Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?
Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फेफच्या टॅलेण्ट हे जन्मजात
फेफच्या टॅलेण्ट हे जन्मजात असते याच्याशी सहमत. ते "जातीवर" नसते, फेफनेही तसे म्हंटलेले नाही. शब्बीर कुमारने कितीही मेहनत घेतली तरी त्याचा मोहम्मद रफी होणार नाही.
कोणतेही टॅलेण्ट कोणत्याही जातीतील व्यक्तीकडे असू शकते. त्यानंतर त्या व्यक्तीची मेहनत, बाजूची सपोर्ट सिस्टीम व मिळणारे मार्गदर्शन आणि संधी - यावर ती व्यक्ती किती प्रगती करते ते ठरते. दलित लोकांना यातले बरेच काही मिळत नाही आणि (सोकॉल्ड) उच्चवर्णीयांना ते मिळते, हे उघड आहे. यावर अनेकदा लिहीलेले आहे. पण इथे त्या प्रश्नावर चर्चा चाललेली नाही.
गरजूंनी लोकमतच्या या बातमीवर फेसबुकवर आलेल्या दर्जेदार प्रतिक्रिया वाचाव्यात म्हणजे याचा संदर्भ नीट कळेल.
नैसर्गिक देणगी (जन्मजात
नैसर्गिक देणगी (जन्मजात टॅलेन्ट) असते असे म्हणून कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीला कमी लेखणार नाही.>>>>तुमच्या नेहमिच्या खासियतने माझ्या पोस्ट मधल अर्धच वाक्य उचलत ! छान
पुर्ण पोस्ट वाचा क्रुपया
टवणे सरांच्या सगळ्या पोस्ट्स
टवणे सरांच्या सगळ्या पोस्ट्स तंतोतंत पटल्या. इतक्या स्पष्ट शब्दांत मांडलेले खालील मुद्दे धाग्याला अनुसरूनच आहेत
धंद्याचे गणित, गुणवत्ता, आजवर हे धंदे ओव्हर रिप्रेझेंटेशन असून सफळ होत आहेत हे आर्ग्युमेंटः बाजारात उपलब्ध मालच विकला जाणार. दलित साहित्य नव्हते तेव्हाही पुस्तके खपत होतीच. तेव्हा धंदे चालत आहेत म्हणून ही व्यवस्था न्याय्य आहे वा मेरिटवर आहे वा सर्वोच्च दर्जाची आहे हे आर्ग्युमेंट खोटे आहे.
कार्यक्रम आयोजन करणारे, सहभागी कलाकार हे नक्कीच जातीयवादी नाहीत, हे मुद्दामून केलेले नाही. पण जे झाले ते स्टॅटिस्टिकली लो प्रोबेबल असून देखील :
१. ते समर्थन करण्या योग्य आहे.
२. त्याविरोधात येणार्या रिअॅक्शन या निशेधार्हच आहेत.
३. असे अनवधानाने होत असेल तर त्याचा कॉग्निझन्स घेउन तसे घडू नये म्हणून अपेक्षा करणे हे अयोग्य आहे व अश्या अपेक्षेचा विरोध केला पाहिजे
या भुमिकेशी मला सांगड घालता येत नाही.
आवाजातले माधुर्य, शायरीतला
आवाजातले माधुर्य, शायरीतला दर्द, काव्यातला हळूवारपणा, पोवाड्यातला वीररस, ढोलकीवर अचूक जागी पडणारी थाप, गझलेतली नजाकत, हार्मोनियमवर लिलया फिरणारी बोटे, तंबोऱ्याचा झंकार, एखादा उत्कट नृत्याविष्कार, मनगटी नजाकतीने मारलेला चौकार वगैरे बघताना एखाद्याच्या डोक्यात जातीपाती, सर्वसमावेशकता, प्रोबॅबिलिटी वगैरेची गणिते चालत असतील तर असे लोक तिकिट काढून पैसे आणि एकंदरीतच वेळ फुकट घालवतात असे माझे स्पष्ट मत आहे!!
वरती कुणीतरी म्हंटलय तस हाडाच्या कलाकाराला आणि कलानिष्ठ रसिकालाही अतिशय वाईट वाटेल अशी चर्चा चालू आहे!!
फेफ तुझे मुद्दे बिनतोड आहेत पण एकंदर प्रतिवाद बघता इतर धाग्यावर दिलेला सल्लाच इथे परत देईन
समेवर येताना टाळी न मिळता गायकाच्या जातीवरुन टवाळी मिळत असेल तर दोष कुणाकडे जातो हे उघड आहे
आणि जे कलेपेक्षा किंवा त्या बरोबरीने सर्वसमावेशकतेचे ढोल बडवत आहेत किंवा ज्यांना फक्त तिच भाषा प्रिय आहे खास त्यांच्यासाठी: कलाकारांच्या आणि कार्यक्रमाच्या आयोजकांच्या सर्वसमावेशकतेचे जाहिर पंचनामे करताना आपण स्वता आधी एक रसिक म्हणून सर्वसमावेशक झालोय का याचा धांडोळा घ्या!!
टवणे सर, थँक्यू _/\_
टवणे सर, थँक्यू _/\_
-----------
I did not choose that example. तसा वाद आता झाला म्हणून माझं मत मांडलं.
----
पुढचा लिहिलेला मोठा प्रतिसाद खोडून टाकला.
----
अवांतर
इर्शाद बद्दल भूमिका घेणार्या आणि आता माझी जिवीची आवडी बद्दल तंतोतंत तशीच भूमिका न घेणार्यांना लेबल लावलं गेलंय.
तर असंच काही लेबल इर्शाद किंवा जावेद अख्तर गुलजार नको वर चर्चा चाललेली असताना भूमिका न घेणार्यांना आणि आता हिरीरीने घेणार्यांना लावता येईल का?
<समेवर येताना टाळी न मिळता
<समेवर येताना टाळी न मिळता गायकाच्या जातीवरुन टवाळी मिळत असेल तर दोष कुणाकडे जातो हे उघड आहे आअणि पुढचं वाक्य.
टोटल स्ट्रॉमन. इथे असं कोणी लिहिलंय?
पुणे विमानतळावर जी काय
पुणे विमानतळावर जी काय पेशवेकालीन पेंटिंग्ज लावलेत त्यावरून अमोल कोल्हेने ट्वीट केले आहे आणि नवा वाद वगैरे सुरु होईल असं म्हणतायेत. आता तो विषय पण ह्या धाग्यातच उरकून घ्या.
https://youtu.be/_2TYLlfiASk
<< नैसर्गिक देणगी (जन्मजात
<< नैसर्गिक देणगी (जन्मजात टॅलेन्ट) असते असे म्हणून कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीला कमी लेखणार नाही.>>>>तुमच्या नेहमिच्या खासियतने माझ्या पोस्ट मधल अर्धच वाक्य उचलत ! छान
पुर्ण पोस्ट वाचा क्रुपया >>
----- पुर्ण पोस्ट वाचली होती... आत्ता पुन्हा वाचली. तिथे अर्धच वाक्य उचलायला नको होते. माझे चुकले. संपुर्ण पोस्ट विचारांत घेतल्यावरही माझा प्रतिसाद तोच राहिल.
नेहेमीची खासियत? - संपुर्ण पोस्ट मधले जे मला महत्वाचे वाटते त्या बद्दल माझी टिप्पणी असते. यात नेहेमीची खासियत वगैरे काही नाही. तुम्हाला मान्य व्हायलाच हवे असा कुठलाही आग्रह नाही. या पुढे चर्चा करण्याची संधी दिली तर संपुर्ण पोस्टला कट-पेस्ट करेल. पण उगाचच लांबी वाढते, आणि म्हणून महत्वाचे तेव्हढेच उचलतो.
टॅलेंट हे नैसर्गिक " देणगी "
टॅलेंट हे नैसर्गिक " देणगी " वगैरे नसते. जन्मजात कुणी टॅलेंट सोबत आणत नाही. >> उदय हे हे तुमच वाक्य आहे
त्यावर
रियली??? या तुमच्या वाक्याला छेद देणारी सर्वमान्य अशी पटकन आत्ता सुचलेली ठळक उदाहरण म्हणजे भारतरत्न लता मगेशकर आणी किशोर कुमार .याना निसर्गदत्त उत्तम गळा होताच त्याला त्याच्या रियाझ,शिक्षण,सराव याची जोड त्यानी दिली कला,क्रिडा किवा फॉर दॅट मॅटर कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायला भरपुर मेहनत लागतेच
हिमेश रेशमिया याच्यात गाण्याच कुठलही टॅलेन्ट नाही ते त्यानी कितिही मेहनत घेतली अगदी नाकातुन सुद्धा आवाज काढुन बघितला तरी शक्य नाही.
ही माझी पोस्ट यात तुम्हाला कुठे दिसल की मी मेहनतिला नाकारतेय?
मी पुन्हा थेट प्रश्न विचारतो.
मी पुन्हा थेट प्रश्न विचारतो. जी जात ५-६% आहे त्याचे ९०% रिप्रेझेंटेशन असणारा कार्यक्रम जो स्टॅटिस्टिकली लो प्रोबेबिलिटी आहे काय दर्शवितो?
काय दर्शवतो नक्की????
सगळीकडे सगळ्या गोष्टी जातीच्या टक्केवारीनुसारच व्हायला पाहिजेत, तसं नसेल तर तो गुन्हा, फ्रॉड- something sinister that needs to be called out- ही rigid आणि नाझी विचारसरणी आहे.
जर कोणाला मुद्दाम प्रतिबंध केला जात असेल तर ते नक्कीच योग्य नाही पण तसा प्रकार इथे झालेला दिसत नाही. पूर्ण संमेलनात वेगवगळ्या जातीधर्माचे लोक आहेतच.
अमेरिकेत भारतीय टक्केवारी किती आहे? स्पेलिंग बी मध्ये भारतीय मुलं पुढे असतात. ते लोक यावरून लगेच निषेध निषेध अशी बोंब मारताना दिसले नाहीत. उलट कौतुक करतात. लेख लिहितात. ती मुलं कसं तयारी करतात, काय वेगळं करतात? हे बघतात.
पुर्वी लातूर पॅटर्न नावाचा प्रकार होता. तिथे लातूरच्या मुलांचं परीक्षेत ओव्हर रिप्रेझेंटेशन होतंय म्हणून त्यांना आता restrict करा असं म्हटलं गेलं की काय आहे लातूर पॅटर्न, कसा अभ्यास करतात ती मुलं हे बघायचं?
इंडियन सीईओजचं टेकमध्ये यश मिळवणं असेल. कोरियन म्युझिक, टीव्हीने मिळवलेलं ग्लोबल यश असेल.
किंवा सीकेपीसारख्या चिमुकल्या मायनोरिटी समाजातून आलेल्या एका परिवाराकडे महाराष्ट्राने तीन पिढ्या टाकलेला विश्वास असेल.
जनरली लोक इतके रिजिड नसतात की सगळीकडे टक्केवारी डोक्यात ठेवून मोजत बसतील.
ज्यू समाजाचं उदाहरण तर आहेच. फायनल सोल्यूशनच्या आधी हिटलरने असंच त्यांना शिक्षणात जर्मन आरक्षण आणून restrict कर, मीडियात काम करायला बंदी, नाटक सिनेमात, concert hall मध्ये काम करायला बंदी , वकिली करायला बंदी असे प्रकार केले होते. (तुम्ही अगदी पूर्ण बंदी आणत नाही तर तुमची टक्केवारी 1% असेल तर तितकंच काम तुमचे लोक करू शकता असं म्हणत आहात. )
आजही अमेरिकेत ज्यू लोक ठराविक क्षेत्रात ओव्हर रिप्रेझेंटेड आहेत. इवल्याश्या कम्युनिटीकडे भरपूर नोबेल पुरस्कार आहेत. तिथे त्यांच्या सुदैवाने तो गुन्हा होत नाही.
टवणे सर _/\_
टवणे सर _/\_
>अमेरिकेत भारतीय टक्केवारी किती आहे? स्पेलिंग बी मध्ये भारतीय मुलं पुढे असतात. ते लोक यावरून लगेच निषेध निषेध अशी बोंब मारताना दिसले नाहीत.
अगदीच काय च्या काय तुलना व कांगावा ! अमेरिकेत भारतातून केवळ उच्च शिक्षित लोकच मायग्रेट होतात. त्यांच्या मुलांना लहानपणपासूनच चांगले वातावरण मिळते. शिवाय इथे टवणे सरांसारखे लोक बोंब मारत नाहियेत. असे का घडते याचा प्रामाणिकपणे व संवेदनशील पणे विचार करत आहेत. बोंब हा शब्द "इर्शाद" वरून झालेल्या गोंधळाला ला जास्त लागू होतो.
मागच्या अनेक वर्षात स्पेलिंग
मागच्या अनेक वर्षात स्पेलिंग बी मधे भारतीय लोक पुढे असतात हे दिसत आहे. छान. आता याला कारण भारतीय लोकांकडे स्पेलींग तयार करण्यासाठी आवश्यक असणारी बुद्धी /प्रतिभा/स्मरणशक्ती ची नैसर्गिक देणगी आहे. हे काय जे टॅलेन्ट आहे ते जन्मजातच असते असे म्हटले किती हास्यास्पद ठरेल ? आणि जोडीला त्यांची स्वत: ची मेहनत आणि पोषक वातावरण असतेच.
>>> सैराटचे कास्ट बघा, क्र्यु
>>> सैराटचे कास्ट बघा, क्र्यु बघा. त्यात सर्व जातींचे जमातींचे रिप्रेझेंटेशन आहे.
मुळात मुद्दा हा 'हे तपासावं असं कोणाच्या मनात तेव्हा आलं होतं का' असा होता, पण ते जाऊ दे.
हा वरचा इतका मोठा दावा इतक्या पटकन इतक्या नि:संदिग्धपणे केलेला पाहून मला खरंच अचंबा वाटलेला आहे. टवण्यांकडे महाराष्ट्रातल्या सर्व जातीजमातींची (प्रत्येकी निदान पन्नास आडनावांसह) यादी हाताशी असावी आणि चित्रपट पाहण्याआधी ते ती यादी श्रेयनामावलीशी पडताळून घेत असावेत असं एक चित्र डोळ्यांसमोर आलं.
कारण तसं नसेल तर वरचा दावा अपुर्या माहितीच्या आधारे केला गेला आहे, आणि तसं असेल तर 'तुमचा कलाक्षेत्राकडे बघायचा अॅन्गल चुकतोय' हा फेरफटका यांचा निष्कर्ष रिएंफजाय्ज होतो आहे.
काव्य-गायन-वादन कलाक्षेत्रं सर्वसमावेशक नाहीत या दाव्याला काही आधार आहे का या प्रश्नालाही अजून कोणी उत्तर दिलेलं नाही, ती नाहीतच असं गृहित धरूनच चर्चा सुरू आहे.
काल मायबोलीकर भास्कराचार्य यांच्याशी ऑफलाइन झालेल्या चर्चेत एक मुद्दा समोर आला, जो बहुधा इथे अध्याहृत असावा, पण तो स्पष्ट मांडला जाणं आवश्यक आहे.
संमेलनातील कार्यक्रमांसाठी जातीनिहाय सर्वसमावेशन हा नियम किंवा किमान गाइडलाइन ठरवण्याची आणि पाळण्याची जबाबदारी मराठी साहित्य परिषदेची आहे, संदीप खर्यांची नाही.
खर्यांनी त्यांची वेव्हलेन्थ ज्यांच्याशी जुळते असे कोणतेही कलाकार घेऊन कार्यक्रम एरवी जरूर करावा - तसं करायला कायद्याने बंदी नाही.
पण असा कार्यक्रम जर सर्व जातीजमातींचा समावेश करत नसेल, किमान कुठल्याही एका जातीची बहुसंख्या दिसणार नाही अशा प्रकारे बांधलेला नसेल तर असा कार्यक्रम संमेलनात सादर होऊ द्यायचा की नाही हे ठरवायची जबाबदारी साहित्य परिषदेची आहे.
पण ट्रोलिंग साहित्य परिषदेच्या पदाधिकार्यांचं होत नाही, खर्यांचं होतं.
सहज शोध घेतला तर ही एक लिंक
सहज शोध घेतला तर ही एक लिंक सापडली.
इथे म्हटल्यानुसारः
Number of Castes in Maharashtra
A large number of castes and communities in Maharashtra go unrecorded. Local community leaderships often claim that the actual number of castes is very high than the ones recorded.
For instance, the Kaka Kelkar Commission report of 1955 said there were almost 2,400 OBC castes while Mandal Commission report of 1979 said there were 3,743 OBC castes across India.
The numbers of castes and tribes in Maharashtra listed for administrative purposes like reservation are given as below.
Scheduled Castes: 59 castes
Scheduled Tribes: 47 tribes
OBCs: 346 castes
Special Backward Classes: 7 castes
Vimukta Jati (VJ): 14 tribes
Nomadic Tribe (NT-B): 35 caste
Nomadic Tribe (NT-C): 1 caste (Dhangar)
Nomadic Tribe (NT-D): 1 caste (Vanjari)
म्हणजे सर्वदूर सर्वसमावेशकता लागू करायची तर प्रत्येक कार्यक्रमात पाचेकशे कलाकार घ्यावे लागतील.
असो - जोक्स अपार्ट. 'सर्वसमावेशन' हा शब्द या संदर्भात बहुधा दिशाभूल करणारा आहे.
कुठल्याही एका जातीची मेजॉरिटी कुठल्याही कार्यक्रमात असू नये, असा मुद्दा असावा.
(मुळात जात हा विषय डोक्यात येणंच मला पटत नाही हे वर लिहून झालं आहेच.)
त्याहीपुढे "तशी मेजॉरिटी कुठल्याही रॅन्डम कार्यक्रमात दिसली तर ते हेतुपुरस्सर नसलं तरीही भयंकरच आहे आणि त्याबद्दल अन्डररिप्रेझेन्टेड जातीतल्या लोकांनी 'ते कसं बदलता येईल' याचा विचार किंवा आत्मपरीक्षण न करता मेजॉरिटीने दिसणार्या जातीतील कलाकारांचं ट्रोलिंग, निषेध किंवा किमानपक्षी कीव करावी" असंही आहे का?
स्वाती, गंमत म्हणून पान १३ (
स्वाती, गंमत म्हणून पान १३ ( ब्राउसरमध्ये दिसणारं) वरचा तुमचा हा प्रतिसाद
बिंदी' हे जसं (जाहिरातींमध्ये न सापडणार्या) प्रतिकांचं प्रतीक झालं होतं (म्हणे! Proud ), तसा इर्शाद समावेशाचं प्रतीक झाला आहे असं मी या निमित्ताने डिक्लेअर करून टाकते. Proud Happy
Submitted by स्वाती_आंबोळे on 10 November, 2021 - 21:14
“ एकंदर प्रतिवाद बघता इतर
“ एकंदर प्रतिवाद बघता इतर धाग्यावर दिलेला सल्लाच इथे परत देईन” -
इतरत्र तुझं ऐकूनच थांबलो. पण तिथे असामी ज्या भावनेनं लिहीतो, त्याच भावनेनं इथे लिहीतोय. 
“ काव्य-गायन-वादन कलाक्षेत्रं
“ काव्य-गायन-वादन कलाक्षेत्रं सर्वसमावेशक नाहीत या दाव्याला काही आधार आहे का या प्रश्नालाही अजून कोणी उत्तर दिलेलं नाही” - बिंगो!
भरत
भरत

मग ही चर्चा समावेशनाबाबत नसून कुठल्याही एका गटाच्या ओव्हररिप्रेझेन्टेशनबद्ल आहे हे बरोबर असेल तर ती आपण चुकीच्या धाग्यावर करतो आहोत.
धाग्याचा ग्रूप बदलून
धाग्याचा ग्रूप बदलून दिल्याबद्दल धन्यवाद, प्रशासक.
रियली??? या तुमच्या वाक्याला
रियली??? या तुमच्या वाक्याला छेद देणारी सर्वमान्य अशी पटकन आत्ता सुचलेली ठळक उदाहरण म्हणजे भारतरत्न लता मगेशकर आणी किशोर कुमार .याना निसर्गदत्त उत्तम गळा होताच त्याला त्याच्या रियाझ,शिक्षण,सराव याची जोड त्यानी दिली कला,क्रिडा किवा फॉर दॅट मॅटर कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायला भरपुर मेहनत लागतेच
हिमेश रेशमिया याच्यात गाण्याच कुठलही टॅलेन्ट नाही ते त्यानी कितिही मेहनत घेतली अगदी नाकातुन सुद्धा आवाज काढुन बघितला तरी शक्य नाही.>>>>>म्हणजे ज्यांना रेशमिया ऐकायला आवडतो त्यांना गाणं अजिबातच कळत नाही?
छानच चर्चा चालू आहे की.
अरे वा, छानच चर्चा चालू आहे की.
लगे हाथ मायबोली आणि मायबोलीवरील वेगवेगळे लेखनाचे, गप्पांचे ग्रुप्स आहेत ते सर्वसमावेशक आहेत की कसे, तिथे कोणत्या जातींचे किती टक्के रिप्रेझेंटेशन आहे, ते प्रॉबॅबिलिटीला धरून आहे की कसे त्याचे स्टॅटिस्टिक्स येऊ द्या.
एकाच ग्रुपवर मुन्नावरला फक्त
एकाच ग्रुपवर मुन्नावरला फक्त तो मुस्लिम नावाचा आहे म्हणून टार्गेट केल जातय असही म्हणताय जे उघडपणे सिद्ध झालेल नाही पण त्याच ग्रुपवर खरेचा ग्रुप ब्राम्हण आडनावाचा आहे म्हणुन सोमी,समाजमाध्यम यावर ओपनली टारगेट केल जातय तरी त्याच समर्थन होतय... माबोकर पुरोगाम्याचि चान्गलिच पचाइत झालिये.
Submitted by स्वाती_आंबोळे on 4 December, 2021 - 09:5०>>> योग्य पोस्ट!
पण असा कार्यक्रम जर सर्व जातीजमातींचा समावेश करत नसेल, किमान कुठल्याही एका जातीची बहुसंख्या दिसणार नाही अशा प्रकारे बांधलेला नसेल तर असा कार्यक्रम संमेलनात सादर होऊ द्यायचा की नाही हे ठरवायची जबाबदारी साहित्य परिषदेची आहे. दॅट्स सम्स ऑल.
अमेरिकेत भारतातून केवळ उच्च
अमेरिकेत भारतातून केवळ उच्च शिक्षित लोकच मायग्रेट होतात. त्यांच्या मुलांना लहानपणपासूनच चांगले वातावरण मिळते. शिवाय इथे टवणे सरांसारखे लोक बोंब मारत नाहियेत. असे का घडते याचा प्रामाणिकपणे व संवेदनशील पणे विचार करत आहेत. ////
मुद्दा इतकाच की एखादा गट स्पेलिंग बी मध्ये over representative असणं तिकडे स्वीकारलं जातं, गुन्हा ठरवलं जात नाही. ज्यू लोकांचे लोकसंख्येच्या मानाने जास्त प्रतिनिधित्व असणं नाझीज सोडून इतरांना खटकत नाही.
बोंब मारणे- एका टवणेची भाषा संवेदनशील असेल पण फेसबुक वर इतरत्र ज्या गटारी चीप भाषेत घरचे संस्कार दाखवत abusive गरळ ओकली गेली आहे त्याकडे आपण दुर्लक्ष कराल किंवा समहाऊ तेही जस्टीफाय कराल.
येऊ घातलेली संमेलनं अशी असतील
येऊ घातलेली संमेलनं अशी असतील- काही वृत्तपत्र हेडलाईन्स आणि बातम्या
*यंदाच्या संमेलनात अध्यक्षपद A जातिकडे आरक्षित असून त्यामुळे मतदानाचा अधिकार त्याच जातीला असेल.
*दरम्यान, मावळते संमलेनाध्यक्ष यांनी B जातीचं खोटं प्रमाणपत्र दाखवून अध्यक्षपद मिळवल्याचा आरोप कॅबिनेट मंत्री कबाब खविस यांनी केला असून लवकरच सर्व पुरावे देणार आहेत.
*यंदाच्या संमेलनात 4 दिवस अनेक कार्यक्रम होणार असून सर्व कार्यक्रमात लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार जातनिहाय आरक्षण असेल. त्याचे डिटेल्स लवकरच जाहीर होतील. C आणि D जातीच्या संघटनांनी आपल्याला पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नसल्याने संमेलनातील आपलं आरक्षण वाढवावं या मागणीसाठी मोर्चा काढण्याची धमकी दिली आहे.
* ब्राह्मण समाजातील एका लेखकाने कथालेखन केल्यावरून त्याला अटक झाली आहे. ब्राह्मण समाजात लेखकांचे ओव्हर रिप्रेझेंटेशन असल्याने ब्राह्मण समाजातील व्यक्तींना लेखक बनण्यासाठी सरकारी परवाना लागतो आणि त्याला 5 वर्षांची प्रतीक्षायादी आहे. आपण न राहवून कथा लिहिली पण कुठेही प्रकाशित केली नाही असा लेखकाचा दावा आहे. हा नवा बामणी कावा असून हाणून पाडला जाईल असा इशारा विविध मानवतावादी, anti fascism आणि पुरोगामी संघटनांनी दिला आहे.
* 'नाझी विचारसरणीचे आजच्या काळातील धोके' या विषयावर संमेलनात परिसंवाद होणार असून त्यासाठी E, F, G, H जातीच्या लोकांनी अर्ज करावेत.
(जातींची नावं काल्पनिक प्लेसहोल्डर्स आहेत अर्थात.)
>>> अमेरिकेत भारतातून केवळ
>>> अमेरिकेत भारतातून केवळ उच्च शिक्षित लोकच मायग्रेट होतात. त्यांच्या मुलांना लहानपणपासूनच चांगले वातावरण मिळते.
भारतातून न आलेल्या उच्चशिक्षित पालकांच्या चांगल्या वातावरणात वाढणाऱ्या मुलांना स्पेलिंग बी मध्ये भाग घ्यायला बंदी आहे, का असे लोकच अमेरिकेत अस्तित्वात नाहीत? काहीही!
आपल्याकडे समाजात अजूनही
आपल्याकडे समाजात अजूनही सरमिसळ पाहिजे तितकी नाही. सोनारांच्या पद्धती सीकेपी, मराठा, सारस्वत, शिंपी, ब्राह्मण (दलित तर जाऊच दे) ह्यांना माहीत नसतात. ब्राह्मणांना सारस्वत सोनारांमध्ये मुंजी होतात हे माहीत नसते. लोकांची मित्रमंडळे आपापल्या जातीतच असतात. त्यामुळे परंपरागत कसब, हुनर, माहितीची देवाणघेवाण होत नाही. एका अर्थाने सपाटीकरण न होता विविधता जपली जाते, पण त्याचबरोबर ह्या विविधतेला संपर्क माध्यमांतून मान्यता मिळत नाही. उदाहरणार्थ मराठी लिखित माध्यमांतून तुरळक लेखकांचे लिखाण सोडले तर ' चुलीवर मटणाचे बरबाट रटरटत होते ' किंवा ' मी शाळेतून आलो तेव्हा आई तव्यावर मासळी तळत होती' , ' खेळून आल्यावर भूक लागली तेव्हा आईने पटकन तव्यावर अंड्याचा पोळा करून दिला ' असे भोजन संस्कृतीतले घरगुती उल्लेख दिसत नाहीत. कारण माध्यमांमध्ये अशी संस्कृती असणाऱ्यांचा वरचष्मा किंवा प्राबल्य नाही. त्यांची लोकसंख्या कमी आहे हे अर्थातच कारण ठरू शकत नाही. असे लोकसंख्येची कमी टक्केवारी असणारे बहुतेक गट समाजामध्ये प्रभावी नाहीत.
ह्या गटांचे माध्यमांत प्रभावी होणे/ बनणे आवश्यक आहे आणि ते इतरांना पसंत आणि मान्य/ स्वीकारार्ह असणे हेही आवश्यक आहे.
आपल्या बहुविध संस्कृतीचे प्रतिबिंब माध्यमांत पुरेशा प्रमाणात उमटत नाही असे मला वाटते. ते कसे उमटवावे, त्यासाठीच्या लोकमान्यतेच्या धंद्याची गणिते काय असावीत तो वेगळा मुद्दा आहे.
>>अन्डररिप्रेझेन्टेड
>>अन्डररिप्रेझेन्टेड जातीतल्या लोकांनी 'ते कसं बदलता येईल' याचा विचार किंवा आत्मपरीक्षण न करता मेजॉरिटीने दिसणार्या जातीतील कलाकारांचं ट्रोलिंग, निषेध किंवा किमानपक्षी कीव करावी" असंही आहे का?<<
धिस इज एक्झॅक्टली द एफिंग मेंटॅलिटी (पार्डन माय फ्रेंच) वी आर टॉकिंग अबौट. जे अंडरप्रिविलेज्ड आहेत, दे हॅव टु ब्लडि स्टेप अप अँड मेक एफर्ट्स, अगेन्स्ट ऑल आड्स टु रीच अवर लेवल (विच वी इन्हेरिटेड ऑन ए सिल्वर प्लॅटर). अँड बाय्दवे, दे कॅनाट एक्स्पेक्ट ए लेवल फिल्ड फॉर कांपिटिशन. बुल शीट! एक माणुस म्हणुन तुमच्या सगळ्या संवेदना बधीर झाल्या आहेत?
दुसरा टॉपिक - इथल्या पब्लिकला गिफ्टेड आणि टॅलंटेड यातला फरक माहित नाहि, हे आता उघड झालं आहे. गिफ्टेड क्वालिटी म्हणजे दैवी देणगी. जी माझ्या अनुभवानुसार फक्त लताबाईंना मिळालेली आहे. याउलट टॅलंट इज समथिंग दॅट कॅन बी डेवलप्ड अँड क्रिएटेड. तेंडल्या, टायगर वुड्स आईच्या पोटातुन स्विंग कसा करायचा हे शिकुन आलेले नाहित. त्यांच्या यशाचं गमक मेहेनतीत आणि "पोषक वातावरण" यात आहे. सेम गोज विथ किशोर कुमार, हिमेश रेशमिया. दोन टोकाची उदाहरणं, एक कॉमन फॅक्टर - "पोषक वातावरण". मी या कॅटेगोरित भिमाण्णांना पण टाकेन; दैवी देणगी नाहि, पण एक पॅशन, अपार मेहनत आणि स्वतःला झोकुन देण्याची तयारी (परिणामांची पर्वा न करता) यातंच त्यांच्या यशाचं सार दडलेलं आहे...
थोडक्यात, टॅलंट कोणाच्याहि पदरात वरुन टपकंत नाहि, ते अर्न करावं लागतं; जे पोषक वातावरणा शिवाय शक्य नाहि...
टोटली! बोंब हा शब्द जितका
भारतातून न आलेल्या उच्चशिक्षित पालकांच्या चांगल्या वातावरणात वाढणाऱ्या मुलांना स्पेलिंग बी मध्ये भाग घ्यायला बंदी आहे, का असे लोकच अमेरिकेत अस्तित्वात नाहीत? काहीही! >>> टोटली! बोंब हा शब्द जितका ईर्शाद च्या रिअॅक्शनला लागू होतो तितकाच या कार्यक्रमाच्या रिअॅक्शनलाही लागू होतो. पुन्हा एकदा सांगतो - इथल्या संवेदनशील ई प्रतिक्रियांवर जाउ नका. फेबु पाहा.
पुणे विमानतळावर जी काय पेशवेकालीन पेंटिंग्ज लावलेत त्यावरून अमोल कोल्हेने ट्वीट केले आहे आणि नवा वाद वगैरे सुरु होईल असं म्हणतायेत. आता तो विषय पण ह्या धाग्यातच उरकून घ्या. >>> याला मीडियाने व्यवस्थित उचलून धरायला आणि काड्या घालायला सुरूवात केली आहे.
हा एक जागतिक दर्जाचा बिनडोकपणा आहे. पुणे विमानतळावर शिवाजी महाराजांचे एक भव्य पेण्टिंग ऑलरेडी आहे. मुख्य दारातून आत गेल्यावर डावीकडे भिंतीवर आहे. अनेकदा ते पाहिले आहे. कोल्ह्यांनी उगाच हे भडकाउ ट्विट टाकायची आधी जरा विमानतळावर थोडे फिरायचे? ते सोडा, त्याला आणखी वारा घालून भडकावण्याआधी एबीपी वगैरेंनी तरी चेक करायचे?
एबीपीने "यातून नवीन वाद होण्याची शक्यता आहे" च्या पुढे "त्यामुळे आम्ही टीआरपी खेचून घेत आहोत" हे सांगितले नाही फक्त. आणि कोल्ह्यांच्याही "पेशव्यांच्या पराक्रमाबद्दल आदर आहेच पण..." चा अर्थ "त्याबद्दल मी जाहीरपणे बोलणार नाही, ते ब्रिगेडी लोक तुम्हाला सांगतीलच" असाही होतो. नाहीतर पेशव्यांना मधे आणायची गरज नव्हती.
बाय द वे, पुणे विमानतळावर आत फोटो काढायला बंदी आहे. यांनी कोठे काढला माहीत नाही. एक दोन सेल्फी पॉईण्ट आहेत पण हा तेथील वाटत नाही.
> इथल्या संवेदनशील ई
> इथल्या संवेदनशील ई प्रतिक्रियांवर जाऊ नका. फेबु पाहा.
मी फेबु वरील मजकूर वाचलेला नाही. पण अर्थात तिथे खर्यांना पर्सनली ट्रोल केले गेले असेल तर तेही निषेधार्ह च आहे. स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणार्यात जातीयवादी लोकही भरलेले आहेत.
संगीत नाटकांत एखाद्या
संगीत नाटकांत एखाद्या पात्राची गात गात एन्ट्री होते तशी राज यांची एन्ट्रीच कीव करत करत झाल्यामुळे त्यांचं कुठलंच एफिंग वक्तव्य प्रयत्न करूनही सीरियसली घेताच येत नाहीये मला.
Pages