इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑनेस्टली सांगायचे तर दिवाळी च्या ट्रॅडिशनल वेअर च्या जाहिरातीत ४-५ पैकी एकाही मॉडेल ने चुकूनही कुंकू न लावणे हे फॅबनेही एक प्रकारचे स्टेटमेन्टच केले आहे का? >>

याबाबतीत माझे निरीक्षण हे २०११-१२ चे आहे. आता काय बदल झालेत माहीत नाही. तेव्हा हे सहज जाणवत होते की उच्च मध्यमवर्गीय डेमोग्राफिकला समोर ठेवून जी उत्पादने विकली जातात त्यातील लोक हे सहसा मॉडर्न कपडे घालतात. स्त्रिया साडी वा कुंकू लावत नाहीत. निम्न मध्यमवर्गीय लोकांकरता ज्या जाहिराती असतात त्यात साडी व कुंकू दोन्ही असे (व "मिसेस" कोणीतरी असा उल्लेख). हे एक दोन जाहिरातींवरून पाहिलेले नाही. असंख्य पाहिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत हे लक्षात येण्याइतक्या जाहिराती पाहिलेल्या नाहीत.

फॅब इंडियाची नक्की कोणती जश्न-ए-रिवाज जाहिरात माहीत नाही. मी फेबु वर एक फोटो पाहिला त्यात हिरवे कपडे घालून दोन स्त्रिया अजिबात न हसता दाखवल्या होत्या. "दिवाळी" म्हंटल्यावर समोर येणारे कोणतेही व्हिज्युअल त्यात नव्हते. मुळात ती मूळची ईद करता असलेली जाहिरात ढकला काही दिवस अजून असे म्हणून कोणीतरी रि-पर्पज केल्यासारखी वाटली.

पण हा सगळा मार्केटिंग व ग्राहक यांच्यातील मामला आहे. त्यातून कल्चर बिल्चर धोक्यात यायचा संबंध नाही. पब्लिकला आवडले नाही तर ते विकत घेणार नाहीत. पु.ना. गाडगीळ वगैरेंकडे जाणारे पब्लिक जाहिराती बघून मुळातच जात नसावे.

आणि यातून काही षडयंत्र वगैरे असणे म्हणजे - एखाद्या इस्लामी किंवा ख्रिश्चन संघटनेकडून विविध पब्लिक ट्रेडिम्ग कंपन्यांना पैसा जात आहे. त्यातील मार्केटिंग विभागात त्यांचे हस्तक घुसले आहेत. ते कंपनीचा फायदा, स्वतःचे करीयर वगैरे सोडून धर्मप्रसाराचे कार्य हाती घेत आहेत. त्यांचे बॉस लोकही आपला माल खपो वा न खपो, आज कुंकू न दाखवण्यापासून सुरूवात कर. उद्या एकदम मेंदी-दाढी दाखव असले सल्ले देत आहेत. त्यातून त्यांची विक्री/फायदा फाफलला व शेअर कोसळला तरी विविध गुंतवणूक दार चालवून घेत आहेत (ते ही यात सामील आहेत) - असे चित्र डोळ्यासमोर आले.

मार्केटिंग विभागात त्यांचे हस्तक घुसले आहेत. ते कंपनीचा फायदा, स्वतःचे करीयर वगैरे सोडून धर्मप्रसाराचे कार्य हाती घेत आहेत. त्यांचे बॉस लोकही आपला माल खपो वा न खपो, आज कुंकू न दाखवण्यापासून सुरूवात कर. उद्या एकदम मेंदी-दाढी दाखव असले सल्ले देत आहेत. त्यातून त्यांची विक्री/फायदा फाफलला व शेअर कोसळला तरी विविध गुंतवणूक दार चालवून घेत आहेत (ते ही यात सामील आहेत) - >>>> फा Lol
त्या तनिष्क च्या जाहिरातीचा असाच ओढून ताणून काढलेला अर्थ होता. लव जिहाद वगैरे ऐकून थक्क झाले होते.

फा Lol

फॅबच नाही, आता बरेच ब्रॅन्ड्स गोवले गेलेत यात. >> हो तनिश्क वगैरे ही आलेत त्यात. सगळा सावळा मूर्खपणा आहे. भाचा म्हणतो तसे दुकान कसे चालते ह्यांना ?

>>>>>>>>सामो, तुम्ही भाषा आणि धर्म यांत गल्लत करताहात का?
हिंदुत्ववादी लोकं भाषेकरता फक्त विरोध करत आहेत की त्यामध्ये 'धर्म' हा छुपा अंडरकरंट आहे?

>>> हिंदुत्ववादी लोकं भाषेकरता फक्त विरोध करत आहेत की
'ईर्शाद'ला? फक्त भाषेवरून! फक्त कार्यक्रमाच्या नावाच्या भाषेवरून.

>>>>>>>>>>'ईर्शाद'ला? फक्त भाषेवरून! फक्त कार्यक्रमाच्या नावाच्या भाषेवरून.
सॉरी मग मी चूकीचे समजले. भाषा काहीही द्या कन्नड्/तमिळ काय फ्रेन्च व जर्मन नावंही द्या काव्यवाचनाला. काही फरक पडत नाही.

खान-कुरेशी मराठी भाषिकच असू शकतात की. मुद्दा सविस्तरच लिहायचा तर - फॅब इंडियाचे प्रकरण (वैयक्तिक अनुमोदन नसले) तरी एकवेळ समजू शकते - फॅब इंडियासारख्या परकी कंपन्या जेव्हा एखाद्या देशात व्यवसाय करतात तेव्हा त्या त्या देशाची संस्कृती जाहिरातीत इ सांभाळावी इ अपेक्षा असणे व त्यावरून त्यांना 'कॅन्सल' करणे ह्यात नुकसान परकीय कंपनीचे जास्त होते. (त्यांचे कारागीर भारतीय असतात हे लोकं विसरतात. मात्र तो मुद्दा नाही कारण त्यांना तसंही अल्प मोबदला मिळतो). "इर्शाद" प्रकरणात आक्षेप घेऊन काय होणार- मराठी भाषिक व्यक्तींचेच, भारतीय नागरिकांचेच नुकसान होणार. मग ती जोशी-खरे असली काय नि मराठी भाषिक खान-कुरेशी असली काय... वैद्यबाईंना नक्की काय साधायचे होते? इर्शाद ऐवजी "बोला दाजीबा" नाव ठेवायचं काय आता...

>>> मुसलमान लोकं मेन स्ट्रीम मध्ये आहेत का भारतात की ते स्वतःची वेगळी आयडेंटिटी जपतात
मेनस्ट्रीम म्हणजे काय असायचं असतं? कलाकार आहेत, खेळाडू आहेत, सगळ्याच क्षेत्रांत आहेत की!

त्यांचे कारागीर भारतीय असतात हे लोकं विसरतात. >>> सी, पण या कारागिरांनीतरी सांगायला नको का? उद्या ओल्ड नेव्हीची स्प्रिंगमधे येणारी जाहिरात ख्रिसमसला वापरली तर कसे चालेल Happy तेथे तो खास ख्रिसमसी लाल रंग, स्नोफ्लेक्स वगैरे व्हिज्युअल्स हवेतच.

करेक्ट अब्दुल कलामही मुसलमानच होते. कमालीचे हुषार व उच्च लोक आहेत - सर्व धर्मात.
त्यामुळेच म्हटले - स्वतःचे स्वतः ठरवा.

मुसलमान लोकं मेन स्ट्रीम मध्ये आहेत का भारतात की ते स्वतःची वेगळी आयडेंटिटी जपतात
मेनस्ट्रीम म्हणजे काय असायचं असतं? कलाकार आहेत, खेळाडू आहेत, सगळ्याच क्षेत्रांत आहेत की!

>> एक्झॅक्टली. आणि दोन्ही एकाच वेळेस असू शकते की. इकडे आल्यावर आपणही काही ख्रिश्चन होत नाही. भारत देश, राज्यघटना व एकूण समाज यांच्याशी बांधिलकी असणे आवश्यक. बाकी तुम्ही हिरवे कपडे घाला किंवा भगवे. फक्त दाढी ठेवा नाहीतर एकदम करारी मिशा. घूँघट घ्या नाहीतर बुरखा. जोपर्यंत दुसर्‍याला त्रास नाही तोपर्यंत काय फरक पडतो.

ओल्ड नेव्हीपेक्षा स्टारबक्सचा ख्रिसमस कप वरचा वाद अधिक चपखल उदाहरण आहे. स्टारबक्सने केवळ लाल रंग व इतर कुठलेही 'मेरी क्रिसमस' इ नसलेले कप काढले. काही लोकांना त्याबद्दल आक्षेप होता.

फॅब इंडिया भारतीय ओनरशिप नाहीये. (एवढ्यात बदलले असेल तर माहिती नाही).

>>>>>>>>>>>>भारत देश, राज्यघटना व एकूण समाज यांच्याशी बांधिलकी असणे आवश्यक.
+१०००
आणि या निकषावर भारतिय मुस्लिम समाज हा मेन्स्ट्रीमच्च आहे. तेव्हा माझे विधान मग सोपे झाले. 'इर्शाद' शब्दाला हरकत घेण्याचे कारण नाही. कारण हा फक्त पाकिस्तानी ( शत्रुराष्ट्र) शब्द नाही तर भारतिय शब्द आहे.

फारेन्ड खूप धन्स.

>>> फॅब इंडिया भारतीय ओनरशिप नाहीये
ओह ओके. नावात इंडिया आहे आणि दिल्लीत सुरू झाली एवढंच पाहिलं मी. Happy

पण या कारागिरांनीतरी सांगायला नको का? >>

हातमागावरच्या कारागिरांनी मार्केटिंग डिपार्टमेंटला ॲडविषयी काही सांगावं ही अपेक्षा त्या गुंतवणूकदार इ. षडयंत्राच्या चित्रापेक्षा काही फार वेगळी वाटत नाही. Proud

(अवांतरः भास्कराचार्य यांनी "सुईधागा" हा सिनेमा पाहिला नसल्याचे निदर्शनास येते. कारागीर मार्केटींगला सल्लाच काय, तो/ती काहीही अगदी फॅशनशो ही करू शकतो. )

भा Lol

Thanks स्वाती , माझ्या नजरेतून लिंक सुटली.

शेफाली वैद्य दुसरी कंगना बनण्याच्या मार्गावर आहे. नुसत्या पोस्टी लिहायच्या. या बाईला कार्येक्रमाचं नाव सुद्धा माहीत नव्हतं उगाच मंदपणा दाखवायचा ते पण असा पब्लिकली!
I am sure यांनी किती डोकं आपटलं तरी बघणारे बघायला जाणारच हा कार्येक्रम कारण आम्ही बर्याच काळापासून वाट बघतोय.

या सगळ्यात मला वैभव किंवा संदीप ची एकही पोस्ट दिसली नाही आमचं कसं बरोबर आहे वगैरे सांगणारी हे मला फार आवडलंय. अशा उगाच च्या काँट्रॅव्हरसीला ignore करणंच जास्त योग्य आहे.

₹रच्याकने शेफाली हे नाव मराठी आहे का? त्याचा मराठीत काय अर्थ होतो म्हणे?

हिंदुत्ववादी लोकं भाषेकरता फक्त विरोध करत आहेत की त्यामध्ये 'धर्म' हा छुपा अंडरकरंट आहे? >> धर्म हा छुपा नसून उघड उघड करंट आहे.

>>> शेफाली हे नाव मराठी आहे का? त्याचा मराठीत काय अर्थ होतो म्हणे?
संस्कृत आहे, शेफाली म्हणजे प्राजक्त.

पण संस्कृत म्हणजे मराठी नाही ना Proud सरळ प्राजक्ता करायचं की नाव कशाला असलं फॅन्सी? ही आहे का आपली संस्कृती? अं?
तसं तर सगळ्या भाषा संस्कृत आणि तामिळ पासून बनल्या असतील तर मराठी आणि उर्दू बहिणी झाल्या की नाही? मावशीशी कोणी असं वाईट वाटतं का? वेडीच आहे ही

शेफारलीताई आत्ता माहीत झाली वाटतं बरैचजणांना. 2013 पासून विषारी पोस्टी टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि भाजपा-हिंदुत्ववाद्यांची अतिलाडकी आहे. लाखानी फाॅलोअर आणि हजारानी लाइक्स. आधीच्या तिच्या पोस्टी पटल्या असाव्यात, आता चक्क पुणेरी खरेजोशींची अडवणुक चालु झाल्यावर विरोधाचा सूर लागतोय.. छाने. .

बाकी या कंपनीवर बहिष्कार, त्या जाहीरातीवर बंदी, दुकानं फोडाफोडी.. हेच का म्हणे यांचं इज ऑफ डुइंग बिझनेस!!! लोल.

लोल भा - पण मार्केटिंग वाले स्थानिक इन्पुट्स घेतात विविध विभागांमधून.

कारागीर मार्केटींगला सल्लाच काय, तो/ती काहीही अगदी फॅशनशो ही करू शकतो. >>> सी Lol द बर्निग ट्रेन मधे विनोद खन्ना (आख्खी) गाडी डिझाइन करतो. तिच्या प्रवासातील ऑपरेशनल हेडही तोच असतो. तसेच असावे Happy

Pune-based author and speaker Shefali Vaidya, also famous on social media for her collection and knowledge of Indian textiles and sarees has been appointed as a member in a specially constituted committee formed by the Ministry of Textiles.

भारताच्या अर्थमंत्रीसुद्धा त्यांना चर्चेसाठी बोलवतात.

पण हा सगळा मार्केटिंग व ग्राहक यांच्यातील मामला आहे. त्यातून कल्चर बिल्चर धोक्यात यायचा संबंध नाही. पब्लिकला आवडले नाही तर ते विकत घेणार नाहीत. पु.ना. गाडगीळ वगैरेंकडे जाणारे पब्लिक जाहिराती बघून मुळातच जात नसावे. >> सहमत.

बाकी 'ईर्शाद' म्हणा नाही तर 'काव्यनवोन्मेषपहाटरम्यप्रकटन' म्हणा, कार्यक्रमाच्या बोरत्वात काही फरक नाही ना? Wink

स्वाती_आंबोळे, Happy किती सुरेख कविता आहे ना पण तिची आठवण होणे हे नको वाटते. ही कविता वाचली की अस्वस्थ वाटतं मला! कवी हा क्रांतदर्शी म्हणजे पारदर्शी असतो - काळाचा पडदा सारून पुढचे पाहणारा. ते जाणवते अगदी!

फॅब इंडिया च्या दिवाळीच्या जाहिराती या ज्या ग्राहकांसाठी असतात त्यांची दिवाळी फार वेगळी असते. त्यांच्या एरवीच्या इंग्रजाळलेल्या लाईफस्टाईलला साजेशी! त्यांच्यासाठी जश्न ए रिवाज ही एक एथनिक टर्म आहे. And Diwali is ethnic. So it works.
झुकरबर्गने फेसबुकचे फुकट दुकान (hate shop) उघडून दिले आहे - त्यावर बसून आपल्या मतांच्या पिंका टाकणे हा अनेकांचा फुल टाईम व्यवसाय आहे. देशभक्ती, हिंदुत्व, भाषा हे यांचे आवडते विषय. आपल्या अति संकुचित पट्टीने लोकांची लायकी मोजणे आणि सर्टिफिकीटे वाटणे हा शेफाली वैद्य आणि प्रभृतींचा आवडता खेळ आहे. या खेळापायी कोणाचा जीव गेला तरी यांना काही फरक पडत नाही.
अशा विखारी लोकांना जास्त फूटेज देणे म्हणजे मनस्ताप करून घेणे आहे. माझ्यापुरते मी या सगळ्यापासून दूर रहायचे ठरवले आहे. त्यातून वाचलेला वेळ हा मी पर्यावरण संकट, इकॉलॉजी या विषयावर वाचन, मनन करण्यात घालवते.

फॅब इंडिया च्या दिवाळीच्या जाहिराती या ज्या ग्राहकांसाठी असतात त्यांची दिवाळी फार वेगळी असते. त्यांच्या एरवीच्या इंग्रजाळलेल्या लाईफस्टाईलला साजेशी! त्यांच्यासाठी जश्न ए रिवाज ही एक एथनिक टर्म आहे. And Diwali is ethnic. So it works. >> पण हे जर खरं असेल, तर फॅब इंडियाला असल्या नो बिंदी हॅश्टॅग्सना घाबरायचं काहीच कारण नाहीये. त्यांचा पोटेन्शियल ग्राहक त्यांचे कपडे घेईलच की.

Pages