Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?
Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कालच्या न्युजलाँड्री हप्ता
कालच्या न्युजलाँड्री हप्ता मध्ये पण कलाकारांची जात हा मुद्दा चर्चेस आला आहे. पॉड कास्ट मुळातून ऐका. मी काही तो इथे कॉपी करू शकत नाही. प ण सवर्ण नसलेल्या कलाकारांना डिस्क्रिमिनेशन फेस करावे लागले आहे व लागते आहे भारतात हा मुद्दा आहे. तो दुर्लक्षिता येणार नाही.
मायावती च्या रुपा वरून जोक करणॅ हे सवर्ण स्टँड अप कॉमेडिअन्स नी अनेक वेळा केले आहे.
वीर दास च्या दोन भारतां च्या कवितेचे जे कौतूक होते आहे त्यात जातिव्यवस्थेला अनुल्लेखाने मारले आहे.
टव णे सर तुमचे प्रतिसाद आवडले. जुना टण्या सापडल्या सारखे वाटले.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Jj2LBl6ncFs ही एक झलक
हीरा,
हीरा,
मराठी लिखित माध्यमांतून तुरळक लेखकांचे लिखाण सोडले तर ' चुलीवर मटणाचे बरबाट रटरटत होते ' किंवा ' मी शाळेतून आलो तेव्हा आई तव्यावर मासळी तळत होती' , ' खेळून आल्यावर भूक लागली तेव्हा आईने पटकन तव्यावर अंड्याचा पोळा करून दिला ' असे भोजन संस्कृतीतले घरगुती उल्लेख दिसत नाहीत
हे काही पटलं नाही. जयवंत दळवी, पुलं, विश्वास पाटील, आनंद यादव, रवींद्र पिंगे, बा. भ. बोरकर ही मला चटकन आठवलेली नावं. हे तुरळक लेखक नाहीत.
वर उल्लेख केलेले लेखक
वर उल्लेख केलेले लेखक कर्तृत्वाने क्षुल्लक नाहीत. संख्येने तुरळक आहेत. दलित साहित्यात असे उल्लेख त्या मानाने अधिक सापडतात. दलित साहित्य सोडून इतर साहित्यात असे उल्लेख तुरळकच आहेत. अपवाद व्यंकटेश माडगूळकरांच्या सुरुवातीच्या आठवणीस्वरूप पुस्तकांचा.
>>लोकांची मित्रमंडळे आपापल्या
>>लोकांची मित्रमंडळे आपापल्या जातीतच असतात.
हे चुकीचे गृहीतक आहे असे नमूद करुन खाली बसतो!! ..... बाकी जे विषयाला धरुन आहे ते चालू दे!!
माबोकर पुरोगाम्याचि चान्गलिच
माबोकर पुरोगाम्याचि चान्गलिच पचाइत झालिये.
Submitted by स्वाती_आंबोळे on 4 December, 2021 - 09:5०
अय्या मी उगाच इतके दिवस टीपापाकरांना पुरोगामी समजत होतो तर.
Submitted by WHITEHAT on 5 December, 2021 - 04:53
आयडी बदलला म्हणून कांगावा करायची सवय जात नाही
अय्या, ते वाक्य मी लिहिलेलं
अय्या, ते वाक्य मी लिहिलेलं नाही, प्राजक्ता यांनी लिहिलंय.
त्यांच्या पोस्टमधला त्यानंतर उद्धृत केलेला (साहित्य परिषदेबाबतचा) परिच्छेद माझा आहे.
तसं टीपापाकरांना बरेच लोक बरंच काही समजतात. आम्ही मनावर घेत नाही ते सहसा.
अमा, लिंक बघते, पण
अमा, लिंक बघते, पण
>>> वीर दास च्या दोन भारतां च्या कवितेचे जे कौतूक होते आहे त्यात जातिव्यवस्थेला अनुल्लेखाने मारले आहे.
हे नक्की हेतुपुरस्सरच आहे कशावरून? त्याला सुचलं ते त्याने सादर केलं - त्यात अमुक आहे तर तमुक का नाही असं विचारणं ही व्हॉटअबाउटरी झाली नाही का?
साहीत्य संमेलनात एक विशेष सूर
साहीत्य संमेलनात एक विशेष सूर लावतात तो ऐकताना खुदूखुदू हसायला येतं. गेल्या वेळच्या अध्यक्षा अरूणा ढेरेंच्या भाषणात तो सूर होता. त्याच सूरात कवी सौमित्र बोलत होते. त्यांची दमछाक बघताना या वर्षी पुन्हा खुदूखुदू हसू आले.
हेतुपुरस्सर नसेलच. पुन्हा
हेतुपुरस्सर नसेलच. पुन्हा टवणे सरांनी लिहिलेले तेच मुद्दे इथे लागू होतात.
वावेच्या पोस्टशी सहमत. हीरा -
वावेच्या पोस्टशी सहमत. हीरा - अशा टाइपची वर्णने खूप वाचली आहेत. किंबहुना "बामणी" वर्णनेच कमी वाचली आहेत. मी कदाचित तसे टीपिकल लिहीणारे लेखक फारसे वाचलेले नसावेत. अनेक वाचक फडके, खांडेकर वगैरे अशी सुरूवात करतात ते मी वाचलेले नाहीत.
लोकांची मित्रमंडळे आपापल्या जातीतच असतात. >> हे ही खूप जनरलायझेशन आहे. मी चाळीत वाढलो तेथे खूप विविध जातींचे लोक एकत्र राहात होते. आपसांत लग्ने बिग्ने झाली नाहीत पण एकमेकांकडे जेवणे वगैरे सर्रास होते. घरातील वेगवेगळ्या प्रथा, पद्धती माहीत होत्या. एका घरी देवीचे नवरात्र असे - दरवर्षी एका वाहनावर देवीची स्थापना करून रोज संध्याकाळी "अनादि निर्गुण प्रकटली भवानी" ने सुरूवात होणार्या त्यांच्याकडच्या आरतीला सगळी चाळ जमत असे. दोन मित्रांकडे "तळी" भरत - "सदानंदाचा येळकोट... चांगभले" असे काहीतरी म्हणत , लग्नातले/पूजा असेल तर बुंदी वगैरे जेवण, एका कोल्हापुरी घरात मटण आणि कोंबडी वडे वगैरे भरपूर विविधता पाहिली आहे (आणि खाल्ली आहे). नुसते पुरणपोळ्यांचेच तीन चार प्रकार खाल्ले आहेत, एकाच चाळीत. एका तेलुगू दलित मित्राकडून "आमच्या समाजात" असा अनेकदा ऐकलेला व आधी न समजलेला उल्लेख आठवतो. त्याचा अर्थ त्या स्पेसिफिक भौगोलिक भागातून आलेले व त्या जातीचे लोक - जे पुण्यात एकत्र येउन काही गोष्टी करत- त्या संदर्भाने होता हे नंतर समजले. त्यातील किमान दोन अ-ब्राह्मण कुटुंबातील लोक जानवी घालत. मुंज झाल्याचे आठवत नाही त्यांच्याकडे पण असेलही. आता जातवार आठवायचा प्रयत्न केला तर साळी, माळी, मराठा, ब्राह्मण, सोनार, कासार, विश्वकर्मा, आंध्र मधून आलेले दलित कुटुंब, नामदेव शिंपी, ख्रिश्चन, मुस्लिम, फासेपारधी - असे मित्र होते. तेव्हा यातील (हिंदूंपैकी) बहुतेकांची जात कधी विचारली गेली नाही, कधी गप्पांत आपोआप आली तर कळत असे. नाहीतर अगदी कॉलेजच्या वयापर्यंत यातले बरेच ब्राह्मण व मराठा नाहीत इतपत माहीत असे पण त्यापुढे नाही. हे बरेचसे नंतर समजले.
यातील एका "मधल्या" समजल्या गेलेल्या समाजाच्या मित्राने एकदा त्यांच्याच समाजातर्फे जवळच्या देवळात पूजा आयोजित केली होती तेथे तीर्थप्रसादाला बोलावले होते. तेथे गेलो तर दारात एक पैलवान टाइप माणूस बसला होता व प्रत्येकाला <ती जात> आहेस का असे अडवून विचारत होता. एकूण आविर्भाव असा होता की त्या वेळेस तेथे त्याच समाजाच्या लोकांना जाता येइल. मी त्या जातीचा नाही म्हंटल्यावर मग कोणत्या जातीचा, असे त्याने विचारले. त्यावर "ब्राह्मण" ऐकल्यावर लगेच त्याचा अडवलेला हात वर गेला व दार उघडले.
अशी "दारे" जागोजागी कशी आपोआप उघडली गेली हे समज आल्यापासून चांगले माहीत आहे. बँकेतले, ऑफिसमधले, ओळखीचे अनेक लोक आपल्याशी एकदम चांगले वागतात तितके आपल्या मित्राशी वागत नाहीत याचे गूढ त्यातील जातीचा अँगल लक्षात आल्यावर राहिले नाही. तेव्हा त्या प्रिव्हिलेजची पूर्ण जाणीव आहे. ते कधी नाकारलेले नाही. इव्हन माबोवर सुद्धा एकदोनदा लिहीलेले आहे. ब्राह्मणांना कोठे ते मिळते, मराठ्यांना व इतर उच्चवर्णीय समजल्या गेलेल्या जातींना कमी प्रमाणात का होईना पण कोठे मिळते, आणि बाकी अनेकांना, विशेषतः दलित व इतर अनेक जातींना ते कसे कोठेच मिळत नाही - हे ही चांगले माहीत आहे. जवळच्या मित्रांना मिळालेल्या वागणुकींमधून थेट पाहिलेले आहे.
मी इथे हे सगळे अस्थानी/अवांतर आहे असे सातत्याने लिहीतोय कारण या चर्चेचा संदर्भ या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोशल नेटवर्क वर - विशेषतः फेबुवर - अगदी व्हाइटहॅट यांनी लिहील्याप्रमाणे घरचे संस्कार दाखवत ची अर्वाच्य चिखलफेक सुरू आहे त्याबद्दल आहे. सामजिक असमानतेबद्दल नाही.
साहित्यसंमेलनवाले मलापण एक
साहित्य संमेलनवाले मलापण एक पुरस्कार देतील काय?
अंघोळ करताना जिथे हात पोहोचत
अंघोळ करताना जिथे हात पोहोचत नाही त्या ठिकाणचा (पाठीवरच्या) मळ कसा काढावा यावर तर कुणी बोललंच नाही.
बोकलत - प्वाईंट आहे. पूर्वी आमच्या गावी भूतांची पंगत पाहिलेली लोकं आहेत. काही वर्षांनी साहीत्य संमेलन पाहिलेले लोक शिल्लक राहतील त्यात पुरस्कार मिळून जाईल.
भरत, तुमच्या कळकळीबद्दल मला
भरत, तुमच्या कळकळीबद्दल मला शंका नाही.
आत्ता सकृतदर्शनी मला ती व्हॉटअबाउटरीच वाटते आहे, आणि सतत जातीचा चष्मा लावून त्यातूनच प्रत्येक घडामोडीकडे पाहाणं चुकीचं वाटत आहे. जातीमुळे संधी नाकारली जाणं आणि जाताीवरून ट्रोलिंग होणं दोन्ही एकसारखंच अक्षम्य वाटत आहे.
मी शहरात वाढले, आणि माझ्याच काय पण माझ्या आईवडिलांच्या मित्रपरिवारातदेखील अनेक जातीधर्मांचे आणि अन्यभाषिकही लोक होते. त्यांतले पारशी, मुसलमान, ख्रिश्चन / गुजराती, मारवाडी, तेलगू आणि तमिळ कोण हे माहीततरी होते, जात हा विषयच कधी निघाला नाही. अजूनही ‘जात’ याचा cuisine इतकाच एक अर्थ मला कळतो. हा सगळाच बहुधा माझ्या प्रिव्हिलेज्ड अपब्रिंगिंगचा भाग म्हणता येईल.
जिला जन्मल्यापासून जातीची जाणीव सतत आणि नकारात्मक पद्धतीनेच करून दिली गेली असेल, त्या व्यक्तीचं दुःख आणि बहुधा त्यामुळे चढलेल्या चष्म्यातून दिसणारं जग मला समजणं अशक्य आहे हे मान्य करून मी माझ्यापुरता या कार्यक्रमाबद्दलच्या चर्चेला पूर्णविराम देते आहे.
माझा वरील प्रतिसाद लिहिताना
माझा वरील प्रतिसाद लिहिताना मी दळवी- पुल- बोरकर - कणेकर- यादव अशी पाच सहा नावे गृहीत धरली होती आणि ती डोळ्यासमोर होतीच. कारण विरोधी उदाहरणे म्हणून हीच नावे पुढे केली जातील हे उघड होते. पण ही नावे प्रचंड साहित्यिक समूहाच्या एक टक्का तरी भरतील का? (दलित साहित्य सोडून).
आणि विधाने जनरलच आहेत. स्पेसिफिक नाहीत. वैयक्तिक अनुभव वेगळे असतात आणि समूहाचे म्हणजे अगदी झुंडीचे नसले तरी एकत्रितांचे वेगळे असतात.
( 'मी आल्या आल्या पटकन एक थालीपीठ लावले' आणि ' मी आल्या आल्या पटकन एक अंड्याचा पोळा काढला' ह्या दोन वाक्यांची मराठी साहित्यातले वारंवारिता किती असेल?
इथे 'आपापली' बाजू मांडुन
इथे 'आपापली' बाजू मांडुन किंवा फॉर दॅट मॅटर, काही लोकांनी केल्याप्रमाणे 'समोरची' बाजू उचलून धरुन नक्की काय होणारे? मतपरिवर्तन होणारे? किती जणांना इथे आंतरजातिय विवाह करायला आवडेल? जर वय निघून गेले असेल तर आपल्या मुलाबाळांचा- नाती/पणत्यांचा?
खरे तर समाजात, रोटी-बेटी व्यवहार आवश्यक आहे. ते व्हेन्टिलेशन (वायुविजन) च नाही ना समाजात.
किती जणांना इथे आंतरजातिय
किती जणांना इथे आंतरजातिय विवाह करायला आवडेल? > मी आहे की गुढघ्याला बाशिंग बांधून तयार. आता तुम्ही वैदेही परशुरामीला लवकरात लवकर बोहल्यावर घेऊन या !
खरेंच्या कार्यक्रमाला ट्रोल
खरेंच्या कार्यक्रमाला ट्रोल करणारा ब्रिगेड-पुरोगामी कंपू आहे.
इथे या ट्रोलिंग ब्रिगेडचंच कसं बरोबर आहे वगैरे बरीच सारवासारव पुरोगामी लोकांनी केली.
आता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गिरीश कुबेरवर शाई फेकली. कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आक्षेप आहे म्हणून हा प्रकार केला. आता जस्टीफिकेशन्स येऊ द्यात. कुबेर ब्राह्मणेत ना? ओव्हर रिप्रेझेंटेड पण आहेत का?
एखादी कम्युनिटी काही
एखादी कम्युनिटी काही क्षेत्रात ओव्हर रिप्रेझेंटेड असण्याची अनेक उदाहरणे दिली.
ज्यूईश कम्युनिटी हे एक उदाहरण आहेच.
अमेरिकेतील भारतीय लोक हे स्पेलिंग बी, आयटी वगैरे मध्ये जास्त प्रमाणात दिसतात.
भारतात श्रीमंत लोकांच्या यादीत गुजराती मारवाडी बनिया लोक सर्वात जास्त दिसतात.
नेहरू गांधी परिवार देशाच्या राजकारणात ओव्हर रिप्रेझेंटेड आहे. मायबोलीवरचे पुरोगामी आजही राहुल प्रियंका याना सत्ता मिळावी यासाठी प्रचार करत असतात.
मराठा समाजाची नेमकी टक्केवारी माहीत नाही. जास्तीत जास्त 33 %? पण मराठा आमदार 40-45 टक्केहून अधिक असतात. सहकार क्षेत्र, साखर कारखाने येथे हा समाज ओव्हर रिप्रेझेंटेड आहे.
बॉलिवुडमध्ये ज्यावेळी मुस्लिम लोकसंख्या 15 टक्केहून कमी होती तेव्हाही मुस्लिम कलाकार खूप जास्त होते.
पुरोगामी ब्रिगेडी कंपूला वरीलपैकी कशातही प्रॉब्लेम दिसत नाही. पण ब्राह्मण समाजाच्या एका कार्यक्रमाचा इतका इश्यू?
सालाबादाप्रमाणे कांगावा !
सालाबादाप्रमाणे कांगावा !
त्या पर्सनल ट्रोलिंग चे समर्थन/ सारवासारव कुणीही इथे केलेली नाहीये.
मुळात ब्रिगेडी आणी पुरोगामी यांना एकाच गटात ढकलणे हेच चुकिचे आहे.
कुबेर यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार निंदनीय, मूर्खपणाचा आणी निषेधार्ह आहे.
शरद पवार, राऊत यांनीही निषेध केलेला आहे.
संभाजी ब्रिगेड ही
संभाजी ब्रिगेड ही राष्ट्रवादीचाच एक अघोषित भाग आहे त्यामुळे शरद पवारांनी फक्त निषेध करून काहीही फायदा नाही.
अहो कुसुमाग्रज, पु लं
अहो कुसुमाग्रज, पु लं देशपांडे यांचे काळी कुठे होती मायबोली ?
जर असती तर कुसुमाग्रजांनी नटसम्राटचे उतारे इथे क्रमशः टाकले असते.
त्यावर सूचनाखोरांनी लगेच बजावले असते.
चालू घडामोडींमधे हलवा.
पुलं ची वार्यावरची वरात विनोदी विभागात का आहे असा एक प्रश्न आलाच असता.
सुरेश भटांना गजंल म्हणजे काय हे आधी शिकून घ्या मगच महिन्यातून एखादी पोस्ट करा अशी धमकीवजा विनंती मिळाली असती.
ओमीक्रोन या नव्या variant चा
ओमीक्रोन या नव्या variant चा ओरिजिनल चायनीज अल्फा variant ने स्पष्ट शब्दात निषेध केला आहे.
मैं उसे दिल से कभी माफ नहीं
मैं उसे दिल से कभी माफ नहीं कर सकूंगा असं म्हटलं का? तरच निषेधाला अर्थ आहे
Arnold's ABS Anxiety हे
Arnold's ABS Anxiety हे सिल्वेस्टर स्टॅलोन चे या विषयावरचे पुस्तक वाचनीय आहे. लायब्ररीवाले लक्ष द्यावे.
कोण कोणाला काय बोलतयं काहीच
कोण कोणाला काय बोलतयं काहीच कळत नाही.
ईर्शाद
ईर्शाद
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=SWPvLeRH5-E
जबरदस्त कास्टिस्ट बायस . ब्रामिन फूड व्हेज फूड वी आर पायस पीपल. डोक्या ला झिणझिण्या आल्या.
४.०५ पासून पुढे बघा.
बघितले.
बघितले.
दुसरे कुणी आनंदी आहेत, सुखी समाधानी आहेत हे पाहून तुमच्या डोक्याला झिणझिण्या आल्या हे वाचून थोडी गंमतच वाटली.
इथे कुणि काही बोलले तर तिथे का झिणझिण्या आल्या लोकांना - इथे तर कुणालाच काही वाटले नाही.
इथे ब्राह्मणच काय, इतर जातीच्या, पाकीस्तानी आणि इतर लोकांचेहि अनेक धंदे आहेत. ते जाहिरात करतात.
असे सारखे सारखे डोक्याला झिणझिण्या यायला लागल्या तर तुमचे कठीणच आहे
का ब्राह्मण लोक सुखी आहेत म्हणून जास्त वाईट वाटले? का ब्राह्मणांची मते आवडत नाहीत म्हणून?
तुमच्या डोक्याला कितीहि झिणझिण्या आल्या तरी ब्राह्मण आपले अधिकाधिक सुखी समाधानी होत रहातील. तेंव्हा तुम्ही तिथे भारतात बसून जातीयवाद करत बसा. आम्ही मजेत इथे राहू!!
खरा जातीयवाद भारतातील लोकांच्या मनात आहे, नको तिथे जात पात. सतत जातपात आणि डोक्याला झिणझिण्या! जातीयवाद इतका ठासून भरला आहे मनात की इतर गोष्टींना तिथे जागाच नाही!
त्यातून ब्राह्मण म्हंटले की लगेच लोक चवताळून उठतात!!
आणि ब्राह्मण गंमत बघत बसतात! ७० वर्षे आरक्षण झाले अजून रडगाणेच!
<<<कोण कोणाला काय बोलतयं
<<<कोण कोणाला काय बोलतयं काहीच कळत नाही.>>>
अहो इथे असेच असते. धाग्याचा विषय काय, मुद्दा काय याचा विचार न करता नुसते तावातावाने भांडायचे, मुख्य म्हणजे जात काढायची! मग बघायलाच नको. मी पण अधून मधून येऊन आगीत तेल ओतत असतो!
तुम्हाला तसे लिहिता येत नसेल तर जरा दोन तीन पेग घेऊन या, लिहा नि मज्जा बघत बसा.
Pages