Submitted by DJ. on 13 December, 2018 - 09:45
लहाणपणी सर्वत्र चिमण्यांची चिव-चिव आणि कावळ्यांची काव-काव ऐकु यायची. कधितरी पोपट साद घालायचे. मैनाताई पण थुईथुई बागडताना दिसायच्या. पण या मराठमोळ्या पक्षांनी चिवचिवाट केला अथवा कावकाव केलं म्हणुन कधिही मस्तक उठले नाही.
हल्ली मात्र चिमण्या-कावळे-पोपट लांबुनच दर्शन देउन पसार होतात आणि अत्यंत घाणेरडी अशी परप्रांतीय कबुतरे कितीही हाकलली तरी त्रास द्यायला पुन्हा हजर होत आहेत. सोबत त्यांचे शेकडो सगे-सोयरे आणुन साफ-सफाईचे अगदी ३-१३ वाजवलेत.
गेल्या २-३ महिन्यांपासुन बिल्डिंगची डक्ट, बाल्कनी आणि खिडक्यांच्या ग्रिल्सवर कबुतरांनी उच्छाद मांडला आहे.
त्यांची पिसे, विष्ठा आणि सततची गुटर्रर्रर्र-गु यांमुळे अगदी हैराण झालो आहे.
कबुतरे कायमची हुसकावुन लावण्यासाठी, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांच्या त्रासातुन सुटका होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील..?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कबूतरांनी केलेली घाण कशी साफ
कबूतरांनी केलेली घाण कशी साफ करता???
नवीन घरात , दोन्ही बाथरूम आणि कीचन , तिन्ही खिडक्याची exhaust fan ची खिडकी उघडी होती . कबूतरं शिरली घरात. कीचनचा ओटा , खिडकी , दोन्ही बाथरूम , सगळ्या खोल्यांमधली जमिन , सगळं अगदी वाईट पद्धतीने घाण करून ठेवलयं.
सगळीकडे पाणी मारून , scrubber नाहीतर खराट्याने घासून काढेन आणि मग साबण्याच्या पाण्याने धुवून काढेन. आणि काही tried n tested tricks आहेत का ???
हे सगळे करताना मास्क लावा!!
हे सगळे करताना मास्क लावा!!
कबुतर ना अन्न दिले की पुण्य
कबुतर ना अन्न दिले की पुण्य मिळते अशी मानणाऱ्या ज्या जमाती आहेत त्यांच्या वर कांबुतर ची घाण सफाई म्हणून साकार नी जबरदस्त टॅक्स लावावा.
आणि तो सफाई साठी खर्च करावा.
ह्यांना पुण्य मिळणार आणि बाकी लोकांस त्रास.
>>>>>>>>>हे सगळे करताना मास्क
>>>>>>>>>हे सगळे करताना मास्क लावा!!
+१०१
खऱ्या सारखा दिसणारा एक
खऱ्या सारखा दिसणारा एक गुटगुटीत कुत्र्याचं soft toy आणली. Its eye looked so real.
दिसेल अशा पद्धतीने ठेवला आणि रोज त्याची जागा बदलत राहिली.
कबूतरे कमी झाले.
माझ्या दोन-तीन मैत्रिणींना हा उपाय कामी आला.
नाहीतर आहेच dimond shaped net , spikes.
Bird net बसवताना दोन खिळयांधील अंतर एक फुटापेक्षा कमी असावे.
हे छान आहे
हे छान आहे
स्वस्ति, कबुतर्ड्यांनी
स्वस्ति, कबुतर्ड्यांनी तुमच्या घरात घाण केली हे वाचुन भयंकर वाईट वाटलं अन संतापही आला.
खुपदा आर्जवे केल्यावर आमच्या सोसायटीने हजारो रुपये खर्चून ओपन डक्ट्स लोखंडी जाळीने बंद केल्या तेव्हा कुठे ही कबुतर्डी ड्राय बाल्कनीत शिटायची थांबली. तरीही खिडक्यांतून एखादे कबुतर्डे वर्षाकाठी घरात शिरते तेव्हा मात्र मी जीव खाऊन त्याला बदड बदड बदडुन अर्धमेलं करून बाहेर हुसकावतो. त्यांची अंडी आठव्या मजल्यावरून भिरकावून देण्यात पण मी आजिबात वाईट वाटून घेत नाही.
आत्ता लॉकडाऊन मधे बरेच महिने फ्लॅट बंद असतो. पहिल्यांदा सलग ३ महिने फ्लॅट बंद होता तर ह्या कबुतर्ड्यांनी किचन अन दोन बेडरुमच्या मोठाल्या खिडक्यांच्या पारदर्शक काचा पुर्ण शिटून सफेद केल्या होत्या. मी एकटाच घर शाबुत आहे का ते बघायला आलेलो असल्याने मला एकट्याला त्या तीन खिडक्या पत्र्याच्या छोट्या तुकड्याने खरवडून साफ कराव्या लागल्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवेपर्यंत मध्यरात्र झालेली अजुनही आठवतेय. त्यानंतर मी गावी जाताना तीनही खिडक्यांच्या ग्रीलला जुन्या साड्या/बेडशीटे बांधुन जातो जेणे करून पुढील त्रास वाचेल.. अन तो वाचतोही. फक्त त्यात साड्यांचा बळी जातो इतकेच.
माणसांनी पक्ष्यांच्या
माणसांनी पक्ष्यांच्या अधिवासावर आक्रमण केलेय आणि आता त्याची फळे भोगताहेत असे कधीकधी वाटते.
काही पक्षी मुकाटपणे उडून भुर्र गेले, काही चिवट आहेत ते पिच्छा सोडत नाहीयेत.
यावर एकच उपाय, कोंबड्या खातो तसे कबूतरे खायला सुरुवात करा. जेव्हा त्यांना समजेल की माणसे आपल्याला खाऊ लागलेत तेव्हा ते भयभीत होऊन पळ काढतील.
किंवा कदाचित बदलाही घेतील.... कोणी सांगावे
माणसांनी पक्ष्यांच्या
माणसांनी पक्ष्यांच्या अधिवासावर आक्रमण केलेय आणि आता त्याची फळे भोगताहेत असे कधीकधी वाटते. >>>> काहीही.
माणसांचा मूर्खपणा वाढला आहे. लॉजिक न वापरता पोतीच्या पोती धान्य पक्षांसाठी ओतुन ठेवतात. कबुतरांना बेसुमार खायला घालताहेत, म्हणुन संख्या वाढली आहे. दाणे शोधायचे कष्ट नाहीत, सकाळी- संध्याकाळी पोती भरभरून आयते दाणे मिळतात ते खायचे, दिवसभर गुटरगु करत सेक्स / मेटिंग करायचे आणि निर्लज्जपणे लोकांच्या बाल्कनी, टेरेस, अडगळ, कुंड्यामध्ये अंडी घालुन प्रजा वाढवायची. बरं भारतीय लोक, दगड, धोंडे, प्राणी, पक्षी, झाडं, पानं सगळ्याची पुजा करणार. सतत डोक्यात पाप पुण्य हिशोब चालुच, त्यामुळे अंडी नष्ट करणार नाहीत. मग स्ट्रे डॉग्ज काय आणि कबुतरं काय, कितीही नुईसन्स झाला तरी संख्या भरमसाठ वाढतेच आहे. काही लोकांच्या पुण्य कमावण्याच्या मूर्ख विश्वासापायी बाकी कित्येक लोकांना त्रास झाला तरी हरकत नाही. मला मोबाईलवरून फोटो अपलोड करता येत नाही, नाही तर तारीखवार फोटो दाखवले असते की एक इडियट रोज कमीत कमी 25kg चं पोतं बिल्डिंग समोरच्या ग्राऊंडवर ओतुन जातो.
डॉग्जना खायला घालणाऱ्या
डॉग्जना खायला घालणाऱ्या लोकांबद्दल आक्षेप नाही, पण त्यांना न्यूटर करत नाहीत याबद्दल आक्षेप आहे.
पक्षांना तर विशिष्ट परिस्थिती (दुष्काळ, इतर नैसर्गिक आपत्ती) निर्माण झाल्याशिवाय आयतं खायला घालणं, ही निसर्गचक्रात केलेली ढवळाढवळ आहे. उडु दे पक्षांना, शोधु दे दाणे, पाणी पिण्यासाठी सोय करा, फार तर छोटुशा बर्ड फीडर्स मध्ये दाणे ठेवा, म्हणजे गरजेपुरते खायला मिळालं तर संख्या निसर्गत: कंट्रोल होईल. पोती भरून दाणे मिळाले तर निसर्गाच्या नियमानुसार भरमसाठ संख्या वाढणारच.
पर्यावरणप्रेमी आणि सुडो
पर्यावरणप्रेमी आणि सुडो पर्यावरणप्रेमी अजून कसे आले नाहीत इथे या धाग्यावर...
कबुतरे म्हणजे पंख असलेले
कबुतरे म्हणजे पंख असलेले उंदीर/ घुशी !
> नाही तर तारीखवार फोटो दाखवले असते की एक इडियट रोज कमीत कमी 25kg चं पोतं बिल्डिंग समोरच्या ग्राऊंडवर ओतुन जातो
महापालिकेकडे वा पोलिसात तक्रार केली तर ?
तर...? अहो, ते भगवे कपडे
तर...? अहो, ते भगवे कपडे घातलेले मोर्चा घेऊन येतील घरावर.... अँटी भगवा धर्मीय ठरवून मोर्निंग वॉकला जाताना गोळ्या घालून ठार करतील. हे प्राणी-पक्षीप्रेमी माणूसघाणे प्रकारात मोडतात. एकवेळ माणसांचा जीव गेला तरी चालेल परंतू प्राणी-पक्षी जगायला हवेत अशा कोत्या मनोवृत्तीचे असतात. अन त्यांना फूस म्हणुन भगव्यांची साथ असते.. खरं म्हणजे दररोज अशाप्रकारे पोती भ-भरून धान्य ओतणारे हे एकप्रकारे गरिबांचे पैसे (अन त्या अनुषंगाने रक्तही..!!) शोषणार्या एका अल्पसंख्यांक समाजाचीच भगव्यांशी हातमिळवणी झालेली असते. भरडला जातो तो मात्र सर्वसामान्य भारतीय नागरिक.
कबुतरासारख्या एका generalist
कबुतरासारख्या एका generalist species ला अनैसर्गिक पद्धतीने अन्न खायला घालून वाढवणे यात कोणतेही पर्यावरणप्रेम नाही. उलट पर्यावरणाची हानीच आहे.
दिवाळीतील केपांची बंदुक वाजवत
दिवाळीतील केपांची बंदुक वाजवत राहिलं की कबुत्र घाबरुन पळापळ करतात. लहानपणी हा शोध लागल्यावर आमची बाल्कनी कबुत्रांची घाण मुक्त झालेली.
ज्यांना उच्छादावर काही मार्ग
ज्यांना उच्छादावर काही मार्ग सापडत नाही त्यांनी शेवटी समाधानासाठी हे पुस्तक वाचा

महापालिकेकडे वा पोलिसात
महापालिकेकडे वा पोलिसात तक्रार केली तर ?>>>> त्यासाठी तर फोटो जमवुन ठेवले आहेत. तक्रारीचा काही उपयोग होणार का माहित नाही, पण प्रयत्न करून पहाणार आहे.
जगात पक्षांच्या अनेक जाती
जगात पक्षांच्या अनेक जाती आहेत.पण कबुतर हा पक्षी सोडला तर बाकी कोणताच पक्षी.
निर्लज्ज, आयत खावू,नाही.
लोकांच्या घरात मुक्काम ला बाकी कोणताच पक्षी येत नाही.
ही कबुतर च लोचट असतात.
जगात पक्षांच्या अनेक जाती
जगात पक्षांच्या अनेक जाती आहेत.पण कबुतर हा पक्षी सोडला तर बाकी कोणताच पक्षी.
निर्लज्ज, आयत खावू,नाही.
>>>>
आणि माणूस
सर्व फसादची जड माणूस आहे. माणूस जे स्वतःच्या मौजमजेसाठी करतो ते सारेच अनैसर्गिक आहे. आणि वर आपणच उल्ट्या बोंबा मारायचे की कबूतरे ही अशी आहेत नि तशी आहेत... बहुधा माणसाला कॉम्पिटीशन नकोय
कबूतरांची वाढलेली संख्या दिसतेय.. माणसांच्या वाढत्या संख्येबद्दल काय..
कबूतरांचा माणसाला त्रास आहे का.. बरे
निसर्गाला वा ईतर प्राण्यांनाही काही त्रास आहे का कबूतरांचा?
तसेच माणसे जे निसर्गाला वा ईतर प्राण्यांना त्रास देतात ते मोजले तर कोणाचे पारडे जड जाईल..
माणूस केवळ कबूतरांनाच दाणे टाकत नाही तर कावळ्यांनाही आपले पुर्वज म्हणून खाऊ घालतो, कुत्रे, मांजरी, ससे, पोपट जे मनाला येईल ते प्राणीपक्षी पाळतो.. या पाळीव प्राण्यांचा ईतर कोणाला त्रास होत नाही असे वाटत असेल तर तो त्या पशूमालकांचा भ्रम आहे.
एकेक धागा या सर्व प्राण्यांच्या त्रासवरही काढा.. किंवा सर्वसमावेशक धागा काढा.. असे एकाच पक्ष्याला टारगेट करण्यात काय अर्थ आहे?
एकेक धागा या सर्व
एकेक धागा या सर्व प्राण्यांच्या त्रासवरही काढा.. किंवा सर्वसमावेशक धागा काढा.. असे एकाच पक्ष्याला टारगेट करण्यात काय अर्थ आहे?
Submitted by ऋन्मेऽऽष on 1 December, 2021 - 00:05
तू चक्क दुसऱ्यांना सांगतो आहेस धागे काढायला??? तुझ्याच हस्ते होऊ देत !!!
कबुतरासारख्या एका generalist
कबुतरासारख्या एका generalist species ला अनैसर्गिक पद्धतीने अन्न खायला घालून वाढवणे यात कोणतेही पर्यावरणप्रेम नाही
बाकीचे पक्षी येऊन का खात नाहीत ?
बाकीचे पक्षी गरीब परंतू
बाकीचे पक्षी गरीब परंतू स्वाभिमानी मराठी माणसाप्रमाणे वागतात.. ही कबुतर्डी जमात मात्र यु.पी. - बिहार्यांसारखी लोचट अन जागा मिळेल तिथं राहुन घाण करणारी असतात.
ऋन्मेष, मला दिवसेंदिवस अजुन
ऋन्मेष, मला दिवसेंदिवस माबोची 'राखी सावंत' वाटत चालला आहे. वरची पोस्ट म्हणजे धडधडीत पुरावा. प्रसिद्धीसाठी काहीही. मग ते illogical, मंद मत असेल तरी चालेल.
कबुतरांचा कोणाला त्रास आहे का????????
हा लेख, त्याचं टायटल आणि इतके सारे प्रतिसाद वाचले नाहीत का?
एकदा रस्त्यातच धान्य फेकले
एकदा रस्त्यातच धान्य फेकले म्हणजे ते खाणारे सगळे पक्षी स्वाभिमाणिच ना ?
की माणसाने टाकलेले , आपोआप पडलेले असे काही त्यात क्लासिफिकेशन असते ?
जाळ्या लावून,अनेक अडथळे
जाळ्या लावून,अनेक अडथळे निर्माण केले तरी कबुतर घरात येवून घाण करणारच.
बाकी पक्षी दोन मिनिट येतील पाणी असेल तर पितील काही खातील आणि उडून जातील.
पण कबुतर तिथेच मुक्काम ठोकत हा अनुभव आहे.
हकाले तरी जाणार नाहीत परत तिथेच.
आमच्या घरात येणाऱ्या पाली
आमच्या घरात येणाऱ्या पाली घुशी झुरळे ऊंदीर मच्छर गेला बाजार ढेकणे ही काही पाणी पिऊन परत जात नाहीत तर आमचे रक्त पिऊनही तिथेच पडून राहतात. त्यामुळे या मुद्द्यावर अमुकतमुक प्राणी स्वाभिमानी वगैरे बोलणे गंडलेले लॉजिक आहे.
आता काही पक्षी झाडांवर राहतात ती झाडे काही त्यांनी लावली नसतात. माणसांनीही लावलेली असू शकतात. मग यावरून त्यांचा स्वाभिमान काढायचा का?
माणसांनी पोसायचे सोडले तर जणू जगातून कबूतर जात नष्टच होणार आहे. काय तो मानवी अहंकार
तळमजल्याच्या घरांना कबुतरांचा
तळमजल्याच्या घरांना कबुतरांचा त्रास कमी असावा.
@ मीरा
@ मीरा
प्रसिद्धीसाठी काहीही. मग ते illogical, मंद मत असेल तरी चालेल.
>>>>
मला ईथली कैक मते बिनलॉजिकल वाटत आहेत. मी ती खोडतोय. तुम्ही माझी खोडा.
मी कबूतरांचे वकीलपत्र घेतलेय समजा
https://www.google.com/url?sa
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.esakal....
तळमजल्याच्या घरांना कबुतरांचा
तळमजल्याच्या घरांना कबुतरांचा त्रास कमी असावा.
>>>>
मला नाही वाटत. मी आता लंचटाईमला आता खाली वॉकला आलो आहे. पण मस्त पाऊस सुरू झाला आहे. माझ्याकडे छत्री नाही. तर पार्किंगच्या आडोश्याला थांबलो आहे. भिजायला आवडले असते पण पुन्हा वर जाऊन एसीत बसायचे आहे. असो. पण काही कबुतरेही नुकतेच त्यांच्याकडेही छत्री नसल्याने फडफडत ईथे आली आणि वरच्या पाईपांवर आणि खाचीखोचीत बसली आहेत. त्यामुळे तळमजल्याचे लोकं कबुतरांचे नावडते असतात असे काही नसावे.
Pages