Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?
Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हरचंद पालव, व्यवसाय चालेल पण
हरचंद पालव, व्यवसाय चालेल पण ही माथेफिरू मंडळी दुकानांची तोडफोड करून जे नुकसान करतील ते व्हायला नको म्हणून जाहिरात मागे घेतली असेल. दुर्जनः प्रथमं वंदे!
अच्छा. शक्य आहे.
अच्छा. शक्य आहे.
बाकी 'ईर्शाद' म्हणा नाही तर
बाकी 'ईर्शाद' म्हणा नाही तर 'काव्यनवोन्मेषपहाटरम्यप्रकटन' म्हणा, कार्यक्रमाच्या बोरत्वात काही फरक नाही ना? >>>
झुकरबर्गने फेसबुकचे फुकट
झुकरबर्गने फेसबुकचे फुकट दुकान (hate shop) उघडून दिले आहे >>> येस! आणि यातून फायदा फक्त फेसबुकचा आहे.
गझल च्या कार्यक्रमाला इर्शाद
गझल च्या कार्यक्रमाला इर्शाद नाव ठेवणे एकदम योग्य वाटतंय.
नो बिंदी नो बिझनेस बद्दल गोंधळलेली आहे.मी अमेझॉन किंवा तत्सम साईटवर जे कुर्ते घेते त्यातल्या 90% मॉडेल्स नी टिकली लावलेली नसते.
मला स्वतःला छान साडी नट्टापट्टा दागिने कोणाची वेशभूषा असेल तर कपाळावर टिकली बघायला आवडते.किंवा ती टंगाडी मोठी बिंदी केसात घातली असेल तर टिकली दिसतही नाही.
पण 'टिकली नसेल तर खरेदी करु नका, जाहिरात बोअर असेल तर खरेदी करू नका, हिरवे कपडे हिरवे इस्लामिक फॅशन दागिने असतील तर खरेदी करू नका,मॉडेल हसल्या नाहीत तर खरेदी करू नका' वगैरे अजिबात परवडणारं नाही.
मुद्दाम प्रतिकांबद्दल गोंधळ कोणत्याच धर्माच्या लोकांनी घालू नये.ते धंद्याचं, पैश्यांचं गणित आहे.प्रत्येकाचे विचार, प्लॅन वेगळे असू शकतात. जाहिरात कंपनी आणि ज्यांचे पैसे जातात त्यांना ठरवू देत.
इथलं पब्लिक हे सगळं
इथलं पब्लिक हे सगळं पहिल्यांदा होतेय वगैरे करत अचंबित का होतेय? हे सगळं आधीपासूनच चालू आहे. शेफाली वैद्य यांच्या पोस्टखालील कमेंट वाचल्या तर विशिष्ट दुकानातून खरेदी न करणे, ओला उबेर वर मुस्लिम ड्रायव्हर असला तर ट्रिप रद्द करणे वगैरे करतो अस लोकं अभिमानने लिहीत आहेत. आता फक्त वैभव जोशी आणि संदीप खरेंना या सगळ्याची झळ बसली म्हणून गवगवा होतो इतकंच. याबाबतीत फिल्मी यांची पोस्ट अचुक आहे. अजून व्हावं हे सगळं.द्वेषाने सगळं आंधळं झाले की डोळे फोडतील एकमेकांचे तेव्हा जाऊन थंडावतील. कठीण आहे सगळं
"झोमॅटोने मुस्लिम डिलिव्हरी
"झोमॅटोने मुस्लिम डिलिव्हरी पार्टनर हाती माझा खाऊ पाठवल्याने माझा उपास मोडला."
झोमॅटो नमले नाहीत. फॅब इंडिया, तनिष्का, डाबर, जोशी-खरे- मटा नमले.
यापुढे तुम्ही गझला लिहू नका असं वैभव जोशींना सांगितलं जाऊ शकेल.
आकाशवाणी मुंबईच्या डायल इन कार्यक्रमात 'नामंजूर' ही कव्वाली वाजल्यावर "कव्वाली आपल्या संस्कृतीत बसत नाही. अशी गाणी लावून नका," असा फोन आला होता.
मुळात आयुष्यात इतके जास्तीचे
मुळात आयुष्यात इतके जास्तीचे निकष लावायला वेळ कसा मिळतो?
एका नेहमीच्या दिवसात मी खूप लोकांशी कामानिमित्त, शेजारी म्हणून व्यवहार करेन. त्यातले काही भिन्नधर्मिय असतील.काही भिन्न देशीय असतील.काही भिन्न प्रांतीय असतील.यांनी मला रोजगार न देण्याचे,माझ्याशी व्यवहार न करण्याचे ठरवले तर मला घरी हरी हरी करत बसावे लागेल.
आकाशवाणी मुंबईच्या डायल इन
आकाशवाणी मुंबईच्या डायल इन कार्यक्रमात 'नामंजूर' ही कव्वाली वाजल्यावर "कव्वाली आपल्या संस्कृतीत बसत नाही. अशी गाणी लावून नका," असा फोन आला होता. >> मुळात मला 'ती कव्वाली आहे' हेच नामंजूर आहे.
भरत, झोमॅटोचे physical assets
भरत, झोमॅटोचे physical assets नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे. It's an online service company. आणि लोकांना बाहेर खाण्याची इतकी सवय आणि गरज आहे की या काळात झोमॅटोचे ॲप न वापरणे वगैरे ट्रिक्स चालणार नाहीत. शिवाय झोमॅटोवरून आॅ र्डर देणारा जो तरूण वर्ग आहे तो बऱ्यापैकी ग्लोबल आहे. त्याला या साऱ्याशी काही घेणेदेणे नाही.
उद्या तनिष्कचे शोरूम फोडले तर त्यांना परवडणारे नाही.
जाहिरातीत बाया मुलं पुरुष
जाहिरातीत बाया मुलं पुरुष दाखवण्या ऐवजी मस्त काळ्या मखमली वर नुसते दागिने दाखवले फ्लेक्स मध्ये तर सगळेच प्रश्न सुटतील
अर्थात कपडे विकणाऱ्या लोकांना या युक्ती करता येणार नाहीत.हँगरवर लटकलेले नुसते कपडे फ्लेक्स वर वाईट दिसतील.
दिवाळीत काळे कपडे
दिवाळीत काळे कपडे दाखवल्याबद्दल निषेध होईल, तो वेगळाच.
म्हणजे तालिबानसारखेच म्हणा की
म्हणजे तालिबानसारखेच म्हणा की.. आधी या हिंसक लोकाना घाबरून माॅडेल्स दाखवणं बंद केलं की मग कधी माॅडेल दाखवायचं ठरवलं की हजार खुसपटं काढतील. त्या माॅडेलचे कपडे हिंदु स्टाइलचे आहेत की नाही, ते संस्कृतीत बसणारे आहेत की नाही, हेअरस्टाईल हिंदु स्टाइल ऐहे की नाही, भाषा हिंदी आहे की एखादा शब्द उर्दु/फारसी आहे, ते माॅडेल स्वतः हिंदु आहेत की नाही, असले तर ते हिंदु रितीरिवाज पाळणारे आहेत की नाही, हेच सर्व त्यांच्या कुटुंबियांविषयी चेकींग..ते कधी चॅरिटी करतात का, या संकटात किती दिले, त्या संकटात का नाही दिले ..
ही तालिबानायझेशनची यादी अनंत आहे.
यावर मुळात घाव घालायला हवा नायतर वाढत जाणार हे अनेक लोक मागची साताठ वर्ष कोकलून सांगत आहेत पण त्यांना देशद्रोही ठरवून मंद लोक आरामात बसलेत.
हेहे
हेहे
काळ्या कपड्याचे विसरलेच होते.
सुनीती, माझी पोस्ट उपरोधात्मक आहे.
Anti Romeo squad सारखं दुर्गा
Anti Romeo squad सारखं दुर्गा वाहिनीच्या बायकांनी टिकली कुंकू न लावता फिरणाऱ्या हिंदू बायकांना रस्त्यात धरून हळदीकुंकू लावायचा उपक्रम घ्यायला हवा.
झोमॅटोने स्टॅंडही घेतला होता. त्या़च्यावर पुढे कधीतरी आयटी, ईडीची रेड पडते का ते पाहू.
(No subject)
ईर्शाद हा शब्द ऐतिहासिक
ईर्शाद हा शब्द ऐतिहासिक बखरीतही असावा...
इर्शाद—पुस्त्री. हुकूम; आज्ञा; उपदेश. 'रामाजी महादेव यास इर्शाद फर्मावून.' -ख ७.३५६५. 'तिकडील बातमी वरचेवर आणवीत जावी, याप्रमाणें इर्शाद करून खलिता वाचून बहुत श्रमी झाले.' -दिमरा २.१६६. [अर. इर्शाद् = आज्ञा; हुकूम]
https://www.google.com/amp/s/educalingo.com/mr/dic-mr/irsada/amp
या कार्यक्रमात बहुदा गझलाही असाव्यात...मला माहित नाही. जर मराठी शब्द Oxford dictionary त स्थान मिळवत असतील तर काय हरकत?
असे कितीतरी आजचे मराठी शब्द मुळ मराठी नाहीत. भाषा संवाद साधण्यासाठी आहे तो साधला गेला म्हणजे झाले. जर पर्यायी सुंदर, चपखल मराठी शब्द असेल तर जरुर वापरावा पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यासाठी इतरांनी गदारोळ करु नये. ती एक प्रकारची मुस्कटदाबीच.
विक्रेत्याच्या दृष्टीने विचार
विक्रेत्याच्या दृष्टीने विचार केला तर 'टिकली न लावता टाकू म्हणजे सर्व धर्मिय लोक घेतील' असा काही विचारही असू शकेल.म्हणजे दुकानाचे नाव जय अंबे किंवा आई माता किंवा आमिर न ठेवता 'इंपिरियल' वगैरे ठेवणे,तसं.
इतका विचार केलाय का गाजलेले फॅशन शो बघून त्यातले लूक वापरून जाहिराती घाईत बनवल्यात हे बनवणाऱ्यानाच विचारायला हवे.
(असं खूप ठिकाणी वाटतं.म्हणजे मूळ कल्पना ज्याची त्याला बोलावून त्याच्या डोक्यात काही वेगळा संदेश, विचार होता हे त्यालाच विचारणे.)
आणखी एक गोड बातमीhttps:/
आणखी एक गोड बातमी
https://scroll.in/latest/1002663/up-hindutva-group-checks-markets-to-ens...
Kranti Sena had declared that on the occasion of Haryali Teej [on Wednesday], Muslim artists won’t be allowed to apply mehendi [henna] on the hands of Hindu women
मॉडेलने बिंदी न लावणं,
बिंदी-इर्शाद- जश्न रिवाज हे मुद्दे महत्वाचे नाहीत. त्याच्या बेसिसवर लोकांनी खरेदीचा निर्णय घेऊ नये.
पण शेफाली याना एक private citizen म्हणून स्वतःपुरतं असं म्हणण्याचा अधिकार नक्कीच आहे की मला ही जाहिरात आवडली नाही म्हणून मी तो प्रॉडक्ट विकत घेणार नाही.
She isn't forcing others. She isn't inciting violence or law and order disruptions. She isn't targeting any religion or caste as a whole.
Can't she speak for herself?
अशा प्रकारच्या गोष्टी हिंदुत्ववादी आणि पुरोगामी अशा दोन्ही गोटातून होत असतात. त्यामुळे हा जणू काही exclusively हिंदुत्ववाद्यांचा प्रॉब्लेम आहे असा आव आणण्याचा प्रकार विनोदी आहे. दुसऱ्या बाजूने बघितले असता-
2021 च्या जानेवारीपासून शेफाली वैद्य एका मराठी वृत्तपत्रात सदर लिहू लागल्या. तेव्हा हे सदर बंद करा, अन्यथा आम्ही बहिष्कार घालू असा विरोध पुरोगामी गोटातून झाला. ते लेख राजकीय विषयांवर नाहीत. तरीही वैद्यबाईना प्लॅटफॉर्म आणि लेखिका म्हणून legitimacy देण्यास पुरोगामी लोकांचा विरोध होता.( ही मोहीम फेल झाली, सदर अजूनही चालू आहे.)
पुण्यात एका ठिकाणी साध्वी सावित्रीबाई फुले उद्यान अशी पाटी बघून काही काँग्रेस समर्थकांनी त्याचा मुद्दा बनवला. साध्वी शब्दाला विरोध केला. हे भाजपचं कारस्थान आहे वगैरे खोटा कांगावा केला गेला. नंतर सत्य समोर आलं की ती पाटी काँग्रेसच्याच कार्यकाळात लावलेली आहे आणि भाजपचा काही संबंध नाही. आपणच लावलेल्या पाटीबद्दल outrage करण्याचा विनोदी प्रकार बघून जनतेची दोनचार तास करमणूक झाली. नंतर बहुधा पाटी बदलली गेली. साध्वी, साधू हे शब्द खटकण्याचा आणि डिलीट करण्याचा अधिकार मान्यच आहे. इतरांना इतर शब्द(उदा- इर्शाद) खटकले तर त्यांना व्यक्त होण्याचा अधिकार मिळेल का?
Storia नावाच्या एका beverage ब्रँडच्या विनोदी जाहिरातीत राहुल आणि सोनिया यांच्याशी साधर्म्य असलेली पात्रे असल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी कंपनीच्या मुंबईतील कार्यालयावर हल्ला केला. आम्ही जाहिरात मागे घेऊ , हल्लेखोरांवर चार्जेस प्रेस करणार नाही आणि लेखी माफीनामा देतो असं कंपनीने मान्य केल्यावर प्रकरण मिटलं.
https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/congress-workers-ransac...
मुळात शेफाली आणि तत्सम लोकांना फॉलो करणाऱ्या सगळ्यांना ते सगळं लिहिलेलं अगदी मान्यच असतं असं नाही. पण storia वरचा हल्ला खटकत नाही आणि शेफालीबाईनी मी अमुक ब्रँडचे कपडे घेणार नाही म्हटलं की जगबुडी झाल्यागत outrage करायचं या पुरोगामी दुटप्पीपणाला लोक वैतागलेले असतात.
दोन्हीकडच्या लोकांनी एकत्रपणे दोन्हीकडच्या कट्टरतेला विरोध करायला हवा. पण आमच्याकडे आहे बुवा कट्टरता असं उजवीकडची गाबडी निदान मान्य तरी करतात.
इर्शादला असलेला प्रॉब्लेम मला
इर्शादला असलेला प्रॉब्लेम मला तरी कळलेला नाही; पण जश्न रिवाज मला तरी पब्लिसिटी stunt वाटले. मुद्दामून उचकवण्यासाठी केलेला प्रयत्न. सगळंच अर्धवट. Collection आहे, तर तेही कुठे mention नाही; दिवाळीचा माहोल पण विचित्र.
खर तर आपल्या मराठी लोकांना मराठीत शुभेच्छा द्यायला का आवडत नाही हे मला तरी कळलं नाहीये. इथे यूरोप ला आल्यावर मातृभाषेचा आग्र्ह/महत्व समजतो. आणि त्याचा पुरोगामी/प्रतिगामी पणाशी संबंध तर अजिबात झेपत नाही.
इथे यूरोप ला आल्यावर
इथे यूरोप ला आल्यावर मातृभाषेचा आग्र्ह/महत्व समजतो.
म्हणून मायबोली आयडी इंग्रजीत ठेवला आहे का??? ईट ऍपीयर्स कूल यू सी.
पी एन जी वाद नक्की आठवत नाही,
पी एन जी वाद नक्की आठवत नाही, पण अतिशय भयाण दुःखी चेहरा करून कोणीतरी मराठी सिरीयल मधली मॉडेल आहे त्या पोस्टरवर
अरे हे वाचलंच नव्हतं म्हणून
अरे हे वाचलंच नव्हतं म्हणून चुकीच्या जागी एक प्रतिसाद लिहून आले. पण फुकटचे जाल आउटरेज आहे. मी दोन च दिवस आधी फॅब इन्डियातून बक्कळ खरेदी केलेली आहे. तिथे जबरी नवे कपडे व दिवाळीचे दिवे गिफ्टस साबण उटणी तेले आले आहे. अग्दी सुरेख सिरॅमिकच्या पणत्या पण आहेत. ते आता परत येउन घेतो म्हणून निघालो. फर्निचर पण मसत मिळाले ते फिट करायला आले त्या लेबर व स्टाफला दिवाळी दिली.
शेफाली बाई कायम हेट पोस्टी लिहीत अस्ते. चिन्मई व सुमीत राघवन ह्यांचा पण तिच्या बरोबर फेसबुकी राडा झाला. पण त्यात तिने फुकटची मिळालेली ठिगळी साडी ल्हिले आहे ते वाचोन मात्र हह पुवा झाले. आता सारा उखडेल. अजून ज्वल्त पोस्टी लिहील ही सुडो प्रिव्हिलेज्ड पुरोगामी आहे. काय वेळ असतो ब्वा पब्लिक कडे.
@झम्पू दामलू - माझा id बराच
@झम्पू दामलू - माझा id बराच जूना आहे ७-८ वर्ष जूना , student असताना काही माहितीसाठी काढलेला.....तो बदलला नाही. तेंव्हा Yahhomail account च नाव ठेवलं होत....त्यात काय cool ? हाच तर मुद्दा आहे....
https://www.loksatta.com/pune
https://www.loksatta.com/pune/sandeep-khare-vaibhav-joshi-diwali-pahat-p...
काव्य पहाट नाव झालंय आता त्या कार्यक्रमाचं. असेच वागत राहीलो तर ही सहिष्णू हिंदू धर्माच्या अस्ताची पहाट असेल. फारच दुर्दैवी
संदिप खरे किंवा वैभव जोशींची काही चूक नाही यात. एक सुसंस्कृत समाज म्हणून आपणच कुठेतरी कमी पडत आहोत हे नक्की.
या धाग्यामुळेच याबद्दल समजले.
या धाग्यामुळेच याबद्दल समजले. मला वाटते मुद्दाम पब्लिसिटी स्टंटसाठी हे ईर्शाद नाव देण्यात आले आहे.
ईर्शाद शब्द मूळचा ज्या भाषेतील असेल ते असेल, पण माझ्यासारखाय भाषा पंडित नसलेल्या सामान्य लोकांच्या डोक्यात उर्दू शेरोशायरीच्या वेळेसच अर्झ करता हू, गौर फर्माईयेगा, ईर्शाद ईर्शाद वगैरे म्हटले जाते हे पक्के आहे. मग मुद्दाम ते नाव ठेवायची गरज काय आहे? तर पब्लिसिटी स्टंट. नुकतेच ते फॅब ईंडियाचे जश्न ए रिवाज कसे फेमस झाले तसेच हे करायचे असावे आणि तीर निशाणेपे. मायबोलीवर धागा आला, शंभरेक पोस्ट होताहेत, और क्या चाहिये दिवाली मे.. अन्यथा दिवाळीच्या पहाटे काव्यगायनाचे पोग्राम किती जण बघतात हि एक शंकाच आहे.
एकदा पब्लिसिटी मिळाली की मग कदाचित ते नाव बदलतीलही. लोकांच्या भावना लक्षात घेऊन वगैरे म्हटले जाईल.
पण मुळात आपल्याला पब्लिसिटी मिळावी म्हणून यात जाणूनबुझून भावना भडकवून आपली पोळी भाजून घेतली आहे.
ईर्शाद हे नाव त्या
ईर्शाद हे नाव त्या कार्यक्रमाला आधीपासूनच आहे. आम्ही २०१८ च्या दिवाळीत हा कार्यक्रम पुण्याला यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी पाहिला आणि ऐकला होता. अतिशय सुंदर रंगला होता. सावनी शेंडेही उपस्थित होती स्टेजवर.
ऋन्मेष, सगळे इतके उथळ नसतात
ऋन्मेष, सगळे इतके उथळ नसतात की पब्लिसिटी साठी असले स्टंट करतील.
जिज्ञासा +१
जिज्ञासा +१
आणि त्या कार्यक्रमाला अशा उथळ पब्लिसिटीची गरजही नाही.
माबोवर १०० पोस्टीसारख्या पब्लिसिटीची तर नक्कीच नाही.
हा फार जुना कार्यक्रम आहे, नाव सुरूवातीपासूनच ' इर्शाद'च आहे.
Pages