय / कमोड इ इ

Pages