कबुतरांच्या उच्छादाला आवर कसा घालावा..?

Submitted by DJ. on 13 December, 2018 - 09:45

लहाणपणी सर्वत्र चिमण्यांची चिव-चिव आणि कावळ्यांची काव-काव ऐकु यायची. कधितरी पोपट साद घालायचे. मैनाताई पण थुईथुई बागडताना दिसायच्या. पण या मराठमोळ्या पक्षांनी चिवचिवाट केला अथवा कावकाव केलं म्हणुन कधिही मस्तक उठले नाही.

हल्ली मात्र चिमण्या-कावळे-पोपट लांबुनच दर्शन देउन पसार होतात आणि अत्यंत घाणेरडी अशी परप्रांतीय कबुतरे कितीही हाकलली तरी त्रास द्यायला पुन्हा हजर होत आहेत. सोबत त्यांचे शेकडो सगे-सोयरे आणुन साफ-सफाईचे अगदी ३-१३ वाजवलेत.

गेल्या २-३ महिन्यांपासुन बिल्डिंगची डक्ट, बाल्कनी आणि खिडक्यांच्या ग्रिल्सवर कबुतरांनी उच्छाद मांडला आहे.
त्यांची पिसे, विष्ठा आणि सततची गुटर्रर्रर्र-गु यांमुळे अगदी हैराण झालो आहे.

कबुतरे कायमची हुसकावुन लावण्यासाठी, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांच्या त्रासातुन सुटका होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील..?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बिल्डिंगची डक्ट, बाल्कनी आणि खिडक्यांच्या ग्रिल्सवर कबुतरांनी उच्छाद मांडला आहे.>>>>> काही नाही आपण पिंजर्‍यात रहावे लागते.पिजन नेट खिडकीला लावून घ्या.बिल्डिंगच्या डक्ट, सोसायटीने लोखंडी जाळ्या बसवायला हव्यात.सर्वानुमते ते करून घेतल्यावर बरीच घाण कमी होते.

अशी परप्रांतीय कबुतरे>>>> हे काय नवीन?

अशी परप्रांतीय कबुतरे>>>> हे काय नवीन? << अहो लहानपणी ही घाणेरडी जमात कधीही पाहिली नव्हती.. २००० सालानंतर अचानक ते दिसु लागले आणि आता चांगलेच फोफावलेत.

पिजन नेट लावलं तर मोकळं आकाश दिसणार नाही आणि सोसायटीच्या मिटिंग मधे हा प्रस्ताव मांडुन तो सर्वसंमत होण्यासाठी बराच वेळ जाईल तेव्हा ही कबुतरे पिटाळुन लावण्यासाठी अगदी जहाल उपाय योजण्याचीही मानसीक तयारी झाली आहे. तर तसे काही करता येईल का..?

सपाट पृष्ठभाग असेल, जसे की पॅरापेट वगैरे तर तिकडे ठेवायला प्लास्टिक चे स्पाइक्स मिळतात, (तारेचा ब्रश उलटा ठेवला तर कसे दिसतील त्याची मोठी, प्लास्टिक आवृत्ती)
याच्यावर कबुतरे बसत नाहीत, मात्र ती जागा ओक्युपाईड राहते

डक्त , मोकळी जागा या साठी बर्ड नेट मिळते ती लावा, पण ते प्रकरण बर्या पैकी महाग पडते, नेट नूसती आणून, तुमची तुम्ही लावीत तर खूप स्वस्त पडेल

घराच्या AC खाली, वर कबुतर घरटी करत असेल तर फोडलेल्या अंड्याचे कवच तिकडे ठेवा, कबुतर येणे थांबते, हा स्वानुभव

@ सिम्बा : >>घराच्या AC खाली, वर कबुतर घरटी करत असेल तर फोडलेल्या अंड्याचे कवच तिकडे ठेवा, कबुतर येणे थांबते, हा स्वानुभव << हे मस्त आहे.. Light 1 आज मार्गशिर्ष गुरुवार असल्याने उद्या सकाळीच २-४ अंडी फोडुन त्याची टरकले ठेवतो.. Proud Proud Proud

@ च्रप्स : अहो वैताग आलाय हो अगदी.. काय करु.. वैताग आल्याशिवाय असं कोणी अचानक उठुन मनसैनिक होत नसतं Uhoh

२००० सालानंतर अचानक ते दिसु लागले आणि आता चांगलेच फोफावलेत.>>>>>> ओ त्याही अगोदरपासून कबुतरे आहेत.त्यांना खायला घालणारे आसपास असतील तर अजूनही वाढतात.
मलाही नेट नको होतं.काळी बाहुली(हलली तर उडतील म्हणून),सीडी, प्लॅस्टीक बॅग टांगून झाल्या.शेवटी कंटाळून नेट लावले.आता बरं वाटते,फक्त पिंजर्‍यात असल्याची भावना सोडून.

कबुतरे कायमची हुसकावुन लावण्यासाठी>>> घोर अपमान करा त्यांचा किंवा जालीम पाणउतारा Light 1

हल्ली प्रदुषणामुळे कबु च प्रमाण वाढलय शहरांमध्ये असं वाचल होत पेपरात..
आमच्या जुन्या किरायाच्या घरी पण हा त्रास व्ह्यायचा, मग आम्ही घर बदललं (इतर अनेक कारणांमुळे)
चांगला धागा.. मामाच्या घरी इथले वाचलेले उपाय सांगते .. त्यान्च्याकडॅ तुमच्यासारखी सेम परिस्थिती आहे

अगदी अगदी!!

सर्व इतर पक्षी शहरातून नामशेष झाले जसे केवळ सगळीकडे कबुतरे म्हणण्यापेक्षा पारवे वाढले आहेत.. ह्यांना लोक चक्क ज्वारी देतात खायला विशेषतः डुलवाले दुकानदार..
इथे हैदराबादेत काही ठिकाणी ज्वारीच्या पिशव्या किलो अर्धाकिलो च्या विकायला ठेवतात. लोक येऊन त्या विकत घेऊन ह्या पाराव्यांच्या झुंडीला खाऊ घालतात. हे निम्याच्यावर रस्ता अडवून ज्वारी टिपत असतात.

आणि वर वापरलेला परप्रांतीय शब्द बरोबर आहे कारण कबुतर नाही त्यांना ज्वारी खाऊ घालणारे बहुतांशी युपी, बिहार, राजस्थान, हरियाणातील इत्यादी भागातील आहेत..

दिवाळीतल्या बंदुकीच्या केपा वाजवल्या की ही कबुतरे घाबरून उडतात. लहान पोरांना असल्या केपा आणून द्या आणि मजा बघत बसा.

जहाल उपाय??
आरे मारून टाकायचे आहे का त्या मुक्या प्राण्यांना??
तसा काही विचार असल्यास जपून...
सारेच सलमान नसतात..
तो भाई होता.. सुटला.
तुम्ही मात्र लटकाल

पण येस्स ! कब्बू बिर्याणी करून खाणार असाल तर मात्र मलाही बोलवा Happy

खरे तर हा बेस्ट उपाय आहे !
एखद्या रविवारी कोंबड्या कुत्र्यांना ब्रेक द्या. आणि त्या ऐवजी सर्व चाळकरी मिळून बाहेर पॅसेजमध्येच कबूतर मारून खा.
एकदा का दोन तीन रविवार असे नित्यनियमाने केलेत तर बिशाद नाही पुन्हा तिथे कोणते कबूतर फिरकायची.

पण यात एक धोका आहे.
कदाचित तुम्हालाच कबूतर खायची चटक मटक लागेल.
मग आज तुम्ही जे कबूतर्र जा जा जा गाणे गात आहात ते उद्या ए नादान परींदे घर आ जा गाऊ लागाल.

पण उपाय मात्र हमखास आहे. आमचा पावसाळ्यात घोंघावणारया माश्यांवर वापरून झालाय.

तुमच्या बॅल्कनीपुरतं बोलायचं तर १) ग्रील लावायचे त्याचे चौकोन ३बाइ३ नको. २बाइ३, दोन बाइ तीन/चार असले की कबुतर येऊ शकत नाही.
२)लीव लायसनवर असल्यास मासे पकडायचं जाळं आठ फुट( अडिच मिटर) पन्नाचे मिळते चार फुट आणून दोन तुकडे करून जोडल्यास बॅलकनीला लावायचे.

बाल्कनीच्या कठड्यावर मिरचीपावडर टाकून ठेवा. २/३ दिवसात कबूतरं येण्याचं बंद होईल.

मी पण कबुतरांचा जुना धागा शोधायच्या विचारात होतो. आमच्या कडे पण नुस्ता उच्छाद मांडला आहे.
आधी फक्त टेरेस वर बसत, पण मागच्या आठवड्यात तर एक मी दुपारी सुखाची वामकुक्षी घेत असताना माझ्या पाठीवर येऊन बसलं.

टेरेस तर घाण करतातच पण एक दोन वेळा तर हॉल मधे येउन प्रसाद ठेउन गेले आहेत.

मला आता काही तरी करायला लागणार आहेच.

तुमच्या टेरेस ला जर जाळी बसवता येत असेल तर बसवून घ्या. मला तो पण पर्याय करता येणार नाही.

चैत्रगंधा यांनी दिलेला उपाय करुन पहायचा प्रयत्न करतो.

कबुतरे पळुन जात नाहीत, तोपर्यंत स्वतःला सर्दी , अ‍ॅलर्जी पासुन वाचवा. भयानक त्रास असतो तो.

@ सिम्बा : आज सकाळी फोडुन ठेवलेत.. बघु काय फायदा होतो का ते.
@ व्यत्यय : ते गुजराती बंधु-भगिनी गोडिने सांगुनही कबुतरांना दाणे टाकर रहतात..
@ ऋन्मेऽऽष : तुम्ही सांगितलेला जहाल उपाय योजला तर कबुतरांऐवजी मलाच घर सोडावे लागण्याची शक्यता आहे.
@ Srd : तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वस्तातील जाळी मिळते का पहातो.. मस्त उपाय आहे.. मिळाली तर १०००-२००० रुपयांची जाळी आणुन आख्खी सोसायटी झाकुन टाकतो.
@ चैत्रगंधा : काय जालीम उपाय सांगितलात हो.. आजच मिरची पावडर टाकुन बघतो.. उद्या विकांत आहे तर काळापट-हिरव्या मिरच्या आणुन गिर्रर्रर्रर्र वाटुन कबुतरे बसतात तिथे वाटणाचा पो टाकुन बघतो..

ईथे छान उपाय सांगितले आहेत.. माझ्याप्रमाणेच कबुतरंमुळे त्रासलेल्या इतरही माबोकरांना दिलासा मिळेल.

प्रतिसाद डबल झाल्याने काढून टाकला आहे

पाइप वरून खाली येतात त्यास टॅाइलेट बाथरुमचे आडवे जोडलेले असतात तिथे बसतात कबुतरं. पाइपवर सिमेंट टाकून उतार केला की बसता येणार नाही कबुतरांना.
बाल्कनीसाठी चाळीस रुपयांचे जाळं लागतं. माझ्याकडे चार वर्षं आहे, उन्हाने, अल्ट्रावाइलेटने तुटली नाही. बाहेरच्या व्हुमध्ये बाधा येत नाही इतकी बारीक आहे.

बाल्कनीच्या कठड्यावर मिरचीपावडर टाकून ठेवा. >> असं तिखट टाकून ठेवल तर वार्‍याने ते उडणार नाही का? आणि वार्‍याने आपल्याच घरात आलं, कोणाच्या, खास करुन लहान मुलांच्या डोळ्यात गेल तर? Uhoh

लहान मुलांच्या डोळ्यात गेल तर? >> मोठ्यांनी कॉमन सेन्स वापरायचा. टेरेसचे दार बंद ठेवावे किंवा मग वार्‍याची दिशा , ताशी वेग, टेरेस आणि दारातील अंतर इ.इ. बघून मग पावडर टाकावी. Light 1

मोठ्यांनी कॉमन सेन्स वापरायचा. टेरेसचे दार बंद ठेवावे किंवा मग वार्‍याची दिशा , ताशी वेग, टेरेस आणि दारातील अंतर इ.इ. बघून मग पावडर टाकावी. Light 1 >>> माझा कॉमन सेन्स मला हेच सांगतो की, अशा पध्दतीने तिखट टाकणे योग्य नाहीच. कारण वार्‍याची दिशा, वेग आपल्या हातात नाही. असो.

Pages