कबुतरांच्या उच्छादाला आवर कसा घालावा..?

Submitted by DJ. on 13 December, 2018 - 09:45

लहाणपणी सर्वत्र चिमण्यांची चिव-चिव आणि कावळ्यांची काव-काव ऐकु यायची. कधितरी पोपट साद घालायचे. मैनाताई पण थुईथुई बागडताना दिसायच्या. पण या मराठमोळ्या पक्षांनी चिवचिवाट केला अथवा कावकाव केलं म्हणुन कधिही मस्तक उठले नाही.

हल्ली मात्र चिमण्या-कावळे-पोपट लांबुनच दर्शन देउन पसार होतात आणि अत्यंत घाणेरडी अशी परप्रांतीय कबुतरे कितीही हाकलली तरी त्रास द्यायला पुन्हा हजर होत आहेत. सोबत त्यांचे शेकडो सगे-सोयरे आणुन साफ-सफाईचे अगदी ३-१३ वाजवलेत.

गेल्या २-३ महिन्यांपासुन बिल्डिंगची डक्ट, बाल्कनी आणि खिडक्यांच्या ग्रिल्सवर कबुतरांनी उच्छाद मांडला आहे.
त्यांची पिसे, विष्ठा आणि सततची गुटर्रर्रर्र-गु यांमुळे अगदी हैराण झालो आहे.

कबुतरे कायमची हुसकावुन लावण्यासाठी, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांच्या त्रासातुन सुटका होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील..?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सीडीचा काही उपयोग होत नाही. माझं झालंय ट्राय करुन.
मी फिशनेट लावलं निळ्या रंगाचं असतं ते. त्याने बर्डनेटइतका व्ह्यू अडत नाही. हे खराब झालं की तंगूस म्हणून अजून एक बारीक, क्रीम कलरचे नेट असते ते लावणार.

हो सीडींचा उपयोग मलाही फारसा नाही झाला. सुरुवातीला काही दिवस झाला असेल कदाचित. आठवत नाही. शेवटी नेट लावून घेतलं.

माझ्याकडे वर्ष तरी झालं असेल सीडी लावून. कबुतरं घरात आलेली नाहीत.
आमची खिडकी आहे. सहा फूट रुंद. ग्रिल्स नाहीत.

मी aluminium foil लावली होती grill ना..का ही ही उपयोग झाला नाही..त्यावर बसून घाण करतात .वैताग आहे नुसता..
डांबर गोळ्या पूड करून बघते..

आमच्या एका ओळखीच्या मिरची पेस्ट करून टाकली होती कट्ट्यावर. दोन चार कबुतर्ड्यांना आगडोंब झाला तेवढाच काय तो उपयोग तिचा.

एकंदर कबुतर हा मुतखड्यागत वाटत आहे.

कुणाला झाडपाल्याचा उपयोग होईल , कुणाला दुर्बीण सर्जरी

करोनासारखे कबुत्राचेही सतत वेगळेवेगळे वेरीयंट येत असावेत

1) जाळी लावली तर कबुतर गच्चीत येणार नाहीत .त्यांना आत मध्ये येण्यास मज्जाव होईल.
२) पण ती पण महा shahni असतात.
वर त्यांना बसायला जागा असेल तर तिथे बसून तुमच्याच गच्चीत संडास करतील.

DJ Lol

मी तर वर्षाकाठी घरात घुसलेल्या एकतरी कबुतर्ड्याला यथेच्छ झोडपतो.. आजिबात हयगय करत नाही. तुम्ही सर्वांनी देखील अजिबात दयामाया न दाखवता तावडीत सापडलेल्या कबुतर्ड्यांना यथेच्छ झोडपा. सगळीकडे असा प्रसाद मिळाला तर महाराष्ट्रातील कबुतर्ड्यांच स्थलांतर होईल अशी आशा आहे.

लहानपणी पावसाळ्यात मैदानी खेळ बंद व्हायचे तेव्हा आम्ही आत कॉमन पॅसेजमध्ये दादरावरच कॅरम खेळायचो. तेव्हा पावसाळी माश्या घोंगावत त्रास द्यायला यायच्या. मी त्यातल्या एकीला पकडायचो. कॅरमवर टांगलेल्या गरम बल्बचा चटका द्यायचो. आणि सोडून द्यायचो. तिला मारून तिच्या रक्ताने हात माखण्यापेक्षा असे चटका देऊन सोडून दिल्याने ती केकाटत आणखी दहा जणांना सांगायची की दादा रागीट आहे. कॅरमजवळ जाऊ नका. बस प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचा...

एकदम बरोबर... असं केल्याने लवकर दहशत पसरून त्रास देणारे चार हात लांब राहतात मात्र त्यासाठी त्रास सोसणाऱ्यांनी एकी दाखवून प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी.

अरे इ तक्या पोष्टी?! काल मी अर्धा तास माझ्या खोलीची खिडकी तीच मुंबई टाइप फ्लोअर टु सीलिन्ग वाली उघडी टाकली होती तर कुत्र्याने दोन कबुत रे मारून आण ली. किस्सा खलास.

आता त्यासाठी कुत्रे पाळा असा सल्ला काही देणार नाही. कारण वो आपलोगों के बसकी बात नही.

उचला रे पालखी चला इथून.

"जगभरात कबुतरे हे शांतीचे आणि प्रेमाचे प्रतीक समजले जातात" असं वर‌ कोणीतरी लिहिले आहे. अशा प्रेमळ आणि शांतताप्रिय पक्षाला मारहाण, मिरच्यांची धुरी!!
कोणीतरी वकीलपत्र घेतले आहे बरे कबुतरांचे.

शहरातील कुत्रा आणि मांजर ( पाळीव) हे पण त्यांचे नैसर्गिक गुण विसरले आहेत.मांजर (पाळीव) इतकी आयात खाऊ झाली आहेत की उंदीर च त्यांची शिकार करतील.
माणसाच्या ह्या वागण्या मुळे काही प्राण्यात उत्क्रांती होवून. वेगळेच प्राणी तयार होवू नाही म्हणजे झाले.

मीरा..., ऋन्मेष हा मायबोलीवरचं कबुतर आहे जोपर्यंत मायबोलीकर किलो-किलोने त्याला धान्य घालत रहाणार, तोपर्यंत तो अशीच घाण करत फिरणार.

माणसाच्या ह्या वागण्या मुळे काही प्राण्यात उत्क्रांती होवून. वेगळेच प्राणी तयार होवू नाही म्हणजे झाले.
>>>
शहरातले कबूतर आणि जंगली कबूतर यात फरक असतो
असे मागे मी कुठेतरी बहुधा मायबोलीवरच की बहुधा या धाग्यावरच वाचले होते

दर विकेंडला आम्ही वाशीच्या मिनि सी शोअरला जातो तिथे तळ्याकाठी बरीच कबुतरे आणि कुठलेतरी पांढरे पक्षी असतात. तिथे कबुतरांना दाणे घालायचा खेळ सर्रास चालतो. मी कधी घातले नाहीत. पण मुले जातात त्या पक्ष्यांशी खेळायला. त्यातून धावले की ते उडतात. मी त्यांना ओरडतो. कोणी सुखाने दाणे टिपतेय त्यात आपण उडवाउडवी करायचे हे पटत नाही. त्यात कबुतरांमुळे आजारही होतात असेही ऐकून आहे. त्यामुळे पांढरे पक्षी असले की खेळू देतो. अर्थात त्यांचा एक सीजन असतो. ते दिसायलाही छान दिसतात त्यामुळे त्यांना डिमांडही असतो. कबुतर काय रोजचेच आहे, गॅलरीत दिसते त्याचे काय कौतुक. पण तरी असे मोकळ्याढाकळ्या जागी शेकडो कबुतरे एकत्र दाणे टिपताना आणि फुर्र केले की थव्याने एकसाथ उडताना बघायला मजा वाटते.

ता.क. - डीडीएलजे आओ आओ मुळे कबुतरांना दाणे टाकायचे फॅड वाढले आहे हे मान्य.

दर विकेंडला आम्ही वाशीच्या मिनि सी शोअरला जातो तिथे तळ्याकाठी बरीच कबुतरे आणि कुठलेतरी पांढरे पक्षी असतात.
Submitted by ऋन्मेऽऽष on 5 December, 2021 - 11:45

कुठलेतरी पांढरे पक्षी म्हणजे फ्लेमिंगो असतील.

गच्चीतल्या पत्र्यावर बसणा-या कबुतरांमुळे आमच्या अंगणात खूपच घाण व्हायची. मग नेम धरून तिथेच कुंड्या ठेवल्या. आता झाडांना चांगलं खत मिळतंय.

काय सांगता बोकलत..??? थांबा थांबा.. प्रिंटा काढून पत्रक वाटायला माणूस लावतो. म्हणजे पैशांच्या हव्यासापोटी कबुतर्ड्यांची आपोआप गच्छंती होईल. काय सॉलिड आयडिया दिलीत..!!!

कबूतर मारून जमिनीत पुरलं की त्याचे पैसे बनतात.
नवीन Submitted by बोकलत on 5 December, 2021 - 21:35
<<

खरंय. एवरिबडी नोज दॅट.

फक्त त्याच्या जुन्या १००० रुपयाच्या नोटा बनतात

सार्वजनिक ,सरकारी जागेवर कबुतर ना शेकडो किलो धान्य दिले की पुण्य मिळते हे जैन,गुजराती,मारवाडी लोकांस कोणी सांगितले.
पुण्य पण ह्यांना फुकट च पाहिजे.
इतके श्रीमंत आहेत पण स्वतः जागा खरेदी करून चारशे पाचशे एकर वर कबुतर पाळून पुण्य का मिळवत नाहीत.
पुण्य पण दुसऱ्यांच्या पैशावर च पाहिजे.

Pages