कबुतरांच्या उच्छादाला आवर कसा घालावा..?

Submitted by DJ. on 13 December, 2018 - 09:45

लहाणपणी सर्वत्र चिमण्यांची चिव-चिव आणि कावळ्यांची काव-काव ऐकु यायची. कधितरी पोपट साद घालायचे. मैनाताई पण थुईथुई बागडताना दिसायच्या. पण या मराठमोळ्या पक्षांनी चिवचिवाट केला अथवा कावकाव केलं म्हणुन कधिही मस्तक उठले नाही.

हल्ली मात्र चिमण्या-कावळे-पोपट लांबुनच दर्शन देउन पसार होतात आणि अत्यंत घाणेरडी अशी परप्रांतीय कबुतरे कितीही हाकलली तरी त्रास द्यायला पुन्हा हजर होत आहेत. सोबत त्यांचे शेकडो सगे-सोयरे आणुन साफ-सफाईचे अगदी ३-१३ वाजवलेत.

गेल्या २-३ महिन्यांपासुन बिल्डिंगची डक्ट, बाल्कनी आणि खिडक्यांच्या ग्रिल्सवर कबुतरांनी उच्छाद मांडला आहे.
त्यांची पिसे, विष्ठा आणि सततची गुटर्रर्रर्र-गु यांमुळे अगदी हैराण झालो आहे.

कबुतरे कायमची हुसकावुन लावण्यासाठी, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांच्या त्रासातुन सुटका होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील..?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

म्हणजे आपण रोज वापरतो तेच , भारतीय / कमोड इ इ
>>>>
हो पण मग करायचे काय? रोज समुद्रात जायचे का शौचाला? चला आम्ही मुंबईकर ते जमवूही. झाल्यास सोबत कबूतरांनी नेत जाऊ. ते ही तिथेच करतील. त्यांचाही त्रास मिटला. पण बाकीच्यांचे काय?

कबुतर्ड्यांनी तिकडे हिमालयात शिटावे किंवा समुद्रात आम्हाला काही देणं घेणं नाही... त्यांनी घरी-दारी उच्छाद मांडु नये यासाठी त्यांची प्रजा वाढु न देण्यासाठी त्यांना इतरांनी दाणे टाकू नयेत हीच अपेक्षा.

त्यांची प्रजा वाढु न देण्यासाठी त्यांना इतरांनी दाणे टाकू नयेत हीच अपेक्षा.
>>>
हा मुद्दा योग्य आहे. अमरीश पुरीसारखे माळरानावर जावे आणि आओ आओ करत कबुतरांना दाणे टाकावेत. पण जर कोणी आपल्या दारात कबुतरांना दाणे घालत असेल आणि त्याचा त्रास शेजार्‍यांना होत असेल तर सोसायटीने तसा नियम बनवायला हवा. जसे आम्ही आमच्या नव्या सोसायटीत नियम बनवला आहे की ईथे कुत्रे-मांजरी पाळायचे नाहीत. अजूनपर्यंत तरी कोणी या नियमाविरुद्ध आवाज उठवला नाहीये. पण मग एकांनी ससे पाळले आहेत. त्यांना तुर्तास परवानगी दिली आहे. कारण सर्वच पोरांना ते आवडतात.

कबुतरांच्या धाग्यावर कुत्रे, कावळे, चिमण्या येऊन गेलेत. सशांनी पण हजेरी लावली. आता वाघ सिंह कधी येतात तेच बघत रहायचे.

कबुतर जिथे खातात तिथे हग्गा मारत नाहीत... तुम्हाला कबुतरांचा त्रास नको असेल तर त्यांना भरपूर खायला द्या.. ते शेजारी जाऊन शिटतील ....

aashu29 = आशुचॅम्प?>>>>
बरं ओके.

ॠ च्या बाष्कळ बडबडीला कंटाळणे हा एकमेव फॅक्टर असेल डुआय म्हणायला तर अर्धी माबो डुआय होईल Rofl

अमरीश पुरीसारखे माळरानावर जावे आणि आओ आओ करत कबुतरांना दाणे टाकावेत>>> सोबत मोबाईलवर ये मेरा इंडिया आय लव माय इंडिया गाणं लावायचं आणि दोन चार स्टेप करायच्या.

हे जे कबुतरांचे थवे आपण पाहतो त्या थव्या मध्ये दहा बारा कबूतरच खरे भारतीय असतात बाकीचे सगळे कबूतर हे इतर देशांचे असतात. रशिया, अमेरिका, चीन,युरोपियन देश ई. भारतीय संस्कृती ही एक महान संस्कृती आहे.आपल्या भारतीय माणसांचे वागणे,राहणीमान, जेवण याचा अभ्यास करण्यासाठी हे कबूतर आलेले असतात. त्यांच्या शरीरात एक छुपा कॅमेरा असतो. हे कबूतर पुन्हा त्यांच्या देशात जाऊन तिथल्या शास्त्रज्ञांना आपली माहिती पुरवतात.

.

आज सफाईचा पहिला टप्पा पार पाडला.
पहिल्यांदा सुका कचरा - पिसं , गवत ई ई गोळा केलं .
किचनची खिडकी , ओटा , बाथरूम सगळीकडे पाणी मारून घेतलं.
शेजारच्या फ्लॅटमध्ये सुतारकाम चालू होतं , कामगाराकडून एक सनमायकाचा तुकडा आणला. ओटा , खिडकीची फ्रेम तारेच्या स्क्रबरने आणि सनमायकाने घासून काढलं. पाणी मारून मारून साफ केलं ..
बाथरूम पण जितके साफ करता येईल ते केलयं.
आता उद्या घासून काढायचयं.
दुपारपासून त्या उग्र वासाने डोक दुखायला लागलं.
बराच काळ लागणार आहे सफाईला .

स्वस्ति, त्या कबुतरांच्या वकिलाला मदतीला बोलवुन घ्या. खरं तर चुकलंच, आजपण बोलवायला हवं होतं, म्हणजे कबुतरांचा काय त्रास असतो, या प्रश्नाचं परस्पर उत्तर मिळालं असतं.

हाईट्ट आहे स्वस्ति. तुमच्या स्वच्छतेच्या कामात देव तुम्हाला ताकद अन् सहनशक्ती देवो हीच सदिच्छा. एखादे कबुतरडे तावडीत सापडते का बघा अन् यथेच्छ फ्रीस्टेल धुवा त्याला.

@स्वस्ति
प्लीज, मास्क घालूनच काम करा.आम्हीही दर महीन्यात एकदा गॅलरी स्वच्छ करतो. मास्क घालूनच. आमच्याकडेही खूप कबुतरे येतात. पारवे नाही कबुतरे.

प्लीज, मास्क घालूनच काम करा
>>>>
मी मुलांना घेऊन बरेचदा किंबहुना दर आठवड्यात एकदा तरी सी शोअरला जातो तिथेही आसपास कबूतरे असतात. झुंडीने असतात. तिथे काढलेले फोटो जेव्हा फॅमिली ग्रूपवर शेअर करतो तेव्हा माझ्या बायकोच्या घरचे हाच सल्ला देतात की त्यांच्या फार जवळ नेऊ नकोस. आजारी पडतील पोरे. नक्की काय आजार पसरवतात ते कोणाला काही माहिती?

हो सामो , ग्लव्हज आणि मास्क शिवाय पर्याय नाही Sad . तो वासही भायानक डोक्यात चढतो .

काल दूसरा टप्पा पार पाडला --
सगळ्या खोल्यांमधली फरशी , बाथरूम , नळ , शावर , दरवाजे Sad .
कोरडीच घासून काढले सगळे , तो कचरा भरला आणि मग पाणी मारून सगळी फरशी मॉपने साफ केली .
उरलेले डाग , एक एक फरशी चेक करत , एक एक डाग घासून काढला .
बाथरूम पूर्ण हार्पिक टाकून साफ केलं. धूवून काढलं . नंतर फर्श्या परत पाणी मारून मॉपने साफ केल्या .
आता घर बर्यापैकी बर वाटतय .
आता सगळ्या फरशा , कीचनचा ओटा , सिन्क - साबण , फिनाईल , डेटॉलच्या पाण्याने पूसून काढायच्यात Sad . काल ३ - साडेतीन तासाच्या मेहनतीनंतर ताकद नव्हती .
अजून खिडकीच्या बाहेरची सफाई केलीच नाही . अगोदर जाळ्याबसवून घेउ मग बघू कायते .

ही सगळी रामकहाणी सांगायच कारणं - कबूतरांचा उपद्रव हसण्यावारी नेणार्या लोकांना थोडीशी कल्पना यावी की हे प्रकरण मानसिक आणि शारीरीकद्रुष्टया किती थकवणार आहे . एवढी सफाई करून वास जात नाहीये , अजूनही घरात उग्र वास येतोय . जमिनीवर काही ठिकाणी अजूनही हिरवे हिरवे डाग दिसतायेत . दोन दिवस , माझं डोकं दूखत होतं घरी येउन . कपडे पण डेटॉलमध्ये टाकले , आंघोळीलाही डेटॉल साबण किन्वा मेडिमिक्स वगैरे सुखावह वाटातेयत. झोपेतही कबूतर आणि ती घाण , आणि सफाई दिसते .
देव न करो कोणाला असा त्रास सहन करावा लागला तरी केवळ मॉरल सपोर्ट म्हणून डिटेल्स लिहिलेत Sad .

माणसे लावायची अश्या कामाला.
आमचे घर तयार होते. शिफ्ट होणार होतो दहा दिवसात. लॉकडाऊन लागला. चार महिने अडकलो. आधीच्या भाड्याच्या घरात २५ हजार प्रमाणे लाखभर घरभाडे गेले या चार महिन्यात. पण वाईट या गोष्टीचे वाटत होते की नवीन हक्काचे घर तयार असून तसेच पडून होते. लाईटींगचे थोडेफार क्षुल्लक कामे बाकी होती. लॉकडाऊनच्या आधी वास्तुशांती झालेली तेव्हा घर धुवून घेतलेले. पण या चार महिन्यात बिल्डींगमध्ये ईतरांची कामे सुरू असल्याने पुन्हा धूलमिट्टी जमा झालीच. ते साफ करणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे हे समजले. म्हणून मग तिथला कामे करणारा कॉन्ट्रेक्टर पकडून त्याचीच माणसे लाऊन घर साफ करून घेतले. त्यांच्यात असली कामे करायची ताकतही असते आणि काय कसे साफ करायची आयड्याही असते. घर उजळवून काढतात.. खिडक्यांच्या ग्रिलच्या चौकटीत अडकलेला बारीक न बारीक कण उकरून काढतात..

>>>>>>>आजारी पडतील पोरे. नक्की काय आजार पसरवतात ते कोणाला काही माहिती?
श्वसनाचे विकार होतात असे ऐकिवात आहे. खखोदेजा. पण हा तर कॉमन सेन्स आहेच की एखाद्या जीवाच्या विष्ठेत काम करायचं तर मास्क हवा.

विष्ठेत असे नाही. ईन जनरल त्यांच्या सहवासाने काही विकार होतात का?
दादर कबुतरखान्या शेजारी राहणाऱ्या लोकांचे काही अनुभव वगैरे.. मागे वाचलेले काहीतरी. आता आठवत नाहीये.

वीरमाता जीजाबाई भोसले उद्याना शेजारी रहाणार्‍यांना उद्यानाचे नाव लक्षात न रहाण्याचा रोग होतो तसं दादर कबुतर्डेखान्यापाशी रहाणार्‍यांना काही त्रास होत असेल तर माहिती नाही.

माणसे लावायची अश्या कामाला. >>>>> मुद्दामच नाही लावली . एक तर कोणाला बोलावायच हा प्रश्न होताच . कॉन्ट्रक्टरची वगैरे माणसं माहीत नव्हती .
माझ्या आईकडे कचरा-लादी करायला विश्वासू बाई आहे . तिला बोलवायचा विचार होता .
पण घराची अवस्था बघून , ज्या घाणीत आम्हालाच काम करायच्या कल्पनेनेच शिसारी येत होती , त्यासाठी जास्त पैसे देउनही बाईला बोलावणं मला योग्य वाटलं नाही . घर आमचं होतं , दूर्दैव आमच की खिडक्या उघड्या होत्या , निस्तरावं आम्हीच असं माझ मत पडलं .
कदाचीत आता शेवटची फरशी पूसून घ्यायला , ओटा धूवावयला तिला बोलवेन .

धूळ-मातीची सफाई किचकट असली तरी करायला काही वाटत नाही . आताही , काल घर साफ करून आलोय . शेजारच्या फ्लॅटमध्ये काम चालू आहे , सिमेंट , धूळ , माती होणारच आहे परत . ती करू . पण परत कबूतरानी काही केल तर ते साफ करायची ताकद नाही - शारीरीक नाहीच , मानसिक तर नाहीच नाही.

खिडक्या उघड्या म्हणजे - दोन्ही बाथरूम आणि किचनमध्ये एग्झॉस्ट लावायला जागा असते ती मोकळी होती .
किचनला दरवाजा नाही . एका बाथरूमचा दरवाजा उघडा होता त्यामुळे कबूतरांना पूर्ण घर मोकळं मिळालं .

>>>>>ज्या घाणीत आम्हालाच काम करायच्या कल्पनेनेच शिसारी येत होती , त्यासाठी जास्त पैसे देउनही बाईला बोलावणं मला योग्य वाटलं नाही .
Happy __/\__

स्वस्ति, अर्बन कंपनीवाले मशीन लावून स्वच्छता करतात. ते लोक मास्क आणि ग्लोव्हज्ही वापरतात.
बंद असलेल्या घरांसाठी म्हणून त्यांचं एक पॅकेज आहे.

Pages