Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?
Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<<कार्यक्रमाबद्दलच्या
<<<कार्यक्रमाबद्दलच्या चर्चेला पूर्णविराम देते आहे.>>>>
इथे कुठल्या कार्यक्रमाबद्दल चर्चा चालू होती?
मायबोलीवर असा काही विषय नसतो,
कार्यक्रम म्हणजे कुबेर यांच्यावर शाई फेकण्याचा कार्यक्रम होता का? कोण कुबेर? कुणि शाई फेकली?
<<<तसं टीपापाकरांना बरेच लोक
<<<तसं टीपापाकरांना बरेच लोक बरंच काही समजतात. आम्ही मनावर घेत नाही ते सहसा. >>>
टीपापा चा काय संबंध इथे? का आपले उगीचच?
ब्राह्मण नि टीपापा म्हंटले की भारतीय जनता एकदम जोरात येऊन वादावादी करत बसतात. ब्राह्मण व टीपापा कुणीच मनावर घेत नाहीत.
उलट टिंगल म्हणून मी काहीतरी लिहितो.
काही लोक अमेरिकेतल्या भारतीयांना शिव्या देतात. तेहि मनावर घेत नाहीत. मुळात भारतीय जनता काय म्हणते याचे इथे कुणालाच सोयर सूतक नाही. पण ते ओरडत बसतात. असे तुम्ही जसे एक धागा काढून ६०० गाठले तसे होते.
त्यांच्या तेहि लक्षात येत नाही!!
मी पण अधून मधून येऊन आगीत तेल
मी पण अधून मधून येऊन आगीत तेल ओतत असतो!>>>>>

तुम्हाला तसे लिहिता येत नसेल तर जरा दोन तीन पेग घेऊन या, लिहा नि मज्जा बघत बसा.>>>>>> चहाच्या घोटाला पेग कसे म्हणु?
भारतीय समाज पुष्कळ बदलता
भारतीय समाज पुष्कळ बदलता राहिलेला आहे. (जसे इतर समाजांबाबतही होत असते) काही एक फोर्सेस -बले समाजाला त्यांच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी ढकलत असतात तर काही बले सद्यस्थितीच इष्ट असे त्यांच्या दृष्टीने मानून विरोध करीत असतात. समाजाचे एक अंग त्याच्या दृष्टीने पुढे वाटचाल करण्यास उत्सुक असते तर असा अननुभवी मार्ग धोक्याचा आहे, त्यापेक्षा टाईम टेस्टेड मार्गच बरा असे म्हणून एक अंग त्याला प्राणपणाने विरोध करीत असते.
त्यामुळेसमाज अमुकच दिशेने चालला आहे हे म्हणणे पूर्ण सत्य नसेल.
समाजातल्या अंतस्थांनाही कदाचित हे कळत नसेल. दूरस्थांची बातच सोडा.
हत्ती आणि आंधळ्यांसारखी गत.
मायबोलीच्या दैनन्दिन वावरात
मायबोलीच्या दैनन्दिन वावरात प्रत्येक जातीचा म्हणजे समाजघटकाचा किती वावर आहे?
कुठल्या घटकाचा वावर किती टक्के असावा, किती टक्क्याच्या वरचा वावर सामान्य व किती टक्क्याच्या खालचा वावर अपवाद समजण्यात यावा?
सर्व समाजघटकाना इथे प्रतिनिधीत्व मिळावे, विशेषत: तळागाळातील घटकानी इथे जास्त वावरावे यासाठी कोण प्रयत्न करतेय का? कोणी करणे अपेक्षीत आहे? मायबोली प्रशासनाने की इथे वावरणार्या इतर प्रस्थापित घटकानी? काही समाजघटकाना इथे येण्यात रस नसला तरी योग्य तो समतोल
सर्वत्र राखला जाणे महत्वाचे असल्याने अशा समाजघटकाना इथे घेउन येण्याची जबाबदारी कोणी घ्यावी?
वरच्या चर्चेतले काही मुद्दे वाचुन वरील प्रश्न डोक्यात आले. धाग्याच्या मुळ विषयाशी अर्थात या प्रश्नान्चा काहीही सम्बन्ध नाही.
तळागाळातील घटकांचा इथेच नव्हे
तळागाळातील घटकांचा इथेच नव्हे तर सर्वच क्षेत्रांमध्ये अधिक वावर असावा असे मला वाटते. काही गट उपेक्षित दुर्लक्षित घटकांसाठी काम करीत असतात. प्रत्यक्ष फील्ड वर नेहमी जाता येतेच असे नाही पण आर्थिक मदत, समुपदेशन, मार्गदर्शन इत्यादिद्वारे मदत करणाऱ्यांच्या काही समूहात आपले योगदान असू शकते. आमचे असते.
हीरा यांचे वरचे दोन्ही
हीरा यांचे वरचे दोन्ही प्रतिसाद आवडले.
त्यासोबत असंही म्हणेन की ज्याच्याकडे जात/पैसे/वर्चस्व इत्यादींच्या योगे भाग्य वाट्याला आलं आहे, त्यांना जे अभागी आहेत, त्यांच्याविषयी करुणा असावी, त्यांना मदत करण्याची वृत्ती असावी, त्यांना आपल्या बरोबर आणण्याची इच्छा असावी - हे सगळं खरंच आहे. पण एखाद्यावर 'तू करुणा दाखवलीच पाहिजे' किंवा 'तू थोडीशी का होईना पदरमोड करून मदत केलीच पाहिजे' अशी सक्ती करता येत नाही. इर्शादचे दोन्ही घोळ हे 'अमुक एक असावं/नसावं' अशी इच्छा आणि सक्ती ह्यात लोकांनी घातलेल्या घोळामुळे आहेत, इतकं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
हेही खरंच आहे. करुणाभक्ती
हेही खरंच आहे. करुणाभक्ती असावी, सक्ती नसावी.
लबलब ठिंगणी. कॅटरीना विकी
रोज पहाटे तीन वाजता उठून या धाग्याचे वाचन करत व तोंडाने ईर्शाद म्हणत हात जोडून परिक्रमा केल्यास होणारे चमत्कार

हीरा, सर्वच क्षेत्रात हवे
हीरा, सर्वच क्षेत्रात हवे याला सहमत. वर चर्चा लिखित साहित्याची झाली. लिखित साहित्यात लेखकाला साहित्य प्रकाशीत करताना खुप त्रास होऊ शकतो कारण प्रकाशक कोणी दुसरा असतो. तिथे अमुक समाजाला वाव मिळाला नाही म्हणणे सोपे आहे.
पण आजच्या ऑनलाइनच्या जमान्यात लेखक स्वतःचे साहित्य स्वतःच प्रकाशित करु शकतो. मायबोलीसारखे भरपुर प्लॅटफॉर्म आता उपलब्ध आहेत जिथे फुकटात साहित्य प्रकाशीत करता येते.
मग इथे काय स्थिती आहे? इथे समाजाचे योग्य प्रतिबिम्ब पडले आहे का?
ह्याच्या उल टही चर्चा कधीतरी
ह्याच्या उल टही चर्चा कधीतरी व्हावी. किती सो कॉल्ड अपर कास्ट लोक सैन्यात जाउन लढणे/ अधिकारी नव्हे जवान. कचरा कलेक्ट करणे. ढोरे ओढणे चामडी साफ करणे, हागणदारी साफकरणे ह्या उद्योगात आहेत? किती वेठ बिगारीत जखडलेले आहेत? हा व्यवसाय त्यांनी आपण हून स्वीकाअरला आहे का , त्यात पीजी केले आहे का? का वंशपरंपरा गत आला आहे? ह्याचे ही क्लॅरिफिकेशन व्हावे.
ह्याच्या उल टही चर्चा कधीतरी
ह्याच्या उल टही चर्चा कधीतरी व्हावी. किती सो कॉल्ड अपर कास्ट लोक सैन्यात जाउन लढणे/ अधिकारी नव्हे जवान. कचरा कलेक्ट करणे. ढोरे ओढणे चामडी साफ करणे, हागणदारी साफकरणे ह्या उद्योगात आहेत?
ज्जे बात!!! +++++११११११
अमा आणि साधना , दोघांच्याही
अमा आणि साधना , दोघांच्याही प्रश्नांना साधारण एकच उत्तर येईल. लिहिणे किंवा लेखन ही एक कला आहे. त्यात भाषेवर प्रभुत्व असणे जरूरीचे आहे. हे प्रभुत्व मराठी माध्यम किंवा कुठल्याही माध्यमाच्या शालेय शिक्षणाच्या दहा वर्षांनी येत नाही. आपल्या इथे भाषेवर ज्यांचे प्रभुत्व आहे तेच माध्यमांत प्रभावी आहेत. तेच आपले प्रश्न, भाव भावना प्रभावीपणे मांडू शकतात. ज्यांची अभिव्यक्ति प्रभावी असते ती सर्वदूर पसरते कारण मुद्देसूद, उत्तम भाषेत नेमके लिहिलेले सध्याच्या प्रमुख वाचकवर्गाला वाचायला आवडते. खेड्यातल्या लोकांना आधी प्रमाण भाषेत व्यक्त होणे हेच कितीतरी कठीण असते. त्यातून भाषासौष्ठव, व्याकरण , न ण सांभाळीत लिहिणे किती कठीण. मुळात त्यांना शब्दच कमी पडतात. हर्ष, शोक, संताप, चीड, दु :ख, प्रेम, प्रणय, निराशा, साफल्य, संशय, असे अनेक भावाविष्कार व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडतात.
इथे काही यशस्वी ग्रामीण लेखकांचा आणि त्यांच्या साहित्याचा हवाला दिल्याने समस्या सुटणार नाही. हे पिढ्यानुपिढ्या चालू आहे.
एक गोपुरीचे पटवर्धन अथवा आणखी काही तुरळक उदाहरणे असतील जिथे उच्च वर्णीयांनी चर्मोद्योग केला. ह्या कष्टाच्या उद्योगात श्रमाला मोल नाही. फॅक्टरीतून निघणारी पादत्राणे स्वस्त पडतात. तिथे चामडे हाताळावे लागत नाही. ज्यांच्याकडे मुळातच भांडवल नाही ते असे उद्योग कसे उभे करणार? सिन्नरचा एक धनगर मुलगा आमच्याइथे घरोघरी किरकोळ कामे करीत असे. कधी उदबत्ती विक्री, कधी दिनदर्शिका, पंचांगविक्री वगैरे. त्यातून वह्यांचाही खर्च भागत नसे. मग कोणी जुने बूट, कपडे, गणवेश पुरवीत असत. जेमतेम दहावी झाला. सैन्यात जायचे होते तर ऑर्डर्ली म्हणून लागला. पण अशी चाकरी आवडेना. एकदा सुट्टीवर आम्हांला भेटायला आला. मी म्हटले तुला उच्च शिक्षण घ्यावेच लागेल. स्पर्धापरीक्षेसाठी तयारी करावी लागेल. त्याला कॅप्टन वंजारी ह्यांच्याकडे नेले. तिथे त्यांचा क्लास सुरू होता. (त्यांनी वेळ तीच दिली होती) त्यांनी एक दोन प्रश्न विचारले. ह्याची उत्तरे आणि भाषा ऐकून मुले टिंगल करू लागली. हसू लागली. वंजारींनी ह्याला काही जमणार नाही अशी नकारार्थी मान हलवली. तरी मी रेटून ह्या मुलाला सैनिकी उच्च शिक्षण म्हणजे काय, हे तरी कळू दे म्हणून सहा महिन्यांची फी भरली. शेवटी अर्थात जे शून्य हाती यायचे होते ते आले. तेव्हढ्यात आर्मीत नोकरी लागली म्हणून वडिलांनी लग्न करून दिले. म्हणजे पुढचे शिक्षण बंदच झाले.
आता इथे कोणाला जबाबदार धरायचे?
ह्या बाबतीत गुजराती समाज आदर्श मानावा लागेल. त्यांच्यात श्रमाला प्रतिष्ठा आहे. ओ बी सी मधले लोहार, सुतार, सोनार, कांसार हे लोक आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत आहेत. त्यांच्या त्यांच्या संस्था आहेत, शाळा कॉलेजे आहेत, हॉस्पिटले आहेत, आपल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्त्या त्यांनी ठेवलेल्या असतात. कोष्टी, साळी, शिंपी, मालधारी लोकही दरिद्री नाहीत. अस्पृश्यही बऱ्यापैकी संघटित आहेत.
अर्थात हा मुद्दा राहातोच की उच्चवर्णीय लोक ह्या धंद्यात का उतरत नाहीत. इथे जातीची उतरंड आड येते. आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही, श्रमाची सवय नसते, कसब नसते, शारीरिक श्रमाची कामे आवडत नाहीत, इतर सफेद कॉलर नोकरीधंद्यात मिळतो तितका पैसा मिळत नाही. वगैरे..
हीच सर्वसाधारण कारणे असतील.
>> जबरदस्त कास्टिस्ट बायस .
>> जबरदस्त कास्टिस्ट बायस . ब्रामिन फूड व्हेज फूड वी आर पायस पीपल. डोक्या ला झिणझिण्या आल्या>> बघितलं. डोक्याला झिणझिण्या वगैर्र आल्या नाहीत. बर्याच लोकांचा तसा समज किंवा विश्वास असतो. त्यांना ते तसं नाही हे सांगत रहाण्याची गरज आहेच. जे त्यांच्यातल्या तरुण पिढीने करायला हवं.
बायदवे, ह्या एरियात खूपदा जाणं होऊनही ह्यांच्या रेस्टॉरंटला काही जाणं झालं नाही ते एकदा जमवायला हवं.
हिरा, झकास लिहीलत. एकदम
हिरा, झकास लिहीलत. एकदम सुटसुटीत लिहील्याने डोक्यावरुन गेले नाही.
अर्थात हा मुद्दा राहातोच की उच्चवर्णीय लोक ह्या धंद्यात का उतरत नाहीत. इथे जातीची उतरण आड येते. आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही, श्रमाची सवय नसते, कसब नसते, शारीरिक श्रमाची कामे आवडत नाहीत, इतर सफेद कॉलर नोकरीधंद्यात मिळतो तितका पैसा मिळत नाही. वगैरे..
हीच सर्वसाधारण कारणे असतील.>>>> शक्यता आहे. किंवा भांडवल नसल्याने धंद्याचे धाडस वा गणित जमत नसावे.
मारवाडी, गुजराथी लोक स्वतःच्या ७-८ वर्षाच्या मुलाला गल्ल्यावर बसवतात, त्याला माल द्यायला लावतात यातुनच त्या मुलाला / मुलीला प्रेक्टिकल ज्ञान मिळते. आपली मराठी माणसे लाजत बसतात आणी लहान मुलांना काय कामे सांगायची , शिकु दे, खेळु दे म्हणून घरातच बसवतात. मग पोरगं आपलं बसत शाळा, ट्युशनच्या थिअर्या रंगवत.
हीरा किती सुंदर प्रतिसाद.
हीरा किती सुंदर प्रतिसाद. नेहमीप्रमाणेच. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा.
लग्नाच्या मुली पहाताना, लग्न करताना, नवर्याने जातीची अट अजिबात ठेवलेली नव्हती. इतका अभिमान आहे मला त्त्याचा
आय हॅव्ह बीन ऑन बोथ एन्डस.
पण या वेळेचा विषय आहे खरे यांच्या ट्रोलिंगबद्दल आणि वर स्वाती आंबोळे यांनी लिहीलेप्रमाणे ते निषेधार्हच आहे. खरे कुठुन सर्वसमावेशक जातिंचे इन्फ्रास्ट्रक्चर आणणार? त्यांनी काही व्यावसायीक गणिते मांडली
असो.
हेही खरंच आहे. करुणाभक्ती
हेही खरंच आहे. करुणाभक्ती असावी, सक्ती नसावी.>> ज्यांना प्रिव्हीलेज आहे त्यांनी ते जाणून न घेता दुसऱ्याला जातीवरून, इतर बाबींवरून हिणवू नये. दुसऱ्यांना संधी मिळत नाही एवढं मान्य करणे पुरेसे आहे. मदत पुढची गोष्ट. आरक्षणला पाठिंबा त्याहून पुढची पायरी. काही कळते आहे की पुन्हा भोपळे चौक?
https://www.livelaw.in/amp
न्या. डी वाय चंद्रचूड यांनी ६ डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने केलेल्या भाषणाचे सार अनेक वृत्तपत्रात छापून आले. ते संपूर्ण भाषण या खालील लिंकवर उपलब्ध आहे. वेळ असेल व घालवायची इच्छा असेल तर ते वाचावे. इथे वर चर्चेत आलेले काही मुद्दे त्याच वा थोड्या वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये या भाषणात आले आहेत.
ज्युरिसप्रुडंस वरील पुस्तके व त्यांचे संदर्भ सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून अपेक्षितच असतात. पण त्याचबरोबर न्या. चंद्रचुड यांच्या भाषणात अगदी गेल्या ३-४ वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांचेही संदर्भ आहेत. जसे सुरज येंगडे, याशिका दत्त, सुजाता गिडला वगैरेंची पुस्तके.
https://www.livelaw.in/amp/top-stories/justice-dy-chandrachud-caste-priv...
हीरा. सोशल मीडीयात या चर्चा
..
<<< जवान. कचरा कलेक्ट करणे.
<<< जवान. कचरा कलेक्ट करणे. ढोरे ओढणे चामडी साफ करणे, हागणदारी साफकरणे ह्या उद्योगात आहेत?>>>
ते कशाला ती कामे करतील? त्यांना इतर कामे करता येतात! नाहीच जमले तर करतीलहि, पण सध्या त्या कामांमधे उच्चवर्णियांचा प्रवेश कठीण आहे. स्पर्धा, आरक्षण या भानगडीत त्यांना ही कामे करायला मिळणारच नाहीत, आणि तेहि फुकट जातीयवाद उकरून आम्हाला या कामांत आरक्षण पाहिजे असे म्हणणार नाहीत. ते काम इतरांचे. जे काम करायला अनेक उच्चवर्णीय मिळू शकतात, तिथे आरक्षण म्हणून जबरदस्ती इतरांना घ्यायचे! तरी उच्चवर्णिय गप्पच.
>>करुणाभक्ती असावी, सक्ती
>>करुणाभक्ती असावी, सक्ती नसावी.<<
करुणाभक्ति (एंपथी?). अहो, ती असण्याकरता मूळात इश्यु आहे, याचं अॅकनालेजमेंट व्हायला हवं कि नको? इथे पब्लिकमधे उपेक्षितानांच दोष देउन आपलं सांस्कृतिक दारीद्र्य उघडं करण्याची चढाओढ लागलेली आहे. असो.
महाभारतात एक प्रसंग आहे - महायुद्ध संपल्यावर श्रीकृष्णाने रथातुन अर्जुनाला सर्वप्रथम उतरायला सांगितलं. ते कां, याचं वर्णन मी इथे करणार नाहि. त्या कथेचा गाभा/संदर्भ याकरता कि - अर्जुन सुरुवाती पासुन भ्रमातंच राहिला, कि आपणंच सर्वश्रेष्ठ. त्या येड्याला कल्पनाच न्हवती कि तो हे महायुद्ध जिंकला ते केवळ श्रीकृष्णाच्या पाठिंब्या मुळेच.
आता सूज्ञ असाल, तर यातली अनॅलजी समजेल. नाहितर आहेच, गाढवा समोर वाचली...
"अहो, ती असण्याकरता मूळात
"अहो, ती असण्याकरता मूळात इश्यु आहे, याचं अॅकनालेजमेंट व्हायला हवं कि नको? "
हाच इश्यू आहे! acknowledgement नाही हाच गाभा आहे!
ठराविक लोकांनी खरेंच्या
ठराविक लोकांनी खरेंच्या कार्यक्रमातील कलाकार कोण यावरून सोशल मीडियावर केलेला थयथयाट, नंतर कुबेरांवर शाई फेकण्याचा प्रकार- त्याबद्दल 'हिंसाचाराचं समर्थन नाही पण' म्हणत केलेलं समर्थन - या तुलनेत महाराष्ट्रात एका विवाहित गर्भवती मुलीचा तिच्या भाऊ आणि आईने शिरच्छेद करण्याच्या घटनेबद्दल काहीच विशेष outrage झालं नाही. म्हणजे फक्त ब्राह्मण समाजाविरुद्ध बोलण्यापुरतीच या लोकांना वाचा फुटते का?
बेसिक माणुसकी हवी. पोटच्या मुलींना माणूस म्हणून वागवण्याची संस्कृती हवी. मग संदीप खरे लिहितात तसं
'तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं' वगैरे कवितेच्या ओळी लिहिता येतात.
शाई प्रकरणातील निषेध पाहिले
शाई प्रकरणातील निषेध पाहिले तर "कोचरेकर मास्तरांकडे याहून कठोर शब्दांचा भरणाच नव्हता" हे बटाट्याची चाळ मधले वाक्य आठवते
अनेक लोकांनी "हे करणे बरोबर नाही पण...." लावून पुढे बरेच पाल्हाळ लावले आहे. शेवटी झुंडशाही कोण करते आणि कोणाविरूद्ध करते यावर बर्याच पब्लिकची प्रतिक्रिया ठरते. हे इथेही दिसले.
मात्र अमोल कोल्ह्यांच्या लोहगाव विमानतळावरच्या फोटोसंबंधी काडीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. एकतर त्यांच्याविषयी राष्ट्रवादीमधेच बराच राग दिसतोय सध्या. दुसरे म्हणजे राष्ट्रवादी व भाजप यांची जवळीक वाढलेली आहे. शाई प्रकरणातही ते दिसले.
शाई प्रकरणात निदान इथे तरी
शाई प्रकरणात निदान इथे तरी सर्वांनीच निसंदिग्ध निषेधच केला आहे.
शाई प्रकरणातील निषेध पाहिले
शाई प्रकरणातील निषेध पाहिले तर "कोचरेकर मास्तरांकडे याहून कठोर शब्दांचा भरणाच नव्हता" हे बटाट्याची चाळ मधले वाक्य आठवते //
खरं आहे. एका कार्यक्रमात ब्राह्मण आडनावं दिसली म्हणून होणाऱ्या outrage च्या तुलनेत कुबेरांचा शाईस्तेखान केल्यावर त्याच पुरोगाम्यांकडून झालेलं outrage खूपच कमी आणि नाईलाजास्तव केल्यासारखं होतं.
वैजापूरमध्ये घडलेल्या मुलीच्या beheading च्या भयानक घटनेबद्दल तर काहीच्या काही underrepresented प्रतिक्रिया आहेत. रादर- एखादी ब्राह्मण पुरोगामी महिला, एक-दोन दलित चळवळीतील कार्यकर्ते स्त्रीपुरुष यांच्या अस्वस्थ प्रतिक्रिया वगळता बाकी बऱ्यापैकी मौन दिसलं. म्हणजे लॉजीकली काय जास्त concerning असायला हवं- शिरच्छेद की कवितेचा कार्यक्रम....
<< करुणाभक्ति (एंपथी?). अहो,
<< करुणाभक्ति (एंपथी?). अहो, ती असण्याकरता मूळात इश्यु आहे, याचं अॅकनालेजमेंट व्हायला हवं कि नको? इथे पब्लिकमधे उपेक्षितानांच दोष देउन आपलं सांस्कृतिक दारीद्र्य उघडं करण्याची चढाओढ लागलेली आहे. असो. >>
------ सहमत
स्वप्रसिद्धीचा चाळा… एबीपीने
स्वप्रसिद्धीचा चाळा… एबीपीने अशी घेतली शाळा ! : https://www.youtube.com/watch?v=zasaTjl8ztg
हहपुवा
रेनी टेस्ट
रेनी टेस्ट
मामी भारी आहे क्लिप.
मामी
भारी आहे क्लिप.
Pages