Submitted by DJ. on 13 December, 2018 - 09:45
लहाणपणी सर्वत्र चिमण्यांची चिव-चिव आणि कावळ्यांची काव-काव ऐकु यायची. कधितरी पोपट साद घालायचे. मैनाताई पण थुईथुई बागडताना दिसायच्या. पण या मराठमोळ्या पक्षांनी चिवचिवाट केला अथवा कावकाव केलं म्हणुन कधिही मस्तक उठले नाही.
हल्ली मात्र चिमण्या-कावळे-पोपट लांबुनच दर्शन देउन पसार होतात आणि अत्यंत घाणेरडी अशी परप्रांतीय कबुतरे कितीही हाकलली तरी त्रास द्यायला पुन्हा हजर होत आहेत. सोबत त्यांचे शेकडो सगे-सोयरे आणुन साफ-सफाईचे अगदी ३-१३ वाजवलेत.
गेल्या २-३ महिन्यांपासुन बिल्डिंगची डक्ट, बाल्कनी आणि खिडक्यांच्या ग्रिल्सवर कबुतरांनी उच्छाद मांडला आहे.
त्यांची पिसे, विष्ठा आणि सततची गुटर्रर्रर्र-गु यांमुळे अगदी हैराण झालो आहे.
कबुतरे कायमची हुसकावुन लावण्यासाठी, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांच्या त्रासातुन सुटका होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील..?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मृत्तिका खाणोन घर केलें । तें
मृत्तिका खाणोन घर केलें । तें माझें ऐसें दृढ कल्पिलें ।
परी तें बहुतांचें हें कळलें । नाहींच तयासी ॥ ३४॥
मुष्यक म्हणती घर आमुचें । पाली म्हणती घर आमुचें ।
मक्षिका म्हणती घर आमुचें । निश्चयेंसीं ॥ ३५॥
कांतण्या म्हणती घर आमुचें । मुंगळे म्हणती घर आमुचें ।
मुंग्या म्हणती घर आमुचें । निश्चयेंसीं ॥ ३६॥
विंचू म्हणती आमुचें घर । सर्प म्हणती आमुचें घर ।
झुरळें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ३७॥
भ्रमर म्हणती आमुचें घर । भिंगोर्या म्हणती आमुचें घर ।
आळीका म्हणती आमुचें घर । काष्ठामधें ॥ ३८॥
मार्जरें म्हणती आमुचें घर । श्वानें म्हणती आमुचें घर ।
मुंगसें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ३९॥
पुंगळ म्हणती आमुचें घर । वाळव्या म्हणती आमुचें घर ।
पिसुवा म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४०॥
ढेकुण म्हणती आमुचें घर । चांचण्या म्हणती आमुचें घर ।
घुंगर्डी म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४१॥
पिसोळे म्हणती आमुचें घर । गांधेले म्हणती आमुचें घर ।
सोट म्हणती आमुचें घर । आणी गोंवी ॥ ४२॥
बहुत किड्यांचा जोजार । किती सांगावा विस्तार ।
समस्त म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४३॥
पशु म्हणती आमुचें घर । दासी म्हणती आमुचें घर ।
घरीचीं म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४४॥
पाहुणे म्हणती आमुचें घर । मित्र म्हणती आमुचें घर ।
ग्रामस्त म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४५॥
तश्कर म्हणती आमुचें घर । राजकी म्हणती आमुचें घर ।
आग्न म्हणती आमुचें घर । भस्म करूं ॥ ४६॥
समस्त म्हणती घर माझें । हें मूर्खहि म्हणे माझें माझें ।
सेवट जड जालें वोझें । टाकिला देश ॥ ४७॥
अवघीं घरें भंगलीं । गांवांची पांढरी पडिली ।
मग तें गृहीं राहिलीं । आरण्यस्वापदें ॥ ४८॥
किडा मुंगी वाळवी मूषक । त्यांचेंच घर हें निश्चयात्मक ।
हें प्राणी बापुडें मूर्ख । निघोन गेलें ॥ ४९॥
ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचीती ।
जन्म दों दिसांची वस्ती । कोठें तरी करावी ॥ ५०॥
देह म्हणावें आपुलें । तरी हें बहुतांकारणें निर्मिलें ।
प्राणीयांच्या माथां घर केलें । वा मस्तकीं भक्षिती ॥ ५१॥
रोमेमुळी किडे भक्षिती । खांडुक जाल्यां किडे पडती ।
पोटामध्ये जंत होती । प्रत्यक्ष प्राणियांच्या ॥ ५२॥
कीड लागे दांतासी । कीड लागे डोळ्यांसी ।
कीड लागे कर्णासी । आणी गोमाशा भरती ॥ ५३॥
गोचिड अशुद्ध सेविती । चामवा मांसांत घुसती ।
पिसोळे चाऊन पळती । अकस्मात ॥ ५४॥
भोंगें गांधेंलें चाविती । गोंबी जळवा अशुद्ध घेती ।
विंचू सर्प दंश करिती । कानटें फुर्सीं ॥ ५५॥
जन्मून देह पाळिलें । तें अकस्मात व्याघ्रें नेलें ।
कां तें लांडगींच भक्षिलें । बळात्कारें ॥ ५६॥
मूषकें मार्जरें दंश करिती । स्वानें अश्वें लोले तोडिती ।
रीसें मर्कटें मारिती । कासावीस करूनी ॥ ५७॥
उष्टरें डसोन इचलिती । हस्थी चिर्डून टाकिती ।
वृषभ टोचून मारिती । अकस्मात ॥ ५८॥
तश्कर तडतडां तोडिती । भूतें झडपोन मारिती ।
असो या देहाची स्थिती । ऐसी असे ॥ ५९॥
ऐसें शरीर बहुतांचें । मूर्ख म्हणे आमुचें ।
परंतु खाजें जिवांचें । तापत्रैं बोलिलें ॥ ६०॥
देह परमार्थीं लाविलें । तरीच याचें सार्थक जालें ।
नाहीं तरी हें वेर्थची गेलें । नाना आघातें मृत्यपंथें ॥ ६१॥
असो जे प्रपंचिक मूर्ख । ते काये जाणती परमार्थसुख ।
त्या मूर्खांचें लक्षण कांहीं येक । पुढे बोलिलें असे ॥ ६२॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
नरदेहस्तवननिरूपणनाम समास दहावा ॥ १०॥
https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0...
वीरू आपल्या लिंक्मध्ये असे
वीरू आपल्या लिंक्मध्ये असे लिहिलेय
मानव व कबुतरांचे जवळचे नाते आहे. कबुतर हवेहवेसे वाटते. त्यांना पाळणे, खायला घालणे, लाड करणे, सर्वांना आवडते.
ह्यात कबुतराचेच नाव नाही
रामदासांच्या काव्यामध्ये कबुतराचेच नाव नाही, की कबुतर पत्र पोचवायला वापरत होते म्हणून आवडत होते ?
ईजिप्शियन पाककला शिकून घ्यावी
ईजिप्शियन पाककला शिकून घ्यावी, कबुतरे कमी होतील अन ती करण्यात अर्थार्जन पण होईल की

रामदासांच्या काव्याचा
रामदासांच्या काव्याचा मतितार्थ काय आहे
मला एवढे पद्द्यप्रचुर कळत नाही
तसा मी पक्षी प्रेमी आहे.
तसा मी पक्षी प्रेमी आहे.
अगदी कावळे,चिमण्या,पोपट, घार,salunkhya, महाराष्ट्रात असणारे सर्व पक्षी प्रिय आहेत.
फक्त हे कबुतर च डोक्यात जाते.
वीरू आपल्या लिंक्मध्ये असे
वीरू आपल्या लिंक्मध्ये असे लिहिलेय..>> पुर्ण वाचण्याचे कष्ट घ्या ना सर.
कबुतर निरोप पोचवत असतील ह्या
कबुतर निरोप पोचवत असतील ह्या वर तर बिलकुल विश्वास नाही.
थाप असावी ही.
कोणी फक्त दीन किलो मीटर परिघात कबुतर द्वारे निरोप पोचवून दाखवावा.
एक नंबर च आळशी पक्षी आहे.
फ्लेमिंगो वैगेरे पक्षी आहेत हजारो किलोमीटर अंतर पार करतात आणि आपल्या नैसर्गिक स्थानावर च येतात.
लोकांच्या घरात जात नाहीत.
ते संदेश पोचवू शकतात.
कबुतर?
बिलकुल नाही.
पुर्ण वाचले. खरे खोटे जे असेल
पुर्ण वाचले. खरे खोटे जे असेल ते. फक्त जे मजेशीर वाटले ते कॉपीपेस्ट केले.
कबुतर निरोप पोचवत असतील ह्या
कबुतर निरोप पोचवत असतील ह्या वर तर बिलकुल विश्वास नाही.
>>>
मैने प्यार किया कुठे एवढा सिरीअसली घेता सर.
त्या हम आपके है कौनमध्ये निरोप पोहोचवायचे काम कुत्र्याला दिलेले.
रामदास म्हणतात , मालक
रामदास म्हणतात , मालक फुशारक्या मारत असतो , हे माझे घर म्हणून
पण इतके विविध किडे , पशु पक्षी , नातेवाईक इ लोक त्या घरात रहात असतात व मालक एक दिवस सगळे सोडून निघून जातो
धमाल सुरू आहे इथे. मला वाटलं
धमाल सुरू आहे इथे. मला वाटलं जाळ्या लावा, पिंजरे मागवा असलं काही सुरू असेल.
मी लहान होतो तेव्हा एक कबूतर
मी लहान होतो तेव्हा एक कबूतर पाळला होता. त्याला बोलायला पण शिकवलं होतं. तो कबूतर व्हॉइस sms सारखं काम करायचा. बर्ड फ्लू आला त्यात गेला तो.कबुतरांना शिकवण्याचं परत मी मनावर नाही घेतलं. आता परत सुरू करून एक कबूतर पाच हजार रुपयांना विकण्याचा मानस आहे. मोबाईल टॉवरमुळे खूप प्रदूषण होत आहे. जे लोक्स फटाके उडवू नका प्रदूषण होईल ओरडत असतात ते तर नक्कीच तो कबूतर घेतील आणि मोबाईल फेकून देतील. म्हणजे मायबोलीवरच दहा कबूतर विकले जातील. म्हणजे पन्नास हजार लगेच मिळतील. आणि बाहेरचे अमेझॉन, फ्लिपकार्टवर शंभर एक लोक्स मिळाले म्हणजे पाच लाख. पाच लाख आणि पन्नास हजार साडेपाच लाख लगेच मिळणार. आणि मग हळूहळू बिझनेस वाढणार आणि वर्षाकाठी वीस तीस लाख सहज मिळणार. अक्षय कुमार फिर हेराफेरी मध्ये सुनील शेट्टी आणि परेश रावलला टेरेसवर नेऊन बोलतो पैसाच पैसा तसं काहीसं वाटतंय मला.
एक कबूतर पाळला होता. त्याला
एक कबूतर पाळला होता. त्याला बोलायला पण शिकवलं होतं. तो कबूतर व्हॉइस sms सारखं काम करायचा. बर्ड फ्लू आला त्यात गेला तो.>> भावपुर्ण श्रध्दांजली. तुमच्या दुखात आम्ही सहभागी आहोत.
कबूतर बसण्याच्या नेहमीच्या
कबूतर बसण्याच्या नेहमीच्या जागांवर डांबराच्या गोळ्यांची
naphthalene balls पूड करून पसरवून ठेवा. टेस्टेड उपाय आहे. अर्थात घरात लहान मुले किंवा इतर पाळीव प्राणी नसल्यासच हा प्रयोग करा.
अरे वा मनिम्याऊ.. तुम्ही तर
अरे वा मनिम्याऊ.. तुम्ही तर टेस्टेड उपाय सांगितलात. धन्यवाद. आता काय कबुतर्ड्यांची खैर नाही. मी अर्धा किलो डांबर गोळ्या कुटुन पसरवून ठेवेन गॅलरीत.
हं
हं
पूर्ण गोळी ठेवली तर कबुतर त्याला ढकलून देईल
म्हणून पूड
उशिरा समजले
कबुतर मेले तर डॉ पक्षीराजन
कबुतर मेले तर डॉ पक्षीराजन येईल
रामदास कर्रेक्ट म्हणतात
रामदास कर्रेक्ट म्हणतात
आणि हे आपल्या घरालाच लागू नाही तर वसुंधरेलाही लागू आहे. माणसांनी जमिनी वाटू घेतल्यात. प्राणी गिणतीतच नाहीत.
कबुतरे, डास ,ढेकणे,उंदीर
कबुतरे, डास ,ढेकणे,उंदीर मारतो तेंव्हा निसर्गचक्रात ढवळाढवळ नसते असे पर्यावरण प्रेमी म्हणतात... त्यामुळे गो अहेड..
ज्याप्रमाणे आईन्स्टाईन बोललाय
ज्याप्रमाणे आईन्स्टाईन बोललाय की मधमाशा मेल्या तर तीन वर्षात पृथ्वीवरील मानवजात नष्ट होईल त्याप्रमाणे एक महान शास्त्रज्ञ बोकलत यांनी पण विधान केलंय की सगळे कबूतर मेले तर दोन वर्षात पृथ्वीवरील मानवजात नष्ट होईल. आणि बोकलत हे खूपच महान शास्त्रज्ञ असून त्यांनी वर्तवलेली शक्यता कधीच खोटी ठरत नाही.
कारण शक्यता खरी ठतेपर्यंत दम
कारण शक्यता खरी ठतेपर्यंत दम धरा.असे महान संशोधक बोकलत ह्यांचा हट्ट असतो .
म्हणून त्यांचे अंदाज खरे च ठरतात.
रामदासांनी कबुतर उल्लेखले
रामदासांनी कबुतर उल्लेखले नाही.
पण मांजरदेखील लिहिलेले नाही.
हे दोन सजीव 1700 नंतर भारतात आले की काय ?
आहे आहे मार्जार लिहिले आहे
आहे आहे
मार्जार लिहिले आहे
हिंदी शिनेमावाल्यांनी या गचाळ
हिंदी शिनेमावाल्यांनी या गचाळ पक्षाला ग्लॅमर मिळवुन दिले आहे.
हिंदी सिनेमांनी?
हिंदी सिनेमांनी?
जगभरात कबुतरे हे शांतीचे आणि प्रेमाचे प्रतीक समजले जातात.
हे वाचा.
Throughout human history, pigeons have symbolized love, peace, compassion, wisdom, and power and have been honored as sacred messengers from the gods. The most common pigeon symbolism and spiritual meanings in the ancient cultures that worshipped pigeons were of good luck, divination, healing, peace, and happiness.
एक म्हणजे एकच धरुन बसायचं
एक म्हणजे एकच धरुन बसायचं
आठवडाभर बाहेर होते.
आठवडाभर बाहेर होते.
मास्क , ग्लव्हज , गमबूट , सगळं घालून सफाई करावी लागणार.
कीचनच्या खिडकीची तर अतिशय वाईट अवस्था आहे.
.
Naphthalene पावडरचा उपाय करून बघेन.
गेला आठवड्यात पहिली सोसायटी मिटींग झाली. एक दोन सदस्यांनी कबूतरांचा उच्छाद हा विषय काढलाच. सोसायटीने डक्टमध्ये जाळी लावून घ्यावी अशी सूचना करण्यात आलीयं . बघू पुढचं पुढे. सध्या सफाई करण्याला पर्याय नाही.
सीडी टांगून उपयोग होत नाही
सीडी टांगून उपयोग होत नाही का? चकाकणारी हलती वस्तू. आमच्याकडे कबुतरं घरात यायची थांबली खिडकीत दोन सीडीज लटकवल्यापासून. दीड दोन फूट लांब दोर्याने टांगल्यात.
भरत. ही चकाकणाऱ्या टांगत्या
भरत. ही चकाकणाऱ्या टांगत्या सीडींची कल्पना चांगली आहे. मी तर अराशांची झिरमळ पण लाऊन बघेन.
Pages